सहज उडण्याचा भ्रम

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Jul 2019 - 4:47 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

काही वेळा खूप एकटं वाटतं. असुरक्षित वाटतं. आपल्या पाठीमागे कोणीही उभं नाही असं वाटतं. जवळचं असं आजूबाजूला कोणीही नसल्याची भावना बळ धरू लागते. आपण उपरे आहोत. आपण चुकून या जगात जन्माला आलोत. अवेळी आपलं काही बरं वाईट झालं तर? झोपेत. रस्त्यात. एकटे असताना. कोण कोणाला कळवेल?
आयुष्य म्हणजे काय? आपण कशासाठी जगत आहोत? जन्माला आलोत आणि आतापर्यंत कर्मधर्मसंयोगाने वाचलोत म्हणून फक्तह जगायचं का? या जगण्यामागे आपला उद्देश काय? पोटापाण्यापुरतं कमवण्यासाठी नोकरी करत रहायची. पुस्तकं वाचायची. आणि अधूनमधून काही लिहिण्यासारखं वाटलं तर लिहायचं. बस. (आतून वाटत असलं तरी प्रकृतीमुळे आपण एखादी लोक चळवळ उभी करण्यासाठी रस्त्यावर उतरू शकत नाहीत.)
हे सर्व कशासाठी, कोणासाठी लिहीत आहोत आपण? का लिहीत आहोत? हे वाचून कोणाला काय वाटेल? लिहिलेलं सर्व प्रकाशित होत नाही. समजा प्रकाशित झालं तरी प्रकाशित झालेली पुस्तकं सर्वच लोक वाचत नाहीत. आपल्याला वाटतं आपण वैश्विक लिहितो. (अक्षर नव्हे.) पण आपण ज्या मराठी भाषेत लिहितो ते सर्व मराठी लोक तरी हे वाचतात का? संपूर्ण महाराष्ट्रात चांगली पुस्तके वाचली जात नाहीत. बडोद्यातले, कलकत्त्यातले, दिल्लीतले, म्हैसूरचे, भोपाळचे थोडक्यात बृहन महाराष्ट्रातले सर्व मराठी लोक मराठी पुस्तके वाचत नाहीत. आपल्या देशातील दुसर्यार भाषेतील लोक आपले काही वाचत नाहीत. चीन, जपान, अरबस्थानातील लोक आपलं वाचत नाहीत. जर्मनी, ब्रिटन, अमेरिकेतील लोक आपल्याला लेखक म्हणून ओळखत नाहीत तर मग आपण वैश्विक कसे? आपण वैश्विक नसतोच कधी. आपण तसा समज करून घेतो फक्तत.
क्षणभर तात्पुरती अनुकंपा निर्माण करण्याव्यतिरिक्त हे लिखाण कोणावर ओरखडाही उमटू शकणार नाही. ह्या लिखाणाने माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल, असा आपण आपल्यापुरता भाबडा समज करून घेतो. तसं होणं शक्य वाटत नाही. कारण अनेक तत्वज्ञ, संत, महंत, प्रेषितांचे वचने, धर्मग्रंथ हे आजपर्यंत कोणावर परिणाम करू शकले नाहीत. लोक ज्या धर्माचा अभिमान आयुष्यभर मिरवतात, ज्या धर्मात जन्माला येतात, ज्या धर्माचं कर्मकांड आयुष्यभर करत राहतात, तो धर्म