एबा कोच यांच्या ‘दि कंप्लीट ताज महाल’ या ग्रंथाचा परिचय

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
18 Jun 2020 - 2:49 am
गाभा: 

एबा कोच यांच्या ‘दि कंप्लीट ताज महाल’ या ग्रंथाचा परिचय

1

एबा कोच (उच्चाराप्रमाणे ईबा कोह)

प्रस्तावना

हा ग्रंथ काही काळापासून माझ्या संग्रहात होता. तो मागवल्यावर त्याच्या नोट्स काढून त्यावर एक Comparative study of Books by Ebba Koch and Late P. N. Oak या शीर्षकाचा निबंध लिहायचे हाती घेतले होते. नंतर काही ना काही कारणाने ते लेखन मागे पडले. आता ते लेखनही सुरु ठेवून मराठीत काही लिहून सादर करावे आणि वाचकांच्या प्रतिक्रियांचा कानोसा घ्यावा असे वाटून हे लिखाण सादर करत आहे.
कै. ओकांचे ताजमहाल विषयावर विचार आजपर्यंत जनमानसात पसरले आहेत. या ठिकाणी कॅप्टन पु.ना. ओक ह्यांच्या 'नेताजींचे सहवासात' या पुस्तकाचा परिचय करून दिल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपण आधी वाचले आहेत. त्यांच्या म्हणण्याबाबत ईबा कोह यांच्या ग्रंथातून त्याबद्दल काय वाचायला मिळते याचा परामर्ष घ्यावा असा मानस आहे. शक्यतो मध्यम मार्ग स्वीकारून लेखन करायचा प्रयत्न आहे. मी पुनांचा पुतण्या म्हणून माझ्या कडून काही ठिकाणी त्यांचे म्हणणे जास्त ठळकपणे दाखवले गेले तर तो दोष माझा आहे.
सामान्यपणे खालील बिंदू कै ओकांच्या म्हणण्यातून ठळकपणे दिसतात-
१. कळसाचा आकार व त्यातील भाग -
२. ॐ भासेल अशी फुलाच्या पाकळ्यांची रचना
३. कार्बन १४ कसोटीतून समोर येणारे निष्कर्ष

यावर लेखन करण्याआधी या ग्रंथाची सामान्य माहिती देतो. २८८पानाच्या पुस्तकात ५० हजारातून निवडलेले ३७७ फोटो व आकृत्या आहे. मजकूर २००५ सालापर्यंतचा ताजा आहे. लेखिका व्हिएन्ना, ऑस्ट्रिया देशातील अभ्यासक आहेत. गेल्या १९९५ ते २००५ या १० काळात त्यांनी ताजमहालाच्या प्रत्येक भागाचा सर्वांगाने अभ्यास केलेला आहे. त्या भारतीय पुरातत्व खात्यात ताजमहालाच्या सल्लागार समितीवर होत्या. त्यांना Aga Khan Program for Islamic Architecture, Harvard येथील व्हिजिटिंग फेलोशिप मिळाली आहे. यावरून आपण समजून घ्या. त्यांच्या लेखनातून इतर काय म्हणतात ते बरोबर किंवा चूक असा पवित्रा नाही. काही ठिकाणी सौम्य भाषेत त्यांनी आपले मत दर्शवले आहे. भारतातील गचाळपणा त्यांनी एके ठिकाणी मजेने दाखवताना म्हटले आहे की विदेशी पर्यटकांना एटीएममधून पैसे काढायची आधुनिक सुविधा जिथे एका बाजूला आहे त्याच्या शेजारी गाई-म्हशींचे फदफदे टाळत तिथे पोहोचावे लागते!
माझ्या जवळचा ग्रंथ 2006 सालचा थेम्स अँड हडसन .कॉम चे प्रकाशन आहे. अमेझॉनवरून मागवता येते किंमत £24.95 आहे.

