मासिक पाळी, शरीर विज्ञान आणि अंधश्रद्धा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
15 Nov 2018 - 10:25 am
गाभा: 

मिपाच्या चालू घडामोडी धाग्यावरील साबरीमाला चर्चा दुसर्‍या सदस्य महोदयांना मासिक पाळी अपवित्र वाटते या मुद्यावर आली तेव्हा मध्येच सोडून दिली. (माझी वैचारीक बाजू लावून धरण्याची व्यवस्थित क्षमता असूनही) कारण मासिक पाळी , शरीर विज्ञान आणि अंधश्रद्धा हा स्वतंत्रपणे चर्चा करण्याची गरज असलेला विषय असावा. मासिक पाळी विषयक शरीर विज्ञान , श्रद्धा - अंधश्रद्धा या बद्दल चर्चा करण्याची खरेच गरज नाही का ? गेल्या वर्षाभरातील काही सर्वसाधारण अनुभव एका देवीच्या मंदिरापाशी एक जोडपे पोहोचते पाळीच्या कारणाने नवरा एकटाच मंदिरात जातो पत्नी स्वतःहून मागे बाहेर उभी टाकते. मंदिरात गेले काय नाही गेले काय, काय फरक पडतो ? एका महाविद्यालयातील एक विद्यार्थिनी कॉलेजचे वर्ग मधात सोडून घरी परतली , कारण पॅड ओव्हर फ्लो महाविद्यालय असो वा इतर संस्थातील सुविधांबद्दलची अनुत्तरीत प्रश्ने आणि न झालेल्या चर्चा ? केवळ सर्वसाधारण शिक्षण वाढल्यामुळे प्रश्न मिटतात ? मग संपूर्ण साक्षरता असलेल्या केरळात असो वा युरोमेरीकेतील प्रश्न असोत मिटलेत ? आणि भारतातील वयात येणार्‍या मुलींच्या मोठ्या प्रमाणात शालेय शिक्षण अर्धवट सोडण्या मागे अद्यापही मासिक पाळी व्यवस्थापन हि एक ठळक समस्या आहे त्याचे काय ?

मिपा आणि मायबोलीचा शोध घेतला, मायबोलीवर अंधश्रद्धा विषयक अल्प चर्चा मागे केव्हा तरी होऊन गेल्याचे दिसले, मिपावरही अल्प अनुषंगिक चर्चा झाल्या असाव्यात पण सविस्तर चर्चा झाल्याचे दिसले नाही.

हा चर्चा प्रस्ताव टाकण्या आधी दोनदा तरी हात आखडता घेऊन थांबून राहीलो. साबरीमाला अनुषंगाने मासिक पाळी अपवित्र मानणारी (?) मंडळी चालू घडामोडी धाग्यावर आपले मुद्दे रेटत असताना मिपाकर विशुमित यांनी त्यांच्या प्रतिसादातून "क्षमा करा वैयक्तिक वाटून घेऊ नका, तुमच्या घरातील माताभगिनींचा आदर ठेवून विचारतो,खरंच 100% विटाळ पाळला जातो का??" असा प्रश्न उपस्थित केलेला दिसला तेव्हा या अनुषंगाने एकुणच चर्चा पुढे नेता येईल असे वाटले.

या चर्चा धाग्यात साबरीमाला प्रवेशाबाबत खुपशी चर्चा अपेक्षित नाही. मुख्य धागाचर्चा विषय मासिक पाळी शरीर विज्ञान आणि अंधश्रद्धा असा आहे.

चर्चेसाठी काही प्रश्न मांडतो .

१.१ ) मासिक पाळी म्हणजे काय ? शरीर विज्ञानाच्या दृष्टीकोणातून स्पष्ट करा , शरीरविज्ञानाच्या दृष्टीने सुयोग्य दर्जायुक्त मराठी हिंदी इंग्रजी युट्यूब दुवेही उपलब्ध केल्यास उत्तमच

१. २.१.१ ) मासिकपाळी विषयक आपणास समाजावरील प्रभाव असलेल्या कोणत्या पौराणिक कथा माहित आहेत ? विशेषतः इंद्र आणि ऋषिपंचमी विषयक कथा कोणत्या आहेत ? यातील काही कथांनी स्त्रीमनांवर मासिकपाळी विषयक अपराधीत्वाची भावना निर्माण होण्यास अप्रत्यक्ष कारणीभूत राहील्या असण्याची आपणास शक्यता वाटते का ? कथेच्या प्रभावाची आणि या कथेच्या आर्थीक निम्नस्तरीय आणि ग्रामीण प्रभावाची सद्यस्थितीची आपणास कल्पना असल्यास माहिती हवी आहे .

१.२.१.२) पुर्वी ज्याकाळात पाळीच्या तारखांवर औषधी नियंत्रण शक्य नव्हते तेव्हा विवाह मुहूर्त पाळण्याची अंधश्रद्धा पण जोरदार होती आणि पाळी चे दिवस अपवित्र समजले जात त्या काळात विवाह मुहूर्त पाळण्यास प्राधान्य द्यावे लागत असेल तर या दोन गोष्टींचा मेळ जुन्या काळातले लोक कसे घालत असत ?

