Skip to main content

त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 04/06/2020 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे दहा-बारा वर्षापूर्वी बेंगलोरमध्येच भाड्याच्या घरात राहत होतो. घराची मालकणी शगुफ्ता नामक (नाव मुद्दामुन लिहिले आहे.वस्सकन अंगावर येऊ नये.)एक स्त्री होती. घराचे डिल होण्याअगोदर तोंडात साखर ठेवुन बोलायची.माझे नुकतेच लग्न ठरले होते.गोड तर इतकी बोलत होती कि मी माझ्या होणार्या बायकोचा व तिचाही लग्नाअगोदर फोनवर संवाद घडवुन आणला. उदा. भाईसाब आप फिकर मत किजिए. आय विल बी अ‍ॅट युअर सर्विस.वगैरे. (हेच वाक्य लक्षात राहण्याचे कारण पुढे येईलच.) पण जेव्हा घरात राहायला सुरवात केली व अ‍ॅग्रीमेंट वगैरे सोपस्कार..त्यापेक्षा बेंगलोरच्या रितिनुसार साधारण आठ-दहा महिन्यांचे आगाऊ भाडे अनामत म्हणुन तिला दिले त्यानंतर तिने खरे रंग दाखवायला सुरवात केली. म्हणजे एकदम विलन न बनता काही छोटी मोठी कामे घरात निघाली तर वो आप ही देख लो हेच पालुपद. ( आय विल बी अ‍ॅट युअर सर्विस ची ऐशीतैशी )ह्यात ड्रेनेज लॉक होणे, पाण्याचे मीटर खराब होणे असे काही गंभीर समस्या होत्या. मालकीणीचा चार फ्लॅट असलेला इंडिपेंडंट बंगला होता त्यामुळे बाकिच्या भाडेकरुंशी संवाद साधुन ही कामे करावी लागत आणि भाडेकरुही तिने केवळ अर्थप्राप्ती हा निकष ध्यानात घेऊन ठेवले होते. (बॅचलर्स वगैरे).त्यांना मॅनेज करणे अजुन एक दिव्य होते. ती स्वतः दुसरीकडे राह्त होती मालकीणीचा नवरा चांगल्या कंपनीत कामाला होता व एकदा ती उपलब्ध नसल्याने पाणी न येण्याची एक समस्या त्याच्या कानावर घालुन कृपया हीच निराकरण करा अशी विनंती केली असता घर खाली करण्याची धमकी दिली होती त्यामूळे जपूनच बोलणी करावी लागत. ते असो. पुढे त्या घरातुन दुसरीकडे शिफ्ट झालो तेव्हाही तिने पत्नीचा अप्रत्यक्ष पाणउतारा केला. पत्नी ह्याबद्दल तारतम्य बाळगुन विचार करणारी असल्याने तिने ह्याकडे कानाडोळा केला. पण आज बारा वर्ष होत आली आणि ही गोष्ट अधेमधे आठवत असायची.पण सध्या लॉकडाऊनच्या काळात का कुणास ठाऊक माहीती नाही पण सकाळी उठल्या उठल्या प्रातर्विधी उरकतानाच एकदा तरी आठवत राहते(त्या दृष्टीने प्रातःस्मरणीयच) आणि मनस्थिती लगेच बदलते. थोडक्यात प्रेमभंग झालेल्या प्रेमीसारखी मनस्थिती होते.(!) थोडा बारीक विचार केला असता लक्षात आले कि माझा जो काही पाणउतारा केला तो एकवेळ मी विसरलो असतो पण पत्नीचा केलेला पाणउतारा विसरणे अवघड वाटतेय. ह्याबाबतीत खुद्द पत्नीलाच विचारले असता तिने सांगितले कि अश्या गोष्टींचा ती जास्त विचार करत नाही. ती स्वतः दिल्लीत राहीली आहे आणि अश्या गोष्टी आधीही अनुभवल्या आहेत.ते ही असो पण ह्या गोष्टीनंतर गोड बोलणार्या कुठल्याही व्यक्तीवर पटकन विश्वास बसत नाही. लगेच अँटीना चालु होतो कि काहीतरी उद्देश अस्णार. पण अश्या मनस्वास्थ्य बिघडवणार्या आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?

वाचने 99649
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

ज्या प्रकारे वादविवाद सुरू झाले आहेत त्यानुसार आता इतकीच अपेक्षा आहे की धागालेखकाला "हा धागा लिहिला, हिच आणखी एक त्रासदायक आठवण ना ठरो" :D

सर्व अवांतर --
"क्षच्या बाळाने (वय वर्ष १.५) अशी नक्की काय चूक केली असेल कि त्याला त्याच घर मिळालं? त्यालासुद्धा एखाद छान घर का नाही मिळालं?जगातल्या कुठल्याही बाळाला त्याची कुठलीही चूक नसताना वाईट घरात का जन्म मिळतो?" मला तरी या प्रश्नाचं पुनर्जम्नशिवाय कुठलाही पटेल असं उत्तर मिळालेलं नाहीये. तुम्हाला मिळालं तर नक्की ऐकायला आवडेल.
याच धरती वर, धागाकर्त्याला ती घर मालकीण मिळाली कारण त्याचे पूर्वजन्माचे पाप असे म्हणायचे आहे का मग? कदाचीत तो पण त्या शेगुप्ता येव्हडाच किंवा त्याहून भयंकर होता त्या जन्मात, असेच का? ----------- बाकी कालवड गोठ्यात.. चिमणी घरट्यात.. तशी माणसे घरात जन्मतात.. यात पूर्वजन्म आणला तर.. X बाई जिचा नवरा दारुडा Y असतो ह्यांना जो Z मुलगा होणार असतो, त्याचे पूर्वजन्म पाप त्याला असल्या घरात आणते असे म्हंटल्यावर, त्या Z ला तेथे जन्म घेता यावा म्हणुन X आणि Y चा लग्न आणि संभोग घडून आला असे म्हणायचे का मग? हे म्हणजे कैद्या साठी जेल तयार केले गेले असे झाले मग.. ---- पूर्वजन्म असला तरी असल्या भंकस गोष्टी जन्मा जन्मा पासून जोडलेल्या नसल्याच पाहिजेत.. आणि असे असेल तर.. मी तुम्हाला रिप्लाय दिला आहे.. कारण गेल्या जन्मात तुम्ही मला असाच अवांतर टाईप कुठेतरी.. वेगळ्या स्वरूपात असा रिप्लाय दिला होता म्हणुन त्याची हि परतफेड समजावी... आणि या वर रिप्लाय पुढच्या जन्मात करावा.. आता काही घाई नाही..

