क्रायसिस?

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
9 Nov 2020 - 4:14 pm

को ला आणायला जाणे भाग होते. आठ दिवसांची सुट्टीत युनिट वर कामाच्या फ्लो मध्ये काहीही अडचण न येण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करून ठेवलीच होती. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा खात्री करून घेतली. हाफ सेंच्युरी निमित हील स्टेशन चा २ दिवस ३ रात्री नेमका कुठे ते अजुन ठरले नव्हते. मदिकेरी, कुद्रेमुख ची निवड को वर सोडली होती.
....
प्रवास सुख काही नशिबात नव्हते. ३ आगाऊ पोरांनी रात्र भर उच्छाद मांडला आणि झोप अपुरी झाली. को ने ते बरोब्बर ओळखले. जायफळ घातलेला पायस म् ओरपून ८ तासांची झोप पुरी केली.
........
संध्याकाळी पाय मोकळे करायला बाहेर पडलो. सगळा अनुभव वेगळाच होता. अगदी fantasy fulfilled धर्तीवर.
२० डिग्री तापमान, चांदण्याची पखरण असलेले जवळ जवळ निरभ्र आकाश, आणि तरीसुद्धा अंगावर पडणारा पण तरीसुदधा न भिजवणारा भुरभुरावी पाऊस. एकदम वेगळेच जग. चपटी ची आठवण झाली. चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह ठेऊन नुसते "अरक" हा शब्द उच्यारण्याची गरज होती, लगेच दिशा मिळाली आणि ब्रँड पण मिळाला.
...........
टेकाडावर असलेले घर. आजूबाजूला असलेली बैठी घरे. घराच्या गच्चीवर गेलो. तिथे सतरंजी आधीच टाकलेली होती. थोड्या वेळाने को आली. सोबत चखणा पण होता.
......
"काय मस्त वातावरण आहे. हे आजचं का नेहेमी असेच."
अजुन आठवडाभर असेच, को म्हणाली
"कशाला पाहिजे ते हील स्टेशन, त्या पैशात तुला हवे ते घे" माझ्यातला मध्यमवर्गीय जागा झाला.
नक्की का?
"Do you think I am stupid to leave this"
बघ हां?
"ठरले, इथेच राहू, आण ते पाणी इकडे"
को ने तांब्या आणि ग्लास पुढे केला.
आकाशाकडे बघितले, बायकोकडे बघितले, .....
पहिला विचार आला
"Are you nuts"? आकाश पांघरायची संधी पुन्हा मिळणे शक्य नव्हते.
जिन्याच्या दरवाजा कडे नजर टाकली, तो बंद होता. चपटी चे उघडेले बुच बंद केले.
को हसली आणि म्हणाली
THANK GOD, YOU ARE NOT STUPID AFTERALL
..
जाता जाता: Midlife crisis ची माझी व्याख्या.
40 +guys Crying over Self Inflicted Situation

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

राघव's picture

9 Nov 2020 - 5:15 pm | राघव

विप्रसर, लेखनशैली पुर्वीप्रमाणेच.. खास, कडक आणि वेगळी!
खूप छान वाटलं परत आलेलं पाहून!

Midlife crisis ची माझी व्याख्या.
40 +guys Crying over Self Inflicted Situation
मर्म आणि त्यावरले अचूक बोट! :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2020 - 6:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त..चालू द्या....!

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

9 Nov 2020 - 7:30 pm | कंजूस

तिकडचे भाग आणि वातावरण याबाबत पूर्ण सहमत.
हवा आणि पाणी पीतच राहावं.

चौथा कोनाडा's picture

9 Nov 2020 - 8:20 pm | चौथा कोनाडा

झकास !