म्हणजे नेमकं काय, हे लोकांना आयुष्य संपून जातं तरी कळत नाही. लोक आपल्या धर्माचे ग्रंथ वाचत नाहीत, आणि जे वाचतात ते ग्रंथांप्रमाणे आचरण करत नाहीत, अथवा त्यातून चुकीचा अर्थ तरी काढतात; असे असेल तर ह्या आत्मकथनाचं वाचन कोणावर कशाला काही परिणाम करू शकेल? लोकांचा असमर्थांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा बदलू शकेल? खरं तर आपण सांगितल्याशिवाय हे वाचेल कोण? अशी मनात उदासी पसरत जाते. काहीही करू वाटत नाही. तहानभूक मरून जाते. आपलं अस्तित्व कशासाठी, हा सनातन प्रश्न कायम सतावत असतो मनात.
आपण कुठंतरी अपघाताने जन्म घेतो. जिथं जन्म घेतो, तिथले संस्कार, धर्म, जात, आपल्यावर बळजबरी चिकटवल्या जातात. बालपण थोडं बरं जातं. नंतर आपल्यावर विशिष्ट ध्येयं लादलं जातं. तुला असं असं करायचं आहे. ते लादल्यामुळे दिलेलं कर्तव्य आपण कसं तरी ओढूनताणून पूर्ण करतो. आपला कल असतो एकीकडे आणि आपल्याकडून करवून घेतलं जातं दुसरीकडे भलतंच. हे सर्व असतं म्हणे आपल्यासहीत कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी. भोज्याला टिपताच आपण या सापळ्यात मरेपर्यंत अडकून बसतो. आपल्याला नोकरीला लावलं जातं, व्यवसायाला लावलं जातं अथवा आपण स्वत: होऊन नोकरी-व्यवसाय स्वीकारतो.
विवाह होतो. मुलं जन्माला येतात. आपल्यावर जे लादलं गेलं होतं ते आपण पुन्हा आपल्या मुलांवर लादतो. त्यांच्यासाठी मनाला न पटणार्याद, समाधान न देणार्या नोकर्यान- व्यवसाय करत जगत राहतो. ध्येयंहीन, ध्येयंशून्य! आणि शेवटी राबून राबून मरतो. आपण असं मरतोच पण मागे टाकून जाणार्यांयनाही अशाच पध्दतीने मरायचा मार्ग मोकळा करून जातो. नव्हे, मागे तसाच मार्ग आपण मरण्याआधी आपल्या हातानेच त्यांच्यासाठी आखून जातो! खरंच आपण का जगतो असं मचूळ? आयुष्यात आपण भक्कम टिकाऊ असं काही करूच शकणार नाही का? उत्तर शोधत मरायचं का उत्तर न शोधता जगत रहायचं?
अर्धवट पंखांनीही आपण भरारी मारायचा प्रयत्न करत फक्तच रस्ता ओलांडायचा आणि समाधान मानायचं एव्हरेस्ट सर केल्याचं अथवा एखाद्या अज्ञात ग्रहावर पोचायचा. पण हा केवळ भ्रम. ह्या सहज उडत राहण्यात कदाचित आपणच आपल्याला शाबासकी देत असू आणि इतरांच्या ते खिजगणतीतही नसावं...
(‘सहज उडत राहिलो’ या आत्मकथनातील शेवट. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

