सासुरवाशीण

अनंत छंदी's picture
अनंत छंदी in जे न देखे रवी...
22 Nov 2008 - 1:44 pm

दुपारच्या रणरणत्या उन्हात, पागोळीच्या सावलीत
एक गाय येऊन बसली निवारा शोधीत
ओटीवरती सासूबाई, डाळिंब्या निवडत होत्या.
जपमाळ घेऊन माजघरात बसली होती नलूआत्त्या
सैपाकघरात आवराआवर, सूनबाई करते खोचून पदर
मन मात्र झुलत असते, माहेरच्या झोपाळ्यावर
आई, भाऊच्या आठवणीने डोळ्यामध्ये अश्रुधारा
आत्ताच का आठवते आहे, भातुकली अन चिमणचारा
गायीला पाहून मायेची सय तिला येते आहे.
गायीशी गळामिठी घालून सासुरवाशीण रडते आहे.
गाय आणि माय दोन्ही आहेत एकच बाळे
वात्सल्याशिवाय वेगळे काही बोलतात का दोघींचे डोळे?

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

शितल's picture

22 Nov 2008 - 8:06 pm | शितल

सासुरवाशीण भावली. :)

गाय आणि माय दोन्ही आहेत एकच बाळे
वात्सल्याशिवाय वेगळे काही बोलतात का दोघींचे डोळे?

सुंदर.
:)

टवाळचिखलू's picture

22 Nov 2008 - 8:28 pm | टवाळचिखलू

आत्ताच का आठवते आहे, भातुकली अन चिमणचारा
खरंच आत्ताच का ?

मस्त.

- (सासुरवाश्या नवरा) चिखलू
लग्नापुर्वी शी न लूक्ड सो ... लुकडी!

विसोबा खेचर's picture

23 Nov 2008 - 8:52 am | विसोबा खेचर

सुंदर कविता...

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय

या ओळी आठवल्या..

तात्या.