लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले. मिपा दिवाळी अंक २०१९ अनुक्रमणिका ह्या असल्या पाऊसरात्री ह्या असल्या पाऊसरात्री मी नीज लोटुनी देतो आठवांच्या मऊ उशीला हलकेच कुशीत घेतो रात्र कशी सरावी? या अवघड प्रश्नामध्ये नाव कागदी सोडून हेलकावे बघत बसतो प्रौढ जलधारांच्या सुरात चालती गप्पा मी त्यांच्या मैफलीला पहिल्या रांगेत बसतो किती नाही म्हणावे मी हळवा उगाच होतो तुझे गाणे तुझ्यासाठी माझ्याही नकळत गुणगुणतो अनुक्रमणिका वाचने 2741 प्रतिक्रिया 3 प्रतिक्रिया वा, वा! यशोधरा शनिवार, 26/10/2019 14:00 वा, वा! आहाहा श्वेता२४ शुक्रवार, 08/11/2019 17:41 अलगद, हळुवार कविता अलवार, सुरेख. अलकनंदा मंगळवार, 19/11/2019 13:54 अलवार, सुरेख.
प्रतिक्रिया
वा, वा!
आहाहा
अलवार, सुरेख.