(दाराआडचा मुलगा)

Primary tabs

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
4 Apr 2019 - 9:54 am

पेरणा

एक मुलगा दाराआडून चोरून चोरून बघतो आहे बाहेर
किती बाहेर?
बाथरुमच्या बाहेर, खोलीमधे
जिथे त्याची मैत्रीण बसली आहे
मोबाईल वर गेम खेळत त्याचीच वाट बघत,
करत असेल का ती ही तिकडून जाण्याचा विचार?
समजले असेल का तिलाही
तो चोरून तिच्या कडे बघतो आहे,
तिच्या जाण्याची वाट बघत ?
मुलगा दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
कारण तो टॉवेल आणि कपडे खोलीत विसरला आहे,
ते नेमके त्या मुलीच्याच शेजारी पडलेले आहेत,
मुलगी मात्र गुंग होऊन मोबाईल मधे बघत असते....
टॉवेल विसरलेला मुलगा
बाथरुमच्या दाराआडून बघत राहतो...
हताशपणे वाट बघतच राहतो....

पैजारबुवा,

आता मला वाटते भितीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडवाङ्मयइंदुरीवडेकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

4 Apr 2019 - 10:17 am | संजय पाटिल

भन्नाट.....
तेही फक्त ७ मिनीटात?

संजय पाटिल's picture

4 Apr 2019 - 10:19 am | संजय पाटिल

सॉरी सॉरी...
तारीख बघीतली नाही....
१ दिवस ७ मिनीटे...

अन्या बुद्धे's picture

4 Apr 2019 - 10:48 am | अन्या बुद्धे

:)

पाषाणभेद's picture

4 Apr 2019 - 11:39 am | पाषाणभेद

हाण्ण ति चाय ला

दुर्गविहारी's picture

4 Apr 2019 - 11:44 am | दुर्गविहारी

या गतीने विडंबने येत राहिली तर दहशतीने बहुधा नवीन कविता येणार नाहीत. ;-)

प्रत्येक गोष्टीचे वर्तूळ असते. चढणे आले अन बुडणे आलेच.
पुल म्हणतात त्याप्रमाणे तो विश्वेश्वर घट्ट आहे. त्याला कसलेतरी सोयर नाही अन कसलेतरी सूतक नाही.

बाथरुमच्या दाराआडून बघत राहतो...
हताशपणे वाट बघतच राहतो....

मुर्ख लेकाचा!!!

अभ्या..'s picture

4 Apr 2019 - 12:35 pm | अभ्या..

मी म्हणतो असल्या इंग्लिश आंघोळी कराव्याच कशाला?
;)

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Apr 2019 - 3:42 pm | राजेंद्र मेहेंदळे

या मुलाच्या दाराआडुन बघण्याला आणि बाहेर न येण्याला काहीतरी लॉजिक आहे.

मराठीत सुलभ अर्थ प्लीज..

खिलजि's picture

4 Apr 2019 - 4:57 pm | खिलजि

जबराव जबराव जबराव

झ्याक झालंय

मज्या आली

चामुंडराय's picture

4 Apr 2019 - 5:10 pm | चामुंडराय

हा हा......

इडंबनाचं पेव फुटलंय राव मिपा वर

चांगलंय .. चांगलंय ..

अभ्या..'s picture

4 Apr 2019 - 5:10 pm | अभ्या..

दाराआड लै जण झाले म्हणून धागा न काढता अ‍ॅक्चुअल दाराचा मुलगा इथेच..
.
.
.

एक मुलगा दाराआडून बघतो आहे बॉलीवूड
किती ते प्रचंड?
फसलेल्या हिरोगिरीचे, नसलेल्या कुवतीचे
बिगबॉसच्या बक्षीसाचे, फिक्सिंगच्या अटकेचे...
दारा करत असेल का त्याचा विचार?
शिकवलं असेल का त्याला कधीतरी.
अचाट ताकतीसोबत राखलेला संयम.
पौराणिक पात्रे साकारतानाचे संस्कार.
मुलगा ते नाही घेऊ शकत.
दारा आपले काम करतच राहतो.
जब वी मेट चा पूर्ण पिकलेला सरदार
मुलाला कामावरची निष्ठा शिकवत राहतो
वय हरवलेला मुलगा
आता हनुमानाच्या रोलमध्ये
दिल्लीत रामलीला करत राहतो....

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Apr 2019 - 5:14 pm | ज्ञानोबाचे पैजार

एकच फाईट वातावरण टाईट.
पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

4 Apr 2019 - 6:04 pm | तुषार काळभोर

लै भारी
लै भारी
लै भारी
लै भारी

गोंधळी's picture

4 Apr 2019 - 5:15 pm | गोंधळी

मुलगी मात्र गुंग होऊन मोबाईल मधे बघत असते....
टॉवेल विसरलेला मुलगा
बाथरुमच्या दाराआडून बघत राहतो...
हताशपणे वाट बघतच राहतो....

मोबाईलमुळे होणारा दुष्परीणाम सांगीतला आहे.असे वाटते.

शिव कन्या's picture

4 Apr 2019 - 9:39 pm | शिव कन्या

ज्ञानोबाचे पैजार, अभ्या भौ .... मस्त !! :))

शिव कन्या's picture

4 Apr 2019 - 9:39 pm | शिव कन्या

ज्ञानोबाचे पैजार, अभ्या भौ .... मस्त !! :))

सोन्या बागलाणकर's picture

5 Apr 2019 - 2:33 am | सोन्या बागलाणकर

तुफान!
मैत्रिणीलाच का नाही सांगत टुवाल द्यायला?

जव्हेरगंज's picture

5 Apr 2019 - 9:34 pm | जव्हेरगंज

Kadak !!

नाखु's picture

21 Apr 2019 - 1:45 pm | नाखु

आंघोळ करत असल्याने हा घोळ झाला आहे.
त्याने मैत्रीण अंमळ बिनांघोळीची असेल आणि याच्याच आमंत्रण इच्छुक असेल तर नो घोळ नो टोळ.

अखिल मिपा पायघोळ ते पांजरपोळ संघाच्या "गुलाबी खुसपुस" या अनियतकालिकाच्या धोत्र्याची फुले या सदरातून साभार