आभाळ पडलंय खड्ड्यात ; खड्डा पार आभाळात !
"... कोणताही प्रश्न आपला स्वत:चा असतो, आपलं त्याबद्दल काहीतरी इंटरप्रिटेशन असतं आणि आपण ते लोकांवर थापत असतो. Why? एकमेव कारण म्हणजे आपल्याला आतून त्या उत्तराबद्दल Recognition आलेलं नसतं, म्हणून तीच गोष्ट आपण बाहेर सांगून बाहेरुन Recognition मिळण्याचा प्रयत्न करतो. बाहेरुन कुणी दिलेलं रेकग्नीशन, तुमची दुसर्याने तयार
केलेली कुठलीही ओळख बोगस असते. ..."
Source: http://www.misalpav.com/node/21802
(धन्यवाद, यकूजी)
::::
खूप दिवस / वर्षं झाली या गोष्टीला. तेंव्हा माझा ईश्वराच्या अस्तित्त्वावर विश्वास नव्हता. देवळात जाणं मला पसंत नसे. कोणी देवळात जाऊ म्हटलं की माझ्या कपाळावर आठ्या. आणि अगदी नाईलाजास्तव जावं लागलं तर बाकी सगळे देवळाच्या आत आणि मी बाहेर असाच सगळा प्रकार असायचा. त्या काळात माझे "ईश्वराची गरज काय?" या प्रश्णावरून स्वतःवरच प्रयोग चालत.
मी शान्तपणे स्वत:च्या विचारांचा / भावनांचा हळूहळू मागोवा घेत स्वत:ला प्रश्ण विचारून मनात कोणते विचार येतात , कोणत्या भावना दाटतात हे बघत असे. त्यात्लाच एक महत्त्वाचा प्रश्ण असायचा: "समजा ईश्वर असेल तर काय?" आणि त्याविरुद्ध दुसरा तितकाच महत्त्वाचा प्रश्ण असायचा: "समजा ईश्वर नसेल तर काय?"
समजा ईश्वर असेल तर काय?
या प्रष्णावरून मनात वेगवेगळ्या शक्यता, भावना आणि विचार निर्माण होत. त्यातली सगळ्यात प्रभावी म्हणजे - समजा ईश्वर असेल तर आहे दिलासा. हा दिलासा कशाबद्दल - तर आधार असल्याबद्दल , एका प्रकारच्या निश्चितीबद्दल. बरं मग निश्चिती असेल तर दिलासा का बरं? तर तो दिलासा निर्भय बनवतो म्हणून. बरं मग भिती नक्की कशाबद्दल - तर अनिश्चिततेबद्दल. म्हणजे नक्की कशाबद्दल? तर जे/ ज्याबद्दल काही माहीत नाही त्याबद्दल. म्हणजे अज्ञात गोष्टींबद्दल. बरं मग ज्ञात असलेल्या गोष्टींचं भय नाही का? आहे ना, उदाहरणार्थ समोर नरभक्षक वाघ उभा राहिला तर? तर ती आहे मृत्यूची भिती -- मृत्यूची भिती का बरं? कारण मृत्यूबद्दल काहीच माहित नाही - म्हणजेच पुन्हा अज्ञाताची भिती. आता जर मग देव असेल तर आहे दिलासा ...
आता एक पायरी खाली उतरूयात... पुढे गेल्यावर ... बरं, आता भिती अजिबात उरली नाही... पुढे काय? पुढे... मग... असलेल्या परिस्थितीचा कंटाळा... का बरं? कारण मग अज्ञात असं काही उरलंच नाही पण बुद्धीला भूक आहे अज्ञाताची. अजून एक Matrix -- अज्ञाताचा ध्यास - Adventure हवंहवंसं वाटणं.
एक पायरी अजून खाली जाऊयात...
असं का बरं? कारण आपलं अस्तित्त्वच आहे अनुभवासाठी. अज्ञात गोस्टींचा अनुभव घेऊन त्या ज्ञात करून घेण्यासाठी.
समजा ईश्वर नसेल तर काय?