१.२.२) मासिक पाळी विषयक आपल्या व्यक्तिगत / आपल्या कुटूंबीयांच्या / आपल्या नातेवाईकांच्या / परिचीतांच्या / कार्यालयीन कर्मचार्यांच्या ते आपल्याकडे काम करणार्‍यांच्या श्रद्धा अंधश्रद्धांचे सद्य स्वरुप कसे आहे ( महाराष्ट्राबाहेरील स्थितीची कल्पना देण्यास हरकत नाही पण या प्रश्नाद्वारे मुख्यत्वे महाराष्ट्रातील सद्य श्रद्धा स्थिती बाबत जाणून घ्यायचे आहे )

१.२.३) श्रद्धा अंधश्रद्धां च्या कारणाने आपण व्यक्तिशः / आपल्या कुटूंबीयांच्या / आपल्या नातेवाईकांच्या / परिचीतांच्या / कार्यालयीन कर्मचार्यांच्या /घरकाम करणार्‍यांच्या औषधे आणि वैद्यकीय उपायांनी मासिकपाळी च्या तारखा बदलली जात असल्याबद्दल सद्य स्वरुप कसे आहे . मासिकपाळी च्या तारखा बदल ण्याचे अथवा गोळ्या औषधांचे इतर काही दुष्परिणाम असतात की दुष्परिणाम सहन करायचे असतात की

१.२.३) केवळ हिंदूंच्याच अंधश्रद्धांची चर्चा करतो आहोत असा आक्षेप नको, मुस्लिमांमधील मासिकपाळी विषयक अंधश्रद्धांची सुद्धा माहिती द्या, तसेच एका धर्मातील अंधश्रद्धांचा आधार घेऊन दुसर्‍या धर्मातील अंधश्रद्धांचे समर्थन टाळले जाईल हि अपेक्षा

१.३) घरकामासाठी स्त्री मदतनीस ठेवणार्‍या आपण स्त्री आहात ? आर्थिक सुस्थित वर्गीयांकडे सर्वसाधारणपणे घरकाम करण्यासाठी स्त्रीया येतात त्यांनाही मासिकपाळीच्या समस्या असू शकणार त्यांच्या आणि तुमच्या सध्याच्या त्यांचे काम, सुट्ट्या आणि श्रद्धा अनुषंगाने त्यांच्या पिएम एस आणि पाळी समस्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपण संवाद साधून त्यांना सहकार्य एक एम्प्लॉयर म्हणून आपण पुरवता का ? आपल्या सहकार्याचे स्वरुप काय असते ?

२) पि एम एस म्हणजे काय ? या बद्दल पि एम एस बद्दल मिपावर एक चांगला धागा लेख आहे . त्या धागा लेखाचा दुवा उपलब्ध करुन देण्यापुर्वी किंवा वाचण्यापुर्वी पि एम एस म्हणजे काय ? ह्याची किती जणांना किंवा आपल्याला स्वतःस कल्पना असल्यास आपल्या परिचयातील किती जणांना कल्पना आहे ?

२.२ ) पि एम एस बद्दलच्या आधीच्या धाग्यात व्यक्तिगत जिवनातील समस्या व्यवस्थापनाबद्द्ल चर्चा दिसते पण नौकरी दरम्यानच्या पि एम एस व्यवस्थापनाबद्दल चर्चा दिसत नाही . ऑफीस असो का फिल्डवर्क पि एम एस बाबत काम करताना कोणत्या समस्या स्त्रीयांना येतात ? संस्थेत काम करणार्‍या स्त्रियांच्या पि एम एस समस्यांमुळे संस्थेचे काम , संस्थेची उत्पादकता , संस्थेची ग्राहकाभिमुखता , कर्मचार्‍यातील खेळीमेळीचे वातावरण प्रभावित होण्याच्या शक्यता असू शकतात का ? संस्थेचे काम , संस्थेची उत्पादकता , संस्थेची ग्राहकाभिमुखता , कर्मचार्‍यातील खेळीमेळीचे वातावरण प्रभावित होऊ नये यासाठी पि एम एस समस्यांचे व्यवस्थापन कशा पद्धतीने व्हावे असे आपणास वाटते ?

३) मासिक पाळी आणि पि एम एस बाबत पुरुषांना जागरुक करण्याची गरज आहे का ? पुरुषांना कोणत्या वयात आणि कोणत्या मुद्यांवर जागरुक करावे असे वाटते ?

४) मासिक पाळी विषयक बर्‍याच युट्यूब मराठी आणि हिंदीत दिसतात त्यातील कोणत्या युट्यूबवरील माहिती शरीर विज्ञानाच्या दृष्टीने योग्य आणि उपयूक्त वाटते कोणत्या युट्यूबवरील माहिती त्रुटीयूक्त वाटते ?

५) क्रिडा, नृत्य , ते लष्करी निमलष्करी दलातील ते श्रमीक स्त्रीया पिएमएस आणि पाळीच्या दिवसातही कार्यरत दिसतात त्यांचे या विशेष दिवसांचे व्यवस्थापन त्या कसे करतात ?

