हैद्राबादी व्हेज बिर्याणी

मिंटी's picture
मिंटी in पाककृती
14 Nov 2008 - 3:19 pm

नमस्कार मंडळी....:)

स्वाती ताई सारख्या सुगरणीकडुन प्रेरणा घेऊन आज एक पाककृती देण्याचा हा छोटासा प्रयत्न :)

हैद्राबादी व्हे़ज बिर्याणी

साहित्य -
१ १/२ कप बासमती तांदुळ ३० मिनिट भिजवुन ठेवावेत
२०० ग्रॅम बटाटे सालं काढुन चिरलेले
२०० ग्रॅम गाजरं सालं काढुन चिरलेली
५० ग्रॅम काजु
५० ग्रॅम बदाम भिजवुन सालं काढलेले
२५ ग्रॅम बेदाणे
१०० ग्रॅम कांदा बारीक चिरलेला
४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१ टी. स्पून आलं पेस्ट
१ टी. स्पून लसूण पेस्ट
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून ति़खट
१ कप दही
१ टी स्पून केशर
२ टी स्पून दुध
१/३ कप पुदिन्याची पानं बारीक चिरुन
१/३ कप कोथिंबीर बारीक चिरुन
६ हिरवे वेलदोडे
६ लवंग
१ दालचिनी
३ तमाल पत्र
१२० ग्रॅम तुप
मिठ चविनुसार
गुलाब पाणी गरजेनुसार
भिजवलेली कणिक बिर्याणीचं भांडं सील करायला

कृती -
१. भिजवुन ठेवलेले तांदुळ एका भांड्यात घेऊन त्यात ३ कप पाणी टाका. त्यात ३ वेलदोडे, ३ लवंगा,दालचिनीचे २ तुकडे, आणि १ तमालपत्र टाका आणि भात पुर्ण शिजवुन घ्या. जास्तीचं पाणी काढुन टाका आणि झालेला भात बाजुला ठेवा.
२.दही व्यवस्थीत फेटुन घ्या आणि त्याचे २ भाग बनवा.
३.केशर पाण्यात भिजवुन घ्या आणि दह्याच्या एका भागात घाला.
४.एका पॅन मध्ये तुप गरम करुन त्यात उरलेला खडा मसाला घाला आणि मध्यम आचेवर तडतडेपर्यंत परता.
५.बारीक चिरलेला कांदा घालुन तो सोनेरी रंग येईपर्यंत परता. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं - लसुण पेस्ट घाला आणि १ मिनिट परतुन घ्या. त्यात हळद, तिखट आणि सर्व भाज्या घालुन व्यवस्थीत परतुन घ्या.
६. यात दह्याच्या दुसरा भाग व २/३ कप पाणी घालुन उकळी येईपर्यंत ठेवा. भाज्या पुर्ण पणे शिजवुन घ्या.
७. भाज्या शिजल्या की त्यात काजु, बदाम,बेदाणे घाला.
८. यात केशर घातलेल्या दह्याचा थोडा भाग, पुदिना आणि कोथिंबीर घाला.
९.मग त्यावर निम्मा भात घाला आणि पुन्हा त्यावर दह्याचं मिश्रण, पुदिना आणि कोथिंबीर घाला. यावर पुन्हा एकदा उरलेल्या भाताचा थर द्या व भांडं घट्टं झाकण लावुन बंद करा. वाफ जाऊ नये म्हणुन झाकण कणिक लावुन सील करुन घ्या.
१०. हे भांडं प्री-हिटेड ओवन मध्ये १५-२० मिनिटं ठेवा आणि गरम गरम सर्व करा.

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

14 Nov 2008 - 3:22 pm | जैनाचं कार्ट (not verified)

निषेध निषेध !

स्त्री सदस्यांनी आमच्या सारख्या अविवाहित मंडळीच्यावर सुड उगवण्यासाठीच तात्याच्या मागे लागून पाककृती नावाचा विभाग चालू केला आहे ;)

मस्त जमली आहे... जमलीच तर बहाद्दुरला सांगून तयार करुन बघतो !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

मिंटी's picture

14 Nov 2008 - 3:28 pm | मिंटी

राज अरे तुमच्या सारख्या बॅचलर लोकांसाठी उपयुक्त अश्या काही पाककृती मी शिकुन घेतल्या आहेत..त्या पण लौकरच टाकेन.... :)

जैनाचं कार्ट's picture

14 Nov 2008 - 3:33 pm | जैनाचं कार्ट (not verified)

मग ठीक आहे.. पण कधी तरी गिळायला बोलवावे लागेल तरच निषेध मागे घेऊ ;)

राज
(लाच घेतल्याशिवाय न सोडनारा दिल्ली पुलिस.. सदा आप साथ ! )

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

मिंटी's picture

14 Nov 2008 - 3:40 pm | मिंटी

अरे कधिही ये....
पुण्यात कधी येणं होतं का तुझं???
आलास की ये मग घरी....
पण मी काही सुगरण वगैरे नाहीए हा.....

जैनाचं कार्ट's picture

14 Nov 2008 - 3:42 pm | जैनाचं कार्ट (not verified)

मी नेहमी पुन्यातच येतो ;)

लिस्ट बनवत आहे कुठ कुठ जाणे ह्याची .. निलकांत कडे वस्ती असते आमची !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

घाटावरचे भट's picture

14 Nov 2008 - 3:34 pm | घाटावरचे भट

हैद्राबादी आणि व्हेज???????????

