मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

माझे गाणे - 'ये ना तू सख्या' ...

Primary tabs

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
5 Sep 2020 - 1:14 pm

या गाण्याला तसे खुप वर्ष झालीत. तसे पाहिले तर हे माझे पहिलेच गाणे आणि शेवटचे ही :-).
'Maroon color' या आठवणीतल्या लेखामुळे आणि ऑडिओ फाइल्स येथे देता येऊ लागल्याने पुन्हा हे गाणे देतोय.

तो काळ तसा वेगळा होता २००७-२०१०.
हे गाणे खरे तर ब्रेल लिपीतील पुस्तकातील मी लिहिलेली एक कविता होती.. जे आम्ही भेट दिले होते आळंदी येथील अंध शाळेसाठी.
परंतु तेथील मुलांच्या मागणीमुळे निवडक १० कविता आम्ही गाण्यांच्या ऑडिओ रुपात आणली. त्यातलेच हे गाणे.
तसे माझा सामजिक वावर तेंव्हा होता, परंतु संगित -कला क्षेत्रात अश्या जास्त ओळखी नव्हत्याच मुळी.
आणि नंतर ही मला त्या सर्वांबरोबर कायम संबंध ठेवता आला नाही.. डॉ.राहुल देशपांडे यांच्यामुळे हे एकुलते एक माझे गाणे ऑडिओ रुपात आले.
नंतर संगित क्षेत्राशी संबंध आला नाही, आणि मी ही माझा सहभाग पुर्ण बंद केलाच. त्याला अनेक कारणे आहेत :-)

या कवितेतील मुळ शब्द नंतर थोडे बदलले होते.. म्हणजे रंग आणि घनपदार्थ यांचे उच्चार आणि वर्णने यामधुन बदलली आहेत.. कारण अंध मुलांना रंगाबद्दल सांगणे लागु नये म्हणुन.

एकुलते एक गाणे आहे म्हणुन गाणे कायम जपुन ठेवले.

- शब्दमेघ

पाऊसमांडणी

प्रतिक्रिया

संगीत आणि आवाज अप्रतिम , खुप खुप सुंदर शब्दांनी सजलेले चिंब पावसाळी गाणं आहे.मस्तच आहे रे!

चांदणे संदीप's picture

5 Sep 2020 - 4:28 pm | चांदणे संदीप

झाडांच्या पानात, वेलींच्या फुलात
पाऊस दाटून आला
रिमझीम सरींत, भिजल्या मातीत
आठव देऊन गेला

वार्‍याचा पदर, नदीची चादर
चिंबड करीत आला
ओंजळ भरूनी, मेघात न्हाऊनी
ओटीत घालूनी गेला
बरसली ती, झिरपली ती
मल्हार वेल्हाळ आला
थेंबाची आरती, पानांची पालखी
आंदण देऊन गेला
झाडांच्या पानात, वेलींच्या फुलात...

भिजल्या मनात, सजल्या रानात
केशर शिंपीत आला
झाडांची झावळी, स्पर्शाने सोवळी
ओलेती करून गेला
स्वप्नांच्या चाहूली, मिठीची सावली
वसंत शिंपत आला
कशाला आवरू, मनाला सावरू
माझ्यात गुंतून गेला
झाडांच्या पानात, वेलींच्या फुलात...

झाडांच्या पानात, वेलींच्या फुलात
पाऊस दाटून आला
रिमझीम सरींत, भिजल्या मातीत
आठव देऊन गेला

वा! निव्वळ अप्रतिम! सुरेख गाणे झाले आहे.
फ्रेश म्युजिक, तितकाच सुंदर आणि फ्रेश आवाज. गाणे ऐकत असताना बाहेर ओसरीवर जणू पावसाने झिम्मड लावलीय असा भास झाला.

अजून अशीच गाणी लिहिली पाहिजे भाऊ. नाहीतर चारशे चाळीस करंट माझा, चिमणी उडाली भुर्र, हळूच दांडा धर ह्याचा मार्केटमध्ये खच पडलेला आहेच.

सं - दी - प

प्राची अश्विनी's picture

7 Sep 2020 - 4:37 pm | प्राची अश्विनी

+11

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Sep 2020 - 1:59 am | मिसळलेला काव्यप्रेमी

+९९९९१११९९९९९

सतिश गावडे's picture

5 Sep 2020 - 4:57 pm | सतिश गावडे

सुरेख गाणं लिहीलं आहे गणेशा. संगीत आणि स्वरही तितकाच चांगला आहे.

अनन्त्_यात्री's picture

5 Sep 2020 - 8:09 pm | अनन्त्_यात्री

गणेशा!

संजय क्षीरसागर's picture

5 Sep 2020 - 8:17 pm | संजय क्षीरसागर

संगीत ही फार मोलाची देणगी आहे. गाणं छान झालं आहे. पुन्हा सुरु करा, तुम्हाला नक्की मजा येईल.

प्रमोद देर्देकर's picture

5 Sep 2020 - 8:45 pm | प्रमोद देर्देकर

हायला हा आणखी एक तुमचा दडवून ठेवलेला पैलू नजरेत आला.
लिहा अजून.
आणि गाण्याला संगीत कोणी दिले तसेच कोण गातंय ते सांगा की.

धन्यवाद.. दडवून ठेवलेला पैलू वगैरे नाही हो, असेच तेंव्हा झाले गाणे.
नंतर मात्र हे field आणि आमचे रस्ते काही एकत्र आले नाहीत.

गायिका: स्वप्नजा लेले.
संगितकार: सत्यजीत केळकर.

गोंधळी's picture

5 Sep 2020 - 9:13 pm | गोंधळी

गाणं अप्रतिम आहे. ऐकताना छान वाटलं.

संदीप, भक्ती, प्रमोद जी, संजय जी, गोंधळी, सगा, अनंत यात्री
धन्यवाद. मनापासुन..

प्राची अश्विनी's picture

7 Sep 2020 - 4:38 pm | प्राची अश्विनी

आहा! लूपमध्ये ऐकतेय...
खूपच गोड.

राघव's picture

7 Sep 2020 - 8:36 pm | राघव

आवडलंय! शब्द, संगीत आणि आवाज.. सगळंच! :-)

या कवितेतील मुळ शब्द नंतर थोडे बदलले होते.. म्हणजे रंग आणि घनपदार्थ यांचे उच्चार आणि वर्णने यामधुन बदलली आहेत.. कारण अंध मुलांना रंगाबद्दल सांगणे लागु नये म्हणुन.

ह्यासाठी खास _/\_

राघव's picture

7 Sep 2020 - 8:36 pm | राघव
बबु's picture

7 Sep 2020 - 10:45 pm | बबु

गणेशा, कविची प्रतिभा नित्य, निरन्तर आणि चिरन्तन असते. लिहिते रहा.

रातराणी's picture

8 Sep 2020 - 11:22 am | रातराणी

अप्रतिम झालं आहे गाणं! शब्द, संगीत, आवाज सगळं जुळून आलंय!

Bhakti's picture

18 Sep 2020 - 11:24 pm | Bhakti

https://youtu.be/K6b3C26N8zc
हे नवीन गाणं आहे पावसाळी.. मस्तय ऐका सगळ्यांनी
:)

सुंदर संगीत असलेले सुंदर गाणे !

या कवितेतील मुळ शब्द नंतर थोडे बदलले होते.. म्हणजे रंग आणि घनपदार्थ यांचे उच्चार आणि वर्णने यामधुन बदलली आहेत.. कारण अंध मुलांना रंगाबद्दल सांगणे लागु नये म्हणुन.
वाह्ह... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलू