दृष्टांत

भृशुंडी's picture
भृशुंडी in जनातलं, मनातलं
22 Sep 2018 - 12:09 pm

मला रोज रात्री स्वप्नं पडतात. कधी साधी, कधी विचित्र. पण रोज. नेमाने.
बरेचदा मला स्वप्नं लक्षातही रहात नाहीत. सकाळी उठून डोळे उघडले की रात्रीची काहीच याद उरत नाही.
आता मग असा प्रश्न पडू शकतो की स्वप्नं लक्षात रहात नसतील तर स्वप्नं पडतात हे कसं काय लक्षात रहातं?
गुड क्वेश्चन.

कारण स्वप्नात जे काही दिसतं, त्याचे अधिभौतिक परिणाम झालेले असतात. माझ्यासमोर, माझ्या अंगावरच.
माझा फ्यूज उडालेला असतो. साध्या रानटी भाषेत किंवा मराठीत (एकूण एकच) सांगायचं झालं तर माझा वीर्यपात होऊन सगळं काही गारेगार झालेलं असतं.

Embarrassing, right? You bet. मला जर कौन बनेगा करोडपतीची लॉटरी लागली असती तरीही मी हे असलं काही कुणाला कधी सांगायला गेलो नसतो. पण बाकीचा प्रकार इतका इंट्रेस्टिंग आहे की.. पर्याय नाही. पुढेमागे मला जर वेड लागलं तर त्या आधी हे सगळं कुठेतरी मांडून ठेवायला पाहिजे म्हणून इथे लिहून ठेवतोय.

आता ही २ स्वप्नं. त्याच्या मुळाशी जायला हवं.
साधारण २ महिन्यांपूर्वी मला पहिलं स्वप्न पडलं असावं. त्या दिवशी बाकी काहीच खास झालं नव्हतं. नेहेमीसारखा दिवस. सकाळी ऑफिसला गेलो, काम करायचं नाटक केलं, घरून नेलेला डबा (आईने दिलेला. बायको हा प्रकार अजून आयुष्यात नाही) फेकून दिला आणि फ्राईडराईस खाल्ला. मग दुपारी कॉफी, तीन-चार लोकांशी मीटींग्स आणि मग ट्रॅफिकमधून घरी परत. नोकुछ नो हिलचूल.
फक्त एकच गोष्ट वेगळी झाली. मला व्हॉट्सअ‍ॅपवर कुणी पुराण्या मित्राने शाळेच्या ग्रूपवर अ‍ॅड केलं. आणि त्या सगळ्या मेंढरांच्या कळपात मला आमच्या (तेव्हाच्या) शाळेतल्या बाईसुद्धा दिसल्या. चमत्कारीक अनुभव.

"शाळेतल्या बाई" म्हटल्यावर डोळ्यापुढे जे चित्र येत असेल ते विसरून जा. आमच्या (तेव्हाच्या) ह्या बाई - तूर्त आपण त्यांना सांकेतिक भाषेत गीता टीचर म्हणू. तर ह्या गीता टीचरसुद्धा आमच्या ह्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमधे होत्या.
अर्थात मी त्यांच्या प्रोफाईलवर जाऊन पाहिलं- आणि १०३% दचकलो. त्यांचं प्रोफाईल बघून दोनच निष्कर्ष निघू शकत होते-
थियरी नं १. -> गीता टीचरनी १५ वर्षांपूर्वीचा फोटो लावला होता.
थियरी नं २. -> साधारण १५ वर्षांत गीता टीचर अजिबातच बदलल्या नव्हत्या.

मग रात्री फोन चेक करून मी झोपलो. आणि त्याच रात्री मला पहिलं स्वप्न पडलं. नक्की काय बघितलं ते मला आठवत नाही, पण त्या रात्रीच पहिल्यांदा झोपेत माझ्या केळ्याची काकडी झाली. आणि मग बलम पिचकारी इत्यादी. असो. तेव्हा मला प्रचंड ओशाळलेपण आलं (टिपिकल भारतीय ओशाळलेपण जे कुठल्याही प्रांजळ प्रसंगी आपल्याला येतंच- विषेशतः जर तो प्रसंग लैंगिक [ कसला पुचाट शब्द आहे हा!] वगैरे असेल तर नक्कीच.), आणि तो प्रसंग मी खोलवर दाबून टाकला.