६) चर्चेस योग्य अजून काही प्रश्न असल्यास जोडावेत. अनुषंगिकाव्यतरीक्त चर्चा टाळण्यास आणि चर्चा सहभागासाठी आभार

* युरोमेरीकेतील समस्यांचर्चेबाबत Period Power: A Manifesto for the Menstrual Movement हे Nadya Okamoto यांचे पुस्तक (मी बातमी वाचून चाळले आहे पूर्ण वाचलेले नाही) बर्‍यापैकी प्रकाश टाकत असावे .

*** मिपावर उपलब्ध अनुषंगिक लेख आणि प्रतिसाद***
* रजोनिवृत्ति विषयक डॉ. सुबोध खरे यांचे मिपावरील लेख 'मध्य वयातील वादळ' : ,

प्रतिक्रिया

II श्रीमंत पेशवे II's picture

16 Nov 2018 - 11:53 am | II श्रीमंत पेशवे II

मासिक पाळी - मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात.

इतकेच आम्हाला साधारण ७ वी - ८ वी मध्ये आल्यावर कळले. त्याचा काय त्रास होतो , ति सहज येते कि .....दर वेळेला जखम होते,( कारण रक्त जखम न होता कसं येईल ) तेव्हा कसं वाटत असेल , मुलींचा घोळका सारखा सारखा स्वच्छता गृहा कडे का जातो , इतक्या वेळा का जातात ... त्यांना बाई का ओरडत नाहीत .....या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवणे खूप अवघड होते ....काहीतरी गहन विषय आहे असे वाटायचे ..... बहिणीला किंवा ओळखीच्या मुलीला विचारायला गेलो तर ....गप्प बस तुला काय करायचे ? आणि अजून काहीतरी सांगून त्या दिशाभूल करत असत.

पण खरच आपण किती सहजतेने त्या वयातून मोठे होतो .......जेव्हा कळते तेव्हा त्या गोष्टीचे कुतुहूल / काळजी / व्यवस्था / आजार / सुविधा / असले कोणतेच विचार मनात येत नाहीत.

माहितगार नि एका जबरदस्त विषयाला हात घातला आहे ....खर तर काहीजणांनी हा काय तितका फारसा चर्चेचा विषय नाही , ते नैसर्गिक आहे म्हणून दुर्लक्ष केले आहे किंवा करतील .
पण जेव्हा आता मी चाळीशी ला आल्यावर समाजाकडे आणि चालू असलेल्या परंपरे कडे एका विशिष्ठ दृष्टिकोनातून पहिले तर गाभ्या मध्ये विचारलेला प्रत्येक पश्न हा किती महत्वाचा आहे हे कळते.
नुकताच होऊन गेलेला पद्मन ( pad man ) सिनेमा ने ह्या विषयावर चांगलाच प्रकाशझोत टाकला आहे. पण तरीही हा विषय पूर्ण तळागाळा पर्यंत पोचलेला नाही.

मिपा वर याबद्दल स्पष्ट , सजग आणि वैज्ञानिक आधारावर लिखाण होईल ...आणि ते वाचायला हि आवडेल

कुमार१'s picture

16 Nov 2018 - 12:19 pm | कुमार१

साधारणतः मुलींच्या शाळेत या विषयाची व्यवस्थित माहिती व्याख्यान वा चित्रफिती च्या माध्यमातून दिली जाते.

मुलींच्या या विशेष बाबीची माहिती मुलांनाही त्या वयात समजावून दिली पाहिजे.

ही लैंगिक शिक्षणातील प्राथमिक पायरी आहे.

रोमन रेन्स's picture

16 Nov 2018 - 4:08 pm | रोमन रेन्स

मला तर असे वाटते की मासिक पाळीच्या दरम्यान मंदीरात न जावू देणे .हे अजून आपला समाज मागे राहिल्याचे लक्षण आहे .एखादा घाण आजार किंवा शाररीक समस्या असल्यासारखं त्यांच्याशी वर्तव्णूक ठेवणे हे मलातरी योग्य वाटत नाही ... जर मासिक पाळी चालू असताना मंदीरात प्रवेश ना देणे हे कोणत्या ग्रंथात असेल तर संदर्भ द्यावा .आणि जर असेल तर जुलाब झालेल्या माणसांना कसा काय प्रवेश देतात .?

सुबोध खरे's picture

16 Nov 2018 - 7:20 pm | सुबोध खरे

मुळात मंदिरात जाणे हा भागच "श्रद्धेचा" आहे. त्यात "जबरदस्ती" नसावी.

श्रद्धा हि शास्त्रीय चिकित्सेवर ठरवता येत नाही.

लोकांना एक पेग "बियरचा" घेऊन हलके वाटायला लागते. (एवढे अलकोहोल कफ सिरप मध्ये पण असते)
किंवा कोणाला स्वामींचा अंगारा लावल्यावर "लगेच" ताप उतरतो
किंवा कार्तवीर्य अर्जुनाचा मंत्र म्हटल्याने हरवलेली गोष्ट सापडते

अशा अनेक श्रद्धा आहेत.

बहुसंख्य स्त्रिया श्रद्धेमुळे पाळी चालू असताना मंदिरात प्रवेश करणार नाहीत.

