सांगू वडीलांची किर्ती.

हेमंत बर्वे's picture
हेमंत बर्वे in जनातलं, मनातलं
12 Nov 2008 - 8:21 pm

गेले बरेच दिवस मिपावर मी मुलांचे शिक्षण,करीअर.पालक आणि त्यांचे मानसशास्त्र ,समुपदेशन या विषयांवरचे लेख अलीप्तपणे वाचत होतो. अलीप्तपणे अशासाठी की मी ह्या सगळ्या कचाट्यातून नुकताच बाहेर पडलो आहे. माझी मुलगी व्यावसायीक शिक्षणक्रम पूर्ण करून नोकरी ला लागली आहे. बोलता बोलता विषय निघाला तेव्हा तेव्हा रामदास मला नेहेमी आठवण करून द्यायचे की " हेमंत तू शिक्षकाचा मुलगा आहेस.(माझे आई आणि वडील दोघंही शिक्षक होते.) आणि खासकरून नानांचा विषय निघाला की रामदास परत आठवण करून द्यायचे .

उद्या १३ नोव्हेंबर रोजी माझे वडील मुकुंद दामोदर बर्वे यांची पुण्यतिथी.

माझे वडील (घरातली आणि परीचीत मंडळी त्यांना नाना म्हणत.) अचानक आणि फार लवकर गेले. मी तेव्हा जेमतेम दहा वर्षाचा असेन. आमचा दादा इंजीनीअरींगच्या दुसर्‍या वर्षाला होता. मी सगळ्यात धाकटा असल्यामुळे त्यांच्या कारकीर्दीबद्दलची माहीती मला माझी आई , आज्जी, दादा आणि इतर बहिणींकडून मिळत गेली . आमच्या नानांच्या करीअरची सुरुवात कल्याणच्या एका शाळेत व्यायाम शिक्षक म्हणून झाली. नोकरी करत करत ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं . ही शाळा जनरल एज्युकेशन इंस्टीट्यूटची होती. याच संस्थेच्या इतर दहा एक शाळा तेव्हा होत्या.छबीलदास लल्लूभाई त्यापैकीच एक. ते उत्तम इंग्रजी शिकवायचे.मोडीवर हुकुमत होती. जाज्वल्य देशाभिमानी. जहाल नेतृत्वाला मानणारे. वाड्याच्या आदीवासींसमोर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप ठेवून त्यांना जिल्हा बंदी लागू करण्यात आली. त्यामुळे ते मुंबईच्या शाळेत बदलून आले.याच संस्थेचे ते सेक्रेटरी झाले.

त्याकाळी टीचर-एज्युकेशनिस्ट-काउंसीलर असे वेगवेगळे भाग नव्हते. एकदा शिक्षक म्हटलं की त्यात सगळंच आलं.
हे मी ठाम पणे म्हणू शकतो कारण नुकतेच त्यांनी लिहीलेले काही लेख मला सापडले. पन्नास वर्षापूर्वी लिहीलेले हे लेख अनुक्रमे लोकसत्ता आणि सन्मित्र (एसेम.जोशींचे) या पेपरात प्रसिद्ध झाले होते.
त्यापैकी एक लेख १९५६ सालचा आणि दुसरा १९६१ सालचा आहे. माझे वडील द्रष्टे होते. सध्या मिपावर जे प्रश्न मांडले जात आहेत त्याची भाकीतं या पन्नास वर्षांपूर्वीच्या लेखात तुम्हाला वाचायला मिळतील . माझ्या वडीलांच्या आयुष्यावर एक कादंबरी लिहीली जाउ शकते. पण आता ते प्रयोजन नाही म्हणून आज फक्त त्या लेखांची प्रत तुमच्यासमोर ठेवतो आहे.

शक्य तितका प्रयत्न करून स्कॅन कॉपीज दिल्या आहेत. वाचायला थोडे गैरसोयीचे आहे .
इतके दिवस हे कागद मिळाले नव्हते. आता मिळाल्यावर ते पुन्हा प्रकाशीत करणं हेच पुण्यस्मरण.
धन्यवाद.

इतिहाससमाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

सहज's picture

13 Nov 2008 - 7:12 am | सहज

जुने लेख, जुने संदर्भ, जुनी आकडेवारी वाचताना एक वेगळीच मजा येते.

आपल्या वडिलांच्या स्मृतीला अभिवादन

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Nov 2008 - 10:13 am | घाशीराम कोतवाल १.२

कारण वरील लेखात त्यांनी जे मुद्दे मांडलेत ते खरोखरच विचार करण्या सारखे आहेत
संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे
त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे
यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत

विनायक प्रभू's picture

13 Nov 2008 - 11:28 am | विनायक प्रभू

ठाण्यात मो्ह्.विद्यालयात बर्वे मॅडम तुमच्या कोण नातलगापैकी का?माझा एक मोह मधला मित्र मी लवाटे सरांबद्द्ल बोलतो तसाच तो बर्वे मॅडम बद्दल भरभरुन बोलत असे. आज तो ठाण्यातिल एक प्रसिद्ध डॉक्टर आहे.
समुपदेशनाचे खूळ त्यावेळी नव्हते. सत्ताविस सक किती रे हा असले प्रष्न अचानक विचारायचे लवाटे सर. २ सेकंदात उत्तर नाही मिळाले तर डोक्यावर ड्स्टरने समुपदेशन व्हायचे. पाढे तोंड्पाठ.
आज शिक्षक मंडळी सरकार, पालक आणि मुले ह्याच्या दावणिला बांधलेली मु़की असतात.
जरा काही शिक्षक म्हणुन अधिकार गाजविले की लगेच पालक मानसिक छ्ळाची तक्रार घेउन पोचतात.
बर्वे सरांच्या स्मृतीला अभिवादन.
अवांतरः वक्तृत्व स्पर्धेत एकदा मोह मध्ये बर्वे साहेबांकडुन बक्षिस घेतल्याचे अंधूक आठवते. चलो दुनिया गोल आहे.

स्नेहश्री's picture

13 Nov 2008 - 12:09 pm | स्नेहश्री

आमच्या काका आणि बाबा कडुन मी ऐकल आहे.
मी पण त्याच शाळेची विद्यार्थीनी होते.

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी