नमस्कार,
धोंडोपंतांनी देवद्वार छंद सोप्या रितिने शिकवल्यावर आमच्या काव्य प्रतिभेला नवे धुमारे फुटले. (काही लोक म्हणाले उधाण आले.) आमच्या प्रतिभेचा वारू चौखूर उधळला. त्याच्या टापा प्रतिसादांतून आणि खरडवह्यातून उमटल्या.
बसलो गाडित
काव्याच्या मजेत
शब्द खटक्यात
देवद्वारी
सुमार विचार
दिसती सुंदर
शद्बा चढे जोर
देवद्वारी
रचतो वेगात
काव्याच्या धुंदित
शब्द अचंबित
देवद्वारी
काव्य ते कसले
चोपूनी बसले
शब्द ते हसले
देवद्वारी
-- लिखाळ.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1567
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
आभारी आहे
In reply to मस्त! by विसोबा खेचर
मस्तच.