" मासिक पाळी " याबद्दल शास्त्र काय सांगते ? पुराणामध्ये काही या विषयाबद्दल लिहिले आहे का ?

खिलजि's picture
खिलजि in काथ्याकूट
14 Jan 2019 - 3:39 pm
गाभा: 

मिपाकरांनो , मला या विषयाबद्दल नेहेमीच औत्सुक्य वाटत आले आहे . खरं तर हा खूप महत्वाचा विषय आहे .. मासिक पाळी टाळण्यासाठी अजूनही स्त्रिया जे पण काही करता येईल ते करतात . कुणी आयुर्वेदिक उपाय करून ते लांबवतात तर कुणी ऍलोपॅथीच्या गोळ्या खाऊन लांबवतात . कारण एकच, धार्मिक विधी किंवा समारंभाला हजर राहणे .
खरंच याची गरज आहे का ? जे नैसर्गिक आहे ते आहे , ते उगाच गोळ्या खाऊन नाना उपाय करून का पुढे ढकलायचे ? उगाच गर्भाशयाच्या आजारांना का निमंत्रित करायचे ?
मी स्वतः माझ्या घरी यावर ठाम मते मांडली आहेत आणि ते करण्यापासून मज्जावही घातला आहे . त्या समारंभाला वाटल्यास हजर राहू नका पण ती पाळी पुढे ढकलण्यासाठी निदान गोळ्या तरी घेऊ नका .
कुणी महत्वाची व्यक्ती गैरहजर असेल तर , आपलेच नातेवाईक नको नको ते बोलतात . तिला काम करायचा कंटाळा आला असेल किंवा यायचेच नसेल .. बोलून देत , कुणाला फरक पडतोय ? निदान मला तरी नाही पडत , पण मी ज्यांना हे बळजबरीने करायला सांगतो त्यांचे मात्र चेहरे हिरमुसलेले असतात .

पुराणातही मला या विषयावर काही लिहिलेले आढळलेले नाही आहे . तरी देखील इतके न्यूनगंड मनात या विषयाबद्दल का बाळगावे ? का स्त्रियांना इतके दुय्यम वागविले जाते ? ते मला अजूनही कळलेले नाही आहे .
मुळात या प्रकारापासून लांब राहण्यासाठी ज्या काही पळवाटा त्या शोधतात त्या खरंच धोकादायक आहेत . त्यावर कुणीही भाष्य करत नाही , किंबहुना हे जे गर्भाशयाचे कर्करोग होतात त्यामागे हेच मुख्य कारण असावे असे माझे मत आहे .
मिपाकरांचे मत जाणून घ्यायला मी खरंच उत्सुक आहे . मग ते पुराणकालीन असो किंवा शास्त्रीय किंवा अजून दुसरे काही , पण मत मांडावी हि अपेक्षा ...

सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया

माहितगार's picture

14 Jan 2019 - 5:10 pm | माहितगार

....त्यावर कुणीही भाष्य करत नाही .....

अगदी दोन महिन्यापुर्वी साबरीमाला निमीत्ताने या विषयावर डिटेल प्रश्नावलीसहीत मासिक पाळी, शरीर विज्ञान आणि अंधश्रद्धा चर्चा धागा काढला होता. चर्चा फारशी पुढे गेली नाही हा भाग वेगळा.

....पुराणातही मला या विषयावर काही लिहिलेले आढळलेले नाही आहे...

:) सॉरी उपरोक्त वाक्य वस्तुनिष्ठ नसावे. एखाद दोन अपवाद वगळता सर्वच प्रभाव ठेऊन असलेल्या विवीध धर्मीय साहित्य या विषयावर अंधश्रद्धात्मक विचार ठेवत होते तसा हिंदूधर्मीय स्मृती साहित्याचे पुरेसे नकारात्मक योगदान राहिले असण्याची शक्यता असावी. पुराणपुर्व काळात ज्या काही अंधश्रद्धा असतील त्यास पौराणिक साहित्याने भर घालून प्रभाव वाढवण्याचे कार्य केले असावे , अर्थात किमान शहरी मध्यमवर्गीय भागातून एकुणच पौराणिक प्रभाव कमी होत असताना आपणास त्याची कल्पना नसणे समजता येण्यासारखे असावे.