१. कळसाचा आकार आणि त्यातील भाग -


1

कळस म्हणजे काय? त्याचे महत्व हे लेखिकाला माहिती आहे. पान १६७ वर त्या म्हणतात, “ताज महलाच्या विशिष्ठ भागा(मधील) नंदनवन प्रतीकांमध्ये फुलांच्या फुलदाण्यांवर एक विशेष भर दिला आशोभिहे. त्यांचा (त्या काळातील वास्तू विशारदांचा) युरोपियन फॉर्म (मधे) भारतीय वास्तुकलेच्या प्राचीन प्रतीकांचा उपयोग (पूर्ण-घट) तांब्यातून बाहेर पडणाऱ्या पानातून, समृद्धीचे आणि कल्याणचे प्रतीक (दर्शवले जाते) त्याचा कोपरे सुत बनवण्यासाठी शाहजहानी पद्धतीला (वास्तूकलेच्या नव्याने ) अर्थरूपी करायला वापरला केला गेला आहे. फोटो ३४७ वरील भाष्याचे थोडेसे स्वैर रुपांतर;
मूळ लिखाण असे आहे - या पेक्षा अर्थवाही पुरुपांतर कोणाला सुचवायचे असेल तर स्वागत आहे. “The flower vases set a special accent in the Paradise symbolism of the hall. Their Europeanizing form is used for an elegant Shahjahani reinterpretation of an ancient symbol of Indian architecture, the pot with overhanging leaves (purna-ghata), which symbolizes prosperity and wellbeing [347];”

या सोबतचा फोटो -
फक्त कळसाचा फोटो कुठेही दिसत नाही. त्या कळसाची एक प्रतिकृती तिथे जमिनीवर मुद्दाम तयार करून ठेवलेली दिसते.
त्या मेहमानखाना म्हणजे ताजमहालाकडे तोंड केले तर उजव्या हाताला दिसते ती वास्तू. डाव्या हाताच्या वास्तूला मशीद आहे. कधी तिला सवाल म्हणतात उजव्या बाजूच्या वास्तूला साहजिकच जबाब असेही म्हणतात.

1
ती प्रतिकृती दिसेल पण एका बुरुजावरून, दुरून तो पान १८३ वरील, फोटो क्र. २६३ पाहा.
कै पुना ओकांच्या पुस्तकातील चित्रे कृष्ण धवल होती. ती नंतरच्या काळात रंगीत व अधिक जवळून काढली गेली आहेत. त्यामुळे त्यांचा वापर करून दाखवला आहे. …

1

२. ॐ भासेल अशी फुलाच्या पाकळ्यांची रचना -

1

ओकांनी ॐ असे वर्णलेला ईवा कोह यांनी फोटो क्र. ३४३ पान २२१ वर त्याला म्हटले आहे, “Flower type X (With bending stalks (देठ) supporting pair of blossoms (फुले)except at the top where one of each pair left out so as to create reverse (उलटवलेली) symmetry (प्रमाणबद्धता) on the Dado (जमिनीलगतची भिंतीवरची पट्टी )in one of the cruciform rooms (समोरासमोरच्या समानांतर खोल्या)”. (Photograph taken in 1997)
या फुलाचे नाव काय ते कै ओक सांगताना दिसत नाहीत. पण ते लिलीच असावे.
1
लिलीचे फूल कसे दिसते ते विकीपेडियावर पहा
ईबा कोह लाल फुलांच्या फोटोतील मजकुरात म्हणतात,” Martagon lily painted by Mansur, Mighsl, c.1620. This is possibly the earliest botanical illustration tulip linifolia regel, which grows in central asia and the western Himalayas. It is characterised a undulating (डुलणारी) leaves and broad (पाकळ्या) petals, abruptly contracting to a fine point, which curl back (फुलाच्या पानांची टोके आत वळलेली) and are a glowing red.
फोटोत निरखुन पाहिल्यास इनसेट मधे मी खाली मान घातलेल्या फुलाला डावीकडे तोंड करून दाखवल्यावर ॐ त्यातून ही दिसू शकतो असे भासते. इथला ॐ किंवा नागाच्या जोड्या, गणेशाचे रुप वगैरे दृष्टीभ्रम Optical illusions आहेत. मानले तर ॐ आहे नाही तर फक्त फुलाची आकृती आहे. नाग जोड्या, गणेशावर पुढील भागात भाष्य केले आहे.
लिली हे फूल अनेक रुपात विविधरंगातील छटातून असते. कमळ हा एक प्रकारच्या लिलीचा प्रकार असावा.

