नोकरी/कंत्राटी काम आणि नशीब

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
15 Aug 2020 - 12:54 pm
गाभा: 

सध्या कोरोनाप्रतापामुळे अनेकांच्या नोकर्‍या जात आहेत.कंत्राटी कामे मिळेनात.कधीतरी कोरोना अगदी नगण्य उरेलच; किंवा संपुष्टातसुद्धा येईल. त्यावेळी पुन्हा नोकरी संशोधन किंवा नवे कंत्राटी काम मिळवायला लोक बाहेर पडतीलच.

खाजगी नोकरी शोधताना किंवा नोकरी करत असताना किंवा कंत्राटी कामे मिळवताना काही वेळा असे निदर्शनास येईल की आपण पात्र असूनही आपल्याला संधी मिळालेली नाही किंवा प्रमोशन मिळालेले नाही.उलट आपल्याला डावलून ज्याला संधी दिली गेलीय त्याला नक्की काय पाहून त्या पदावर काम करण्याची संधी दिली गेली असावी किंवा नक्की काय तपासून कंत्राट दिले गेले असावे अशी शंका येते.

तर काही वेळा याच्या उलट प्रकारसुद्धा घडतो म्हणजे आपल्याला फारशी अपेक्षा नसताना एखादी चांगली नोकरी किंवा कंत्राट मिळते किंवा अपेक्षेपेक्षाही बरेच जास्त रकमेचे पॅकेज मिळते.

हे असे घडण्याची काही ठराविक कारणे असू शकतात का? ती शोधता येतील का? की हा केवळ रँडमनेस आहे? चांगली नोकरी किंवा कंत्राटी काम मिळणे यात एखाद्याच्या नशीबाचा भाग कितपत वाटतो तुम्हाला? कष्ट , प्रामाणिकपणा याला नेहमीच न्याय मिळतो असे वाटते का? चांगली नोकरी किंवा कंत्राट मिळणे या मागे कोणत्या गोष्टींचा संबंध असावा असे वाटते?

प्रतिक्रिया

आर्यन मिसळपाववाला's picture

15 Aug 2020 - 1:33 pm | आर्यन मिसळपाववाला

तुमची पात्रता आनि समोरच्या ची गरज हे पन महत्वाचे आहे. अजुन पन बर्याच गोश्ती आहेत.

उपयोजक's picture

15 Aug 2020 - 2:02 pm | उपयोजक

मिपाकर आप्पा जोगळेकर यांनी त्यांना पासवर्ड आठवत नसल्याने त्यांचा हा अनुभव इथे पेस्टवायला सांगितला आहे.

मी echofeel नावाच्या एका छोट्या कंपनीत कामाला होतो, 5 लोक होते. माहिमला 1 bhk flat होता त्याच्या बेडरूम चे ऑफिस केले होते आणि उरलेल्या 2 खोल्या मालकाच्या राहण्यासाठी. खुर्ची मागे सरकवली तर मालकाच्या खुर्चीवर आपटायची, दुपारी मालक स्वतःच चहा करून आणून देत असे. 5 महिने, 10 दिवस काम केल्यावर मला तिथून काढून टाकले. आणखीन एका मुलाला पण काढले. कोणत्यातरी प्रोजेक्ट गेले होते बहुधा. काढले म्हणजे संध्याकाळी घरी जाताना सांगितले की आता तू येऊ नकोस. घरी परत आलो. 2 दिवसांनी काय वाटले कोणास ठाऊक मालकाला फोन केला आणि experience ची तारीख बदलून देण्याची विनंती केली म्हणजे 6 महिने experience तरी कागदावर येईल म्हणून त्याने मान्य केले. नंतर 2 महिने घरीच बसलो. cmc limited मध्ये apprentice च्या जॉब साठी पेपरात जाहिरात आली होती. 5300 रुपये स्टयपेंड असे लिहिले होते जाहिरातीत म्हणजे आधीच्या निम्मा पगार तरी गेलो interview ला. तिथे माझ्यासारखी बरीच फ्रेशर मंडळी होती. जवळ पास सगळ्यांनाच select करत होते. माझी turn आली तेंव्हा आत गेलो तर interview घेतलाच नाही मराठीतून कुठे राहतोस वगैरे विचारले नंतर resume पाहिला. ते म्हणाले तू experience असल्यामुळे apprentice साठी suitable नाहीस, दुसरे ओपनिंग आहे का पाहतो. म्हणून ते interviewer आत गेले, नंतर direct HR ने बाहेर बोलावले आणि u r selected on cmc limited pay roll सांगितले. 17000 रुपये पगार होता. नंतर 2,3 वेळा जॉब switch केला पण तेंव्हा जो आनंद झाला होता त्याची तुलना इतर कशाशीच नाही. तेंव्हापासून नोकरी नशिबाने मिळते हेच मत झाले आहे.

