Skip to main content

देवदिवाळी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


देवदिवाळी




स्थलकालाच्या कणाक्षणातून तरंग उठतिल मग अखेरचे सीमेवर असण्या-नसण्याच्या क्षणभर उमलून मिटेल काही
जाणीव नेणीव कुठली, जेव्हा कोसळतील द्वैतांच्या भिंती विश्वद्रव्य लवथवते पुन्हा निराकार होईल लवलाही
चिरंतनाच्या अवघड वेणा सोसून हसणारे क्षणभंगुर उजळत जाईल हलके हलके विस्कळखाईत विझतानाही

20191016-122815
अनुक्रमणिका

वाचने 6157
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

खुप छान! मस्तच!

देणार्‍या मिपाकरांना धन्यवाद! महास्फोटापासून (Big bang)सुरू झालेली विश्वव्यापी दिवाळी महाविलयाच्या (Big crunch) देवदिवाळीपर्यंत चालूच राहील. शारीरिक अस्तित्वाला क्षणभंगुरपणाची मर्यादा असूनही चिरंतनाचा ध्यास असलेली मानवी प्रज्ञा (अस्तित्वात (?) असलीच तर) महाविलयाच्या क्षणी कोणत्या अनुभवांना सामोरी जाईल याचे एक संभाव्य शब्दचित्र या कवितेत रेखाटण्याचा प्रयत्न केलाय.