नमस्कार,
धोंडोपंतांनी देवद्वार छंद सोप्या रितिने शिकवल्यावर आमच्या काव्य प्रतिभेला नवे धुमारे फुटले. (काही लोक म्हणाले उधाण आले.) आमच्या प्रतिभेचा वारू चौखूर उधळला. त्याच्या टापा प्रतिसादांतून आणि खरडवह्यातून उमटल्या.
बसलो गाडित
काव्याच्या मजेत
शब्द खटक्यात
देवद्वारी
सुमार विचार
दिसती सुंदर
शद्बा चढे जोर
देवद्वारी
रचतो वेगात
काव्याच्या धुंदित
शब्द अचंबित
देवद्वारी
काव्य ते कसले
चोपूनी बसले
शब्द ते हसले
देवद्वारी
-- लिखाळ.
वाचने
1579
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
मस्त! :)
आभारी आहे
In reply to मस्त! by विसोबा खेचर
आभारी आहे तात्या.
-- लिखाळ.
मस्तच.
थोडेदिवसांनी मिपाचे नाव छंदशास्त्रासाठी प्रसिद्ध होणार. :)
छान जमले आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/