ताज्या घडामोडी - जुलै २०२०

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in काथ्याकूट
16 Jul 2020 - 2:21 pm
गाभा: 

डोळ्यांसमोर पोलिसांनी पिकावर बुल्डोजर चालवल्याने दलित शेतकरी दांपत्याने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशात ही घटना घडली आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई केली जात होती. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांच्या कारवाईवरुन संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडीओमध्ये महिला बेशुद्ध अवस्थेत असताना मुलांचा आक्रोश सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. राम कुमार आणि सावित्री देवी अशी या दांपत्याची नावं आहेत. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या प्रकृती स्थिर आहे. एनडीटीव्हीने यासंंबंधी वृत्त दिलं आहे.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये सरकारने साडे पाच एकर जमीन कॉलेज उभारण्यासाठी राखीव ठेवली होती. पण राम कुमार आणि सावित्री देवी यांनी त्यावर अतिक्रमण केलं असून आपण अनेक वर्षांपासून येथे शेती करत असल्याचा दावा केला आहे. “ही कोणाची जमीन आहे आम्हाला माहिती नाही. आम्ही गेल्या कित्येक काळापासून या जमिनीवर शेती करत आहोत. आमच्या डोळ्यांसमोर पीक नष्ट केलं जात असेल तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही,” असं सावित्री देवी यांनी सांगितलं. आपल्यावर तीन लाखांचं कर्ज असून ते कोण फेडणार ? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

मंगळवारी महसूल विभागाचे काही अधिकारी पोलिसांसोबत जमिनीवर अतीक्रमण हटवून तेथे सुरक्षा भिंत उभारण्यासाठी पोहोचले होते. यावेळी दांपत्याने त्यांना कारवाई करण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. कारवाईदरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी पीक नष्ट केलेलं पाहून अखेर त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी राम कुमार आणि सावित्री देवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे

suicide

suicide

अतिक्रमण चुकीचे असले तरि मानवतावादी दृष्टिकोनातून पीक काढू द्यायला हवे होते . आता त्या तीन मुलांचे काय ?

बिहार मधील २६९ कोटी खर्चून बांधलेला नवा पूल वाहून गेला

सरकार बदलले तरिहि भ्रष्टाचार संपलेला नाही. निकृष्ट दर्जाची कामे होतच आहेत

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

16 Jul 2020 - 3:41 pm | आनन्दा

याला दलित angle पण द्यायचा आहे का?

ज्या चॅनेल ने बातमी दिलीये ते नाव वाचले का??
त्या चॅनेल चे दुकान असल्या अँगल मुळेच चालतेय..

दलित आणि मुस्लिम या दोन शब्दांवर विशेष प्रेम आहे त्यांचे..

बाकी सगळे म्हणजे किडे मुंग्या..!!

दामोदरसुतन भारतवर्षकी सिंघासनपे
२०१४ मोदीसवंत १ से विराजमान हुए, ये अलौकिक समाचार सुनकर तीनों लोको में बहुत प्रसन्नता है समस्त नर और नारी सुर असुर देवता मनुष्य मुनि गनधर्व प्रसन्न हुए पूरे ब्रह्मांड में उत्साह है दिव्यज्योति प्रजवालित हुई है सृष्टि के कल्याण के हेतु ऐसा सौभाग्य प्राप्त हुआ ऐसा समाचार डालते रहे तकि संसार प्रकाशमय रहे.

कपिलमुनी's picture

17 Jul 2020 - 12:06 am | कपिलमुनी

बाकीच्यांना पण कळू द्या !

Gk's picture

17 Jul 2020 - 2:48 am | Gk

साधु मेल्यावर पेप्रात साधु आले होते,

म्हणून दलित मेल्यावर दलित आले

दलीत साधू असे छापून यायला हवे होते.
असो.
या जुलै २०२० मधे घडामोडीत "घडा "पेक्षा "मोडी" च जास्त होत आहेत.

Gk's picture

16 Jul 2020 - 4:59 pm | Gk

कोंग्रेस मध्ये लोणी खाणारे लोक भाजपात जाउन क़ाय करतात , निर्जला एकादशी का ?

सतरंजी उचल्याना भाबड़ा प्रश्न

पिकावरती बुलडोझर फिरवणे वाईट, खरे म्हणजे सरकारने ते पीक कापून सरकारजमा करायला हवे होते.
अन्नाची नासाडी वाईटच. खाऊन मोजावे म्हणतात, टाकून माजू नये.
असो.