चौथा कोनाडा's picture

15 Aug 2020 - 9:25 pm | चौथा कोनाडा

मिपाकर आप्पा जोगळेकर यांचा अनुभव भारी आहे !
पण अश्या संधी मिळणे त्या त्या वेळच्या औद्योगिक भवतालावर अवलंबून आहे.
हे स्पष्ट आहे की जास्त मागणी आणि कमी पुरवठा असेल तर उत्तम संधी मिळत जातील हे तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या जगतास देखील लागू आहे.

एकंदरीतच गेल्या एक दोन दशकात संगणकीकरण, माहिती तंत्रज्ञान, स्वयंचलनीकरण, जलदगणन (क्लाउड कॉम्पुटिंग) कृबु (कृत्रिम बुद्धिमत्ता) यामुळे कमी काळात प्रचंड उलथापालथ होत आहे. या लाटानुरूप झटपट बदलणे, पुनर्रकौशल्यीकरण ( री-स्किलिंग) वेगवेगळ्या कारणास्तव शक्य होणार नाही (वय, बौद्धिक कुवत, आर्थिक-कौटुंबिक पार्श्वभूमी इ) ते खालच्या दर्जाच्या कामात ढकलले जाणार, साह, जिकच त्यांचे उत्पन्न घटणार.

आणि यात राजकीय वशिले, आर्थिक लाच, स्वार्थीपणा अश्या कित्येक बाबी परिणाम करणार !

कष्ट , प्रामाणिकपणा याला नेहमीच न्याय मिळतो असे वाटते का ?
यांना नेहमीच न्याय मिळेल अशी शाश्वती नसली तरी यामुळे उत्तम संधी मिळण्याच्या शक्यता बळावतात असे वाटते.
चांगली नोकरी किंवा कंत्राट मिळणे या मागे कोणत्या गोष्टींचा संबंध असावा असे वाटते ?
चांगली नोकरी यासाठी उत्तर वरील प्रमाणेच, पण कंत्राट मिळणे हे बऱ्याच ठिकाणी राजकीय, आर्थिक प्रभावावर अवलंबून आहे असे जाणवते, याला काही सन्माननीय अपवाद देखील असतील..

आणि नशीब हा फॅक्टर महत्वाचा आहेच !

नशीब नक्कीच उपयोगी पडते, पण कधी? समजा रांगेत १०० पात्र उमेदवार समोर उभे आहेत, आणि एकाला नौकरी मिळाली तर ते नशीब. पण समजा तुमच्याकडे पदवी नसेल तर तुम्हाला त्या रांगेत उभेच राहू दिले जाणार नाही. त्या पदवीसाठी तुम्ही केलेली मेहेनत आणि कष्ट तुम्हाला रांगेत उभे राहण्याची संधी देतात.

