आभाळ पडलंय खड्ड्यात ; खड्डा पार आभाळात !

इरामयी's picture
इरामयी in जनातलं, मनातलं
6 Jul 2019 - 6:40 pm

"... कोणताही प्रश्न आपला स्वत:चा असतो, आपलं त्याबद्दल काहीतरी इंटरप्रिटेशन असतं आणि आपण ते लोकांवर थापत असतो. Why? एकमेव कारण म्हणजे आपल्याला आतून त्या उत्तराबद्दल Recognition आलेलं नसतं, म्हणून तीच गोष्‍ट आपण बाहेर सांगून बाहेरुन Recognition मिळण्याचा प्रयत्न करतो. बाहेरुन कुणी दिलेलं रेकग्नीशन, तुमची दुसर्‍याने तयार
केलेली कुठलीही ओळख बोगस असते. ..."

Source: http://www.misalpav.com/node/21802

(धन्यवाद, यकूजी)

::::

खूप दिवस / वर्षं झाली या गोष्टीला. तेंव्हा माझा ईश्वराच्या अस्तित्त्वावर विश्वास नव्हता. देवळात जाणं मला पसंत नसे. कोणी देवळात जाऊ म्हटलं की माझ्या कपाळावर आठ्या. आणि अगदी नाईलाजास्तव जावं लागलं तर बाकी सगळे देवळाच्या आत आणि मी बाहेर असाच सगळा प्रकार असायचा. त्या काळात माझे "ईश्वराची गरज काय?" या प्रश्णावरून स्वतःवरच प्रयोग चालत.

मी शान्तपणे स्वत:च्या विचारांचा / भावनांचा हळूहळू मागोवा घेत स्वत:ला प्रश्ण विचारून मनात कोणते विचार येतात , कोणत्या भावना दाटतात हे बघत असे. त्यात्लाच एक महत्त्वाचा प्रश्ण असायचा: "समजा ईश्वर असेल तर काय?" आणि त्याविरुद्ध दुसरा तितकाच महत्त्वाचा प्रश्ण असायचा: "समजा ईश्वर नसेल तर काय?"

समजा ईश्वर असेल तर काय?
या प्रष्णावरून मनात वेगवेगळ्या शक्यता, भावना आणि विचार निर्माण होत. त्यातली सगळ्यात प्रभावी म्हणजे - समजा ईश्वर असेल तर आहे दिलासा. हा दिलासा कशाबद्दल - तर आधार असल्याबद्दल , एका प्रकारच्या निश्चितीबद्दल. बरं मग निश्चिती असेल तर दिलासा का बरं? तर तो दिलासा निर्भय बनवतो म्हणून. बरं मग भिती नक्की कशाबद्दल - तर अनिश्चिततेबद्दल. म्हणजे नक्की कशाबद्दल? तर जे/ ज्याबद्दल काही माहीत नाही त्याबद्दल. म्हणजे अज्ञात गोष्टींबद्दल. बरं मग ज्ञात असलेल्या गोष्टींचं भय नाही का? आहे ना, उदाहरणार्थ समोर नरभक्षक वाघ उभा राहिला तर? तर ती आहे मृत्यूची भिती -- मृत्यूची भिती का बरं? कारण मृत्यूबद्दल काहीच माहित नाही - म्हणजेच पुन्हा अज्ञाताची भिती. आता जर मग देव असेल तर आहे दिलासा ...

आता एक पायरी खाली उतरूयात... पुढे गेल्यावर ... बरं, आता भिती अजिबात उरली नाही... पुढे काय? पुढे... मग... असलेल्या परिस्थितीचा कंटाळा... का बरं? कारण मग अज्ञात असं काही उरलंच नाही पण बुद्धीला भूक आहे अज्ञाताची. अजून एक Matrix -- अज्ञाताचा ध्यास - Adventure हवंहवंसं वाटणं.

एक पायरी अजून खाली जाऊयात...

असं का बरं? कारण आपलं अस्तित्त्वच आहे अनुभवासाठी. अज्ञात गोस्टींचा अनुभव घेऊन त्या ज्ञात करून घेण्यासाठी.


समजा ईश्वर नसेल तर काय?