पुढल्या दोनतीन दिवसांत काहीच झालं नाही. पण मी फावल्या वेळात बरेचदा गीता टीचरच्या प्रोफाईलवर जाऊन त्यांचं ते चित्र पाहून आलो. त्यांना "हाय हॅलो" म्हणावं असं मात्र मला वाटलं नाही. पण गीता टीचर सध्या कशा दिसत असतील? हा प्रश्न मला छळत राहिला. मग मी फेसबुकवर जाऊन त्यांना धुंडाळालं. तिथेही त्यांचे बरेच फोटो होते- गेल्या काही वर्षातले असावेत.
माझी थियरी नं २ बरोबर होती. गीता टिचर अजूनही बऱ्याचशा तशाच होत्या.

मग एक आठवडाभर मी गीता टीचरच्या फेसबुक प्रोफाईलवर बर्‍याच चकरा मारल्या - फक्त त्यांना बघण्यासाठी.
मला माहितीये तुम्हाला काय वाटतंय ते. डर, बाझीगर, स्लीपींग विथ द एनिमी वगैरेचा खुराक मिळालेल्या तुमच्या डोक्यात कसले विचार चालले आहेत ते कळतंय मला. पण तसलं काही नव्हतं. मला गीता टीचरना "बघण्यात" नक्कीच इंट्रेस्ट होता. पण भावनांच्या पातळीवर जवळपास शून्य. द्विमितीय चित्राबद्दल आपल्याला जितकं आकर्षण असू शकेल तितकंच.
असो. तुम्हाला सांगून समजणार नाही आणि तुम्हाला समजू शकेल असं मला सांगता येणं कठीण आहे.

त्या आठवड्यात शनिवारी रात्री मी उशीरा झोपलो, आणि तेव्हा मला दुसरं स्वप्न पडलं - ते मात्र मला लख्ख आठवतं आहे.
पुढला मजकूर कदाचित भारतीय संस्कृती, सोज्ज्वळ विचार, थोर परंपरा वगैरे पदार्थांच्या सेवनाने जाडजूड झालेल्या कुठल्याही मनाला अश्लील वाटेल, पण कुठल्याही छचोरतेच्या वाटेला न जाता जर प्रांजळ सत्य सांगायचं झालं, तर हे सांगणं भाग आहे.
स्वप्नात :
मी शाळेतच होतो. आमच्या वर्गात. पण इसवी सन २०१६मधे, कारण कुणीतरी सुविचार, हजेरी पट ह्यासगळ्या गदारोळात तारीखही लिहून ठेवली होती. पूर्ण वर्ग रिकामा होता. बहुधा सकाळचे ८ वाजले असावेत, कारण खिडक्यातून उन्हाची तिरीप डोकावली होती, आणि वर्ग फिकट पिवळसर उन्हाने न्हाऊन निघाला होता. पण हे सगळं मला फक्त जाणवत होतं- मी प्रत्यक्ष बघत होतो ते गीता टीचरकडे. माझी नजर त्यांच्यावर खिळली होती, आणि जवळपास नजरबंदी झाल्यासारखा मी त्यांच्याकडे पहात होतो.
त्या संपूर्ण नग्नावस्थेत उभ्या होत्या. पूर्ण नग्न. शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर नागड्या.
पण त्यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. अतिशय casual अशा नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्या शांत पण खेळकर आत्मविश्वासाने माझ्याकडे असं रोखून पहाताना त्यांची पापणीदेखील लवली नाही.
तुम्ही कधी एखाद्या स्त्रीला पूर्ण नग्नावस्थेत नि:संकोच उभी राहिलेली पाहिली आहे का? त्याशिवाय तुम्हाला माझी अवस्था समजणं कठीण आहे. आपल्या भारतीय सेटिंगमधे स्त्रीने अशावेळी पराकोटीचा संकोच दाखवणं, लाजेनं चूर होणं, किंवा मिळेल त्या वस्तूमागे लपणं अपेक्षित आहे. किमानपक्षी आपलं शरीर दोन्ही हातांनी लपवणं तर अपेक्षित आहेच आहे.
पण गीता टीचरनी ह्यापैकी काहीच केलं नाही. आपले मोकळे केस खांद्यावर रूळू देत, अगदी सहज अशा त्या माझ्यासमोर उभ्या होत्या. आपली नग्नता लपवणं दूरच राहिलं, त्या जवळपास आपला नग्न देह celebrate करावा अशा तर्‍हेने माझ्यापुढे उभ्या होत्या.

