Skip to main content

[शशक' २०२०] - लॉकडाऊन

लेखक माझीही शॅम्पेन यांनी बुधवार, 22/04/2020 15:32 या दिवशी प्रकाशित केले.

लॉकडाऊन




स्वयंफुर्तीने केलेली संचारबंदी झाली संध्याकाळी मस्त टाळ्या वैगरे वाजवल्या मज्जा आली ! घरी एकटाच होतोना तरी आज रात्री दिव्यांची आरास केली होती ! कंटाळा आला आता पण एकटेपणाचा , हि गेली सोडून गेल्या वर्षी शेजारच्या गॅलरीतून चिमुकली रोज आजोबा म्हणून हात करून फ्लयिंग किस देते लब्बाड गोबर्या गालांची बया मेडिकेकवाला मात्र न चुकता औषध देऊन जातो , तेवढाच मानवी सहवास ! का कोणजाणे छोटी आजकाल दिसेना गॅलरीत , तो मेडिकलवाला सुद्धा येत नाहीये , कुंड्यापण सुकत चालल्यात कसली तरी अनामिक हुरहूर आणि आमची हिपण दिसतेय थोडी आनंदी !! आता शेजाऱ्यांना कसला वास येतो म्हणे तो माझ्या घरून ? थांबा कशाला दरवाजा तोडताय , मी निघालोयना दरवाजा उघडायला , संपलं वाटत लॉकडाऊन !!!


वाचने 17154
प्रतिक्रिया 69

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, टाळेबंदी संपली असा कथाकाराचा केवळ अंदाज आहे, प्रत्यक्ष अनुभव नाही. या ठिकाणी ही कथा लेखकाने मुद्दाम संदिग्धावस्थेत सोडून दिलीये. रिकाम्या जागा वाचकांनी आपापल्या कल्पनांनी भरायच्या आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

> थांबा कशाला दरवाजा तोडताय , मी निघालोयना दरवाजा उघडायला , संपलं वाटत लॉकडाऊन असं म्हणून गेलेला माणूस कसा उठेल ? हा प्रश्रे ! तुम्ही फार सिरियसली घेऊ नका.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, तुम्ही म्हंटल्याप्रमाणे गांभीर्याने नाही घेत. मग तुमची कथाही गांभीर्याने का घ्यावी असा प्रश्न पडतो. तुमची कथा इथे आहे : https://www.misalpav.com/node/46598 माणसाला देहंच नाही तर त्यात लॉकडाऊन कुठनं आला? आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.

+१

वरील सर्व मजकूर वाचले. तरिही कथा आवडली. छान गुंफली आहे कल्पना.

आवडली

+१

+१

+१ आवडली!

+1

+१

+1

+1

+1. जब्बरदस्त.