तुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
12 Mar 2020 - 6:30 am

तुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे
तुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे हा एक मानवि मनाचा गुणधर्म आहे..
दुसर्‍याच्या जीवनाशी आपली तुलना करीत ते एक तर सुख मानतात वा दुःखी होतात...
काहि मुली आपण मैत्रिणींच्या मनाने जाड आहोत हा विचार करीत अस्वस्थ होतात..
तर सहका~याची गाडी जुन्या मॉडेल ची व माझी लेटेस्ट म्हणून काहि आनंदित होतात..
अशी माणसे आपणास कायम भेटत असतात..व काहि वेळा आपण हि तसेच वागत असतो..
बाह्य गोष्टींची तुलना करताना बरेच वेळा आपल्या आयुष्याची नेमकि किंमत काय?
आपण काय मिळवले याचे मुल्य मापन करण्याची क्षमताच आपण हरवुन बसतो...व बाहे्रच्या गोष्टीवर आपला काहिच कंट्रोल नसल्याने एक हतबलतेची भावना येते...
अश्या माणसांची मने चिड व ईर्षेने भरलेली असतात..
समजा आपल्या आयुष्यात जरी फार आपण पुढे गेलो नाहि असे वाटत असेल तर ति चुक आपण परिश्रमाने नक्कीच भरुन काढु शकतो..
तुलना हि आपण आपल्याशी केली तर फायदेशीर पडु शकते..
काल मी कुठे होतो..आज कुठे आहे हे सिंहावलोकन नेहमीच फायद्याचे ठरते..व हवे ते ईप्सित व ध्येय गाठण्या साठी योग्य तो बदल हि करता येतो...
असे असले तरी आपला साथीदार/मित्र/सहकारी जर आपल्या पुढे गेला तर मनास वेदना तर नक्किच होतात..
आपल्या आयुष्यात असे प्रसंग आले असतिलच... आपण सुखि वा दुखि झाला का?

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

खिलजि's picture

12 Mar 2020 - 1:30 pm | खिलजि

दुसऱ्याकडे बघून दुखी होणाऱ्यांची कायम कीव येते .. हे साले स्वतःपण दुखी होतात आणि आजूबाजूच्यांना पण दुखी करतात .. सगळ्यात ब्येस्ट म्हणजे ,, इतरत्र ना पाहता , आपले शौक साजरे करावे , जेणेकरून तुमचा दृष्टिकोन बदलायला मदत होते आणि परिस्थितीवर माता करायला बळही मिळते..
गृदेव आपणास आदर्श ठेवूनच मी पुढे जात आहे .. आपले धागे इतरांसाठी भलेही रटाळ असतील पण माझ्यासाठी ते मार्गदर्शक हैत .. काळजी नसावी .. अर्ज किया है

वो धागा , धागा नही

जिसमे सादगी ना हो

आप फर्माते रहो ऐसेही

बीचमे मी कोई बंदिश ना हो

हम पढेंगे बेसुमार आपको

कोई कसूर नही छोडेंगे

गृदेव जो माना है आपको

भक्तगण चारो ओर बढायेगे