नोकरी/कंत्राटी काम आणि नशीब
सध्या कोरोनाप्रतापामुळे अनेकांच्या नोकर्या जात आहेत.कंत्राटी कामे मिळेनात.कधीतरी कोरोना अगदी नगण्य उरेलच; किंवा संपुष्टातसुद्धा येईल. त्यावेळी पुन्हा नोकरी संशोधन किंवा नवे कंत्राटी काम मिळवायला लोक बाहेर पडतीलच.
खाजगी नोकरी शोधताना किंवा नोकरी करत असताना किंवा कंत्राटी कामे मिळवताना काही वेळा असे निदर्शनास येईल की आपण पात्र असूनही आपल्याला संधी मिळालेली नाही किंवा प्रमोशन मिळालेले नाही.उलट आपल्याला डावलून ज्याला संधी दिली गेलीय त्याला नक्की काय पाहून त्या पदावर काम करण्याची संधी दिली गेली असावी किंवा नक्की काय तपासून कंत्राट दिले गेले असावे अशी शंका येते.
तर काही वेळा याच्या उलट प्रकारसुद्धा घडतो म्हणजे आपल्याला फारशी अपेक्षा नसताना एखादी चांगली नोकरी किंवा कंत्राट मिळते किंवा अपेक्षेपेक्षाही बरेच जास्त रकमेचे पॅकेज मिळते.
हे असे घडण्याची काही ठराविक कारणे असू शकतात का? ती शोधता येतील का? की हा केवळ रँडमनेस आहे? चांगली नोकरी किंवा कंत्राटी काम मिळणे यात एखाद्याच्या नशीबाचा भाग कितपत वाटतो तुम्हाला? कष्ट , प्रामाणिकपणा याला नेहमीच न्याय मिळतो असे वाटते का? चांगली नोकरी किंवा कंत्राट मिळणे या मागे कोणत्या गोष्टींचा संबंध असावा असे वाटते?
वर्गीकरण
वाचने
7519
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
तुमची पात्रता आनि समोरच्या ची
असाही अनुभव
मिपाकर आप्पा जोगळेकर यांचा
कष्ट , प्रामाणिकपणा याला नेहमीच न्याय मिळतो असे वाटते का ?यांना नेहमीच न्याय मिळेल अशी शाश्वती नसली तरी यामुळे उत्तम संधी मिळण्याच्या शक्यता बळावतात असे वाटते.चांगली नोकरी किंवा कंत्राट मिळणे या मागे कोणत्या गोष्टींचा संबंध असावा असे वाटते ?चांगली नोकरी यासाठी उत्तर वरील प्रमाणेच, पण कंत्राट मिळणे हे बऱ्याच ठिकाणी राजकीय, आर्थिक प्रभावावर अवलंबून आहे असे जाणवते, याला काही सन्माननीय अपवाद देखील असतील.. आणि नशीब हा फॅक्टर महत्वाचा आहेच !नशीब नक्कीच उपयोगी पडते, पण
माझ्या मित्राचा अनुभव
माझा अनुभव
नशीब आणि संधी ह्यासंबंधीचे
In reply to नशीब आणि संधी ह्यासंबंधीचे by कानडाऊ योगेशु
खुप रोचक !
टॉयलेट मध्ये गेल्यामुळे अचानक संधी मिळून गेली >............... याला म्हणतात योगायोग किंवा धागाकर्त्याच्या भाषेत नशिब १In reply to खुप रोचक ! by चौथा कोनाडा
याला म्हणतात योगायोग किंवा धागाकर्त्याच्या भाषेत नशिब १
In reply to याला म्हणतात योगायोग किंवा धागाकर्त्याच्या भाषेत नशिब १ by कानडाऊ योगेशु
नशीब फळफळणे असे म्हणावे >>
२ पैसे
In reply to २ पैसे by चौकस२१२
चौकस २१२
दलाल निर्माण करणे
In reply to दलाल निर्माण करणे by Rajesh188
.
In reply to . by Gk
.