तुर्तास एवढेच

Ya विषयावर खूप वेळा काथ्याकूट झाला आहे. जुने लिंक सर्च केल्या तर सापडतीलच..

मिपाकरांचे मत जाणून घ्यायला मी खरंच उत्सुक आहे

ही एक नैसर्गिक गोष्ट असून त्याचा संबंध कोणत्याही धार्मिक गोष्टीशी लावू नये. जर इतकेच देवाला स्त्री भक्तांच्या ya गोष्टीचा त्रास होत असता तर त्याने कदाचित स्त्री ला असे बनवले च नसते.

एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आली असेल तर गोळ्या औषधे खाऊन धार्मिक कार्यक्रम जबरदस्ती ने अटेंड करण्याचा खटाटोप करू नये.

कार्यक्रम आयोजकांना मासिक पाळी असणारी स्त्री कार्यक्रमात चालत नसेल तर खुशाल त्यांना फाट्यावर मारावे. पण विनाकारण औषधे घेऊन शरीराचा समतोल बिघडवू नये.

खिलजि's picture

15 Jan 2019 - 3:07 pm | खिलजि

बाप्पू साहेब , मला माहित नव्हते कि आधीपण या विषयावर बरीच चर्चा झालेली आहे ते . असो ,आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत ..

आधी चर्चा झाल्या असल्यास दुवे द्यावेत म्हणजे चर्चेत तोच तो पणा कमी ठेवण्यास साहाय्य होऊ शकेल असे वाटते.

पूजेला आणि मंदिरात जाण्यास मासिक पाळी चालू असताना मनाई आहे आणि तशी रीतच समजत पडली आहे .
आणि ही रीत खूप जुनी पण आहे ती नक्की कधी चालू झाली ह्याची मला तरी माहिती नाही .
मासिक पाळी ही ऐक शारीरिक क्रिया आहे हे सर्व जन जाणतात .तरी सुधा अशी प्रथा का पडली असेल ज्या धर्मात स्त्री ल देवीच्या ठिकाणी मानतात त्याच धर्मात स्त्री ला कमी समजणारी प्रथा आहे हा ऐक विरोधाभास आहे .
पण तोच हेतू आसेल आस आपण ठामपणे का समजतो .
मासिक पाळी दरम्यान स्त्री पा कंबर दुखी च त्रास होतो
आणि mood swing Sudha होतो .
आणि चिडचिड सुधा होते तेव्हा ह्या काळात स्त्री ल आराम मिळावा म्हणून धर्माच्या नावा वर ही प्रथा चालू झाली असेल हे आपण का नाकारतो .

बाप्पू's picture

15 Jan 2019 - 6:07 pm | बाप्पू

धर्मा च्या नावावर जे काही चालू झाले असेल आणि चालत आले असेल ते योग्य च असावं असा काही नियम नाहीये.

स्त्री "त्या" दिवसांमध्ये जर चालू शकते फिरू शकते खाऊ शकते घरातील आणि ऑफिस मधील सर्व कामे करू शकते तर पूजा करताना कोणता मूड स्विंग आणि पाठदुखी आडवी येणार आहे?

