हाटेल साठी नावे सुचवा

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in काथ्याकूट
21 May 2019 - 1:12 am
गाभा: 

सर्व मिपाकरांना नमस्कार!

मी औरंगाबादेत २०-२५ ची सीटिंग असणारे एक नाश्ता व ज्यूस सेंटर सुरु करत आहे. दुकानाची जागा अंदाजे २८० स्क्वेअर फीट आहे.
लोकेशन कॉलेज आणि शिकवण्याच्या परिसरात असल्याने कमीत कमी किमतीत पोटभर(Filling) आणि उत्तम दर्जाचे पदार्थ ठेवण्याचा विचार आहे.

चहा, पोहे-जलेबी, शिरा, उपमा, उसळ, मिसळ पाव, बटाटे वडा,समोसे, पालक वडा, दही धपाटे, दोन तीन प्रकारचे पराठे, छोले भटुरे, पुरी भाजी, मसाले भात, पुलाव, डाळ खिचडी, राजमा चावल, छोले चावल व चार-पाच प्रकारचे ताज्या फळांचे ज्युसेस आणि शेक्स, लस्सी, ताक, रबडी, बासुंदी, होममेड श्रीखंड, होम मेड कुल्फी, असा मेन्यू करण्याचा विचार आहे.

माझ्या या छोटेखानी उपक्रमासाठी नावे सुचवावेत तसेच काही सल्ला किंवा आयडीयाज असतील तर त्याही शेयर करावयात.
या धाग्यास प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक मिपाकराला आभार म्हणून आपल्या हॉटेल चे एक कुपन व्य.नि. द्वारे दिले जाईल.
तसेच जर हॉटेलचे नाव या धाग्यावर सुचवलेल्या पैकी ठेवले गेले तर ते नाव सुचवणाऱ्या मिपाकराला आमच्याकडून भेट म्हणून ३० कुपन दिले जातील.

औरंगाबादकर मिपाकरांनी जरूर व्य.नि. करा तसेच वेळ काढून भेटायला या. हॉटेल आपलेच आहे.

प्रतिसादांच्या प्रतीक्षेत!

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

21 May 2019 - 1:25 am | प्रमोद देर्देकर

1:- रुचकर
2:- औरंगाबाद *** (* च्या जागी तुमचा पिनकोड जसे दादर 28 हॉटेल आहे.
अजून सुचवतो.

नूतन सावंत's picture

21 May 2019 - 11:13 pm | नूतन सावंत

पम्याभाऊ, दादर 28 सारखं नको,ते बंद पडलं,

प्रमोद देर्देकर's picture

21 May 2019 - 1:32 am | प्रमोद देर्देकर

3:- समाधान
4:- स्वाद
5:- नाश्ता सम्राट (जरा हटके आणि वेगळं )
6:- न्याहरी भवन

पिवळा डांबिस's picture

21 May 2019 - 1:48 am | पिवळा डांबिस

जिव्हाळा
(श्रेयअव्हेर: पु. ल.)

प्रमोद देर्देकर's picture

21 May 2019 - 6:42 am | प्रमोद देर्देकर

7:- आस्वाद
8:- रुचीरा
9:- पोटभर
10:- खवय्येगिरी

उगा काहितरीच's picture

21 May 2019 - 7:11 am | उगा काहितरीच

१) पोटभर नाश्ता सेंटर
२) झटका मिसळ व नाश्ता
३) मराडवाडा (औ'बाद मधे आहे म्हणून )
४) कटींग चाय
५) मराठवाडी नाश्ता
६) चहा पोहे
७) निवांत
८) हटके
९) नमो / रागा (तुमच्या पसंतीनुसार ;) )
१०) आईच्या गावात (फुकट पब्लिसिटी ;-) )
११) तात्या / दादा / आप्पा / आज्जा / भाऊजी / दाजी ची मिसळ
१२) पुणे / कोल्हापूर / नाशिकची मिसळ
१३) MH 12, 14, 09

सोन्या बागलाणकर's picture

21 May 2019 - 7:44 am | सोन्या बागलाणकर

भारी नावं!

उगा काहितरीच's picture

21 May 2019 - 10:22 am | उगा काहितरीच

१४) सासूरवाडी
१५) चायपाणी

गुंड्या's picture

21 May 2019 - 7:12 am | गुंड्या

खादाडी

आनन्दा's picture

21 May 2019 - 7:37 am | आनन्दा

लाईफ

It's all about college life.

म्हणून हे नाव सुचलं

आनन्दा's picture

21 May 2019 - 7:40 am | आनन्दा

किंवा थंडक

सोन्या बागलाणकर's picture

21 May 2019 - 7:43 am | सोन्या बागलाणकर

आपल्या बापाचं हाटेल (भाडीपा फेम) किंवा आपलेच हॉटेल
पोटोबा
पोटपूजा
जेवून जा
न्याहारी

वामन देशमुख's picture

21 May 2019 - 7:47 am | वामन देशमुख

हॉटेलची लगेच सुचलेली नावे -

१. हॉटेल मिसळपाव डॉट कॉम*
२. हॉटेल खात रहा
३. हॉटेल खा-प्या-मजा करा
४. हॉटेल पोटपूजा
५. हॉटेल खादाडी
६. हॉटेल आधी पोटोबा
अजून नावं सुचली तर सांगतो.

प्रतिसादांना कुपनं ही कल्पना आवडली.

* प्रताधिकार तपासून पहा.

टर्मीनेटर's picture

21 May 2019 - 7:49 am | टर्मीनेटर

1) क्षुधाशांती.
2) पोटपूजा.

गवि's picture

21 May 2019 - 8:37 am | गवि

चाय- फाय (Chai-Fi)

कटिंग कट्टा

चावडी

किटली

चा-पाणी

शिदोरी

अट्टल

खाणी-गाणी (गाण्यांचं उत्तम कलेक्शन नेहमी वाजत असल्यास)

कट्टा रिपब्लिक

नाश्ता नेशन (Nashta Nation)

छोटा ब्रेक

अनवाईंड

श्वेता२४'s picture

21 May 2019 - 9:27 am | श्वेता२४

गविंची सगळीच नावे आवडली

सोन्या बागलाणकर's picture

21 May 2019 - 9:51 am | सोन्या बागलाणकर

झक्कास!

खास करून चा-पाणी आणि चाय-फाय

माझी नावे-
१) कट्टेबाजी
२) कॉलेज कट्टा
३] ऐस-पैस-बैस
४) खाबुगिरी
५) कल्ला पार्टी/कल्ला
६) ऑल्वेज फ्रेश
७) फ्रेशर्स
८) बॅचलर्स

सोन्या बागलाणकर's picture

21 May 2019 - 9:54 am | सोन्या बागलाणकर

अजून एक - हॉटेल चाय-सुट्टा
कॉलेजच्या जवळ असल्याने हे नाव फेमस नाही झाले तर मिपाचा आयडी बदलून घेईन :=D

विजुभाऊ's picture

21 May 2019 - 10:04 am | विजुभाऊ

१) चाय कट्टा
नाष्ता नेशन आणि कट्टा रिप्ब्लीक ही दोन्ही नावे आवडली आहेत.

चांदणे संदीप's picture

21 May 2019 - 10:16 am | चांदणे संदीप

१) लाईट मामला
२) मिसळकट्टा
३) खाऊ कॉर्नर
४) या, खा, प्या
५) हंग्री नेशन
६) खंग्री फूड
७) फूड पॅलेस
८) मॉर्नींग कॅफे (झैरात: माझ्या एका कथेत हे नाव आहे.)
९) न्याहारीगड
१०) निखारा

Sandy

रमेश आठवले's picture

21 May 2019 - 10:31 am | रमेश आठवले

१अमदावाद मधील एका हॉटेलचे नाव त्याच्या प्लॉट नंबरचे आहे.
२. तृप्ति
३. अन्नदाता
४. पोटभरे

प्रकाश घाटपांडे's picture

21 May 2019 - 10:34 am | प्रकाश घाटपांडे

'मिपा' च ठेवा ना!

यशोधरा's picture

21 May 2019 - 10:40 am | यशोधरा

शुभेच्छा तुम्हाला.

नाखु's picture

21 May 2019 - 10:52 am | नाखु

१ भेट कट्टा
२ अल्पोपहार
३ मिसळायण
४ थेट भेट
५ निव्वळ निवांत
६ कट्टा माझा

आणि आपल्या व्यवसायाला भरघोस शुभेच्छा.

१. ब्रोचा कट्टा
२. आबाचा ढाबा

योगी९००'s picture

21 May 2019 - 11:26 am | योगी९००

तुमच्या हॉटेलसाठी शुभेच्छा...!!

पोटोबा, पोटभर, भरपेट, ढेकर असली नावे एक-दोन दिवस चांगली वाटतात. पण या नावांमध्ये ग्रेस नाही. तरूणांना आकर्षित करायचे असेल तर हाय-फाय नाव लागेल. त्यातल्या त्यात इंग्रजी नाव असेल तर बरे. कॉलेज मध्ये बाहेर गावची (किंवा दुसर्‍या राज्यातील) मुले आहेत का? त्या नुसार तुम्हाला नाव ठरवावे लागेल.

कॅफे होमली
मम्माज डेली (Mummy's Daily)
मम्माज रेसिपी (Mummy's Recipe)

तसेच फक्त शाकाहारी मेनू असेल तर नावात सुद्दा तसे दर्शवले गेले तर उत्तम.
कॅफे वेजिटार

अशा प्रकारचे नाव ठेवा.

सस्नेह's picture

21 May 2019 - 12:29 pm | सस्नेह

१. खा की मग
२. झनझनाझन
३. खा-पी-लूट
४. ह्योच त्यो

शब्दानुज's picture

21 May 2019 - 12:39 pm | शब्दानुज

कॉलेज आहे म्हणजे कशाचे आहे ? (इंजिनियर , मेडीकल , ११वी १२वी ? )

त्या अनुशंगाने नाव ठेवल्यास संयुक्तिक ठरेल.कारण तुलनेने ११वी १२ वी मुले आणि या पुढची मुले यात फारच फरक पडलेला असतो.

तनमयी's picture

21 May 2019 - 12:58 pm | तनमयी

औरंगाबाद ला बीड bypass रोड ला MIT कॅम्पूस sb बँकेच्या अगदी लागत त्या गाल्यातच एक नाश्ता कॉर्नर आहे
कांदा भजी ,sandwich असे पदार्थ होते भाव २० रुपाये ओन्ली
भजी चटणी अप्रतिम होती तुम्ही जावून याच
खूप idea मिळेल

मुल पोटभरी चे खातात नाश्ता type
ती पदार्थ ठेवा
पोटभरी नाव ठर्वा

चौथा कोनाडा's picture

21 May 2019 - 1:06 pm | चौथा कोनाडा

हार्दिक अभिनंदन आणि या नविन उपक्रमास ट्रकभरून शुभेच्छा !

तुमच्या हाटिलात दर दिवसाआड मिपाकड्ट्टा होवो !

तुमचं हाटील आख्ख्या जगात फेमस होवो !

तुमच्या हाटीला भायर रांगाच्यारांगा लागोत !

तुमच्या हॉटेलाची अर्रर्रर्रारा खतरनाक म्हणण्या इतकी भरभराट होवो !

उपेक्षित's picture

21 May 2019 - 1:24 pm | उपेक्षित

नवीन धंद्यासाठी आपल्याला शुभेच्छा,

काही आगाऊ सूचना देतोय जरूर विचार करा.

हॉटेलचे नाव इत्यादी मध्ये खूप जास्ती विचार नगा करू मालक आणि तुमचा वेळ पण नका घालू यात.

खालील गोष्टींचा विचार करा::-

- सुरवातीला भारंभार मेन्यू ठेवण्यापेक्षा मोजके पण हुकुमी पदार्थ ठेवा (कारण गर्दी झाली हॉटेल मध्ये तर manage करायला अवघड जाते सुरवातीला नवीन असताना)
- त्यांची चव मेंटेन ठेवा, कारण बर्याच ठिकाणी आधी चांगली चव पण नंतर फरक असे होते.
- नंतर प्रतिसाद प्रमाणे पदार्थ वाढवत न्या आणि त्याची जाहिरात पण करा वेळोवेळी.
- तुम्ही जो मेन्यू ठेवणार आहात तो जास्ती सुटसुटीत कसा असेल हे बघा
- स्वच्छता आणि टापटीप महत्वाची.

आनन्दा's picture

21 May 2019 - 1:50 pm | आनन्दा

बाबाची चड्डी !!!

शब्दानुज's picture

21 May 2019 - 1:53 pm | शब्दानुज

मी जवळपास याच वयोगटातला असल्याने काही सल्ले देतोय. जे पटतील ते ते घ्या.

कमीत कमी हॉटेलचे नाव होईपर्यंत कोणत्याही वारी हॉटेल बंद ठेवू नका. मुले जर तिथे रहात असतील तर रविवारी का होईना ती तुमच्याकडे येऊ शकतात. एकदा जर आत आली आणि अनुभव चांगला वाटला तर इतरदिवशी पुन्हा येऊ शकतील.

समोर पोर आहे असे समजून वागणूक देऊ नका. या वयात अहं जागा झालेला असतो. मानानेच समोरच्याला वागवा.

समोरच्याचे नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न जरुर करा. दाखवलेली अोळखही हा अहं सुखावते.पण सगळ्यांना एकसारखाच भाव ठेवा. एकाला/ ग्रूपला भाव कमी एकाला जास्त असे करू नका

या वयातल्या चवीच्या आवडी आणि तुमच्या आवडी यात फरक पडतो. त्या वयोगटातल्या इतरांना चवीबद्दलचे अभिप्राय मागत रहा.

इतर हॉटेलमद्धे जे मिळते ते सोडून आणखी काही देता येते का पहा. पदार्थांची व्हरायटी जास्त असू द्या. (कॉलेजच्या बाजुला तेच तेच खाऊन मुले कंटाळलेली असतात) उदा- पिझ्झा सारखे पदार्थ बाहेर खुप महाग मिळतात. तुम्हाला घरगुती बेस वापरून बनवता आला तर नक्की विचार करा. जर कोणी मुले मुलींना घेऊन येत असतील (अौरंगाबादमद्दे असे होईल असे फारसे वाटत नाही ..पण तरीही) आणि तुम्ही येऊ देत असाल तर मुले महागडा खर्च करण्याची तयारी ठेवतात. तेव्हा तसे पिझ्झा सारखे थोडेसे (थोडेचेस म्हणजे ५०-१००) खर्चिक प्रकार ठेऊन बघायला हरकत नसावी. आधी प्रायोगिक तत्वावर करुन पहा आणि पुढे तो वाढवा.

चायनिज पदार्थ तुमच्या यादीत नाहीत. त्याचाही विचार करा. हे पदार्थ लोकप्रिय आहेत.

लस्सी ताक सारखे पदार्थ उन्हाळा वगळता फारसे खपणार नाही असे वाटते.

नुसती चांगली फळे ठेवा.(पपई सारखी )प्लेटमद्दे व्यवस्थित काप करून द्या.ज्युससोबत हाही पर्याय असू द्या. या वयात घरून फळे खा असा आग्रह असतो. एखादा तसा ऐकण्यातला असेल वा आयोग्याबद्दल जाग्रूत असेल तर तो घेऊ शकतो. मुली जर येत असतील तर ते फळांचा पर्याय स्विकारू शकतात.

मेन्यू कार्ड छापा. साधेच असू द्या पण असू द्या.प्रत्येक टेबलावर ते हवे. इथे बरेच पदार्थ मिळतात हे त्यातून कळते. हे तेव्हाच करा जेव्हा खप जास्त होत जात आहे, मेन्युवरचे ब-यापैकी पदार्थ आत आहेत.

शेवटी पदार्थ किती आणि कुठले ठेवायचे हे तुम्हालाच ठरवावे लागणार. जर आजूबाजूला आधीच खायची दुकाने असली तर तुम्हाला व्हरायटी द्यावी लागेल. जर हॉटेल नसली , वा तुम्हाला झेपत नसेल तर पदार्थ कमी ठेवा. धोका कमी तर नफाही कमी हे सुत्र इथेही लागू पडते.

मुलांच्या येण्याच्या वेळा जाणून घ्या. जास्त पदार्थ ठेवणे परवडत नसेल तर त्या वेळेला अनुरूप जे आहे ते ठेवा. (म्हणजे सकाळी गर्दी पडत असेल तर फळे , चायनिजला फारशी मागणी नसेल. तेच दुपारी गर्दी होत असेल तर फळे , ज्यूसला मागणी असेल. )

कॉलेजकुमारांना स्वच्छता नसेल तर चालते असे वाटत असेल तर ते साफ चुक आहे. स्वच्छ हॉटेल सर्वांनाच आवडते.