2 Jul 2019 - 2:22 am | जॉनविक्क

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Jul 2019 - 1:55 pm | डॉ. सुधीर राजार...

अस्वस्थ होतंय.

जॉनविक्क's picture

2 Jul 2019 - 2:03 pm | जॉनविक्क

आख्खा लेख तुम्ही फक्त दोन शब्दात व्यक्त केलात :)

अस्वस्थ होतय हा प्रॉब्लेम आहे. एकटं वाटतं, असुरक्षित वाटतं, हे सर्व कशासाठी हा सर्व मनाचा स्वभाव.... आणि म्हणूनच हा फाफट पसारा, आपणच आपल्याच मनाने वाढवलेला आणि पुन्हा त्यात आपलं मनच एकटं म्हणून तेच रडतय :)

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

3 Jul 2019 - 1:46 pm | डॉ. सुधीर राजार...

सहमत

प्रमोद देर्देकर's picture

2 Jul 2019 - 9:15 am | प्रमोद देर्देकर

हे लिखाण आवडलं.
आपण सगळे राहाट गाडग्यात अडकलोय. सुटका नाही हेच खरं..

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Jul 2019 - 1:56 pm | डॉ. सुधीर राजार...

बरोबर

यशोधरा's picture

2 Jul 2019 - 9:25 am | यशोधरा

इतकं नकारात्मक कशासाठी?

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Jul 2019 - 1:57 pm | डॉ. सुधीर राजार...

सहज आलंय

जयंत कुलकर्णी's picture

2 Jul 2019 - 10:09 am | जयंत कुलकर्णी

जगाच्या पाठीवर भव्यदिव्य कामे तरूणच का करू शकतात या प्रश्र्नाचे उत्तर तुम्ही दिले आहे.... :-)

मला तरूण म्हटल्याबद्दल धन्यवाद. आपणही स्वत:ला वृध्द समजू नये.

जयंत कुलकर्णी's picture

2 Jul 2019 - 4:12 pm | जयंत कुलकर्णी

मी काय म्हणतोय हे तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही. आणि मी वृद्धच आहे. ते मानण्यात मला काहीही कमीपणा वाटत नाही, उगाच ओढूण ताणून तारुण्यावे नाटक मला तरी करता येत नाही.... :-) असो... आपण हे व्यकितग घेण्याचे काहीच कारण नव्हते, तारुण्यात मनाची आणि शरिराची ताकद/उमेद जास्त असते म्हणून मी तसे लिहिले होते....असो...

इंग्रजीत कमेंट करत आहे म्हणून क्षमा करा , दुसरीकडून कॉपी करून पेस्ट करत आहे ... मराठीत भाषांतराचा कंटाळा आला आहे , एवढं कुठे ट्रान्सलेट करत बसणार .... तुम्हाला पडलेल्या प्रश्नांसारखेच प्रश्न लाखो लोकांना पडत आहेत , त्यातलीच मी एक ... या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात सद्गुरू जग्गी वासुदेव यांचे व्हिडीओ सापडले .... सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली असं नाही पण काहींची मिळाली असं वाटतं ... या एका व्हिडिओत वर पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत ... आणखी खुप व्हिडीओ आहेत .... हा जर उपयोगी वाटला तर ते पहा ..... वैयक्तिकरित्या मला त्यांचं बोलणं खूप आवडतं , दिवसभरही एकामागून एक व्हिडीओ पाहत राहिलं तरी अजिबात कंटाळा येणार नाही .... त्यांच्या इनर इंजिनिअरिंग कोर्सला जाऊन आलेल्या बऱ्याच लोकांनी आपले अनुभव युट्युब वर शेअर केले आहेत , प्रत्येकाने आपल्या आयुष्यात / आयुष्य जगण्याच्या दृष्टिकोनात खूप चांगले बदल झाले, आपण अधिक आनंदी झालो असं म्हटलं आहे .... भविष्यात योग असला तर जाण्याची मलाही इच्छा आहे पण सध्या तरी युट्यूब वरील व्हिडीओंवरच समाधान मानून घेत आहे ... त्यांचा ऑनलाइन कोर्सही उपलब्ध आहे ... थोडी मोकळीक मिळाली , थोडा नियमित रिकामा वेळ मिळू लागला की तो खरेदी करण्याचा विचार आहे ...

nishapari's picture

2 Jul 2019 - 2:04 pm | nishapari

You’ve heard of a word called Buddha? Hum? If I say Buddha, probably you always think of Gautama the Buddha. Gautama is not the only Buddha. That’s not his name. He became a Buddha. There have been thousands of Buddhas and there still are. What Buddha means is…Bu means buddhi or the intellect; Dha means Dhadha, one who is above. One who is above his intellect is a Buddha. Once you’re above the intellectual process, suffering is finished in your life because all suffering is manufactured there in your logical mind. When you’re into your intellect, when you’re stuck in your intellect you’re a nonstop suffering human being. Wherever you’re put you have a way of creating some kind of suffering – your fears, your anxieties, your tensions, your stress. Just see, people are capable of suffering just about anything. Yes? Isn’t it so? People are capable of suffering just about anything in the world, please see. If you’re not educated, you will suffer that. If you get educated, you suffer that. If you don’t find a job, you’ll suffer that. If you find a job, you suffer that. If you’re not married, you’ll suffer that. If you get married, you suffer that. If you don’t have children, you suffer that. If you have children, you suffer that, isn't it?