खिलजि's picture

15 Jan 2019 - 8:05 pm | खिलजि

मला अजून एक शंका आहे , ते म्हणजे जी पण देवीची जागृत देवस्थाने आहेत , तेथे देवीचे पण हे दिवस का पळाले जात नाहीत ? हा नियम जर सर्व स्त्री जमातीस लागू आहे , तर एखादी जागृत देवी जिला आपण त्या संपूर्ण गावाची शहराची माता समजतो , तिला हे सर्व लागू नसावे का ? तिने फक्त या मंदिरांच्या बडव्यांची तिजोरी भरण्यासाठी जंन्म घेतला आहे का ?
मला वाटत , हे सर्व तिलाही लागू करावे . तिचे महिन्यातील काही दिवस नेमून घ्यावेत आणि त्यानुसार मंदिर बंद ठेवण्यात यावे .
हे सालं , मन बी ना येड्यावानी धावत सुटतं . मी दुर्लक्ष करायचे ठरवले होते पण काही प्रतिसादच असे आले या धाग्यावर कि माझं मन पुन्हा इकडेतिकडे धावायला लागले ..
पुन्हा एक नवीन प्रश्न

जर स्त्रियांना हे सर्व लागू आहे तर देवीच्या मंदिरांना का लागू नाही ?

ट्रम्प's picture

17 Jan 2019 - 5:16 pm | ट्रम्प

पूर्वी पासून घरातील अशिक्षित वडिलधारी मंडळी आणि मंदिरातील बडवे पुजारी हे कारणीभूत आहेत पाळी बद्दल गैरसमज पसरवायला . पण आताच्या 90 टक्के सुशिक्षित बायका नियम धाब्यावर बसवत आहेत , चांगला बदल होत आहे

विशुमित's picture

17 Jan 2019 - 5:25 pm | विशुमित

90%??
आकडा कुठून काढला?

चिनार's picture

17 Jan 2019 - 5:48 pm | चिनार

सेम प्रश्न..
माझ्या मते जास्तीत जास्त १० टक्के बायका (सुशिक्षित!) नियम धाब्यावर बसवत असतील. आणि बाकी ९० टक्के त्यांच्याकडे बघून नाक मुरडत असतील.

ट्रम्प's picture

17 Jan 2019 - 11:01 pm | ट्रम्प

एवढ्या लवकर दोघानी विरोध केलाय म्हणजे अंदाज नक्की चुकलेला दिसतोय !!! = )

विशुमित's picture

18 Jan 2019 - 11:57 am | विशुमित

माझ्या मते स्थिती खूप गंभीर आहे.
विरोध वगेरे करण्याचा बिलकूल हेतु नव्हता. कृपया गैरसमज नसावा.

4/5 दिवस पगारी सुट्टी सरकारनी period काळात देणे चालू केले तर किती स्त्रिया nakartil हा पण ऐक प्रश्नच आहे
थोडा वेळ धर्म बाजूला ठेवूया आणि आसा विचार करू की त्या काळात स्त्री का त्रास होतो म्हणून त्यानं भर पगारी सुट्टी दिली गेली पाहिजे तेव्हा कशा प्रतिक्रिया येतील .
तेव्हा सुट्टीच समर्धन करणाऱ्या प्रतिक्रिया जास्त प्रमाणात येण्याची शक्यता आहे .फक्त रिती रिवाज आहे म्हणून ज्यांना पटत त्यांनी ते पाळल तर बाकी लोकांना आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही .
आणि ह्या मध्ये स्त्रियां वर कोणताच शारीरिक ,मानसिक अत्याचार पण होत नाही मग विरोध का ?
काही मंदिरात पुरुषांना सुधा बंदी असते त्या वरून कोणत्याच पुरुषात अन्याय होतोय ही भावना नसते

4/5 दिवस पगारी सुट्टी सरकारनी period काळात देणे चालू केले तर किती स्त्रिया nakartil हा पण ऐक प्रश्नच आहे

माझ्या माहिती प्रमाणे अशी कोणतीही मागणी स्त्रियांनी कधीच केली नाहीये. प्रत्यक्षात स्त्री ने कधीच त्या दिवसांना आपली कमजोरी किंवा अराम करण्याचा बहाणा मानलेले नाहीये. त्यामुळे उगाच स्त्रियांच्या नावाने काडी टाकून आग लावून मजा बघत बसण्याचा हेतू दिसतोय तुमचा.