पण एखाद्या स्त्रीला मासिक पाळीच्या वेळेस मंदिरात जावेसे वाटत असले तर तिला जाऊ द्यावे.मासिक पाळी हा निसर्ग धर्म आहे.शुचिर्भूत होऊन स्वच्छ स्नान करून गेल्यास अमंगळ असे काही नाही.

रात्रीची दारू उतरलेली नाही,सकाळी स्नान केलेले नाही, मंदिराच्या बाहेर सिगारेट विझवून आत जाणारया हलकट नरपुंगवांपेक्षा अशा श्रद्धा असलेल्या स्वच्छ स्त्रीला मंदिरात प्रवेश देण्यात काही गैर नाही.

शबरीमला मंदिरात केवळ ज्या स्त्रियांना खरंच प्रवेश करायची इच्छा आहे त्यांना व्यवस्थित पणे पूजेसाठी तेथे "प्रचलीत असलेली वेशभूषा" करून प्रवेश द्यावा.

"केवळ लोकांच्या पारंपरिक श्रद्धेवर आघात करण्याच्या मनोवृत्तीने आलेल्या पुरोगामी किंवा स्त्रीमुक्तीवादी हलकट लोकांना", "ज्यांना याचे राजकारण करायचे आहे" किंवा "ज्यांना सवंग प्रसिद्धी पाहिजे" अशाना अजिबात प्रवेश देऊ नये.

माहितगार's picture

17 Nov 2018 - 2:28 pm | माहितगार

...पण एखाद्या स्त्रीला मासिक पाळीच्या वेळेस मंदिरात जावेसे वाटत असले तर तिला जाऊ द्यावे.मासिक पाळी हा निसर्ग धर्म आहे.शुचिर्भूत होऊन स्वच्छ स्नान करून गेल्यास अमंगळ असे काही नाही. .... श्रद्धा असलेल्या स्वच्छ स्त्रीला मंदिरात प्रवेश देण्यात काही गैर नाही.

प्रागतिक भूमिकेचे स्वागत आहे.

...बहुसंख्य स्त्रिया श्रद्धेमुळे पाळी चालू असताना मंदिरात प्रवेश करणार नाहीत...

शंभर वर्षांपुर्वी 'बहुसंख्य भारतीय ग्रहणकाळात अनेक गोष्टी टाळतील ' असे वाक्य ही राहीले असू शकते पण ग्रहण नेमके कसे होते हे लोकांना समजत गेले आणि ग्रहणाच्या प्रभावाच्या मर्यादाही. (या दृष्टीने सुविहीत शास्तिय माहिती पोहोचवली जाण्याची जरुरी असू शकते का ? हे आपणास पटत असल्यास या धागा लेखातील शास्त्रीय माहिती प्रश्नांच्या अनुषंगाने आपण अधिक मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा करतो)

शंभर वर्षांपुर्वी पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात दर्शन मिळावे म्हणून विधवा स्त्रीया झगडत होत्या, विधवा स्त्री ने दर्शन घेतले तर मेलेल्या नवर्‍यांना स्वर्गात पोहोचण्यासाठी वैतरणी नदी ओलांडता येत नाही असे सांगितले जात होते.

आता पाळीच्या 'त्या शांततामय धर्मातील एक पवित्र ग्रंथीय ऋचा काय सांगते तर प्रेषिताला नर्कात ९० टक्के स्त्रीयाच दिसल्या का तर त्या पाळीच्या चार दिवसांमध्ये एकमेव परमेश्वर स्त्रीयांच्या प्रार्थना स्विकारत नसावा . आणि आपल्याकडे पाळीची सुरवात कशी झाली तर इंद्राकडून ब्रह्म हत्या झाली असताना स्त्रीयांनी इंद्राला आसरा देण्याच्या बदल्यात स्त्रीयांना लाभलेला शाप. त्या शिवाय जेवण करत असलेल्या ब्राह्मणाला पाळी चालू असलेल्या स्त्रीने नुसते पाहीले तरी नवर्‍या सहीत वेगळ्या प्राणी योनीत जन्मण्याची शक्यता.( गेल्या वर्षा भरातला एक युट्यूब ऑनलाईन उपलब्ध असावा. ) श्रद्धांचे असे आधार असावेत हे आपल्याला आजच्या विज्ञान युगात खरेच पटू शकते का ?

तरी श्रद्धा हरकत नाही पण मिपावरच एका अल्पबचत गट कार्य करणार्‍या लेखिकेचा लेख आहे की गावातल्या मंदिरात सभा घेण्यास बोलावले गेले पण त्यातून पाळी आलेल्या आणि विधवाधी स्त्रीया वगळल्या जाणार हे ओघाने आलेच तर दुसर्‍या गावात मोरीचे सांडपाणी परसबागेत वापरण्यास विरोध होता का तर माहवारीच्या काळातील पाण्यातून उगवलेल्या भाज्या खाऊन पुरुष षंढ होतील असे त्या स्त्रीयांना वाटत होते . तर सुशिक्षीत स्त्रीया पाळी ची तारीख बदलून यावी म्हणून गोळ्या / औषधे मोठ्या प्रमाणात मागतात या बद्दल एका स्त्री डॉक्टरचा लेखही ऑनलाईन गेल्या वर्षाभरातला उपलब्ध आहे. असो.