People are capable of suffering just about anything – this is the nature of the intellect. Once you’re into the intellect, this is how life is. If you’re below the intellect, you won’t suffer so much. Animals don’t suffer as much as you suffer. Physical things, if they’re taken care of, they’re quite okay. They don’t have the kind of suffering that human beings know, isn't it? So, if you’re below the intellect you don’t suffer so much, like you asked that question. If you’re below the…if you’re above the intellect, you’re a Buddha. If you’re below the intellect, maybe we can call you Buddhu. If you’re in the intellect – nonstop suffering. So, to avoid suffering, people are inventing many ways to go below the intellect. Excessive eating, alcohol, excessive indulgence in physical pleasures – these are all the ways you’re trying to avoid the torment of the intellect for some time. You get drunk and you feel good for a few hours but then life will catch up with you with more intensity; it won’t let you go. Now, this being, which was below the intellect, somehow evolved into the intellect. The only way out for this is to evolve beyond the intellect.

https://youtu.be/3amX-jVo4-U

जॉनविक्क's picture

2 Jul 2019 - 2:15 pm | जॉनविक्क

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

3 Jul 2019 - 1:49 pm | डॉ. सुधीर राजार...

मस्त. धन्यवाद.

माहितगार's picture

10 Jul 2019 - 10:06 am | माहितगार

क्षमा असावी,

मी सुद्धा जग्गी वासुदेवांना बर्‍यापैकी ऐकले आहे. बरेच मुद्दे बर्‍याच रोचक पद्धतीने मांडतात.

तरीही

माझा intellect स्वस्थ बसू देत नसल्याने मी उपरोक्त परिच्छेदातील 'intellect' या शब्दाच्या वापराबद्दल सांशक आहे. दुसरे बुद्ध या शब्दाकडे काही वेगळ्या कोनातून बघण्यास सांगण्याचा प्रयत्न असावा, पण बुद्ध शब्दाची भाषाशास्त्रीय व्युत्पत्ती जग्गी वासुदेव म्हणतात तशीच असेल या बाबत साशंकता वाटते.

जॉनविक्क's picture

3 Jul 2019 - 5:14 pm | जॉनविक्क

असो.

छान लेख आणि त्यावरचा संवाद , प्रतिवाद एकदम मस्त .. उर भ्रुण आला

सुबोध खरे's picture

3 Jul 2019 - 6:27 pm | सुबोध खरे

आयुष्यात आपण भक्कम टिकाऊ असं काही करूच शकणार नाही का?

माणसाने केलेल्या कामापेक्षा त्याने लावलेला वृक्ष बहुधा जास्त वर्षे टिकतो --श्री व्यंकटेश माडगूळकर

आपण जमतील तितके जास्त वृक्ष लावावेत आणि जगवावेत. ते आपल्या मरणानंतरहि बरेच वर्षे असतील.

रानरेडा's picture

3 Jul 2019 - 10:27 pm | रानरेडा

Desire is the antithesis of manna.
Reality has always been overflowing with spiritual brothers and sisters whose essences are immersed in understanding. We are at a crossroads of growth and delusion. We are in the midst of a magical invocation of passion that will amplify our connection to the infinite itself.

Yes, it is possible to shatter the things that can disrupt us, but not without spacetime on our side. You must take a stand against selfishness. Stagnation is born in the gap where inseparability has been excluded.

If you have never experienced this fusion of the creative act, it can be difficult to exist. The grid is calling to you via transmissions. Can you hear it? Although you may not realize it, you are divine.

Shakti will clear a path toward dynamic knowledge.
Throughout history, humans have been interacting with the world via supercharged waveforms. Our conversations with other warriors have led to an unfolding of ultra-unified consciousness. Humankind has nothing to lose.