चव- व्हरायटी - किंमत - स्वच्छता असा क्रम तुमचा असायला हवा.

नवीन गाणी हलक्या आवाजात लावून ठेवा. स्वभाव बोलघेवडा नसेल तर तसा करा. त्या वयोगटांतले चर्चांचे विषय समजून घ्या. हस-या चेह-याने दिलखुलास गप्पा मारत राहा.त्यांना अजून काय हवे , नको ते बोलण्यातून काढून घ्या.

एक पाटी लावा. त्यावर रोज काहीतरी विनोदी लिहीत जा.(आम्ही कॉलेजमद्धे ब-याच सरबातवाल्यापैकी एका सरबतवाल्याकडे जात होतो कारण तो पाटी लावून त्यावर काहीबाही लिहायचा. जिज्ञासा या वयात प्रभावी असते. )

डिस्काऊंट आॉफर देण्यास आपण तयार आहात असे वाटते. लकी ड्रा सारखे प्रकार सुरवातीला ठेऊन बघा. ३६० कुपन मधून १ ला पेन ड्राईव्ह दुस-याला अमूक तमूक असे. त्याची जाहिरातबाजी करा.

नाव झाल्यावरही दर्जा कायम ठेवा. मोहासाठी जास्त लोकांना सेवा देण्याच्या नादात नाव खराब होत जाते.
ते टाळा.

कॅमेरा जरुर लावा. देव न करो पण छेड, मारामारी सारखे प्रकार झाले तर आपली बाजू मांडायला कॅमेरा महत्वाचा ठरतो.

मला व्यवसायाचा अनुभव नाही. त्यामुळे सारासार विचार करून जे मुद्दे पटतील तेच आचरणात आणा.

चौथा कोनाडा's picture

21 May 2019 - 4:04 pm | चौथा कोनाडा

+१

खिलजि's picture

22 May 2019 - 11:40 am | खिलजि

सुंदर आणि माहितीपूर्ण विवेचन दिलेलं आहे . ते इतरांनाही उपयुक्त ठरेल पुढील वाटचालीसाठी

mayu4u's picture

21 May 2019 - 2:06 pm | mayu4u

Quick Bites
Tasty & Healthy
Super Snacks
Spice Corner
Munch n Sip

चौकटराजा's picture

21 May 2019 - 2:08 pm | चौकटराजा

नाश्टा नेशन एकदम झ्याक ! कारण नाश्टा आहे , कॉलेज असल्याने नाव मराठी देऊ नाय ! गवि च्य ३० कुपनातील दोन कुपने मला द्या ! मी व प्रा डा बिरूटे खायला येऊ ! एका कुपनात कितीही खा अशी सवलत आहे का ?

धंदा जोखमीचा आहे पण कमाई उत्कृष्ट होऊ शकते , जर खालील बाबी कटाक्षाने पाळल्या तर

१) स्वच्छता नितांत गरजेची आहे
२) दर्जेदार आणि वाजवी दरात उपलब्ध असलेले पदार्थ
३) जागा मोकळी आणि हवेशीर असू द्या
४) कुठलाही पदार्थ पंधरा ते वीस मिनिटांत तयार करून वाढला पाहिजे , कारण कॉलेजात तासांना/वर्गात हजर राहणे गरजेचे आणि तेही योग्य वेळेत ..
५) कुठल्याही धंद्यात उभं राहण्यासाठी आपली क्षमता कमीतकमी दोन वर्षे असावी . लगेच अनुमान काढू नका , पुढे जाऊन भलेच होईल ..

मला सुचलेली नाव

पॉटबार किंवा हेल्थबार किंवा पोटोबा

शुभम भवतु

समीरसूर's picture

21 May 2019 - 4:16 pm | समीरसूर

Tasty Times – Have a good time; enjoy our tasty food…
Hot ‘n’ Fresh – Enjoy every fresh moment of life…
Awesome Snack Bar – Believe us, it’s truly awesome!
झन्नाट एक्सप्रेस - या, बसा, जरा निवांतपणा अनुभवा!
अच्छे दिन कॅफे - इथला प्रत्येक क्षण सुपर अच्छा!
जस्ट धमाल!
Apple & Onion – We make every moment memorable…

काही नावं सुचवली आहेत. व्यवसायासाठी अनेक शुभेच्छा! मला वाटतं काही कॅचफ्रेज असेल तर अधिक मजा येईल. हॉटेल तुफान चालणार यात शंकाच नाही. आम्ही आल्यावर झणझणीत मिसळ खाणारच! :-)

चौथा कोनाडा's picture

21 May 2019 - 4:20 pm | चौथा कोनाडा

१) कॅण्डीज्यूस
२) हेल्दीबाईट
३) निशान स्नॅक्स, टी अँड ज्यूस
४) कट्टा कॉलेजकूल
५) यंगस्टर्स कट्टा
६) कॉलेजस्टार्स
७) युथअड्डा
८) हॉट अँड कूल
९) कॅम्पसकिंग
१०) युथ-बूथ
११) कॅफे कुछ और रंग
१२) एनके'ज बाईटस्पॉट

समीरसूर's picture

21 May 2019 - 4:30 pm | समीरसूर

Spicy ‘n’ Sweet – As delicious as our life…
Garlic ‘n’ Grapes - स्वाद ऐसा जो हर पल बना दे मसालेदार...
#एकनंबर - अजून काय नको!
टेस्टी पॅटर्न - खतरनाक टेस्ट औरंगाबदची!

तनमयी's picture

21 May 2019 - 4:40 pm | तनमयी

soda corner theva
aurangabad hot ahe
tyamule chalel khup

नाखु's picture

21 May 2019 - 4:43 pm | नाखु

सुरुची
स्वाद रेंगाळणाऱ्या,क्षुधा तृप्त करणारा

भीमराव's picture

21 May 2019 - 5:05 pm | भीमराव

नवीन उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा.

अमोल काम्बले's picture

21 May 2019 - 5:30 pm | अमोल काम्बले

१. Ghaas Phoos २. Chay Khopcha ३. SodaBottleOpenerWala

मराठी कथालेखक's picture

21 May 2019 - 6:22 pm | मराठी कथालेखक

मला वाटतंय नाव शक्य तितकं न्युट्रल ठेवा .. म्हणजे नावावरुनच काहीतरी प्रतिमा तयार व्हायला हवी अशी गरज नाही.
म्हणजे 'अन्नपुर्णा' वा तत्सम जुनाट आणि पारंपारिक नावं पण ठेवू नका आणि उगाच उथळपणाची प्रतिमा बनेल असंही ठेवू नका... नावात फार काही नसतंच. पुण्यात 'वैशाली' हे साधंसच नाव असलेलं हॉटेल खूप लोकप्रिय आहे. ..तुम्हीही असं काही ठेवू शकता तुमच्या घरातील मुलांपैकी कुणाचं नाव, अगदी तुमचं नाव 'कॅफे निशांत' वगैरेही चालू शकेल.

समीरसूर's picture

22 May 2019 - 9:52 am | समीरसूर

हे पटलं. ब्रँड नंतर तयार होतो. आणि तो बर्‍याच इतर घटकांवर अवलंबून असतो. गुगल, अ‍ॅपल, ओरॅकल, चितळे, जोशी वडेवाले, बेडेकर मिसळ, अ‍ॅमेझॉन, वगैरे ब्रँड्स नंतर आयकॉनिक झाले. या नावांचा आणि त्या ब्रँड्सच्या व्यवसायांचा तसा काहीच संबंध नाही. या धाग्यावर आलेल्या नावांपैकी (मी सुचवलेली ग्राह्य धरून) बरीचशी नावे उथळ वाटतात. पण अशा हॉटेलला ब्रँड करण्याची फारशी गरजही नसते. एक ठराविक ग्राहकवर्ग असतो आणि त्यावर या प्रकारच्या हॉटेल्सचा व्यवसाय उत्तम चालतो. या केसमध्ये कॉलेजची मुले हा मुख्य ग्राहकवर्ग आहे. त्यांना मुख्यत्वेकरून एक स्वस्त, टाईमपास करता येण्याजोगी, नेहमी सहजपणे जाता येईल अशी, फॅमिली टाईप नसणारी, उधारी ठेवू शकणारी, पटकन भूक भागवणारी अशी एक निवांत जागा हवी असते. इथे मालकाशी, स्टाफशी उत्तम संबंध हादेखील एक महत्वाचा घटक असतो. चव हा फार महत्वाचा मुद्दा खरं तर नसतोच. अर्थात, चव चांगली असणं चांगलंच आहे. त्यामुळे ब्रँडिंगचा फार विचार करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला आवडेल ते नाव (उथळ किंवा गहन) ठेवायला हरकत नसावी. हॉटेल जोरात चालणारच! :-)

चौथा कोनाडा's picture

22 May 2019 - 1:31 pm | चौथा कोनाडा

+१

वरील दोन्ही प्रतिसादात अत्यंत योग्य निरीक्षण मांडलेलं आहे.