नेत्रेश's picture

17 Aug 2020 - 11:14 pm | नेत्रेश

माझ्या मित्राचा अनुभव - त्याने मुंबईतल्या मोठ्या IT कंपनीत सिनीयर सॉफ्टवेअर ईंजीनीयर पदासाठी अर्ज केला होता. मुलाखतीदरम्यान त्याचा experience पाहुन सरळ मॅनेजर पदाची ऑफर दीली, आणी पगारही त्याच्या अपेक्षेच्या जवळ जवळ दुप्पट ऑफर केला. अर्थात तो तेवढा लायक होता हे नक्की.

दुसर्‍या सहकार्‍याचा अनुभव पण साधारण असाच होता. त्याला ऑफर मिळाल्यावर जवळ्जवळ ३ महीने लागले आधीचा जॉब सोडुन तिकडे जॉईट व्हायला. त्या दरम्यान कंपनीने ऑफर रीव्हाईज करुन पगार २५% वाढउन दीला - आम्ही पाहीलेली पहीलीच पगारवाढ जी १ ही दीवस काम न करता मिळाली होती.

कपिलमुनी's picture

17 Aug 2020 - 11:51 pm | कपिलमुनी

फ्रेशर असतना २ वर्षे बाँड वर काम केले , २००८ साली ७००० वर २०१० होईतो काम केले ,
२ वर्षे झाल्यावर साहेब म्हणाले पगार दुप्पट कर्तो १५,००० पण अजुन २ वर्षे बाँड कर , मि नाही म्हणाल्यावर आताच्या आता राजीनामा दे किंवा बाँड असे सांगितले

मि राजीनामा देउन बाहेर पडलो . तसे १.८ लाखाचे पॅकेज झाले असते , एक महिना घरी बसून इंटर्व्हू दिले , तत्काळ जोईनिंग असल्यने डिंमांड होते मग ४.५ लक्ष वर दुसरीकडे जॉईन झालो.

ह्या ट्रिक ला बळी पडलेले मात्र बिचारे अजुन २ वर्षे सडले.

कानडाऊ योगेशु's picture

18 Aug 2020 - 2:15 am | कानडाऊ योगेशु

नशीब आणि संधी ह्यासंबंधीचे काही रोचक किस्से अनुभवले आहेत आणि काही ऐकले आहेत.
ठराविक पात्रता तुमच्याकडे असेल तर तिथुन पुढे तुमचे करियर कसे वळण घेते ह्यात नशीबाचा भाग ही असतो हे मी आता नाकारत नाही.

पुढील किस्सा माझ्या मॅनेजरने मला सांगितला होता.
तो बेंगलोरस्थित एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत कामाला असताना तो ज्या टीम मध्ये काम करत होता त्या टीमचा प्रोजेक्ट पूर्ण झाल्याने त्यातील सदस्यांना बेंचवर ठेवण्यात आले होते. मोठ्या कंपनीत हा प्रकार रूटीनचाच भाग असतो. मॅनेजर परफॉर्मर असल्याने त्याला दुसर्या एका चांगल्या टीममध्ये लगेच संधी मिळाली पण त्याचा एक कलिग त्याच्या मते खुशालचेंडू होता त्यामुळे त्याला तितक्या लवकर संधी काही मिळाली नाही. तर ती कशी मिळाली ह्याचे वर्णन तो असे करत असे कि हा एकदा लघुशंकेला टॉयलेट मध्ये गेला तेव्हा तिथेच त्याला ओळखणारा दुसर्या टीमचा कोणी एक मॅनेजर आला होता. धार मारत असताना त्याने त्याला विचारले कि काय करतोयस सध्या वगैरे ह्याने उत्तर दिले कि बेंचवर आहे सध्या. त्यावर तो मॅनेजर म्हणाला कि माझ्या टीममध्ये जागा आहे. युके मध्ये जावे लागेल. ह्या कलिग साठी तर ती आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन ह्या पध्दतीची संधी होती त्याने लगेच स्वीकरली. माझा मॅनेजर मग म्हणत असे आम्ही काम करुन भारतातच राहिलो आणि त्या कलिगची तो निकल पडी.