संक्षीसर,वीणा३,गण्या,मोदक,कंजुस सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ही घटना १२ वर्षांपूर्वीची आहे .अन्यथा घरमालकाकडुन त्याला दिलेली अनामत रक्कम परत कशी मिळवावी? असा धागा काढावा लागला असता.
इतकी रक्कम देण्यापूर्वी तिथल्या भाडेकऱ्यांना त्यांचा अनुभव विचारला असता तर एका झटक्यात मालकीणीची महती कळली असती !
विचारले होते.पण सगळे एका नौकेचे प्रवासी.त्यामुळे तिथे त्यावेळी असलेला भाडेकरु उघड उघड बोलला नाही. पण कशी आहे म्हटल्यावर उपहासात्मक हास्य आले होते त्याच्या चेहर्यावर. जो सोडुन जाणार होता व ज्याच्या खाली केलेल्या फ्लॅटमध्ये मी राहणार होतो त्याने तिच्याबद्दल पॉझिटिवच सांगितले. त्याची अनामत रक्कम अडकली होती व नवा भाडेकरु मिळवुन देवुन त्याची अनामत रक्कम त्याला लवकर मिळाली असती. हाच प्रकार घर सोडताना माझ्याबाबतीत झाला. अनामत रक्कम अडकली असल्याने मी उघड उघड चालाक औरत है असे म्हणु शकत नव्हतो.(सुदैवाने कुणी तसा प्रशन विचारला नाही.कदाचित येणारा भाडेकरु माझ्यापेक्षा नवखा असावा.) अनामत रक्कम परत मिळाली पण काटछाट करुन ज्याची तशी काही गरज नव्हती. धाग्याचा उद्देश फक्त ह्या अनुभवाच्या आठवणीसंबंधी नसून अश्या प्रकारच्या मनःशांती बिघडवणार्या अशा प्रकारच्या अनुभवांपासुन सुटका कशी करुन घ्यायची असा आहे. आतापर्यंतच्या चर्चेमधुन तर झाले गेले त्याबद्दल आपण काही करु शकत नाही व समोरच्याला व स्वतःला माफ करायला हवे ह्या निष्कर्षाप्रत आलो आहे. हे आधीही माहीती होतेच. "कधीतरी स्वतःला माफ करायला हवे" हे संदीप खरेने उगाच म्हटलेले नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

शरीरशास्त्रात ज्याप्रमाणे कोणतंही औषध कोणत्याही व्याधीवर चालत नाही त्याचप्रमाणे मानसशास्त्रात ठराविक नियमच ठराविक मानसिकतेवर काम करतात. > कधीतरी स्वतःला माफ करायला हवे हा नियम तुम्ही शगुफ्ताला छळलं असतं आणि ती हयात नसल्यानं, आता परिमार्जनाचा कोणताही मार्ग उरला नसता, तर त्या अपराधभावनेतून मुक्त व्हायला होईल. पण लिखित केसमधे मोहमुक्तीचा नियम वापरायला हवा. त्यानं व्यक्ती अनुभवसमृद्ध होते, आणि पुन्हा माणूस ओळखतांना सजगता राहते. ____________________________________ इथे कुणी, काहीही वकूब नसतांना उपहासात्मक कमेंटस करणे. मानसशास्त्राचा शून्य अभ्यास असतांना विषय भरकटवणे. फालतू शाब्दिक चुका काढणे.... वगैरे चालू करत असेल तर त्याला बेदखल करणं योग्य राहील. नाही तर एका चांगल्या आणि सर्वोपयोगी विषयाचा नाहक चोथा होईल. प्रसंगी मुखभंग करणं ही उचित ठरतं अन्यथा असे सदस्य फुकटची वकीलपत्रं घेणं, कुणीही विचारत नसतांना मधेच असंबंद्ध कमेंटस मारणं... असे धंदे करुन स्वतःचं उपद्रव मूल्य वाढवत बसतात.

In reply to by संजय क्षीरसागर

..मोहमुक्तीचा..
संक्षीसर तो मोह नव्हता. मोह म्हणजे गरज नसणार्या गोष्टीचा हव्यास करणे. पण इथे घर घेणे ही माझी गरज होती. आणि ते निवडण्याचे बरेच निकष होते. ह्याला चोखंदळपणा म्हणु शकतो. वर म्हटल्याप्रमाणे अश्या पध्दतीत अगदी फुल्ल फ्रुफ्फ निर्णय घेणे अवघड असते. साधारण त्या वेळी योग्य वाटलेल्या निकषांचा आधार घेऊन निर्णय घेणे गरजेचे होते आणि तो घेतला. आणि अक्कलखाती एक अनुभवही जमा झाला . म्हणजे नंतरच्या घरमालकासोबततरी अशी समस्या येऊ दिली नाही.
हा नियम तुम्ही शगुफ्ताला छळलं असतं आणि ती हयात नसल्यानं,
शगुफ्ता इथे महत्वाची नाही. इथे भूतकाळात झालेल्या एका गोष्टीमुळे मी स्वतःच स्वतःला छळतोय. माझी सध्याची मनःस्थिती शगुफ्ताला जरी समजली तरी तिला झाट फरक पडणार नाही. त्यामूळे इथे मीच माझ्याबाबतीत काहीतरी करायला हवे आणि तेच मी करण्याचा प्रयत्न करतोय.

In reply to by कानडाऊ योगेशु

@ कानडाऊ योगेशु, तुम्ही अगदी महत्वाच्या विषयाला हात घातला आहे. मी माझे उत्तर शब्दब्ध्द करतो आहे. त्याचबरोबर त्याबाबतचे तर्क पण लिहायचा विचार करत असल्याने वेळ लागतोय. आणखी एकाने पण रिक्वेस्ट केली आहे. त्यामुळे जनरलाईज करून उत्तर तयार करतोय. उद्यापर्यंत पाठवायचे ठरवतोय. बघू कसं जमतांय ते.

In reply to by कानडाऊ योगेशु

> हव्यास करणे हा प्रतिसाद, निर्णयामागची, मानसिक प्रक्रिया उलगडावी यासाठी आहे तुम्ही व्यक्तिगत घेणार नाही अशी अपेक्षा करतो. ___________________________ तुमच्या निकडीबद्दल वाद नाही. पण मोह म्हणजे स्वप्नरंजनामुळे तारतम्य हरवणे ! एक मोठी रक्कम देतांना आपल्याला तिथे रहात असलेल्यांचं सांगणं, फारसं मनावर घ्यावसं वाटत नाही, ज्याची जागा आपण घेणार, त्याचे पैसे अडकल्यामुळे, त्यानी दिलेला पॉजिटीव फिडबॅक, आपल्या कामाचा नाही, याकडे दुर्लक्ष होणं आणि सगळ्याची परिणीती म्हणजे फसगत होणं ही मोहाची किमया आहे. आणि मोहाचं वैशिष्ठ्य असं की तो कायम दुसर्‍यानी फसवलं असाच स्टँड घेतो ! ____________________________________ आजपर्यंत कोणत्याही निर्णयात माझी फसगत झाल्याचं स्मरत नाही पण कधी झाली तर मी त्या व्यक्तीचे पहिल्यांदा अभार मानीन, कारण तीनं मला माझ्या निर्णयप्रक्रियेतली खोट दाखवली, माझ्या दृष्टीकोनातून जो सुटला होता, असा माणूस ओळखण्याचा आणखी एक नवा पैलू दाखवला. थोडक्यात, त्या घटनेचा एक वाईट आठवण असा ठसा मनात कधीही उमटणार नाही. _________________________________ बघा विचार करुन.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही व्यक्तिगत घेणार नाही अशी अपेक्षा करतो.
चर्चेतुन व इतरांच्या अनुभवातुन बरेच काही नव्याने कळते आहे.त्यामुळे व्यक्तिगत घेण्याच्या प्रश्नच येत नाही.
माणूस ओळखण्याचा आणखी एक नवा पैलू दाखवला.
येस्स. लेखातच लिहिण्याप्रमाणे गोड बोलणार्या कुणावरही रादर कुणावरही आता सहजगत्या विश्वास ठेवु शकत नाही.प्रत्येक व्यक्तीकडे सेन्स ऑफ डाऊट ने पाहणे गरजेचे असते हे परिणामकारकरित्या समजले.(धडा मिळाला.!)

