भारताबाहेरील पदव्युत्तर शिक्षण : अमेरिका / जर्मनी

विटेकर's picture
विटेकर in काथ्याकूट
24 Sep 2018 - 3:43 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी ,

चिरंजीवांचे बी ई मेक्यानिकल चे हे शेवटचे वर्ष !

कुणीतरी म्हंट्ल्य ..... टू बी(ई) ऑर नोट टू बी(ई) इज नॉट अ क्वेश्चन बट व्हाट इज आफ्तर बीई इज द क्वेश्चन !

आता त्याने पुढे काय करावे हा प्रश्न सगळ्या घरादाराला आहे ! ( त्याला तो तितकासा नाही हा माझा एक आडिशनल छळ आहे !)
तो बापाइतकाच हुषार असल्याने क्याम्पस मध्ये काही होइल्से वाटत नाही तेव्हा पुढे काहीतरी शिकणेआले. त्यातील अमेरिकेत जाऊन एम एस करणे राजमार्ग!
मध्यमवर्गी सरळमार्गी बापाप्रमाणे त्याचा शिक्षणाला उपेगी पडेल म्हणून मी एक फ्लाट घेऊन बसलो आहे त्याची किमत आता इतकी घसर्ली आहे की त्या पैश्यात फक्त विमानाचे तिकिट येईल ! त्यामुळे त्याने जाऊ नये असे वाटत होते तेव्हड्यात ह्ल्ली वाट्टेल तेवढी कर्जे मिळतात असे विटूकाकूचे एक लांबची बहीण म्हणाली , विटूकाकूच्या आशा आता पल्लवीत झाल्यात पुन्हा !

पण हल्ली ट्रम्प असल्याने तिकडे आता जाऊ नये असाही एक मतप्रवाह आहे. त्यामुळे जर्मनीची एक टूम निघाली आहे. हापिसातले म्हणतात आता अमेरिकेला नको .. जर्मनीला पाठव .. तिकडे शिक्श्ण फुकट असते म्हणे ! .....( म्हणजे नादारी की काय ? पण ती सरसकट असते का ... साडे तीन टक्केवाले वगळून ? )

तर इथे खूप जाणकार मंड्ळी आहेत , त्यांना विचारावे म्ह्णून धागा काढला आहे !

१. एम एस करावे का ?
२. अमेरिकेत / जर्मनीत की अन्यत्र ?
३. की सरळ भारतातच एम बी ए करावे ?
४. १-२ वर्षाचा मिळेल तो अनुभव घेऊन मग एम एस अथवा एम बी ए चा विचार करावा ?
५. सध्या काहीच करु नये ... जे जे होईल ते पहावे ? मग त्याचे त्यालाच कळेल ?

असा सगळा मत मतांचा गल्बला आहे ... !

