श्री शरद पवार _एक आठवण -------------------------------

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
16 Jul 2019 - 3:42 pm

.

माझं एम आय डी सी भोसरी मध्ये लघु उद्योग युनिट होते
साल नेमके आठवत नाही
पण कै विशवनाथ प्र सिंग हे त्या काळात प्रधान मंत्री होते
एके दिवशी बातमी आली की सिंग सरकारने लेबर चार्जेस कारणा-या कारखान्या ना पण एक्ससाईज ड्युटी लागू केली आहे
हि बातमी समजतात आम्हा उद्योजकांच्या पोटात गोळा उभा राहिला
पोस्ट समजण्या साठी लेबर चार्जेस म्हणजे काय ते समजावून घेणे आवश्यक आहे
उद्योजकांची २ प्रकारात वर्गवारी होते
१- म्यानुफ्याक्चरर म्हणजे स्वताचे प्रोडक्त्त असणारे
म्यानुफ्याक्चरर कडे स्वताचे प्रोडक्त्त असते ते कच्चा माल विकत घेतात व वस्तू तयार करून त्याचे मार्केटिंग करतात व बाजारात विकतात
म्यानुफ्याक्चरर ना सेल्स टॅक्स एक्ससाईज ड्युटी आदी कर लागू असतात
अश्या म्यानुफ्याक्चरर ची संख्या नगण्य असते म्हणजे ४-५% साधारण असते /असावी
२- साधारण ९५% उजयोजक लेबर चार्जेस वर काम करत असतात
लेबर चार्जेस म्हणजे ते टाटा बजाज आदी कंपन्यांची कामे करत असतात
कम्पनी त्यांना मटेरियल देते व ते दिलेल्या ड्रॉईंग नुसार वस्तू बनवत असतात
यांचा टर्न ओव्हर (उलाढाल) लाखोंच्या घरात असते
या उद्योजकांना सेल्स ट्याक्स एक्ससाईज ड्युटी आदी लागू नसते
सरकारी फतव्या मुळे सर्व कारखान दारांना एक्ससाईज ड्युटी लागू होणार होती
त्या मुळे सर्व उद्यजकांचे धाबे दणाणले
मुद्दा एक्ससाईज ड्युटी भरण्याचा नव्हता कारण उद्योजक एक्ससाईज ड्युटी आपल्या खिशातून भारत नसतो तर तो ग्राहकाला ती आकारात असतो व त्याचा भरणा सरकारी तिजोरी त करत असतो
पण हा कायदा खुप कडक होता / आहे
शिवाय रोजचे रजिस्टर ठेवा महिन्याला स्टेटमेन्ट व भरणा करा आदी खूप क्लिष्ट व किचकट बाबी होत्या
त्यात जरा चूक झाली की नॉन बेलेबल वोरण्ट
किर्लोस्कर सारख्या दिग्ग्ज उद्योजकांना यांनीदिवस चौकीत डाम्बले होते
तर छोट्या उद्योजकांची हे काय तमा बाळगणार
शिवाय इन्स्पेकटर आला कि त्याची सरबराई पाकीट हा पण एक ताप असे
या सा-या मुळे आमचे धाबे दणाणले होते
आम्हा उद्योजकांची एक स्मॉल स्केल असोसिएशन होती
त्याचा अध्यक्ष इथापे वा बगाडे असे कुणीतरी होते नेमके नाव आठवत नाही
असोशियन चे सदस्य अध्यक्ष - सदस्यांचे शिष्ट मंडळ श्री पवार सरांना भेटायला गेले आहे अशी कुणकुण आम्हाला लागली
चर्चा गुप्त स्वरूपाची असल्याने नेमकी चर्चा काय झाली ते माहीत नाही
मात्र उद्यजकांनी ह्या कायद्याच्या निषेध म्हणून एक दिवस कारखाना बंद ठेवायचा आणि सायंकाळी ७ वाजता श्री पवार साहेब न्यू इंग्लिश शाळेत मालक वर्गाच्या अडचडी समजावून घेणे व पुढची रणनीती यावर मार्गदर्शन करणार असा आदेश आला .
ठरल्या प्रमाणे कडकडीत बंद पाळण्यात आला
रोज ज्या कारखान्यात २४ तास यंत्रे काम करत असत ते थंडावले होते
सा-या एम आय डी सी त शांतता होती
सा-यांना श्री पवार कार बोलणार याबाबत उत्सुकता होती
सायंकाळी आम्ही सारे सभेला उपस्तित होतो
साधारण ७००-८०० उद्योजक असतील सभेला
व्यासपीठावर अध्यक्ष श्री पवार साहेब श्री अरुण गुजराथी श्री रामकृष्ण मोरे असोशिएन चे अध्यक्ष भाजप चे श्री आण्णा जोशी आदी मान्यवर होते
प्रथम असोशिएन चे अध्यक्ष यांनी उद्यजकांच्या अडचणी आदीची ओळख करून दिली
त्या नंतर इतर मान्यवरांची भाषणे सुरु झाले
शेवटी श्री पवार साहेब बोलण्यास उभे राहिले
जेव्हा सर्व मार्ग बंद होतात त्या वेळी अन्याया विरुद्ध रस्त्यावर उतरून संप बंद आदीचा वापर करावा लागतो हे मालक वर्गात समजले ते बरेच झाले
असा नर्म विनोदी टोला पवार साहेबानी मारताच श्रोत्यात खसखस पिकली
नंतर त्यांनी आपल्या अडचणी मी समजावून घेतल्या आहेत एक दोन दिवसात मी व आपले शिष्ट मंडळ दिल्लीस जाणार आहे
आपल्या अडचणी सिंग साहेबाच्या कानावर घालू व काय करता येईल ते बघू
असे बोलून सभेची सांगता झाली
पुढे बंद संपला उद्योजक कामाला लागले
एम आय डी सी त कारखाने धडाडू लागले
पुढे ६-७ दिवसांनी मित्र भेटला व म्हणाला ? बातमी वाचली का?
मी नाही म्हणालो -अरे तो कायदा साहेबानी रद्द करायला लावला
अरे मस्त झाले राव -डोक्याची कटकट मिटली
*
उद्योग व शेती हि विकासाची दोन चाके आहेत हे जाणणारा श्री पवार हा लोकनेता आहे
दोन्ही आघाडीवर जरा जरी अडचणी आल्यातरी पवार साहेब लक्ष ठेऊन असल्याने तक्रारीचा तातडीने निचरा होतो
एखाद्या शेजारी बांधवांच्या सावकार तगादा लावत संसार उद्ध्वस्त करत असेल तर त्याला तातडीने मदत मिळतेच व अप्रिय टाळले जाते
एखादा कामगार वा संप असेल तर त्या मध्य मार्ग काढून तडजोड केलेली पाहण्यात येते
टेल्को बजाज गरवारे अश्या मोठ्या उद्योग समूहाचे तंटे साहेबानी
सोडवल्याचे आपणास माहीत आहे
अबकारी अन्याय कर कायदा रद्द करून जो मोकळा श्वास आम्हा उद्योजकांना घ्यायला मिळाला त्या बद्दल उद्योजकांच्या मनात श्री पवार साहेब यांच्या बद्दल आदराचे स्थान कायम स्वरूपी राहील यात शंका नाही