सुनील's picture

14 Nov 2008 - 3:42 pm | सुनील

भटा, जरा नावाला जागा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

घाटावरचे भट's picture

14 Nov 2008 - 11:58 pm | घाटावरचे भट

>>भटा, जरा नावाला जागा!

नावाला जागूनच प्रतिक्रिया दिली आहे. भट असलो तरी केव्हाच धर्मभ्रष्ट झालो आहे. आता बोला...

सर्किट's picture

15 Nov 2008 - 3:21 am | सर्किट (not verified)

भट हे खरे "भ्रष्ट" शब्दापासूनच अपभ्रंश होऊन आलेले आहे, असा माझा ठाम विश्वास आहे.

(भ्रष्ट -> भ्रठ्ठ -> भठ्ठ -> भट्ठ -> भट)

-- सर्किट भट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

घाटावरचे भट's picture

16 Nov 2008 - 2:39 am | घाटावरचे भट

=))

सुनील's picture

14 Nov 2008 - 3:40 pm | सुनील

मस्तच पण जरा फोटोही टाकला असता तर बरं झालं असतं!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मैथिली's picture

14 Nov 2008 - 3:42 pm | मैथिली

अतिशय उत्तम अशी पाक क्रुति आपन सादर केलेलि आहे ...

खुपच अवडलि...!!! ;) :)

मनस्वी's picture

14 Nov 2008 - 5:33 pm | मनस्वी

आवडली पाकृ.
फोटो का नाही टाकलास?

मिंटी's picture

14 Nov 2008 - 5:44 pm | मिंटी

धन्यवाद :)

अग टाकायची विसरले फोटो
थांब टाकते थोड्यावेळात :)

साला, काय पन मजा येयाचा नाय! हड्डी चावल्याबिगर बिर्यानीला काय टेस येनार?
पन आता लिवलावच त करून बगाया हरकत नाय! टेस घेतल्यावर आपून काय तो खुल्ला बोलू.

स्वाती दिनेश's picture

14 Nov 2008 - 6:12 pm | स्वाती दिनेश

मिंटे, छान दिसतेय ग.. मस्त!
स्वाती

रेवती's picture

14 Nov 2008 - 8:32 pm | रेवती

मी बिर्याणी करते ती जवळ जवळ अश्याच पद्ध्तीने करते.
फोटूमुळे पाकृ ची लज्जत वाढलीये.

रेवती

पिवळा डांबिस's picture

15 Nov 2008 - 10:32 am | पिवळा डांबिस

व्हेज पुलाव आण व्हेज बिर्याणी (हैद्राबादी वा लखनवी वा इतर कोणतीही!!!) यातील फरक काय?
कोणी जाणकार समजावून सांगतील काय?

जैनाचं कार्ट's picture

15 Nov 2008 - 10:35 am | जैनाचं कार्ट (not verified)

हा फरक येथे लिहून नाही समजवता येणार.. !

खाऊनच बघावा लागतो.. या इकडं कधी तरी .. फरक स्पष्ट करु ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

पिवळा डांबिस's picture

15 Nov 2008 - 10:46 am | पिवळा डांबिस

>खाऊनच बघावा लागतो..
खरंच! आपण खाउन बघीतलीये खरी बिरयानी, जैनभाऊ?
जर असेल तर मग तुम्हाला फरक माहितीच असावा!!!!
>या इकडं कधी तरी .. फरक स्पष्ट करु
जरूर!! नेष्ट टाईम दिल्लीला आल्यावर आपली डेट...
(बाकी दिल्लीला येऊन व्हेज पुलाव/बिर्याणी खाण्याइतकं दुर्दैव ते कोणतं?:))
पण दोस्तासाठी आम्ही तेही करू.....

जैनाचं कार्ट's picture

15 Nov 2008 - 10:49 am | जैनाचं कार्ट (not verified)

व्हेज नाही हो खायचं ;)

आपलं अस्सल लखनवी बिर्याणी खायची :D

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

पिवळा डांबिस's picture

15 Nov 2008 - 10:59 am | पिवळा डांबिस

आत्ता कसं आमच्या मनातलं बोललात!!!
अहो दिल्लीला आल्यावर अस्सल गोष्त बिरयानी खाऊ, तंदुर मुरगा खाऊ, सळयांवरचा शीग कबाब खाऊ.....
फक्त व्हेज पदार्थ खाऊ तो म्हणजे थंडगार लस्सी......

सिरियसली, बाकी नेक्स्ट व्हिजिटमध्ये खरंच दिल्लीला यायचा प्लान आहे.....
तुम्हाला वेल इन ऍडाव्हान्स कळवीन.....

पिवळा डांबिस's picture

15 Nov 2008 - 11:06 am | पिवळा डांबिस

.

पिवळा डांबिस's picture

15 Nov 2008 - 11:07 am | पिवळा डांबिस

.

विसोबा खेचर's picture

16 Nov 2008 - 1:00 am | विसोबा खेचर

पाकॄ आणि फोटू अर्थातच छान आहे..

परंतु आम्हाला मात्र चांगली दम केलेली गोश्त बिर्याणीच आवडते..! :) ती मजा व्हेजबिर्याणी खातान कधी जन्मात आली नाही..

असो, प्रत्येकाच्या आवडीनिवडी..

तात्या.