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

25 Sep 2018 - 12:22 am | चित्रगुप्त

माझ्या माहितीप्रमाणे परदेशात शिक्षण घ्यायला गेल्यास पुढेही तिकडेच राहून नोकरी करणे एकप्रकारे आवश्यक ठरते, कारण शिक्षणासाठी काढलेले कर्ज तिकडे नोकरी करूनच लवकर फेडता येते. दुसरे म्हणजे इंजिनियरिंग कॉलेजातल्या माझ्या प्रोफेसर मित्राच्या मते तिकडल्या डिग्रीला भारतात नोकरीच्या दृष्टीने काही विशेष महत्व मिळत नाही (हा माझा बालमित्र असून त्याचा प्रत्यक्ष सल्ला घेण्यासाठी मला व्यनि करावा)
आता-आतापर्यंत अमेरिकेत शिक्षण घेऊन तिकडे नोकरी मिळवणे फारसे अवघड नव्हते, परंतु आता ट्रंपतात्यांमुळे तसे करणे जरा धोक्याचे आहे, कारण नोकरीसाठी आवश्यक H-1B व्हिसावर जास्त निर्बंध येत आहेत. नोकरी मिळाली तरी बरेचदा नाईलाजाने तीच नोकरी पकडून रहावे लागते. ग्रीन कार्ड मिळायला आता पंधराहून जास्त वर्षे लागतात, तोवर डोक्यावर टांगती तलवार रहाते. थोडा आणखी पुढलाही विचार करता मुलाचे लग्न झाल्यावर त्याच्या बायकोला सुद्धा अमेरिकेत नोकरी मिळणे कठीण जाऊ शकते. अश्या बर्‍याच मुली आहेत ज्या भारतात चांगले शिक्षण घेऊन, चांगली नोकरी करत असून आता अमेरिकेत गेल्यावर नोकरी मिळू/करू शकत नसल्याने निराश आहेत. माझ्या नात्यातील एकजण सध्या अमेरिकेत एमएस करत आहे, तो सुद्धा चांगला सल्ला देऊ शकेल (त्याची बायको भारतात नोकरी करत आहे, परंतु नवीन नियमांप्रमाणे स्पाऊस व्हिसावर तिकडे गेल्यावर तिला नोकरी करता येणार नाही, त्यामुळे तोही आमच्या सल्ल्यानुसार कॅनडात स्थलांतरित होण्याच्या विचारात आहे)
... हा सर्व विचार करता अमेरिकेपेक्षा सध्या कॅनडा उत्तम आहे. मात्र व्हँकुअर वगळता संपूर्ण कॅनडात भयंकर थंडी असते. (माझ्या मुलाने फ्रान्समधे एमएस केले, परंतु त्यापूर्वी तीन वर्षे फ्रेंच भाषा शिकला होता. जर्मनीबद्दल नक्की ठाऊक नाही. जर्मनीतले मिपाकर सांगू शकतील, किंवा जालावर वा मॅक्स मुल्लर भवन मधे माहिती मिळू शकेल.
परदेशातील शिक्षणापूर्वी आवश्यक त्या परिक्षा देणे, योग्य संस्था हुडकून तिथे प्रवेश मिळवणे वगैरेत दीड-दोन वर्षे जातात. या काळात भारतातच नोकरी करून अनुभव घेणे, पैसा जमवणे, माहिती काडत रहाणे श्रेयस्कर.

सध्याच्या परिस्थितीत जर्मनी अतिशय चांगला देश आहे. २-३ वर्षे तिथे शिक्षण घ्यावे आणि ट्रम्प च्या नियमांनी अमेरिकेचा बांबू लागला नाही तर अमेरिकेत स्थायिक व्हावे.

सध्या अमेरिकेतील स्थलांतर परिस्थिती वाईट वाटत असली ट्रम्प महाशयः जाताच नवीन सरकारला सगळी कडे रिसेट बटन दाबावे लागेल आणि त्यामुळे भारतीय लोकांना खूप फायदा होईल असे वाटते.

दिगोचि's picture

25 Sep 2018 - 11:55 am | दिगोचि

भारतातील लोक फक्त अमेरिका व जर्मनी एव्हढेच देश पदव्युत्तर शिक्शणासाठी आहेत असे का धरतात. ऑस्त्रेलिया न्युझीलन्ड यादेशान्चा का विचार करत नाहीत. या देशातील शिक्षणदेखील तितकेच उत्तम आहे व येथे शिकून मग जर अमेरिका किम्वा जर्मनीमधे जायचे असेल तर तिकडे नोकरी मिळु शकते. तेम्व्हा असा विचार करा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2018 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

परदेशात शिक्षणासाठी जाणे हा महत्वाचा आणि खार्चिक असलेला निर्णय आहे.