धोरणअनुभव

प्रतिक्रिया

हस्तर's picture

16 Jul 2019 - 4:11 pm | हस्तर

अत्यंत शृंगारिक कथा
नरम विनोदी

अविनाशकुलकर्णी's picture

16 Jul 2019 - 4:34 pm | अविनाशकुलकर्णी

काय ह -सकस लिहायचे नाही का -औघड हाय

चुंबनाचा वर्षाव शिवाय मजा नाही
इथे पण कुठेतरी ऍड करा

विजुभाऊ's picture

17 Jul 2019 - 11:43 am | विजुभाऊ

शरद पवारांच्या बाबतीत ?

टवाळ कार्टा's picture

16 Jul 2019 - 5:06 pm | टवाळ कार्टा

चक्क अकुकाकांचा प्रतिसाद...आज मी जग पूर्ण बघितले ;)

त्यासाठी हस्तर इतके पुण्य कर्म असावे लागते

प्रतिसाद अजून समजला का कोणाला ?

फुटूवाला's picture

16 Jul 2019 - 5:30 pm | फुटूवाला

गुरुपोर्णिमेच्या दिवशी गुरूंनी समस्त मिपाकरांना दर्शन दिले.

धन्य झालो.

नेमकं लिहिलंत हो. आता मतदार त्यांना निवडून का देत नाही हे एक कोडेच आहे. तुम्हाला काय वाटते?