चौथा कोनाडा's picture

18 Aug 2020 - 10:38 pm | चौथा कोनाडा

खुप रोचक !

टॉयलेट मध्ये गेल्यामुळे अचानक संधी मिळून गेली >
............... याला म्हणतात योगायोग किंवा धागाकर्त्याच्या भाषेत नशिब १

घटना जिथे घडली तेपाहता ह्याला नशीब फळफळणे असे म्हणावे लागेल ;)

चौथा कोनाडा's picture

19 Aug 2020 - 6:15 pm | चौथा कोनाडा

नशीब फळफळणे असे म्हणावे >>

कानडाऊ योगेशु :-) हा .... हा ..... हा .... !

चौकस२१२'s picture

18 Aug 2020 - 5:55 am | चौकस२१२

२ पैसे
१) कष्ट आणि प्रयत्न हे बऱयापैकी आपल्या हातात असते
२) नशीब हे काही आपल्या हातात नसते त्यामुळे त्याबद्दल जास्त विचार करून काहीच उपयोग नाही
उदाहरण;
प्रयत्न> सरळ संबंध नसलेल्या जाहिरातीला अर्ज केला, कारण आखाती देशातील भरपूर पगाराची होती म्हणून,,, मुलाखतीत साहेब म्हणाला अरे या नोकरीचा आणि तुझ्य अनुभवाचा तसा काही संबंध नाही पण मला जाणून घ्याचे होते कि अशी धडपड करणारा माणूस कोण ते बघावे.. आणि त्याने त्याच्या कडे जरा लांबणीवर पडलेल्या एका कामाला/ कल्पनेला पुढे आणले आणि मला नोकरी दिली , म्हणजे चिकाटी आणि व्यहारचातुर्य या "प्रयत्न आणि गुणांमुळे " संधी मिळाली
नशीब >: वरील नोकरी घेतली पण २ महिन्यात गेली कारण? ज्या दोन उद्योगांचे मिलन होणार होते त्यातील एकाने अजून एका तिसरया उद्योगाशी काही व्यवहार आधीच केल्याचे उघडकीला आले ... आणि सगळं काम साहेबाने रद्द केले ...

उपयोजक's picture

20 Aug 2020 - 3:07 pm | उपयोजक

छान अनुभव!

Rajesh188's picture

19 Aug 2020 - 12:11 am | Rajesh188

दलाल निर्माण करणे आणि कोणताच प्रश्न न सुटता ती धुपत राहणे ह्या साठी कंत्राटी पद्धत काँग्रेस नी त्यांच्या रिती रिवाजा प्रमाणे चालू केली(३७० नष्ट करणे घटने विरूद्ध आहे असा गैर समज पसरवून तो प्रश्न भिजत ठेवला).
कंत्राटी पद्धत ही ना मालकाच्या फायद्याची ना कामगारांच्या फक्त भडव्या च्या फायद्याची आहे.
कामाचे कंत्राट जसे मिळते जो सर्वात जास्त कमिशन देतो त्याला.
ज्या कामासाठी ते कंत्राट दिले जाते ते काम पूर्ण होवू अगर न होवू,त्याचा दर्जा अतिशय फालतू असेल तरी कमिशन जास्त देणारा व्यक्ती हवा

Gk's picture

19 Aug 2020 - 9:02 am | Gk

मोदींजींच्या कृपेने सर्व रेल्वे स्टेशने कंत्राटी कँपन्यांना दिली

प्लॅटफॉर्म तिकीट 50 रु झाले

50 रु वारले की मग प्लॅटफॉर्म दिसतो

Gk's picture

19 Aug 2020 - 9:06 am | Gk

आणि सामान्य लोकांची पेन्शन वारवण्याचे कार्य 2000 च्या बाजपेयीं सरकारने केले,

स्वतः मात्र पेन्शन घेतली