अर्थात इतकं सरळ साधं नसतं गणित, पण स्थूलमनाने बरोबर आहे. खूप लिहिता येईल. नावाने दीर्घकाळ फार फरक पडत नाही हे खरं, पण अमुक टाईपचं नाव ठेवल्याने नक्की फेल होईल असंही नसतं.

जिथे चटक लागेल अशी चव असते तिथे लोक नुसते रस्त्यावर उभे राहून झुंबड करून बटाटेवड्याचा पुढचा घाणा किंवा भेळेचं पुढचं पातेलं बनून निघण्याची वाट बघत तिष्ठत असतात. वडे ट्रेमध्ये पडताच डेसपरेट होऊन नोटा नाचवत "ए मला दे रे पार्सल, ए अण्णा रांगेत घे रे , ओ साईडला व्हा" वगैरे भांडणे, ढकलाढकली इत्यादि करुन चार सहा वडापाव ज्यादाच मागून घेऊन ते मिळालेलं पार्सल पारितोषिक असल्याप्रमाणे नाचवत आनंदित मुद्रेने गर्दीतून बाहेर पडतात.

अशा जागेला नाव नसलं तरी लोक ते बनवून घेतात.

चव हा सिंगलमोस्ट लॉंग टर्म फॅक्टर.. बाकी सर्व दुय्यम.

एमबियन्स, पाश्चात्य वळणाचं नाव, आरामदायक स्वच्छ जागा हे सर्व गुड टु हॅव.. पण व्यवसाय जिवंत ठेवण्यास पुरेसं नाही,

त्या त्या भागातल्या क्राऊडला भावतील असे पदार्थ (पोहे उपमा पासून लजान्या, चीज फोंडयुपर्यंत) निवडक आणि सदैव उपलब्ध ठेवता येतील इतकेच..

मेनू तीन फूट लांब आणि आवडीने काहीही मागवलं की मात्र: ते सकाळीच मिळतं, थालीपीठ अभी नही है, चायनीज पुरा बंद है.. डोसा को टाईम लगेगा (म्हणजे = मिळणार नाही) आत्ता फक्त पोहे उपमा आणि मिसळच मिळेल इत्यादि वाक्ये ही अत्यंत घातक असतात.

निवडक पदार्थ , सदैव उपलब्ध आणि अत्यंत चविष्ट बनतील अशी पद्धत.

बस्स ..

बाकी सर्व ऑप्शनल.

(१५-२० साल पुरानी बात है ... म्हणजे अगदी परवा परवा )
विश्वाच्या मध्यवर्ती शहरातील, मध्यवर्ती पेठेत माझे निवासस्थान होते.
तेथील बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, यांच्या जुन्या वाड्यापुढे, एक लांब दाढी वाले सद्गृस्थ, संध्याकाळी अंडा भुरजीची हातगाडी लावून व्यवसाय करायचे.

मार्केट मधे हातगाडीवरची अंडाभुरजी समजा १५ ला आहे, यांच्याकडे ती २० ला असायची.
परंतु संध्याकाळी यांच्या हातगाडीवर तुफान गर्दी असायची....
कारण काय ? सिम्पल मेनू अंडा व पाव संबंधित सर्व प्रकार भुर्जी , ऑम्लेट इ इ
रोजच्या रोज गाडी अत्यंत स्वच्छ , घासून पुसून लखलखीत ... सर्व बाजुने काचेची पारदर्शक तावदाने .. स्वच्छ .
सुवाच्य अक्षरातील बोर्ड. (मेन्यू )
कुकिंगचे तेल सुद्धा पारदर्शक बेल्जीयम काचेच्या चंबूत ... तेल सुद्धा नितळ... निवांत स्थिर ... एक सुई एवढा सुद्धा कण (any foreign object ) त्यात दिसायचा नाही.
गाडीच्या वर कुठेही पडलेला कांदा टमाटा यांचा एक कण , तेलाचा शिंतोडा नाही.
कांदे टमाटे मोगर्यासारखे बारीक कापून एका भांड्यात व्ययस्थित, त्या भांडयांना बाहेरून कुठेही बरबटलेले हात उमटलेले नाही ...
अभिप्रायासाठी एक A५ साईज ची वही , रेनॉल्ड्स चे पांढरे निळे एक पेन. मानेत व कमरेत हलणारी भरतनाट्यम नर्तिकेची मातीची मूर्ती , भुर्जी करताना हातगाडीला मंद धक्का लागल्यामुळे होणारी, मूर्तीची हालचाल ...

वेगळाच अँबियन्स ... भुर्जी खायला जाताना असंच म्हणून जाताना मनात गिल्टी वाटायचं ..
वाटायचं की छान शुभ्र ड्रायक्लिन बंडी पायजमा असा वेष करून आलं पाहिजे होत इथे ...

चौथा कोनाडा's picture

24 May 2019 - 1:01 pm | चौथा कोनाडा

... भुर्जी खायला जाताना असंच म्हणून जाताना मनात गिल्टी वाटायचं ..
वाटायचं की छान शुभ्र ड्रायक्लिन बंडी पायजमा असा वेष करून आलं पाहिजे होत इथे ...

+१

:-)

दणकट पायजमा, मुलायम बंडी, शालगर भुर्जी

पुण्यात / पुण्याचे जे जे काही असतं , ते अखिल भारतीय लेव्हलवरच असतं....

त्यामुळे "पुण्याचा" आणि "राष्ट्रीय" द्विरुक्ती आहे...

:)

