Skip to main content

चकली

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
चकली
दिवाळीच्या फराळात चकली ही अगदी हवीच हवी. पण हवी तेव्हा चकलीची भाजणी उपलब्ध न होणार्‍या ठिकाणी राहिल्यावर कुठली चकली नि काय.. एकदा असाच चकलीचा खमंग विषय चालला असता माझ्या भावजयीने तिच्या आईच्या - डॉ. दीपा कोल्हटकरांच्या ह्या रेसिपीने केलेल्या चकल्या खाल्ल्यावर भाजणीचा हा प्रश्न सुटला. तर ह्या बिनभाजणीच्या चकल्यांसाठीचे साहित्य - १ वाटी तेल, १ वाटी मैदा, १ वाटी बेसन किवा फुटाण्याचे डा़ळे, ४ वाट्या तांदळाचे पीठ. ओवा, मीठ, तिखट, तीळ - चवीनुसार कृती - बेसन/फुटाण्याचे डाळे भाजून घ्या. बेसन, मैदा, तांदळाचे पीठ, ओवा, मीठ, तिखट , तीळ हे सर्व एकत्र मिक्स करून घ्या. तेल गरम करा. हे गरम तेल वरील मिश्रणात घाला व कालवून ठेवा. साधारण तासभर झाकून ठेवा. तासाभराने ते परत एकदा चांगले कालवा. एका सोर्‍यापुरतेच पीठ भिजवा व चकल्या पाडा व तळा पुढच्या घाण्यासाठी प्रत्येक वेळी तेवढेच पीठ भिजवून चकल्या पाडा. .
दिवाळी अंक वर्ष

वाचने 20303
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

बायकोला वाचायला देतो...

In reply to by टर्मीनेटर

+२

In reply to by मुक्त विहारि

बायकोला वाचायला दिले... आता अशी पण चकली हवी ज्यात पिळण्याचा त्रास नाही.

चकली माझा विक पाॅइंट. या चकलीत १ वाटी तेल पाहून करेन का माहित नाही पण मस्त रेसिपी. यम्म :)

ह्या चकल्या फक्त खाल्ल्या की करुन देखिल पाहिल्या? खमंग होतात का ? बाय द वे, फराळाचा व्यवसाय अगदी घराघरातून चालतो. ते लोक चकली खुशखुशीत पण फार तुटणार नाही, रंग सोनेरी, अशी अगदी हुकमी छान चकली कशी करतात? असा अगदी नो-फेल फॉर्म्युला असतो का ? चकली मधले असंख्य वेरिएबल्स कसे मॅनेज करतात?

In reply to by यशोधरा

आम्हाला पण थोड्या पाठवा, म्हणजे आम्हीपण स्वातीताईना त्या कश्या झाल्या त्या सांगू. (हलकेच घ्या) - चकलीचा भोक्ता.

इथेही भाजणी मिळत नाही त्यामुळे या प्रकारच्या चकल्या नक्की करून बघणार आहे. माझ्या आईनेही मैदाच्या चकल्या पूर्वी केल्याच्या आठवत आहे.

मस्त ग स्वातीताई, करून पहाते