३. कार्बन १४ कसोटीतून समोर येणारे निष्कर्ष -

(१९७४ साली मार्विन मिल्स या अमेरिकन तज्ज्ञाने आपणहून आग्रऱ्याला जाऊन यमुनेच्या पात्राकडे असलेल्या संरक्षक भितीतील एक लाकडी दरवाज्याच्या भागातील काही इंचाचा तुकडा परीक्षणासाठी काढून नेला होता. नंतर त्यांच्या निष्कर्षातुन १३५९ ± ८९ असा काळ असावा असा निष्कर्ष काढला होता.) कै. ओकांनी ते आपल्या पुस्तकात नमूद केले. ("The date came to 1359 AD with a spread of 89 years on either side and 67% probability, Masca corrected.")
आता तर तो दरवाजा विटांच्या भिंतीने बंद केला आहे.
1

ईबा कोह यांच्या ग्रंथात कार्बन कसोटीचा उल्लेख आजिबात केलेला नाही. मग मार्विन मिल्स यांचा संदर्भ बिबलिओग्राफीत येणार कसे?

(जाता जाता - नाडीग्रंथांच्या संदर्भात ताडपट्टीची कार्बन कसोटी करायला मी मिल्स त्यांना विनंती केली होती. पण तोवर जर्मनीत ती कसोटी झाल्याचे समजल्यावर मी ती बाब पुढे रेटली नव्हती.)

पुढे चालू...

प्रतिक्रिया

समीर वैद्य's picture

19 Jun 2020 - 12:17 am | समीर वैद्य

दिसत नाहीयेत...
लेख वाचतो आहे....

शशिकांत ओक's picture

19 Jun 2020 - 8:16 am | शशिकांत ओक

मजकूरानंतरचे दिसत नाही हे कळले तर बरे होईल.

मुखपृष्ठ

1

कलशाचे जमिनीवरील नकाशा चित्र
1

चौथा कोनाडा's picture

19 Jun 2020 - 1:09 pm | चौथा कोनाडा

काही दिवसांपुर्वी हा व्हिडियो पाहण्यात आला, यात ही " त्या लाकडी नंतर वीटांनी बंद केलेल्या " दरवाज्याचा उल्लेख आणि चर्चा आहे !

शशिकांत ओक's picture

20 Jun 2020 - 2:37 am | शशिकांत ओक

प्रवीण मोहन यांच्या क्लिप्सवर बंदी आणली गेली होती. त्यांनी आता बहुतेक माझा हा शेवटचा भाग असेल असे म्हटल्याची क्लिप पाहण्यात आली होती. जाहिरातदार आपल्या पैशाच्या बळावर कसे दडपण आणतात याचे ते उदाहरण होते. असे म्हणतात.

शशिकांत ओक's picture

19 Jun 2020 - 2:39 pm | शशिकांत ओक

यांनी उपस्थित केलेले मुद्दे विचार करायला लावतात. आतून बंद केलेल्या दरवाज्याच्या किल्ल्यांचा रखवालदार कोण?
एबा कोच बाईं आत जाऊ दिले जाते. तर इतरांना का नाही?
वगैरे बाबी उपस्थित होतात.

कंजूस's picture

20 Jun 2020 - 9:49 am | कंजूस

रुद्र महालय, सिद्धपूर, याबाबत मी माझ्या मोढेरा पाटण लेखात फोटो क्र ७ पाहा
तिथेही बंदी आहे. आम्ही गेलो होतो त्या अगोदर दोन महिने राडा झालेला .

विजुभाऊ's picture

19 Jun 2020 - 6:23 pm | विजुभाऊ

सध्या देशात आणि राज्यातही भाजप चे सरकार आहे.
राम मंदीरा संबन्धात जे मुद्दे उपस्थित केले तेच मुद्दे इथेही लागू पडतात. राम मंदीरासाठी उत्खननाची आवश्यकता होती . इथे त्याचीही जरूर भासणार नाहिय्ये.
मग सरकार हे का करीत नाहिय्ये

सरकार हे का करीत नाहिय्ये

राम जन्म भूमी न्यास एका अर्थाने भारतातील मामला होता. ताज महालाच्या संदर्भात संपूर्ण जगातील मुगल बांधकाम कलेवर प्रश्न निर्माण केला जाऊ शकतो...
ताजमहालाचे देखणेपण टिकवून, राहू देणे व एका बाजूला त्याच्या मुळ स्वरूपाला चर्चातून प्रभावीपणे तापवलेले ठेवण्याने सत्तेच्या राजकारणाला सोईचे जात असावे.
एबा कोच यांनी कै पुना ओकांच्या मताला आजकाल मोठ्या प्रमाणात मान्यता मिळत आहे असे पान २५० वर नमूद केले आहे. शिवाय परदेशातून आलेल्या पर्यटकांना ते शिवमंदिर कसे होते असे पटवून देण्यास (भारतीय) तत्पर ( who is at pain to) असतात. असे मत व्यक्त केले आहे.
इतरांची मते समजून घ्यायला आवडेल.