अभ्या..'s picture

22 May 2019 - 5:13 pm | अभ्या..

परफेक्ट,
नावात काही नसतं. अ‍ॅक्चुअली काही नसतं. आमच्या इथं गुंडाची भेळ नामक हॉटेल(त्याचे नाव दुसरेच आहे कैतरी जे मालकाला तरी माहिते का कुणास ठाऊक) धोधो चालत असते. शेजारचे हायफाय सेलिब्रेशन कॅफे कायम ओस पडलेले असते, त्याचे आत्तापर्यंत चार मालक बदलले. धंद्यात सेलिब्रेशन नाहीच.
सोलापुरातील भैय्याची भेळ सेम तसेच. ठेंगील, हाक्के, नसले अशा इतर गावातील लोकांना ऑड वाटतील अशा आडनावानी, नावानी ब्रॅन्ड बनवला. आज त्यांचे नुसते नाव असले तरी हॉटेल धोधो चालते. सोलापुरातील डब्ल्युआयटी समोरचा बनकचोरी, बनसमोसासाठी फेमस अरविंद ह्याचे नाव तर शेजारील अरविंद स्टेशनरीवरुन ओळखले जाई. ब्रॅन्ड हा आपण बनवायचा असतो. आपण वाढवायचा असतो.
त्यासाठी आवश्यक गोष्टी म्हणजे युनिक चव, कन्सिस्टन्सी, दरफलकाचे संशोधन(इतर ठिकाणचा रेट, सुटे द्यायला सोपे, कॉम्बो करायला सोपे म्हणजे वीस रुपयात मोठावडापाव आणि एक कटींग, पन्नास रुपयात मिसळ आणि ताक अशा ट्रिक्स) महाराज किंवा वस्ताद ला जपणे, चांगले वेटर नोकरीला ठेवणे, त्यांच्यावर सतत लक्ष राहु देणे. कुठे रेंगाळू देणे नाही, पैशाचा हिशोब एकवेळ अगदी चोख नसु दे पण असु देणे. जी सिस्टिम तुमच्या गावात रुळलीय आणि व्यवहाराला, मनुष्यबळाला सोपीय ती वापरणे (उगीच हायफाय करायचे म्हणून बिलिंग कम्प्युटराइज्डच कर, प्लेटा उचलायला पोरे ठेवायची पण सेल्फ सर्व्हिस असले काहीतरी करु नका, ज्याटाईपचे कस्टमर येतात किंवा अपेक्षित आहेत त्यानुसार करा.) सुरुवातीलाच मोठमोठे फ्लेक्स किंवा बॅक्लिट बॉक्स, डिस्प्ले, लायटिंग अशा गोष्टींवर खर्च करु नकात. त्यात थोडासा जरी चेंज करायचा असला तरी महागात जाते. आधी फक्त आणि फक्त इन्फ्रास्ट्रक्चरच बघा. स्पॉट, टेस्ट, रेट आणि सर्व्हिस हेच चार खांब मजबूत करा. ते एकदा दणकट झाले की मग डिस्प्ले, डिझाईन(जे काही ब्रॅन्ड तयार होईल त्याचे) थीम, स्टाईल, कॅम्पेनिंग अशा गोष्टी बघा.
वस्ताद किंवा महाराज हा लै महत्त्वाचा फॅक्टर आहे, हॉटेल लाईन मध्ये कर्मचार्‍यांना उचल किंवा अ‍ॅडव्हान्स मोठ्या अमाउंटची पध्दत आहे. चाम्गला हुन्नरी वस्ताद मिळाला कि हळूच एक घरचा उत्साही मेंबर किचनमध्ये वावरु द्या. कुणीच नसले तरीही एकदोन आयटेम तरी आपल्याला बनवता आले पाहिजेत. किचनमध्ये लक्षही राहते. उधळमाधळ जपुन केली जाते. एक छोटा बर्नर काउंटर सकाळी पोहे, थोड्या वेळाने वडापाव आणि भजी आणि संध्याकाळी तोच बर्नर दाबेली किंवा पावभाजीसाठी युटिलाईज करा. मिसळ (किंवा औरंगाबादेत जे दिवसभर चालु शकेल ते आयटम) अशांना सेपरेट ठेवा. खूप सारे भरगच्च मेनुकार्ड करण्याएवजी हळूहळू वाढवत न्या. भरगच्च मेनु साठी प्रिपरेशनही तेवढीच दांडगी असावी लागते. आणि दररोज ते उरणं परवडणारे नसते. वेटर लोकांवर कम्पलसरी लक्ष ठेवा. किचनपाशी किंवा एकाच जागी रेंगाळू द्यायचे नाही. एका कोपर्‍यात मोबाईल घेऊन बसु द्यायचे नाही. एकदा सवय लागली की सोडविणे फार अवघड. मग मालकाला चोरुन कोपरे हुडकले जातात. उधारीत वेटरला डायरेक्ट साक्ष ठेवायचे पण कस्टमर पोरासोबत जास्त खिदळू द्यायचे नाही, अशा मैत्रीतून हॉटेलमालकाला गंडवले जाते. बिहारी नेपाळी मुले ठेवणार असताल तर त्यांचे कार्ड, पुरावा घेउन ठेवा. त्यांची वये कन्फर्म करुन घ्या. नेपाळी लोक त्यांच्या कार्डवर शक साल वेगळे लावतात. तिकडचे वर्षगणना वेगळी असते. बालकामगार इश्शु येऊ शकतो. त्यांच्या नातेवाईक वेटराचा जामीन घेऊन ठेवा. मालकालाच स्वच्छतेची आवड आणि सवड आहे हे कळले कि साफसफाई राहते हॉटेलात. दररोज रात्री फिनाईलने फरशी पुसुन घ्यायचा राबता ठेवायचा. अशा जबाबदार्या वेटराना कशा वाटून देता येतात ते बघा. ह्या बाबतीत प्रभाकर पेठकर काकांचे अनुभव रेफर करा. त्यांचा प्रचंड अभ्यास आहे.
पार्सल सिस्टिम चांगली ठेवा, प्लास्टिक किंवा पॅकिंग मटेरिअल साधेच वापरा पण सरकारी नियमात बसणारे आणि स्वच्छ वापरा. पेपरनॅपकीन च्या वापरावर लक्ष ठेवा. कॉलेजपरिसरात तो प्रचंड वाया घालवायचे प्रमाण असते आणि ते पर्यावरण आणि आर्थिक डृश्ट्याही परवडत नाही. डिशेस आणि बोल्स सर्विंगला असतात ते सुरुवातीलाच चांगल्या दर्जाचे, वापरण्यास सुलभ आणि रोटेशनला पुरेसे इतके घ्या.
रिपिट येणार्‍या, त्या एरीयातील यंग कस्टमरांचे मोबाईल नंबर घेऊन ठेवा, त्यांना व्हाटसप वरुन मेसेज किंवा इमेजेसमधुन संपर्कात राव्हा, तेवढीच जाहिरात होत राहते. त्यासाठी काही स्कीम्स आणि क्रियेटिव्ह्ज बनवुन घ्या, मुलांमध्ये अशी पब्लिसिटी झाली कि अपोआप रिमाईंडस मिळत जातात.
हॉटेल धंद्यात शेवटचा पॉइट म्हणजे पेशन्स. आज हॉटेल किंवा स्नॅक्स सेंटर टाकले की फुल्ल पब्लिक सुरु झाले असेही नसते. त्यासाठी पैशाचा बॅ़कअप ठेवा. कन्सिस्टंटली काम केले, प्रयोग केले आणि पूर्ण श्रध्देने धंद्यात उतरलात तरच या धंद्यात यश आहे.
लैच टायपेगिरी केली पण धंद्यात अपयश आणि नुकसानीचा इतका अनुभव पाठीशी आहे की कुणी धंदा करतोय म्हणले की आवर्जुन बोलावेसे वाटते, त्याला यश मिळावेसे वाटते. त्याच्यातरी उदाहरणाने अजुन दोघे तिघे धंद्यात उतरावेसे वाटले तरी ती मोठी अचिव्हमेंट आहे.
सो. जास्त काही झाले असेल तर क्षमस्व आणि आपल्या नवीन व्हेंचरासाठी लाखो करोडो अब्जो शुभेच्छा.

अभ्या..'s picture

22 May 2019 - 5:53 pm | अभ्या..

आणि एक राहिलेच की, तुमच्या स्कीमचे कुपन देऊ नका मला.
देवदयेने आमच्या आदरणीय बिरुटे सरांनी कधी बोलावलेच औरंगाबादेला तर अवश्य येऊ आणि त्यांच्याच पैशाने तुमच्या हाटेलात मनसोक्त खादाडी करु हे प्रॉमिस. ;)

गवि's picture

22 May 2019 - 6:01 pm | गवि

हो हो. मी पण.

सर म्हणजे दरियादिल मनुष्य.. बाकी कसे का असेनात.

बबन ताम्बे's picture

21 May 2019 - 6:40 pm | बबन ताम्बे

जरा वेगळे नाव - झुंबड

चौथा कोनाडा's picture

25 May 2019 - 10:28 pm | चौथा कोनाडा

झुंबड

मस्त हटके नाव ! +१

सुखी's picture

21 May 2019 - 7:45 pm | सुखी

खावा sssकी

नाखु's picture

21 May 2019 - 7:46 pm | नाखु

हटके -नेटके
"चवदार तरी दमदार"

इंग्रजी माध्यमातून लिहीताना के सुट्टा लिहा तुमचे आडनाव म्हणून सुद्धा बोधीत होईल.

स्वतः च्या नावाचा ब्रांड करता आला तर बघा ते जास्ती फायद्याचे आणि लोकांना आपल्यातील वाटेल.

या धाग्यास प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक मिपाकराला आभार म्हणून आपल्या हॉटेल चे एक कुपन व्य.नि. द्वारे दिले जाईल.

कुपन मिळालं नाही :(.

गवि's picture

21 May 2019 - 8:07 pm | गवि

बंक-कर, Bunk-karr

बंकर

Bunk कर

बंकर्स

कॉलेज, क्लासला दांडी मारण्याच्या सवयीला प्रोत्साहन दिल्यासारखं वाटेल खरं.. सिरीयसली घेतलं तर.

सुधीर कांदळकर's picture

21 May 2019 - 9:04 pm | सुधीर कांदळकर

डेलिकसी द निशां

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2019 - 9:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाश्ता डॉट कॉम ठेवा. नाव नै आवडलं तरी औरंगाबादचा म्हणून कूपन पाठवालच मला माहिती आहे. नाही पाठवलं तरी नाश्त्याला तुमच्या हॉटेलात येईनच. :)

बाय द वे कोणत्या कॉलेजजवळ सुरु करताय ? माझ्याच कॉलेजशेजारी तर नाय ना ? :)

-दिलीप बिरुटे.

अर्धे कूपन फाडून मला द्या. लक्ष असू द्या.

फक्त औरंगाबादकर असं शेवटी लिहिलंय त्याकडे लक्ष गेलं नव्हतं नीटसं.

