शेतकी कॉलेजचे दिवस

बबु's picture
बबु in जे न देखे रवी...
25 Feb 2020 - 12:11 pm

मित्रा, आपण भेटलो परत
पन्नास वर्षांनी या स्नेहमेळाव्यात…
आणि आठवणींच्या चित्रांचे रंग
परत एकदा ओले झाले...
आठवला भाजी-भाकरीचा डबा,
आईनं पहाटेच उठून तयार केलेला
अन्नपूर्णेच्या मायेनं
एसटीने आपल्यापर्यंत पोहोचवलेला ...
आठवला बिनाका गीतमालाच्या
सरताज गीतांचा कल्ला ..
कित्येक बुडवून लेक्चर्स ,
गेलो मॅटिनी शो पाहायला ..
आपण सर्वच कुणबीकीचा
वसा आठवत लढत होतो ...
अडचणींचा गोवर्धन
जिद्दीच्या काठ्यांनी तोलत होतो ...
आयुष्याच्या संध्याकाळी
कृतार्थतेच्या सात्विक भावांनी
उजळलेला तुझा चेहरा पाहताना
मलाही त्या कृतार्थतेची अनुभूती येत आहे...
संकल्प मनोमनी परतभेटीचा करूया...
माऊलींचे पसायदान मनोमनी आळवूया...

कविता

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

25 Feb 2020 - 10:09 pm | चौथा कोनाडा

छान कविता, माझ्या वर्गातील शेतकरी कुटुंबातील एम्टीपाटिल आठवला.
एसटीतुन येणारा डबा उशीरा आला किंवा आला नाही की त्याची होणारी कुचंबण आठवली.
आमच्या घरी ये जेवायला म्हटलं कि खुप संकोचुन जायचा.
काही वेळा रात्री उपाशीच झोपायचा असं त्याचा रूम पार्टनर सांगायचा मला.

कित्येक बुडवून लेक्चर्स ,
गेलो मॅटिनी शो पाहायला ..

या पायी आम्ही देखील गुरुजनांच्या शिव्या खाल्लेल्या.

असंका's picture

27 Feb 2020 - 1:30 pm | असंका

फारच सुरेख...

कुणबीकीचा वसा...म्हणजे शेतीचा वसा असं आहे का? की दुसरा काही अर्थ आहे?

धन्यवाद!!

अनेक आठवणींची चित्रे उभी राहिली या कवितेमुळे
हॉस्टेल ला रूम वर असे एकूण 14-15 वर्षे मी बाहेर होतो घरच्या..
त्यामुळे असे असंख्य मित्र.. असंख्य घटना डोळ्यापुढे आल्या

संजय क्षीरसागर's picture

11 May 2020 - 2:48 pm | संजय क्षीरसागर

.