ताबडतोब मनात भितीचे तरंग -- कारण दिलासा देणारं बलवान असं काहीच नाही. अंधार -- काळाकुट्ट! काहीच दिसत नाही... म्हणजे काय? अज्ञात. अज्ञाताची भिती. आणि आता या अज्ञाताच्या काळोखात देवाचा दिलासा नाही - अजूनच भिती... पण समजा हेच एक सत्य असेल तर काय? तर मग अज्ञाताचा संपूर्ण स्विकार करायचा... बरं मग केला स्विकार. आता काय? आता भिती हळूहळू कमी होत चालली. बघ अजूनही सगळं अज्ञात आहे आणि देव नाही - तरीही भितीचा मागमूस उरला नाही? आता देवाची गरजही उरली नाही.

आता पायरी अजून खाली उतरूयात -- ज्ञात / अज्ञात या बाहेरच्या गोष्टी झाल्या. त्याबद्दल मनात भावभावनांचे तरंग कशामुळे उठत आहेत? त्यातली या विचारांना, भावनांच्या कल्लोळाला चालना देणारी मूळ भावनना कोणती? ती आहे - "भिती असणं" आणि "भिती नसणं" यांच्यापासून निर्माण झालेलं अद्वैत-आवर्त. ते अद्वैत यासाठी कारण एक नसेल तर दुसर्‍याला अस्तित्त्व नाही. "भिती नसणं" म्हणजेच निर्भयत्त्व -- म्हणजेच प्रेम असणं, त्यातून निर्माण होतो विश्वास -- आणि त्यातून येते निश्चिती -- आणि त्यातून येते निश्चिंती असणं... आणि मग - पुन्हा एकदा matrix -- अज्ञाताचा ध्यास - Adventure हवंहवंसं वाटणं.

आता एका दुसर्‍या प्रतलावर जाऊन पाहू. Recognition का बरं हवंहवंसं वाटावं? याच्या मुळाशी आहे भिती -- आपलं अस्त्तित्त्व नाकारलं जाण्याची भिती -- मग बाहेरून येतो एक Recognition च्या रुपात दिलासा: You are accepted. म्हणजे अज्ञातापासून काही क्षणांपुरती का होईना, सोडवणूक.

आता अजून एक पायरी खाली जाऊयात. हा जो दिलासा, निश्चिंती आपण आपल्या मेंदूत हवी तेंव्हा निर्माण करू शकलो तर? तर .. तर... बस्स. आज इथेच पुरे.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

6 Jul 2019 - 6:59 pm | कुमार१

दिलासा, निश्चिंती आपण आपल्या मेंदूत हवी तेंव्हा निर्माण करू शकलो तर? >>> +१११

जालिम लोशन's picture

6 Jul 2019 - 6:59 pm | जालिम लोशन

त्यामुळेच मुसलमान, ईसाई, यहुदी धर्म फोफावले, वाढले. त्यामधे पॅरिश, उमाह, वगैरे concept आहे जे मानसिक आर्थिक आधार अडचणीच्या काळात व्यक्तीला देतात. त्यासाठी नियमीत वर्गणी ते चर्च, मशिद, सिनेगाॅग मधे गोळा करतात. व पगारी धार्मीक नेते त्यासाठी नेमलेले असतात.

राघव's picture

6 Jul 2019 - 7:34 pm | राघव

असाही विचार असतोय होय.. कल्पना नव्हती. ठीक आहे.

स्वतःच्या अस्तित्वाच्या भितीतून ईश्वराच्या अस्तित्वाचा शोध म्हणजेच एकमेव मार्ग काय? म्हणजे फक्त त्या दिलाशासाठीच हे अस्तित्व शोधायचं काय? किंवा या दिलाशासाठीच अस्तित्व नाकारत बसायचं काय?

की अजूनही काही मार्ग असू शकतात?

पण हे काम खूप अवघड आहे .
जितके की एकद्या योगी पुरुषाला सुद्धा आपल्या सर्व वासना,इच्या,काबूत ठेवणे अवघड आहे

अभ्या..'s picture

6 Jul 2019 - 8:31 pm | अभ्या..

तर .. तर... बस्स. आज इथेच पुरे.

देव कल्पनाच नसली तर भीती कशी उरेल?

जॉनविक्क's picture

6 Jul 2019 - 9:24 pm | जॉनविक्क

Your god is outcome of your own frustration.

कंजूस's picture

6 Jul 2019 - 9:25 pm | कंजूस

आज इथेच पुरे.