आशा मावळली. :-(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2019 - 9:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आदरणीय गविसेठ. आपण सुचवलेली नावे उत्तम आहेत, समजा त्यांना त्यापैकी एखादं नाव आवड़लं तर औरंगाबादकर म्हणून ती कुपन्स मला देण्यात यावी असे तुम्ही त्यांना सांगावे ही नम्र विनंती. आभार.

-दिलीप बिरुटे
(आपला नवशिष्य)

निशांत_खाडे's picture

21 May 2019 - 10:42 pm | निशांत_खाडे

फक्त औरंगाबादकर असे काही नाही. तुम्ही कधीही या.
कुपन्स लवकरच पाठवतो.

उस्मानपुऱ्यात, उत्सव मंगल कार्यालयाच्या समोर.
आयसीडी, बंसोड्स, सायन्स अकादमी, गायकवाड, गुरुकुल असे सर्वच क्लासेस २०० मीटर च्या आत आहेत.
तुमचे कॉलेज एक-सव्वा किलोमीटर असेल.

कोण's picture

21 May 2019 - 9:25 pm | कोण

#ZeroPeriod
BreakPeChai
FoodForThought
#HungryKya
Hunger-Games
ChaiPeCharcha
Chit Chat

निशांत_खाडे's picture

21 May 2019 - 10:36 pm | निशांत_खाडे

सर्वांचे आभार, प्रतिसाद येत राहूद्या.
सर्वच नावे एक से बढकर एक आहेत.

अजून हॉटेल चे काम चालू आहे, उदघाटनाची तारीख नक्की झाली कि सर्वांना व्य.नि द्वारे कुपन्स पाठवतो.

फुटूवाला's picture

5 Jun 2019 - 8:37 am | फुटूवाला

माझ्या घरापासून लांब नाहीये..
फुटूवाला
(लगनसराई आटोपल्याने आता रिकामटेकडाच)

स्वप्नीलदमाळवे's picture

22 May 2019 - 12:17 am | स्वप्नीलदमाळवे

१)उदरभरण

2)Headquarter ( काँलेज जवळ असल्याने codeword मध्ये बोलायला सोपे )

जालिम लोशन's picture

22 May 2019 - 12:35 am | जालिम लोशन

फुकुंनपी.

चांदणे संदीप's picture

22 May 2019 - 10:18 am | चांदणे संदीप

अशा नावाचं एक चायनीज सेंटर होतं चिंचवडात. बंद झालं ते नंतर.

Sandy

रमेश आठवले's picture

22 May 2019 - 1:49 am | रमेश आठवले

जोश

चित्रगुप्त's picture

22 May 2019 - 3:16 am | चित्रगुप्त

Healthy n' Spicy असे काहीतरी नाव देऊन तुमचे पदार्थ चटपटीत असूनही आरोग्यासाठी उत्तम आहेत, असे वाटू द्या आणि प्रत्यक्षातही असू द्या.
विविध प्रकारच्या Smoothies अवश्य ठेवा.

https://www.indiatimes.com/health/recipes/14-smoothie-recipes-for-a-quic...

https://www.vegrecipesofindia.com/smoothie-recipes/
.

सुबोध खरे's picture

22 May 2019 - 11:34 am | सुबोध खरे

चांगल्या हॉटेल ची काही लक्षणे
१) स्वच्छता-- हॉटेलची टेबले वारंवार स्वच्छ कपड्याने साफ ठेवणे हे फार महत्त्वाचे आहे. हॉटेलातील कपडा पार कळकट होईस्तोवर बरेच हॉटेल मालक बदलत नाहीत. हि बाब मुलींना विशेषतः खटकते त्यामुळे अशा हॉटेल वर त्या नाक मुरडतात. दर आठवड्याला नवीन नॅपकिन विकत आणणे ही स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तम गुंतवणूक आहे. याच खर्च आठवड्याला २० ते ३० रुपयांपेक्षा जास्त नाही.

२) बहुसंख्य हॉटेलात मेनुकार्डे कमी असतात आणि असली तरी वेटरना ती उचलण्याची घाई का असते हे समजत नाही. प्रत्येक टेबल वर २ मेनुकार्डे कायम स्वरूपी ठेवावी. १०० ग्राहकांपैकी एकाने जरी एक पदार्थ जास्त मागवला तरी त्या अतिरिक्त मेनूकार्डाचे पैसे वसूल होतात. मेनू कार्ड कुतूहलाने पाहिली असताना त्यातील एखादा पदार्थ आपण घ्यावा अशी साहजिक इच्छा ज्याचे पोट पूर्ण भरलेले नाही त्याची होते.

३) हॉटेलातील प्रत्येक कोपऱ्यात पंख्याची/वातानुकूलित यंत्राची हवा व्यवस्थित येईल हि काळजी घेणे. हॉटेलात बसणे आरामशीर असले तर नकळत ग्राहक तेथे परत येतो.

४) हॉटेलचा दर्शनी भाग प्रसन्न असावा. येणार ग्राहक बाहेरूनच "नको जायला" म्हणाला तर धंदा बसलाच समजा.

५) एखाद्या ग्राहकाने एखाद्या पदार्थाबद्दल तक्रार केली तर तो लगेच बदलून द्यावा. हॉटेलच्या धंद्यात अन्नपदार्थाची किंमत हि सर्वात कमी म्हणजे १०-२० % च्या वर जात नाही. चटणीला वास येतो आहे असे म्हटल्यावर आपल्याला येत नसेल तरी त्याजागी पर्यायि पदार्थ /केचप द्यावा. कारण मला वास येत नाही असे सांगितले तर ग्राहक मनात (किंवा उघडपणे) "आम्ही काय खोटे बोलतो आहोत का" असे म्हणतो आणि परत हॉटेलची पायरी चढत नाही.

६) श्री. पेठकर यांच्यासारख्या या व्यवसायातील अनुभवी आणि यशस्वी माणसांचा सल्ला जरूर घ्यावा आणि वेळोवेळी घेत राहावा.

औरंगाबादला आलो तर आपल्या हॉटेलला जरूर भेट देईन (आणि बिल संपूर्णपणे भरेन)

बाकी आपल्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा

समीरसूर's picture

22 May 2019 - 12:03 pm | समीरसूर

सुरेख प्रतिसाद!

सगळे मुद्दे अगदी चोख आहेत.

खूप प्रेमाने जरी नाही तरी अदबीने बोलणारे वेटर्स असतील तर ग्राहकाला चांगले वाटते. मी तर नेहमीच म्हणतो, हॉटेलच्या व्यवसायात तुम्ही काही हुकुमी गोष्टींची काळजी घ्या; ग्राहक अगदी चव बेताची आणि किंमती थोड्या चढ्या असल्या तरी पुन्हा पुन्हा येतात. स्वच्छता, प्रसन्न वातावरण, आरामदायी व्यवस्था, अदबशीर वेटर्स, माहितीपूर्ण मेनू कार्ड, तत्पर सेवा (हे खूप मह्त्वाचे; एका चांगल्या चवीच्या हॉटेलमध्ये केवळ सेवा ढिसाळ असल्याने लोकं जात नाहीत हे माझ्या पाहण्यातले उदाहरण आहे), ऐसपैस टेबले, वगैरे घटक असतील तर ग्राहक चवीकडे थोडे दुर्लक्ष करू शकतात.

कुठल्याही व्यवसायात जर एकंदर अनुभव चांगला, विनाकटकटीचा, पटकन काम करून देणारा, तत्पर सेवा देणारा, ग्राहकाला आदराने वागवणारा, माहिती देणारा, निर्णय घेण्यात मदत करणारा, योग्य पर्याय सुचवणारा, ग्राहकाला बोलण्यातून आपलेसे करून घेणारा असेल तर माझ्यासारखा ग्राहक फार चिकित्सा न करता, अधिक पर्याय न तपासता, आणि किंमतीचा फार विचार न करता निर्णय घेतो असे निरीक्षण आहे. अर्थात, काहीच वस्तू किंवा सेवांच्या बाबतीत असे होते. कपडे, छोट्या-मोठ्या वस्तू, ईलेक्ट्रिक, प्लंबिंग सेवा, भाज्या, किराणा, क्वचित लागणार्‍या वस्तू, वगैरे मी वरील प्रकारचा अनुभव आल्यास पटकन घेऊन मोकळा होतो. ही कामे फारशी आवड नसल्याने ती पटकन कशी संपतील याकडे माझा कल असतो. थोड्या फार फरकाने या वस्तूंचा किंवा सेवांचा दर्जा सारखाच असतो; त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता खूप कमी असते.