१)त्या खोल्यांत आणखी काही मंदीराचे अवशेष सापडले तर ताजमहाल विवादात येऊन बंद केला जाऊ शकतो. तसे होऊ द्यायचे नसेल.
२) समजा बंद खोल्यांत जाण्याचे अरुंद मार्ग असतील तर एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना आत जाऊ देणे धोक्याचे ठरेल.

विजुभाऊ's picture

20 Jun 2020 - 9:31 am | विजुभाऊ

पर्यटकांना आत जाऊ देणे धोक्याचे ठरेल.

पर्यटक राहू देत. अभ्यासकांना तरी आत जाऊ द्या

पुरातत्व खात्याच्या परवानगीने होईल.

शशिकांत ओक's picture

20 Jun 2020 - 11:39 am | शशिकांत ओक

काम करून निवृत्त झालेल्यांना तोंड उघडायला प्रवृत्त करायला शक्य आहे का? यावर विचार व्हावा!

शशिकांत ओक's picture

20 Jun 2020 - 11:49 am | शशिकांत ओक

काढून ते विटांनी बंद करायचा हुकूम कागदावर कोणी तरी दिला असेल, कोणी तरी त्यावर टेंडर काढून बांधकाम व्यावसायिकांनी ते काम पार पाडले असेल. अशांनी आपापल्या आठवणी सांगितल्या तर?
मी मध्यंतरी ताजमहाल बघायला गेलो होतो तेव्हा संगमरवरी व लाल दगडांचा योग्य आकार बनवायचे काम करणाऱ्या कारागीरांशी बोलताना हे तुकडे कुठे कुठे चिकटवायचे आहेत याचे कंत्राटी पद्धतीने काम चालू आहे. याची आठवण झाली.

रमेश आठवले's picture

20 Jun 2020 - 7:19 pm | रमेश आठवले

पुरातत्व विभागाकडे जुजबी गवण्डी करण्या साठी स्वतः ची व्यवस्था असेल. मात्र वरून आदेश आल्या शिवाय ते असले काम हातात घेणार नाही.

त्यातून जुन्या वास्तुच्यासाठी जर भरपूर वाव असेल तर!

इस्रोचे लोक नाही तोंड उघडत तर पुरातत्त्ववाले कशाला आग लावतील?

शशिकांत ओक's picture

20 Jun 2020 - 7:15 pm | शशिकांत ओक

पण आगलावू हिंदी चॅनेलवर भीषण चेहरा असलेले काही अशा गोष्टींना प्राधान्य देताना दिसतात, काहींना टीआरपीसाठी लोकांना प्रवृत्त करायला शक्य आहे...?

दुर्गविहारी's picture

22 Jun 2020 - 7:35 pm | दुर्गविहारी

अभ्यासपुर्ण लिखाण ! आणखी वाचायला आवडेल. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

शशिकांत ओक's picture

27 Jun 2020 - 11:27 pm | शशिकांत ओक

माझ्या एका हवाईदलातील मित्रांनी नेटवरून भाषणाचे निमंत्रण दिले आहे. त्यासाठी ताजमहालाचा विषय त्यांनी निवडला. त्यामुळे मिपावरील लेखाचा उपयोग करून सादरीकरण सोपे होईल असे वाटते...

