त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in काथ्याकूट
4 Jun 2020 - 10:50 pm
गाभा: 

साधारणपणे दहा-बारा वर्षापूर्वी बेंगलोरमध्येच भाड्याच्या घरात राहत होतो. घराची मालकणी शगुफ्ता नामक (नाव मुद्दामुन लिहिले आहे.वस्सकन अंगावर येऊ नये.)एक स्त्री होती. घराचे डिल होण्याअगोदर तोंडात साखर ठेवुन बोलायची.माझे नुकतेच लग्न ठरले होते.गोड तर इतकी बोलत होती कि मी माझ्या होणार्या बायकोचा व तिचाही लग्नाअगोदर फोनवर संवाद घडवुन आणला.
उदा. भाईसाब आप फिकर मत किजिए. आय विल बी अ‍ॅट युअर सर्विस.वगैरे. (हेच वाक्य लक्षात राहण्याचे कारण पुढे येईलच.)
पण जेव्हा घरात राहायला सुरवात केली व अ‍ॅग्रीमेंट वगैरे सोपस्कार..त्यापेक्षा बेंगलोरच्या रितिनुसार साधारण आठ-दहा महिन्यांचे आगाऊ भाडे अनामत म्हणुन तिला दिले त्यानंतर तिने खरे रंग दाखवायला सुरवात केली. म्हणजे एकदम विलन न बनता काही छोटी मोठी कामे घरात निघाली तर वो आप ही देख लो हेच पालुपद. ( आय विल बी अ‍ॅट युअर सर्विस ची ऐशीतैशी )ह्यात ड्रेनेज लॉक होणे, पाण्याचे मीटर खराब होणे असे काही गंभीर समस्या होत्या. मालकीणीचा चार फ्लॅट असलेला इंडिपेंडंट बंगला होता त्यामुळे बाकिच्या भाडेकरुंशी संवाद साधुन ही कामे करावी लागत आणि भाडेकरुही तिने केवळ अर्थप्राप्ती हा निकष ध्यानात घेऊन ठेवले होते. (बॅचलर्स वगैरे).त्यांना मॅनेज करणे अजुन एक दिव्य होते. ती स्वतः दुसरीकडे राह्त होती मालकीणीचा नवरा चांगल्या कंपनीत कामाला होता व एकदा ती उपलब्ध नसल्याने पाणी न येण्याची एक समस्या त्याच्या कानावर घालुन कृपया हीच निराकरण करा अशी विनंती केली असता घर खाली करण्याची धमकी दिली होती त्यामूळे जपूनच बोलणी करावी लागत. ते असो. पुढे त्या घरातुन दुसरीकडे शिफ्ट झालो तेव्हाही तिने पत्नीचा अप्रत्यक्ष पाणउतारा केला. पत्नी ह्याबद्दल तारतम्य बाळगुन विचार करणारी असल्याने तिने ह्याकडे कानाडोळा केला. पण आज बारा वर्ष होत आली आणि ही गोष्ट अधेमधे आठवत असायची.पण सध्या लॉकडाऊनच्या काळात का कुणास ठाऊक माहीती नाही पण सकाळी उठल्या उठल्या प्रातर्विधी उरकतानाच एकदा तरी आठवत राहते(त्या दृष्टीने प्रातःस्मरणीयच) आणि मनस्थिती लगेच बदलते. थोडक्यात प्रेमभंग झालेल्या प्रेमीसारखी मनस्थिती होते.(!) थोडा बारीक विचार केला असता लक्षात आले कि माझा जो काही पाणउतारा केला तो एकवेळ मी विसरलो असतो पण पत्नीचा केलेला पाणउतारा विसरणे अवघड वाटतेय. ह्याबाबतीत खुद्द पत्नीलाच विचारले असता तिने सांगितले कि अश्या गोष्टींचा ती जास्त विचार करत नाही. ती स्वतः दिल्लीत राहीली आहे आणि अश्या गोष्टी आधीही अनुभवल्या आहेत.ते ही असो पण ह्या गोष्टीनंतर गोड बोलणार्या कुठल्याही व्यक्तीवर पटकन विश्वास बसत नाही. लगेच अँटीना चालु होतो कि काहीतरी उद्देश अस्णार. पण अश्या मनस्वास्थ्य बिघडवणार्या आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

4 Jun 2020 - 11:26 pm | योगी९००

मी पण योगेशच व सध्या बंगलोरला आहे. पण हॉस्टेलवर रहातोय त्यामुळे असा अनुभव नाही.

सरळ एकदा तिला फोन करा. तिची विचारपुस करा. गोड भाषेत बोला. बोलता बोलता सांगा की तुम्ही जो आमचा पाणउतारा केला तो आम्ही अजूनही विसरलो नाही. पुढे असेही सांगा की असे बोलणारे सुदैवाने या आधी व नंतर कोणीच आम्हाला भेटले नाही. आम्ही लकी आहोत की त्यानंतर कोणीच आम्हाला असे भेटले नाही. हे सगळे हसत हसत आणि आनंदी मुडने सांगा. ती जरी भांडली तरी काही बोलू नका व शांतपणे फोन कट करा. कदाचित ती सॉरी पण म्हणेल...

पण यानंतर तिचे मनस्वास्थ्य बिघडलेले राहील... कायमचे..!!

कानडाऊ योगेशु's picture

4 Jun 2020 - 11:44 pm | कानडाऊ योगेशु

मी पण योगेशच व सध्या बंगलोरला आहे.

बाबौ ह्यासाठीच त्या घरमालकीणीचे नाव लिहिले होते. त्यानावाची व्यक्ती घरमालक म्हणुन समोर आली तर सावध राहा.

बाकी माझ्यापध्दतीने मी निषेध नोंदवला होता पण अनामत म्हणुन दिलेली बरीच मोठी रक्कम तिच्याकडुन परत येणे बाकी असल्याने जास्त काही करु शकलो नाही. पण तिचे मन:स्वास्थ बिघडवणे हा उपाय नसुन आपण अश्या आठवणींपासुन स्वतःची कशी सुटका करुन घ्यायची ह्याचा उपाय शोधतो आहे. (तसे पाहायला गेले तर लेखात लिहिल्याप्रमाणे आता गोड बोलणार्या कुणाही व्यक्तीवर विश्वास टाकु शकत नाही. हा एक फायदाच झालाय.)

ऋतुराज चित्रे's picture

4 Jun 2020 - 11:45 pm | ऋतुराज चित्रे

ती स्वतः दिल्लीत राहीली आहे आणि अश्या गोष्टी आधीही अनुभवल्या आहेत.
हे खरय. तुम्ही दिल्लीचा अनुभव घ्या,किंवा कधीतरी तिकडचा भाडेकरू ठेवून बघा.

कानडाऊ योगेशु's picture

4 Jun 2020 - 11:58 pm | कानडाऊ योगेशु

होय. पत्नीने सांगितल्यानुसार दिल्लीतील पंजाबी स्त्रिया जीभेवर साखर पेरुन बोलतात. तिला शिक्षणानिमित्त काही दिवस दिल्लीला राहावे लागणार होते तेव्हा पी.जी साठी चौकशी करताना तिने हे अनुभवले. ह्या शगुफ्ता नामक स्त्रीचे मूळ हे जम्मू काश्मीर मधले होते आणि एकुण बोलण्याची पध्दत वगैरे पाहता पत्नीला तिची व्यावहारिकता लवकरच समजुन चुकली होती.

तुमची अवस्था दोन साधूंच्या गोष्टीतल्या साधू सारखी झाली आहे. ती गोष्ट थोडक्यात अशी, दोन संसार त्यागलेले साधू एका अरूंद नाल्याजवळ उभे असतात. त्यांना तो नाला पार करायचा असतो. तेव्हढ्यात तिथे एक सुंदर कमनीय बांध्याची तरुणी येते. तिला पण नाला पार करायचा असतो. ती त्यातल्या एका साधूला विनंती करते कि मला उचलून पलीकडे नेऊन ठेवाल का? त्या दोघांपैकी एक साधू लगेच त्या तरुणीला सहज उचलून पलीकडे नेऊन सोडतो. आणि ती तरुणी आपल्या रस्त्याने निघून जाते. दुसरा साधुसुद्धा पहिल्याच्या मागोमाग येतो आणि दोघे चालू लागतात. पण थोड्या वेळाने पहिल्या साधूला आपल्या सहकाऱ्याची चल-बिचल जाणवते, आणि तो त्याला सांगतो कि बाबारे, मी त्या तरुणीला त्या नाल्याजवळच सोडलं आहे, आणि तू तिच ओझ अजून का बर उचलून ठेवल आहेस?

तुमच्या पत्नीने जर तो विषय सोडला आहे, तर तो अपमान तुम्ही पण सोडलाच पाहिजे (तुमची ती मालकीण पण या गोष्टीतल्या तरुणीसारखी सुंदर कमनीय बांध्याची होती का? आणि असली तरीही तिला तिच्या घराजवळच सोडून तुम्ही तुमच्या बायाकोसोबतच वर्तमानात रहा)

आणि एंटेना चालू असण हि चांगली गोष्ट असते, पण सिग्नल मात्र योग्यच पकडा. Tin Tin मध्ये एक वाक्य आहे “People always have the habit of catching wrong signals!!” ते तुम्ही तुमच्या बाबतीत टाळालच अशी आशा करून माझे किर्तन संपवितो

कानडाऊ योगेशु's picture

4 Jun 2020 - 11:52 pm | कानडाऊ योगेशु

राणेसाहेब तुमचे विश्लेषण बरोबरआहे. कधी कधी वाटते मनालाच अश्या गोष्टीत गुंतुन चर्विताचर्वण करायला आवडते. पण सोडुन द्या म्हणुन सुटले जात नाही ही खरी समस्या आहे.

योग्या, मला तर चांगलाच ओळखतो तू..

सरळ फोन कर त्या शेंगउपटिला, दोन साजूक शिव्या हासड.. मग मनाची शांती होईल..
मग तू या आठवणीत रमशील कि काय भारी शिव्या दिल्या शेंगउपटिला...

कानडाऊ योगेशु's picture

5 Jun 2020 - 12:32 am | कानडाऊ योगेशु

नाय रे गण्या. आता बारा वर्षांनंतर फोन करुन बोललो कि तुझ्यामुळे यंव झाले अन त्यंव झाले तर तिला आसुरी आनंद मिळु शकतो. ती ह्याबाबतीत निर्ढावलेली आहे. कारण तिथुन गेलेला जवळपास प्रत्येक भाडेकरु तणतणतच गेला आहे.

गणेशा's picture

5 Jun 2020 - 12:44 am | गणेशा

योग्या,
मग माझ्यासारखे जुणे, पन तिथं राहिलेले एक दोन तरी गोळा कर.. अन त्यांच्यात बसल्यावर दे शिव्या...

शिव्या हा मनशांती मिळवण्याचा एकमेव मार्ग असतो अश्या वेळेस..
नाही तर बस आठवत त्या म्हाताऱ्या शेंगउपटिला..
--
अवांतर :
मिपा वर गण्या म्हणणारा तू पहिलाच.. बरं वाटलं.. आपल्या सारखं..
सायकलचा धागा घेतलाय लिहायला त्यात हे असले नावाचे सांगितले आहे.. बरं वाटतं..

शेर भाई's picture

5 Jun 2020 - 12:15 am | शेर भाई

मनाला अश्याच गोष्टीत गुंतुन चर्विताचर्वण करायला आवडत असल्यास तुमचा सगळ्यात आधी एंटेना बदला, कारण सिग्नलच चुकीचा पकडला जात असेल तर कार्यक्रम चुकीचेच लागणार.

सगळ्याच गोष्टी स्वतःसाठी नसतात करायच्या हे आधी लक्षात घ्या. तुम्ही जर मनापासून ठरवलेत तर तुम्ही नक्कीच ते सोडून द्याल.

पाषाणभेद's picture

5 Jun 2020 - 12:57 am | पाषाणभेद

जास्त विचार नका करू. व्यक्ती तितक्या प्रकृती.
ती तुमचा विचार अजूनही करत असेल काय?

कानडाऊ योगेशु's picture

5 Jun 2020 - 9:08 am | कानडाऊ योगेशु

ती तुमचा विचार अजूनही करत असेल काय?

नसावी. खाली भुजंगरावांनी म्हटल्याप्रमाणे मी तिच्या खिजगणतीतही नसेल.

भुजंग पाटील's picture

5 Jun 2020 - 2:21 am | भुजंग पाटील

थोडक्यात म्हणजे ती शगुफ्ता बारा गावचे पाणी प्यायलेली स्ट्रीट स्मार्ट बाई असून कमी खर्चात आणि कमी त्रासात प्रॉपर्टी मॅनेज अन फायदेखोरी करणे तिला चांगलेच माहिती होते. तिच्यासाठी असले वागणे पर्सनल नसेलही. त्या मानाने तुम्ही तेव्हा जरा नवखे (आणि खूप संवेदनशील) होता.

एक रिमोट शक्यता ही कि ती बाई टोकाची नार्सिसिस्ट / सोशियोपॅथ (मराठी शब्द माहिती इल्ले) असावी, आणि अगदी ठरवून विचार करून असे वागत असावी.
(विचीत्र वाटतेय, पण असले लोक असतात.)

काहिही असले तरी तुम्ही तिच्या आता खिजगणतीतही नसाल. त्यामुळे तुम्ही पण ते चॅप्टर पुर्ण क्लोज करा.
मी तेव्हा असे बोलायला हवे होते, आणि तसे वागायला हवे होते हा विचार आत्ता करूना फक्त फ्रस्ट्रेशन वाढते.

आणि इतक्या लहानसहान गोष्टींची चिंता करताहात, म्हणजे त्रास करून घ्येण्यासारखे इतर दुसरे काही प्रॉब्लेम तुम्हाला नसावेत अशी आकाशातल्या बापाकडे प्रार्थना करतो. :)

हे नक्कीच करावे:
तो विषय डोक्यातून पुर्ण काढून टाका. ती तुमची कोणीही लागत नाही, आणि तिचा तुमचा परत संबंधही येणार नाही.
१० वर्षापुर्वी घडलेल्या प्रकाराबद्दल आता चरफडत बसणे - इज नॉट हेल्दी.
तिला माफ करा - स्वतःला सांगा की तुम्ही तिच्यापेक्षा चांगली व्यक्ती आहात, आणि तिचा विचार करून ह्यापुढे तिला महत्व देणार नाही.
हॉबी असेलच तुम्हाला. त्यात वेळ घालवा.
हा एक छोटेखानी पण रिलेटेबल लेखः https://www.entrepreneur.com/article/272275
हे शक्य असेल तर करावे:
बंगळुरातील मित्र, सहकारी व नातेवाईकांना तसल्या लोकांपासून दूर राहण्यास सांगणे.
ती रेंटल प्रॉपर्टी ऑनलाईन असेल तर जमल्यास निगेटीव्ह रिव्ह्यू देणे
हे मुळीच करू नये:
त्या व्यक्ती बद्दल खूप विचार करून स्वतःचा तिळपापड करत बसणे.
बदल्याच्या भावनेतून त्या व्यक्तीला ऑनलाईन स्टॉकींग करणे
रात्री अपरात्री निनावी कॉल्स देणे.