In reply to by कानडाऊ योगेशु

मी दुसर्‍यावर कायम विश्वास टाकतो ! पण त्याच्या सचोटीची पूर्ण खात्री होईपर्यंत त्याच्या बोलण्या आणि वागण्यातली एकवाक्यता क्रॉस-चेक करत राहतो ! मग माणूस ओळखण्यात चूक होत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

@ संपादक मंडळ इथला प्रतिसाद वैयक्तिक वाटतो आहे म्हणून उडाला असेल तर वैयक्तिक कमेंट असणारा वरचा प्रतिसाद संपादित होणे आवश्यक वाटत नाही का..?

हा संवेदनशील व्यक्तींचा प्रातिनिधिक प्रश्न आहे. जेवढ विसरण्याचा प्रयत्न कराल तेवढे ते उफाळून येते. जखम बरी न होणार्‍या अश्वत्थामा सारख्या या कटु स्मृती त्रास देतात. शब्द हे शस्त्र असते. जपून वापरावे म्हणतात ते यामुळेच. काळानुसार तीव्रता कमी होत जाते. शिवाय काही जाणीवपुर्वक प्रयत्न करावे लागतात. काही वर्षांनी काही निमित्ताने ती व्यक्ती अनपेक्षितपणे दिसल्यास पुन्हा उफाळून येतात कटुस्मृती. बेफिकिर बनण्याचा प्रयत्न करा. शिवाय तुम्ही कोणाला त्रास दिला नाहीये ही मोठी जमेची बाजू आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

> प्रातिनिधिक प्रश्न आहे. काही प्रमाणात बरोबरे पण मुळात हा मनाच्या संयोजनाचा प्रश्न आहे खरं तर संवेदनाशील व्यक्ती हा गुण मानला गेला असला तरी, अशा व्यक्तीला भावनांचं संयोजन करता येत नाही ही बेसिक मेख असते !

In reply to by प्रकाश घाटपांडे

पटतेय घाटपांडे सर.! जास्त विचार करु जाता असे जाणवले कि सगळ्याच्या मुळाशी गोष्टी स्वतःच्या मनासारख्या न झाल्या तर ते सहजासहजी न स्वीकारता येण्याची मानसिकता आहे. म्हणजेच बाह्य गोष्टींवर जास्तच अपेक्षा ठेवण्याचा आहे. प्रत्येक रिलेशन (वस्तुंसोबत,व्यक्तींसोबत) मध्ये जर प्रथमपासुनच गोष्टी स्वतःच्या मनाविरुध्द जाऊ शकतात असे मान्य केले तर पुढे होणारा त्रास वाचु शकतो.
शिवाय तुम्ही कोणाला त्रास दिला नाहीये ही मोठी जमेची बाजू आहे
बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय। ह्यापेक्षा जास्त काय बोलु! नेहेमीप्रमाणेच चांगल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.!

एखाद्या त्रासदायक आठवणीला स्वतःच हास्यास्पद ठरवता येऊ शकते का यावर विचार करावा, असा सल्ला देऊ शकतो खरं तर. पण जर आठवण इतकी त्रासदायक असेल तर त्याचा कितपत उपयोग होईल हे नक्की सांगू शकत नाही. अर्थात् प्रयोग करून बघायला हरकत नाही. उदा: माझी एक अशीच आठवण ज्याचा फार त्रास व्हायचा अगोदर - ते मी स्वतःच माझी कशी फजिती झाली होती हे हसत हसत माझ्या मित्राजवळ बोलून मन मोकळं केलं. त्यानंतर जेव्हा त्या आठवणीनं पुन्हा डोकं वर काढलं, त्यावेळी तेवढा त्रास झाला नाही, कारण माझे आणि माझ्या मित्राचे त्यावरचे हसणे जास्त लक्षात राहिले होते. असाच प्रयोग नंतर आणिकही काही वेळेस केला तेव्हा तसा त्रास कमी होत गेला. माझ्या लक्षात आलेली गोष्ट ती ही - आपण स्वतःच आपल्या आनंदाला जास्त महत्त्व देत नाही. दु:खाला देतो. हे मी एका धाग्यात मांडले होते, असे स्वतःच्याच धाग्याचा पुरस्कार करण्याचा दोष पत्करून सांगू इच्छितो. :-) जर त्यातून काही उपयोगाचं मिळत असेल तर जरूर बघावं. शुभेच्छा.

In reply to by राघव

धागा वाचला. लिहिलेले आवडले. थोडक्यात हर फिक्र को धुए मे उडाता चला गया असा अ‍ॅटिट्युड नक्कीच काम करतो.
आपण स्वतःच आपल्या आनंदाला जास्त महत्त्व देत नाही. दु:खाला देतो.
माणसाला दु:ख कुरवाळत बसायला आवडते. विशेषतः ते जुने असेल तर अजुनच. म्हणुनच समदु:खी हा शब्दप्रयोग वापरला जातो समसुखी असा शब्द मी अजुन वाचला नाहीये.

...................अस होते कधी कधी ! माझा मात्र बन्गलोरच्या घरमालकाचा अनुभव अतिशय चांगला आहे - के एन एन गुप्ता - इन्दिरानगर ( होटेल सन्गीत चे मालक ) मी एकूण ८ वर्षे या एकाच घरात रहिलो .. दोघे ही अतिशय सालस .. पक्का शेट्टी .. पण माझ्याशी व्यवहार अतिशय प्रेमळ .. बायको माहेरी आली की मी जेवायला त्यान्च्याकडे असे ! माझ्या मुलासाठी या शेट्टीने सोन्याची अन्गठी केली होती .. दोघे नवरा - बायको आमचे खूप लाड करायचे .. मुलाला त्याण्च्याकडे ठेऊन आम्ही बाहेर जायचो ... त्यान्च्यामुळे मुलगा तेलगु , कानडी आणि थोडे तमिळ पन शिकला ! मी घर बान्धायला सुरुवात केल्यावर या गृहस्थाने जवळ जवळ सहा महीने अगोदर , मी त्यान्च्याच घरात रहात असताना , दिपोझित चे पैसे परत दिले ... बान्धकामाला लागतील म्हणून ! मी माझ्या स्वत्;च्या घरी फार काळ राहू शकलो नाही .. मी घर मालक झाल्यावर माझ्या समोर हा आदर्श होता ! दोन वर्शापूर्वी ते आमच्याकडे पुण्याला येऊन गेले , आम्ही त्यान्च्यासोबत शिरडीला जाऊन आलो , आजही तगडा सम्पर्क आहे .. नातेवाईक असल्यासारखा ! हा निव्वळ प्राक्तानाचा भाग आहे ! .. आपले प्राक्तन आपण सहज स्वीकारले तर त्रास कमी होतो ! "..हे असं कसं झाले .." या प्रश्नाला काडीचा अर्थ नाही .. हे असेच होणार होते म्हणून असे झाले .. हे स्वीकारून पुढे चालणे महत्वाचे ! मना त्वाचि रे पूर्व सन्चित केले | तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ! सहज स्वीकारा .. म्हणजे त्रास कमी होईल ..अर्थात हे सान्गायला फार सोपे आहे ! जेव्हा असा एखादा त्रास होतो त्यवेळी आपले कर्ज फिटत असते. कर्ज फिट्त असेल तर दु: ख व्हावे का आनन्द?

