डोक्याला शॉट [ (पेट्रोल) पंचमी ]

गड्डा झब्बू's picture
गड्डा झब्बू in जनातलं, मनातलं
28 Nov 2020 - 1:05 am

हेल्लो फूल्स...

आवाक झालात ना ? मी आज नमस्कार चमत्कार करायचा सोडून तुम्हाला डायरेक्ट हेल्लो फूल्स... म्हणतोय म्हणून...
येस...आय न्यू धिस! मला हे आधीच माहित होतं की मी असं बोलल्यावर तुमच्या थोबाडावर असेच बावळट भाव येतील म्हणून...
कसं ते विचारा... लाजतांय काय असे विचारायला? संकोचू नका, बिंदास विचारा की मला हे आधीच कसे काय माहित होतं म्हणून...
भले शाब्बास विकुशा, मला हे ही माहित होतं की तूच हे विचारणार, आणि आता कसं ते सांगतो कारण, तु विचारलंच आहेस म्हणून...
कोणीही विचारलं नसतं तरी मी ते रेटून सांगितलंच असतं, कारण मला ते काहीही करून तुम्हाला सगळ्यांना सांगायचंच होतं म्हणून...
अरे विकुशा, आता परत हा फालतू प्रश्न का विचारतोयस की कोणीही विचारलं नसतं तरी मी ते का सांगितलं असतं म्हणून...
आता बिलकुल फाजीलपणा न करता विकुशा तु आणि बाकी सगळ्या बावळटांनो तुम्ही पण निमुटपणे ऐकून घ्या, कारण मी सांगतोय म्हणून...

मी आता तुमच्यासारखा सामान्य मानव राहिलो नाहीये, तसा मी आधीही तुमच्या सारखा सामान्य मानव नव्हतोच कधी, पण आता मी एक सिद्ध पुरुष झालेलो आहे. मला अक्युमनची दैवी देणगी आणि निर्विचारी विदेहत्व प्राप्त झालेले आहे!

अविचारी नाही रे विकुशा, नि... हि... र... वि... हि.. चा... हा... री... आता पुन्हा मधे मधे फालतू बडबड करू नकोस नाहीतर एक थोतरीत देईन ठेऊन... मग बोंबलू नकोस मी आधी सांगितले नाही म्हणून...

तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे मागे माझे गुरु इहलोक सोडून गेले. त्यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत अक्युमनच्या दैवी देणगीचा प्रचार केला पण त्यांनी जाता जाता ती सिद्धी मी सोडून आणखी कुण्णाला म्हणजे कुण्णालाही दिली नाही!
इतकी मोठी दैवी देणगी हाताळण्यासाठी लागणारी कुवत तेवढा वकूब त्यांना माझ्यातच सापडणार याची खुणगाठ मी आधीच मनाशी बांधून ठेवली होती. कारण मी काय चीज आहे हे मी पण चांगलाच ओळखून होतो आणि ते पण!

१- मी
२- मी म्हणजे मी
३- मी म्हणजेच मी
४- मी म्हणजे मीच
५- मीच म्हणजे मी

अशी मी, माझा इतरेजनांना परिचय करून देण्यासाठी माझी मीच तयार केलेली माझीच पंचसूत्री ओळख त्यांना फार आवडत असे. ते कायम कौतुकाने मला म्हणत असत, की तु (म्हणजे मी) जन्मजात सिद्ध आहेस!

मी जशी कल्पना केली होती झालेही तसेच. गुरुवर्यांनी ती सिद्धी देण्यासाठी माझीच निवड केली. आणि मी काय सांगु तुम्हाला, त्यांनी अनुग्रह दिला त्यावेळी माझ्या मुखकमला वर असे काही सायुज्य भाव पसरले आणि देह मोरपिसासारखा हलका होऊन आकाशात ढगांमधून तरंगतोय असे वाटायला लागले कि बस्स, आणि तेही एल. एस. डी. चे सेवन न करता... आता बोला! बोला बोला...

बसली ना दातखीळ?

अरे तुम्ही काय बोलणार आणि मी काय तुमचे ऐकणार... तर आता पुढे मी काय सांगतोय ते तुम्हीच ऐका! कारण धिस इज व्हेरी इंटरेस्टिंग...

मी आता सिध्द पुरुष झालेलो आहे त्या अधिकाराने मी तुम्हाला सांगतो... तुम्ही सगळेजण सुद्धा सिध्द आहात!
नाही ना विश्वास बसत? अरे बावळटांनो मान्य करा ही गोष्ट, कारण मी सांगतोय म्हणून...