कानडाऊ योगेशु's picture

5 Jun 2020 - 9:34 am | कानडाऊ योगेशु

भुजंगराव तुमच्या प्रतिसादातल्या वाक्यावाक्याशी सहमत.
हे मुळीच करु नये मध्ये जे लिहिले आहे तसे विचार मनात आले होते खरे. (मान्य करायला हरकत नसावी.)

थोडक्यात म्हणजे ती शगुफ्ता बारा गावचे पाणी प्यायलेली स्ट्रीट स्मार्ट बाई असून कमी खर्चात आणि कमी त्रासात प्रॉपर्टी मॅनेज अन फायदेखोरी करणे तिला चांगलेच माहिती होते.

येस. तिच्यासाठी भाडेकरु ठेवणे हा एक व्यव्साय होता व सुरवातीला गोड वगैरे बोलुन वैयक्तीक संबंध चांगले करतेय असे दाखवुन भाडेकरु मिळवण्याची स्ट्रॅटेजी होती. कारण घर सोडुन जाताना नव्या भाडेकरु सोबत केलेला करारनामा मी पाहिला तेव्हा ज्या ज्या समस्यांचे मी तिने निराकरण करावे अशी अपेक्षा केली होती त्या व तत्सम समस्यांचे निराकरण करणे ही भाडेकरुची जबाबदारी असेल असा नवा मुद्दा तिने करारनाम्यात घातला होता. नव्या भाडेकरुची परिस्थिती काय होणारे हे वाचुन खरेतर हसुच आले होते तेव्हा.(अती झाले आणि हसु आले टाईप).
तश्या छोट्य मोठ्या समस्या आयुष्यात असतातच आणि ही घटनाही कधीमधी मनात चमकुन जात असेल पण लॉकडाऊन मध्ये तसाही वेळ पुष्कळ आहे आणि त्यामुळे मागे सारली गेलेली ही घटना पुढ्यात आली असावी. पण ह्या विचाराच्या दुष्टचक्रातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे. सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

शेर भाई's picture

5 Jun 2020 - 10:00 am | शेर भाई

एकंदर अस दिसते आहे कि, ज्या व्यक्तिने तुम्हाला त्रास दिला / फायदा घेतला ती व्यक्ती एक स्त्री होती, त्याचा तुमच्याही नकळत तुमच्यातल्या सुप्त पुरुषी अहंकाराला (Male EGO) त्रास होतो आहे. जमल्यास त्याला मलमपट्टी करून एका कोपर्‍यात बसायला पाठवा. नाहीतर त्याला चांगल खायला प्यायला देऊन मोठ्ठ करून स्वतःच्या वर्तमानाला, भूतकाळाच्या जुन्या भुताला चुरगळायला देत रहा.

कानडाऊ योगेशु's picture

5 Jun 2020 - 10:49 am | कानडाऊ योगेशु

तुमच्यातल्या सुप्त पुरुषी अहंकाराला (Male EGO) त्रास होतो आहे

नाही हो.तसे नसावे. ती घरमालक होती आणि तशीही एकुण फॅमिली श्रीमंत होती त्यामुळे तो मोठेपणा मान्य केला होता. बहुदा खरा त्रास हा परिस्थितीनुसार स्वतःचा फायदा पाहुन भूमिका बदलण्याच्या तिच्या वृत्तीमुळे झाला असावा.

बाप्पू's picture

5 Jun 2020 - 4:50 pm | बाप्पू

मला अस वाटत तुम्ही उगाचच इतक्या लहान गोष्टीचा बाऊ करत आहात.
अश्या कितीतरी गोष्टी सगळ्याच्या आयुष्यात घडतच असतात.
आम्ही कितीतरी ठिकाणी भडकेरू म्हणून राहिलोय आणि अश्याच प्रकारचे अनुभव खूप वेळा आलेत. जास्त विचार न करता विसरून जाणेच सोयीस्कर..

अठवणी किंवा विचारांपसून सुटका म्हणजे त्या आठवणी पुन्हा येउ नयेत किंवा ते विचार मनात निर्माण होउ नये अशी इच्छा पण हे शक्य नसत, आपण विचार थांबवू शकत नाही कुणी किती सांगितले कि सोडून द्या किंवा आपल्याला जरी वाटले तरी विचार येतातच , उलटपक्षी थांबवायचा प्रयत्न केला तर ते जास्त येतात त्यामुळे विशिष्ट विचारांपासून सुटका हा विचार काढून टाका.

आता घटना तुमच्या बरोबर आणि तुमच्या बायकोबरोबर घडली पण आता तुमच्या आणि तीच्या त्याबद्दलच्या भावना वेगळ्या आहेत म्हणजे तुम्हाला जो त्रास होतो आहे तो घटनेचा नसून त्या बद्दल तुमच्या मनात असलेल्या भावनांचा आहे आता घटना आणि भावना वेगळ्या केल्या कि लक्षत येईल कि घटना विसरण्या पेक्षा त्या बद्दलच्या भावनांची तीव्रता कशी कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि घटना जरी कुणीही घडवली असली तरी, या भावना तुमच्या आहेत त्यामुळे त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे

आता या भावनांची तीव्रता कशी कमी करता येईल हे सांगण्या एव्हडा मी काही तद्न्य नाही पण मानशास्त्रात याला बहुदा unfinished emotional business असे म्हणतात त्या अनुशंगाने शोधत येईल

कानडाऊ योगेशु's picture

5 Jun 2020 - 8:36 pm | कानडाऊ योगेशु

योग्य लिहिले आहे राजाभाऊ. प्रश्न फक्त ह्या घटनेबाबतच्या विचारांचा नाही आहे. पण अश्या एकुण घडुन गेलेल्या अप्रिय घटना व तत्संबंधी विचारांपासुन सुटका करुन घेण्याचा होता. मनातील ही विचारांची लढाई विचारांनीच जिंकता येईल असे मला वाटते. हे लढाई बाहेर लढुन उपयोगाचे नाही.
फार मागे नाटककार अशोक पाटोळेंची मुलाखत वाचली होती.त्यांनाही अश्या परिस्थितीबाबत प्रशन विचारला गेल्यावर त्यांनी अश्या लोकांना मी माझ्या नाटकातील पात्रे बनवुन त्यांचा सूड घेतो असे काहीसे उत्तर दिले होते.

शाम भागवत's picture

29 Jun 2020 - 2:22 pm | शाम भागवत

आणि घटना जरी कुणीही घडवली असली तरी, या भावना तुमच्या आहेत त्यामुळे त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे

राजाभाऊ,
पूर्पणे सहमत.
त्यामुळे त्यातून सुटका करून घेणे आपल्याच हातात आहे व ते शक्यही असते.

तुम्हाला प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता.
पण.
तुमच्या आजच्या हजरजबाबीपणामुळे आठवलं. :) :) :)

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jun 2020 - 7:49 pm | प्रकाश घाटपांडे

आणि घटना जरी कुणीही घडवली असली तरी, या भावना तुमच्या आहेत त्यामुळे त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे >>> जरी नाही स्वीकारली तरी परिणाम तुम्हालाच भोगावे लागणार आहेत हा भागही आहेच. त्रासाच्या भागामधे अनुत्तरीत प्रश्न व अपेक्षाभंग या दोन्हीचा समावेश होतो. अनुत्तरीत प्रश्नामधे उत्तर आपल्याकडे नसते ते समोरच्याकडे असते. आपणाला ते जाणून घेण्याची उत्सुकता व इच्छा असते ती पुर्ण होत नाही म्हणूनही तुम्ही अस्वस्थ झाले असता. अपेक्षाच ठेवायच्या नाहीत असे प्रत्यक्शात होत नाही त्यामुळे अपेक्षाभंगाच्या दु:खद स्मृती लाही सामोर जाव लागत. काळ हा त्यावर तीव्रता कमी करणारा इलाज आहे काही निमित्ताने कटुस्मृती पुन्हा ट्रिगर होतात पुन्हा काळ हा इलाज. अशा संकटाना सामोरे जाणे व लढत राहणे. काही मानसोपचाराच्या रिलॆक्सेश्न मेथड मन शांत करतात.
त्यामुळे त्यातून सुटका करून घेणे आपल्याच हातात आहे व ते शक्यही असते.>>> हे कळत पण वळत नाही असा भाग आहे

प्रसाद गोडबोले's picture

5 Jun 2020 - 7:29 pm | प्रसाद गोडबोले

त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?

>>>

गांजा !

नाखु's picture

6 Jun 2020 - 4:24 pm | नाखु

तुम्हि समस्या बदलायला सान्गत आहात !!!

तुका म्हने उगि रहावे! चित्ति असो द्यावे समाधान !

स्मिता.'s picture

5 Jun 2020 - 8:28 pm | स्मिता.

तुम्ही जेवढं लिहिलंय त्यावरून जरी तुमचा अनुभव त्रासदायक असला तरी आम्ही एका घरमालकाकडून घेतलेल्या अनुभवाच्या तुलनेत फारच सौम्य आहे असे दिसते. आमच्या अनुभवाचा सुरुवातीचे काही दिवस फार मानसिक त्रास झाला पण काळासोबत तीव्रता कमी झाली. 'झाले-गेले गंगेला मिळाले' असे म्हणून स्वतःच्या मनावरचे ओझे हलके केले आणि पुढच्या वेळेकरताचा धडा घेतला.

हा मानसिक त्रास त्या व्यक्तिच्या चुकिच्या वागण्यापेक्षा आपल्या असहय्यतेचा असतो. १०-१२ वर्षं होवूनही जर आठवणी त्रासदायक वाटणं सहाजीक आहे पण 'सोडून देणे' हे आपल्या मानसीक स्वास्थ्याकरता गरजेचे असते.

कानडाऊ योगेशु's picture

5 Jun 2020 - 8:39 pm | कानडाऊ योगेशु

हा मानसिक त्रास त्या व्यक्तिच्या चुकिच्या वागण्यापेक्षा आपल्या असहय्यतेचा असतो.

बुल्स आय.

रोज लक्षात ठेवून एक वेळ ठरवून नियमित किमान दहा मिनिटे अत्यंत अप्रिय, त्रासदायक आठवणी पुन्हा पुन्हा आठवाव्यात. त्यातल्या काही वेळेवर आठवत नसतील तर त्या नोंदवून ठेवाव्यात आणि लिस्ट वाचून आठवाव्यात. मनाला रोज त्या घटनेवर किमान दोन दोन मिनिटे एकाग्र करावे. कालच्यापेक्षा आज मनस्तापाची पातळी घटली तर प्रयत्न कमी पडताहेत किंवा आपल्यात सातत्य नाही असे स्वतःला सांगून पुन्हा प्रयत्न करावे.
मनस्ताप समाधानकारक झाला की मग लिस्टपुढे तारीख टाकून टिकमार्क करावेत.

यामुळे काही दिवसांनी (उदा नियमित व्यायामाप्रमाणे) या रूटीनचा अत्यंत कंटाळा येऊन हळूहळू आपण त्या सोडून देतो.

कृ ह घे.

शाम भागवत's picture

5 Jun 2020 - 9:40 pm | शाम भागवत

२००७ साली मी माझ्यावर याबाबतीत प्रयोग केला होता. यश मिळालं होतं. ते यश आजपर्यंत टिकलंय! जमल्यास मी तुम्हाला व्यनि करेन.

हा प्रतिसाद धागाकर्त्यासाठी आहे.

त्यापेक्षा इथे प्रतिसाद का देत नाही ?

त्यांचा प्रॉब्लम व्यक्तिगत वाटला तरी जनरल आहे.

कानडाऊ योगेशु's picture

5 Jun 2020 - 11:17 pm | कानडाऊ योगेशु

भागवत सर व्यनि नक्की करा.

शाम भागवत's picture

5 Jun 2020 - 11:57 pm | शाम भागवत

विस्तृत लिहायला वेळ लागेल. लिहिले तर नक्की पाठवीन.
_/\_

शाम भागवत's picture

8 Jun 2020 - 10:28 am | शाम भागवत

व्यनि पाठवला आहे.

वीणा३'s picture

5 Jun 2020 - 9:40 pm | वीणा३

माझं पूर्वी असं माझ्या जवळच्या नात्यातल्या लोकांबद्दलच झालंय. माझ्या नात्यातल्या लोकांनीच माझ्या भिडस्त स्वभावाचा गैरफायदा घेतलाय, आर्थिक नुकसान पण केलंय. वरती म्हटल्या प्रमाणे आपल्या असहाय्य्यतेचा जास्ती त्रास होतो. आधी खूप त्रास करून घ्यायची. आता म्हणते कि कदाचित मी त्यांना गेल्या जन्मी त्रास दिला असेल , त्यांनी त्याची परतफेड केली. तेव्हापासून त्रास कमी होतो मला या जुन्या गोष्टींचा.

कोण कोणाशी वाईट का वागतं, चांगलं का वागतं, कोणी लोक आपल्याला बघितल्यावर फारसे आवडत नाहीत, पण काही लोकांबरोबर २ मिनटात आयुष्यभराची मैत्री कशी होते, एकाच वेळी २ जन्माला आलेली मुलं - एक खूप चांगल्या घरात, एक कुठल्या तरी दारुडा बाप सतत आजारी आई अशा घरात. हे सगळं असं का होत यावर माझ्याकडे पुनर्जन्म या व्यतिरिक्त उत्तर नाही.

शाम भागवत's picture

5 Jun 2020 - 9:44 pm | शाम भागवत

पुनर्जन्म?
बापरे!!
या धाग्याचं आता काही खरे नाही.
:)

हा संत मंडळींनी सांगितलेला पलायनवाद आहे.
त्याचा मनाची तात्कालिक समजूत घालायला उपयोग होऊ शकेल.

पण त्या भानगडीत कुठलाही त्रास पूर्वजन्मातल्या आपल्या दुष्कृत्यांशी जोडायचा नाद लागतो

ते पूर्णपणे निराधार आणि अशास्त्रिय आहे.
त्यामुळे वस्तुनिष्ठ दृष्टीकोन हरवतो
आणि आपली चूक नसतांना सुद्धा,
काय वाट्टेल ते सहन करायची सवय लागते.