चौकस२१२'s picture

29 Jun 2020 - 4:02 pm | चौकस२१२

पु ना ओकांचे भाषण आधी ऐकले कि त्यांचे 'ताजमहाल नव्हे तेजोमहाल ' हे पुस्तक आधी वाचले ते आठवत नाही... या संदर्भातील एक अनुभव
भाषणानंतर तिथे एक एक गृहस्थ भेटले होते, त्यावेळी १० वि नंतर ची सुट्टी होती आणि त्या गृहस्थाने सांगितले कि एक सहल निघते आहे दिल्ल्ली जयपूर आग्रा इत्यादी .
महाराष्ट्रातून वेग्वेगळ्या शहरातून लोक येणार आहेत ..( प्रत्यक्षात आम्ही तिघेच होतो शेवटी) घरची परवानगी घेऊन मी आणि माझा एक मित्र असे दोघे त्यांच्या बरोबर निघालो .. पु नाच्या दृष्टिकोनातून त्याने आम्हाला ताजमहाल, फत्तेपूर सिक्रि इत्यादी दाखवले ,, तो इसम त्यांचा चेला होता म्हणा किंवा पुनांचे विचार पटणारा होता हे नक्की आणि नंतर दिल्लीत गेल्यावर लक्षात आले कि संघाचा पण कार्यकर्ता होता ( उघड नाही पण दुरून तरी) कारण दिल्लीत कोणत्यातरी संघाचं एका मोठ्या कार्यालयात ( जुन्या मोठ्य्या ऐसपैस अश्या हवेलीत राहिल्याचे आठवते)
- ताजमहाल मधील नदीच्या पात्राकडे उतरंड जशी होते तसे बरेच मजले होतात आणि ते बंद का?
- घुमटात कलश नारळ आणि पाने आणि त्याची प्रतिकृती काळ्या दगडातील जमिनीवर केलेली हि हिंदू निशाणी कशी?
असे काही मुद्दे त्याने दाखवलेले आठवतात तसेच अजून एक
- घुमटात पिंड आणि दोन नाग असे काहीसे काम कसे काय?
- ताजमहाल किंवा फत्तेपूर सिक्रि येथे एक गोष्ट दाखवली ती कि आवारात जी थडगी ठेवली आहेत ती खोटी असावीत..? का कारण ओळीने ठेवलेल्या थडग्याच्या नंतर खाली भुयारी जाणारा एक जिना होत आणि आश्चर्य म्हणजे खाली गेल्यावर एक दरवाजा होता आणि तो बरोअबर थडग्यांच्या बाजूला उघडणारा! असे कसे?
जर थडगी खरी तर मग त्याचं खाली कसे जात येईल...
हे सगळे पाहून ऐकून मनात प्रश्न निर्माण झाले यात शंका नाही ,पण मग पूढे पुनांच्या पुस्तकातील काही गोष्टी मात्र ओढून ताणून आणल्या सारख्या वाटल्या
- जर कारागीर आणि स्थापत्य विशारद अनेक हिंदू असतील तर नकळत किंवा अगदी जाणीवपूर्वक हिंदू कलेचा प्रभाव या ठिकाणी पडला असेल ( बादशहाच्या संमतीने ) असे नाही का होऊ शकत
- अतिपुर्वे कडे पण हिंदुत्व पसरेल होते मान्य पण जगभर हिंदूच होते हे काही पटत नाही
- पुढील मुद्दा ( कृपया खालील म्हणणे चूक असल्यास चूक दाखवून द्यावी )
लाखो वर्षांपूर्वी गोंडवन म्हणजे ऑस्ट्रेलियात ज्याला गोंडवानालँड म्हणतात त्यावेळी ऑस्ट्रेलाई आणि भारत जोडलेले होते या भौगालिक सत्याचा आधार घेऊन असे विधान केलं आहे कि ''ऑस्ट्रेलिया म्हणजे अस्त्र आलंय'
हे विधान मात्र मला अगदीच ओढलेले आणि टोकाचे वाटले खरे तर अतर्क्य वाटले

योगविवेक's picture

29 Jun 2020 - 10:52 pm | योगविवेक

- जर कारागीर आणि स्थापत्य विशारद अनेक हिंदू असतील तर नकळत किंवा अगदी जाणीवपूर्वक हिंदू कलेचा प्रभाव या ठिकाणी पडला असेल ( बादशहाच्या संमतीने ) असे नाही का होऊ शकत