बाकी तो पुलाचा विडिओ बघितला, काही अपवादात्मक परिस्थितीत या गोष्टी घडतात. रत्नागिरीमध्ये आरे वारे ला बांधलेला पूल असाच पहिल्या पावसात वाहून गेला होता, म्हणजे पूल सुस्थितीत असतो, पण त्याला जोडणारा घातलेला भराव वाहून जातो.. या गोष्टीवरून कामाचा दर्जा ठरवणे कठीण..
पण एकंदरीतच सरकारी कामाचा दर्जा ठरवणे तसेही कठीणच असते.

एमपीः गुना में पति-पत्नी पर लाठीचार्ज के वायरल वीडियो पर शिवराज की कार्रवाई, कलेक्टर-एसपी और आईजी को हटाया
अतिक्रमण हटाने के दौरान पति-पत्नी के विरोध के बाद दोनों पर पुलिसकर्मियों के लाठीचार्ज का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया है, जिसके बाद मध्य प्रदेश पर सवाल उठाए जा रहे हैं.
By: ब्रजेश राजपूत | 16 Jul 2020 10:56 AM (IST)

कंजूस's picture

17 Jul 2020 - 8:24 am | कंजूस

सातबारा असल
*याशिवाय बँकेने कर्ज दिले कसे?
* कारवाई अगोदर नोटिस द्यावी लागते पण अशी दिल्यास स्टे ओर्डर आणतात.

सुबोध खरे's picture

17 Jul 2020 - 10:06 am | सुबोध खरे

सातबारा असल

*याशिवाय बँकेने कर्ज दिले कसे?

मला पण हाच प्रश्न आहे.

काही वेळेस बातमीदार बातमी ला वजन आणण्यासाठी नसलेले कर्ज पण दाखवतात.

अर्थात सरकारी यंत्रणा किती अमानुष असू शकते याचे अनुभव सार्वत्रीक आहेत.

मूळ सत्य बाहेर काढण्यासाठी हे पत्रकार याचा पाठपुरावा करतील का?

आणि दलित असतील तर राजकीय नेते यात आपली पोळी भाजून घेतील यात शंका नाही.

पण तरीही त्या कुटुंबाला न्याय मिळेल का हा खरा प्रश्न आहे.

कारण एकदा राजकीय लाभ उठवून झाला कि दलितांची तळी उचलणाऱ्या नेत्यांना आणि पत्रकारांना त्याबद्दल काही घेणे देणे नसते असाच अनुभव आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Jul 2020 - 11:12 am | प्रकाश घाटपांडे

काय करायला नको होत हे झाल. पण हे प्रकरण कसे हाताळायला हवे होते म्हणजे काय करायला हवे होते याबद्दल कुणी काही बोललय का?

पण हे प्रकरण कसे हाताळायला हवे होते
डंका करायचा.

Gk's picture

18 Jul 2020 - 1:12 am | Gk

महाराष्ट्रात फड़नवीस वगैरे करोना निवारत फिरत आहेत.

अभिनंदन.

( रिकामे बसले असते , आणि शहाला समजले असते तर त्याने बिहारात चिठ्ठया वाटायला पाठवले असते )

Gk's picture

18 Jul 2020 - 8:00 pm | Gk

राजस्थानच्या ऑपरेशन लोचटचे काय झाले ?

पेट्रोल दरवाढिविरोधात तोंड आवळून घेणारे भाजपे दूध दरवाढिविरोधात आंदोलन करत आहेत

पेट्रोल 200 रु झाले तरी मोदिलाच मत देउ म्हणनारे भाजपे दुधाला दीड रुपये जास्त का देउ शकत नाहीत ?

दूध दरवाढी साठी आन्दोलन होतं कि दूध दरवाढी विरोधात.

Gk's picture

23 Jul 2020 - 9:16 pm | Gk

पण दरवाढ ही सरकारने 10 रु सबसिडी देऊन भागवायची,

त्यापेक्षा भाजपे पदरच्या जास्त पैशाने दूध का घेत नाहीत ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2020 - 5:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत आहे, भारी होता.:)

-दिलीप बिरुटे

सातारातील राज्यसभा सांसद झालेले खासदार, शपथ घेऊन झाल्यावर, जय भवानी जय शिवाजी म्हणाले,
त्यावर त्यांना राज्यसभा प्रमुखांनी चांगलीच कानउघाडणी करून समज दिली "जय भवानी जय शिवाजी" उद्गारा बद्दल.
आता हेच जर आधीच्या पंतप्रधानांच्या काळात झालं असतं तर आतापर्यंत चाटुकार प्रजातीने सोशल मुद्दयावर शिवरायांचा अपमान झाला असा धुमाकूळ घातला असता.
शिवरायांचा चुकून एकेरी उल्लेख झाला (आणि त्याबाद्दल जाहीर माफी ही मागितली ) अश्या एका महिला स्टॅन्डअप कॉमेडीअनला, एका तथाकथित गुजरातवासी शिवप्रेमीने , बलात्काराची जाहीर धमकी दिलेली.

