[शतशब्दकथा] Everything is fair in business and politics

Primary tabs

SaurabhD's picture
SaurabhD in जनातलं, मनातलं
21 May 2020 - 10:02 am

तुम्हाला तर माहितीच आहे ... कथा खरंच पूर्णपणे काल्पनिकच आहे. वस्तुस्थितीशी ह्याचा अजिबात काहीही संबंध नाही ... आणि देव करो, आणि कधीच काही संबंध येऊ पण नये ... बाकी तुम्ही सगळे सूज्ञ आहातच ...

------------------

प्रोजेक्ट डेमो नंतर काही काळाने ...

"मानलं तुम्हाला डॉक्टर, खरंच जबरदस्त आहे तुमचं डिझाईन. तुमचा विशेष सन्मान केला जाईल ... गुप्तपणे ..."

"थँक्यू सर ..."

"तुमच्या औषधाने पण चोख काम केलं आहे."

"थँक्यू सर ... पण आपण ते औषध इतर देशांना का नाही विकत ? आपल्या देशाला खूप आर्थिक फायदा होईल ..."

"तुम्हाला म्हणून सांगतो डॉक्टर, जगात दोन भाग आहेत. एक शत्रू आणि दुसरा बाजारपेठ.
...
औषध तेव्हाच बाजारात आणायचं जेव्हा शत्रू पूर्णपणे कोलमडले असतील आणि बाजारपेठ इतकी भेदरलेली असेल की आपण सांगू त्या किमतीला औषध विकत घेतलं जाईल"

"आणि मित्र ... ?"

"राजकारणात कोणी मित्र नसतो डॉक्टर, काही लोक कधीकधी फायदेशीर असतात इतकंच !"

कथा

प्रतिक्रिया

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 11:36 am | आयर्नमॅन

अलबर्ट आइन्स्टाइन

ज्योति अळवणी's picture

22 May 2020 - 3:29 pm | ज्योति अळवणी

खरच असेल असं?

सौंदाळा's picture

25 May 2020 - 9:43 pm | सौंदाळा

सिक्वेल पण छान झालाय