हां, तर मी काय सांगत होतो? हा आठवलं मी सांगत होतो की तुम्ही सगळेजण सिध्द आहात, पण तुमच्या आणि तुमच्या सिद्धात्वाच्या आड येतोय तुमचा तो जड देह!
अजून नाही समजलं मी काय म्हणतोय ते? ठीकाय मग मी थोडं सोपं करून सांगतो...
तुम्ही सगळेजण सिध्द आहात, पण तुमच्या आणि तुमच्या सिद्धात्वाच्या आड येतोय तुमचा तो जड देह! एकदा का तुम्ही त्या जड देहापासून विलग झालात की तुम्हाला निर्देहत्व प्राप्त झालेच म्हणून समजा!
तुम्ही म्हणजे देह नाही आणि देह म्हणजे तुम्ही नाही! तुम्ही वेगळे आहात आणि तुमचा देह वेगळा आहे! टाकून द्या तो युसलेस हाडामासाचा जड देह जो तुमच्या सिद्धत्वाच्या वाटेतला एकमेव अडसर आहे!
एकदा विदेही, निर्देहत्वाची अवस्था प्राप्त झाली की लगेच तुमच्या लक्षात येईल आणि मी नाही तुम्हीच म्हणाल अरेच्चा आपण तर वेगळे आहोत, आपण या देहात राहातच नाही, हा तर रिकामा आहे, आपल्याला याची गरजच नाही!

आहे कि नाही सोपं? पण इथेच तुम्ही मार खाताय! हे वाटतंय तेवढं सोपं नाही!

तुम्हाला आधी ते सोपं वाटलं कारण तुम्ही सध्या वडापाव.कॉम वर पडलेले असता जीकडे अनेक भोंदू बाबांचा सूळसुळाट झाला आहे!
सहज सोप्या अध्यात्माच्या नावाखाली वाट्टेल ते लिहून तिथे लेख पाडले जात आहेत! तुमच्या सारखी बावळट माणसे ते लेख वाचतात आणि फसतात!
तिकडे एक बाबा तुम्हाला मृत्यूवर प्रेम करायला सांगेल, दुसरा बुवा उंट छाप चैतन्यचूर्ण सेवनाची विधिवत कृती सांगेल. तिसरा सर्वज्ञानी भरतनाट्यम केल्यासारख्या हातांच्या मुद्रा करायला सांगेल!

पण मी तुम्हाला सांगतो... टेक इट फ्रॉम मी... तो सगळा भंपकपणा आहे! निर्देहत्व प्राप्त करण्यासाठी आधी मनाची निर्विचारी अवस्था प्राप्त करणे अतिशय गरजेचे आहे!

निर्विचारी अवस्थेतून पुढे निर्देहत्व प्राप्तीसाठी मी "निर्विचारातून विदेहत्वाकडे" नावाचा एक महान एकपानी ग्रंथ लिहिला आहे.

फक्त एकपानी? असा बाळबोध प्रश्न काय विचारतोयस विकुशा? अध्यात्म तेवढ सोपं आहे रे , पण प्रकांड पंडितांनी ते तुमच्यासारख्या बावळट लोकांना समजायला नको म्हणून अवघड करून ठेवलं आहे बस्स...

नाही ना विश्वास बसत? अरे बावळटांनो मान्य करा ही गोष्ट, कारण मी सांगतोय म्हणून...

निर्विचारी अवस्था प्राप्त करण्याच्या साधनेची माझ्या महान ग्रंथातील सहज कठीण कृती अशी आहे,

संडास किंवा बाथरूमच्या दरवाज्या समोरचे गलिच्छ पायपुसणे आसन म्हणून घ्या.
डावा पाय बुडाखाली घेऊन त्याची पुढची बोटे मागच्या बाजूने जराशी बाहेर राहतील अशा पोजिशन मधे त्या गलिच्छ आसनावर बसा.
उजवा पाय डोक्यावरून मागे घेऊन मानेवर रेस्ट होईल अशा पोजिशन मधे ठेवा.
डाव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीने मानेवरून डावीकडे आलेल्या उजव्या पायाचा अंगठा घट्ट धरून ठेवा.
उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीने बुडाखालुन मागच्या बाजूला आलेल्या डाव्या पायाचा अंगठा घट्ट धरून ठेवा.
मानेवरच्या पायामुळे ताण आला तरी मान एकदम ताठ ठेऊन डोळे वर करून छताकडे एकटक बघा, त्याक्षणी तुमचे सगळे विचार थांबतील!
यू आर ऑलमोस्ट डन!