In reply to by विटेकर

छान समजावून सांगितले आहे. पण... कळतं पण वळत नाही हाच सर्वसामान्यांचा अनुभव असतो. कारण असे विचार इतके झटकन मनात घुसतात की, स्वत:ला भरपूर त्रास करून घेतल्यावरच, सगळं कळलेलं एक एक करून आठवायला लागतं. :)

In reply to by विटेकर

हेवा वाटण्याजोगा अनुभव आहे तुमचा विटेकरसाहेब!
जेव्हा असा एखादा त्रास होतो त्यवेळी आपले कर्ज फिटत असते. कर्ज फिट्त असेल तर दु: ख व्हावे का आनन्द?
१००% पटले. विचारांवर उपाय विचारांनीच करावा लागतो आणि असे दृष्टीकोन माहित करुन घेण्यासाठीच इथे धागा काढला होता. सद्गुरु जग्गी वासुदेव म्हणतात त्याप्रमाणे जे काही घडते ते सर्व आपल्या आत घडते त्यामुळे प्रॉब्लेम ही आत असेल तर उत्तर ही आतुनच मिळायला हवे.
मना त्वाचि रे पूर्व सन्चित केले | तयासारिखे भोगणे प्राप्त झाले !
ओळी समोर लिहिलेल्या असतात. हजारदा वाचलेल्या असतात पण अर्थ असा सहजासहजी भिनत नाही. आता प्रचिती येतेय. प्रतिसादाबद्दल धन्य्वाद.

In reply to by विटेकर

विटेकरजींनी थोडक्यात आणि सहज पटण्यासारखे स्पष्टीकरण दिलेले आहे. धन्यु.

In reply to by विटेकर

भारी अनुभव. मना त्वाचि रे पूर्व सन्चित केले | तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ! वाह..! __/\__

In reply to by विटेकर

> तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ! या पूर्वसंचिताचा डेटा नक्की कुठे स्टोअर केलेला असतो आणि त्याची डे-टू-डे मॅनेजमंट कोण करतं ? त्या मॅनचा पत्ता कळू शकेल का ? म्हणजे त्याच्याशी संधान बांधून पूर्वसंचितात, लोकांना किमान उर्वरित आयुष्यात तरी बदल घडवून आणता येतील ! त्या डेटा मॅनेज करणार्‍याच्या पूर्व संचिताचं काय ? त्याच्यावर कुणाचा कंट्रोल असतो ?

In reply to by संजय क्षीरसागर

तुमच्या "स्मृती स्ट्रींग्ज" च्या थियरीसारखीच ही पण एक थियरी आहे. ती आज सिद्ध करता येत नाही किंवा तुम्ही मागत आहात ते पुरावे उपलब्ध नाहीत. तुम्ही जशी "स्मृती स्ट्रींग्ज" थियरी मानता तसंच काही लोक हा कर्मविपाक सिद्धांत मानतात. अर्थात विटेकर काका तुम्हाला काय उत्तर देतात हे वाचणं रोचक ठरेल.

In reply to by सतिश गावडे

> तसंच काही लोक हा कर्मविपाक सिद्धांत मानतात. या मुद्द्यावर मी चर्चेला तयार आहे पण तुम्ही मात्र (त्या क्षेत्रात असून) बेसिक गोष्टींचं उत्तर देत नाही : १. नवजात अर्भकाच्या मेंदूनामक बायो- हार्डडिस्कवर कोणताही डेटा नसतो ही वस्तुस्थिती आहे. २. तस्मात, जवळजवळ कोणत्याही अर्भकाला काहीही पूर्वस्मृती नसते. त्याला प्रत्येक गोष्ट नव्यानं शिकायला लागते. ३. ज्या अपवादात्मक बालकाला अशी स्मृती जागृत होते, त्याच्या मेंदूवर तो डेटा डायरेक्ट बाहेरुन कॉपी/पेस्ट व्हायला हवा. ४. थोडक्यात, एखाद्या मृत व्यक्तीच्या अनफॉरमॅटेड "स्मृती स्ट्रींग्ज" तिथे पेस्ट झाल्याशिवाय त्यांचं रिट्रीवल अशक्य आहे. ५. अशाप्रकारे पुनर्जन्म ही अपवादात्मक परिस्थितीत, मृत व्यक्तीच्या अनफॉरमॅटेड "स्मृती स्ट्रींग्ज", नवजात अर्भकाच्या मेंदूत पेस्ट होण्याची केस आहे. त्यापलिकडे पुनर्जन्म या कल्पनेला काहीही अर्थ नाही. ६. तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे याविषयावर झालेल्या संशोधनाचा सारांश तुम्ही दिलात (लिंक नको), तर त्याची शहानिशा होईल. ________________________________________ > अर्थात विटेकर काका तुम्हाला काय उत्तर देतात हे वाचणं रोचक ठरेल. त्यांचाकडे समर्थांच्या श्लोकाशिवाय इतर पुरावा नाही कारण हा प्रष्ण त्यांना मागे विचारुन झालायं ______________________________ मानशास्त्राचे गाढे अभ्यासक `मोदक' यांनी मात्र लाल रंगात समर्थांचा श्लोक क्वोट करुन त्याखाली नमस्कार केला आहे. ते आपले ज्ञानदीप इथे पेटवून पुनर्जन्माविषयी आपल्या अभ्यासाची माहिती सांगणार आहेत. आणि त्याच बरोबर हे सप्रमाण सिद्ध करणार आहेत की आपले प्रतिसाद धागा भरकटवण्यासाठी नसून या संकेतस्थळाला आपलं अमूल्य योगदान देण्यासाठी असतात.

