लाख अंतरे..

आकाश५०८९'s picture
आकाश५०८९ in जे न देखे रवी...
24 Jul 2018 - 1:50 pm

लाख अंतरे अन्‌ अंतरी तू
ऐलतिरी मी, पैलतिरी तू

म्हणाली विलग होता ओठ हे
झाले कॄष्ण मी, हो बासरी तू

आकाश.........

लाख अंतरे

कविता

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

24 Jul 2018 - 3:12 pm | पद्मावति

सुरेख!

श्वेता२४'s picture

24 Jul 2018 - 4:21 pm | श्वेता२४

म्हणाली विलग ऐवजी म्हणाले विलग पाहिजे का

आकाश५०८९'s picture

10 May 2019 - 11:20 am | आकाश५०८९

बासरी वाजवून झाल्यानंतर कृष्णाच्या ओठांपासून दूर होताना बासरी कृष्णाला म्हणते, मी कृष्ण झाले आहे, आता तू बासरी होऊन पाहा. म्हणजे तुला कळेल की, अंतरात असूनही अंतरण्याचं दु:ख काय असतं. अद्वैत असूनही द्वैत स्वीकारण्याचं दु:ख काय असतं. असा काहीसा भाव मांडण्याचा प्रयत्न होता. चुकल्यास क्षमा असावी...

प्रमोद देर्देकर's picture

24 Jul 2018 - 7:26 pm | प्रमोद देर्देकर

आणि झाले कृष्ण ऐवजी झालो पाहिजे का ?
छान आहे चारोळी.

आकाश५०८९'s picture

10 May 2019 - 11:21 am | आकाश५०८९

बासरी वाजवून झाल्यानंतर कृष्णाच्या ओठांपासून दूर होताना बासरी कृष्णाला म्हणते, मी कृष्ण झाले आहे, आता तू बासरी होऊन पाहा. म्हणजे तुला कळेल की, अंतरात असूनही अंतरण्याचं दु:ख काय असतं. अद्वैत असूनही द्वैत स्वीकारण्याचं दु:ख काय असतं. असा काहीसा भाव मांडण्याचा प्रयत्न होता. चुकल्यास क्षमा असावी...

अभ्या..'s picture

10 May 2019 - 11:33 am | अभ्या..

अजून दोनेक महिने थांबला असतात तर कवितेच्या वाढदिवसालाच नसता का आला, तेवढेच केक बिक कापला असता.

अभ्या..'s picture

10 May 2019 - 11:34 am | अभ्या..

अजून दोनेक महिने थांबला असतात तर कवितेच्या वाढदिवसालाच नसता का आला, तेवढेच केक बिक कापला असता.