तुमच्या सारख्या बावळट लोकांना ही निर्विचार अवस्था प्राप्त करायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय अघोरी साधना करावी लागते! मी सांगतो तसे करून ती तुम्हाला काही क्षणात प्राप्त होईल!
मी सांगितलेली सहज कठीण अशी साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत दोन्ही हातांच्या तर्जनी आणि अंगठ्याने पकडलेले दोन्ही पायांचे अंगठे तुम्ही सोडत नाही तोपर्यंत मनात कोणताही विचार उमटू शकत नाही.
पहाटेच्या निवांत वेळी, रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या निर्विचार अवस्थेची मज्जा घ्या...

कोणी विचारली ही भंकस शंका?
ऋन्मेष का? मला वाटलंच होतं तु अशी कुशंका विचारशील, तुझं नुसतं नावच ऋन्मेष शिक्षित आहे पण तु अगदीच अशिक्षिता सारखा वागतोस.
बट डोंट वरी मी सांगितल्या प्रमाणे केल्याने मानेवर फार प्रेशर येऊन Cervical collars लावण्याची वेळ साधकांवर नाही येणार! ट्रस्ट मी...

काय म्हणालास, कशावरून? अरे मी सांगतोय म्हणून...
एक गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये जे काही दुखेल, वाकेल किंवा मोडेल ते त्या देहाचे...तुझे नाही... कारण तु आणि तो जड देह एक नाही आहात...दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत!
तु म्हणजे देह नाही आणि देह म्हणजे तु नाही.... हा उलगडा एकदम अफलातून आहे...हा अनुभव आणखी सघन झाला की तुला कळेल, कुणाच्याही आत कुणीही नाही!

मी सांगितलेली सहज कठीण साधना तुम्ही सगळ्यांनी रोज करा... शक्य तेवढा वेळ करा... शक्य तेवढ्या वेळा करा... सतत करतच रहा...
शक्य तेवढ्या गलिच्छ आसनावर बसून केल्यास चार ते पाच दिवसांत तुम्हाला हुकमी निर्विचारी अवस्था प्राप्त करण्यात मास्टरी मिळेल.
आणि एकदा का तुम्हाला हुकमी निर्विचारी अवस्था प्राप्त करण्यात मास्टरी मिळाली की निर्देहत्व प्राप्तीचा तुमचा मार्ग निर्वेध झालाच म्हणून समजा.

काय? कशावरून? अहो मी सांगतोय म्हणून...

चला तर आपण सगळे आता निर्देहत्व प्राप्त करण्याकडे वाटचाल करूया...
ट्रस्ट मी... आता मी जे तुम्हाला सांगणार आहे तसे केल्यास निर्देहत्व प्राप्ती होत असताना, एकाच क्षणी एक लक्ष संभोगांची उत्कटता तुम्हाला अनुभवायला मिळेल...

आर यु ऑल सेट?
येssस ...

शाब्बास ऋन्मेष शिक्षित...पण बाकीच्यांचा आवाज मला ऐकायला नाही आला जरा मोठ्याने बोला....

य्ये ssssस ... य्ये ssssस ... य्ये ssssस ...

व्हेरी गुड...

माझ्या सर्व बावळट श्रोत्यांनो ही सहज महाकठीण साधना फक्त एकदाच, फारच थोडेसे साहित्य वापरून एकांतात करायची आहे आणि ती काहीशी खर्चिक आहे.

साहित्य-

पाच लिटर पेट्रोल
दोन किंवा तीन मोटारीचे जुने टायर्स
थोडे गवत किंवा लाकडाचा भुस्सा
एक काडेपेटी
पन्नास शेणाच्या गोवऱ्या
एक स्टूल
आधीच्या साधनेसाठी वापरलेले गलिच्छ आसन

सर्व साहित्य घेऊन एखादी एकांताची मोकळी जागा शोधा आणि तयारीला सुरुवात करा.
सगळे टायर्स एकावर एक रचून आसन तयार करा.
टायर्सच्या मधल्या पोकळीत गवत, भुस्सा आणि शेणाच्या गोवऱ्या भरा.
टायर्सच्या एका बाजूला सहज हात पोचेल एवढ्या अंतरावर स्टूल ठेऊन त्यावर काडेपेटी ठेवा.
दुसऱ्या बाजूला पेट्रोलचा डबा ठेवा

वरील तयारी पूर्ण झाल्यावर गलिच्छ आसनावर शेवटची निर्विचार अवस्था प्राप्तीची साधना हवी तेवढा वेळ करा!