राघव's picture

24 Jul 2020 - 11:32 am | राघव

या धाग्यावरील चर्चा [?] बघून ह्याचे नाव 'ताज्या "राजकीय" घडामोडी - जुलै २०२०' असे असायला हवे का काय, हा विचार डोकावून गेला! :-)

Gk's picture

24 Jul 2020 - 4:33 pm | Gk

Varanasi’s civic body has directed priests who conduct rituals for clients on the Ganga’s banks to pay a yearly registration fee of Rs 100 to reserve their wooden seats at the ghats.

Such a fee should not raise eyebrows in a secular country but squirming BJP leaders are unable to digest such a levy in Prime Minister Narendra Modi’s constituency.

Veteran priest Kanhaiya Tripathi, secretary of the Akhil Bharatiya Tirth Purohit Mahasabha, described how Jawaharlal Nehru, the first Prime Minister the current Prime Minister loves to criticise, had saved Varanasi’s priests from having to pay a similar fee under British rule

मोदी सरकार वाराणशी पुरोहितांकडून रजिस्ट्रेशन व तत्सम चार्जेस घेणार,

ब्रिटिशांच्या काळात अशा टेक्सला पंडित नेहरूंनी विरोध करून बंद केले होते.

https://www.telegraphindia.com/india/priest-tax-jawaharlal-nehru-halted-...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2020 - 4:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Union Minister launches 'papad', says ‘it can help develop antibodies against Covid-19’ https://timesofindia.indiatimes.com/videos/news/union-minister-launches-...

-दिलीप बिरुटे

मराठी_माणूस's picture

28 Jul 2020 - 11:39 am | मराठी_माणूस

करोना रुग्णाच्या शेजाऱ्यांना अलगीकरण केंद्रात नेण्याचा पालिकेचा निर्णय अन्यायकारक आहे. अलगीकरण केंद्रात यापूर्वी जागा नव्हत्या म्हणून लोकांना घरी राहण्याची सक्ती केली. आता वारेमाप केंद्रे उघडली आहेत. ती भरण्यासाठी रहिवाशांवर जबरदस्ती केली असेल तर निषेधार्ह आहे.

हे तेथे खालीच लिहिलेले आहे.

वेगवेगळ्या सनदी अधिकाऱ्यांना सरकारने आपल्या विभागात रुग्णसंख्या "कमी" करण्याचे "टार्गेट्स" दिलेले आहेत.

त्यामुळे हे सर्व लोक अशी मनमानी करताना आढळत आहेत. त्यामागे तर्क किंवा मानवतावाद याचा काहीही संबंध नाही.

मराठी_माणूस's picture

28 Jul 2020 - 12:56 pm | मराठी_माणूस

हे एका नगरसेवकाचे म्हणणे आहे.

याच पेपर मधे (नवी मुंबइ पुरवणी मधे) ही बातमी थोडी अजुन सविस्तर आली आहे (ऑन लाइन लिंक मधे ती दिसत नाही) त्यात याचे कारण दिले आहे.

काही काळा पासुन शरद पवार हे त्यांच्या विधानाने, कृतीने किंवा त्यांच्यावर होणार्‍या टिकेमुळे चर्चेत आहेत. माझ्याही वाचनात त्यांच्या संबंधी आणि इतर काही बातम्या काही काळा पासुन येत आहे. अगदी शरद पवार यांचे ताजे वाचलेले विधान म्हणजे राफेल गेम चेंजर ठरणार नाही !

