मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

आयुष्याच्या वाटेवर..

Primary tabs

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
14 Jun 2020 - 12:20 pm

आयुष्याच्या वाटेवर..

आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात
काही विस्मृतीत
जातात ; तर
काही मनात घर
करतात..
आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात..

मनात घर करणारे
खोलवर रुजतात;
त्यांची साथ
हवीहवीशी वाटत
असताना मात्र
साथ सोडुनिया जातात.
आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात..

त्यांच्या परतण्याची
वाट पाहत असताना
डोळेही पाणावतात.
त्यांच्याही मनात
तेच असतं ;
सांगताना मात्र
कचरतात.
आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात..
त्यातले काहीजणच
मात्र मैत्रीला जागतात..

-दिप्ती भगत
(२१जून,२०१९)

आयुष्यमाझी कविताआयुष्याच्या वाटेवरकवितामुक्तक

प्रतिक्रिया

गणेशा's picture

15 Jun 2020 - 12:13 am | गणेशा

मस्त...
----
आयुष्याची वाट असतेच अशी ..कधी सरळ साधी.. आपलिशी वाटणारी.. आपलीच.. आपल्या माणसांची..
तर कधी मध्येच वळणे वळणे घेणारी.. काही जन नेमके या वळणावर भेटतात.. आणि मग ते मागे पडतात...त्या वळणांसारखे..
कधी कधी या वाटेवर सोनकी ची पिवळी धमक फुले येतात , हवीहवीशी वाटणारी.. सुंदर..मन रमते त्या फुलांच्यात ...
काही माणसे नेमकी ह्या सोनकी सारखी असतात.. भुलवणारी.. सुंदर.. पण हातात न गवसणारी...
कधी कधी आयुष्याची वाट हमरस्ता झाल्या सारखी भासते.. उगाच पळत सुटते ती.. काहीच कारण नसताना..
अशी कित्येक माणसे या रस्त्यावर भेटतात आणि ओळखीचे अनेक टोलनाके ओलांडुन पुन्हा अनोळखी होतात...
आयुष्याची ही वाट कातरवेळी मात्र वेगळी भासते.. ते उधळलेले लालसर रंग, ती जणु तिच्या केसात माळत असते..
भेटतो असा एखादा..प्रेमळ..हळवा.. आपलाच असणारा .. रोज घरी आल्यावर मिठीत घेणारा ...

-- शब्दमेघ

कौस्तुभ भोसले's picture

17 Jun 2020 - 4:15 pm | कौस्तुभ भोसले

आवडली

मन्या ऽ's picture

19 Jun 2020 - 10:38 pm | मन्या ऽ

गणेशदा, कौस्तुभ आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! :) वाचकांचे आभार.. :)