आता तुमचे मनोधैर्य कमालीचे वाढले असल्याने टायर्सच्या तयार केलेल्या आसनावर छानपैकी मांडी घालून बसा.
एकदा बसल्या जागेवरून पेट्रोलचा डबा आणि स्टुलावरची काडेपेटी सहज उचलता येते कि नाही याची रंगीत तालीम करून पहा.
आता पेट्रोलचा डबा उचला आणि त्यातले पेट्रोल डोक्यापासून सुरुवात करत सर्वांगावर ओतून झाल्यावर टायर्स आणि त्यांच्या अवती भवती ओता.
पेट्रोल ओतताना काडेपेटी भिजणार नाही याची काळजी घ्या.
तो अनावश्यक जड देह नखशिखांत पेट्रोलने भिजवल्यावर रिकामा डबा फेकून द्या.
आता स्टुलावरची काडेपेटी हातात घेऊन दोन काड्या एकत्र पेटवा आणि आसनाच्या पोकळीत भरलेल्या गवतावर अलगद टाका.
यू आर ऑलमोस्ट डन!

अभिनंदन! अशी भक्कन आग पेटल्यावर अवघ्या काही मिनिटांत तुम्हाला त्या जड देहापासून कायमची मुक्ती मिळणार आहे.

पण आगीत होरपळून वेदना होतील त्याचे काय?

कोण बोलला रे तो? विकुशा पुन्हा तूच? मी एवढं सगळं समजावून सांगितलं तरी तु हा प्रश्न मला विचारतोस? मला?
अरे जे काही भाजेल, जळेल, वेदना होतील त्या रिकाम्या देहाला होतील...तुला नाही... कारण तु आणि तो जड देह एक नाहीच आहात...दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत!
तु म्हणजे देह नाही आणि देह म्हणजे तु नाही.... तु देहापासून वेगळा आहेस, देह हे तुझे अस्तित्वही नाही आणि देह हे तुझे व्यक्तिमत्वही नाही...
हा अनुभव घेताना तुला कळेल की, त्या जळणाऱ्या रिकाम्या देहाच्या आत मरायला कुणीही नाही!
ज्याला तु स्वतःचा समजत होतास त्या रिकाम्या देहाची पेटलेली होळी लांब उभा राहून अभूतपूर्व शांत चित्ताने बघताना तुला माझे म्हणणे पटेल...
पेट्रोल पंचमीचा हा अफलातून अनुभव घेताना तुझ्या चेहऱ्यावरील स्मितहास्य हे बुद्धमूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यापेक्षा मोहक असेल...ट्रस्ट मी...

कशाला उगाच फोका मारून राहिला बे!

आता हे कोण बोलले? त्युचा पैलवान का? झटक्यात ओळखले मी...
माझ्या बावळट श्रोत्यांनो तुम्ही अशा नतद्रष्टांकडे जराही लक्ष देऊ नका...

का लक्ष देऊ नका म्हणजे? मी सांगतोय ना? म्हणून...

क्रमश:

----------

विशेष सूचना (तीच आपली नेहमीची) - सदर लेखन वाचून खरोखरीच कोणाच्या डोक्याला शॉट लागल्यास लेखकाचा उत्तरदायित्वास नकार लागू :P
सर्व पात्रे आणि नावे काल्पनिक आहेत. त्यांचा कुठल्याही जिवंत अथवा मृत अथवा पुनर्जन्म झालेल्या व्यक्तींशी संबंध नाही. तरी संबंध अथवा साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
वरील लेखनाचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा उपमर्द करणे नसून निव्वळ मनोरंजनात्मक आहे.

विडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

28 Nov 2020 - 7:18 am | आनन्दा

आयला जाम हसलो!!

पण हसण्यापेक्षा देखील शेवट अत्यंत मार्मिक आहे!

तोफा कबुल करो!!!

कंजूस's picture

28 Nov 2020 - 8:08 am | कंजूस

शमनालाही घडाभर तेल ओतलंस की. भिजलो. आता पातंजली साबण लावून अंघोळ करणार.

डीप डाईव्हर's picture

28 Nov 2020 - 3:04 pm | डीप डाईव्हर

खिक्क

उपयोजक's picture

28 Nov 2020 - 9:16 am | उपयोजक

आवडेश! :)

उपयोजक's picture

28 Nov 2020 - 9:38 am | उपयोजक

विदेहत्व

अथांग आकाश's picture

28 Nov 2020 - 10:57 am | अथांग आकाश

भलतीच खडतर साधना आहे :-)
.