ज्या बातम्यांचा उल्लेख केला त्या सर्व एकत्रपणे [ जुन्या-नव्या ] खाली देतो :-
शरद पवार हिंदूविरोधी;त्यांना कार्यक्रमाला बोलवु नका;राष्ट्रीय वारकरी परिषदेनं काढल पत्रक
बकरीद पर CM उद्धव ठाकरे ने रियायत देने से किया मना तो, शरद पवार के पास पहुंच गए मुस्लिम विधायक, जानें पूरा मामला
शासनाने एसटीची थकबाकी देऊन कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे, इंटकची मागणी
राज्यातील १२१ मदरशांसाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी
पहले महाराष्ट्र सरकार के पास नहीं थे कर्मचारियों को वेतन देने के पैसे, अब बाँटेंगे मदरसों में वेतन
आर्थिक संकटातही नव्या गाडय़ांच्या खरेदीला मान्यता
राम मंदिर बनाने से कोरोना नहीं जाएगाः शरद पवार
आमंत्रण आलं तरी अयोध्येत भूमिपूजनाला जाणार नाही: शरद पवार
राफेलची भूमिका ‘गेमचेंजर’ ठरणार नाही : शरद पवार
शरद पवारांना जनतेच्या हिताची / राष्ट्राच्या हिताची इतकी चिंता / काळजी का वाटते ? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि खालील व्हिडियो पाहण्यात आला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राफेल के भारत पहुंचने पर अमित शाह बोले, ये फाइटर जेट गेम चेंजर साबित होंगे

Gk's picture

30 Jul 2020 - 7:27 pm | Gk

मग मोदी शहा शरद पवारांना अटक का करत नाहीत ?

:: After a long journey of 8500 kms, the Rafale jets finally reached Ambala Airbase yesterday.

Today the jets will be flown to Mumbai, taken to Milan Subway to fit extra accessories like rubber floor mats, dark tinted film, Pioneer Deck with 1 Sub woofer, 2 speakers & 2 Tweeters, Mud Flaps, Air Freshner, Reverse horn and a small silver idol of Modi on the dashboard. Phew!
--
Atul Khatri (stand-up comedian)

अनन्त अवधुत's picture

30 Jul 2020 - 12:27 pm | अनन्त अवधुत
अनन्त अवधुत's picture

30 Jul 2020 - 12:27 pm | अनन्त अवधुत
अनन्त अवधुत's picture

30 Jul 2020 - 12:28 pm | अनन्त अवधुत
अनन्त अवधुत's picture

31 Jul 2020 - 12:44 pm | अनन्त अवधुत

@संपादक मंडळी,
कृपया हे अर्धवट प्रकाशित झालेले प्रतिसाद उडवा. अग्रीम आभार.

मी माझ्या प्रतिसादात पियुष गोयल यांचे ट्वीट देण्याचा प्रयत्न करत होतो. पुर्वपरिक्षण करताना मला व्यवस्थीत दिसत होते. वर माझे वाक्य आणि त्याखाली पियुष गोयल यांचे ट्वीट, असे. पण प्रतिसाद प्रकाशित केला की एरर पेज दिसत होते. त्यामुळे शेवटी मी त्यांच्या ट्वीटची लिन्क माझ्या प्रतिसादात देउन, विषय सोडवला.
पण मिपा ने जरी मला एरर पेज दाखवले तरी प्रतिसाद प्रकाशित केले असे दिसतय.

अनन्त अवधुत's picture

30 Jul 2020 - 12:31 pm | अनन्त अवधुत

जाहिर झाले आहे. Powerpoint presentation मला हे सादरीकरण पियुष गोयल यांच्या ट्वीट मध्ये मिळाले.

नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल जे काय आंतरजालावर वाचायला मिळतंय ते एकूण चांगलं वाटतंय. पुढची कार्यवाही (इम्प्लिमेंट) कशी करणार देव जाणे.

सुबोध खरे's picture

1 Aug 2020 - 12:53 pm | सुबोध खरे

वाममार्गी आणि फुरोगामी लोकांनी ( उदा. सीताराम येचुरी) यांनी हे धोरण भिकार आहे म्हटले आहे

म्हणजे हे नक्कीच चांगले असावे असा माझा कयास आहे.

भीमराव's picture

1 Aug 2020 - 2:18 pm | भीमराव

नविन शैक्षणिक धोरण यावर सविस्तर चर्चा व्हावी.

कपिलमुनी's picture

4 Aug 2020 - 1:20 pm | कपिलमुनी

बिहार पुराने 55 लाख बाधित आहेत ,पण मेनस्ट्रीम मीडिया याला फुटेज देत नाही ,ते सुशांत सुशांत खेळत बसले आहेत.

कारण बिहार मध्ये भाजप सरकार आहे त्यांचे अपयश झाकायचे आणि महाराष्ट्र पोलिसांवर शिंतोडे उडवायचे

Gk's picture

14 Aug 2020 - 2:41 pm | Gk

कोविड , लॉक डाऊन बंद पडल्यापासून भाजपिय लोक राजकारणात कमी रस घेत आहेत

नैतर मध्य प्रदेश , राजस्थान , चाणक्य , राहुल वर हातभार लिहिले असते