पण मी पडलो गरीब बिचारा भारतीय पुरूष. ज्याला नग्नता म्हणजेच अश्लीलता आणि नग्नता म्हणजेच लैंगिकता ही समीकरणं वर्षानुवर्ष पढवण्यात आली होती. त्यामु़ळे गीता टीचरचा तो निर्वस्त्र देह बघून माझ्या केळयाची लगेच काकडी झाली. आणि मग बलम पिचकारी इत्यादी.
आता त्या स्वप्नाबद्दल विचार केला तर वाटतं -
स्त्रीने कपडे काढले, की ती लगेच रतीसंगासाठीच उत्सुक असते हा महान शोध भारतात कधी लागला ते जरा बघावं लागेल. कारण निव्वळ ' प्रौढ स्त्रीची नग्नता' ही आपल्यादेखी अस्तित्त्वातच नाही. आता मग लगेच तुम्ही म्हणाल की नागा साधू असतातच की. आपण त्यांना मानतो. जैन लोकांतही दिगंबर पंथीय असतात- मग?
तर राजेहो, पुरूषांनी गांजा पीत, भस्म फासून आपलं लिंग उघडं ठेवत रस्त्यावरून हिंडावं हे नियमांत जर बसत असेल तर मग स्त्रियांना थोडी तरी सवलत द्या की. दाखवू देत त्यांना आपलं शरीर.
मग तुम्ही आदिवासी बायका वगैरे पळवाटी शोधाल. तसे आपण मूल्यांची लपाछुपी खेळण्यात चँपियन आहोत. ह्या भारतीय संस्कृतीनामक गाठोड्यातून हवे ते तर्कविसंगत दाखले आज्ञेबरहुकूम बाहेर काढता येतात. ब्यूटिफूल. पण असो, मी भरकतलोय.

तर शनिवारी रात्री हे स्वप्न पडलं आणि गीता टीचरना अशा अनावृत्त अवस्थेत पाहून माझ्या सज्जन भारतीय लिंगाने त्या रात्री नेमिक्रमे उसासे टाकले.

रविवारी सकाळी उठून मी चूळ भरायच्यासुद्धा आधी पुन्हा माझया व्हॉटसएप ग्रुपवर चक्कर मारली. पण मला गीता टीचरचा फोटो बघायचं धाडस झालं नाही.
स्वप्नातल्या नग्नतेने लाजलेलं माझं भीरू मन मला सांगत होतं की नको करूस हे. पाप आहे हे.
मग मी थोडावेळ "जिंदगी ना मिलेगी दोबारा" पाहिला, माझ्या मध्यमवर्गीय मनाला झेपेल इतकीच स्वप्न दाखवणाऱ्या ह्या चित्रपटाचा मी फार ऋणी आहे.
तरीही मला गीता टीचरचा फोटो बघायला लाज वाटत होती. मग मी अनुराग कश्यपला शरण गेलो आणि सरळ "नो स्मोकिंग " पाहिला. बरं वाटलं.
जर जॉन अब्राहम सायबेरियातल्या वाळवंटात बाथटबामध्ये गायब होऊनही चिल राहू शकतो तर मग मी का नाही?
त्याला तर आयेशा टाकियाशी सामना करायचा होता - मग गीता टीचर किस झाड की पत्ती ? असं म्हणून मी स्वतःचं समाधान केलं.