In reply to by संजय क्षीरसागर

पण तुम्ही मात्र (त्या क्षेत्रात असून) बेसिक गोष्टींचं उत्तर देत नाही :
मेंदू हा बायो- हार्ड डीस्क आहे हे तुमचं गृहीतक आहे. मला हार्ड डिस्क कशी चालते हे माहीती आहे, मेंदू कसा चालतो मला असलेलं ज्ञान नगण्य आहे. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हीही मेंदू विषयातील तज्ञ नाही. त्यामुळे तुमच्या या गृहीतकाला "तुमचं वाचनातून तयार झालेलं वैयक्तीक मत" इतकाच अर्थ आहे.
१. नवजात अर्भकाच्या मेंदूनामक बायो- हार्डडिस्कवर कोणताही डेटा नसतो ही वस्तुस्थिती आहे. २. तस्मात, जवळजवळ कोणत्याही अर्भकाला काहीही पूर्वस्मृती नसते. त्याला प्रत्येक गोष्ट नव्यानं शिकायला लागते. ३. ज्या अपवादात्मक बालकाला अशी स्मृती जागृत होते, त्याच्या मेंदूवर तो डेटा डायरेक्ट बाहेरुन कॉपी/पेस्ट व्हायला हवा. ४. थोडक्यात, एखाद्या मृत व्यक्तीच्या अनफॉरमॅटेड "स्मृती स्ट्रींग्ज" तिथे पेस्ट झाल्याशिवाय त्यांचं रिट्रीवल अशक्य आहे. ५. अशाप्रकारे पुनर्जन्म ही अपवादात्मक परिस्थितीत, मृत व्यक्तीच्या अनफॉरमॅटेड "स्मृती स्ट्रींग्ज", नवजात अर्भकाच्या मेंदूत पेस्ट होण्याची केस आहे. त्यापलिकडे पुनर्जन्म या कल्पनेला काहीही अर्थ नाही.
या मुद्द्यांना कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. केवळ तुमची वैयक्तीक मतं आहेत ही. तुमचे हे मुद्दे आणि "जर सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचा निर्माता आहे तर सृष्टीचाही निर्माता असायला हवा" किंवा "एक मुल श्रीमंताघरी जन्माला येते आणि दुसरे गरीबाघरी. पूर्वसंचिताशिवाय असा भेदभाव कसा होईल?" अशा स्वरुपाची विधाने यात अक्षरशः काहीही फरक नाही. सारा मानण्याचा किंवा न मानण्याचा खेळ आहे. तुमच्यासाठी ही "स्मृती स्ट्रींग्ज" थियरी खरी आहे तितकाच खरा कर्मविपाक सिद्धांत तो मानणार्‍यांसाठी आहे. हे तुम्हाला मान्य नसेल तर तुमच्या विधानांच्या समर्थनार्थ पुरावे द्या. कुणी संशोधन केले, कोणत्या शोधनिबंधात प्रसिद्ध झाले, त्यांचा पियर रिव्ह्यू कुणी केला? "स्मृती स्ट्रींग्ज" सर्व प्रथम कुणी आणि कोणत्या यंत्रातून पाहील्या? आता जर पाहायच्या असतील तर कशा पाहता येतील? वगैरे.
६. तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे याविषयावर झालेल्या संशोधनाचा सारांश तुम्ही दिलात (लिंक नको), तर त्याची शहानिशा होईल.
डॉ इयान स्तीव्हन्सन यांचे काम संशोधन म्हणण्यापेक्षा व्हेरीफिकेशन अँड डोक्युमेंटेशन स्वरुपाचे म्हणता येईल. ते आणि त्यांचे सहकारी मागचा जन्म आठवत असल्याचा दावा करणार्‍या मुलांना, त्यांच्या कुटुंबियांना भेट देत, त्यांच्या दाव्यांची, ते सांगत असलेल्या गतजन्मीच्या आठवणींची नोंद करत, या आठवणीतील माहितीवरुन मागील जन्मातील ठिकाणं आणि माणसं शोधण्याचा प्रयत्न करत. अशी मिळती जुळती ठिकाणं आणि माणसं सापडल्यास दावा करणार्‍या मुलाने सांगितलेल्या माहीतीतील किती माहिती जुळते याचा ताळा करीत आणि ते आपल्या शोधनिबंधातून मांडत. यातील बर्‍याचशा केसेस मधील बरीचशी माहिती जुळत असे. हे फार मोघम विधान आहे याची मला कल्पना आहे. मी हे सारे जवळपास सात आठ वर्षांपूर्वी वाचले होते. आता मुद्देसुद आठवत नाही. ज्यांना अधिक जाणून घेण्याची ईच्छा आहे त्यांनी डॉ इयान स्टिव्हन्सन यांचे लेखन वाचावे. मात्र या नोंदीतून काही गोष्टी ठ़ळकपणे समान होत्या. त्या म्हणजे: १. पुनर्जन्माच्या आठवणी मुलांना वयाच्या सहा सात वर्षांपर्यंत आठवत असत. त्यानंतर मुलांना गतजन्मीच्या आठवनींचा विसर पडत असे. २. गतजन्मीच्या आठवनी आठवणार्‍या बहुतांश मुलांचा मागील जन्मातील मृत्यू अपघाती किंवा घातपाती झालेला असे. ३. मृत्यूच्या वेळी घातपातात किंवा अपघातात शरीराच्या एखाद्या अवयवावर ईजा झालेली असल्यास त्याची खूण या जन्मी शरीरावर दिसत असे ४. दुसरा जन्म घेताना लिंगबदल शक्य असे. या सार्‍या नोंदी पुनर्जन्माच्या सुचक आहेत असे माझे मत आहे. पुनर्जन्म असतोच असा माझा दावा नाही.

In reply to by सतिश गावडे

> हे माहीती आहे स्टोरेज > रिट्रीवल > प्रोसेसिंग > अप्लिकेशन या कंप्युटर आणि मेंदूच्या कार्यप्रणालीत नेमका काय फरक आहे ? उदा. एखादी व्यक्ती समोर आल्यावर मेंदू स्मृतीतून स्टोअर्ड डेटा अक्सेस करून प्रोसेस करतो आणि आपल्याला सांगतो की हा सगा ! कंप्युटर या वेगळं काय करतो ?

In reply to by संजय क्षीरसागर

म्हणजे तुमचे म्हणणे देखील तर्कावर आधारीत मत आहे. त्याला तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा वैज्ञानिक पुरावा नाही. कर्मविपाक सिद्धांतही असेच तर्कावर तयार झालेले मत आहे पूर्वसंचित चांगले - हा जन्म चांगला जाईल पूर्वसंचित वाईट - हा जन्म वाईट जाईल तस्मात तुमची स्मृती स्ट्रिंग्जची थियरी आणि विटेकर काकांनी मांडलेले पूर्वसंचिताविषयीचे मत या एकाच पातळीवरील वैयक्तिक धारणा आहेत. आणि एखादी व्यक्तीला आपण केलेल्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावा देता येत नाही नसेल तर तिला दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या तत्सम दाव्याचा पुरावा मागाण्याचा नैतिक अधिकार नाही असे माझे मत आहे ;)

In reply to by सतिश गावडे

सगा सर तराजूच्या कोणत्याही पारड्यात कधीच नसतात. ते नेहमी तराजूच्या मध्यभागी असलेल्या काट्यावर बसलेले असतात. _/\_