त्यांना कमी समजू नका ,माणूस खूप प्यादे हलवत आहे

ट्रम्प's picture

16 Jul 2019 - 5:11 pm | ट्रम्प

आणि या लेखात एक ही प्रधान , जोशी , आपटे , कुलकर्णी नाहीत !!! तसेच खोब्रागडे चे अंतरजातीय लग्न पण नाही .
छे !!! लेख जरा आळणी झाला आहे .

माहितगार's picture

16 Jul 2019 - 5:14 pm | माहितगार

व्यक्तिशः व्यक्तिपूजा आणि घराणेशाही समर्थन दोन्ही शक्य नाही.

तरीही

एखाद्या व्यक्तिने पाळलेल्या शब्दाची केलेल्या योग्य कामाची वाजवी दखल घेणे हे सुद्धा स्तुत्य आहे, या बद्दल पवारजींसोबत लेखक महोदयाचे कौतुक.

हस्तर's picture

23 Jul 2019 - 12:37 pm | हस्तर

घराणे शाही कुठे नाहीये ?

झेन's picture

16 Jul 2019 - 6:52 pm | झेन

आपल्या देशात डायरेक्ट टॅक्सचा बेस वाढवू शकत नाही म्हणून सरकारनी आधी एक्ससाईज मग सर्व्हिस टॅक्स आणि आता जिएस्टी आणून ठेवला आहे. कुठल्याही सामान्य व्यक्तिला कळतच नाही या महिन्यात मी नेमका एकूण किती अप्रत्यक्ष कर भरला.

पवारसाहेबांबद्दल माहितीपूर्ण लेख?

आज अचानक असा लेख का बरं लिहिला?

Content मार्केटींगमधलं एक तंत्र आहे - subtle promotion. अकूंनी आधी कार्पेटबॉम्बींग केल्यागत कथा आणि लेख यांचा खच पाडला... इतका की केवळ त्यांच्याच लेखनाने मिसळपावचा पृष्ठभाग भरून टाकला. त्यांनी हेही बघितलं की त्यांनी केलेलं लेखन वाचलं जातंय (कोणत्याही कारणाने का असेना...).
आणि त्यानंतर अलगदपणे हा लेख लिहिला जेणेकरून तो अधिकाधिक लोक वाचतील. Content marketing with a twist.

हा केवळ तर्क आहे आणि तो चुकलेलाही असू शकतो.

अकूकाका, कृपया हलके घेणे.

हे पोलिटिकल मार्केटिंग आहे
पवार साहेबांचा चाणाक्षपणा मी पण मानतो पण मगरपट्टा ला वीट आला होता हपापापले पणाचा

सुधीर कांदळकर's picture

17 Jul 2019 - 6:43 am | सुधीर कांदळकर

कायद्याबद्दल आपल्याला चुकीची माहिती दिली गेलेली आहे. त्या कायद्यातील तेव्हाच्या ५७/एफ/३ या नियमाखाली मूळ उत्पादक काही विशिष्ट प्रक्रियासाठी माल इतर कारखान्यात पाठवू शकत असे. हा माल त्या ठराविक प्रक्रियेनंतर विहित मुदतीत मूळ उत्पादकाला परत पाठवावा लागत असे. ड्यूटी भरणे तसेच माल विहीत मुदतीत परत मिळविणे ही जबाबदारी मूळ उत्पादकाची असे.

माल परत पाठविण्यास उशीर झाल्यास मात्र त्या मालाच्या किंमतीवर जी मूळ उत्पादकाने ५७/एफ/३ चलानात जाहीर केलेली असे त्या किमतीवर ड्यूटी भरावी लागत असे.

आपल्याला ड्यूटीवरील एक्साईज अधिकार्‍याने बनविलेले दिसते. या बनवेगिरीत आणखी कोण कोण सामील होते ते शोधून काढा.

सुधीर कांदळकर's picture

17 Jul 2019 - 6:50 am | सुधीर कांदळकर

झाले ल्या उशीरामुळे ड्यूटी आकारली गेली असेल. ती दिरंगाई पवारसाहेबांच्या मध्यस्थीने सरसकट सर्वांना माफ केली गेलेली असेल.

पवारसाहेब अशा अडचणीत नेहमी मदत करतात. जर लबाडी नसेल तर.

