अज्ञानात सुख आहे

Primary tabs

मीउमेश's picture
मीउमेश in जनातलं, मनातलं
8 Aug 2018 - 1:21 pm

काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात माझी आजी या विषयावर एका टीव्ही कलाकारानं खूप छान लेख लिहिला होता. तो लेख वाचल्यावर आमचे एक नातेवाईक खूप प्रभावित झाले त्यांनी त्या लेखकाला ( टीव्ही कलाकाराला ) भेटण्याची इच्छा केली आणि मी ती भेट घडवून आणली.

जेव्हा त्या कलाकाराला त्या लेखा विषयी प्रश्न विचारले तेव्हा तो खूप बिचकाला , त्याच्या शारीरिक हालचाली वरून त्याने तो लेख लिहिला नव्हता असा माझ्या ध्यानात आले ( बॉडी लँग्वेज, संभाषण यांवरून लोकांना ओळखणं त्यांचं मूल्यमापन करणं हेच माझं काम असल्याने ) . त्या लेखाबद्दल चर्चा करताना त्या कलाकाराला सहज उत्तर देता येत नव्हती .

मला कमालीचं आश्चर्य वाटलं , माझ्या नातेवाईकांनी त्या कलाकारांशी बरीच इतर चर्चा केली , सेल्फी काढले. त्याच्या चेहऱ्यावर खूप समाधान दिसत होते . पण माझं समाधान झालं नाही उलट माझ्या मधला करमचंद जागृत झाला. मी खूप चिकित्सक वृत्तीने या प्रकरणाचा छडा काढायचा ठरवलं . माझ्या ओळखीतल्या काही लहान मोठ्या टीव्ही कलाकारांशी मी या बद्दल चर्चा केली आणि मिळालेली माहिती अशी कि

हे कलाकार किव्हा सेलिब्रिटीज यांनी केलेलं लेखन आपण वाचतो ते मुळात त्यांनी लिहीलेल नसतं , त्यासाठी त्यांनी PRO नेमलेले असतात जे त्यांच्या नावानी सेलिब्रिटीज चा फेसबुक , ट्विटर अकाउंट आणि या अशा लेखांच्या तत्सम जबाबदाऱ्या पार पाडत असतात.

अजून खोलात शिरल्यावर असं लक्ष्यात आलं कि हा PRO तर एक प्रकारचा व्यवसाय आहे, हे PRO चिक्कार पैसे कमावतात . आणि आपण हे असे लेख आणि या लोकांची वर्तमानपत्रातील सादरे आवर्जून वाचतो ... वाचत राहणार , फॉलो करणार

अज्ञानात सुख आहे हे उगाच नाही म्हणून गेले आपले पूर्वज

अनुभवविनोद

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

8 Aug 2018 - 1:32 pm | कपिलमुनी

चांगला धंदा आहे . मराठी माणसांनी लौकर सुरु करावा .
नैतर PRO गुज्जु ची आणि आपन फक्त तिथे नोकरी करणार असे नको.

ट्रम्प's picture

8 Aug 2018 - 4:32 pm | ट्रम्प

आरे वा !!!!
लैच महत्वाचे माणूस आहात आपण . तेव्हढं त्ये पप्पू पंतप्रधान व्हवू शकतो का न्हाय ते सांगा ना .

अभ्या..'s picture

8 Aug 2018 - 7:51 pm | अभ्या..

अरे, त्यात काय एवढे?
इथे मिपावर कितीतरी पीआरओ आहेत. इमेज मेकिंग अगदी शिस्तीत लिहितात.

ज्योति अलवनि's picture

10 Aug 2018 - 1:36 pm | ज्योति अलवनि

खरच आपण मात्र त्या कलाकारानेच लिहिलं आहे असं समजून वाचत असतो. किती ही सामान्य वाचकांची फसवणूक! आणि आता हे कळल्यावर प्रत्येक लेखाकडे संशयित नजरेने बघितलं जाईल. म्हणजे त्या कलाकाराने प्रामाणिकपणे लिहिलं असेल त्याच्यावर अन्याय

रंगीला रतन's picture

10 Aug 2018 - 5:11 pm | रंगीला रतन

घोस्ट रायटिंग! बर्याच वर्षापासून सर्रास चालू आहेत हे प्रकार!

सुबोध खरे's picture

10 Aug 2018 - 8:36 pm | सुबोध खरे

हायला

हे तर लै जुनं आहे

पी एच डी चे थिसीस सुद्धा लिहुन मिळ्तात.

इतके राजकारणी पी एच डी, डी लिट कसे काय होतात याचं हे उत्तर आहे.

बऱ्याच पी एच डी च्या प्रबंधाच्या अगोदर अदृश्य शाईने हे हि लिहिलेले असते कि वरील संशोधन हे कल्पनेचा अफाट विस्तार असून त्याचा सत्याशी कोणताही संबंध नाही आणि चुकून कोणाला त्याचा वास्तवाशी संबंध आढळला तर तो केवळ योगायोग आहे आणि लेखक त्याला जबाबदार नाही.