In reply to by सतिश गावडे

> त्याला तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा वैज्ञानिक पुरावा नाही ? मी विचारलंय : स्टोरेज > रिट्रीवल > प्रोसेसिंग > अप्लिकेशन या कंप्युटर आणि मेंदूच्या कार्यप्रणालीत नेमका काय फरक आहे ? उदा. एखादी व्यक्ती समोर आल्यावर मेंदू स्मृतीतून स्टोअर्ड डेटा अक्सेस करून प्रोसेस करतो आणि आपल्याला सांगतो की हा सगा ! कंप्युटर या वेगळं काय करतो ? मेंदू बायो-कंप्युटर आहे हा माझा तर्क नाही, ते विधान आहे. आणि तुम्हाला वर विचारलेला प्रष्ण ते सिद्ध करतं. त्यासाठी कोणत्याही वेगळ्या लिंकची किंवा संशोधनाची गरज नाही. __________________________________ शिवाय एआय (आर्टीफिशिअल इंटेलिजन्स) हा मनाचीच प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न नाही तर वेगळं काय आहे ? रोबोटिक्स काय आहे ? तुम्हाला कंप्युटर हा मनाच्या प्रणालींचा वेध घेऊन त्याचं काम सोपं करण्याचा आणि प्रसंगी मनाला रिप्लेस करण्याचा प्रयत्न आहे याची कल्पना नाही का ? थोडक्यात, मन हा सर्वात अ‍ॅडवान्सड बायोकंप्युटर आहे ही उघड गोष्ट आहे. _____________________________________________ आता तुमच्या त्या क्षेत्रातल्या ज्ञाननं कर्मविपाक सिद्धांताची उकल करा : १. जगाची लोकसंख्या ७८० कोटी आहे. २. या ७८० कोटी लोकांच्या सर्व कृत्यांचा डेटा प्रत्येक दिवशी किती होईल ? ३. कर्मविपाक वॅलीड होण्यासाठी असा नक्की किती पूर्वजन्मांचा डेटा लागेल ? ४. हा सर्व डेटा नैतिक मूल्यांवर कसा सॉर्ट केला जातो ? उदा. वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवणं हा अतिरेक्यांच्या दृष्टीनं स्वर्गप्राप्तीचा रस्ता आहे पण जगाच्या दृष्टीनं ते सर्वोच्च पाप आहे. तर याचा निवाडा करणारी सिस्टम जगात कोणता माईचा लाल बनवतो ? ५. हा ७८० कोटी लोकांचा (तुम्ही सांगाल तितक्या जन्मांचा) डेटा नक्की कुठे स्टोअर केला आहे ? ६. हा सर्व डेटा हरेक क्षणी प्रोसेस करुन, प्रत्येकाचं विधीलिखित ठरवणारी यंत्रणा नक्की कशी काम करते ? त्या क्षेत्रात काम करत असूनही तुम्हाला यातल्या एकाही प्रष्णाचं उत्तर देता येणार नाही. आता तुमच्या कर्मविपाक सिद्धांताला काय आधार आहे ?

In reply to by संजय क्षीरसागर

आता तुमच्या कर्मविपाक सिद्धांताला काय आधार आहे ?
संक्षी, मी स्वत:च कर्मविपाक सिद्धांत मानत नाही हो. मी म्हणतोय की कर्मविपाक सिद्धांत आणि तुम्ही मांडलेली "स्मृती स्ट्रींग्ज अंतराळात निसटतात, त्यातील काही नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरतात" ही स्ट्रींग्ज थियरी या दोन्ही गोष्टी तर्कावर आधारीत असून त्यांना कोणताही आधार नाही. आता तुमच्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरे नसल्याने तुम्ही मलाच कर्मविपाक सिद्धांताला काय आधार आहे विचारत आहात, जो मी मानतच नाही. :) ते कॉम्प्युटर, हार्डडिस्क, स्टोरेज, रिट्रीवल, प्रोसेसिंग, अप्लिकेशन आणि एआय हे सारं बाजूला ठेवा आणि तुम्ही जे विधान केलंय "स्मृती स्ट्रींग्ज अंतराळात निसटतात, त्यातील काही नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरतात" त्याच्या अनुषंगाने या मुद्द्यांवर बोला: तुम्ही जे विधान केलंय त्याच्या समर्थनार्थ तुमच्याकडे काही शास्त्रीय पुरावे आहेत का? यावर कुणी संशोधन केले, कोणत्या शोधनिबंधात प्रसिद्ध झाले, त्यांचा पियर रिव्ह्यू कुणी केला? "स्मृती स्ट्रींग्ज" सर्व प्रथम कुणी आणि कोणत्या यंत्रातून पाहील्या? आता जर पाहायच्या असतील तर कशा पाहता येतील? त्या स्मृती स्ट्रींग्ज नेहमीच अंतराळात निसटतात आणि नवजात अर्भकाच्या मेंदुत शिरतात की काही अपवादात्मक परीस्थितीत होते? हे कसे तपासता येते. आता फक्त या आणि याच प्रश्नांची उत्तरे द्या कुठलीही संगण़क विषयक संकल्पना मध्ये न आणता. संगणकाशी तुम्ही दाखवू पाहत असलेले साम्य हा केवळ तुमचा तर्क आहे. तो शास्त्रीय पुरावा नाही. :)

In reply to by सतिश गावडे

साम्य हा केवळ तुमचा तर्क आहे ? तुम्हाला मुद्दा कळतो का पाहा : १. जर मेंदू हा बायोकंप्युटर आहे हेच तुम्हाला मान्य नसेल तर मेमरी स्ट्रींग्ज हा डेटा आहे हे सुद्धा मान्य होणार नाही आणि चर्चा पुढे सरकणार नाही. २. तस्मात, तुम्ही कंप्युटर काय आहे ते सांगा ३. कर्मविपाक सिद्धांत तुम्ही डेटा स्टोरेज आणि प्रोसेसिंग या अँगलनं पाहू शकत असाल तर मी मांडलेल्या मुद्यांवर तो फेल जात नाही का ? हे संगणकतज्ञ म्हणून सांगा.

In reply to by संजय क्षीरसागर

तुमचा दावा: स्मृती स्ट्रींग्ज अंतराळात निसटतात, त्यातील काही नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरतात मी तुमच्या दाव्याच्या संदर्भात विचारलेले प्रश्नः तुम्ही जे विधान केलंय त्याच्या समर्थनार्थ तुमच्याकडे काही शास्त्रीय पुरावे आहेत का? यावर कुणी संशोधन केले, कोणत्या शोधनिबंधात प्रसिद्ध झाले, त्यांचा पियर रिव्ह्यू कुणी केला? "स्मृती स्ट्रींग्ज" सर्व प्रथम कुणी आणि कोणत्या यंत्रातून पाहील्या? आता जर पाहायच्या असतील तर कशा पाहता येतील? त्या स्मृती स्ट्रींग्ज नेहमीच अंतराळात निसटतात आणि नवजात अर्भकाच्या मेंदुत शिरतात की काही अपवादात्मक परीस्थितीत होते? हे कसे तपासता येते. तुमच्याकडे माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर नाही. थांबतो आता. :)

In reply to by सतिश गावडे

उलट आहे ! तुम्हाला कंप्युटर काय आहे या साध्या प्रष्णाचं उत्तर देता येत नाही ! ____________________________________ अ : हा कंप्युटर आहे बः तो तुमचा तर्क आहे ! अ: ठीके. मग कंप्युटर काय आहे ? बः तुम्ही ज्याला कंप्युटर म्हणता तो तुमचा तर्क आहे अ : पण मग तुमचा कंप्युटर म्हणजे नक्की काय आहे ? ब : तुमच्याकडे माझ्या प्रष्णाला उत्तर नाही ! ________________________________________ आता याचे दोनच अर्थ संभवतात : १. ब ला अशी भीती आहे की त्यानं कंप्युटर काय आहे याचं उत्तर दिलं तर अ ज्याला कंप्युटर म्हणतो तीच गोष्ट आपण सांगतोयं हे उघड होईल २. ब लाच कंप्युटर म्हणजे नक्की काय हे माहिती नाही ____________________________________________ वास्तविकात मला कोणतीही एक्सटर्नल लिंक द्यायची गरज नसते पण बरेच दिवस तुमची गाडीच पुढे सरकत नाहीये, त्यामुळे हे पाहा : Face It, Your Brain Is a Computer _The New York Times किमान तुमच्या विचारांना नवी दिशा तरी मिळेल.