खालील प्रश्नांची "प्रामाणिक" उत्तरे शोधून मग त्यानुसार पूर्ण विचारांती निर्णय घ्यावा :

१) आपल्या पाल्याला आयुष्यात नक्की काय (पक्षी : कोणते करियर) करण्याची इच्छा आहे? यामध्ये, 'एखाद्या आवडीच्या खास विषयात प्राविण्य' ते 'चांगल्या पगाराची नोकरी आणि सुखवस्तू जीवन', इतका मोठा वर्णपट आहे... त्यात पाल्य नक्की कोठे बसत आहे, हे नक्की केले तर नंतर हळहळ करायला लागण्याची शक्यता कमी होते. केवळ, 'इतर कोणी कुठेतरी जाऊन आता आनंदात आहे', यावरून सगळ्यांच्या बाबतीत तसेच होईल असे नाही. पाल्याची 'आवड-निवड-इच्छा' आणि 'गंतव्य देशातील संधी' यांचे गणित जुळणे आवश्यक आहे.

२) प्रत्येक देशातील देशाबाहेरून येणार्‍या लोकांबद्दलची, (अ) सद्याची आणि (आ) पुढच्या ५ त १० वर्षांत अपेक्षित असलेली, परिस्थिती. परदेशात शिकायला जाणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षणानंतर तिथेच स्थायिक होण्याची इच्छा असणारे, बहुसंख्य असतात. तेव्हा हा विचार कळीचा आहे.

या विचारानंतर सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल...

अ) कॅनडात स्थायिक व्हायचे असेल तर कॅनडात (विशेषतः पदव्युत्तर) शिक्षण घेणे जास्त चांगले.

आ) ऑस्ट्रेलिया/न्युझीलंड/सिंगापूर/दक्षिणपूर्व आशिया/इ मध्ये स्थायिक व्हायचे असेल ऑस्ट्रेलियात (विशेषतः पदव्युत्तर) शिक्षण घेणे जास्त चांगले.

इ) युरोपमधल्या एखाद्या देशात स्थायिक व्हायचे असेल त्या देशात (विशेषतः पदव्युत्तर) शिक्षण घेणे जास्त चांगले. जर्मनीमध्ये २०१४ पासून, स्थानिक व परदेशी विद्यार्थ्यांसाठी, सर्व सरकारी विश्वविद्यालयांमधले पदवी व पदव्युत्तर शिक्षण (विशेषतः ट्युशन फीज) मोफत केले गेले आहे. मात्र, काही प्रशासकिय फीज व स्वतःच्या राहण्या-जेवणाचा खर्च आपला आपण करायचा असतो. फ्रान्समध्ये ही सूट फक्त इयु नागरिकांना आहे, भारतियांना नाही.

वरच्या सर्व देशांत (अ, आ, इ) स्थानिक पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या व्यक्तिला नोकरी मिळवणे आणि स्थायिक होणे जास्त सोपे असते... बहुतेक देशांत ते सुगम करण्यासाठी नियम-कायदेही आहेत. मात्र, स्थानिक भाषेचे ठराविक स्तराचे शिक्षण ही पूर्वअट असते.

ई) अमेरिकेत (यु एस ए) व वरचे देश सोडून इतर देशांत स्थायिक व्हायचे असेल तर अमेरिकेत (विशेषतः पदव्युत्तर) शिक्षण घेणे जास्त चांगले.

मात्र, सद्या अमेरिकेत वर्क व्हिसा (उदा : H1B, इ) आणि त्यापुढची पायरी म्हणजे परमनंट रेसिडेन्सी (पक्षी : ग्रीन कार्ड) मिळणे बरेच कठीण झाले आहे... ट्रंप तात्यांनी तर ते अधिकाधिक कठीण बनवण्याचा चंग बांधला आहे. ही परिस्थिती अजून दोन वर्षे सुधारण्याची शक्यता नाही. पुढल्या निवडणूकीनंतर ट्रंपना पुढची चार वर्षे सत्ता मिळेल की नाही त्यावर त्या वर्षांतील परिस्थिती अवलंबून असेल.

पिलीयन रायडर's picture

25 Sep 2018 - 1:24 pm | पिलीयन रायडर

जर्मनीबद्दल - https://www.misalpav.com/node/35531

उगीच MBA अथवा MS करण्यात काय अर्थ आहे?