मग मी निवांत शॉवर घेऊन आलो आणि गीता टीचरच्या स्वप्नाबद्दल विचार करू लागलो. त्या अशा का दिसल्या असतील आपल्याला? आपलं अंतर्मन आपल्याला काही सांगायला बघतंय का ? किंवा मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात तसं झालं असेल ? मला अजूनही गीता टीचर आवडतात का? माझया मनात त्यांच्याबद्दल ज्याला रूढ मराठीत "लैंगिक भावना किंवा कामेच्छा" म्हणावं लागतं तसला काही प्रकार असेल का? गूढ आध्यात्मात आत्मे स्वप्नात येऊन संवाद साधतात तशा गीता टीचर माझ्याशी सम्वाद साधत असतील का? त्यांना मी आवडीन का?

पण कसलीच उत्तरं मिळेनात , ते टेन्शन मला सहन होईना.

नंतर पडलेलं स्वप्न थोडं वेगळं होतं.
मी शाळेतच होतो.आमच्या वर्गात. आणि गीता टीचर तशाच नग्न होत्या. पण वर्गात इतर मुलं मुलीही होते. आणि सर्वानी आपले कपडे काढून ठेवलेले.
एकेका चेहर्यावरून माझी नजर फिरू लागली. आमच्या ग्रुपमधले अशोक, विजू, मंदार आणि वर्गातला भीम -म्हणजे शिंदेसुद्धा आपलं केसाळ शरीर दाखवत तसाच उभा होता.
रश्मी, सारिका, माधवी आणि वर्गातली त्या कालची नंबर १ - ललितासुद्धा शांतपणे नागडी उभी होती.
त्यातल्या कुणाच्याही चेहेर्यावर कसलाच संकोच नव्हता. लालसा नव्हती, छचोरपणाही नव्हता. केवळ सावधान -विश्राम करताना येणाऱ्या सहजपणाने ते सगळे
तिथे उभे होते. आपापली शरीरं अनावृत्त ठेवून ते कधीही कवायत सूरू करतील असं मला वाटलं.

तुम्ही कधी इतक्या लोकांना नागडं उभं असलेलं पाहिलं आहे का? उंच, बारीक, जाडे, बुटके लोक.
त्यांची ऐसपैस, मोठ्या, छोट्या अशा चणीची शरीरं. त्यांच्या मांड्या, ढोपरं, पोटऱ्या वगैरे.
आणि त्यांची अतिशय वैयक्तिक अशी लिंग किंवा योनी.

एक अतिशय घृणा आणणारं दृश्य. किंवा नसेलही. पण मादक सौंदर्य किंवा पुन्हा मराठीचा आधार घ्यायचा झाला तर " कामोद्दीपित" करणारं त्यात अगदीच काही नव्हतं. जे काही होतं ते प्रणयोत्सुक भावनांपासून सत्तावन्न किलोमीटर लांबच होतं.

आता गीता टीचर हसून पुढे आल्या आणि म्हणाल्या - "अरे कपड्यांवर वगैरे काही नसतं रे. आणि नागडेपणावर तर नाहीच. तुला वाटेल की मग अर्धवट नागडी शरीरं अजून आकर्षक वाटतील? इथे ह्या सगळ्या मुलांना मी बनियानवर आणि पोरीना ब्रा-पॅन्टीजमध्ये उभं केलं तर तुला काय वाटेल? की मग तुझ्या आवडत्या ललिताला एकटीलाच उभं केलं तर? तेव्हा नग्नता, अंगप्रदर्शन वगैरे सगळं झूट."
"पण -"
"तुला मी आकर्षक वाटेन जर मी तुझ्या मनात नागडी किंवा अर्धनग्न झाले तर. तुझ्या मनात मी माझे कपडे तुला हवे तसे उतरवले तर . तर मग तू मला हवी तशी ओचकारशील किंवा हळुवारपणे माझं चुंबनाही घेशील. सगळं तुझ्या मनात आहे."
मी म्हटलं "पण टीचर हे मला माहिती आहे."

तेव्हा त्यांनी अचानक माझ्या गोट्या करकचून आवळल्या आणि त्या फुत्कारल्या -
"अरे लवड्या, मग पोरींनी कुठले कपडे घालावे आणि कुठले घालू नये हे सांगणारे, त्यांची ब्रा खांद्यावरून बाहेर आली की गंजीफ्रॉक बाहेर आल्यागतच अजागळ दिसत हे न कळणारे आणि लाळ गाळणारे, पोरीनी छोट्या चड्ड्या घातल्या म्हणून संस्कृती बुडाली अशी आरोळी ठोकणारे, रेप झाला हे तिचंच पाप आहे अशी आक्रस्ताळी मांडणी करणारे, पोरींनी सातच्या आत घरात यावं अशी अपेक्षा करणारे सगळे जे कुणी आहेत त्यांना सांग ना ते."

मी जागा झालो तरी माझ्या गोट्या दुखत होत्या. मी लगेच त्या व्हॉट्सअप ग्रुपवरून स्वतःला डिलीट केलं आणि कैलाशजीवनसाठी आईकडे सुट्टे मागायला गेलो.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 Sep 2018 - 1:46 pm | प्रचेतस

मिपा वयात आलं भो.

आनन्दा's picture

22 Sep 2018 - 1:52 pm | आनन्दा

अश्लील अश्लील

असं म्हणावसं वाटतय.. पण कीबोर्ड रेटत नाहीये.

कारण शेवटचा परिच्छेद.

कपिलमुनी's picture

22 Sep 2018 - 3:02 pm | कपिलमुनी

लेख अश्लील वगैरे नाहीये , वेगळ्या पद्धतीची मांडणी आहे .
नग्नता म्हणजेच कामुकता ,लैंगिकता नव्हे.
इतर काकड्या , पिचकाऱ्या गोष्टी त्या त्या वयात होतातच. मुलींना पाळी येणे जेवढे नैसर्गिक आहे तेवढेच मुलांच्या बाबतीत हे नैसर्गिक आहे.

शेवटच्या परिच्छेदामधून चांगला संदेश दिला आहे.

"तुला मी आकर्षक वाटेन जर मी तुझ्या मनात नागडी किंवा अर्धनग्न झाले तर. तुझ्या मनात मी माझे कपडे तुला हवे तसे उतरवले तर . तर मग तू मला हवी तशी ओचकारशील किंवा हळुवारपणे माझं चुंबनाही घेशील. सगळं तुझ्या मनात आहे."

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2018 - 4:10 pm | टवाळ कार्टा

उत्तम रॉ लेख

चौथा कोनाडा's picture

22 Sep 2018 - 4:26 pm | चौथा कोनाडा

बाबौ, खतरनाक लिवलंय !
आता फुडचं सपान कोनत ?

संजय पाटिल's picture

22 Sep 2018 - 8:40 pm | संजय पाटिल

भारीच आहे हे....... पण एक शंका आहे ....कैलासजिवन कुठे कुठे वापरता येतं?

नाखु's picture

23 Sep 2018 - 12:32 am | नाखु

कन्याकुमारीपर्यंत कुठेही.
जी एस टी एकच आहे.

संजय पाटिल's picture

23 Sep 2018 - 10:37 am | संजय पाटिल

=))

विशुमित's picture

23 Sep 2018 - 5:53 pm | विशुमित

कैलास जिवन खातात पण ना??

मध्यमवर्गीय मराठी घरात मधुमेह, हार्टअटॅक आणि कॅन्सर सोडून बाकी सगळ्यावर कैलाश जीवन चालत असावं.

मारवा's picture

23 Sep 2018 - 7:18 am | मारवा

अत्यंत रोचक लिखाण आहे.
मनाच्या आतले पापुद्रे सोलुन त्याकडे निरखुन पाहणारं लिखाण आहे.
मराठी आंजावर क्वचित असं काही लिहीलं जातं,

यशोधरा's picture

23 Sep 2018 - 2:11 pm | यशोधरा

सणसणीत लेख.

