प्रेमाची लांबी

Primary tabs

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
24 Sep 2019 - 9:06 pm

प्रेमाची लांबी
--------------
नवरा बायको कशावरूनही भांडतात. पण त्याचं अन तिचं कशावरून बिनसलं हे कळलं, तर तुम्हाला गम्मतच
वाटेल.

तिला टीव्हीवरच्या मालिका बघून तसलेच दागिने घालावेसे वाटत .’ लाडकी बायको’ ही तिची सध्याची जाम आवडती मालिका होती .

एके दिवशी- मालिका चालू असताना तो आला. त्या दिवशी लाडकीने लांब मंगळसूत्र घातलं होतं. डिझायनर !
ती म्हणाली ,” अहो, मलाही असंच मंगळसूत्र हवं. नवऱ्याचं प्रेम जेवढं जास्त तेवढं मंगळसूत्र लांब असतं !”
तो हसत म्हणाला, “अस्सं ? मग तर तुला गळ्याला घट्ट बसेल एवढंसच मंगळसूत्र करायला हवं !”

त्यावर ती अशी काही रुसली म्हणताय.

शेवटी तो रुसवा काढायला त्याला ते लांब मंगळसूत्र करावंच लागलं . तेव्हा कुठे तिच्या प्रेमाची लांबी जागेवर आली.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

मला वाटलं आता तुम्ही लांबी मोजणारच! पण कसचं काय.. फुसका बार निघाला