कानडाऊ योगेशु's picture

5 Jun 2020 - 11:23 pm | कानडाऊ योगेशु

पलायनवाद तर पलायनवाद. मला जर एखादा विचार करुन मनःशांती मिळणार असेल तर माझी हरकत नाही. आणि तसेही शास्त्रीय विचार,वस्तुनिष्ठ विचार करुनही मी काही फार दिवे लावेन असे वाटत नाही.
अवांतरः मध्यंतरी एका प्रथितयश लेखकाने एका विशिष्ठ राज्यात विशिष्ठ घटनेनंतर झालेल्या दंगलीला एका विशिष्ठ नेत्याला जबाबदार धरुन जर माझ्याकडे अमुक हत्यार असते तर मी तमुक केले असते असे उघडरित्या बोलुन आपला मनक्षोभ शांत केला होता. मी तर अगदी पामर माणुस आहे इथे.

संजय क्षीरसागर's picture

5 Jun 2020 - 11:46 pm | संजय क्षीरसागर

करुन पाहा.

अशी प्रत्येक नकोशी वाटणारी गोष्ट पूर्वजन्माशी रिलेट केल्यावर,

आपण पूर्व जन्मी इतके पापी होतो का ?
या नव्या विचारानं,

आता त्या विचारापासून कशी सोडवणूक करू ?
म्हणून नवा धागा काढावा लागेल !

कानडाऊ योगेशु's picture

6 Jun 2020 - 12:06 am | कानडाऊ योगेशु

पुनर्जन्मच असे नाही पण आपणही कोणावर जाणतेपणी अजाणतेपणी अन्याय केला असेल व तो इथे बॅलन्स होतो आहे असे जरी समजले तरी फरक पडतो.
बाकी काही दिवसभर असे विचार येत नाहीत. पण वरच्या एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे लॉकडाऊनमध्ये अचानक मोकळा वेळ मिळाल्यामुळे एरवी अडगळीत पडलेला हा विचार वर आला.
इथे लिहुन मदत मागायचे कारण नात्यातल्या एका जवळच्या व्यक्तीची जवळपास सर्व सांसरिक जबाबदारीतुन मुक्त झाल्यानंतर आलेल्या पोकळीत असे जुनेपुराणे विचार मनात घोळवुन विचार करत बसल्याने झालेली हालत जवळुन पाहीली आहे.

> अजाणतेपणी अन्याय केला असेल व तो इथे बॅलन्स होतो.

एकतर अस्तित्व हा कॅश सौदा आहे
ज्या क्षणी चूक त्याच क्षणी शिक्षा
कारण इथे मागचा हिशेब ठेवायची कोणतीही व्यवस्था नाही.

जो काय मागचा हिशेब आहे
तो प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूपालिकडे कुठेही स्टोअर होत नाही.

लेखात वर्णन केलेला प्रसंग ओढवण्याचं खरं कारण
माणूस ओळखण्यात झालेली चूक आहे
देखणी काश्मिरी स्त्री आणि मोहक बोलणं
यामुळे जजमंट चुकलं असा साधा विषय आहे.

पण आपलं जजमंट चुकलं
यापेक्षा त्या स्त्रीनं कसा गैरफायदा घेतला
असा विचार करत बसलं तर,
कितीही सल्लामसलत केली तरी
विचारातून विचार निर्माण होऊन,
त्यातून सुटका होणार नाही.

त्याऐवजी पुढच्या वेळी सावध राहू
पुन्हा अशी चूक होऊ द्यायची नाही,
इतका साधा विचार केला तर
सगळा विषय संपतो.

कानडाऊ योगेशु's picture

6 Jun 2020 - 1:20 am | कानडाऊ योगेशु

देखणी काश्मिरी स्त्री आणि मोहक बोलणं

ह्या वाक्याने सगळा संदर्भच बदलतोय हो. ही स्त्री माझी विचारक्षमता कुंठीत करण्याइतकी देखणी तर अजिबातच नव्हती. बोलणे मोहक म्हणता येणार नाही पण व्यक्ती चांगली आहे हा विश्वास समोरच्यावर बिंबवण्याइतपत फसवे होते. ज्याचाच आता त्रास होतो. (फसले गेलो वगैरे.)
पण ते जाऊ दे. झाले गेले गंगेला मिळाले,अक्कल्खाती टाकले असे समजुन पुढे चालायचे.

> पण व्यक्ती चांगली आहे हा विश्वास समोरच्यावर बिंबवण्याइतपत फसवे होते.

मोहाशिवाय फसवणूक करणारी दुसरी गोष्ट या जगात नाही

फसवणाऱ्याबद्दल तिटकारा निर्माण झाल्यामुळे
आपला मोह नडला हे मान्य होत नाही,
आणि दुसऱ्यानी फसवलं असा स्टँड घेतला जातो.
मग सल्लामसलतीला अंत नाही.

आपण आपल्या मोहाची किंमत चुकवली असा विचार,
आपल्याला अनुभवसमृद्ध करतो,
मग पुन्हा तशी चूक होत नाही !

> झाले गेले गंगेला मिळाले,अक्कल्खाती टाकले असे समजुन पुढे चालायचे.

करेक्ट !

तुमचा प्रश्न सोडवला आहे !

माझ्याकडे माझी कामवाली बाई एका बाई ला घेऊन येते. तिला फिट्स येतात. तिचा नवरा दारुडा/नशेडी आहे. तिला मी काही जास्तीची कामं (जी माझी कामवाली करत नाही) ती देते, आणि पैसे देते. ही बाई (तिला क्ष म्हणू) जेव्हा गरोदर होती तेव्हा माझी एक मैत्रीण पण गरोदर होती. दोघीना एकाच दिवशी बाळ झालं (जे मला नंतर कळलं). मैत्रिणीचं बाळ बरेचदा भेटत असल्यामुळे मला बरेचदा बघायला मिळतं. क्षच २-३ महिन्यांनी बघायला मिळतं. दोन्ही बाळ खूपच गोड आहेत.

मला नेहमी त्यांना बघिल्यावर प्रश्न पडतो, कि एकाच दिवशी एकाच शहरात जन्माला आलेली बाळं, एकाला अगदी फुलासारखं जपलं जातं. दुसऱ्याला अंघोळ तरी घालतात का, जेवायला तरी धड देतात का देव जाणे. क्षच्या बाळाच्या नशिबी त्याचं घर आणि मैत्रिणीच्या बाळाच्या नशिबी उत्तम घर असं का?

"क्षच्या बाळाने (वय वर्ष १.५) अशी नक्की काय चूक केली असेल कि त्याला त्याच घर मिळालं? त्यालासुद्धा एखाद छान घर का नाही मिळालं?जगातल्या कुठल्याही बाळाला त्याची कुठलीही चूक नसताना वाईट घरात का जन्म मिळतो?"

मला तरी या प्रश्नाचं पुनर्जम्नशिवाय कुठलाही पटेल असं उत्तर मिळालेलं नाहीये. तुम्हाला मिळालं तर नक्की ऐकायला आवडेल.

काथ्याकुटाचा विषय मला तरी असा वाटतो कि,
१. त्यांना घर आवडलं असावं + सोईचे असावं.
२. नुकताच लग्न ठरलंय म्हणजे आयुष्यात अजून सेटल व्हायचे असावेत, वयाने पण लहान असावेत.
३. ८-१० महिन्याचे पैसे आगाऊ दिलेत.
४. दिल्लीकडचे लोक खरंच खूप गोड बोलतात. आपल्याला खरंच सवय नसते. नंतर कळतं कि एकूणच वागायला कसे पण असले तरी बोलायला मिठ्ठास, अदबशीर असतात एकदम.
५. मालकीण नीट वागत नाहीये म्हणून लगेच ८-१० महिन्याच्या आगाऊ पैशावर पाणी सोडावं आणि दुसरं घर बघावं अशी परिस्थिती नसावी.
६. आणि अजूनही त्रास होतो त्याच मूळ कारण, नवीन लग्न झालेलं, पत्नीला सुद्धा यातून जायला लागलं, हे असावं. स्वतःला झालेला त्रास विसरणं जास्त सोपं असतं, आपल्या माणसाला झालेला त्रास विसरणं अजून कठीण असतं.

काय वाट्टेल ते सहन करायची सवय लागते - माझ्या परिस्थितीत आर्थिक नुकसान किंवा नातं तुटणं असे दोन पर्याय होते. मी आर्थिक नुकसान निवडला. मला दिसत होत कि समोरची व्यक्ती स्वार्थीपणा करत्ये. पण त्या वेळेपर्यंत त्या व्यक्तीने माझं लहानपानपासून बरंच काही केलं होतं, काही अवघड प्रसंगातून जात असताना मानसिक आधार पण दिला होता. जर सरळ पैसे मागितले असते तर काढून दिले असते आणि परत पण मागितले नसते. तसं न करता विचित्र परिस्थितीत (आर्थिक नुकसान किंवा नातं तुटणं ) टाकलं आणि पैसे घेतले. याचा त्रास जास्त होत होता. अजून कोणाचाही असं ऐकून घेतलं नसतं.

ज्या क्षणी चूक त्याच क्षणी शिक्षा - म्हणजे मी आत्ता १०० रुपयांचा भ्र्ष्टाचार केला कि लगेच माझ्या घरातले १०० रुपये चोरीला जाणार. किंवा मी आत्ता कोणाचातरी खून केला तर लगेच माझा पण कोणीतरी खून करणार? मला कल्पना एकदम आवडली. असं असत तर खरंच किती छान झालं असतं.

संजय क्षीरसागर's picture

6 Jun 2020 - 8:38 am | संजय क्षीरसागर

ही रक्कम काही लाखात असावी.

इतकी रक्कम देण्यापूर्वी तिथल्या भाडेकऱ्यांना त्यांचा अनुभव विचारला असता तर एका झटक्यात मालकीणीची महती कळली असती !

पण मोह अशी काही स्वप्र रंगवतो की समोरचं प्रपोजल सगळ्यात बेस्ट वाटायला लागतं !

मोहाची ही किमयाच प्रत्येक फसवणूकीचं कारण असते.

मग तो विवाह असो,आर्थिक प्रश्न असो की इतर व्यावहार !

त्या वेळी ते प्रपोजल जगातलं एकमेव वाटायला लागतं आणि व्यक्ति निर्णय घेते.

तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नंतर देईन.

इतकी रक्कम देण्यापूर्वी तिथल्या भाडेकऱ्यांना त्यांचा अनुभव विचारला असता तर एका झटक्यात मालकीणीची महती कळली असती !

एकदम बरोबर..

अवांतर -

योग्या ज्या पद्धतीने सर्व उत्तरांना असे नाहीच म्हणत.आहे त्या पेक्षा मीच आधी लिहितो

आता या साठी तेंव्हा लग्न झाले नसताना हि वेळ नव्हता असे धागाकर्त्याला म्हणायचे असेल तर आता हि तो प्रश्न विचारात आहे..
असा प्रश्न तेंव्हाच विचारले पाहिजे होते..

एकदम बरोबर..

मोदक's picture

6 Jun 2020 - 8:55 am | मोदक

गणेशा..

आधी तू "शगुफ्ता" हे नांव १० वेळा कागदावर लिहून काढ. शेगुप्ता काय आहे राव.. =))

संजय क्षीरसागर's picture

6 Jun 2020 - 8:54 am | संजय क्षीरसागर

मजेशीर आहे.

फसलेली व्यक्ती स्वतःचा मोह बघण्याऐवजी,
फसवणाऱ्याची स्टोरी लावते
मग आप्त-स्वकीय तिला दुजोरा देतात
असा सूड घे, तशी हॉर्सपॉवर लाव.....

त्या भानगडीत पुन्हा फोकस,
आपला मोह नडला याऐवजी,
फसवणाऱ्यावर जातो !

नीट बघितलंत तर
प्रत्येक असफल विवाहामागे
मोहच दडलेला दिसेल !

पुनर्जन्म... असफल विवाह..

आता हळूहळू मुंबई विरूद्ध पुणे, व्हेज विरूद्ध नॉन व्हेज असे मुद्दे पण येऊदेत. मग धाग्याचा चहूअंगानं खरडफळा होईल.

संजय क्षीरसागर's picture

7 Jun 2020 - 12:09 pm | संजय क्षीरसागर

पुनर्जन्माचा विषय एका सदस्येनं दिलेल्या प्रतिसादाला अनुसरुन आला आहे
प्रतिसाद नीट वाचले असते तर अशी असंबद्ध कमेंट केली नसती.

पण काल इथे दिलेल्या प्रतिसादात,
तुम्ही स्वतःच्या मानसशात्राच्या अभ्यासाविषयी डिंग मारुन
"काही प्रष्ण असतील तर विचारा" असं म्हटलं होतं

आता तुमचा मानसशास्त्राचा व्यासंग आणि अभ्यास
काय आहे त्याची शहानीशा इथेच होऊ दे.
ती व्यनि करा वगैरे शेपूटगिरी सोडा,

कारण सदस्येनं विषयाला धरुन लेखावर प्रष्ण केला आहे :

" जगातल्या कुठल्याही बाळाला त्याची कुठलीही चूक नसताना वाईट घरात का जन्म मिळतो ? "

याचं इथे उत्तर द्या.

प्रत्येक असफल विवाहामागे मोहच दडलेला दिसेल !

या कमेंटचा धाग्याशी काय संबंध आहे..?

माझा मानसशास्त्रीय अभ्यास सांगतो आहे की, तुम्ही कोणताही विषयाला बादरायण संबंध लावून फाटे फोडता आणि अकारण विषयांतर करून समोरच्याला निरूत्तर करण्याचा प्रयत्न करता.

> प्रत्येक असफल विवाहामागे मोहच दडलेला दिसेल !

अर्थात !

सगळा लेखच निर्णयाच्या प्रक्रियेचा उलगडा होण्यासाठी आहे.

व्यावहारात जशी माणूस न ओळखता आल्यानं फसगत होते,
तद्वत, विवाहातही तीच चूक होते.

मोह याचा अर्थ स्वप्नरंजन असा होतो,
निर्णय घेणारी व्यक्ती इतकी मोहून जाते
की तिची सारासार करण्याची क्षमता मालवते.

लेखकाला तिथे राहणार्‍या लोकांचा उपहास समजला नाही
आणि त्यानी जागा सोडणार्‍या भाडेकर्‍यावर विश्वास टाकला

मोहाचं दुसरी बाजू अशी की
तो व्यक्तीला स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी
दुसर्‍यानी कसं फसवलं याची कहाणी ऐकवतो

आणि प्रत्येक असफल विवाहाची हीच कथा असते.
_______________________________________________

थोडक्यात, माझे प्रतिसाद कधीही मुद्दासोडून नसतात.
ते कुणाला कळत नसतील तर त्यानं असंबद्ध कमेंट करण्याऐवजी
आणखी खोलात जाऊन विचार केला, तर कळू शकतील.