ट्रम्प's picture

23 Sep 2018 - 2:53 pm | ट्रम्प

जबरदस्त लेखनशैली !!!
दोनवेळा लेख वाचून काढला , बलात्कार करणाऱ्या च्या पण ट्या अशाच पक्कड ने दाबल्या पाहिजेत .
एक मात्र खरं आहे लेख वाचतांना संपादक मंडळाला सुद्धा या लेखा बद्दल विचार पडला असेल .

सुदैवाने मला स्वप्न कधी पडलेच नाही त्यामुळे इथे या लेखात जे दिले आहे ते कधी अनुभवले नाही .. पण तरीही स्वतः त्या भूमिकेशी समरस होऊन बघितले आणि पटले .. भाषाशैली तर वाखाणण्याजोगी आहे , सध्याच्या पिढीला या अश्याच भाषेत लिखाण झाले तर समजेल अशी .. लिहीत राहा साहेब , लिहीत राहा ,, आणि स्वीकारा या खिलजीचा मानाचा मुजरा ...

मराठी कथालेखक's picture

24 Sep 2018 - 4:31 pm | मराठी कथालेखक

वाचून घ्या रे लवकर ..धागा उखडला जाण्याआधी.
माझ्या उखडलेल्या "सॉफिस्टिकेटेड"ची आठवण ताजी झाली :)

ज्योति अळवणी's picture

24 Sep 2018 - 7:39 pm | ज्योति अळवणी

उत्तम.... कैलासजीवन स्वप्नातून जागे झाल्यावरची गरज... स्वप्नात डोळ्यात अंजन!

हे खरंच आहे की नग्नता पाहणाऱ्याच्या मनात असते. पण दुर्दैवाने या मुद्द्याची फक्त चर्चाच होऊ शकते. आपल्या लेकी जर लहान कपडे घालून बाहेर पडत असतील तर आपणही एकदा तरी म्हणतोच... घालायला हवंच का अस? आणि त्यावर नवीन पिढीने 'look' दिला की मग फक्त 'सांभाळ ग' तोंडातून येत!!!!!

Unfortunate fact of our life!!!

सुबोध खरे's picture

24 Sep 2018 - 9:42 pm | सुबोध खरे

या गोष्टीला स्वप्नावस्था म्हणतात.( दुर्दैवाने काही ठिकाणी याला स्वप्नदोष म्हणतात) हा दोष नाही.
शुक्राणू तयार होणे आणि त्याचे उत्सर्जन होणे हि एक पुरुषातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. पूर्वी १५ १६ वयालाच लग्न होत असत आणि त्यामुळे स्त्रीसुख हे तरुण वयातच प्राप्त होत असल्याने स्वप्नावस्था होण्याचे प्रमाण कमी असे. त्यामुळे ज्यांना स्वप्नावस्था होत असे त्यांना हे लोकांना सांगण्याची लाज वाटत असे. त्यातून मध्य युगात लैंगिकता हे एक अब्रह्मण्यम (taboo) झाल्यामुळे एकंदर त्याभोवती एक गूढ असे लज्जास्पद वलय तयार झाले. त्यामुळे त्यातून शास्त्रीय माहिती मिळणे अशक्य झाले. जेंव्हा शास्त्रीय माहितीचा अभाव असतो तेंव्हा अफवा आणि कंड्याना ऊत येतो. त्यातून लैंगिकता आणि पौरुष यांचे अनैसर्गिक संबंध जोडण्यात आले आणि लिंगाचा आकार आणि संभोग करण्याची क्षमता याबद्दल अवास्तव कल्पनाविकासाला भर आला.
वाजीकरण ( घोड्यासारखी लैंगिक शक्ती) इत्यादी भंपक कल्पनांना जन्म झाला आणि मग त्यातून लैंगिक भावनांचा निचरा होणे हि अशक्यप्राय गोष्ट झाली.
यामुळे हस्तमैथुन सारख्या नैसर्गिक गोष्टी या चूक आहेत आणि त्यामुळे तुम्ही स्वतःची अपरिमित हानी करून घेता आहात अशी भंपक विचारसरणी पुढे आली. ब्रम्हचर्य म्हणजेच जीवन वीर्यनाश म्हणजेच मृत्यू
२० थेम्ब रक्ता पासून एक थेम्ब वीर्य तयार होते.