माहितगार's picture

17 Jan 2019 - 7:37 pm | माहितगार

खिलजींनी अजून एक धागा काढला आहे पण तिकडे या धाग्यावरील सर्व प्रश्न उपलब्ध नाहीत म्हणून हा धागा पुन्हा एकदा वर काढून पहातो. पाहुया कुणी धाग्यातील प्रश्नांना उत्तरे देतेय का ते.

बाप्पू's picture

19 Jan 2019 - 12:06 am | बाप्पू

३) मासिक पाळी आणि पि एम एस बाबत पुरुषांना जागरुक करण्याची गरज आहे का ? पुरुषांना कोणत्या वयात आणि कोणत्या मुद्यांवर जागरुक करावे असे वाटते ?

हो. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये या विषयाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.

आता 21 व्यं शतकाचाच विचार केला तर महाराष्ट्र सह दक्षिण भारत हा 80% chya वर साक्षर आहे .
मुलानं बरोबर मुलींना सुधा महाराष्ट्र सह दक्षिण भारतात त्यांचे सर्व हक्क देण्यासाठी विरोध कोणाचाच नाही आणि तर दिले गेले आहेत .
जे शाळेत जावून शिकलेत त्यांना मासिक पाळी म्हणजे काय ह्याची सविस्तर माहिती आहे .पण बहुतांश पोस्ट करते जे मासिक पाळी ची माहिती आशि देत आहे की जणू कोंताता तरी नवीन शोध आहे नी हिंदू समाज विचार अडाणी त्याला मासिक पाळी म्हणजे काय हे माहीतच नाही आसा स्वतःच स्वतःला समजावत जोरकस पने आपली मते mandat आहेत .
मासिक पाळी कधी येते हे लग्ना नंतर ती स्वतः स्त्री आणि तिचा नवरा ह्याच दोघांना माहीत आस्ते .आणि लग्ना अगोदर आई ल .
मग मला हा प्रश्न पडतो मंदिरात मासिक पाळी दरम्यान प्रवेश देत नाहीत .आस खूप लोकांचं मत आहे त्यांनी मला सांगाव महाराष्ट्र सह दक्षिण भारतात कोणत्या मंदिरात स्त्रियांची मासिक पाळी चेक करायची यंत्रणा आहे आणि ती यंत्रणा कशी काम करते .
आणि आस checking jar hot नसेल तर मासिक पाळीत मंदिरात जायचं नाही हा निर्णय त्या स्त्री च स्वतःचा असतो .त्यासाठी प्रतिबंध मंदिर करत नाही

माहितगार's picture

21 Jan 2019 - 4:19 pm | माहितगार

….मासिक पाळीत मंदिरात जायचं नाही हा निर्णय त्या स्त्री च स्वतःचा असतो ….; ....फक्त रिती रिवाज आहे म्हणून ज्यांना पटत त्यांनी ते पाळल तर बाकी लोकांना आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही .
आणि ह्या मध्ये स्त्रियां वर कोणताच शारीरिक ,मानसिक अत्याचार पण होत नाही मग विरोध का ? …( हे आपले वाक्य आपल्या दुसर्‍या धाग्यावरील प्रतिसादातून )

याचे उत्तर वरील धागा लेख आणि डॉ. सुबोध खरे यांना दिलेल्या उत्तरात येऊन गेले आहे, तरी पण नजरेतून सुटले असल्यास अंधश्रद्धा टाळली जाण्याचे महत्व आपल्यासाठी पुन्हा एकदा कॉपी पेस्टवतो.