महत्त्वाचे म्हणजे माणसाला स्वतःची मतेच नसतात ती परिस्थती नुसार बदलत असतात ..
काहीच धोका नसताना गुंड लोकांचा प्रतिकार केला पाहिजे असे तावातावाने स्वतःची मत सांगणार स्वतः वर तशी वेळ आली तर स्वतःच्याच मता विरूद्ध वागतो हे त्रिकाळ बाधित सत्य आहे
ईश्वर नाही असे म्हणणारे जेव्हा अत्यंत कठीण प्रसंग येतो तेव्हा स्वतःची मते बाजूला ठेवून १ min साठी तरी चमत्काराची आशा करतो

जॉनविक्क's picture

7 Jul 2019 - 2:46 am | जॉनविक्क

ईश्वर नाही असे म्हणणारे जेव्हा अत्यंत कठीण प्रसंग येतो तेव्हा स्वतःची मते बाजूला ठेवून १ min साठी तरी चमत्काराची आशा करतो

डाइनोसोर्स नाहीत हे माहित असूनही जुरासिक पार्क बघताना फाटली(भीती वाटली) होतीच ना... अशा क्षणिक मानवी भावनांवर चिरकालिंन वैश्विक सत्य कधिच उभे राहू शकत नाही.

छान वाटतं वाचायला ... पण पटत नाही .. अस्तित्व नाकारल्या जाण्याच्या भीतीने वगैरे देवाचं अस्तित्व लोक स्वीकारत असावेत वगैरे ... एवढा फिलॉसॉफीकल विचार सामान्य माणूस करत नसतो . देवाच्या कल्पनेची निर्मिती आदिमानव काळात झाली .. त्यावेळी मृत्यूनंतर काय वगैरे प्रश्न पडण्याइतकी बौद्धिक पातळी नव्हती .. अगदी आजही बहुसंख्य लोकसंख्येला मृत्यूनंतर काय किंवा recognition वगैरेशी काही घेणंदेणं नसतं ...

दैनंदिन आयुष्य जगताना अनेक गोष्टी माणसाच्या शक्तीबाहेरच्या असतात ... भीती असतेच पण ती अनिश्चित किंवा अज्ञात गोष्टींबद्दल नाही तर ज्या गोष्टी आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे हर्ट करू शकतील , ज्या रोखणं आपल्या हातात नाही त्या अत्यंत मटेरियल जगाशी निगडित गोष्टींबद्दलच .. उदाहरणार्थ नोकरी जाणे , अगदी जवळच्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू , अपंगत्व , ज्यांचे उपचार सापडले नाहीत असे आजार , आर्थिक परिस्थिती काही कारणामुळे ढासळणे .. ही मोजकी उदाहरणं झाली ... ज्या गोष्टी माणूस कंट्रोल करू शकत नाही ... अशावेळी त्या कंट्रोल करू शकेल असा एक कुणीतरी सर्वशक्तिमान , दयाळू , प्रेमळ , क्षमाशील वगैरे ( कारण तो न्यायनिष्ठुर असून चालणार नाही , वाट्टेल तसं वागणाऱ्यांनी मग कुठच्या तोंडाने त्याच्याकडे मदत मागायची ? ) वगैरे वर बसलेला आहे ... ही कल्पना लोकांना आधार देते ... त्या आधाराची गरज इतकी शेकडो वर्षं जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातल्या समाजात आहे .. म्हणूनच आस्तिकत्व टिकून राहिलं आहे ...

अस्तिकत्वाची सुरुवात पंच महाभूतांचे अस्तित्व मान्य करण्यातून झाली असावी. ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे हे आयुर्वेदिक औषधा सारखे आहे, झाला तर उपायच होईल किमान अपाय तरी होणार नाही.

जॉनविक्क's picture

7 Jul 2019 - 2:42 pm | जॉनविक्क

ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे हे आयुर्वेदिक औषधा सारखे आहे, झाला तर उपायच होईल किमान अपाय तरी होणार नाही.

अपाय भरपूर आहेत... ते हि साईडइफेक्ट पेक्षा भयंकर.

बाकी अस्तिकत्वाची सुरुवात भीती आणि नैराश्यातून होते तर नास्तिकत्व अहंकारातून व इग्नोरन्समुळे निर्माण होतं असं वैयक्तिक मत आहे.

गड्डा झब्बू's picture

7 Jul 2019 - 3:12 pm | गड्डा झब्बू

अपाय भरपूर आहेत... ते हि साईडइफेक्ट पेक्षा भयंकर.

थोडा प्रकाश टाकाल का यावर? अंधश्रद्धा, बुवाबाजीवर न घसरता फक्त ईश्वराचे अस्तित्व मान्य करण्याने किंवा त्यावर श्रद्धा ठेवल्याने होणारे अपाय जाणून घ्यायचे आहेत.

