कोरोना

Primary tabs

Sneha Kalekar Ghorpade's picture
Sneha Kalekar G... in जे न देखे रवी...
19 May 2020 - 4:08 pm

कसा काय देवराया, हा कहर झाला कोरोनाचा
न भूतो न भविष्यती,असा खेळ पाहिला आयुष्याचा

किड्यामुंग्यांसारखी माणसं मरू लागली जिकडेतिकडे
यातून लवकर सुटका कर देवा, एवढ़े कळकळीचे साकडे

कधी नव्हे ती आता,सर्वांना नाती कळू लागली आयुष्यभराची देवा, अद्दल घडवलीस चांगली

माझ्यासारखं कुणीच नाही, असं "माणूस" मिरवीत होता
फुकटच्या "हुशारया" आणि नुसता "गुर्मीत" होता

आणलंस थोडं शुद्धीत,फिरवलीस तुझी काठी
व्याकूळ झाला माणूस, आपल्याच माणसांसाठी

चांगलाच धडा शिकवलास, आम्हाला असंच हवं होतं
"मी"पणाच्या अहंकारात,विसरून गेलो नातंगोतं

कोरोनाच्या या लढाईतून देवा, तूच आम्हाला तारून नेऊ शकतोस
पूरे कर देवा आता, किती लेकरांचा अंत बघतोस

झाली आमची चूक, मी सगळ्यांच्या वतीने मान्य करते
थांबव तुझा खेळ आता, मी तुझ्या पाया पडते

स्नेहा कालेकर - घोरपडे

कविता

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

19 May 2020 - 5:02 pm | जव्हेरगंज

कविता छान!!

कोरोना विषयी एवढे लिहीलं गेलंय की आता नको वाटतेय वाचायला..

काहीतरी वेगळं लिहा! आम्ही आहोतच वाचायला!!