Skip to main content

चॉकलेट नारळ बर्फी

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


चॉकलेट नारळ बर्फी




साहित्य: २ कप डेसिकेटेड नारळ. पाऊण कप पाणी पाऊण कप साखर ३-४ मोठे चमचे मिल्क पावडर पाव कप मिल्कमेड २ लहान चमचे वेलचीपूड व्हॅनिला इसेन्स २ चमचे कोको पावडर सजावटीसाठी पिस्ता चुरा, चांदीचा वर्ख. कृती: सर्वप्रथम एका पातेल्यात साखर, पाणी आणि मिल्कमेड टाकून १०-१५ मिनिटं उकळी आणा. आच मंद करून त्यात इसेन्स टाकून त्यातला अर्धा पाक वेगळ्या भांड्यात काढावा. एका भांड्यांत अर्धा पाक वेगळा काढून त्यात बाकीचे खोबरं, वेलचीपूड, मिल्क पावडर हे जिन्नस आर्ध्या प्रमाणात टाका. दुसऱ्या भांड्यांत राहिलेल्या अर्ध्या पाकात कोको पावडर टाकून मग उरलेले जिन्नस टाका. ही मिश्रणं १० मिनिटं शिजवून घ्या. एका ताटाला तुपाचं बोट लावून त्यावर वरील मिश्रण कालथ्याने पसरवून घ्या. वरून कोको पावडरवाल्या मिश्रणाचा थर लावा. शेवटी पिस्त्याचा चुरा भुरभुरा. वर्ख लावा आणि गार करत ठेवा. गार झालं की सुरीला तूप लावून हव्या त्या आकारात वड्या पाडा. naralbarfi
20191016-122815
अनुक्रमणिका

वाचने 16604
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

जीवघेणा फोटो. पाकृ आवडली गणपासेठ. -दिलीप बिरुटे

पाकृ आवडली. डेसिकेटेड नारळ म्हणजे तयार सुक्या खोबऱ्याचा चुरा किंवा चव बाजारात मिळतो तसा की ओलं ताजं खोबरं, खवलेलं?

वड्यांचा फोटो खूप सुंदर आलाय. पाककृती आवडली!

बर्‍यापैकी सोप्प वाटतय हे. करुन बघतो (बिघडले आणि बायको ने हाणला तर तुला बघून घेइन गणपा)