इतकं नकारात्मक? कशापायी? असं वाटतंय, लेखकाला कोणी धरून उभा आडवा फोकाटला तरी तो बघत बसेल. "कोणाला मारतायत?" अशा विचारात.

व्हा मोकळे. उठा पेटून. दुनिया गेली तेल लावत. जे पाहिजे ते करा. पण तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा. (चुकीचे काही करू नका. लेखकाचा राग रंग पहाता लेखक चुकीचे काही कृत्य करेल किंवा करू शकेल असे वाटत नाही.)

रानरेडा's picture

5 Jul 2019 - 11:56 pm | रानरेडा

फार उडू नका , जमिनीवर आणायला वेळ लागणार नाही असे आमचे एक शिक्षक बोलायचे त्याचे आठवण झाली !

पिंट्याराव's picture

7 Jul 2019 - 9:06 pm | पिंट्याराव

राजहंसाचे चालणे I भूतली जालिया शहाणे II
आणिके काय कोणे I चालावेची ना ?

- ज्ञानेश्वर माऊली

मी जी चुकीची काम केली आहेत ती माझ्या वर लादली आहेत असे म्हणणारे खूप स्वार्थी लोक असतात .
धर्म सुधा कोण्ही लादत नाही तुम्ही त्याच्या आहारी जाता .
धर्म नाकारणारी खूप लोक आहेत .
लग्न कोण्ही लादत नाही स्वतःचीच इच्या असते सेक्स पार्टनर हक्काचा मिळवण्याची .
लग्न न करणारी खूप लोक आहेत जगात .
पुस्तक कोण्ही वाचत नाही .
हे तर खूप बालिश आहे इथे अमेरिकेत काय घडत ते जगातील दुसऱ्या टोकाला असलेल्या जपान la माहीत पडत ते न वाचता .
एकंदरीत पोस्ट करते डॉक्टर असले तरी ते मुन्नाभाई तर नाहीत ना ही शंका येतेय

जॉनविक्क's picture

8 Jul 2019 - 4:49 am | जॉनविक्क

हा जन्म लादला गेला आहे असे आपणास वाटत नाही का ? मग कोणती ही कोणावर काही लादत नाही कसे म्हणता येईल, इथूनच तर लादणे सुरु झाले की.

माझ्या पुरते म्हणाल तर माझा जन्म होण्यात माझा कसलाही हात नाही आणि बहूतेकांची स्थिती हीच असावी.

सुबोध खरे's picture

8 Jul 2019 - 11:10 am | सुबोध खरे

कोणतीही गोष्ट लादणे म्हणजे इच्छे विरुद्ध करणे.

इथे मुळात इच्छेचा प्रश्नच नव्हता तेंव्हा लादणे म्हणणे चूक ठरेल.

फार तर अपघात म्हणा

जॉनविक्क's picture

8 Jul 2019 - 11:24 am | जॉनविक्क

इथे मुळात इच्छेचा प्रश्नच नव्हता तेंव्हा लादणे म्हणणे चूक ठरेल.

अजून विस्तार करून स्पष्ट कराल का ?

सुबोध खरे's picture

10 Jul 2019 - 9:31 am | सुबोध खरे

आपण या जगात येण्यापूर्वी कोण होताशरीर आत्मा कि अजून काही? हेच माहिती नाही.
लादणे याचे एक उदाहरण -मुलाला कॉमर्स ला जायचं आहे आणि बापाने सायन्सला जाण्याची जबरदस्ती केली (हा निर्णय लादला गेला). किंवा बायकोला नोकरी करायची होती पण नवऱ्याने राजीनामा देण्याचा निर्णय तिच्यावर लादला.
यात मुळात काही इच्छा आकांक्षा आहेत आणि त्याविरुद्ध करायला लागले तर लादणे म्हणता येईल. आपण जन्माला का आलो हेच माहिती नाही किंवा नसतो आलो तर काय झाले असते हेही माहिती नाही मग मुळात अस्तित्वच नाही तर इच्छा कशी असेल आणि मग त्याविरुद्ध निर्णय कसा लादता येणार?

nishapari's picture

10 Jul 2019 - 9:45 am | nishapari
जॉनविक्क's picture

8 Jul 2019 - 11:28 am | जॉनविक्क

फार तर अपघात म्हणा

हे वाक्य लिहून आपले प्रतिसादातील विरोधाभास कायम ठेवण्याचे प्रयोजनच समजले नाही.

