सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

भारांच्या जगात... २

Primary tabs

अजिंक्य विश्वास's picture
अजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं
1 Aug 2018 - 11:28 pm

भटांच्या वाड्यातील भुतावळ- भा. रा. भागवत

भटांच्या वाड्यातील भुतावळ

भूत म्हणले की, आजपण आपले कान टवकारले जातात. ह्या भुतावळीचे नाव वाचल्यावर माझे देखील तसेच झाले होते. कारण भूतकथा ह्या माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय (त्याबद्दल नंतर कधीतरी सविस्तर)
पण ही भुतावळ हातात घेतली आणि घाबरण्यापलीकडे जाऊन एका उबदार अश्या अनुभवाला जाऊन पोहोचलो.
हे पुस्तक वास्तविक म्हणजे चार्ल्स् डिकन्सच्या क्लासिक ' ए ख्रिसमस कॅरोल'चे स्वैर रुपांतरीत रुपडे आहे. मूळ ख्रिसमसऐवजी त्याला आपल्या मराठमोळ्या दिवाळीचे अलंकार चढवले आहेत, पण मूळ गाभ्याला धक्का न लावता!

भन्नाटपुरात ऐन दिवाळी आली असता चिटको पिटको आणि कंपनी मध्ये हयात असलेले चिटको शेठ मात्र दिवाळीला नावे ठेवत आपल्या हाताखालील कारकुनाला दिवाळीची सुट्टी न देता कामाला यायला सांगतात. आपल्या भाच्यालादेखील लागट बोलून घालवतात. देणगी मागायला आलेल्या माणसांनासुद्धा रिकाम्या हातात परत पाठवतात. आजन्म ब्रह्मचारी असलेले चिटको शेठ संध्याकाळच्या वेळेत, कित्येक वर्षांत पडली नव्हती एवढ्या थंडीत आणि धुक्यात आपली आकडेमोड संपवून बाहेर निघतात.
दिवाळीचे मंगलमय वातावरण ओलांडून, दिव्यांची रोषणाई न पाहता, फटाक्य़ांच्या आतशबाजीकडे दुर्लक्ष करत आणि चिल्ल्या-पिल्ल्यांच्या नावाने बोटे मोडत ते गर्द झाडांच्या वाडीत एका पेशवाईतल्या पण आता बदनाम झालेल्या इनामदार भटांच्या कुप्रसिद्ध वाड्यात म्हणजेच आपल्या स्वर्गवासी (?) झालेल्या पिटको शेठच्या विकत घेतलेल्या वाड्यात येतात. घरच्या अंधारात जेवण करून झोपायला खोलीत येतात आणि अचानक त्यांना भूत दिसते...
नक्की कशाचे भूत असते. आणि नुसते भूत नाही तर ती भुतावळ असते. बोलणारी... सांगणारी... आपला भूत- वर्तमान आणि भविष्यदेखील जाणणारी!
पुढचे जाणून घेण्यासाठी ह्या भुतावळीच्या कह्यात जाण्याशिवाय मार्गच उरत नाही.

ह्या कादंबरीतील भूते अंगावर तर येतातच पण घाबरवून ना सोडता आपल्या विचारमग्न बनवतात आणि अंतर्मुख देखील!
मूळ १८४३च्या डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झालेली लघुकादंबरी आपले लाघव का जपून आहे , हे ह्या पुस्तकामुळे समजते आणि तेसुद्धा भारांच्या खास शैलीत!
हा अनुभव घेणे , एकदा तरी अनिवार्य!
(जाता जाता- जमल्यास ' ए ख्रिसमस कॅरोल' नावाचा जिम कॅरी याचा २००९ मधला अॅनिमेशनपट देखील पाहा. व्हीक्टोरियन काळातील त्या समाजाची आणि व्यवहारांची माहिती तो चोख आणि उत्कृष्ट पद्धतीने देताना मूळ कादंबरीलाही न्याय देतो.)
धन्यवाद

वाङ्मयकथाबालकथाआस्वादलेखमाहितीसंदर्भमदत