प्रेम

Primary tabs

MipaPremiYogesh's picture
MipaPremiYogesh in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amप्रेम

प्रेम असतं गाणं
दोघांच्या मनात!
प्रेम असतं भिजणं
चिंब पावसात!!
प्रेम असतं नाचणं
आनंदाच्या भरात!
प्रेम असतं जगणं
भान विसरून जीवनात!!
प्रेम असतं चांदणं
पडलेलं अंगणात!
प्रेम असतं मोहरणं
मोगर्‍याच्या सुगंधात !!
प्रेम असतं फिरणं
मोहरलेल्या चैत्रबनात!
प्रेम असतं बहरणं
शिशिरानंतरच्या वसंतात!!


प्रतिक्रिया

कुमार१'s picture

14 Nov 2020 - 4:54 pm | कुमार१

प्रेमळ काव्य आवडले .

गणेशा's picture

14 Nov 2020 - 8:54 pm | गणेशा

मस्त..

आणि

प्रेम असतं काव्य..
तुझ्या सहवासात...
आणि ह्या काव्याच्या
प्रत्येक शब्दात असतेस तू..
माझी तू..फक्त माझी तू..

Bhakti's picture

14 Nov 2020 - 10:32 pm | Bhakti

वाह!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Nov 2020 - 5:00 pm | ज्ञानोबाचे पैजार

फक्त थोडी अ‍ॅडीशन करतो

प्रत्येक शब्दात असतेस तू..
माझी तू..फक्त माझी तू.
पण आपल्यातल्या
बोलण्यातला अंतिम शब्द
असतो
फक्त तुझा, फक्त तुझा

(अनुभवी) पैजारबुवा,

Bhakti's picture

14 Nov 2020 - 10:08 pm | Bhakti

प्रेम असतं भिजणं
चिंब पावसात..
अगदी ..चिंब प्रेम!!

गोंधळी's picture

14 Nov 2020 - 10:56 pm | गोंधळी

मस्त..

सोत्रि's picture

15 Nov 2020 - 1:06 pm | सोत्रि

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं...

- (‘प्रेम’ळ) सोकाजी

विजुभाऊ's picture

16 Nov 2020 - 7:36 am | विजुभाऊ

सहमत

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 9:33 pm | टर्मीनेटर

@MipaPremiYogesh

'प्रेम'

ही कविता आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

MipaPremiYogesh's picture

19 Nov 2020 - 8:00 pm | MipaPremiYogesh

धन्यवाद सगळ्यांनी वेळात वेळ काढून अभिप्राय दिल्याबद्दल

किरण कुमार's picture

24 Nov 2020 - 2:13 pm | किरण कुमार

छान छान

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Nov 2020 - 5:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

भावना शब्दात अप्रतिम उतरल्या आहेत.
लिहित रहा
पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

25 Nov 2020 - 5:17 pm | चौथा कोनाडा

छान ! आवडली !