असो, लेखकाचा प्रॉब्लम सुटला आहे.
_______________________________________

आता तुम्ही जो मानशास्त्राचा अभ्यास केला आहे त्यावरनं

" जगातल्या कुठल्याही बाळाला त्याची कुठलीही चूक नसताना वाईट घरात का जन्म मिळतो ? "

याचं उत्तर इथे उत्तर द्या.

म्हणजे तुमचा काय अभ्यास आहे ते सर्वांना कळेल.

आणि प्रत्येक असफल विवाहाची हीच कथा असते.

माझा मुद्दा सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद. :)

यातून तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही,

तर दोन गोष्टी सिद्ध होतात :

एक, अनाकलन किंवा दोन, अनूभवशून्यता.

अनाकलन दूर होण्यासाठी पुनर्वाचन आणि
अनुभवशून्यता दूर होण्यासाठी वाट बघणे
यापैकी योग्य तो पर्याय निवडता येईल.
______________________________

आता तुम्ही जो मानशास्त्राचा अभ्यास केला आहे त्यावरनं

" जगातल्या कुठल्याही बाळाला त्याची कुठलीही चूक नसताना वाईट घरात का जन्म मिळतो ? "

याचं उत्तर इथे द्या.

म्हणजे तुमचा काय अभ्यास आहे ते सर्वांना कळेल.
_______________________________________

अन्यथा तुमचे प्रतिसाद असंबद्ध आणि केवळ धागा भरकटवण्यासाठी होते हे उघड होईल.

मोदक's picture

8 Jun 2020 - 2:41 pm | मोदक

मूळ मुद्दा हा आहे की, प्रत्येक असफल विवाहामागे मोहच दडलेला दिसेल !

या कमेंटचा धाग्याशी काय संबंध आहे..?

धागा हा एका सदस्याच्या मानसिक त्रासासंदर्भात उत्तर शोधण्यासाठी असताना तुम्ही चर्चेला मोहाकडे वळवले आणि नंतर असफल विवाहाचे टुमणे कुठूनतरी शोधून आणले.

जर तुमच्या मते "सगळा लेखच निर्णयाच्या प्रक्रियेचा उलगडा होण्यासाठी आहे" तर धाग्यात लेखकाने घेतलेल्या निर्णयाची वस्तुनिष्ट पद्धतीने उकल झाली आणि त्याचा पुन्हा त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळ्या लोकांनी त्यांना उपाय सुचवून झाले - म्हणजे योग्य चर्चा झाली आहे.

असे असताना असफल विवाह हा मुद्दा आलाच कुठून..?
___________________________

प्रश्नाचे उत्तर न देण्याचा हक्क राखून ठेवत आहे.
___________________________

तुमचे प्रतिसाद नेहमीप्रमाणे असंबद्ध आणि केवळ धागा भरकटवण्यासाठी आहेत हे एव्हाना उघड झाले आहे. त्यामुळे हा ही धागा वाचनमात्र करण्याचा तुमचा प्रयत्न अयोग्य आहे इतकेच नोंदवत आहे.

पुन्हा तेच !

या प्रतिसादावरुन आता आणखी एक गोष्ट उघड होते,
तुम्ही पुढचे मागचे प्रतिसाद न वाचताच,
काहीही प्रतिसाद देता !

आता तरी नीट वाचा, म्हणजे पुन्हा तेच ते सांगावे लागणार नाही.
___________________________

"सगळा लेखच निर्णयाच्या प्रक्रियेचा उलगडा होण्यासाठी आहे"

अत्यंत साधी गोष्ट आहे (आणि जी आधीच्या प्रतिसादात सांगितली आहे), ती अशी की

इतकी रक्कम देण्यापूर्वी तिथल्या भाडेकऱ्यांना त्यांचा अनुभव विचारला असता तर एका झटक्यात मालकीणीची महती कळली असती !

पण मोह अशी काही स्वप्र रंगवतो की समोरचं प्रपोजल सगळ्यात बेस्ट वाटायला लागतं !

मोहाची ही किमयाच प्रत्येक फसवणूकीचं कारण असते.

मग तो विवाह असो, आर्थिक प्रश्न असो की इतर व्यावहार !

त्या वेळी ते प्रपोजल जगातलं एकमेव वाटायला लागतं आणि व्यक्ति निर्णय घेते.

_______________________________________________

आता (तरी) लेखावरचे सर्व प्रतिसाद नीट वाचले असतील तर हे लक्षात येईल की
सदस्यांनी हा धागा पूर्वसंचिताकडे वळवला आहे

अर्थात, तो वीणा या सदस्येनं या आधीच वळवला होता.
त्याला अनुसरुन मी पुनर्जन्म हा मुद्दा कसा चुकीचा आहे ते सविस्तरपणे लिहीलं आहे.

तुम्ही नेहेमीप्रमाणे ते न वाचताच धागा भरकटवण्यासाठी असा प्रतिसाद दिला :

पुनर्जन्म... असफल विवाह..

आता हळूहळू मुंबई विरूद्ध पुणे, व्हेज विरूद्ध नॉन व्हेज असे मुद्दे पण येऊदेत. मग धाग्याचा चहूअंगानं खरडफळा होईल

__________________________________

आणि आता स्वतःची चूक लक्षात आल्यावर,
पुनर्जन्म हा मुद्दा खुबीनं टाळला आहे

________________________________________

>प्रश्नाचे उत्तर न देण्याचा हक्क राखून ठेवत आहे ?

आता हा धागाच पूर्वसंचिताकडे वळल्यानं आणि
तुम्ही मानसशात्राचे व्यासंगी आहात अशी शेखी मिरवल्यानं

तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणं क्रमप्राप्त झालं आहे :

" जगातल्या कुठल्याही बाळाला त्याची कुठलीही चूक नसताना वाईट घरात का जन्म मिळतो ?

आता उगीच शेपूटगिरी न करता उत्तर द्या

अर्थात, ते तुम्हाला कदापिही देता येणार नाही
आणि त्यामुळे `हक्क राखून ठेवला आहे' हा शुद्ध पलायनवाद आहे
हे सिद्ध होईल.

आता असे आहे.. धागा लेखकाने मुद्दा मांडला, त्याला लोकांनी यथाशक्ती उत्तरे दिली आणि विटेकरकाकांच्या प्रतिसादावर धागालेखकाने सहमती दाखवली. मग तुमची थिअरी लोकांना पटली नाही म्हणून तिळपापड का होतो आहे..?

जगातल्या यच्चयावत तत्वज्ञानाचा अभ्यास करू तुम्हाला स्व गवसलेला आहे ना.. मग तो इतका हलका आहे..?

_____________________________________________

" जगातल्या कुठल्याही बाळाला त्याची कुठलीही चूक नसताना वाईट घरात का जन्म मिळतो ?

याला माझ्या लेखी "पूर्वसंचित" हेच उत्तर आहे.

_____________________________________________

आता उगीच शेपूटगिरी न करता उत्तर द्या

यावर तुमच्यापेक्षाही झणझणीत उत्तर देऊ शकतो पण पायर्‍या खाली उतरून तुमच्या लेव्हलला यायची इच्छा नाही. त्यामुळे पास.

तुमचा मानशास्त्राचा अभ्यास इतका प्रगाढ असेल याची कल्पना होतीच.

आता हे वाचा आणि :

१. जगाची लोकसंख्या ७८० कोटी आहे.
२. या ७८० कोटी लोकांच्या सर्व कृत्यांचा डेटा प्रत्येक दिवशी किती होईल ?
३. कर्मविपाक वॅलीड होण्यासाठी असा नक्की किती पूर्वजन्मांचा डेटा लागेल ?
४. हा सर्व डेटा नैतिक मूल्यांवर कसा सॉर्ट केला जातो ?
उदा. वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवणं हा अतिरेक्यांच्या दृष्टीनं स्वर्गप्राप्तीचा रस्ता आहे पण जगाच्या दृष्टीनं ते सर्वोच्च पाप आहे.
तर याचा निवाडा करणारी सिस्टम जगात कोणता माईचा लाल बनवतो ?
५. हा ७८० कोटी लोकांचा (तुम्ही सांगाल तितक्या जन्मांचा) डेटा नक्की कुठे स्टोअर केला आहे ?
६. हा सर्व डेटा हरेक क्षणी प्रोसेस करुन, प्रत्येकाचं विधीलिखित ठरवणारी यंत्रणा नक्की कशी काम करते ?

आता हे तुमचं `पूर्वसंचित' कसं काम करतं याचं उत्तर द्या.

शिवाय तुम्हाला आवडेल अशी शब्दरचना घ्या :

उत्तर देण्याचा हक्क राखीव ठेवणं हा पलायनवाद आहे.

तस्मात, उत्तर द्या.

खाली जुगलबंदी सुरू आहे ना..? ती झाली की बोलू. :)

संजय क्षीरसागर's picture

9 Jun 2020 - 8:33 pm | संजय क्षीरसागर

> ती झाली की बोलू ?

जुगलबंदीकडे मी बघतो.
तुम्ही अजिबात विचलीत होऊ नका.

आता तुमच्यावर फार मोठी जवाबदारी आली आहे....

कारण विटेकर तर काही बोलत नाहीत
आणि तुम्ही छातीठोकपणे जाहीर केलंय
"याला माझ्या लेखी "पूर्वसंचित" हेच उत्तर आहे."

त्यामुळे मानसशास्त्राचा एक प्रगाढ अभ्यासक काय ज्ञानदीप पेटवतो
आणि पूर्वसंचिताच्या गहन संकल्पनेचा कसा उलगडा करतो;
शिवाय मुद्दा न भरकटवता तो संकेतस्थळाला आपलं अमूल्य योगदान कसं प्रदान करतो
याकडे लक्ष लागून आहे.

आता मागे हटू नका.

कानडाऊ योगेशु's picture

9 Jun 2020 - 7:12 pm | कानडाऊ योगेशु

मी काय म्हणतो संक्षी सर, हा कर्मविपाक सिध्दांत,आस्तिकत्व व त्याअनुषंगाने येणारे पुनर्जन्म इ. प्रकार चार्वाकसंहितेने अगोदरच थोतांड ठरवलेले आहे. दोन्ही बाजुने मतप्रदर्शन व्यक्त करायचे म्हटले तर अगणित साहित्य उपलब्ध आहे त्यामुळे अश्या चर्चेतुन नवे असे काही निष्कर्ष होणार नाही.
उदा.

यावज्जीवेत सुखं जीवेद ऋणं कृत्वा घृतं पिवेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥

( विकिपिडियाने पाजळलेले ज्ञानामृत.)
त्यामुळे हे कसे चूक वा बरोबर आहे ह्या वादाचा अंत नाही.
व्यक्तिशः माझा वरील सर्व गोष्टींवर दृढ विश्वास आहे पण एकवेळ मान्य करु कि हे सगळे थोतांड आहे पण त्याने तुमची थेअरी बरोबर आहे हे सिध्द होत नाही.
त्याहीपेक्षा मी असे म्हणेन कि तुमच्याकडे नक्कीच वेगळे काहीतरी सांगण्यासारखे आहे पण ते पटवुन देण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमचीच आहे.
नाहीतर मी म्हणतो तेच खरे हा झाकिर नाईक टाईप हेकटपणा झाला.

अभ्या..'s picture

9 Jun 2020 - 7:18 pm | अभ्या..

चल योगी, आपण सगळेजण त्या शागुफ्ता ला शिव्या देऊन येऊ.
लैच त्रास दिला रे आपल्या सगळ्यांना.

कानडाऊ योगेशु's picture

9 Jun 2020 - 7:36 pm | कानडाऊ योगेशु

चल योगी, आपण सगळेजण त्या शागुफ्ता ला शिव्या देऊन येऊ.

अरे त्यापासुन सुटका हवी म्हणुन तर धागा काढला ना भौ! :(

> सांगण्यासारखे आहे पण ते पटवुन देण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमचीच आहे.

अर्थात, आणि तेच तर करतोयं !

पण लोक्स जर पुनर्जन्ममधे आणून
त्यावर कोणतंही लॉजिक न देता,
त्यांचा हट्टच सोडत नाहीत

तर खरे झाकिर नाईक कोण आहेत ते बघा !

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2020 - 5:56 pm | टवाळ कार्टा

मला हा प्रतिसाद आणखी किती उजवीकडे सरकतो हे बघायचे आहे म्हणून आलो, एक मस्त लांबलचक प्रतिसाद दिला की एका ओळीवर एक अक्षर येते.

सतिश गावडे's picture

13 Jun 2020 - 6:12 pm | सतिश गावडे

कुणाला कशाचं तर बोडकीला केसाचं =))

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2020 - 9:45 pm | टवाळ कार्टा

इथे दुसरे काय सुरू आहे

चामुंडराय's picture

14 Jun 2020 - 4:51 am | चामुंडराय

बघू आणखी किती उजवीकडे सरकतो ते?

कानडाऊ योगेशु's picture

14 Jun 2020 - 11:39 am | कानडाऊ योगेशु

ह्याला खिंडीत गाठणे असे म्हणतात. ;)

कानडाऊ योगेशु's picture

6 Jun 2020 - 3:32 pm | कानडाऊ योगेशु

पण मोह अशी काही स्वप्र रंगवतो की समोरचं प्रपोजल सगळ्यात बेस्ट वाटायला लागतं !

मोहाची ही किमयाच प्रत्येक फसवणूकीचं कारण असते.

मग तो विवाह असो,आर्थिक प्रश्न असो की इतर व्यावहार !

त्या वेळी ते प्रपोजल जगातलं एकमेव वाटायला लागतं आणि व्यक्ति निर्णय घेते.

निर्णय घेणे ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि बर्याच वेळेला मर्यादित गोष्टीना (रिसोर्सेस) विचारात घेऊन त्यावेळेला योग्य वाटेल असा निर्णय घ्यावा लागतो. दरवेळेला मोहात पडल्यामुळेच निर्णय घेतला व चुकला असे नसते. प्रत्येक वेळेला चिकित्सक होऊन बाल कि खाल काढुन निर्णय घ्यायला गेलो तर वेळ व पर्याय हातातुन निघुन जातो. भविष्याबद्दल असलेल्या अश्या अनभिज्ञतेमुळेच आयुष्य रोचक बनते.

संजय क्षीरसागर's picture

6 Jun 2020 - 4:28 pm | संजय क्षीरसागर

> फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ?

निर्णय घेतांना फक्त दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात.

एक, माणूस ओळखता येणं, आणि
दोन, निर्णय घेणार्‍याची हेतू शुद्धता !

व्यावहारात एक फार सोपं प्रिंसिपल आहे :

Don't Use the Other, and
Don't Allow the Other to Use You !

Then It is Always a Fair Play.

> वाईट घरात का जन्म मिळतो?"