असे मानायला काही हरकत नाही.
शहाजहान हिंदूंच्या चेहरा मोहऱ्याशी जवळ जाणारा, तुर्की पेक्षा हिंदुस्तानी, इतरही बोली भाषा जाणणारा होता, मरायच्या आधी एका पत्रात औरंगजेबाला उद्देशून म्हणाला होता की अरे तुझ्या पेक्षा ते काफिर बरे! ते मेलेल्या पूर्वजांना पाणी (ओंझळीने) देतात! आणि मी तुझा बाप जीवंत असताना मला पाणी पुरवठा बंद करतोस? वगैरे वगैरे...
म्हणून ताजमहालाच्या बांधकामाला लावलेल्या मजूर, कारागिरांना हिंदू पद्धतीने वास्तू निर्माण कलेत प्राविण्य प्राप्त असल्याने छिन्नी हातोडा चालवायची मुभा दिली असेल कि , "करतायत ना सुंदर दिसेल असे काम तर करू देत." हाय काय अन नाय काय?
मित्रांनो, इतकेच सोपे सरळ हे राज्य कर्ते असते तर मग शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेला काही अर्थ नाही असे म्हणावे लागेल.
ताजमहालाच्या पायवाटेवर अनेक कारागीरांनी देवनागरीत आपली नावे कोरलेली दिसतात. पैकी कोणी हाता सरशी एखाद्या सुविचारला लिहिले असते! इतका सहधर्मभाव उचंबळून आला असता तर पाकिस्तान निर्माण व्हायची गरज पडली नसती.
...
लक्षात ठेवा... राजकर्ता ... व त्याचे मुकादम ठेकेदार हातात हंटर घेऊन कामावर बारीक लक्ष ठेवून असतात. प्लान खुद्द शहाजहानने बनवलेला असताना इराणी कारागीराला मुख्य नेमलेले असताना कोणी अशी खोडसाळपणे आगळीक करेल तर त्याची काय वाट लावली जाईल! अहो तुम्ही कितीही सहिष्णुता वादी असलात तरी आधीच्या भाडेकरूंनी त्याच्या आवडीनिवडीचे हज यात्रेचे फोटो असलेले कॅलेंडर लावले असेल तर राहू दे, शेवटी तारीखच दाखवली असेल म्हणून ठेवता का? इथे या व आधीच्या सम्राटाचा इतिहास मुसलमान करायला विशेष उत्सुक असतो असे वेळोवेळी दर्शवतो तो अशा राजाच्या बांधकामात हिंदू कला गूण दाखवतो! उलट तो गैर हिंदू कलेला आपल्या हातून कसे तयार होते आहे हे दाखवून शाबासकी मिळवेल?

चौकस२१२'s picture

30 Jun 2020 - 6:40 am | चौकस२१२

योगविवेक...
मी हि 'मुसलमान आक्रमकांनी आणि आणि राज्यकर्त्यांनी ' बहुल हिंदू असलेल्या भारतात फार 'सर्वसमभावाने ' राज्य केलं ' असला विचार करणार अति सहिष्णुता वादी निश्चितच नाही ( ते बिरुद अरुंधती रॉय किंवा प्राध्यापक राम पुनियानी यांसारखे महान लोक मिरवतात )
उलट पु ना ओकांच्या विचारातून एक सहल अनुभवली आणि प्रत्यक्ष पुस्तकातील काही मुद्दे एकाने दाखवायचा प्रयत्न केला आणि मी हि भारावून गेलो होतो परंतु पुढे वाचन,वय आणि प्रवास या गोष्टीतून यातील काही मुद्य्यांवर शंका होऊ लागली आणि ते एकांगी वाटू लागले म्हणून प्रतिक्रिया दिली