सुधीर कांदळकर's picture

17 Jul 2019 - 6:51 am | सुधीर कांदळकर

झाले ल्या उशीरामुळे ड्यूटी आकारली गेली असेल. ती दिरंगाई पवारसाहेबांच्या मध्यस्थीने सरसकट सर्वांना माफ केली गेलेली असेल.

पवारसाहेब अशा अडचणीत नेहमी मदत करतात. जर चोरी वा लबाडी नसेल तर.

ट्रेड मार्क's picture

17 Jul 2019 - 7:18 am | ट्रेड मार्क

लेखाचे हेडिंग वाचून आधी पेपर बघितला.... म्हणलं काही विपरीत झालं की काय...

एक आठवण वगैरे... असं काही करू नका हो... अजून त्यांना पंतप्रधान बनायचं आहे.

चौकटराजा's picture

17 Jul 2019 - 9:04 am | चौकटराजा

काळजी नसावी . विधात्याने आपला खास वेळ का कसब खर्च करून साहेबाना बनविले आहे. हा माल असातसा नाही ! ))))

फुटूवाला's picture

17 Jul 2019 - 10:18 am | फुटूवाला

अजून त्यांना पंतप्रधान बनायचं आहे.

:)

Rajesh188's picture

17 Jul 2019 - 1:21 pm | Rajesh188

कथेचं शीर्षक वाचलं आणि पहिले न्यूज चॅनेल चालू केलं.
काही भलत सलत तर घडल नाही ना ही शंका .

चौथा कोनाडा's picture

17 Jul 2019 - 5:45 pm | चौथा कोनाडा

भारी किस्सा आहे. तुमच्या या अनुभवाला सलाम !
राव, आजोबांची एव्हढी पुण्याई , मग का दाखवला नातवाला घरचा रस्ता ?

साहेब एक दिवसांचे का होईना पंतप्रधान व्हावेत, हीच सोनिया चरणी प्रार्थना !

मोदी साहेब असे पर्यन्त शक्य नाही
पवार साहेबानी एवढ्या दिवसात दुसऱ्या देशात गेले असते तर जिंकला पण असता

इसम मुख्यमंत्री झाला हेच लायकीपेक्षा जास्त आहे

इतकं असूनही सलग पाच वर्षे पूर्ण केली नाहीत आणि तीच देवेंद्र फडणवीस करतीलच याचा त्रास होतो त्याच्या बगलबच्चे आणि पोसलेल्या संघटना यांना

दुसऱ्याच्या आशीर्वादाने पंत प्रधान पण बनता येते
स्व कर्तृत्व काय ?

चौथा कोनाडा's picture

19 Jul 2019 - 6:07 pm | चौथा कोनाडा

साहेबांच्या पंतप्रधान बनण्याच्या स्वप्नाला खो ?
त्यांनी सोनिया गांधी विदेशी म्हणत मराठी स्वाभिमानी बाणा दाखवत काँगी मधून फुटून नवीन स्थापन केलेल्या राष्ट्रवादी पक्षाबद्दल चिंताजनक बातमी आहे.

राष्ट्रवादीलाच असलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोग काढून घेणार म्हणे !
ही बातमी वाचा !

https://www.esakal.com/desh/election-commission-notice-ncp-200592

राष्ट्रवादीचे बुरे दिन; राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता जाणार?

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी हे आवश्यक :
- निवडणूक आयोग 1968 च्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देते.
- त्या पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार पाहिजे.
- त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांत लोकसभा निवडणुकीत किंवा तेथील विधानसभा निवडणुकांमध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली पाहिजे.
- चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता पाहिजे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर देशात अनेक राजकीय पक्षांना जोरदार धक्का बसला होता. आता निवडणूक आयोगाकडूनही या पक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे. आयोगाने अनेक पक्षांना त्यांना दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिली असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला आज (गुरुवार) नोटीस दिली आहे. आयोगाच्या या नोटीशीवर राष्ट्रवादीला 20 दिवसांमध्ये उत्तर द्यावे लागणार आहे. उत्तर न आल्यास राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जबर धक्का बसला. महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांच्या फक्त 5 जागा आल्या होत्या. यात काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली तर राष्ट्रवादीला चार जागांवर समाधान मानावे लागले होते.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी हे आवश्यक :
- निवडणूक आयोग 1968 च्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देते.
- त्या पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार पाहिजे.
- त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांत लोकसभा निवडणुकीत किंवा तेथील विधानसभा निवडणुकांमध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली पाहिजे.
- चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता पाहिजे.

राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले असले तरी इतर नियमांची पुर्तता करणे पक्षाला जमले नाही त्यामुळे पक्ष काय उत्तर देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली की त्या पक्षाला कार्यालयासाठी मोठ्या शहरांमध्ये कमी किंमतीत जागा आणि देशभर एकच निवडणूक चिन्ह अशा अनेक सुविधा मिळत असतात.

वाईट वाटतेय त्यांच्या साठी !

नाखु's picture

19 Jul 2019 - 6:28 pm | नाखु

एकाने प्रश्न विचारला आहे की भाजपाचे एकदा फक्त दोन खासदार होते तर त्यांच्या पक्षालाच कशी मान्यता दिली होती.
अशी अर्धवट माहिती असलेल्या समर्थकांच्या पक्षांचं भवितव्य काय??
महाराष्ट्रातील सोडून आणखी कुठे खासदार आहेत रा काॉंचे ??

अशीच बातमी ५ वर्ष आधी पण आली होती

चौथा कोनाडा's picture

23 Jul 2019 - 10:32 pm | चौथा कोनाडा

माझया वाचनात आलेल्या माहितीनुसार मागच्या निवडणूक वेळी पेशल सूट (परवानगी) दिली होती.
भाजपाला सूट दिली त्यावेळी हा नियम होता कि नाही ते माहीत नाही !
राजकीय तडजोडीसाठी पुन्हा ही सूट देणार कि काय पाहावे लागेल.
कारण नोटिशीला उत्तर देण्यासाठी १८ जुलै+ २० दिवस म्हणजे साधारण १० ऑगस्ट पर्यंतची मुदत आहे.
आता हे पक्ष (राष्ट्रवादीसहित) काय उत्तर देणार ? नियमच असे असतील तर. राजकीय तडजोड करावी लागणार राष्ट्रवादीला

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

18 Jul 2019 - 7:34 pm | प्रलयनाथ गेंडास...

कौतुक? चुकून कधीतरी !

https://www.misalpav.com/node/44872

हा धागा वाचून ...

योगायोगाने या धाग्यावर आलो (अर्थातच इंट्रेष्टिंग प्रतिक्रियांसाठी )

पाहतो तर काय ? त्या धाग्यावर डोसचा, येथे (प्रतिक्रियांपाहून), जास्त परिणामकारकता दिसतेय !

चौथा कोनाडा's picture

19 Jul 2019 - 5:51 pm | चौथा कोनाडा

+१ धागा आणि प्रतिसाद !

स्वतःची ठाम मत असणारे नेते खरोखर कौतुकास्पद असतात .
जे कोणाच्या प्रभावाखाली नसतात त्यामुळं राजकीय जीवनात अस्थिर असतात पण असतात स्वतःच्या मनाने वागणारे त्या व्याख्येत शरद पवार बसत असावेत

स्वतःची ठाम मत असणारे नेते खरोखर कौतुकास्पद असतात .
जे कोणाच्या प्रभावाखाली नसतात त्यामुळं राजकीय जीवनात अस्थिर असतात पण असतात स्वतःच्या मनाने वागणारे त्या व्याख्येत शरद पवार बसत असावेत

प्रसाद_१९८२'s picture

27 Jul 2019 - 8:01 pm | प्रसाद_१९८२

सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे इतर पक्षात जे पलायन सुरु आहे ते पाहाता, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे फक्त पवार कुटुंबियच उरतील असे दिसतेय !
--
शरद पवारांनी इतर पक्षातील निवडून येणारी लोक फोडून स्वत:चा पक्ष निर्माण केला व आता तीच लोक १५ वर्षे सत्तेची मलई चापून, दुसर्‍या पक्षात पलायन करत आहेत. पवारांनी जे पेरले तेच आता उगवतेय !

हस्तर's picture

30 Jul 2019 - 2:52 pm | हस्तर

हे राजकारण आहे
असे पण होऊ शकते मुद्दाम लोक पेरली आहेत आतल्या खबर द्यायला

चौथा कोनाडा's picture

1 Aug 2019 - 11:46 pm | चौथा कोनाडा

ताजे वृत्त :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गटबाजीमुळे पक्ष सोडलेला नसून चौकशीच्या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी भाजपचा मार्ग पत्करला असल्याचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

खरंच राव, काय राजकारण सुरु आहे तेच कळत नाहीय.