अस्तित्वात कुणाचाही कुठलाही डेटा स्टोअर करणारी यंत्रणा नाही.
सर्व डेटा हा व्यक्तीच्या मेंदूशिवाय इतर कुठेही नसतो.
हा बेसिक फंडा आहे.

व्यक्तीच्या निधनानंतर देहाबरोबर मेंदूही
पंचत्त्वात विलीन होतो.
एक कहाणी संपन्न होते.

त्यामुळे व्यक्तीचं पूर्वसंचित ही कल्पना निराधार आहे.
_________________________________________

अस्तित्व हा क्षणोक्षणी चाललेला एक अतीविशाल कॅलिडोस्कोप आहे
त्याच्या सर्व प्रक्रिया परस्परावलंबी आणि स्वयंचलीत आहेत.

उदा. पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर १५ कोटी किलोमीटर आहे.
म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत,
१५ कोटी किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळाची प्रदक्षिणा एका वर्षात पूर्ण करते !

अशा अनंत ग्रहमालिका या अस्तित्वात फिरतायंत.

यावरनं तुम्ही कल्पना करु शकाल की पृथ्वीसारख्या एका ग्रहावरच्या,
एक व्यक्तीची, इतक्या अनंत पसार्‍यात छदाम गणती नाही.

____________________________________________

आई-वडील वगैरे कल्पना,
`विवाह' या मानव निर्मीत, समाजव्यवस्थेचा भाग आहेत.
निसर्गाला त्याच्याशी काहीही घेणं-देणं नाही.

तस्मात, अमक्या स्त्रीच्या पोटी हे बालक, आणि
तमक्या स्त्रीच्या उदरी ते बालक जन्माला घालायचं
(ते ही त्याच्या पूर्वसंचितानुसार !)
असा निसर्गाचा काहीही प्लान नसतो.

निसर्ग फक्त त्याच्या प्रोलिफरेशनमधे इंटरेस्टेड असतो
आणि त्या-त्या क्षणी, अस्तित्वाच्या अतीविशाल कॅलिडोस्कोपमधे;
ज्या घटना सहज घडू शकतात,
त्यानुसार जन्म-मृत्यू होत रहातात.

अशाप्रकारे पुनर्जन्म ही केवळ मानसिक दिलासा देऊ शकेल अशी,
निराधार मानवी कल्पना आहे.
_______________________________

> ज्या क्षणी चूक त्याच क्षणी शिक्षा - म्हणजे मी आत्ता १०० रुपयांचा भ्र्ष्टाचार केला कि लगेच माझ्या घरातले १०० रुपये चोरीला जाणार. किंवा मी आत्ता कोणाचातरी खून केला तर लगेच माझा पण कोणीतरी खून करणार?

अस्तित्व हा कॅशचा सौदा आहे
याचा अर्थ जाणीव एक आहे.

ज्या यातना मरणार्‍याला होतील
त्याच यातना, त्याच वेळी मारणार्‍याला होतील
मरणारा त्या यातना भोगून मरेल आणि सुटेल;
आणि जगणारा त्या यातना भोगत जगेल;
इतकाच काय तो फरक.

ज्या प्रकारे वादविवाद सुरू झाले आहेत त्यानुसार आता इतकीच अपेक्षा आहे की धागालेखकाला "हा धागा लिहिला, हिच आणखी एक त्रासदायक आठवण ना ठरो"

:D

प्रसाद गोडबोले's picture

6 Jun 2020 - 12:10 pm | प्रसाद गोडबोले

=))))

मेलो मेलो =))))

नाखु's picture

6 Jun 2020 - 4:29 pm | नाखु

याच धाग्यात पुढील धाग्याची बीजे आहेत तर !!!

आधि बीज एकले, बीज अन्कुरले !!

शलभ's picture

7 Jun 2020 - 8:33 pm | शलभ

+1
प्रतिसाद वाचता वाचता तेच वाटत होतं. :P

गणेशा's picture

6 Jun 2020 - 8:19 am | गणेशा

सर्व अवांतर --

"क्षच्या बाळाने (वय वर्ष १.५) अशी नक्की काय चूक केली असेल कि त्याला त्याच घर मिळालं? त्यालासुद्धा एखाद छान घर का नाही मिळालं?जगातल्या कुठल्याही बाळाला त्याची कुठलीही चूक नसताना वाईट घरात का जन्म मिळतो?"

मला तरी या प्रश्नाचं पुनर्जम्नशिवाय कुठलाही पटेल असं उत्तर मिळालेलं नाहीये. तुम्हाला मिळालं तर नक्की ऐकायला आवडेल.

याच धरती वर, धागाकर्त्याला ती घर मालकीण मिळाली कारण त्याचे पूर्वजन्माचे पाप असे म्हणायचे आहे का मग?
कदाचीत तो पण त्या शेगुप्ता येव्हडाच किंवा त्याहून भयंकर होता त्या जन्मात, असेच का?

-----------

बाकी कालवड गोठ्यात.. चिमणी घरट्यात.. तशी माणसे घरात जन्मतात..
यात पूर्वजन्म आणला तर..

X बाई जिचा नवरा दारुडा Y असतो ह्यांना जो Z मुलगा होणार असतो, त्याचे पूर्वजन्म पाप त्याला असल्या घरात आणते असे म्हंटल्यावर, त्या Z ला तेथे जन्म घेता यावा म्हणुन X आणि Y चा लग्न आणि संभोग घडून आला असे म्हणायचे का मग?

हे म्हणजे कैद्या साठी जेल तयार केले गेले असे झाले मग..

----

पूर्वजन्म असला तरी असल्या भंकस गोष्टी जन्मा जन्मा पासून जोडलेल्या नसल्याच पाहिजेत..
आणि असे असेल तर..

मी तुम्हाला रिप्लाय दिला आहे.. कारण गेल्या जन्मात तुम्ही मला असाच अवांतर टाईप कुठेतरी.. वेगळ्या स्वरूपात असा रिप्लाय दिला होता म्हणुन त्याची हि परतफेड समजावी...

आणि या वर रिप्लाय पुढच्या जन्मात करावा.. आता काही घाई नाही..

डिपॉझिट रक्कम परत मिळाली ना?

कानडाऊ योगेशु's picture

6 Jun 2020 - 10:47 am | कानडाऊ योगेशु

संक्षीसर,वीणा३,गण्या,मोदक,कंजुस सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

ही घटना १२ वर्षांपूर्वीची आहे .अन्यथा घरमालकाकडुन त्याला दिलेली अनामत रक्कम परत कशी मिळवावी? असा धागा काढावा लागला असता.

इतकी रक्कम देण्यापूर्वी तिथल्या भाडेकऱ्यांना त्यांचा अनुभव विचारला असता तर एका झटक्यात मालकीणीची महती कळली असती !

विचारले होते.पण सगळे एका नौकेचे प्रवासी.त्यामुळे तिथे त्यावेळी असलेला भाडेकरु उघड उघड बोलला नाही. पण कशी आहे म्हटल्यावर उपहासात्मक हास्य आले होते त्याच्या चेहर्यावर. जो सोडुन जाणार होता व ज्याच्या खाली केलेल्या फ्लॅटमध्ये मी राहणार होतो त्याने तिच्याबद्दल पॉझिटिवच सांगितले. त्याची अनामत रक्कम अडकली होती व नवा भाडेकरु मिळवुन देवुन त्याची अनामत रक्कम त्याला लवकर मिळाली असती. हाच प्रकार घर सोडताना माझ्याबाबतीत झाला. अनामत रक्कम अडकली असल्याने मी उघड उघड चालाक औरत है असे म्हणु शकत नव्हतो.(सुदैवाने कुणी तसा प्रशन विचारला नाही.कदाचित येणारा भाडेकरु माझ्यापेक्षा नवखा असावा.)

अनामत रक्कम परत मिळाली पण काटछाट करुन ज्याची तशी काही गरज नव्हती.

धाग्याचा उद्देश फक्त ह्या अनुभवाच्या आठवणीसंबंधी नसून अश्या प्रकारच्या मनःशांती बिघडवणार्या अशा प्रकारच्या अनुभवांपासुन सुटका कशी करुन घ्यायची असा आहे.
आतापर्यंतच्या चर्चेमधुन तर झाले गेले त्याबद्दल आपण काही करु शकत नाही व समोरच्याला व स्वतःला माफ करायला हवे ह्या निष्कर्षाप्रत आलो आहे. हे आधीही माहीती होतेच. "कधीतरी स्वतःला माफ करायला हवे" हे संदीप खरेने उगाच म्हटलेले नाही.

शरीरशास्त्रात ज्याप्रमाणे कोणतंही औषध कोणत्याही व्याधीवर चालत नाही
त्याचप्रमाणे मानसशास्त्रात ठराविक नियमच ठराविक मानसिकतेवर काम करतात.

> कधीतरी स्वतःला माफ करायला हवे

हा नियम तुम्ही शगुफ्ताला छळलं असतं
आणि ती हयात नसल्यानं,
आता परिमार्जनाचा कोणताही मार्ग उरला नसता,
तर त्या अपराधभावनेतून मुक्त व्हायला होईल.

पण लिखित केसमधे मोहमुक्तीचा नियम वापरायला हवा.
त्यानं व्यक्ती अनुभवसमृद्ध होते, आणि
पुन्हा माणूस ओळखतांना सजगता राहते.

____________________________________

इथे कुणी, काहीही वकूब नसतांना
उपहासात्मक कमेंटस करणे.
मानसशास्त्राचा शून्य अभ्यास असतांना
विषय भरकटवणे.
फालतू शाब्दिक चुका काढणे.... वगैरे चालू करत असेल
तर त्याला बेदखल करणं योग्य राहील.
नाही तर एका चांगल्या आणि सर्वोपयोगी विषयाचा
नाहक चोथा होईल.

प्रसंगी मुखभंग करणं ही उचित ठरतं
अन्यथा असे सदस्य
फुकटची वकीलपत्रं घेणं,
कुणीही विचारत नसतांना मधेच असंबंद्ध कमेंटस मारणं...
असे धंदे करुन स्वतःचं उपद्रव मूल्य वाढवत बसतात.

कानडाऊ योगेशु's picture

6 Jun 2020 - 8:22 pm | कानडाऊ योगेशु

..मोहमुक्तीचा..

संक्षीसर तो मोह नव्हता. मोह म्हणजे गरज नसणार्या गोष्टीचा हव्यास करणे. पण इथे घर घेणे ही माझी गरज होती. आणि ते निवडण्याचे बरेच निकष होते. ह्याला चोखंदळपणा म्हणु शकतो. वर म्हटल्याप्रमाणे अश्या पध्दतीत अगदी फुल्ल फ्रुफ्फ निर्णय घेणे अवघड असते. साधारण त्या वेळी योग्य वाटलेल्या निकषांचा आधार घेऊन निर्णय घेणे गरजेचे होते आणि तो घेतला. आणि अक्कलखाती एक अनुभवही जमा झाला . म्हणजे नंतरच्या घरमालकासोबततरी अशी समस्या येऊ दिली नाही.

हा नियम तुम्ही शगुफ्ताला छळलं असतं
आणि ती हयात नसल्यानं,

शगुफ्ता इथे महत्वाची नाही. इथे भूतकाळात झालेल्या एका गोष्टीमुळे मी स्वतःच स्वतःला छळतोय. माझी सध्याची मनःस्थिती शगुफ्ताला जरी समजली तरी तिला झाट फरक पडणार नाही. त्यामूळे इथे मीच माझ्याबाबतीत काहीतरी करायला हवे आणि तेच मी करण्याचा प्रयत्न करतोय.

शाम भागवत's picture

6 Jun 2020 - 8:40 pm | शाम भागवत

@ कानडाऊ योगेशु,
तुम्ही अगदी महत्वाच्या विषयाला हात घातला आहे.

मी माझे उत्तर शब्दब्ध्द करतो आहे. त्याचबरोबर त्याबाबतचे तर्क पण लिहायचा विचार करत असल्याने वेळ लागतोय. आणखी एकाने पण रिक्वेस्ट केली आहे. त्यामुळे जनरलाईज करून उत्तर तयार करतोय. उद्यापर्यंत पाठवायचे ठरवतोय. बघू कसं जमतांय ते.

> हव्यास करणे

हा प्रतिसाद, निर्णयामागची,
मानसिक प्रक्रिया उलगडावी यासाठी आहे
तुम्ही व्यक्तिगत घेणार नाही अशी अपेक्षा करतो.
___________________________

तुमच्या निकडीबद्दल वाद नाही.

पण मोह म्हणजे स्वप्नरंजनामुळे तारतम्य हरवणे !

एक मोठी रक्कम देतांना आपल्याला तिथे रहात असलेल्यांचं सांगणं,
फारसं मनावर घ्यावसं वाटत नाही,
ज्याची जागा आपण घेणार,
त्याचे पैसे अडकल्यामुळे, त्यानी दिलेला पॉजिटीव फिडबॅक,
आपल्या कामाचा नाही, याकडे दुर्लक्ष होणं

आणि सगळ्याची परिणीती म्हणजे फसगत होणं
ही मोहाची किमया आहे.

आणि मोहाचं वैशिष्ठ्य असं की
तो कायम दुसर्‍यानी फसवलं असाच स्टँड घेतो !

____________________________________

आजपर्यंत कोणत्याही निर्णयात
माझी फसगत झाल्याचं स्मरत नाही

पण कधी झाली तर मी त्या व्यक्तीचे पहिल्यांदा अभार मानीन,
कारण तीनं मला माझ्या निर्णयप्रक्रियेतली खोट दाखवली,
माझ्या दृष्टीकोनातून जो सुटला होता, असा
माणूस ओळखण्याचा आणखी एक नवा पैलू दाखवला.

थोडक्यात, त्या घटनेचा एक वाईट आठवण असा ठसा मनात कधीही उमटणार नाही.

_________________________________

बघा विचार करुन.

कानडाऊ योगेशु's picture

6 Jun 2020 - 11:28 pm | कानडाऊ योगेशु

तुम्ही व्यक्तिगत घेणार नाही अशी अपेक्षा करतो.

चर्चेतुन व इतरांच्या अनुभवातुन बरेच काही नव्याने कळते आहे.त्यामुळे व्यक्तिगत घेण्याच्या प्रश्नच येत नाही.

माणूस ओळखण्याचा आणखी एक नवा पैलू दाखवला.

येस्स. लेखातच लिहिण्याप्रमाणे गोड बोलणार्या कुणावरही रादर कुणावरही आता सहजगत्या विश्वास ठेवु शकत नाही.प्रत्येक व्यक्तीकडे सेन्स ऑफ डाऊट ने पाहणे गरजेचे असते हे परिणामकारकरित्या समजले.(धडा मिळाला.!)

संजय क्षीरसागर's picture

6 Jun 2020 - 11:38 pm | संजय क्षीरसागर

मी दुसर्‍यावर कायम विश्वास टाकतो !

