सोशल नेटवर्किंग साईट्स सुरक्षा - काळाची गरज

Rohit Samudra's picture
Rohit Samudra in जनातलं, मनातलं
13 Feb 2020 - 8:45 pm

© रोहित समुद्र

पूर्वी एका कॉम्प्युटर वरून दुसरी कडे संदेश पाठवणे म्हणजे एक महा कर्मकठीण काम होते म्हणजे असे पूर्वी किस्से मी ऐकलेले आहेत की दोन कॉम्प्युटर्स मधे संदेश पाठवायचा असेल तर ते दोन कॉम्प्युटर्स हे अंतर्गत जोडलेले असणे हे महत्वाचे होते आणि ते करण्याकरता लोक एका गच्ची वरून दुसरी कडे फायबर केबल टाकून घामाघूम होत आणि नुकतेच इंटरनेट आल्यामुळे सगळ्यांच्या खिशाला तसं परवडत नवते आणि कॉम्प्युटर ही एका ठराविक समाज समूहाची मक्तेदारी आहे अस लोक मानत असल्यामुळे जास्त लोकांचा ओढा हा कॉम्प्युटर खरेदी करण्याकडे नव्हता . पण भारताने जेंव्हा पासून जागतिक बाजार पेठेच धोरण स्वीकारलं तेंव्हा पासून कॉम्प्युटर मधल्या प्रगतीचा वेग हा कमालीचा वाढला आणि सगळा बिझनेस हा एका खोलीत आल्यामुळे लोकांचा कॉम्प्युटर वापरण्याचा कल वाढला नंतर एकविसाव्या शतकात स्मार्टफोन्स चा उदय झाल्यामुळे हाच कॉम्प्युटर हातामधे आला . ह्याच दरम्यान काही वेबसाइट्स चा जन्म झाला की ज्यायोगे आपण समाजाशी एकदम संपर्क साधू शकतो आणि आपले म्हणणे जगासमोर मांडू शकतो त्यालाच सोशल नेटवर्किंग वेबसाईट असे नाव दिले गेले. सुरवातीला हे सर्व समाजाला नवीन असल्यामुळे ते वापरण्यात काही धोका वाटला नाही पण जसा ह्याचा वापर दिवसेंदिवस वाढत गेला त्यामुळे काही समाज कण्टकांची नजर पडल्यामुळे ह्यांच्यातील वापरण्याचा धोका आणखीनच वाढला
जेंव्हा आपण कोणत्या ही सोशल नेटवर्किंग साइट वर प्रोफाइल बनवतो तेंव्हा आपण नकळत आपली बरीच खाजगी माहिती ही त्या वेबसाईट वर टाकत असतो उदाहरणार्थ आपले आवडते रंग , डिश , सिनिमे तसेच आपण ही प्रोफाइल बनवताना एक युजर लायसेन्स अग्रिमेंट चा एक चेकबॉक्स वर क्लिक करतो तेंव्हा त्या साइट ला आपण ही खाजगी माहिती वापरण्याची मुभा देत असतो. ह्या माहितीचे पुढे काय होते ह्यांचे भान आपल्याला नसते हे ह्या वेबसाइट्स ही माहिती त्यांच्या फायद्या करता वापरतात आणि त्यानुसार जाहिरातींचे वर्गीकरण करून आपल्याला एक जाहिरात पाठवतात अश्या अनेक जाहिराती बघितल्या नंतर नकळतच एखाद्या आवडत्या जाहिरातीवर आपण क्लिक करतो आणि नंतर खरा खेळ सुरू होतो , आपल्या समोर एक नंतर फॉर्म दिसतो आणि आपण तो भरून देतो ही माहिती एका सर्व्हर वर जमा होते अश्या प्रकारे माहिती चे चौर्य कर्म करून त्याचा गैर वापर केला जातो हे करणाऱ्या जमातीला लोक हॅकर या नावाने संबोधतात हे लोक साधारणपणे अकरा ते एकवीस या वयोगटात जास्त प्रमाणात असतात त्यामुळे कोणती ही माहिती टाकतांना सावधगिरी बाळगायला हवी उठसूट सगळी माहिती त्या वेबसाईट वर टाकणं योग्य नाही तसेच
आपण कुठे गावाला गेलो किंवा एक दिवसीय सहलीला गेलो तर लगेच त्याला लोकांची पसंती मिळावी म्हणून लोक फेसबुक वर शेअर करतात हे अत्यंत चुकीचे आहे कारण एखाद्याने हे वाचले आणि तो सूडबुद्धीने त्या माणसाच्या घरी गेला तर काहीही अनर्थ होऊ शकतो हीच गोष्ट फोटो च्या बाबतीत आहे विशेषतः फोटो हे आपण पब्लिक ली फेसबुक वर अपलोड केले तर हेच फोटो वापरून आपली एक दुसरी प्रोफाइल हॅकर तयार करू शकतात आणि त्या प्रोफाइल वरून गुन्हे करू शकतात. सेलिब्रिटीज च्या बाबतीत आपण हे बऱ्याचदा घडलेले बघतो म्हणून कोणती ही माहिती शेअर करताना आपण दहा वेळेला विचार केलेला बरा आणि प्रायव्हेट माहिती न शेअर केलेली बरी
स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न हल्ली फारच ऐरणीवर आलेला आहे सध्या झालेले हिंगणघाट प्रकरण आणि हल्ली एवढ्यात घडलेली अॅसिड अटॅक प्रकरणे ही तर खेड्यात घडलेली असल्यामुळे , तिकडचे लोक फार टेक नो सेव्यी नसल्यामुळे एकदम स्त्री वर हल्ला केला जातो पण शहरात जरा वेगळ्या प्रकारे ह्याचे नियोजन हल्लेखोर करतात जेंव्हा एखादी तरुण मुलगी खेड्यातून शहरात जॉब करण्यासाठी येते तेंव्हा सगळी कडचे वातावरण हे त्या मुलीला जुळवून घेण्यासारखे नसते एकंदरीतच सध्या समाजाची एखाद्या मुलीकडे बघण्याची नजर ही त्याला कारणीभूत ठरते , म हे समाजकंटक त्या मुलीची ओळख काढून फेसबुक वर त्याच मुलीच्या नावाची दुसरी प्रोफाइल काढतात आणि त्याच प्रोफाइल वर चित्र विचित्र फोटो टाकतात तसेच मजकूर ही लिहितात आणि फेसबुक वर पसरवतात सुरवातीला त्या मुलीला फारस काही कळतं नाही पण जेंव्हा लोक रस्त्याने येता जाता वाईट नजरेने बघतात टर उडवतात तेंव्हा त्या मुलीला जाग येते पण तेंव्हा गोष्टी फार पुढे गेलेल्या असतात त्यामुळे आपण नवीन ठिकाणी गेल्यानंतर आपल्या प्रोफाइल बाबत सजग असणे जरुरीचे आहे , तसेच अशी गोष्ट घडली तर जवळच्या सायबर सेल शी संपर्क साधून सगळी माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे
सोशल नेटवर्किंग साईट्स चा वापर करून आपण बर्याच चांगल्या गोष्टी साधू शकतो पण काही सुरक्षा अवलंबणे हे महत्वाचे आहे नाहीतर आपली गोपनीय माहिती ही सार्वजनिक होऊन त्याचा गैरवापर होण्याचे प्रमाण वाढेल.

तंत्रविचार