In reply to by संजय क्षीरसागर

तुमचा दावा: स्मृती स्ट्रींग्ज अंतराळात निसटतात, त्यातील काही नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरतात माझा प्रश्नः तुम्ही जे विधान केलंय त्याच्या समर्थनार्थ तुमच्याकडे काही शास्त्रीय पुरावे आहेत का? तुमचे उत्तरः माझा प्रश्नः यावर कुणी संशोधन केले, कोणत्या शोधनिबंधात प्रसिद्ध झाले, त्यांचा पियर रिव्ह्यू कुणी केला? तुमचे उत्तरः माझा प्रश्नः "स्मृती स्ट्रींग्ज" सर्व प्रथम कुणी आणि कोणत्या यंत्रातून पाहील्या? आता जर पाहायच्या असतील तर कशा पाहता येतील? तुमचे उत्तरः माझा प्रश्नः त्या स्मृती स्ट्रींग्ज नेहमीच अंतराळात निसटतात आणि नवजात अर्भकाच्या मेंदुत शिरतात की काही अपवादात्मक परीस्थितीत होते? हे कसे तपासता येते. तुमचे उत्तरः तो कॉम्प्युटर सध्या बाजूला ठेवा आणि वरील प्रश्नांची उत्तरे द्या. :)

In reply to by सतिश गावडे

> आणि वरील प्रश्नांची उत्तरे द्या तुम्ही संगणक क्षेत्रात काम करत असाल तर एक साधी गोष्ट लक्षात यायला हवी : आधी कंप्युटर आहे आणि डेटा नंतर आहे ___________________________ आजपर्यंत तुम्ही मेंदू हा बायोकंप्युटर आहे हा माझा तर्क म्हणत होतात. आता लिंक दिल्यावर तुम्ही डेटावर जंप मारली ! प्रथम हे मान्य करा की मेंदू हा बायोकंप्युटर आहे कारण लिंक देऊनही तुम्हाला ते मान्य नसेल तर चर्चा पुढे नेण्यात अर्थ नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मी कुठेही आणि कसलीही जंप मारलेली नाही. मी माझे प्रश्न याच धाग्यावर मी तीन वेळा कॉपी पेस्ट केले आहेत. तुम्ही त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही ही वस्तूस्थिती आहे. तुम्ही दिलेली लिंक किंवा तुमचे "मेंदू हा बायोकंप्युटर आहे" हे विधान तुमच्या दाव्यासंदर्भातील माझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही. तुम्ही स्वत: अशास्त्रीय विधान करुन त्यासंबंधी विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता इतरांना त्यांची विधाने सिद्ध करायला सांगत आहात हा या धाग्यावर दिसणारा उघड विरोधाभास आहे.

In reply to by सतिश गावडे

> किंवा तुमचे "मेंदू हा बायोकंप्युटर आहे" हे विधान तुमच्या दाव्यासंदर्भातील माझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही. काय बोलता ? म्हणजे लिंक तुम्ही वाचलेलीच दिसत नाही ! वाचा : There is much that we don’t know about brains. But we do know that they aren’t magical. They are just exceptionally complex arrangements of matter. Airplanes may not fly like birds, but they are subject to the same forces of lift and drag. Likewise, there is no reason to think that brains are exempt from the laws of computation. If the heart is a biological pump, and the nose is a biological filter, the brain is a biological computer, a machine for processing information in lawful, systematic ways. The sooner we can figure out what kind of computer the brain is, the better. ____________________________ एकदा तुमचा कंप्युटरविषयी निर्णय झाला की डेटाविषयी बोलू किमान इतकं तरी लॉजिक तुम्हाला कळेल अशी अपेक्षा करतो शिवाय ही लिंक न्यूयॉर्क टाईम्सची आहे हे पुन्हा निदर्शनास आणून देतो.

In reply to by संजय क्षीरसागर

यात तुमच्या "स्मृती स्ट्रींग्ज अंतराळात निसटतात, त्यातील काही नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरतात" या विधानाशी संबंधीत एक शब्द तरी आहे का? :)

In reply to by सतिश गावडे

> त्यातील काही नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरतात" या विधानाशी संबंधीत एक शब्द तरी आहे का? तुमची शोधक वृत्ती दाद देण्याजोगी आहे. एक संगणकतज्ञ दिलेल्या लिंकच्या टायटलकडे दुर्लक्ष करुन त्या लेखात `स्मृती स्ट्रींग्जचा ' शोध घेतो हे सुद्धा तितकंच अपूर्व आहे. _____________________________________ तुमचा पहिला प्रतिसाद वाचा : " मेंदू हा बायो- हार्ड डीस्क आहे हे तुमचं गृहीतक आहे " आता त्या लिंकचं टायटल वाचा : Face It, Your Brain Is a Computer _The New York Times आणि आता तिथे शेवटी काय लिहीलंय ते पुन्हा वाचा : the brain is a biological computer, a machine for processing information in lawful, systematic ways. याचा अर्थ असा होतो की तुम्ही सुरुवात कुठून केली हे विसरलात. दुसरी गोष्ट इतकी वर्ष त्या क्षेत्रात काम करुन मेंदू हा बायो-कंप्युटर आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली नव्हती. आणि आता तुम्हाला, तुमचा पहिला मुद्दा खोटा ठरला हे मान्य करायला अडचणीचं ठरतंय. _________________________________ पण खरी गोची त्याच्यापुढे आहे एकदा मन हा बायो-कंप्युटर आहे हे मान्य केल्यावर स्मृती हा डेटा आहे ही उघड गोष्ट मान्य करायला लागेल. आणि चुकून (किंवा प्रामाणिकपणे) तुम्ही ते मान्य केलंत, तर केवळ एका प्रतिसादात मी `स्मृती स्ट्रींग्जचा' दावा सिद्ध करीन ____________________________ अर्थात, कंप्युटर आणि डेटा यातला फरक संगणकतज्ञाला कळत नाही हे उघडपणे मान्य करणं म्हणजे कंप्युटर एस्टॅब्लीश होण्यापूर्वी, चर्चा डेटाकडे वळवणं हे बहुदा तुमच्या लक्षात आलंय

आपण लिहिलेल्या त्रासदायक अनुभवामुळे सर्व वाचकांना भविष्यात अशा प्रसंगी सावधगिरी बाळगता येईल . "पुढच्यास ठेच , मागचा शहाणा " या न्यायाने . या लेखावरील अनेक प्रतिसादही माहितीपुर्ण आहेत. बाकी , अशा त्रासदायक आठवणींना "भुली हुई यादों , मुझे इतना तो न तडपाओ , अब चैनसे रहने दो , मेरे पास ना आओ " , " जा मुझे ना अब याद आ , मुझे भुल जाने दे " असे सांगुन लांब ठेवणे कदाचित हितकर .