शंभर वर्षांपुर्वी 'बहुसंख्य भारतीय ग्रहणकाळात अनेक गोष्टी टाळतील ' असे वाक्य ही राहीले असू शकते पण ग्रहण नेमके कसे होते हे लोकांना समजत गेले आणि ग्रहणाच्या प्रभावाच्या मर्यादाही. (या दृष्टीने सुविहीत शास्तिय माहिती पोहोचवली जाण्याची जरुरी असू शकते का ? हे आपणास पटत असल्यास या धागा लेखातील शास्त्रीय माहिती प्रश्नांच्या अनुषंगाने आपण अधिक मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा करतो)
शंभर वर्षांपुर्वी पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात दर्शन मिळावे म्हणून विधवा स्त्रीया झगडत होत्या, विधवा स्त्री ने दर्शन घेतले तर मेलेल्या नवर्‍यांना स्वर्गात पोहोचण्यासाठी वैतरणी नदी ओलांडता येत नाही असे सांगितले जात होते.
आता पाळीच्या 'त्या शांततामय धर्मातील एक पवित्र ग्रंथीय ऋचा काय सांगते तर प्रेषिताला नर्कात ९० टक्के स्त्रीयाच दिसल्या का तर त्या पाळीच्या चार दिवसांमध्ये एकमेव परमेश्वर स्त्रीयांच्या प्रार्थना स्विकारत नसावा . आणि आपल्याकडे पाळीची सुरवात कशी झाली तर इंद्राकडून ब्रह्म हत्या झाली असताना स्त्रीयांनी इंद्राला आसरा देण्याच्या बदल्यात स्त्रीयांना लाभलेला शाप. त्या शिवाय जेवण करत असलेल्या ब्राह्मणाला पाळी चालू असलेल्या स्त्रीने नुसते पाहीले तरी नवर्‍या सहीत वेगळ्या प्राणी योनीत जन्मण्याची शक्यता.( गेल्या वर्षा भरातला एक युट्यूब ऑनलाईन उपलब्ध असावा. ) श्रद्धांचे असे आधार असावेत हे आपल्याला आजच्या विज्ञान युगात खरेच पटू शकते का ?
तरी श्रद्धा हरकत नाही पण मिपावरच एका अल्पबचत गट कार्य करणार्‍या लेखिकेचा लेख आहे की गावातल्या मंदिरात सभा घेण्यास बोलावले गेले पण त्यातून पाळी आलेल्या आणि विधवाधी स्त्रीया वगळल्या जाणार हे ओघाने आलेच तर दुसर्‍या गावात मोरीचे सांडपाणी परसबागेत वापरण्यास विरोध होता का तर माहवारीच्या काळातील पाण्यातून उगवलेल्या भाज्या खाऊन पुरुष षंढ होतील असे त्या स्त्रीयांना वाटत होते . तर सुशिक्षीत स्त्रीया पाळी ची तारीख बदलून यावी म्हणून गोळ्या / औषधे मोठ्या प्रमाणात मागतात या बद्दल एका स्त्री डॉक्टरचा लेखही ऑनलाईन गेल्या वर्षाभरातला उपलब्ध आहे.

ऑलींपिक रेकॉर्ड ब्रेकींग विजेत्या स्त्रीयांच्या मासिक चक्राचा अभ्यास केला गेला असता मासिक चक्राच्या सर्व कालावधींमध्ये विजेत्या स्त्रीयांनी नवे रेकॉर्ड स्थापित केलेले दिसून आले, अनेक महिला क्रिडापटूंची शारीरीक क्षमता असंख्य पुरुषांपेक्षा चांगली असते असे असूनही स्त्रीयांना सरसकट मानसिक आणि शारीरीक दृष्ट्या कमजोर असल्याचा भ्रम स्त्रीया आणि पुरुषात पसरवला जातो तो प्रश्नांकीत होणे महत्वाचे असावे आणि अशा काळात स्त्री मुक्तपणे व्यवहार करु लागल्यास अंधश्रद्धा मागे पडण्यात साहाय्य होते.

….जे शाळेत जावून शिकलेत त्यांना मासिक पाळी म्हणजे काय ह्याची सविस्तर माहिती आहे .पण बहुतांश पोस्ट करते जे मासिक पाळी ची माहिती आशि देत आहे की जणू कोंताता तरी नवीन शोध आहे नी हिंदू समाज विचार अडाणी त्याला मासिक पाळी म्हणजे काय हे माहीतच नाही आसा स्वतःच स्वतःला समजावत जोरकस पने आपली मते mandat आहेत …..

विज्ञान माहित आहे तर अंधश्रद्धांचा आधार घेतल्याची उदाहरणे अद्यापी का दिसतात ?

…. काही मंदिरात पुरुषांना सुधा बंदी असते त्या वरून कोणत्याच पुरुषात अन्याय होतोय ही भावना नसते ….

आपले विधान सर्वांचे प्रतिनिधीत्व कसे काय करू शकते ? ज्याला अन्याय म्हणजे कळते ती व्यक्ती अन्याय्य प्रथांचा विरोधच करेल मग एखादी प्रथा पुरुषांवर अन्याय करणारी असली तरीही. 'पुरुष आहेस, रडावयास काय झाले ?' हे वाक्य ऐकलेल्या आणि ऐकवणार्‍यांना या वाक्यातील पुरुषांना लावलेला वेगळा न्याय जाणवत नाही पण न्याय आणि अन्याय यातील फरक कळतो ते अन्यायाचा विरोध करतील. जगातील काही समुदायात नवजात पुरुष अभ्रकांचा सुंन्ता केला जातो, शरीराचा नाजूक अवयव न कळत्या वयात कापला जातो, या विषयाची चर्चा कमी केली जाते म्हणजे त्या केसेस मध्ये पुरुषांवर अन्याय होत नाही असे नसावे

आणखी महत्वाची गोष्ट एका चुकीने दुसर्‍या चुकीचे , एका अन्यायाने दुसर्‍या अन्यायाचे समर्थन होत नसावे.