शशिकांत ओक's picture

30 Jun 2020 - 9:08 am | शशिकांत ओक

योग विवेक आणि आपण,
पुनांच्या इतर लेखनातून 'काहीही जोड तोड करून लिहितात की काय असे वाटले तर नवल नाही! पण ते लेखन आधीच्या संदर्भात वाचले तर वकिली युक्ती म्हणून मान्य करावे लागते.
२०१० साली प्राग मधे असताना एका बाईंची भेट झाली. त्यांनी आपल्या संशोधनातून असे म्हटले होते की झेक, जर्मन, स्लाव्ह वगैरे त्यांच्या माहितीतील भाषांच्या शब्दात संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. तुम्ही भारतातून आला आहात म्हणून मुद्दाम भेटायला आले आहे. त्यांचा लेख त्यांच्या भाषेत होता. म्हणून काही शब्द उदाहरणे म्हणून देत त्यांनी त्यांचे म्हणणे तुटक इंग्रजीतून सांगितले.
मला वाटले की मी ओक म्हणून त्या मला पुनांच्या संदर्भामुळे भेटायला आलेल्या आहेत. पण "कोण पी एन ओक" म्हणत त्यांनी ते नाव प्रथमच ऐकल्याचे म्हटले!
मग मला इंटरनेटवरून पुनांच्या वर्ल्ड वैदिक हेरिटेज मधील युरोपीय देशांच्या यादीतील झेक भाषेतील संस्कृत शब्दांचे निर्देश दाखवले. त्या बाई चकित झाल्या होत्या. व मी देखील कि पुनांच्या विचार करायचा आवाका किती विशाल होता... इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसतानाच्या काळात त्यांनी केलेले शोधकार्य अदभूत आहे. 'रोम रोम में बसने वाले राम' पहा रामाची राजधानी रोम असे गाणे पण आहे! ओकांची टिंगल करणारे म्हणू देत. काही ठिकाणी तर्काचा अतिरेक वाटला तरी मुख्य कार्य महत्वाचे.

'रोम रोम में बसने वाले राम' पहा रामाची राजधानी रोम असे गाणे पण आहे! ओकांची टिंगल करणारे म्हणू देत. काही ठिकाणी तर्काचा अतिरेक वाटला तरी मुख्य कार्य महत्वाचे.

ओक साहेब, पु ना ओकांची टिंगल करण्याचा काहीच हेतू नाही पण खरंच ऑस्ट्रेलिया = अस्त्रालय असे विधान वाचल्याचे आठवतंय ... ( असे विधान जर पुस्तकात असेल ) तर त्यामागचा तर्क हा काही पटत नाही, रोम आणि राम ? हे काय उलगडून संदर्भ द्याल काय?

बरं ताजमहाल हे मूळ हिंदू मंदिर किंवा महाल होता अश्याच प्रकारचा इतिहास असलेली अजून एक जगप्रसिद्ध वस्तू म्हणजे इस्तंबूल मधील ब्लू मॉस्क जि कधी काळी ख्रिस्ती धर्माची वास्तू ( हया सोफिया0 पण होती आणि १९३५ पासून आता संग्रहालय आहे ,

गंमत म्हणून सांगतो ऑस्ट्रेलीतील अडिलेड शहरातील एक हिंदू मंदिर हे जुन्या चर्च ला विकत घेऊन त्याचे रूपांतर केलं आहे ( अर्थात विकत घेऊन जबरदस्तीने नाही )

गामा पैलवान's picture

30 Jun 2020 - 6:30 pm | गामा पैलवान

चौकस२१२,

हिंदूंचा वावर जगभर होता हे नवीन नाही. दक्षिण अमेरिकेतलं प्राचीन स्थापत्य तत्कालीन हिंदू स्थापत्याशी मिळतंजुळतं होतं. संदर्भ : https://thegr8wall.wordpress.com/2013/03/02/similarities-in-ancient-hind...

उज्जैनस्थित महान भारतीय ज्योतिषी ( = astronomer) वराहमिहिर हा बहुभाषिक होता. त्याने लिहिलेल्या सूर्यसिद्धांतात पाच खंड आहेत. त्यापैकी एक खंड ग्रीक ज्योतिष व एक खंड रोमन ज्योतिषावर आहे. त्याने इजिप्तच्या ज्योतिषावरही भाष्य केलेलं आहे. इतक्या दूरदूरच्या प्रांतांचा अभ्यास त्याकाळी भारतात होत असे. गम्मत म्हणजे हा इराणी वंशाचा होता असा दावा आहे म्हणे. संदर्भ : http://www.iranchamber.com/personalities/varahamihira/varahamihira.php

सांगायचा मुद्दा काये की ऑस्ट्रेलिया बेत त्याकाळी ज्ञात असणार. त्याचं नाव अस्त्रालय असायला काहीच हरकत नसावी.

आ.न.,
-गा.पै.

शा वि कु's picture

30 Jun 2020 - 6:42 pm | शा वि कु

गुगल सर्च याबद्दल ऑस्ट्रेलिस=दाक्षिणात्य प्रदेश असे नाव देतो. लॅटिन शब्द.

शशिकांत ओक's picture

30 Jun 2020 - 10:08 pm | शशिकांत ओक

विचार करत राहू. नंतर आपण वेगळा धागा काढून पहा.