जॉनविक्क's picture

7 Jul 2019 - 3:25 pm | जॉनविक्क

अंधश्रद्धा, बुवाबाजीवर न घसरता फक्त ईश्वराचे अस्तित्व मान्य करण्याने

हाच प्रतिसाद लागू होईल

गड्डा झब्बू's picture

7 Jul 2019 - 3:39 pm | गड्डा झब्बू

दीर्घ प्रतिसाद वाचला पण ईश्वराचे अस्तित्व मान्य करण्याने होणारे अपाय नाही समजले.

जॉनविक्क's picture

7 Jul 2019 - 3:42 pm | जॉनविक्क

समजावण्यात मी अपयशी ठरलो. क्षमस्व.

धन्यवाद. सर्व प्रतिसादांशी सहमत.

विजुभाऊ's picture

8 Jul 2019 - 11:28 am | विजुभाऊ

बरेचसे दारु दुकानदार , बार वाले साई बाबांचे भक्त असतात. हा योगायोग आहे की कसे तेच कळत नाही/
सत्य साईबाबांचे भक्त हा तर आणखी वेगळाच प्रकार आहे

कानडाऊ योगेशु's picture

8 Jul 2019 - 2:25 pm | कानडाऊ योगेशु

ह्यानिमित्तने बुध्दीसागरांची एक कथा आठवली. बुध्दीसागर प्राध्यापकी करत असताना सकाळी स्टाफ रुममध्ये रोज काहीवेळ ईश्वराचे चिंतन करत असत. ह्यावर त्यांचे सहकारी त्यांना हसत असत व टर उडवत असत. एकदा एका अश्या सहकार्यांने "ईश्वर नाही आहे तर तुम्ही तुमची रोजची ही पाच एक मिनिटे का वाया घालवता" असे म्हणुन त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. ह्यावर प्रो.बुध्दीसागर हसुन त्याला म्हणाले कि ठिक आहे जर ईश्वर नसेल तर रोजची पाचच मिनिटे असे धरुन माझे जीवनातले अमुक अमुक तास वाया गेलेत असे समजु. पण जर ईश्वर असेल तर मी तर रोज प्रार्थन करतोय तर तो माझ्यासाठी काहीतरी तरी करेलच पण तुमचे तर पूर्ण जीवनच वाया जाईल कि हो.

देव आहे असे समजल्या मुळे लोक देवा वर अवलंबून राहतात आणि आयुष्यात काही न करता ईश्वर देईल अशी समज करून घेतात त्या मुळे आस्तिक लोक प्रगती करत नाहीत .
पण आपल्या रोजच्या जीवनात ईश्वर ला मानणारी आस्तिक लोक असतात .ते खरंच का काहीच न करता देवा वर अवलंबून असतात तर तसे घडत नाहीत .आस्तिक सुद्धा परीक्षा होण्यासाठी खूप अभ्यास करतात पण मानसिक शक्ती साठी देवाची आठवण काढतात .
शेतकरी आस्तिक शेतात खूप राबतात आणि संध्याकाळी भजन कीर्तन मध्ये स्वतःला गुंतवून स्वतः ला चिंता,वाईट विचार ह्या पासून स्वतः ला दूर ठेवतात.
अशी खूप आस्तिक लोकांची उदाहरणे आहेत की त्यांनी नास्तिक लोकांपेक्षा जास्त समाजहित केले आहे .
खूप मेहनत करून समाज जीवन उंचावले आहे .
नास्तिक लोक हे नेहमी सैरभैर झालेले असतात त्यांचे त्यांच्या मना वर नियंत्रण नसते .
पाप पुण्य आणि देवाचा कोप आणि प्रेम हे मानत नसल्या मुळे पाप करताना त्यांना कोणाची भीती वाटतं नाही

जॉनविक्क's picture

8 Jul 2019 - 5:17 pm | जॉनविक्क

पाप पुण्य आणि देवाचा कोप आणि प्रेम हे मानत नसल्या मुळे पाप करताना त्यांना कोणाची भीती वाटतं नाही

जर ते पाप पुण्यच मानत नाहीत तर ते पाप करतात असे कसे बरे म्हणता येईल ? तसेच ते पुण्य करताना सुद्धा देवाकडून त्याचे फळ मिळेल या अपेक्षेने करत नाहीत असे का म्हटलं नाही ?

मुक्त विहारि's picture

1 Aug 2019 - 7:18 pm | मुक्त विहारि

काही समजले नाही. ....

आता पुढचा भाग कधी?