Skip to main content

सासुरवाशीण

लेखक अनंत छंदी यांनी शनिवार, 22/11/2008 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारच्या रणरणत्या उन्हात, पागोळीच्या सावलीत एक गाय येऊन बसली निवारा शोधीत ओटीवरती सासूबाई, डाळिंब्या निवडत होत्या. जपमाळ घेऊन माजघरात बसली होती नलूआत्त्या सैपाकघरात आवराआवर, सूनबाई करते खोचून पदर मन मात्र झुलत असते, माहेरच्या झोपाळ्यावर आई, भाऊच्या आठवणीने डोळ्यामध्ये अश्रुधारा आत्ताच का आठवते आहे, भातुकली अन चिमणचारा गायीला पाहून मायेची सय तिला येते आहे. गायीशी गळामिठी घालून सासुरवाशीण रडते आहे. गाय आणि माय दोन्ही आहेत एकच बाळे वात्सल्याशिवाय वेगळे काही बोलतात का दोघींचे डोळे?
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2700
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

सासुरवाशीण भावली. :) गाय आणि माय दोन्ही आहेत एकच बाळे वात्सल्याशिवाय वेगळे काही बोलतात का दोघींचे डोळे? सुंदर. :)

आत्ताच का आठवते आहे, भातुकली अन चिमणचारा खरंच आत्ताच का ? मस्त. - (सासुरवाश्या नवरा) चिखलू लग्नापुर्वी शी न लूक्ड सो ... लुकडी!

सुंदर कविता... कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय माया माझ्यावर दाट जशी तुझी माय या ओळी आठवल्या.. तात्या.