सांगा निबंध कुणी हा पाहिला

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
6 Aug 2018 - 8:37 pm

सांगा निबंध कुणी हा पाहिला

आज दंतवैद्या कड़े बसलो होतो. साधारण दोन तासांची निश्चिन्ती. दंतवैद्याचा मुलगा साधारण सातवीत असावा.शाळा आय सी इस सी . मास्तरानी गृहपाठ दिलेय होता. चार विषयावर निबंध लिहायचे होते. आमच्या पीढ़ित निबंध लिहीताना ठराविक सुरुवात असायची. आणि शेवटी नेहमी प्रमाणे "अशे हे मामा मला खुप खुप आवडतात" किंवा निबंध गांडूळ वर असेल तर " असे है गांडूळ मला खुप खुप आवडते" किंवा अशे है गाढव मला खुप खुप आवडत असा संपक असायचा. मध्ये मध्ये वरणावर तूप सोडतात तशी सुवचने सोडायची किंवा मोदकात सारण पेरायच तस प्रसिद्ध लेखकांची नावे पेरायची. मधे काहीही लिहील तरी चालायचे. मार्क 10 पैकी 5 मिळत. परीक्षेत निबंध है थोड़े भारी प्रकरण असायची. विषय भ्रष्टाचाराचा भस्मासुर किंवा माझा आवडता प्राणी किंवा नेता ( द्विरुक्ती) असे असायचे. त मौजून आठ ओळ मध्ये पूर्ण व्हायचे. सुभाषीत / सुवचने अजिबात आठवायाची नाहीत. मग टी व्ही वर पाहीलेलेली महाभारतातली "यंदा यंदा ही अधर मत्स्य ग्लानीर भवतु भारत " अस काही बाही लिहूँन यायचो.

है तस म्हटलं तर बरच विषयांतर झाल.दंतवैद्याला कुणी सभ्य सैतान गृहस्थाने ह्याच एक पुस्तक आले आहे अशी आठवण करून दिली. मला पुढचा धोका दिसत होता पण आजचा दिवस भयानक होता. दंतवैद्याने मला मुलासाठी निबंध लिहून देण्याचे निमंत्रण दिले. मला कोरा कागद आणि लेखणी देण्यात आली. भोवती सगळी मंडळी घोळका करुन बसली. काही सूचते आहे का , किती वेळ लागेल अशी विचारणा सुरू झाली. झाल की सांगा इतकयाही सूचना देण्यात आल्या. मला अगदी शौच कुपात बसल्याच फिलींग आल. सुरुवात केल्यावर थोडास विनोदी लिहा हा अशी सूचना करण्यात आली. डोक्यात तीडीक गेली. वाटल पेन घालून त्या कागदाची सुरळी करावी आणि आणि असो.

पण पण आज काही म्हणजे अगदी शिव्या सुद्धा सूचत नहवत्या. शेवटी आम्ही शाळेत म्हटलेल्या " वे डा त मराठे वीर दौडले सात" गाण्या च्या पंक्तिनी सुरुवात केली. तीतक्यात वार्याने कागद उडाला आणि आठवे नववें आणि दहावे वेडे तो कागद आणायला धावले आणि मी प्रतापराव गुर्जरा सारखा महाराजांच्या ख़लीत्याची म्हणजे कागदाची वाट बघत बसलो. शेवटी नाही नाही हो हो म्ह णु न निबंध कसा बसा पूर्ण केला. तो त्या दंतावैद्याच्या होतकरु मुलाने कॉपी पेस्ट केला. आणि मी तेथून काढता दांत घेतला. निबंध फसला का बसला ते कळायला मार्ग नाही कारण परत तिथे फिरकलो नाही. परत निबंध कोण लिहीणार हो. तर अशी ही निबंधाची गाथा. तर असा हा निबंध मला खुप खुप आवडतो ( हे मात्र असच निबंध पूर्ण करायला आणि हो 10 पैकी 5 मार्क मिळवायला)

केदार अनंत साखरदांडे

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

ट्रम्प's picture

6 Aug 2018 - 10:31 pm | ट्रम्प

छान विनोदी लिहलय !!!!!
पण !! शेवट खूप लवकर आणला अस वाटतंय .

पिवळा डांबिस's picture

7 Aug 2018 - 1:15 am | पिवळा डांबिस

यंदा यंदा ही अधर मत्स्य ग्लानीर भवतु भारत

क्या बात है! =))

नावातकायआहे's picture

7 Aug 2018 - 5:20 am | नावातकायआहे

मस्त ...

योगी९००'s picture

7 Aug 2018 - 11:05 am | योगी९००

मस्त..खूपच छान..!!

थोडा लवकर संपवलाय...निबंधातला काही भाग दिला असता तर अजून मजा आली असती.

जेम्स वांड's picture

7 Aug 2018 - 11:53 am | जेम्स वांड

पावणं लैच मजेदार लिहिताय की हो तुम्ही, अजून थोडं वाढवायला हवा पुढे अजून हसवा, खूप खूप शुभेच्छा

विषय भ्रष्टाचाराचा भस्मासुर किंवा माझा आवडता प्राणी किंवा नेता ( द्विरुक्ती) असे असायचे. त मौजून आठ ओळ मध्ये पूर्ण व्हायचे. सुभाषीत / सुवचने अजिबात आठवायाची नाहीत. मग टी व्ही वर पाहीलेलेली महाभारतातली "यंदा यंदा ही अधर मत्स्य ग्लानीर भवतु भारत " अस काही बाही लिहूँन यायचो.

अनिंद्य's picture

7 Aug 2018 - 5:13 pm | अनिंद्य

@ केदार,

५ नाही हो, निबंधाला १० पैकी १० मार्क :-)

पंचेस मस्त आहेत. त्या 'सभ्य सैतान गृहस्थाने' तुमच्याकडून अजून निबंध लिहून घ्यावेत आणि ते तुम्ही इथे मिपावर प्रकाशित करावेत अश्या शुभेच्छा :-)

अनिंद्य

ज्योति अळवणी's picture

7 Aug 2018 - 6:33 pm | ज्योति अळवणी

मजा आली. छान लिहिला आहे

पण दंतवैद्याचा तुमच्यावरच का दात होता?
याची कारणे द्या.
१) मागच्या वेळी तुम्ही कुठे काम करता हे त्याने विचारले होते ( आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी) तेव्हा तुम्ही नको ती एक्स्ट्र्रा माहिती दिलीत./
२) त्याने तुम्हाला पेपरातला अग्रलेख वाचताना पाहिले होते./
३)तुमचा नंबर शेवटी होता.

भन्नाट! थोडक्यात आवरले, ते काही पटलं नाही बुवा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Aug 2018 - 8:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =))

"यंदा यंदा ही अधर मत्स्य ग्लानीर भवतु भारत" एक नंबर !

अरे तो नीबंध पण टायपायचा ना...

जव्हेरगंज's picture

7 Aug 2018 - 10:55 pm | जव्हेरगंज

=))

रातराणी's picture

8 Aug 2018 - 4:18 am | रातराणी

भारी!

९/१० शेरा: निबंध ८ ओळींचा न झाल्याने १ मार्क कापलाय. :)