खरोखर पुढील शिक्षणाची आवड असेल तर GATE ची परीक्षा देउन IIT तुन M Tech करायला सांगा.
IIT मधे अ‍ॅडनीशन मीळत नसेल तर कॉलेजमधुन ME करायला सांगा. खरोखर चांगला ईंजीनीयर असेल तर हव्या तेवढ्या चांगल्या नोकर्‍या मिळतील. नसेल तर अमेरीकेत कींवा जर्मनीत जाउन तरी काय होणार? मुलगा फार हुशार नाही म्हणता म्हणुन सांगीतले.

भारतातही BARC, DRDO, ISRO अशा ठीकाणी BE नंतर खुप चांगल्या नोकर्‍या मिळतात, तीथे प्रयत्न करायला सांगा. तीथे नोकरी करणार्‍यांना IIT तुन M TEch आणी PhD नोकरी वर असताना भर पगारी करता येते. नंतर Post Doc साठी २ ते ५ वर्ष परदेशात जाता येते. ही ऐकीव माहीती नाही, प्रत्यक्ष अनुभव आहे.

मी अमेरीकेत असतो. इथे नोकरी साठी जागीरात दीली की ८०% अ‍ॅप्लिकेशन्स भारतीय मुलांचे येतात. बहुतेकांना नोकरीसाठी आपण लायक आहोत की नाही / आपल्याला हे काम जमेल की नाही याचाही फीकीर नसते. बरेच जण BE च्या पहील्या / दुसर्‍या वर्शी शीकवलेल्या बेसीक गोष्टीही सांगु शकत नाहीत.

परवाच एकाने ईंटर्व्ह्युमध्ये Transistor माहीत आहे का हे विचारल्यावर "हो, त्यातुन आवाज येतो, वेगवेगळी चॅनल्स लागतात " असे सांगुन मला झीट आणली होती. तुला नोकरी का पाहीजे विचारल्यावर "मला ४ महीन्यात नोकरी मिळाली नाही तर भारतात परत जावे लागेल" असे उत्तर खुप कॉमन आहे.

सांगायचा मुद्दा म्हणजे, एंजीनीयरींगची आवड असेल, पुढे शीकायची खरोखर एच्छा असेल तर तीकडे जाण्यात अर्थ आहे. नाहीतर तुमची मर्जी.

मास्टरमाईन्ड's picture

28 Sep 2018 - 1:31 am | मास्टरमाईन्ड

माझ्या मते practical आणि मस्त प्रतिसाद (फक्त तेव्हढं र्‍हस्व दीर्घाच correction बघा म्हणजे झालं)
पटलं तुमचं.

बरेच जण BE च्या पहील्या / दुसर्‍या वर्शी शीकवलेल्या बेसीक गोष्टीही सांगु शकत नाहीत.

परवाच एकाने ईंटर्व्ह्युमध्ये Transistor माहीत आहे का हे विचारल्यावर "हो, त्यातुन आवाज येतो, वेगवेगळी चॅनल्स लागतात " असे सांगुन मला झीट आणली होती.

हे तर खासच. म्हणजे इथे भारतात तर हा अनुभव येतोच पण अमेरिकेत इतका खर्च करुन गेलेले पण अशा मानसिकतेचे ( बहुतेकांना नोकरीसाठी आपण लायक आहोत की नाही / आपल्याला हे काम जमेल की नाही याचाही फीकीर नसते.) असतील असं वाटलं नव्हतं.

खरोखर पुढील शिक्षणाची आवड असेल तर GATE ची परीक्षा देउन IIT तुन M Tech करायला सांगा.
IIT मधे अ‍ॅडनीशन मीळत नसेल तर कॉलेजमधुन ME करायला सांगा. खरोखर चांगला ईंजीनीयर असेल तर हव्या तेवढ्या चांगल्या नोकर्‍या मिळतील. नसेल तर अमेरीकेत कींवा जर्मनीत जाउन तरी काय होणार? मुलगा फार हुशार नाही म्हणता म्हणुन सांगीतले.

