लॉकडाऊन
स्वयंफुर्तीने केलेली संचारबंदी झाली संध्याकाळी मस्त टाळ्या वैगरे वाजवल्या मज्जा आली !
घरी एकटाच होतोना तरी आज रात्री दिव्यांची आरास केली होती !
कंटाळा आला आता पण एकटेपणाचा , हि गेली सोडून गेल्या वर्षी
शेजारच्या गॅलरीतून चिमुकली रोज आजोबा म्हणून हात करून फ्लयिंग किस देते लब्बाड गोबर्या गालांची बया
मेडिकेकवाला मात्र न चुकता औषध देऊन जातो , तेवढाच मानवी सहवास !
का कोणजाणे छोटी आजकाल दिसेना गॅलरीत , तो मेडिकलवाला सुद्धा येत नाहीये , कुंड्यापण सुकत चालल्यात
कसली तरी अनामिक हुरहूर आणि आमची हिपण दिसतेय थोडी आनंदी !!
आता शेजाऱ्यांना कसला वास येतो म्हणे तो माझ्या घरून ?
थांबा कशाला दरवाजा तोडताय , मी निघालोयना दरवाजा उघडायला , संपलं वाटत लॉकडाऊन !!!
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
25 Apr 2020 - 6:34 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
टाळेबंदी संपली असा कथाकाराचा केवळ अंदाज आहे, प्रत्यक्ष अनुभव नाही. या ठिकाणी ही कथा लेखकाने मुद्दाम संदिग्धावस्थेत सोडून दिलीये. रिकाम्या जागा वाचकांनी आपापल्या कल्पनांनी भरायच्या आहेत.
आ.न.,
-गा.पै.
25 Apr 2020 - 8:20 pm | संजय क्षीरसागर
> थांबा कशाला दरवाजा तोडताय , मी निघालोयना दरवाजा उघडायला , संपलं वाटत लॉकडाऊन
असं म्हणून गेलेला माणूस कसा उठेल ?
हा प्रश्रे !
तुम्ही फार सिरियसली घेऊ नका.
1 May 2020 - 5:43 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
तुम्ही म्हंटल्याप्रमाणे गांभीर्याने नाही घेत. मग तुमची कथाही गांभीर्याने का घ्यावी असा प्रश्न पडतो. तुमची कथा इथे आहे : https://www.misalpav.com/node/46598
माणसाला देहंच नाही तर त्यात लॉकडाऊन कुठनं आला?
आ.न.,
-गा.पै.
आ.न.,
-गा.पै.
25 Apr 2020 - 3:30 pm | चौकस२१२
+१
25 Apr 2020 - 10:53 pm | चहाबाज
वरील सर्व मजकूर वाचले. तरिही कथा आवडली. छान गुंफली आहे कल्पना.
26 Apr 2020 - 6:47 pm | ब़जरबट्टू
आवडली
26 Apr 2020 - 8:31 pm | माझीही शॅम्पेन
गूढ कथा
+1
27 Apr 2020 - 11:34 am | मनस्विता
+१
27 Apr 2020 - 2:40 pm | केंट
+१
27 Apr 2020 - 5:02 pm | एमी
+१ आवडली.
27 Apr 2020 - 9:24 pm | स अर्जुन
+१
जबरदस्त
28 Apr 2020 - 9:24 am | टर्मीनेटर
+१
आवडली!
28 Apr 2020 - 5:30 pm | Nitin Palkar
+1
28 Apr 2020 - 7:30 pm | Nitin Palkar
+१
29 Apr 2020 - 5:24 am | सुमो
+1
29 Apr 2020 - 6:54 pm | यसवायजी
+1
29 Apr 2020 - 10:43 pm | अरिंजय
+1. जब्बरदस्त.
1 May 2020 - 1:15 pm | बिपीन सुरेश सांगळे
मा शॅ
खूप अभिनंदन
3 May 2020 - 9:30 pm | शब्दसखी
अभिनंदन!!