उपरोक्त उत्तर देताना आपल्या दुसर्‍या धाग्यावरील प्रतिसासादाचाही समावेश केला आहे

विशुमित's picture

21 Jan 2019 - 5:27 pm | विशुमित

छान प्रतिसाद.
===

विज्ञान माहित आहे तर अंधश्रद्धांचा आधार घेतल्याची उदाहरणे अद्यापी का दिसता त ?
खर तर हा प्रश्न मला सुधा पडतो .कारण ग्रहणा पासून मासिक पाळी पर्यंत (सध्या ही दोनच उदाहरण घेवू या ) सर्व गोष्टींची शास्त्रीय कारण बहुतांश लोकांना माहीत आसतात .
काही सखोल अभ्यास केलेल्या व्यक्ती सुधा आसतात .
मंदिराचा मुद्दा थोडा बाजूला ठेवूया तो सामाजिक प्रश्न आहे पण आपल्या व्यायकतिक जीवनात सत्यनारायणाच्या पूजेला स्वः घरातील स्त्री ल मासिक पाळी असेल तर ती स्वतः तरी पूजेला बसण्यास तयार होईल का तर ह्या प्रश्नाचं उत्तर नाहीच आस येईल .
मग स्त्री स्वतःवरच अन्याय का करून घेत आसावी कारण ह्या प्रश्नात समाज कुठेच नसतो .त्याला कारण वर्षणवर्ष आपल्या वर झालेले संस्कार हे तर कारण आहेच पण हयात पीडित कोणीच नसतं .मग पाळल तर चांगलंच आस मत उलट नाही पाळल तर कोप होईल ही भीती .
त्याच अनुषंगाने आपण सती chya प्रधेचा विचार केला तर पीडित सरळ सरळ सांगता येवू शकते आणि सती जाणाऱ्या स्त्री ला आपण पीडित आहोत ह्याची तीव्र जाणीव आस्ते .त्या मुळे ती प्रथा थोड्याशा प्रयत्नांना पूर्ण नष्ट झाली ना .
आता aikdam साधं उदाहरण स्त्री आणि पुरुष ह्याच मिळणं हे नैसर्गिक च आहे मग लग्न झालेल्या स्त्री नी परपुरूषा शी संबंध ठेवले तर ते पाप आहे हे १०० percent शास्त्रीय कारण माहित आसून सुधा आपण पाप च मानतो ना

माहितगार's picture

21 Jan 2019 - 9:53 pm | माहितगार

ग्रहणाची वेळ म्हणून एकवेळ उपवास केला किंवा पाळी काळात एखादी पूजा टाळली , प्रथम दर्शनी फारसे बिघडताना दिसत नाही, ग्रहणामुळे एखादे काम लांबणीवर टाकणे, समजा उद्या पंतप्रधानांचा ग्रहण श्रद्धेवर विश्वास असेल आणि पाकीस्तानी विमानांनी आक्रमण केले तरी ग्रहण आहे थांबा त्यांच्या विमानांना थोपवू नका म्हटले तर चालेल का ? एखादी पूजा टाळल्याने फरक पडत नाही पण इतरांसोबतचा सामाजिक सहभागापासून वंचित रहाणे हि एक समस्या दुसरे आजही शाळेतील गळतीचा फार मोठा मुलींचा टक्का पाळीच्या वेळे पासून सुरू होतो. आपण साक्षरतेचा विषय काढला शाळेत जाणार्‍या मुलींनाही असंख्य सुशिक्षीत आयाही प्रत्यक्षात पाळी येई पर्यंत काहीच पूर्व कल्पना देत नाहीत आणि असंख्य मुलींसाठी अचानक आलेली पाळी चक्क मानसिक धक्का ठरते अशी वर्णने वाचण्यात येतात. असो.

माहितगार's picture

21 Jan 2019 - 8:48 pm | माहितगार

जरासे विषयांतर होते आहे पण आपण विषय काढलाच आहे तर शेवटच्या प्रश्नाचा आधी निकाल लावणे आपला शिरस्ता आहे त्यास अनुसरून

...आता aikdam साधं उदाहरण स्त्री आणि पुरुष ह्याच मिळणं हे नैसर्गिक च आहे मग लग्न झालेल्या स्त्री नी परपुरूषा शी संबंध ठेवले तर ते पाप आहे हे १०० percent शास्त्रीय कारण माहित आसून सुधा आपण पाप च मानतो ना...

समाजाचे बरे विचारले समाज कधी सन्यासी पतीचा त्याच्याच पत्नीसोबतच्या रास्त संबंधांना पाप संबोधून जिवंत प्रायश्चित्त घ्यायला सांगतो आणि त्यांच्या मुलांनी चमत्कार करे पर्यंत वाळीत टाकतो, तर दुसरा एक समाज रागाच्या भरात तलाक दिलेल्या स्त्रीने परक्या सोबत शय्यासोबत करुन हलालाची अंधश्रद्धा पार पाडल्या शिवाय घटस्फोटीत पती पत्नीस पुन्हा एकत्र येऊ देत नाही.

नवपरिणित वधूंच्या कौमार्य चाचण्यांचे जाहीर पंचनामे सध्याच्याच महाराष्ट्रातील काही जात पंचायती घडवताना दिसतात.

श्रद्धेवरची मुक्त ज्ञान आणि विवेकाची बेडी ढिली झाली की श्रद्धेची पावले डगमगण्याची शक्यता वाढत असावी, इथे अध्यात्मिक ज्ञान म्हणजे ज्ञान आणि समाज मान्यता म्हणजेच विवेक या मर्यादीत व्याख्या अभिप्रेत नाहीत, ज्ञान आणि विवेक यांचा परीघ अध्यात्म आणि समाज मान्यतेची बंधने ओलांडूनही जात असतो. कॉमन सेन्स हा कॉमन असतोच असे नाही हेही वाक्य बर्‍याचदा ऐकण्यात असते.

केवळ विवक्षीत समाज विवक्षीत काळी काय मानत असे अथवा मानतो त्यावरून त्या गोष्टीची योग्या योग्यता वस्तुतः ठरत नसावी, त्यावरून योग्या योग्यता ठरवणे हा तर्कशास्त्रात Argumentum ad populum नावाची तार्कीक उणीव (तर्कदोष) समजली जाते.

पाप पुण्याच्या ठोस व्याख्या असताना दिसत नाहीत (पुस्तक-रुढी प्रामाण्यवादींचे अशा व्याख्यांना ठोस समजण्याचे प्रयास तात्कालीक असतात), तीस वर्षापुर्वी पर्यंत पिण्याच्या पाण्याची खरेदी विक्री भारतीय संस्कृतीत पाप समान मानली जात असे पण त्याच पाण्याची सध्याच्या भारतीय पिढ्या बिनदिक्कत खरेदी विक्री करताना दिसतात. गुलामांच्या खरेदी विक्रीस कोणताही धर्म पाप मानत नव्हता, नवीन काळातील मानवता त्यास अयोग्य मानते.

परस्परात अनुमती असलेले शरीर संबंध आपण अथवा विविक्षीत कालीन विविक्षीत समाज अग्राह्य मानतो अथवा मानत नाही या वरून अशा संबंधांची योग्या योग्यता ठरू शकत नाही. अनेक पिढ्यात परस्पर कुटूंबात विवाह संबंध न झालेल्या सगोत्रीय जोडप्याचे विवाह केवळ विवक्षीत समाजाने पाप मानले म्हणून शास्त्रीय दृष्ट्या अपात्र ठरत नाहीत आणि मामेबहीण - आत्येभाऊ विवाह आपला समाज पाप समजत नसला तरीही शास्त्रीय दृष्ट्या जोखीमीचे म्हणून अयोग्य असू शकतात.

जळमटे बाजूला सारली की बहुतांश धर्मीय तथाकथीत ग्रंथात कुमारी माता आणि त्यांची मुले केवळ स्विकारलीच नाही तर त्यांना प्रसंगी ऋषी प्रेषित पदे तर त्यांच्या माताही समाज मान्यता मिळवून गेलेल्या दिसतात, अर्थात दुर्दैवाने असे सकारात्मक नशिब कमी जणांच्या वाट्यास आले असावे हेही खरे.

तुमच्याच एका प्रतिसादातून प्रार्थनास्थळातून स्त्रीची पाळीची परिक्षा घेणारी यंत्रे बसवली जात नाहीत असा उल्लेख आहे , स्त्री - पुरुष विवाहेतर संबंध ठेवले नव्हतेच याची तरी प्रार्थनास्थळात यंत्रे कुठे असतात ? तुमच्या पाप-पुण्याच्या व्याख्येत शेवटी महत्वाचे काय आहे?, योनीच्या आतला पडदा अक्षत असणे ? जो संबंधानंतरही अक्षत असू शकतो आणि संबंधांशिवायही क्षत होऊ शकतो किंवा शुचिता ? कि शरीराची शुचिता अबाध्य असूनही मनाच्या शुचितेची ग्वाही देता येत नाही , आणि जिथे मनाची शुचिता अबाध्य असूनही कुणाच्या तरी जबरदस्तीने तथाकथित शरीरशुचिता भंग पावलेली असू शकते ! आपल्या आणि आपल्या समाजाच्या तथाकथित पापपुण्याच्या व्याख्या नेमक्या आहेत तरी काय ?
वयस्क कुमारीका, घटस्फोटीता, विधवा काय मनुष्य प्राणी नसतात ? अपत्य आणि वृद्ध संगोपन , पती पत्नीचा एकमेका आधार, कौटूंबिक चमूच्या स्वरुपात आर्थिक जबाबदार्‍यांचे संवहन या गोष्टी महत्वाच्या असतात नाही असे नाही पण या जबाबदार्‍यांचा आणि शरीर शुचितेचा संबंध असण्याचे काही प्रयोजन शिल्लक उरते की मानवी मनांच्या असुरक्षीततेच्या सांभाळाची किंमत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बळी देऊन मोजावी लागते आहे हा विचार करण्या जोगा प्रश्न असावा किंवा कसे.

* स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षिततेचा सांभाळ या चर्चेत सहभागी होण्याचे आवाह्न आहे .

* जिथ पर्यंत सद्य समाज व्यवस्थेची विचारधारणा आहे, लग्न झालेल्या पुरुषाने नी परस्त्रीशी संबंधही अयोग्य समजले जातात, वस्तुतः वाक्य विवाहबाह्य संबंध अयोग्य समजले जातात असे हवे असावे.

माहितगार's picture

21 Jan 2019 - 9:36 pm | माहितगार

Argumentum ad populum चा दुवा देण्याचा राहीला. लॉजीकल फॉलसींवर युट्यूब सुद्धा आहेत, त्यातील एक खाली माहितीस्तव