बरोबर

सर्वसाक्षी's picture

28 Sep 2018 - 11:53 am | सर्वसाक्षी

माझ्या एका वरिष्ठानी त्यांच्या मुलांना पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशी दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत पाठवले होते. त्याविषयी ते मला असे म्हणाले होते की "आय आय टी/ बीट्स/ वा नामांकित विद्यापिठा व्यतिरिक्त अन्यत्र अभियांत्रिकी पदवी प्राप्त करणार्‍या मुलांनी इथे विशेष मागणी/ मान नाही. जर परदेशी पाठवुन अमेरिकेतून एम एस केले तर तर ते समाजाच्या दृष्टिने 'वरचे' ठरतात तेव्हा परदेशी पाठविण्याखेरीज पर्याय नाही."

अर्थात तेव्हा तिथली परिस्थिती आजसारखी अस्थिर (??? खरोखरच आज तशी अस्थिर आहे का?) नव्हती. पुढे त्यांची मुले एम एस उत्तिर्ण झाली आता तिथेच स्थायिक आहेत.

अशा फार नामांकित नसलेल्या विद्यापिठात शिकुनही इथे उत्तम प्रगती करणारी उदाहरणेही आहेत. एखाद्या मुलाला एखाद्या विषयात विशेष गती वा रुची असेल तर इथेही प्रगती करु शकतो. एम बी ए जर चांगल्या संस्थेतून केलं तर मागणी निश्चित आहे. एम एस ला हल्ली ऑस्ट्रेलियाचा पर्याय निवडतान अनेकजण दिसतात, बहुधा तिथे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर रहिवास व नोकरी सहज व चांगल्या पगाराची मिळते.

मुलाचा विचार (आणि तुम्हा कुटुंबियांचा) काय आहे? जातील तिथे स्थायिक होणे की शिक्षण घेऊन परत येणे? स्थायिक होणार असतील तर गोष्ट वेगळी पण अमेरिका वा ऑस्ट्रेलियात एम एस करुन इथे परत आल्यास त्या एम एस चे इथे नोकरी मिळतना कितपत वजन आहे हा प्रश्नच आहे.

जर मुलाची जायची इच्छा असेल तर अवश्य जाऊद्या, शक्यतो नकारात्मक विचार टाळा, माझ्या माहितीत बाहेर पदव्युत्तर शिक्षण घेउनही तिथे नोकरी न मिळाल्याने परत आल्याचे उदाहरण नाही

निखिल माने's picture

28 Sep 2018 - 12:42 pm | निखिल माने

बाहेर जाण्यापेक्षा बिट्स पिलानी मधुन मास्टर करायला सांगा, फी आणखी इतर खर्च धरुन दहा लाख रुपयांचे आत खर्च येतो आणि कम्पस पण चांगले आहेत इथे. कमीत कमी सात आठ लाख रुपयांचे पैकेज सहज मिळत मेकॅनिकल ला

लेखात पदव्युत्तर शिक्षण म्हणजे केवळ इंजिनीरिंग चाच विचार झालाय. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांच्या संशोधन व व्याख्याता या करिअर मधील परदेशातील संधींबद्दल कुणाला काही माहिती आहे का?

विटेकर's picture

3 Oct 2018 - 6:56 am | विटेकर

सर्व प्रतिसाद उत्तम आणि प्रामाणिक तळमळीने लिहीले आहेत,मन:पूर्वक आभार!

मुक्त विहारी यांनी विशेष वेळ काढून फोनवर अनेक शंकांचे निरसन करणे, औपचारिक आभार मानून स्नेहभावात व्यत्यय आणीत नाही. ते योग्यही नव्हे .

कानडाऊ योगेशु's picture

15 Dec 2020 - 4:39 pm | कानडाऊ योगेशु

जुना लेख वर आला आहे.
पुढे काय झाले ते वाचायची उत्सुकता आहे विटेकर काका?
कदाचित आता तुम्हीच पुढे काय करायचे ह्याबाबतीत योग्य सल्ला देऊ शकाल असे म्हणतो.