आपल्याला जगात आणण्याचा निर्णय लादला गेलेला असू शकतो पण जगात राहायचं की नाही हा निर्णय आपल्यावर कुणी लादू शकत नाही . स्वबुद्धीने बायको / नवरा आणि मुलं या जबाबदाऱ्या घेतलेल्या नसतील ( अविवाहित व्यक्ती असल्यास ) तर जगातून जाण्याचा पूर्ण नैतिक अधिकार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे . आईवडिलांनी आपलं मत घेतलेलं नसतं जगात आणताना तेव्हा जगातून जायचं की राहायचं हा निर्णय घेताना त्यांच्या मताचा विचार करण्याची गरज नाही ... त्यांनी जर भविष्याचा सांगोपांग विचार करून मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला नसेल तर आपण जबाबदार नाही , आपल्या जाण्याच्या निर्णयाने त्यांना जर दुःख होणार असेल तर ती त्यांच्या मूल जन्माला घालण्याच्या निर्णयाची फळं आहेत , त्यात आपला काही संबंध नाही ...

जाण्याचा निर्णय घेणारे लोक कायद्याने बंदी आहे म्हणून जायचे राहत नाहीत ... ज्यांना जगात येण्याचा निर्णय आपल्यावर लादलेला वाटतो ते माणसांमध्ये भावनिक गुंतवणूक झालेली असते / आयुष्यावर आसक्ती जडलेली असते म्हणून , आयुष्याचा मोह सुटत नाही म्हणून जायचा निर्णय न घेता तसेच जगत राहतात .... खरंतर त्यांच्यावर जगणं लादलेलं नसतं , ते स्वतःहून लादून घेतात ... बायको , मुलं , संसार जबाबदाऱ्या ..

ह्या गोष्टी म्हणजे खरंतर त्यांना जगायला कारणं देणारे दोर असतात ... शक्ती म्हणा हवं तर .. उदाहरणार्थ परिस्थितीने सगळीकडून पिचलेल्या एखाद्या अतिशय दरिद्री दाम्पत्याला मुलं आहेत त्यांच्यासाठी म्हणून तरी जगलं पाहिजे म्हणून जगण्याशी झगडत राहण्याचं बळ येतं ... नसतील तर जोडीदाराच्या आधाराने , त्याच्यासाठी .... आपलं जगणं आपल्याला निरर्थक वाटू नये म्हणून ह्या जबाबदाऱ्या लोक स्वतःहून लादून घेत असतात ... काहीजण स्वतःच बांधून घेतलेल्या या दोरांना आयुष्याने लादलेली ओझी वगैरे नावं ठेवतात ... मूळ पोस्ट ज्यांनी लिहीली आहे त्यांच्यासारखे काहीजण .... उलट फार न शिकलेली , शैक्षणिकदृष्ट्या जी बुद्धिमान मानली जात नाहीत ती माणसं , त्यांना हे शब्दबद्ध करता येणार नाही पण त्यांना हे आतून पुरेपूर माहीत असतं ही आयुष्याने लादलेली ओझी नाहीत आपण स्वतः आयुष्याला अर्थ देण्यासाठी , आपल्याला बळ देण्यासाठी , जगणं सुसह्य करण्यासाठी बांधून घेतलेले दोर आहेत ...