जर स्त्रियांना हे सर्व लागू आहे तर देवीच्या मंदिरांना का लागू नाही ?

तार्किक दृष्टया तुमचा मुद्दा बरोबर असला तरी, देवतांना सामान्य मनुष्याच्या बरोबरीला बसवणे योग्य वाटत नाही..
बाकी या मुद्द्यावर जे लोक स्त्री ला त्या दिवसात मंदिर प्रवेश नाकारतात तेच उत्तर देऊ शकतील.

मी तरी अजून कुठलाही देव देवता पहिली नाही . किंबहुना ती संकल्पना , माणसाच्या पावित्र्यावर बेतलेली असावी असे मला वाटते .
जर एखाद्या स्त्रीने काही ज्वाजल्य त्याग किंवा समाजास अमूल्य असे योगदान दिलेले असेल तर बहुदा अनादी काळापासून तिला देवतेचं स्वरूप देण्यात आलेले असावे .. आणि जर ती देवता , एखाद्या स्त्रीत्वाला कारणीभूत असेल तर नियम जे इतर स्त्रियांना लागू असतील ते तिला बसवलेल्या मंदिरासही लागू करावेत .. हे सर्वस्वी माझे मत आहे ....

….आणि जर ती देवता , एखाद्या स्त्रीत्वाला कारणीभूत असेल तर नियम जे इतर स्त्रियांना लागू असतील ते तिला बसवलेल्या मंदिरासही लागू करावेत .. हे सर्वस्वी माझे मत आहे ....

म्हणजे नेमके काय म्हणावयाचे आहे ?

स्त्रीच्या ममत्वामुळेच कदाचित तिला देवतास्वरूप मानले गेले असेल . स्त्रियांनी प्राचीन काळीही असे काहीतरी भरीव योगदान दिले असेल कि त्याची दाखल कदाचित तत्कालीन समाजाने त्यांच्या पश्चात त्यांना देवस्वरूप मानून केली असणार . उदाहरण घ्यायचेच झाले तर साईबाबा .. ते जिवंत असताना त्यांना तेव्हढं पुजलं नसेल जेव्हढं आज जातंय ..तसेच या देवतांच्या मंदिरांचे असेल .. ज्या ज्या गावी ग्रामदेवता असतील त्या कदाचित त्याच गावातील पूजनीय स्त्रिया ( प्राचीन काळातील ) असतील ज्यांना आज आपण मनोभावे हातभेटीचे नारळ देतो.

माहितगार's picture

23 Jan 2019 - 9:16 pm | माहितगार

अद्याप प्रश्न अनुत्तरीत आहे

….आणि जर ती देवता , एखाद्या स्त्रीत्वाला कारणीभूत असेल तर नियम जे इतर स्त्रियांना लागू असतील ते तिला बसवलेल्या मंदिरासही लागू करावेत .. हे सर्वस्वी माझे मत आहे ....

म्हणजे नेमके काय म्हणावयाचे आहे ?

रोमन रेन्स's picture

21 Jan 2019 - 4:38 pm | रोमन रेन्स

स्त्री मानवाच्या प्रजनन प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावते ,म्हणून स्त्रीला वेद पुराणात किंवा देवींच्या रुपात देवत्वाची जागा दिली आहे. पण आज मासिक पाळीच्या काळात मंदिरात प्रवेश न देण्याचा विषय काढला कि खरंच वाटते नक्की देव कोण आहे आणि दास दासी कोण आहे?याच्यावर काहीही उपाय नाही कारण समाजाची मानसिकता बदलायला खूप काळ लागतो.

खंडेराव's picture

19 Feb 2019 - 1:06 pm | खंडेराव

एकदा गुवाहाटीमध्ये असतांना कामाख्या मंदिर ३-४ दिवस देवीच्या मासिक पाळी मुळे बंद होते असे अंधुक आठवते आहे.