चकली

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

चकली

दिवाळीच्या फराळात चकली ही अगदी हवीच हवी. पण हवी तेव्हा चकलीची भाजणी उपलब्ध न होणार्‍या ठिकाणी राहिल्यावर कुठली चकली नि काय..
एकदा असाच चकलीचा खमंग विषय चालला असता माझ्या भावजयीने तिच्या आईच्या - डॉ. दीपा कोल्हटकरांच्या ह्या रेसिपीने केलेल्या चकल्या खाल्ल्यावर भाजणीचा हा प्रश्न सुटला.

तर ह्या बिनभाजणीच्या चकल्यांसाठीचे साहित्य -
१ वाटी तेल, १ वाटी मैदा, १ वाटी बेसन किवा फुटाण्याचे डा़ळे, ४ वाट्या तांदळाचे पीठ.
ओवा, मीठ, तिखट, तीळ - चवीनुसार

कृती -
बेसन/फुटाण्याचे डाळे भाजून घ्या.
बेसन, मैदा, तांदळाचे पीठ, ओवा, मीठ, तिखट , तीळ हे सर्व एकत्र मिक्स करून घ्या.
तेल गरम करा. हे गरम तेल वरील मिश्रणात घाला व कालवून ठेवा. साधारण तासभर झाकून ठेवा.
तासाभराने ते परत एकदा चांगले कालवा.
एका सोर्‍यापुरतेच पीठ भिजवा व चकल्या पाडा व तळा
पुढच्या घाण्यासाठी प्रत्येक वेळी तेवढेच पीठ भिजवून चकल्या पाडा.

.

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Nov 2018 - 12:36 pm | मुक्त विहारि

बायकोला वाचायला देतो...

टर्मीनेटर's picture

6 Nov 2018 - 12:41 pm | टर्मीनेटर

+१

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 9:38 pm | तुषार काळभोर

+२

मित्रहो's picture

8 Nov 2018 - 6:43 pm | मित्रहो

बायकोला वाचायला दिले... आता अशी पण चकली हवी ज्यात पिळण्याचा त्रास नाही.

मीअपर्णा's picture

6 Nov 2018 - 9:37 pm | मीअपर्णा

चकली माझा विक पाॅइंट. या चकलीत १ वाटी तेल पाहून करेन का माहित नाही पण मस्त रेसिपी. यम्म :)

यशोधरा's picture

7 Nov 2018 - 8:55 am | यशोधरा

अटक मटक, चकली चटक!
मस्त गं स्वातीताई!

नूतन सावंत's picture

7 Nov 2018 - 4:19 pm | नूतन सावंत

मस्त बिनभाजणीची चकली.

आवडाबाई's picture

8 Nov 2018 - 8:31 pm | आवडाबाई

ह्या चकल्या फक्त खाल्ल्या की करुन देखिल पाहिल्या? खमंग होतात का ?

बाय द वे, फराळाचा व्यवसाय अगदी घराघरातून चालतो. ते लोक चकली खुशखुशीत पण फार तुटणार नाही, रंग सोनेरी, अशी अगदी हुकमी छान चकली कशी करतात? असा अगदी नो-फेल फॉर्म्युला असतो का ? चकली मधले असंख्य वेरिएबल्स कसे मॅनेज करतात?

स्वातीताई, मी उद्या तुझ्या ह्या पद्धतीने चकली करणारे. तुला सांगीन कशा झाल्या.

सौन्दर्य's picture

23 Nov 2018 - 6:49 am | सौन्दर्य

आम्हाला पण थोड्या पाठवा, म्हणजे आम्हीपण स्वातीताईना त्या कश्या झाल्या त्या सांगू.
(हलकेच घ्या)

- चकलीचा भोक्ता.

लौंगी मिरची's picture

10 Nov 2018 - 6:55 pm | लौंगी मिरची

करुन बघते :)

जुइ's picture

10 Nov 2018 - 10:58 pm | जुइ

इथेही भाजणी मिळत नाही त्यामुळे या प्रकारच्या चकल्या नक्की करून बघणार आहे. माझ्या आईनेही मैदाच्या चकल्या पूर्वी केल्याच्या आठवत आहे.

पद्मावति's picture

11 Nov 2018 - 10:23 pm | पद्मावति

मस्तं चटकदार रेसेपी.

सविता००१'s picture

12 Nov 2018 - 8:24 pm | सविता००१

मस्त ग स्वातीताई, करून पहाते

मदनबाण's picture

25 Nov 2018 - 1:18 pm | मदनबाण

वा...
मला चकली पेक्षा कडबोळी जास्त आवडतात. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aastha Gill - Buzz feat Badshah | Priyank Sharma | Official Music Video