आयुष्याला बाहेरच्या गोष्टींनी अर्थ देण्यापेक्षा स्वतःतच 100 % आनंद आणि अर्थ माणूस निर्माण करू शकला तर नाती आणि लादून घेतलेल्या जबाबदऱ्यांची गरजच पडणार नाही ... ते ज्यांना साधलं आहे अशा लोकांना बाहेरच्या सिच्युएशनने काही फरक पडत नाही , ते सदैव स्वानंदात मग्न असतात असं ऐकलं - वाचलं आहे ... त्याचं शिक्षण जर सगळ्यांना योग्य पद्धतीने मिळालं तर खूप फरक पडून येईल असं वाटतं ... पण बालवाडीपासून मटेरियलिस्टिक जगातल्या म्हणजे बाहेरच्या गोष्टीच मिळवायला उपयोगी पडेल तेच ज्ञान दिलं जातं , आत बघायला कधीच शिकवलं जातं नाही ...

असा आनंद बाहेरच्या गोष्टींशिवाय आपला आपण निर्माण करू शकतो का हा एक प्रश्न आहे . मला वाटतं शक्य आहे . उदाहरण म्हणजे स्वप्नात एखादेवेळा देवाची भेट झाली तर ( कुणासाठी एखादी अतिशय प्रिय व्यक्तीही असू शकते ) मनाला अत्यंत शांती , सुरक्षितता , आता कसली चिंता करायची गरज नाही , प्रचंड आनंद - समाधान या सगळ्या भावना एकाच वेळी दाटून येतात . तो खरा देव नसतो , कुठेतरी वाचलेल्या - दूरदर्शनवर पाहिलेल्या वगैरे गोष्टींतून मनाने ते चित्र उभं केलेलं असतं ... खऱ्या देवाशी त्याचा काडीइतका संबंध नसतो .

पण प्रत्यक्ष खरा देव किंवा प्रिय व्यक्ती समोर न येताही उत्कट आनंद आपला आपण निर्माण करण्याची क्षमता मनाकडे आहे ... स्वप्नामध्ये ती क्षमता आपल्या कंट्रोलखाली नसते ... ती जर आपण जागेपणी आपल्या कंट्रोलखाली आणू शकत असू तर 24 तास कुठल्याही बाह्य कारणाशिवाय उत्कट आनंदाच्या स्थितीत राहणं काय अशक्य आहे ?

आत्मिक आनंद म्हणतात ते काहीतरी वेगळं प्रकरण असावं आणखी ... पण कुठल्याही बाह्य परिस्थितीने फरक पडू न देता 24 तास युफोरिक / उत्कट आनंदाच्या स्थितीत राहता येणं कोणा तज्ज्ञ व्यक्तीने शिकवलं तर कितीतरी लोक सुखी होऊ शकतील ....

आपल्याला जगात आणण्याचा निर्णय लादला गेलेला असू शकतो पण जगात राहायचं की नाही हा निर्णय आपल्यावर कुणी लादू शकत नाही

ठीक आहे मी फक्त आणण्या बाबत विवेचन केलंय, रूट कॉज.

तसेच मी ओझे हा शब्द कोठेही वापरला नाही याचीही नोंद घ्यावी

24 तास युफोरिक / उत्कट आनंदाच्या स्थितीत राहता येणं कोणा तज्ज्ञ व्यक्तीने शिकवलं

विषयांतर होतंय वाटत नाही का, नसेल तर आपली इच्छा प्रमाण समजून इथेच थांबतो.

अवांतर: मी यातील "तदन्य" नाही असा विचार करू नये ही विंनती आहे, मान्य नसेल तर तुम्हाला जे वाटते त्यावर माझा प्रतिवाद काहीही नाही.

हो विषयांतर झालं . धन्यवाद .

जालिम लोशन's picture

8 Jul 2019 - 3:41 pm | जालिम लोशन

छान लिहले आहे. वेगळा धागा होवु शकतो.

रानरेडा's picture

8 Jul 2019 - 3:09 pm | रानरेडा

ओसामा बिन लादेन चे लादेन आडनाव लादण्या वरुन आले असावे का ?