बहुसंख्य हॉटेलात मेनुकार्डे कमी असतात आणि असली तरी वेटरना ती उचलण्याची घाई का असते हे समजत नाही.

माय ग्यान-

१. टेबलावर मेनू कार्ड असणं म्हणजे ऑर्डर अजून दिली नाही हे ओळखायची खूण असू शकते, किंवा उलट.
२. मेनूकार्ड पाण्याने किंवा अन्नपदार्थाने खराव होउ नये म्हणून, असंही असू शकतं....

कमाल झाली भौ त्यांनी हाटेल साठी नावे सुचवाला सांगितले आणि इथले लोक्स त्यांना धंदा कसा करावा कि करू नये यावर लेक्चर देऊन राहिले. आता हाटेल उघडून राहिले म्हंजी काहीतरी अनुभव असलच कि गाठीला. कि ते तुम्हाला हाटेल कसे चालवायचे असे विचारून राहिलेत? नाव सुचवा एवढाच त्येंचा प्रश्न आहे.
बाकी जाऊ देत निशांत खाडे साहेब तुम्ही हाटेलाच नाव TTMM -तेरा तू मेरा मै असंच ठेवा. उधारी का धंदा खोटा हे लक्षात राहूद्या. आणी एक, हाटेलात प्रत्येक भिंतीवर घड्याळ लावा. पोराटोरांनी निवांत बसने वग्रे धंद्यासाठी मारक आहे 'आता उठा असे सांगायला लाऊ नका' अशा पाट्या लावायला हरकत नाही. बाब्बो बाकीचे प्रतिसाद वाचून मि पण अनाहूत सल्ले देऊन राहिलो कि :-)) माफी असावी.

शब्दानुज's picture

22 May 2019 - 7:08 pm | शब्दानुज

आपण हे वाचले का?

माझ्या या छोटेखानी उपक्रमासाठी नावे सुचवावेत तसेच काही सल्ला किंवा आयडीयाज असतील तर त्याही शेयर करावयात.

अरारारा ते वाचायचे राहूनच गेले कि. निशांत भाऊ मि पण सल्ल्या साठी जी माफी मागीतली ति परत घेतो. ते TTMM चा लक्षात राहूद्या, कुपन नाही पाठवला तरी चालेल. मुंबईसून संभाजीनगर येण्या जाण्याच्या खर्चाचा हिशेब केला तर मला इकडेच १० १५ दिवस नाष्टा केलेला परवडेल :-))

धर्मराजमुटके's picture

22 May 2019 - 6:52 pm | धर्मराजमुटके

कॉलेजात आताशा वाचनाची आवड राहिली आहे की नाही ? आहे तर मराठी पुस्तके वाचतात की इंग्रजी ? असे असेल तर एखाद्या प्रसिद्ध पुस्तकाचे नाव पण देऊ शकता.
उदा.
"रारंगढांग"
"कोसला"
फा ईव्ह पॉईंट समवन"
इ. इ.

नवीन प्रयोग आहे, जर मला कधी हॉटेल टाकता आले तर मी नक्कीच पुस्तकाच्या नावांचा वापर करेन. राजकारणाची आवड असेल तर
"चाय पे चर्चा"
"कॉफी आणि बरच काही..."
"निंबूज विथ निशांत"

असे काही प्रयोग करता येईल.

दादा कोंडके's picture

22 May 2019 - 11:59 pm | दादा कोंडके

भारी धागा आणि खत्रा प्रतिसाद.
गवि, अभ्या, खरे वगैरेंना संचालक मंडळ म्हणून घेउन एखादं कुठेही हाटील सुरू केलं तर नक्कीच चालेल. ;)

बाकी, कुपन्साठी एक-दोन नावं सुचवतोय.
१. बघतोस काय? नाश्ता कर.
२. किंवा सरळ नाश्ताचं भाषांतरीत नाव चालून जाइल. उदा. इंबीस (जर्मन), बोकादिलो (स्पॅनिश), कोलात्सिओन (फ्रेंच).

तुषार काळभोर's picture

23 May 2019 - 7:45 am | तुषार काळभोर

अन मांजर इलो?

shashu's picture

23 May 2019 - 6:12 pm | shashu

जब्राट
It's जब्राट
खा जब्राट व्हा जब्राट

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

24 May 2019 - 8:05 pm | हणमंतअण्णा शंकर...

आपल्या आसपासच्या सर्व यशस्वी खाद्यदुकानांची नावे तपासा. पुण्यातलं एक उदाहरण द्यायचं बावधन मधलं पीटर मोमो सेंटर.
याचं "मोमोलिशियस, नॉर्थ-इस्टर्न मॅजिक, इशान्य वडा-लसूण" असलं काहीही भंपक असतं तर मी त्या दुकानात बिचकूनच पाय ठेवला नसता. मी आधी राहत होतो तेथे "चस्का चवीचा: एक भन्नाट मिसळ" की काय असलं नाव होतं.हॉटेल एव्हाना बंद पडलं असेल. बाणेरात "रॉनीज कोल्हापुरी कॅफे बिस्त्रो" नावाचं एक हॉटेल होतं. तेही बंदच पडलं. बावधनलाच आता "दि वडापाव कॅफे" असल्या नावांचे हाय-फाय कॉफी-वडापाव सेंटर आहे. थोड्याच अवधीत त्यांना गाशा गुंडाळावा लागेल यावर मी पैज लावायला तयार आहे.
माझ्या थियरीनुसार नाव हे अतिसामान्य आणि कालानुषंगाने आधीच्या फॅशनचं असावं. तुमचं आडनाव अथवा भागाचं नाव अथवा गावाचं नाव. बास्स्. अजून एक उदाहरण द्यायचं तर बेंगलोरचं मावल्ली टिफिन सेंटर. बेळगावची स्वामी बेकरी. कोल्हापुरची खेमराज बेकरी. पुण्याचे मिलन, आवारे इत्यादी. यांच्यात कुठेही फॅन्सीपणा नाही.

याचं कारण असं की अतिसामान्य नाव जूनपणाचे द्योतक आहे. नंतर तुम्ही किती निष्ठेने उत्तम दर्जाचे अन्न देता त्यावर तुमची पुढची मदार आहे. त्यामुळे तुमच्या भागाचे, तुमचे आडनाव/नाव दुकानाचे नाव म्हणून वापरा. पुढे ज्यूस सेंटर किंवा नाश्ता सेंटर असू द्या. उदा. "क्ष्क्षक्ष ज्यूस सेंटर".

आता हे पटलं नसेल तर मी इतरत्र कुठेतरी दिलेली नावांची लिस्ट पाहा. आवडेल ते घ्या.
खादाडी,

मुदपाकखाना,

खवय्या,

बोटचाट,

जिभल्याचाट,

अरभाट,

तर्री,

वशाट,

विळती,

वदनी-कवळ-घेता,

पोटभर,

रांधण,

पंगत,

तडस,

आग्रह,

रस्सा,

तोंडाला-पाणी,

ढेकर,

हुरडा,

फोडणी,

सरबराई,

चव,

गोग्रास,

तीन दगड,

आर,

कालवण,

फस्त,

फराळ,

न्याहारी,

भूकलाडू-तहानलाडू,

दशमी,

शिदोरी,

सांजोरी,

आरोगण/ आरोगणा (लीळाचरित्रात खूपदा आढळतो , अर्थ: जेवण करणे)

ओदन,

कचक,

चित्राहुती,

हंडीबाग,

अळका,

गालदोडी,

ताटशिंगार,

जोग,

तुंबडी,

भुरका,

खाणोरा,

जावईजेवण

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

24 May 2019 - 8:18 pm | हणमंतअण्णा शंकर...

बाकी, तरुणाईला फॅन्सी नावं आवडतात असं म्हणणाऱ्यांसाठी सांगावेसे वाटते, 'पीटर मोमो सेंटर' येथे रोज शेकड्याने मोमोज फस्त केले जातात आणि खाणाऱ्यांचे सरासरी वय २५ असते. तरुणाई (फार घंताडा शब्द आहे) साठी परवडेबल असणं तरीही चवीला/दर्जाला/नगांमध्ये कोणतीही तडजोड नसणं एवढ्याच गोष्टी आकर्षित करतात.

palambar's picture

25 May 2019 - 4:58 pm | palambar

"सेल्फी "
पुण्यात "आम्ही पोहेकर" असे पोह्यांच्या
प्रकाराचे हाॅटेल चालू झाले आहे.