शा वि कु's picture

28 Nov 2020 - 11:57 am | शा वि कु

विकुशाचा विडंबनात सहभाग असल्याचा आनंद झाला. दॅट विकुशा फेलो साऊंडेड स्मार्ट फ्रॉम द थर्ड पार्ट इटसेल्फ. :))
पेट्रोल प्रश्न मार्मिक आहे. आम्ही खफ वर अशीच शंका उपस्थित केली होती, तेव्हा उत्तर मिळाले होते की शरीर, although just vassle, is fun. पुढे शंका विचारण्याआधी खफ वर एक ....आह,... "दुर्घटना" झाली. त्यामुळे तो विषय तिथंच थांबला.
तुमची साधनेचे प्रात्यक्षिक देताना डेनेथॉर, गॉन्डॉर साम्राज्याचा पेशवा.


शा वि कु's picture

28 Nov 2020 - 11:59 am | शा वि कु

Vessle आणि "तुमच्या साधनेचे"असे वाचावे.

अविचारी (स्वयंघोषीत) विदेही सिद्ध महाराज, कशाला आपटताय किबोर्डवर बोटे. बसा की शांत गप पडी मारुन तुम्हाला स्व गवसलाय तर. लोक्यांच्या डोक्याला शॉट कशाला देताय उगाच फोका मारून.

आपण म्हंजी ब्यांडात असता कि पोलिसात?
😂

डीप डाईव्हर's picture

28 Nov 2020 - 2:55 pm | डीप डाईव्हर

मला तुमचा शिष्य करून घ्या कि महाराज 🙏
तुमच्या मार्गदर्शनात दोन्ही साधना कराव्यात असं वाटू लागलय 😁

चौथा कोनाडा's picture

30 Nov 2020 - 1:20 pm | चौथा कोनाडा

च्यामारी, कैच्याकै !
भावना दुखावल्या, हसून हसुन दुखावल्या !
तुफान हसलो, भावना दुखावुन दुखावुन हसलो !
उठा ले बाबुराव, इस जड रिकाम्या देहको !

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Nov 2020 - 1:31 pm | ज्ञानोबाचे पैजार

मला वाटले रंगपंचमीला अजून वेळ आहे.
पण इथे तर ती दणक्यात साजरी केलेली दिसते.
लै भारी, लैच भारी, लै म्हणजे लै म्हणजे लैच भारी,
पैजारबुवा,

टर्मीनेटर's picture

3 Dec 2020 - 10:00 am | टर्मीनेटर

डोक्याला शॉट लागला 😀

वा. ते बोटात बोट गुतवणे मला काही जमत नाही आणि तंबाखूपण मी खात नाही. मात्र हा कळकट आसनवाला प्रकार मला अगदी चटकन जमला आणि तत्क्षणी आपला देह अगदी हलका होऊन वर वर जात असल्याची जाणीव होऊन लक्ष वेळा शिंक आल्यावर जसे मोकळे मोकळे वाटेल तसे लय भारी वाटले. अनेक आभार. आपल्या पोतडीतून अशाच अनमोल चिजा येऊ द्यात गुरुदेव. साष्टांग दंडवत.

उन्मेष दिक्षीत's picture

6 Dec 2020 - 8:15 pm | उन्मेष दिक्षीत

ऋन्मेष हा माबो वरचा आय डी आहे, थोडं तरी क्रिएटिव व्हायचंत. त्यामानाने शिक्षित बरं आहे अशिक्षित पेक्षा (घ्या आणखी एक सजेशन).

बाकी नैनं च्छिंदंती शस्त्राणी नैनं दहति पावकः असं कृष्णाने का म्हटले असेल ?

हे तेवढं नक्की सांगा.

@उन्मेष दिक्षीत तुम्ही पुन्हा वाचा!
तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत पुन्हा पुन्हा वाचा. नाही उत्तर सापडले तर हि साधना करा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे काही क्षणात मिळतील :))
.

उन्मेष दिक्षीत's picture

7 Dec 2020 - 1:23 pm | उन्मेष दिक्षीत

तुम्ही स्वतः किंवा आणखी कोणी करुन पाहीली आहे का ?

गड्डा झब्बू's picture

8 Dec 2020 - 2:02 pm | गड्डा झब्बू

साधक नंतर कळवत नाहीत हो....कृतघ्न कुठचे....

उन्मेष दिक्षीत's picture

8 Dec 2020 - 3:22 pm | उन्मेष दिक्षीत

तुमचं काय ? जे सांगितलंय तुम्ही ते स्वतः करून पाहीलं आहे का ? रिझल्ट काय ?
तुमचे साधक तुम्हालाही कळवत नाहीत ! का तुमची आचरट आयडिया ऐकुन गेले तुम्हाला सोडून.

तुम्ही दुसर्‍यांना करून पाहा म्हणून जे सांगितलंय ते स्वतः करून पाहीलं आहे का ? रिझल्ट काय होता?