विश्राम बेडेकर

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
9 Dec 2019 - 3:14 pm
गाभा: 

विश्राम बेडेकरांचा एक किस्सा आहे. एक तरुण त्यांना म्हणाला की, तुम्ही लिहिता ते सारं दर्जेदारच कस ?
बेडेकर त्याला आपल्या एका खोलीत घेउन गेले.
ती खोली लिहिलेल्या कागदांनी भरलेली होती.
ते दाखवून बेडेकर त्याला म्हणाले, 'दर्जेदार नसलेलं मीही बरंच लिहिलंय.
पण काय प्रकाशित करायचं याचा विवेक माझ्या कडे आहे.'

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

9 Dec 2019 - 3:29 pm | श्वेता२४

तो तरुण म्हणजे तुम्हीच का?

जॉनविक्क's picture

9 Dec 2019 - 3:47 pm | जॉनविक्क

हा धागा उडवायला माझी हरकत नाही

धर्मराजमुटके's picture

9 Dec 2019 - 8:19 pm | धर्मराजमुटके

मग त्या खोलीतले सगळे कागद तुम्हाला दिले काय ?

आनन्दा's picture

9 Dec 2019 - 8:43 pm | आनन्दा

१ नम्बर!

किस्सा भारी आहे
मात्र जो विवेक बेडेकरांनी वर्णन केला तो
विवेक अविनाशी नाही
विवेक मर चुका है
और अब रह चुके है कागच के चंद (?) टुकडे
और अब रह चुके है मुफ्त बॅन्डविड्थ के चंद (?) किलोबाइट्स
यावरुन एक सुंदर ओळ आठवली

“Trees are poems the earth writes upon the sky, We fell them down and turn them into paper,
That we may record our emptiness.”

― Kahlil Gibran

मनिष's picture

10 Dec 2019 - 11:56 am | मनिष

“Trees are poems the earth writes upon the sky, We fell them down and turn them into paper,
That we may record our emptiness.”

― Kahlil Gibran

ह्यावरून अपरिहार्यपणे ही कविता आठवली.

झाड तोडायचे, कापायचे,
लगदा करायचा, कागद बनवायचा,
त्यावर लिहायचे, ते छापायचे,
मग वाचायचे.
एवढा खटाटोप कशासाठी ?
सरळ
झाडच वाचावे!
झाड वाचताना
मला तुझाही अर्थ
उलगडत जातो.

~ वसंत आबाजी डहाके

झाड तोडायचे, कापायचे,
लगदा करायचा, कागद बनवायचा,
त्यावर लिहायचे, ते छापायचे,
मग वाचायचे.
एवढा खटाटोप कशासाठी ?
सरळ
झाडच वाचावे!
झाड वाचताना
मला तुझाही अर्थ
उलगडत जातो.

~ वसंत आबाजी डहाके

अंगावर सरसरून काटा आला वाचताना!

चौथा कोनाडा's picture

27 Dec 2019 - 11:16 pm | चौथा कोनाडा

मनिष, +१ एक नम्बर !

श्वेता२४'s picture

10 Dec 2019 - 11:59 am | श्वेता२४

रद्दड धाग्यातून सकस प्रतिसादांद्वारे उत्तम साहित्यरसनिर्मिती :)

जॉनविक्क's picture

10 Dec 2019 - 2:48 pm | जॉनविक्क

तेजस आठवले's picture

10 Dec 2019 - 10:00 pm | तेजस आठवले

पण काय प्रकाशित करायचं याचा विवेक माझ्या कडे आहे.'

हे वाक्य १०० वेळा वाचून काढा.

तुम्हाला स्वयंगोल करता येतो हे माहित नव्हतं.

श्वेता२४'s picture

10 Dec 2019 - 10:51 pm | श्वेता२४

हे वाक्य १०० वेळा वाचून काढा.

तुम्हाला स्वयंगोल करता येतो हे माहित नव्हतं.

लै आवडलं:D

आनन्दा's picture

11 Dec 2019 - 12:04 pm | आनन्दा

स्वयंगोल!! भारी!

बाकी अकुकाका, वाचत असाल तर तुम्हाला कळलं असेल की तुमचा चाहता वर्ग दुरावायला लागलाय..
काय तो बोध घ्याल अशी अपेक्षा

गुरुदेव आम्ही गुलाबी थंडीची वाट बघत आहोत .. ती येईल कि न्हाई ते अजून ठाऊक नाही .. पण आपल्या गुलाबी लेखनाची मात्र प्रतीक्षा आहे एवढं नक्की .. सांगाना गुरुदेव कधी कृपा कराल ?

मुक्त विहारि's picture

14 Dec 2019 - 3:33 pm | मुक्त विहारि

मस्तच. ...

शा वि कु's picture

22 Dec 2019 - 1:13 am | शा वि कु

हि तिसरी मिनी मायक्रो पोत्स नाही का ?

काहीतरी येउद्या गुरूजी