(दाराआडचा दगड)

mrcoolguynice's picture
mrcoolguynice in जे न देखे रवी...
4 Apr 2019 - 5:50 pm

एक दगड दाराआडून बघतो आहे मिपाबाहेर
किती बाहेर?
वास्तविकतेच्या बाहेर, भावनांच्यावर स्वार
जिथे एक कवयत्री बसली आहे स्तब्ध....
करत तरी असेल का तो क्षणभर तिचा विचार ?

जात असेल का हो तोही
विडंबनाच्या बाहेर, ट्रोलीकतेच्या पलीकडे?
का टाळ कुटातून तो बाहेरच येऊ शकत नाही...

अशा बेइमान उजेडात
मग कवयत्री तिच्या जिंदगाणीचा अनुवाद वात करून पाठवते,
अंधारात दगड शांतपणे जागा राहतो....
कारण त्याला आजकाल पाझरायलाच होत नाही,
हळूहळू आपण डोकी गहाण ठेवणारा ठोंब्या
कसा झालो,हे त्याचं त्याला कळत नाही;

विझणारी ती मुलगी मात्र
वात नसलेल्या कंदिलाआडून बघत राहते...
बघतच राहते....

वावर

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

4 Apr 2019 - 9:12 pm | पाषाणभेद

दगडाचा उपयोग काय? किती मोठा आहे तो?

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Apr 2019 - 12:02 am | डॉ सुहास म्हात्रे

हो ना, दगडाचा आकार कळला तर, तो दुसर्‍याच्या डोक्यात घालायचा की त्याच्यावर स्वतःचे डोके आपटावे, हे ठरविणे सोपे जाईल. ;) :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Apr 2019 - 9:54 am | ज्ञानोबाचे पैजार

पण नशिब,
दारा आडची वीट असे लिहिले नाही,
(वीटेचे विविध उपयोग माहित असलेला सुलेमानमिया) पैजारबुवा,

दुर्गविहारी's picture

5 Apr 2019 - 10:12 am | दुर्गविहारी

हायला ! दारं आहेत तरी किती ?