यशोधरा's picture

25 May 2019 - 7:15 pm | यशोधरा

शेवटी काय नाव ठेवलेत, ते सांगा नक्की.

दादा कोंडके's picture

25 May 2019 - 9:00 pm | दादा कोंडके

लोकांनी हॉटेलला नावं ठेवायच्या आत तुम्हीच ठेउन मोकळे व्हा. :P

यशोधरा's picture

26 May 2019 - 12:28 pm | यशोधरा

आय डी नामाला जागताय की. =))

चामुंडराय's picture

26 May 2019 - 12:32 am | चामुंडराय

खा डे
हे नाव कसं वाटतंय ?

स्मिताके's picture

27 May 2019 - 9:18 pm | स्मिताके

1. Snack Shack

2. Spice

3. #कट्टा

नीळा's picture

27 May 2019 - 10:29 pm | नीळा

Khadadi katta

रोमन रेन्स's picture

28 May 2019 - 3:36 am | रोमन रेन्स

Timepass Katta

छान. नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा

प्रतिसाद वाचनीय आहेत.

निशांत नाव चांगलं आहे तेच वापरा. निशांत कॅफे किंवा निशांत स्नॅक्स असं काहीतरी.
वर आलेल्या सुचवणींपैकी कॉलेज कट्टा आणि झुंबड देखील आवडली.

श्वेता२४'s picture

28 May 2019 - 11:21 am | श्वेता२४

आमच्या कॉलेज जवळ केस्टी'ज (आडनाव होतं मालकाचं त्यावरुन ठेवलं होतं.) म्हणून मिसळचं दुकान होतं. तसं तुम्ही खाडे'ज करु शकता (यात दोन अर्थ आहेत. ). बाकी खरंच कॅफे निशांत असं काहीसं साधंच नाव ठेवा फार काही वेगळं ठेवायला जाउ नका. वर कोठेतरी पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनिच्या समोरच्या गल्लीतील सुजन फूड्सचा उल्लेख आला आहे. मी तीथे सलग 4 वर्ष न चुकता नाश्ता केला आहे. हे एक छोटेसे दुकान आहे. हे पूर्णपणे महिलांद्वारे चालविले जाते. पोहे,उपमा, इडली, मेथी व आलू पराठा तसेच भाजणीचं व उपवासाचं थालीपीठ, यासोबत चटणी फुकट पण दही हवं असेल तर चार्जेस. पण चव, घटक पदार्थांचा दर्जा (तेल.इ. ) व स्वच्छता इतकी अप्रतीम व गरम गरम वाढणे असते, त्यामुळे पैसे जास्त गेले तरी तिथेच जायचे. लोकं बाहेर उभे असताता. दुपारी लिमिटेड लंच थाळी असते तसेच सकाळपासून पोळीभाजी तयार असते. ताक सदैव मिळते. तिथला चहा देखील दुधाचा (आलं किंवा वेलचीचा फ्लेवर नसलेला) घरातल्यासारखा मिळतो. माझ्यासारखेच वर्षानुवर्षे तिथलं गिऱ्हाईक होतं. सांगायचा मुद्दा हाच की पदार्थाची चव व स्वच्छताच मुख्य बाकी सगळे गौण आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jun 2019 - 3:22 pm | ज्ञानोबाचे पैजार

१. गीळ भिकारड्या
२. पैसे दे नाहीतर भांडी घास
३. वसवसाट
४. बापाची कॄपा
५. पटपट खा
६. मुकाट गीळा
७. नम्रतेने वागा
८. ऑर्डर कॅन्सल होणार नाही
९. टाईमपास घरी करावा
१०. आमचा दर्जा आमची काळजी
११. रानटी
१२. भस्म्या
१३. खाई त्याला खवखवे
१४. आईच्या रेसीपीला बायकोची चव
१५. उपकार

(वर कोणीतरी म्हणाले नावात काय आहे? ते पटले म्हणून मग जरा वेगळी नावे सुचवली)

अजून सुचली तर कळवतो.

पैजारबुवा,

श्वेता२४'s picture

1 Jun 2019 - 6:29 pm | श्वेता२४

ही नावे कमी आणि पुणेरी पाट्या जास्त वाटत आहेत.

एकुलता एक डॉन's picture

3 Jun 2019 - 4:01 am | एकुलता एक डॉन

९. टाईमपास घरी करावा

अश्लिल अश्लिल अश्लिल

चौथा कोनाडा's picture

3 Jun 2019 - 1:26 pm | चौथा कोनाडा

हा हा हा ......

लै भारी नावं पैजारबुवा !
यातलं कुठलाही नाव ठेवलं तर माझ्या तर्फे ९० मिली !

अभ्या..'s picture

1 Jun 2019 - 8:36 pm | अभ्या..

अरे बघा की राव तुमच्या हाटेलाच्या बारश्याकडे,
१०० च्या वर प्रतिसाद आले, कमीतकमी चारपाचशे तरी नावे सजेस्ट झालीत, इतके बहुमोलाचे ;) सल्ले मिळालेत.
निशांतमालक गप्पच. कुठले नाव आवडले ते सांगीनात, सुमडीत हॉटेल चालू करुन गल्ला सुरु केले की काय?
कुपनाचे राहुद्या हो पण काय नाव फायनल केलाव ते तरी सांगा.

कपिलमुनी's picture

3 Jun 2019 - 11:16 am | कपिलमुनी

नाव काहीही ठेवा , गल्ल्यावर बसणाऱ्याचे टोपणनाव आण्णा पाहिजे.
कारण नंतर कॉलेज ची मुले नाश्ता नेशन , चीजी बाईट , पोटभर वगैरे मध्ये ना जाता आण्णा कडे जातात . किंवा अण्णाकडे भेटतात, वाट बघतात . उधाऱ्या करतात आणि माया पण करतात

जॉनविक्क's picture

5 Jun 2019 - 1:50 pm | जॉनविक्क

अथवा ब्रँडिंग वगैरे वगैरे करायचे नसेल तर "हॉटेल PUBG" हे त्या लोकेशनला उत्कृष्ट नाव आहे.

चिगो's picture

11 Jun 2019 - 5:55 pm | चिगो

कॉलेज जवळ आहे म्हणून
'कॅन्टीन'
'एव्हरीडे खाडे'..

गवि's picture

11 Jun 2019 - 6:08 pm | गवि

अंतिमतः

-खाडे आहार भुवन
-खाडे क्षुधाशांति भुवन
-खाडे उपाहारगृह
खाडे स्नॅक सेंटर (पुढे पूर्ण जेवण , थाळी सुरु करायचा बेत नसल्यास)
-खाडे आरोग्य भुवन
-खाडे विश्रांती भुवन
-खाडे हॉटेल
-खाडे फूड कॉर्नर
-खाडे कॅन्टीन

यांपैकी नाव उत्तम ठरेल. फॅन्सी नावांपेक्षा क्वालिटी आणि चव यांवरच पुढे भारी ब्रँड बनेल हे असंख्य उदाहरणं आठवून पटतं आहे.
उलट नावावरच फार श्रम घेतलेत आणि चव सपक असं मत होऊ नये म्हणून साधं नाव असावं आणि पूर्ण फोकस चवीवर असावा (जी काळजी आपण घेतलीच असणार).

अभ्या..'s picture

11 Jun 2019 - 6:21 pm | अभ्या..

सरळ मग 'खा-डे' असच ठेवा की
खा मराठीत, डे विन्ग्लिशात.
.
ट्याग लाईन टाकायची "एव्हरीडे खा डे"
.
फक्त साप्ताहिक सुट्टी घेऊ नकात म्हनजे झालं. ;)

चौथा कोनाडा's picture

12 Jun 2019 - 1:23 pm | चौथा कोनाडा

बहुतेक हेच नक्की झालं असावं,
... पण "साप्ताहिक सुट्टी" त अडकलं असावं

विजय नरवडे's picture

11 Jun 2019 - 6:38 pm | विजय नरवडे

हॉटेल स्वाद

saumitrasalunke's picture

14 Jun 2019 - 4:19 pm | saumitrasalunke

निशांत आरोग्यभुवन
निशांत उपहारगृह
फुडशेल्फ
फुडीटेबल

चौथा कोनाडा's picture

17 Jun 2019 - 5:19 pm | चौथा कोनाडा

हे सगळं वाचून त्यांनी हॉटेल काढायचं रद्द केलं असावं बहुतेक :-)

उघडलंत का मग हॉटेल? काय नाव ठेवलंय ?