EMI - एकदा तरी बघाच

योगी९००'s picture
योगी९०० in जनातलं, मनातलं
9 Nov 2008 - 12:20 am

Wednesday नंतर जेवढे नवीन चित्रपट आले, ते मी अर्ध्यावरच सोडून दिले. 'द्रोणा'' तर पहिल्या पंधरा मिनीटानंतरच बंद केला.

आज खुपच कंटाळा आला आणि बर्याच दिवसांनी उर्मिला आणि संजूबाबाचा चित्रपट म्हणून EMI बघायला घेतला. अर्थात मान्यवर समिक्षकांनी
दोनच स्टार दिले असले तरी थोडा पहावा असा विचार केला.

चित्रपट तसा हलका फुलकाच आहे. पण आशय महत्वाचा. "कर्ज काढून सण साजरे करू नये" हे सांगण्याचा प्रयत्न आहे. तशी कथा चार वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर फिरते.
सर्वानाच पैसा हवा आहे. कोणाला घर, गाडी, परदेशात मधूचंद्र यासाठी ,कोणाला मुलांच्या परदेशातील शिक्षणासाठी तर कोणाला रोज रोज बाई बाटलीसाठी..

सर्वांचा पैसा मिळवायचा मार्ग साधारण एकच - बॅंकेकडून कर्ज नाहीतर बेलगामी क्रेडिट कार्डचा वापर..आणि हफ्ता नाही भरला की लागतो पाठी वसूली दादांचा ससेमिरा.

आणि नंतर सर्वांना त्यातून आपला मसीहा संजूबाबा कसा सोडवतो हा उत्तरार्ध. (संजूबाबाला कायमचा मुन्नाभाई बनवायचे ठरवले दिसते).

तसा चित्रपट साधारणच आहे. पण मला मात्र आवडला. एक तर हा चित्रपट बघताना गाणी सोडून कोठेच कंटाळा आला नाही. वसुली दादांचे विनोद तसे चांगलेच होते. शेवटी शेवटी उगाच संजूबाबा चांगले चालू असलेले काम सोडून उर्मिलाच्या प्रेमात पडतो असे वाटले. सर्व कलाकारांचा अभिनय ठिकठाक आहे. मधे उगाच दोन-तीन-गाणी आहेत, पण पाणी पिणे, किंवा संगणकावर चित्रपट पहात असल्यास अंग जरा सैल सोडणे, आळस देणे यासाठी या गाण्यांचा उपयोग होतो.

पण एकदा जरूर बघावा. दुरद्रुष्टीचा अभाव आणि योग्य नियोजन न केल्याने माणूस कर्जाच्या विळख्यात कसा अडकत जातो हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे.

कदाचित क्रेडिट कार्ड किंवा कर्ज यासाठी त्रास देणार्या मंडळींना "हा चित्रपट पहा आणि मगच आम्हाला तुमच्या कर्जाच्या मोहात पाडा" असे सांगण्यासाठी तरी उपयोग होईल.

खादाडमाऊ

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

कपिल काळे's picture

9 Nov 2008 - 12:34 am | कपिल काळे

<>

<<आज खुपच कंटाळा आला आणि बर्याच दिवसांनी उर्मिला आणि संजूबाबाचा चित्रपट म्हणून EMI बघायला घेतला. >>

जाळ्यावर उपलब्ध आहे का? दुवा द्यावा.

विषयाबद्दल, : इथे अमेरिकेत लोकांना पगार पुरत नाही. क्रेडिट कार्डच्या कर्जात बुडालेले असतात. पे डे लोन्स असा एक प्रकार आहे ( पगाराचा चेक दाखवा आणि कर्ज मिळवा)

असेच इ.एम.आय भरता न आल्यामुळे सब प्राइम पेच उभा राहिला. अर्थव्यवस्था धुळीस मिळवून गेला.

भारतात त्यामानाने कर्ज देताना / घेताना फार विचार केला जातो. तरी भारतात ही सब प्राइम पेच उभा राहिल असे मला वाटते. गॄहकर्जात नव्हे तर, मोठे व्यावसायिक प्रकल्प कर्जावर बांधले गेले आहेत. त्यातील दुकानांमध्ये खरेदीला कोण येणार? आता मंदी चालू आहे. क्रयशक्ती घटली आहे त्यामुळे त्यांच्या धंदयावर परिणाम झाला की त्यांनी प्रकल्प साठी घेतलेले कर्ज फेडले कसे जाइल?

भारतात अश्याप्रकारचा सब प्राइम पेच उभा राहिल असे वाटते.

बरं चित्रपटांचा दुवा इथे देणे.

माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/

योगी९००'s picture

9 Nov 2008 - 1:38 am | योगी९००
कपिल काळे's picture

9 Nov 2008 - 10:25 pm | कपिल काळे

कालच बघितला. थोडफार मुन्नाभाईच्या अंगाने जातो. पण एकदा जरुर बघावा. दुव्यबद्दल धन्यवाद

http://kalekapil.blogspot.com/