विटेकर's picture

3 Oct 2018 - 6:56 am | विटेकर

सर्व प्रतिसाद उत्तम आणि प्रामाणिक तळमळीने लिहीले आहेत,मन:पूर्वक आभार!

मुक्त विहारी यांनी विशेष वेळ काढून फोनवर अनेक शंकांचे निरसन करणे, औपचारिक आभार मानून स्नेहभावात व्यत्यय आणीत नाही. ते योग्यही नव्हे .

एमेसचा खर्च अमेरिकेत सध्या नव्वद लाख रुपये.
स्थानिकानांना मिडल,लोअर नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत या मुद्द्यावर ट्रम्प निवडून आलेला आहे आणि पुन्हा त्याच बाबीवर किंवा अधिक स्पीडब्रेकरवर दुसरा कुणी येणार हे नक्की.

कंजूस's picture

3 Oct 2018 - 8:11 am | कंजूस

आठव्या वर्षी मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी बापाची? नाही. सध्या अठ्ठावीस.

मराठी_माणूस's picture

15 Dec 2020 - 10:30 am | मराठी_माणूस

मुंबई मधे ह्या बद्दल माहीती देणारे counselors कुणाला माहीती आहेत का ?

मराठी_माणूस's picture

16 Dec 2020 - 9:05 am | मराठी_माणूस

ही माहीती अर्थशास्त्रात पी.एच.डी करण्यासाठी हवी आहे

पुण्यात डेक्कन जिमखाना भागात गोखले अर्थशास्त्र संस्थेत चांगले पदव्युत्तर शिक्षण मिळेल आणि पी हेच डी करायला संधी आणि बाहेर करायाची असेल तर मार्गदर्शन मिळेल. ही संस्था जुनी असून जगातील मोठ्या विद्यापीठात त्यांना मान्यता/ सन्मान आहे..काहीं अंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम आहेत असं ऐकलं होतं.

विनायक प्रभू's picture

15 Dec 2020 - 1:22 pm | विनायक प्रभू

परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती वर होत असेल तरच.
नाही तर gate देऊन इथेच बरे

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Dec 2020 - 3:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

१. एम एस करावे का ?- आतापर्यंत आपण ईंजीनियरिंगवर ५ लाख तरी खर्च केले असतील. एम एस ला अजुन साधारण ५०-६० लाख. ईतके करुन तिकडेच नोकरी मिळाली तर ठिक नाहितर भारतात परत येउन नोकरी शोधली तर पगार मिळणार ४०-५० हजार. म्हणजे आय/व्यय चे प्रमाण किती व्यस्त आहे ते पहा. त्यापेक्षा ईथेच राहुन पायथन,डेव्ह ऑप्स्,अ‍ॅन्सिबल, ए.आय(आर्टिफिशियल ईंटेलिजन्स), डाटा सायन्स, असे काहितरी चलती कोर्सेस करुन नोकरीची खटपट करावी.
२. अमेरिकेत / जर्मनीत की अन्यत्र ? जाणकारांनी वरती ऑस्ट्रेलिया/नुझीलंडचा रस्ता सांगितला आहे.
३. की सरळ भारतातच एम बी ए करावे ? फनेल ची आकृती बघितल्यास जसे वरती जावे तसे जागा कमी होत जातात. ५०-१०० जणांना १ मुकादम. त्यामुळे एम बी ए चे वलय दिवसेंदिवस कमी होते आहे. खरेतर बी. ई मुले जे काम करतात तेच थोड्याफार प्रशिक्षणाने बी.एस्सी. मुलेही करु शकतात,शिवाय कमी पैशात. त्यामुळे बी ई चे वलयही कमी होत चालले आहे.
४. १-२ वर्षाचा मिळेल तो अनुभव घेऊन मग एम एस अथवा एम बी ए चा विचार करावा ? हा पर्याय चांगला वाटतो. एम बी एच करायचे असल्यास प्रयत्न करत रहा पण IIM चाच रस्ता धरा(शक्यतो अहमदाबाद पण पर्याय म्हणुन बँगलोर्,कोलकाता,कोझिकोड वगैरेही चालेल.
५. सध्या काहीच करु नये ... जे जे होईल ते पहावे ? मग त्याचे त्यालाच कळेल ? वेळ घालवु नका. काहीच नाही तर #१ मध्ये सांगितल्याप्रमाणे काहीतरी चांगला कोर्स चालु करा. सरकारी नोकरीची आवड असल्यास एम पी एस सी ची तयारी करता येईल. आवड असल्यास आर्मी/नेव्हीच्या शॉर्ट सर्विस कमिशन बद्दल शौकशी करा. कॉलिंग डॉ. सुबोध खरे