अशा तर्हेच्या अफवांना ऊत आला आणि भारतात लैंगिकते कडे पाहण्याची निकोप वृत्ती लयास गेली.
याचा परिणाम काय झाला तर हस्तमैथुन करणे हे पाप समजले गेले. १०० टक्के पुरुष आणि स्त्रिया आयुष्यात कधीतरी हस्तमैथुन करतातच.
निसर्ग आपले काम करीतच असतो त्यामुळे तारुण्यात वीर्य निर्मिती होतच असते पण तिचा निचरा कसा होणार? त्यामुळे स्वप्नांत आलेल्या उत्तेजक प्रतिमामुळे वीर्यस्खलन होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.
मानवी मन हे विचित्र आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टींचे ज्याबद्दल आकर्षण असते पण ज्या गोष्टी निषिद्ध मानल्या गेल्या आहेत ( उदा. आपल्या शिक्षक/ शिक्षिकांबद्दल शेजारी/ शेजारिणी बद्दल असलेले शारीरिक आकर्षण) अशा गोष्टीचे मेंदू आपोआप अर्ध निद्रिस्त अवस्थेत / स्वप्न पडत असताना विश्लेषण करत असतो. स्वप्ने सर्वाना पडतात काहींना आठवतात काहींना नाही.
१०० % पुरुषांना ( आणि स्त्रियांना) अशा बाबींचे आकर्षण वाटते. त्यामुळे लैंगिक भावनांशी या आकर्षणाचा संबंध येणारच.

स्वप्नावस्था या भावनांशी निगडित होणे यात अनैसर्गिक काहीही नाही. स्त्रियांनाही स्वप्नावस्था होतेच परंतु एकंदर स्त्रीने लैंगिक बाबीबद्दल बोलणे हे चांगल्या स्त्रीचे लक्षण नाही अशा तर्हेच्या भंपक कल्पना रुजल्यामुळे त्यांच्यात अशा चर्चा फारच जवळच्या मैत्रिणीबरोबर होऊ शकतात अन्यथा नाही.

मुळात रोज रात्री ३ ते ५ वेळेस लिंगाचे उत्थान होते हे नैसर्गिक आहे आणि त्यामुळे स्वप्नावस्था होणे यात अनैसर्गिक काहीच नाही.
Research has found that, on average, 8 percent of dreams have some sexual content. In the same study, both men and women reported having an orgasm in about 4 percent of their erotic dreams.
https://www.medicalnewstoday.com/articles/321351.php

https://teens.webmd.com/boys/wet-dream-faq#1

तस्मात दृष्टांत हा काही कुणी देवाने दिलेला नसतो तर आपल्याच मनाचा स्वतःशी झालेला संवाद असतो.

@ज्योति अलवनि - निव्वळ नागडं शरीर असं मनात आणतानाच काहीतरी चूक वाटतं आपल्याला. त्याचा अश्लीलतेशी लगेच संबंध लावला जातो.
ही अक्षरशः फालतूगिरी आहे. आणि आपण मध्यमवर्गीय माणसं बरेचदा कुठल्याही गोष्टी "परंपरा" ह्या क्याटेगरीत टाकून लगेच स्वीकारून टाकतो.

निदान स्वतःचं निर्वस्त्र शरीर तरी न संकोचता स्वतःलाच केवळ एक शरीर म्हणून बघता आलं तरी सुरुवात म्हणून उत्तम आहे.

एमी's picture

5 Oct 2018 - 4:43 pm | एमी

आवडली.

शित्रेउमेश's picture

10 Oct 2018 - 9:20 am | शित्रेउमेश

बाबो काय भन्नाट लिवलय....