ताबडतोब मनात भितीचे तरंग -- कारण दिलासा देणारं बलवान असं काहीच नाही. अंधार -- काळाकुट्ट! काहीच दिसत नाही... म्हणजे काय? अज्ञात. अज्ञाताची भिती. आणि आता या अज्ञाताच्या काळोखात देवाचा दिलासा नाही - अजूनच भिती... पण समजा हेच एक सत्य असेल तर काय? तर मग अज्ञाताचा संपूर्ण स्विकार करायचा... बरं मग केला स्विकार. आता काय? आता भिती हळूहळू कमी होत चालली. बघ अजूनही सगळं अज्ञात आहे आणि देव नाही - तरीही भितीचा मागमूस उरला नाही? आता देवाची गरजही उरली नाही.
आता पायरी अजून खाली उतरूयात -- ज्ञात / अज्ञात या बाहेरच्या गोष्टी झाल्या. त्याबद्दल मनात भावभावनांचे तरंग कशामुळे उठत आहेत? त्यातली या विचारांना, भावनांच्या कल्लोळाला चालना देणारी मूळ भावनना कोणती? ती आहे - "भिती असणं" आणि "भिती नसणं" यांच्यापासून निर्माण झालेलं अद्वैत-आवर्त. ते अद्वैत यासाठी कारण एक नसेल तर दुसर्याला अस्तित्त्व नाही. "भिती नसणं" म्हणजेच निर्भयत्त्व -- म्हणजेच प्रेम असणं, त्यातून निर्माण होतो विश्वास -- आणि त्यातून येते निश्चिती -- आणि त्यातून येते निश्चिंती असणं... आणि मग - पुन्हा एकदा matrix -- अज्ञाताचा ध्यास - Adventure हवंहवंसं वाटणं.
आता एका दुसर्या प्रतलावर जाऊन पाहू. Recognition का बरं हवंहवंसं वाटावं? याच्या मुळाशी आहे भिती -- आपलं अस्त्तित्त्व नाकारलं जाण्याची भिती -- मग बाहेरून येतो एक Recognition च्या रुपात दिलासा: You are accepted. म्हणजे अज्ञातापासून काही क्षणांपुरती का होईना, सोडवणूक.
आता अजून एक पायरी खाली जाऊयात. हा जो दिलासा, निश्चिंती आपण आपल्या मेंदूत हवी तेंव्हा निर्माण करू शकलो तर? तर .. तर... बस्स. आज इथेच पुरे.
याद्या
8902
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
सहमत
बरोबर कार्यकारणमिमांसा
बरं.
दिलासा ,निश्चिती आपण हवे तेव्हा आपल्या मेंदूत निर्माण
बस्स. आज इथेच पुरे.
देव कल्पनाच नसली तर भीती कशी
म्हणतात ना
आज इथेच पुरे.
माणसाची मते परिस्थिती नुसार बदलतात
ईश्वर नाही असे म्हणणारे
In reply to माणसाची मते परिस्थिती नुसार बदलतात by Rajesh188
छान वाटतं वाचायला ... पण पटत
अस्तिकत्वाची सुरुवात पंच महाभूतांचे
बाब्बो
In reply to अस्तिकत्वाची सुरुवात पंच महाभूतांचे by गड्डा झब्बू
अपाय भरपूर आहेत... ते हि
In reply to बाब्बो by जॉनविक्क
अंधश्रद्धा, बुवाबाजीवर न
In reply to अपाय भरपूर आहेत... ते हि by गड्डा झब्बू
नाही समजले.
In reply to अंधश्रद्धा, बुवाबाजीवर न by जॉनविक्क
ठीक आहे.
In reply to नाही समजले. by गड्डा झब्बू
धन्यवाद. सर्व प्रतिसादांशी
बरेचसे दारु दुकानदार , बार
ह्यानिमित्तने बुध्दीसागरांची
नास्तिक लोकांचे नेहमीचे आक्षेप
मुद्दे मस्त आहेत
In reply to नास्तिक लोकांचे नेहमीचे आक्षेप by Rajesh188
परत परत वाचले. ...
चिंतनानुभव सापेक्ष असू शकतो.