अवांतर- माझा मुलगा १० वीत आहे आणि हेच सगळे प्रश्न मलाही पडले आहेत. त्यही बाबत चर्चा व मते ऐकायला आवडतील.

सिरुसेरि's picture

15 Dec 2020 - 7:21 pm | सिरुसेरि

सध्या सर्वच क्षेत्रात संगणक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढतो आहे. त्यामुळे पदवी / पदव्युत्तर शिक्षण घेतानाच समांतरपणे त्या शिक्षणाला पुरक ठरेल असे संगणक तंत्रज्ञान शिकुन त्याचा वापरही केला तर पुढील करीअरसाठी फायद्याचे ठरु शकते .

जिन्क्स's picture

16 Dec 2020 - 10:32 am | जिन्क्स


खरेतर बी. ई मुले जे काम करतात तेच थोड्याफार प्रशिक्षणाने बी.एस्सी. मुलेही करु शकतात,शिवाय कमी पैशात. त्यामुळे बी ई चे वलयही कमी होत चालले आहे.

असहमत. हे सगळीकडेच लागू होईल असं नाही. काही क्षेत्रांमध्ये ( जसे की मॅन्युअल टेस्टिंग) ते खरे असेल पण सगळ्या क्षेत्रात असेच असेल असं नाही. मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे डोमेन knowledge ला खूप महत्व आहे. जर विद्यार्थ्याने अभियांत्रिकी शिक्षण चांगले घेतले असेल तर तो लगेच पायऱ्या सर करून वर जातो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Dec 2020 - 11:56 am | राजेंद्र मेहेंदळे

मी जनरल विधान केले आहे आणि तेही जास्त करुन आय.टी क्षेत्राचा कल बघुन केले आहे. सिव्हिल्,मेकॅनिकल,ईलेक्ट्रिकल किवा तुमच्या विशिष्ट क्षेत्रात परीस्थिती वेगळी असु शकते.

सुबोध खरे's picture

16 Dec 2020 - 12:35 pm | सुबोध खरे

माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर होऊन २ वर्षे झाली. त्याच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी बऱ्याच त्या क्षेत्रातील दिग्गज लोकांचे मत घेतले.( यात १)माझा मित्र बीई VJTI, M TECH IIT मुंबई, २) एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डीन बी टेक (एन आय टी) , एम एस आणि पी एच डी अमेरिका, ३) स्वतःची मोठी माती तपासण्याची (SOIL TESTING) प्रयोगशाळा असलेले एक निवृत्त प्राध्यापक एम टेक (आय आय टी) पी एच डी अमेरिका असे उच्च शिक्षित लोक आहेत. त्याचा सारांश असा

१) अमेरिकेतही टिनपाट विद्यापीठे खोऱ्यानी आहेत. तेथे मिळणारे शिक्षण यथा तथाच आहे. त्यामुळे तेथून शिक्षण घेतलेल्याना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता ५०:५० आहे.