पण त्याच्या सचोटीची पूर्ण खात्री होईपर्यंत
त्याच्या बोलण्या आणि वागण्यातली एकवाक्यता
क्रॉस-चेक करत राहतो !

मग माणूस ओळखण्यात चूक होत नाही.

मोदक's picture

7 Jun 2020 - 10:37 pm | मोदक

@ संपादक मंडळ

इथला प्रतिसाद वैयक्तिक वाटतो आहे म्हणून उडाला असेल तर वैयक्तिक कमेंट असणारा वरचा प्रतिसाद संपादित होणे आवश्यक वाटत नाही का..?

हेसुद्धा वामाच्या गावाला जाणार वाटतं.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Jun 2020 - 5:20 pm | प्रकाश घाटपांडे

हा संवेदनशील व्यक्तींचा प्रातिनिधिक प्रश्न आहे. जेवढ विसरण्याचा प्रयत्न कराल तेवढे ते उफाळून येते. जखम बरी न होणार्‍या अश्वत्थामा सारख्या या कटु स्मृती त्रास देतात. शब्द हे शस्त्र असते. जपून वापरावे म्हणतात ते यामुळेच. काळानुसार तीव्रता कमी होत जाते. शिवाय काही जाणीवपुर्वक प्रयत्न करावे लागतात. काही वर्षांनी काही निमित्ताने ती व्यक्ती अनपेक्षितपणे दिसल्यास पुन्हा उफाळून येतात कटुस्मृती. बेफिकिर बनण्याचा प्रयत्न करा. शिवाय तुम्ही कोणाला त्रास दिला नाहीये ही मोठी जमेची बाजू आहे

> प्रातिनिधिक प्रश्न आहे.

काही प्रमाणात बरोबरे
पण मुळात हा मनाच्या संयोजनाचा प्रश्न आहे

खरं तर संवेदनाशील व्यक्ती
हा गुण मानला गेला असला तरी,
अशा व्यक्तीला भावनांचं संयोजन करता येत नाही
ही बेसिक मेख असते !

कानडाऊ योगेशु's picture

7 Jun 2020 - 10:54 pm | कानडाऊ योगेशु

पटतेय घाटपांडे सर.! जास्त विचार करु जाता असे जाणवले कि सगळ्याच्या मुळाशी गोष्टी स्वतःच्या मनासारख्या न झाल्या तर ते सहजासहजी न स्वीकारता येण्याची मानसिकता आहे. म्हणजेच बाह्य गोष्टींवर जास्तच अपेक्षा ठेवण्याचा आहे. प्रत्येक रिलेशन (वस्तुंसोबत,व्यक्तींसोबत) मध्ये जर प्रथमपासुनच गोष्टी स्वतःच्या मनाविरुध्द जाऊ शकतात असे मान्य केले तर पुढे होणारा त्रास वाचु शकतो.

शिवाय तुम्ही कोणाला त्रास दिला नाहीये ही मोठी जमेची बाजू आहे

बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय। ह्यापेक्षा जास्त काय बोलु!

नेहेमीप्रमाणेच चांगल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.!

एखाद्या त्रासदायक आठवणीला स्वतःच हास्यास्पद ठरवता येऊ शकते का यावर विचार करावा, असा सल्ला देऊ शकतो खरं तर. पण जर आठवण इतकी त्रासदायक असेल तर त्याचा कितपत उपयोग होईल हे नक्की सांगू शकत नाही. अर्थात् प्रयोग करून बघायला हरकत नाही.

उदा: माझी एक अशीच आठवण ज्याचा फार त्रास व्हायचा अगोदर - ते मी स्वतःच माझी कशी फजिती झाली होती हे हसत हसत माझ्या मित्राजवळ बोलून मन मोकळं केलं. त्यानंतर जेव्हा त्या आठवणीनं पुन्हा डोकं वर काढलं, त्यावेळी तेवढा त्रास झाला नाही, कारण माझे आणि माझ्या मित्राचे त्यावरचे हसणे जास्त लक्षात राहिले होते. असाच प्रयोग नंतर आणिकही काही वेळेस केला तेव्हा तसा त्रास कमी होत गेला.

माझ्या लक्षात आलेली गोष्ट ती ही - आपण स्वतःच आपल्या आनंदाला जास्त महत्त्व देत नाही. दु:खाला देतो.
हे मी एका धाग्यात मांडले होते, असे स्वतःच्याच धाग्याचा पुरस्कार करण्याचा दोष पत्करून सांगू इच्छितो. :-)
जर त्यातून काही उपयोगाचं मिळत असेल तर जरूर बघावं. शुभेच्छा.

कानडाऊ योगेशु's picture

8 Jun 2020 - 1:26 am | कानडाऊ योगेशु

धागा वाचला. लिहिलेले आवडले. थोडक्यात हर फिक्र को धुए मे उडाता चला गया असा अ‍ॅटिट्युड नक्कीच काम करतो.

आपण स्वतःच आपल्या आनंदाला जास्त महत्त्व देत नाही. दु:खाला देतो.

माणसाला दु:ख कुरवाळत बसायला आवडते. विशेषतः ते जुने असेल तर अजुनच.
म्हणुनच समदु:खी हा शब्दप्रयोग वापरला जातो समसुखी असा शब्द मी अजुन वाचला नाहीये.

विजुभाऊ's picture

8 Jun 2020 - 11:19 am | विजुभाऊ

एन एल पी चा वापर करुन यातून मुक्तता करुन घेता येते.
व्यनी करा. मी मदत करू शकेन

विटेकर's picture

8 Jun 2020 - 11:44 am | विटेकर

...................अस होते कधी कधी !

माझा मात्र बन्गलोरच्या घरमालकाचा अनुभव अतिशय चांगला आहे - के एन एन गुप्ता - इन्दिरानगर ( होटेल सन्गीत चे मालक )
मी एकूण ८ वर्षे या एकाच घरात रहिलो .. दोघे ही अतिशय सालस .. पक्का शेट्टी .. पण माझ्याशी व्यवहार अतिशय प्रेमळ .. बायको माहेरी आली की मी जेवायला त्यान्च्याकडे असे ! माझ्या मुलासाठी या शेट्टीने सोन्याची अन्गठी केली होती .. दोघे नवरा - बायको आमचे खूप लाड करायचे .. मुलाला त्याण्च्याकडे ठेऊन आम्ही बाहेर जायचो ... त्यान्च्यामुळे मुलगा तेलगु , कानडी आणि थोडे तमिळ पन शिकला !

मी घर बान्धायला सुरुवात केल्यावर या गृहस्थाने जवळ जवळ सहा महीने अगोदर , मी त्यान्च्याच घरात रहात असताना , दिपोझित चे पैसे परत दिले ... बान्धकामाला लागतील म्हणून ! मी माझ्या स्वत्;च्या घरी फार काळ राहू शकलो नाही .. मी घर मालक झाल्यावर माझ्या समोर हा आदर्श होता !

दोन वर्शापूर्वी ते आमच्याकडे पुण्याला येऊन गेले , आम्ही त्यान्च्यासोबत शिरडीला जाऊन आलो , आजही तगडा सम्पर्क आहे .. नातेवाईक असल्यासारखा !

हा निव्वळ प्राक्तानाचा भाग आहे ! .. आपले प्राक्तन आपण सहज स्वीकारले तर त्रास कमी होतो ! "..हे असं कसं झाले .." या प्रश्नाला काडीचा अर्थ नाही .. हे असेच होणार होते म्हणून असे झाले .. हे स्वीकारून पुढे चालणे महत्वाचे !

मना त्वाचि रे पूर्व सन्चित केले | तयासारिखे भोगणे प्राप्त झाले !

सहज स्वीकारा .. म्हणजे त्रास कमी होईल ..अर्थात हे सान्गायला फार सोपे आहे !

जेव्हा असा एखादा त्रास होतो त्यवेळी आपले कर्ज फिटत असते. कर्ज फिट्त असेल तर दु: ख व्हावे का आनन्द?

शाम भागवत's picture

8 Jun 2020 - 11:57 am | शाम भागवत

छान समजावून सांगितले आहे.
पण...
कळतं पण वळत नाही हाच सर्वसामान्यांचा अनुभव असतो.
कारण
असे विचार इतके झटकन मनात घुसतात की, स्वत:ला भरपूर त्रास करून घेतल्यावरच, सगळं कळलेलं एक एक करून आठवायला लागतं.
:)

कानडाऊ योगेशु's picture

8 Jun 2020 - 12:22 pm | कानडाऊ योगेशु

हेवा वाटण्याजोगा अनुभव आहे तुमचा विटेकरसाहेब!

जेव्हा असा एखादा त्रास होतो त्यवेळी आपले कर्ज फिटत असते. कर्ज फिट्त असेल तर दु: ख व्हावे का आनन्द?

१००% पटले.
विचारांवर उपाय विचारांनीच करावा लागतो आणि असे दृष्टीकोन माहित करुन घेण्यासाठीच इथे धागा काढला होता. सद्गुरु जग्गी वासुदेव म्हणतात त्याप्रमाणे जे काही घडते ते सर्व आपल्या आत घडते त्यामुळे प्रॉब्लेम ही आत असेल तर उत्तर ही आतुनच मिळायला हवे.

मना त्वाचि रे पूर्व सन्चित केले | तयासारिखे भोगणे प्राप्त झाले !

ओळी समोर लिहिलेल्या असतात. हजारदा वाचलेल्या असतात पण अर्थ असा सहजासहजी भिनत नाही. आता प्रचिती येतेय.

प्रतिसादाबद्दल धन्य्वाद.

मूकवाचक's picture

8 Jun 2020 - 3:00 pm | मूकवाचक

विटेकरजींनी थोडक्यात आणि सहज पटण्यासारखे स्पष्टीकरण दिलेले आहे. धन्यु.

मोदक's picture

8 Jun 2020 - 6:34 pm | मोदक

भारी अनुभव.

मना त्वाचि रे पूर्व सन्चित केले | तयासारिखे भोगणे प्राप्त झाले !

वाह..! __/\__

> तयासारिखे भोगणे प्राप्त झाले !

या पूर्वसंचिताचा डेटा नक्की कुठे स्टोअर केलेला असतो आणि
त्याची डे-टू-डे मॅनेजमंट कोण करतं ?

त्या मॅनचा पत्ता कळू शकेल का ?
म्हणजे त्याच्याशी संधान बांधून पूर्वसंचितात,
लोकांना किमान उर्वरित आयुष्यात तरी
बदल घडवून आणता येतील !

त्या डेटा मॅनेज करणार्‍याच्या पूर्व संचिताचं काय ?
त्याच्यावर कुणाचा कंट्रोल असतो ?

सतिश गावडे's picture

8 Jun 2020 - 7:57 pm | सतिश गावडे

तुमच्या "स्मृती स्ट्रींग्ज" च्या थियरीसारखीच ही पण एक थियरी आहे. ती आज सिद्ध करता येत नाही किंवा तुम्ही मागत आहात ते पुरावे उपलब्ध नाहीत. तुम्ही जशी "स्मृती स्ट्रींग्ज" थियरी मानता तसंच काही लोक हा कर्मविपाक सिद्धांत मानतात.

अर्थात विटेकर काका तुम्हाला काय उत्तर देतात हे वाचणं रोचक ठरेल.

> तसंच काही लोक हा कर्मविपाक सिद्धांत मानतात.

या मुद्द्यावर मी चर्चेला तयार आहे

पण तुम्ही मात्र (त्या क्षेत्रात असून) बेसिक गोष्टींचं उत्तर देत नाही :

१. नवजात अर्भकाच्या मेंदूनामक बायो- हार्डडिस्कवर कोणताही डेटा नसतो ही वस्तुस्थिती आहे.

२. तस्मात, जवळजवळ कोणत्याही अर्भकाला काहीही पूर्वस्मृती नसते. त्याला प्रत्येक गोष्ट नव्यानं शिकायला लागते.

३. ज्या अपवादात्मक बालकाला अशी स्मृती जागृत होते, त्याच्या मेंदूवर तो डेटा डायरेक्ट बाहेरुन कॉपी/पेस्ट व्हायला हवा.

४. थोडक्यात, एखाद्या मृत व्यक्तीच्या अनफॉरमॅटेड "स्मृती स्ट्रींग्ज" तिथे पेस्ट झाल्याशिवाय त्यांचं रिट्रीवल अशक्य आहे.

५. अशाप्रकारे पुनर्जन्म ही अपवादात्मक परिस्थितीत, मृत व्यक्तीच्या अनफॉरमॅटेड "स्मृती स्ट्रींग्ज", नवजात अर्भकाच्या मेंदूत पेस्ट होण्याची केस आहे.

त्यापलिकडे पुनर्जन्म या कल्पनेला काहीही अर्थ नाही.

६. तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे याविषयावर झालेल्या संशोधनाचा सारांश तुम्ही दिलात (लिंक नको), तर त्याची शहानिशा होईल.

________________________________________

> अर्थात विटेकर काका तुम्हाला काय उत्तर देतात हे वाचणं रोचक ठरेल.

त्यांचाकडे समर्थांच्या श्लोकाशिवाय इतर पुरावा नाही कारण हा प्रष्ण त्यांना मागे विचारुन झालायं
______________________________

मानशास्त्राचे गाढे अभ्यासक `मोदक' यांनी मात्र लाल रंगात समर्थांचा श्लोक क्वोट करुन त्याखाली नमस्कार केला आहे.

ते आपले ज्ञानदीप इथे पेटवून पुनर्जन्माविषयी आपल्या अभ्यासाची माहिती सांगणार आहेत.

आणि त्याच बरोबर हे सप्रमाण सिद्ध करणार आहेत की आपले प्रतिसाद धागा भरकटवण्यासाठी नसून या संकेतस्थळाला आपलं अमूल्य योगदान देण्यासाठी असतात.

सतिश गावडे's picture

9 Jun 2020 - 1:39 am | सतिश गावडे

पण तुम्ही मात्र (त्या क्षेत्रात असून) बेसिक गोष्टींचं उत्तर देत नाही :

मेंदू हा बायो- हार्ड डीस्क आहे हे तुमचं गृहीतक आहे. मला हार्ड डिस्क कशी चालते हे माहीती आहे, मेंदू कसा चालतो मला असलेलं ज्ञान नगण्य आहे. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हीही मेंदू विषयातील तज्ञ नाही. त्यामुळे तुमच्या या गृहीतकाला "तुमचं वाचनातून तयार झालेलं वैयक्तीक मत" इतकाच अर्थ आहे.

१. नवजात अर्भकाच्या मेंदूनामक बायो- हार्डडिस्कवर कोणताही डेटा नसतो ही वस्तुस्थिती आहे.

२. तस्मात, जवळजवळ कोणत्याही अर्भकाला काहीही पूर्वस्मृती नसते. त्याला प्रत्येक गोष्ट नव्यानं शिकायला लागते.

३. ज्या अपवादात्मक बालकाला अशी स्मृती जागृत होते, त्याच्या मेंदूवर तो डेटा डायरेक्ट बाहेरुन कॉपी/पेस्ट व्हायला हवा.

४. थोडक्यात, एखाद्या मृत व्यक्तीच्या अनफॉरमॅटेड "स्मृती स्ट्रींग्ज" तिथे पेस्ट झाल्याशिवाय त्यांचं रिट्रीवल अशक्य आहे.

५. अशाप्रकारे पुनर्जन्म ही अपवादात्मक परिस्थितीत, मृत व्यक्तीच्या अनफॉरमॅटेड "स्मृती स्ट्रींग्ज", नवजात अर्भकाच्या मेंदूत पेस्ट होण्याची केस आहे.
त्यापलिकडे पुनर्जन्म या कल्पनेला काहीही अर्थ नाही.

या मुद्द्यांना कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. केवळ तुमची वैयक्तीक मतं आहेत ही.
तुमचे हे मुद्दे आणि "जर सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचा निर्माता आहे तर सृष्टीचाही निर्माता असायला हवा" किंवा "एक मुल श्रीमंताघरी जन्माला येते आणि दुसरे गरीबाघरी. पूर्वसंचिताशिवाय असा भेदभाव कसा होईल?" अशा स्वरुपाची विधाने यात अक्षरशः काहीही फरक नाही. सारा मानण्याचा किंवा न मानण्याचा खेळ आहे. तुमच्यासाठी ही "स्मृती स्ट्रींग्ज" थियरी खरी आहे तितकाच खरा कर्मविपाक सिद्धांत तो मानणार्‍यांसाठी आहे.

हे तुम्हाला मान्य नसेल तर तुमच्या विधानांच्या समर्थनार्थ पुरावे द्या. कुणी संशोधन केले, कोणत्या शोधनिबंधात प्रसिद्ध झाले, त्यांचा पियर रिव्ह्यू कुणी केला? "स्मृती स्ट्रींग्ज" सर्व प्रथम कुणी आणि कोणत्या यंत्रातून पाहील्या? आता जर पाहायच्या असतील तर कशा पाहता येतील? वगैरे.

६. तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे याविषयावर झालेल्या संशोधनाचा सारांश तुम्ही दिलात (लिंक नको), तर त्याची शहानिशा होईल.

डॉ इयान स्तीव्हन्सन यांचे काम संशोधन म्हणण्यापेक्षा व्हेरीफिकेशन अँड डोक्युमेंटेशन स्वरुपाचे म्हणता येईल. ते आणि त्यांचे सहकारी मागचा जन्म आठवत असल्याचा दावा करणार्‍या मुलांना, त्यांच्या कुटुंबियांना भेट देत, त्यांच्या दाव्यांची, ते सांगत असलेल्या गतजन्मीच्या आठवणींची नोंद करत, या आठवणीतील माहितीवरुन मागील जन्मातील ठिकाणं आणि माणसं शोधण्याचा प्रयत्न करत. अशी मिळती जुळती ठिकाणं आणि माणसं सापडल्यास दावा करणार्‍या मुलाने सांगितलेल्या माहीतीतील किती माहिती जुळते याचा ताळा करीत आणि ते आपल्या शोधनिबंधातून मांडत. यातील बर्‍याचशा केसेस मधील बरीचशी माहिती जुळत असे. हे फार मोघम विधान आहे याची मला कल्पना आहे. मी हे सारे जवळपास सात आठ वर्षांपूर्वी वाचले होते. आता मुद्देसुद आठवत नाही. ज्यांना अधिक जाणून घेण्याची ईच्छा आहे त्यांनी डॉ इयान स्टिव्हन्सन यांचे लेखन वाचावे.

मात्र या नोंदीतून काही गोष्टी ठ़ळकपणे समान होत्या. त्या म्हणजे:
१. पुनर्जन्माच्या आठवणी मुलांना वयाच्या सहा सात वर्षांपर्यंत आठवत असत. त्यानंतर मुलांना गतजन्मीच्या आठवनींचा विसर पडत असे.
२. गतजन्मीच्या आठवनी आठवणार्‍या बहुतांश मुलांचा मागील जन्मातील मृत्यू अपघाती किंवा घातपाती झालेला असे.
३. मृत्यूच्या वेळी घातपातात किंवा अपघातात शरीराच्या एखाद्या अवयवावर ईजा झालेली असल्यास त्याची खूण या जन्मी शरीरावर दिसत असे
४. दुसरा जन्म घेताना लिंगबदल शक्य असे.

या सार्‍या नोंदी पुनर्जन्माच्या सुचक आहेत असे माझे मत आहे. पुनर्जन्म असतोच असा माझा दावा नाही.

> हे माहीती आहे

स्टोरेज > रिट्रीवल > प्रोसेसिंग > अप्लिकेशन

या कंप्युटर आणि मेंदूच्या कार्यप्रणालीत नेमका काय फरक आहे ?

उदा. एखादी व्यक्ती समोर आल्यावर मेंदू स्मृतीतून स्टोअर्ड डेटा अक्सेस करून प्रोसेस करतो आणि आपल्याला सांगतो की हा सगा !

कंप्युटर या वेगळं काय करतो ?

सतिश गावडे's picture

9 Jun 2020 - 9:07 am | सतिश गावडे

म्हणजे तुमचे म्हणणे देखील तर्कावर आधारीत मत आहे. त्याला तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा वैज्ञानिक पुरावा नाही.

कर्मविपाक सिद्धांतही असेच तर्कावर तयार झालेले मत आहे
पूर्वसंचित चांगले - हा जन्म चांगला जाईल
पूर्वसंचित वाईट - हा जन्म वाईट जाईल

तस्मात तुमची स्मृती स्ट्रिंग्जची थियरी आणि विटेकर काकांनी मांडलेले पूर्वसंचिताविषयीचे मत या एकाच पातळीवरील वैयक्तिक धारणा आहेत.

आणि एखादी व्यक्तीला आपण केलेल्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावा देता येत नाही नसेल तर तिला दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या तत्सम दाव्याचा पुरावा मागाण्याचा नैतिक अधिकार नाही असे माझे मत आहे ;)

शाम भागवत's picture

9 Jun 2020 - 9:26 am | शाम भागवत

सगा सर तराजूच्या कोणत्याही पारड्यात कधीच नसतात. ते नेहमी तराजूच्या मध्यभागी असलेल्या काट्यावर बसलेले असतात.
_/\_

> त्याला तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा वैज्ञानिक पुरावा नाही ?

मी विचारलंय :

स्टोरेज > रिट्रीवल > प्रोसेसिंग > अप्लिकेशन

या कंप्युटर आणि मेंदूच्या कार्यप्रणालीत नेमका काय फरक आहे ?

उदा. एखादी व्यक्ती समोर आल्यावर मेंदू स्मृतीतून स्टोअर्ड डेटा अक्सेस करून प्रोसेस करतो आणि आपल्याला सांगतो की हा सगा !

कंप्युटर या वेगळं काय करतो ?

मेंदू बायो-कंप्युटर आहे हा माझा तर्क नाही, ते विधान आहे.
आणि तुम्हाला वर विचारलेला प्रष्ण ते सिद्ध करतं.
त्यासाठी कोणत्याही वेगळ्या लिंकची किंवा संशोधनाची गरज नाही.
__________________________________

शिवाय एआय (आर्टीफिशिअल इंटेलिजन्स) हा मनाचीच प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न नाही तर वेगळं काय आहे ?

रोबोटिक्स काय आहे ?

तुम्हाला कंप्युटर हा मनाच्या प्रणालींचा वेध घेऊन त्याचं काम सोपं करण्याचा आणि प्रसंगी मनाला रिप्लेस करण्याचा प्रयत्न आहे याची कल्पना नाही का ?

थोडक्यात, मन हा सर्वात अ‍ॅडवान्सड बायोकंप्युटर आहे ही उघड गोष्ट आहे.
_____________________________________________

आता तुमच्या त्या क्षेत्रातल्या ज्ञाननं कर्मविपाक सिद्धांताची उकल करा :

१. जगाची लोकसंख्या ७८० कोटी आहे.
२. या ७८० कोटी लोकांच्या सर्व कृत्यांचा डेटा प्रत्येक दिवशी किती होईल ?
३. कर्मविपाक वॅलीड होण्यासाठी असा नक्की किती पूर्वजन्मांचा डेटा लागेल ?
४. हा सर्व डेटा नैतिक मूल्यांवर कसा सॉर्ट केला जातो ?
उदा. वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवणं हा अतिरेक्यांच्या दृष्टीनं स्वर्गप्राप्तीचा रस्ता आहे पण जगाच्या दृष्टीनं ते सर्वोच्च पाप आहे.
तर याचा निवाडा करणारी सिस्टम जगात कोणता माईचा लाल बनवतो ?
५. हा ७८० कोटी लोकांचा (तुम्ही सांगाल तितक्या जन्मांचा) डेटा नक्की कुठे स्टोअर केला आहे ?
६. हा सर्व डेटा हरेक क्षणी प्रोसेस करुन, प्रत्येकाचं विधीलिखित ठरवणारी यंत्रणा नक्की कशी काम करते ?

त्या क्षेत्रात काम करत असूनही तुम्हाला यातल्या एकाही प्रष्णाचं उत्तर देता येणार नाही.

आता तुमच्या कर्मविपाक सिद्धांताला काय आधार आहे ?

सतिश गावडे's picture

9 Jun 2020 - 2:42 pm | सतिश गावडे

आता तुमच्या कर्मविपाक सिद्धांताला काय आधार आहे ?

संक्षी, मी स्वत:च कर्मविपाक सिद्धांत मानत नाही हो. मी म्हणतोय की कर्मविपाक सिद्धांत आणि तुम्ही मांडलेली "स्मृती स्ट्रींग्ज अंतराळात निसटतात, त्यातील काही नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरतात" ही स्ट्रींग्ज थियरी या दोन्ही गोष्टी तर्कावर आधारीत असून त्यांना कोणताही आधार नाही.

आता तुमच्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरे नसल्याने तुम्ही मलाच कर्मविपाक सिद्धांताला काय आधार आहे विचारत आहात, जो मी मानतच नाही. :)

ते कॉम्प्युटर, हार्डडिस्क, स्टोरेज, रिट्रीवल, प्रोसेसिंग, अप्लिकेशन आणि एआय हे सारं बाजूला ठेवा आणि तुम्ही जे विधान केलंय "स्मृती स्ट्रींग्ज अंतराळात निसटतात, त्यातील काही नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरतात" त्याच्या अनुषंगाने या मुद्द्यांवर बोला:

तुम्ही जे विधान केलंय त्याच्या समर्थनार्थ तुमच्याकडे काही शास्त्रीय पुरावे आहेत का? यावर कुणी संशोधन केले, कोणत्या शोधनिबंधात प्रसिद्ध झाले, त्यांचा पियर रिव्ह्यू कुणी केला? "स्मृती स्ट्रींग्ज" सर्व प्रथम कुणी आणि कोणत्या यंत्रातून पाहील्या? आता जर पाहायच्या असतील तर कशा पाहता येतील? त्या स्मृती स्ट्रींग्ज नेहमीच अंतराळात निसटतात आणि नवजात अर्भकाच्या मेंदुत शिरतात की काही अपवादात्मक परीस्थितीत होते? हे कसे तपासता येते.

आता फक्त या आणि याच प्रश्नांची उत्तरे द्या कुठलीही संगण़क विषयक संकल्पना मध्ये न आणता. संगणकाशी तुम्ही दाखवू पाहत असलेले साम्य हा केवळ तुमचा तर्क आहे. तो शास्त्रीय पुरावा नाही. :)

साम्य हा केवळ तुमचा तर्क आहे ?

तुम्हाला मुद्दा कळतो का पाहा :

१. जर मेंदू हा बायोकंप्युटर आहे हेच तुम्हाला मान्य नसेल तर मेमरी स्ट्रींग्ज हा डेटा आहे हे सुद्धा मान्य होणार नाही आणि चर्चा पुढे सरकणार नाही.

२. तस्मात, तुम्ही कंप्युटर काय आहे ते सांगा

३. कर्मविपाक सिद्धांत तुम्ही डेटा स्टोरेज आणि प्रोसेसिंग या अँगलनं पाहू शकत असाल तर मी मांडलेल्या मुद्यांवर तो फेल जात नाही का ? हे संगणकतज्ञ म्हणून सांगा.

सतिश गावडे's picture

9 Jun 2020 - 4:34 pm | सतिश गावडे

तुमचा दावा: स्मृती स्ट्रींग्ज अंतराळात निसटतात, त्यातील काही नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरतात

मी तुमच्या दाव्याच्या संदर्भात विचारलेले प्रश्नः
तुम्ही जे विधान केलंय त्याच्या समर्थनार्थ तुमच्याकडे काही शास्त्रीय पुरावे आहेत का? यावर कुणी संशोधन केले, कोणत्या शोधनिबंधात प्रसिद्ध झाले, त्यांचा पियर रिव्ह्यू कुणी केला? "स्मृती स्ट्रींग्ज" सर्व प्रथम कुणी आणि कोणत्या यंत्रातून पाहील्या? आता जर पाहायच्या असतील तर कशा पाहता येतील? त्या स्मृती स्ट्रींग्ज नेहमीच अंतराळात निसटतात आणि नवजात अर्भकाच्या मेंदुत शिरतात की काही अपवादात्मक परीस्थितीत होते? हे कसे तपासता येते.

तुमच्याकडे माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर नाही.

थांबतो आता. :)

उलट आहे !

तुम्हाला कंप्युटर काय आहे या साध्या प्रष्णाचं उत्तर देता येत नाही !

____________________________________

अ : हा कंप्युटर आहे

बः तो तुमचा तर्क आहे !

अ: ठीके. मग कंप्युटर काय आहे ?

बः तुम्ही ज्याला कंप्युटर म्हणता तो तुमचा तर्क आहे

अ : पण मग तुमचा कंप्युटर म्हणजे नक्की काय आहे ?

ब : तुमच्याकडे माझ्या प्रष्णाला उत्तर नाही !

________________________________________

आता याचे दोनच अर्थ संभवतात :

१. ब ला अशी भीती आहे की त्यानं कंप्युटर काय आहे याचं उत्तर दिलं तर अ ज्याला कंप्युटर म्हणतो तीच गोष्ट आपण सांगतोयं हे उघड होईल

२. ब लाच कंप्युटर म्हणजे नक्की काय हे माहिती नाही

____________________________________________

वास्तविकात मला कोणतीही एक्सटर्नल लिंक द्यायची गरज नसते पण बरेच दिवस तुमची गाडीच पुढे सरकत नाहीये, त्यामुळे हे पाहा :

Face It, Your Brain Is a Computer _The New York Times

किमान तुमच्या विचारांना नवी दिशा तरी मिळेल.

तुमचा दावा: स्मृती स्ट्रींग्ज अंतराळात निसटतात, त्यातील काही नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरतात

माझा प्रश्नः तुम्ही जे विधान केलंय त्याच्या समर्थनार्थ तुमच्याकडे काही शास्त्रीय पुरावे आहेत का?
तुमचे उत्तरः

माझा प्रश्नः यावर कुणी संशोधन केले, कोणत्या शोधनिबंधात प्रसिद्ध झाले, त्यांचा पियर रिव्ह्यू कुणी केला?
तुमचे उत्तरः

माझा प्रश्नः "स्मृती स्ट्रींग्ज" सर्व प्रथम कुणी आणि कोणत्या यंत्रातून पाहील्या? आता जर पाहायच्या असतील तर कशा पाहता येतील?
तुमचे उत्तरः

माझा प्रश्नः त्या स्मृती स्ट्रींग्ज नेहमीच अंतराळात निसटतात आणि नवजात अर्भकाच्या मेंदुत शिरतात की काही अपवादात्मक परीस्थितीत होते? हे कसे तपासता येते.
तुमचे उत्तरः

तो कॉम्प्युटर सध्या बाजूला ठेवा आणि वरील प्रश्नांची उत्तरे द्या. :)

> आणि वरील प्रश्नांची उत्तरे द्या

तुम्ही संगणक क्षेत्रात काम करत असाल तर एक साधी गोष्ट लक्षात यायला हवी :

आधी कंप्युटर आहे आणि डेटा नंतर आहे

___________________________

आजपर्यंत तुम्ही मेंदू हा बायोकंप्युटर आहे हा माझा तर्क म्हणत होतात. आता लिंक दिल्यावर तुम्ही डेटावर जंप मारली !

प्रथम हे मान्य करा की मेंदू हा बायोकंप्युटर आहे
कारण लिंक देऊनही तुम्हाला ते मान्य नसेल तर चर्चा पुढे नेण्यात अर्थ नाही.

सतिश गावडे's picture

9 Jun 2020 - 5:42 pm | सतिश गावडे

मी कुठेही आणि कसलीही जंप मारलेली नाही. मी माझे प्रश्न याच धाग्यावर मी तीन वेळा कॉपी पेस्ट केले आहेत. तुम्ही त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही ही वस्तूस्थिती आहे. तुम्ही दिलेली लिंक किंवा तुमचे "मेंदू हा बायोकंप्युटर आहे" हे विधान तुमच्या दाव्यासंदर्भातील माझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही.

तुम्ही स्वत: अशास्त्रीय विधान करुन त्यासंबंधी विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता इतरांना त्यांची विधाने सिद्ध करायला सांगत आहात हा या धाग्यावर दिसणारा उघड विरोधाभास आहे.

संजय क्षीरसागर's picture

9 Jun 2020 - 5:55 pm | संजय क्षीरसागर

> किंवा तुमचे "मेंदू हा बायोकंप्युटर आहे" हे विधान तुमच्या दाव्यासंदर्भातील माझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही.

काय बोलता ?

म्हणजे लिंक तुम्ही वाचलेलीच दिसत नाही !

वाचा :

There is much that we don’t know about brains. But we do know that they aren’t magical. They are just exceptionally complex arrangements of matter. Airplanes may not fly like birds, but they are subject to the same forces of lift and drag. Likewise, there is no reason to think that brains are exempt from the laws of computation. If the heart is a biological pump, and the nose is a biological filter, the brain is a biological computer, a machine for processing information in lawful, systematic ways.

The sooner we can figure out what kind of computer the brain is, the better.

____________________________

एकदा तुमचा कंप्युटरविषयी निर्णय झाला की डेटाविषयी बोलू
किमान इतकं तरी लॉजिक तुम्हाला कळेल अशी अपेक्षा करतो

शिवाय ही लिंक न्यूयॉर्क टाईम्सची आहे हे पुन्हा निदर्शनास आणून देतो.

सतिश गावडे's picture

9 Jun 2020 - 6:00 pm | सतिश गावडे

यात तुमच्या "स्मृती स्ट्रींग्ज अंतराळात निसटतात, त्यातील काही नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरतात" या विधानाशी संबंधीत एक शब्द तरी आहे का? :)

> त्यातील काही नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरतात" या विधानाशी संबंधीत एक शब्द तरी आहे का?

तुमची शोधक वृत्ती दाद देण्याजोगी आहे.
एक संगणकतज्ञ दिलेल्या लिंकच्या टायटलकडे दुर्लक्ष करुन
त्या लेखात `स्मृती स्ट्रींग्जचा ' शोध घेतो हे सुद्धा तितकंच अपूर्व आहे.
_____________________________________

तुमचा पहिला प्रतिसाद वाचा :

" मेंदू हा बायो- हार्ड डीस्क आहे हे तुमचं गृहीतक आहे "

आता त्या लिंकचं टायटल वाचा : Face It, Your Brain Is a Computer _The New York Times

आणि आता तिथे शेवटी काय लिहीलंय ते पुन्हा वाचा :

the brain is a biological computer, a machine for processing information in lawful, systematic ways.

याचा अर्थ असा होतो की तुम्ही सुरुवात कुठून केली हे विसरलात.
दुसरी गोष्ट इतकी वर्ष त्या क्षेत्रात काम करुन मेंदू हा बायो-कंप्युटर आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली नव्हती.

आणि आता तुम्हाला,
तुमचा पहिला मुद्दा खोटा ठरला हे मान्य करायला अडचणीचं ठरतंय.
_________________________________

पण खरी गोची त्याच्यापुढे आहे
एकदा मन हा बायो-कंप्युटर आहे हे मान्य केल्यावर स्मृती हा डेटा आहे ही उघड गोष्ट मान्य करायला लागेल.
आणि चुकून (किंवा प्रामाणिकपणे) तुम्ही ते मान्य केलंत,
तर केवळ एका प्रतिसादात मी `स्मृती स्ट्रींग्जचा' दावा सिद्ध करीन

____________________________

अर्थात, कंप्युटर आणि डेटा यातला फरक संगणकतज्ञाला कळत नाही
हे उघडपणे मान्य करणं म्हणजे
कंप्युटर एस्टॅब्लीश होण्यापूर्वी, चर्चा डेटाकडे वळवणं

हे बहुदा तुमच्या लक्षात आलंय

सिरुसेरि's picture

8 Jun 2020 - 3:10 pm | सिरुसेरि

आपण लिहिलेल्या त्रासदायक अनुभवामुळे सर्व वाचकांना भविष्यात अशा प्रसंगी सावधगिरी बाळगता येईल . "पुढच्यास ठेच , मागचा शहाणा " या न्यायाने .
या लेखावरील अनेक प्रतिसादही माहितीपुर्ण आहेत.

बाकी , अशा त्रासदायक आठवणींना "भुली हुई यादों , मुझे इतना तो न तडपाओ , अब चैनसे रहने दो , मेरे पास ना आओ " , " जा मुझे ना अब याद आ , मुझे भुल जाने दे " असे सांगुन लांब ठेवणे कदाचित हितकर .

आपण सर्वच जण कधी ना कधी अशा चक्रव्युहात अडकतोच फक्त प्रसंग आणि माणसे वेगळी ईतकेच
१. मी पुण्याला प्रथम आलो तेव्हा भाडेकरु म्हणुन राहण्याचा कधीच अनुभव नव्हता. तोवर केवळ मालकाची भुमिकाच माहित होती. पण इथे आल्यावर प्रथमच एजंट बरोबर फिरणे घर बघणे वगैरे करण्यात बरेच नमुने पाहायला मिळाले. सुदैवाने मालक बरा भेटला पण शेजारी तर्‍हेवाईक होते. विशेषतः ज्यांचे मालकाशी वाकडे होते, त्यांना भाडेकरु कसा लवकर पळुन जाईल आणि ह्यांचे नुकसान होईल अशी काळजी असावी. मी सुरुवातीला २-३ वेळा मालकाकडे तक्रारी केल्या पण त्यांना वयोमानानुसार सारखे तिकडे येणे शक्य नव्हते अखेर सेक्रेटरी खंबीरपणे (किवा काट्याने काटा काढु असे असेल) पाठीशी उभे राहिले आणि १-२ वर्षे निभावली. तरी झालेले थोडेफार नुकसान अजुनही मनाला त्रास देतेच जसे की बाइकचे पेट्रोल काढणे, नंबर प्लेट तोडणे, पाण्यावरुन भांडणे उकरणे . कदाचित आता मी त्या गोष्टींचा जास्त चांगल्या प्रकारे सामना करु शकलो असतो.
२. माझा फ्लॅट मित्राला भाड्याने दिल होता. पहिले वर्षभर त्याने रडत खडत का होईना भाडे दिले, पण नंतर मुलीचे आजारपण वगैरे कहाण्या सांगुन बुडवले. शेवटी डिपॉझिट जप्त करुनही थोडे नुकसान झालेच. मैत्रीही तुटली.
३. ट्रिपला गेले असताना आगाउ पैसे दिले असणे आणि हॉटेल भंगार निघणे हा अनुभव तर जवळ पास सर्वांनी कधीतरी घेतला असेल. असेच एका डिसेंबरमध्ये ऐन वेळी बुकिंग करुन गोव्याला गेलो. हॉटेल, बस प्रवास वगैरे सर्व सहलखर्चात समाविष्ट होते. रात्री उशीरा जी बस त्याने आणली ती गॅरेजमधुन अर्धवट दुरुस्त करुन आणली असावी. त्याच्या खिडक्या लागत नव्हत्या. थंडीने काकडुन गोव्यात पोचलो तेथे एका दुर्गम ठिकाण् चे अवकळा आलेले हॉटेल होते. जेवाखायची सोयही यथातथाच होती. एकंदर ट्रिपचे तीनतेरा वाजले हे सांगणे नलगे. बरे आधीच अक्कलखाती पैसे गेल्याने आणी ग्राहकमंच वगैरे साठी वेळही नसल्याने जमेल तेव्ह्ढी मजा केली आणि घरी येउन विसरुन गेलो.

सतिश गावडे's picture

8 Jun 2020 - 8:00 pm | सतिश गावडे

मैत्रीही तुटली.

मित्राकडून येणे असलेले पैसे देण्यास मित्राने टाळाटाळ केली की मैत्री तुटते हा वैश्विक अनुभव असावा. :)

> जमेल तेव्ह्ढी मजा केली आणि घरी येउन विसरुन गेलो.

ग्राहकमंच ही व्यावसायिकांच्या बेपर्वाईला धडा शिकवण्यासाठी उत्तम सोय आहे.
जागरुक ग्राहकांनी त्याचा अवश्य फायदा घ्यावा.
तिथे कोणतीही सनद नसतांना आपण स्वतःची केस लढवू शकतो आणि अत्यंत निष्पक्ष जजेस तुम्हाला न्यायही मिळवून देतात.

बँक ऑफ इंडियाच्या अशाच बेपर्वा वागणुकीला अद्दल घडवण्यासाठी मी त्यांच्याविरुद्ध मेडी-क्लेमची केस जिंकून, हॉस्पिटलचं ४० हजाराचं बील संपूर्ण वसूल केलं आहे.

नक्की.

वेळ मिळाला की सर्वांना उपयोगी होईल असा वेगळा धागा काढीन.

घराची मालकणी शगुफ्ता नामक एक स्त्री होती.
या शगुफ्ता ला तुम्ही माफ करा... अगदी तिच्या तुम्हाला न आवडलेल्या व्यवहारा सकट तिला तुम्ही तुमच्या मनाच्या गहिर्‍या कोपर्‍यातुन देखील माफ करा. जेव्हा तिच्या तुम्हाला त्रासदायक ठरणार्‍या आठवणी जागृत होतील तेव्हा तेव्हा दर वेळी तिला तुम्ही माफ करा...

“Pain is inevitable but suffering is optional.”

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sooni Sooni... :- Cheeni Kum

शाम भागवत's picture

9 Jun 2020 - 9:02 am | शाम भागवत

एकदम बरोबर वाटतंय.
ज्या वेळेस आठवण होते, तीच वेळ असते योग्य उपाययोजनेची.
_/\_

शाम भागवत's picture

9 Jun 2020 - 4:21 pm | शाम भागवत

केव्हांपासून वाट पाहात होतो.
१०० प्रतिसाद झाले.
;)

शाम भागवत's picture

9 Jun 2020 - 4:22 pm | शाम भागवत

आता मी मोठ्या सुट्टीवर जायला मोकळा झालो.
खूप मस्त वाटतंय.

आदरणीय संक्षी सरांचे सर्व प्रतिसाद वाचले, परम संतोष झाला ...
त्याना कर्म विपाकाचा सिद्धांत समजाऊन सांगायची माझी इच्छा नाही. आणि दुसरे , त्यांनी अथवा त्यांच्यासारख्या दश-सह्स्त्र-कोटी लोकांनी कर्म-विपाक सिद्धान्त स्वीकारला नाही म्हणून शष्प देखील फरक पडत नाही !
Value systems are like Lighthouse. If you do not follow them, you will break. Lighthouse is intact!
-Stephen Covey

म्हणून शष्प देखील फरक पडत नाही !

> मुळात सिद्धांतात काही दम नाही त्यामुळे
मनाला सांत्वना देण्याचा हा एकमेव उपाय आहे !

नावातकायआहे's picture

12 Jun 2020 - 8:12 pm | नावातकायआहे

दमलो वाचुन :-)

उलगडण्याचा एक सर्वोपयोगी प्रयत्न, या दृष्टीनं ही पोस्ट महत्त्वाची ठरेल.

१. माणूस ओळखण्यातली चूक फसगतीला कारणीभूत होते.
२. फसगत झालेला स्वतःच्या चुकीतून शिकण्याऐवजी, फसवणार्‍याला दोष देत बसतो.
त्यामुळे माणूस ओळखण्यात पुन्हा चूक होण्याची शक्यता तशीच रहाते.
३. `पूर्वसंचित ' ही भाकड कल्पना आहे.
अशा धारणांमुळे तात्पुरती मानसिक सांत्वना मिळते पण निर्णयक्षमतेत सजगता येत नाही.
४. फसगत केलेल्याला योग्य धडा शिकवणं हे कौशल्य आहे
पण तो आपल्या `पूर्वकर्माचा भोग ' आहे अशी समजूत करुन घेतली की दुहेरी गोची होते :
अ. झालेल्या नुकसानाची भरपाईपण होत नाही, आणि
ब. ती दुखरी आठवण परत केंव्हा वर येईल याचा नेम नाही !