आपण सर्वच जण कधी ना कधी अशा चक्रव्युहात अडकतोच फक्त प्रसंग आणि माणसे वेगळी ईतकेच १. मी पुण्याला प्रथम आलो तेव्हा भाडेकरु म्हणुन राहण्याचा कधीच अनुभव नव्हता. तोवर केवळ मालकाची भुमिकाच माहित होती. पण इथे आल्यावर प्रथमच एजंट बरोबर फिरणे घर बघणे वगैरे करण्यात बरेच नमुने पाहायला मिळाले. सुदैवाने मालक बरा भेटला पण शेजारी तर्‍हेवाईक होते. विशेषतः ज्यांचे मालकाशी वाकडे होते, त्यांना भाडेकरु कसा लवकर पळुन जाईल आणि ह्यांचे नुकसान होईल अशी काळजी असावी. मी सुरुवातीला २-३ वेळा मालकाकडे तक्रारी केल्या पण त्यांना वयोमानानुसार सारखे तिकडे येणे शक्य नव्हते अखेर सेक्रेटरी खंबीरपणे (किवा काट्याने काटा काढु असे असेल) पाठीशी उभे राहिले आणि १-२ वर्षे निभावली. तरी झालेले थोडेफार नुकसान अजुनही मनाला त्रास देतेच जसे की बाइकचे पेट्रोल काढणे, नंबर प्लेट तोडणे, पाण्यावरुन भांडणे उकरणे . कदाचित आता मी त्या गोष्टींचा जास्त चांगल्या प्रकारे सामना करु शकलो असतो. २. माझा फ्लॅट मित्राला भाड्याने दिल होता. पहिले वर्षभर त्याने रडत खडत का होईना भाडे दिले, पण नंतर मुलीचे आजारपण वगैरे कहाण्या सांगुन बुडवले. शेवटी डिपॉझिट जप्त करुनही थोडे नुकसान झालेच. मैत्रीही तुटली. ३. ट्रिपला गेले असताना आगाउ पैसे दिले असणे आणि हॉटेल भंगार निघणे हा अनुभव तर जवळ पास सर्वांनी कधीतरी घेतला असेल. असेच एका डिसेंबरमध्ये ऐन वेळी बुकिंग करुन गोव्याला गेलो. हॉटेल, बस प्रवास वगैरे सर्व सहलखर्चात समाविष्ट होते. रात्री उशीरा जी बस त्याने आणली ती गॅरेजमधुन अर्धवट दुरुस्त करुन आणली असावी. त्याच्या खिडक्या लागत नव्हत्या. थंडीने काकडुन गोव्यात पोचलो तेथे एका दुर्गम ठिकाण् चे अवकळा आलेले हॉटेल होते. जेवाखायची सोयही यथातथाच होती. एकंदर ट्रिपचे तीनतेरा वाजले हे सांगणे नलगे. बरे आधीच अक्कलखाती पैसे गेल्याने आणी ग्राहकमंच वगैरे साठी वेळही नसल्याने जमेल तेव्ह्ढी मजा केली आणि घरी येउन विसरुन गेलो.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मैत्रीही तुटली.
मित्राकडून येणे असलेले पैसे देण्यास मित्राने टाळाटाळ केली की मैत्री तुटते हा वैश्विक अनुभव असावा. :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

> जमेल तेव्ह्ढी मजा केली आणि घरी येउन विसरुन गेलो. ग्राहकमंच ही व्यावसायिकांच्या बेपर्वाईला धडा शिकवण्यासाठी उत्तम सोय आहे. जागरुक ग्राहकांनी त्याचा अवश्य फायदा घ्यावा. तिथे कोणतीही सनद नसतांना आपण स्वतःची केस लढवू शकतो आणि अत्यंत निष्पक्ष जजेस तुम्हाला न्यायही मिळवून देतात. बँक ऑफ इंडियाच्या अशाच बेपर्वा वागणुकीला अद्दल घडवण्यासाठी मी त्यांच्याविरुद्ध मेडी-क्लेमची केस जिंकून, हॉस्पिटलचं ४० हजाराचं बील संपूर्ण वसूल केलं आहे.

In reply to by चामुंडराय

नक्की. वेळ मिळाला की सर्वांना उपयोगी होईल असा वेगळा धागा काढीन.

घराची मालकणी शगुफ्ता नामक एक स्त्री होती. या शगुफ्ता ला तुम्ही माफ करा... अगदी तिच्या तुम्हाला न आवडलेल्या व्यवहारा सकट तिला तुम्ही तुमच्या मनाच्या गहिर्‍या कोपर्‍यातुन देखील माफ करा. जेव्हा तिच्या तुम्हाला त्रासदायक ठरणार्‍या आठवणी जागृत होतील तेव्हा तेव्हा दर वेळी तिला तुम्ही माफ करा... “Pain is inevitable but suffering is optional.”

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sooni Sooni... :- Cheeni Kum

आदरणीय संक्षी सरांचे सर्व प्रतिसाद वाचले, परम संतोष झाला ... त्याना कर्म विपाकाचा सिद्धांत समजाऊन सांगायची माझी इच्छा नाही. आणि दुसरे , त्यांनी अथवा त्यांच्यासारख्या दश-सह्स्त्र-कोटी लोकांनी कर्म-विपाक सिद्धान्त स्वीकारला नाही म्हणून शष्प देखील फरक पडत नाही ! Value systems are like Lighthouse. If you do not follow them, you will break. Lighthouse is intact! -Stephen Covey

In reply to by विटेकर

म्हणून शष्प देखील फरक पडत नाही ! > मुळात सिद्धांतात काही दम नाही त्यामुळे मनाला सांत्वना देण्याचा हा एकमेव उपाय आहे !

In reply to by नावातकायआहे

उलगडण्याचा एक सर्वोपयोगी प्रयत्न, या दृष्टीनं ही पोस्ट महत्त्वाची ठरेल. १. माणूस ओळखण्यातली चूक फसगतीला कारणीभूत होते. २. फसगत झालेला स्वतःच्या चुकीतून शिकण्याऐवजी, फसवणार्‍याला दोष देत बसतो. त्यामुळे माणूस ओळखण्यात पुन्हा चूक होण्याची शक्यता तशीच रहाते. ३. `पूर्वसंचित ' ही भाकड कल्पना आहे. अशा धारणांमुळे तात्पुरती मानसिक सांत्वना मिळते पण निर्णयक्षमतेत सजगता येत नाही. ४. फसगत केलेल्याला योग्य धडा शिकवणं हे कौशल्य आहे पण तो आपल्या `पूर्वकर्माचा भोग ' आहे अशी समजूत करुन घेतली की दुहेरी गोची होते : अ. झालेल्या नुकसानाची भरपाईपण होत नाही, आणि ब. ती दुखरी आठवण परत केंव्हा वर येईल याचा नेम नाही !