२) भारतात तरी परदेशी पदवी बद्दल वलय अजूनही आहे. (कारण तेथील टिनपाट विदयापीठे आपल्या टिनपाट विद्यापीठांपेक्षा साधन सामग्रीने जास्त समृद्ध आहेत.) उदा मुंबई आय आय टी मध्ये काँक्रीटच्या घाण ठोकळ्याच्या शक्ती ची चाचणी घेण्यासाठी प्रयोगशाळा खाजगी विद्यापीठे २५ टन, VJTI ५० टन मुंबई आय आय टी १०० टन अशी आहे तर अमेरिकेत प्रत्येक विद्यापीठात सर्रास १०० ते २०० टन क्षमतेच्या प्रयोगशाळा आहेत.

३) परदेशात जाऊन तुम्ही तेथे स्थायिक होण्याच्या शक्यता आता कमी कमी होत चालल्या आहेत. त्यामुळे तेथे जाणार असाल तर पुढच्या दहा वर्षात भारतात येणारे/ येऊ घातलेले तंत्रज्ञान शिकून आलात तर त्याचा भारतात उपयोग करता येऊ शकतो. अशा तंत्रज्ञानाला येणाऱ्या काळात भारतात वाढणाऱ्या खाजगी क्षेत्रात मरण नाही.

४) अमेरिकेतील खुले वातावरण उपयोग करून घेतल्यास आपल्याला ज्ञानाची कवाडे खुली करून देतात कारण नवनिर्माण करण्याच्या आपल्या वृत्तीला तेथे प्रोत्साहन दिले जाते. बाबा वाक्यं प्रमाणं अशी वृत्ती सहसा नाही.

५) कॅनडा ऑस्ट्रेलिया सारख्या देशात बहुतेक ठिकाणी जेथे आपल्याला नोकरी मिळू शकते तेथील हवामान अत्यंत प्रतिकूल असते.( कॅनडात उणे तापमान आणि ऑस्ट्रेलियात भयंकर उन्हाळा) तेंव्हा बारा महिने बत्तीस काळ घर किंवा कार्यालयातच वातानुकूलित बंदिस्त जागेत राहायची तयारी असेल तर तेथे जाण्याच्या द्रूष्टीने प्रयत्न करा. ( हवामानाचा प्रश्न मुख्यत्वे मेक आणि सिव्हिल ला येतो संगणक इलेक्टॉनिक्सला फारसा नाही).

६) मुलाचा कल कोणत्या विषयात आहे हे समजून न घेता बरेचसे पालक (आणि मुलाला काय कळतंय मी सांगतोय ना?) त्याला संगणक किंवा इलेक्टॉनिक्सला पाठवतात कारण तेथे पास झाल्यावर सुरुवातीला मिळणारे पॅकेज जास्त चांगले असते. यात मुलाची उमेदीची १० वर्षे फुकट जातात( ४ वर्षे अभियांत्रिकीची
आणि त्यानंतरची ५-६ वर्षे आपल्याला काय आवडतं हे समजून घेण्यात किंवा पदरी पडलं ते पवित्र करून घेण्याच्या प्रयत्नात.

७) मुलाला ५० लाखाचा फ्लॅट घेऊन देण्याची बहुतेक मध्यमवर्गीय पालकांची तयारी असते. पण परदेशात शिक्षणासाठी इतके पैसे खर्च करायचे म्हणजे ते फुकट गेले असेच बरेच मध्यमवर्गीय समजतात ( किंवा याच्या अर्धे पैसे सुद्धा मुलाच्या व्यवसायाला देण्याची मध्यमवर्गीय पालकांची तयारी नसते. कारणे वेगवेगळी असतील, बरीचशी सबळ/साधारही असतील)

असो.

लिहिण्यासारखे बरेच आहे.

दादा कोंडके's picture

16 Dec 2020 - 10:26 pm | दादा कोंडके

यानिमित्ताने आलेल्या अनुभवाचा आणि माहितीचा नविन धागा काढावा असं सुचवतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Dec 2020 - 1:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उपयोगी चर्चा. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे