सारंगिया

मनमेघ's picture
मनमेघ in जे न देखे रवी...
6 Sep 2018 - 11:28 am

तुझ्यातला सारंगिया
माझ्या मागे सावलीसा
कधी माझ्याहून आर्त
कधी मूक अव्यक्तसा

कधी माझ्याबरोबर
सूर्यसा तू डोक्यावर
कधी माझ्याहून दुणा
जणू माझ्यातून उणा !

तुझ्यातल्या सारंगीचे
रंग, माझा मनःपट,
माझ्या सुरांचे कुंचले
ओथंबून काठोकाठ

विलंबित कधी द्रुत
श्वासनि:श्वासांची लय
मीट डोळे, पहा मन
तुझे माझे चित्रमय !

~ मनमेघ

कवितासारंगिया

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

6 Sep 2018 - 12:00 pm | चांदणे संदीप

मीट डोळे, पहा मन
तुझे माझे चित्रमय !

उत्तम रचना.

Sandy

मनमेघ's picture

6 Sep 2018 - 5:26 pm | मनमेघ

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

श्वेता२४'s picture

6 Sep 2018 - 5:38 pm | श्वेता२४

मन सारंगीमय झाले

मनमेघ's picture

7 Sep 2018 - 4:25 pm | मनमेघ

प्रतिसादाबद्दल आभारी आहे

राघव's picture

7 Sep 2018 - 4:35 pm | राघव

आवडले रे! :-)

जयंत कुलकर्णी's picture

8 Sep 2018 - 2:10 pm | जयंत कुलकर्णी

//तुझ्यातला सारंगिया
माझ्या मागे सावलीसा
कधी माझ्याहून आर्त
कधी मूक अव्यक्त////

गाण्याला सारंगीची साथ असावी असावी तर अशी. जीवनात साथ असावे तर अशी.
मनाला अत्यंत भावणारे काव्य. ज्याने सारंगी ऐकली आहे त्याला उमजावे याचे मोल....

मनमेघ's picture

12 Sep 2018 - 3:48 pm | मनमेघ

सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद _/\_