भिडे गुरुजींना झालंय काय ?

Primary tabs

सोमनाथ खांदवे's picture
सोमनाथ खांदवे in काथ्याकूट
9 Jul 2018 - 6:49 pm
गाभा: 

भिडे गुरुजींनी शिवप्रतिष्ठान संस्थेच्या अंतर्गत खेडेगावात शेकडो सभा घेऊन शिवप्रेमी निर्माण करण्याचे सतत कार्य केले . त्यांच्या एका सभेला मी सुद्धा उपस्थीत होतो , वक्तृत्व कौशल्य नसले तरी त्यांनी संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकोटांचे महत्व वाढवण्यासाठी घालवले असल्या मूळे हजर असलेल्या प्रत्येक जण भिडे गुरुजींना मनोमन नतमस्तक होत असतो .

अशा आदरणीय सुशक्षित माणसाला अचानक काय झालंय हे समजेनासे झाले आहे , काही दिवसांपूर्वी त्यांनी " आमच्या बागेतील आंबे खाल्ल्याने मुलं होतात " असे वादग्रस्त वक्तव्य केले . त्याचा धुराळा बसण्या अगोदरच " संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता " असे दुसरे वादग्रस्त वक्तव्य भिडे गुरुजींनी केले आहे . त्यामूळे विधानसभेत मुख्यमंत्री साहेबांना कारवाई करण्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले .

कोरेगाव भीमा च्या प्रकरणांत पोलीस दप्तरी भिडे गुरुजींनी चे नाव असतांना अशी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतः च्या समोरील अडचणी का वाढवत आहेत ?

प्रतिक्रिया

भिडे गुरुजी आहेत तिथेच आहेत , मीडियाला झालय तरी काय हे विचारलं पाहिजे . हे साले कधी कुणाला कुठे नेऊन ठेवतील, त्याच गणित टी आर पी वर अवलंबून असते .. कधी बलात्कार अश्या ठिकाणी नेऊन ठेवतात कि आपल्याला आपणच षंढ वाटायला लागतो , कधी लहान मुलांवरील अत्याचार, कधी अजून काही .. हे सर्व त्यांचं वेगळाच गणित असत .. एकदम आपल्या डोक्याबाहेरच

सिद्धेश्वर विलास पाटणकर

दुर्गविहारी's picture

9 Jul 2018 - 8:44 pm | दुर्गविहारी

मलाही हाच प्रश्न पडलाय. पण जोपर्यंत पुर्ण व्हिडीओ आपण पहात आणि एकत नाही तोपर्यंत या विषयावर मत व्यक्त करणे घाईचे ठरेल. एकतर पहिले आंब्याच्या संदर्भातील वक्तव्य चु़किच्या पध्दतीने पसरवले असावे असे वाटते. एकतर भिडे गुरुजींची स्वताची अशी फार प्रॉपर्टी नाही. त्यांचे शेत असावे असे वाटत नाही आणि मुख्य म्हणजे नाशिकची ती सभा फेसबुक लईव्ह केली होती असा शिवप्रतिष्ठानचा दावा आहे. तेव्हा सत्य काय ते बाहेर यायलाच पाहिजे.
दुसरा मुध्दा भिमा-कोरेगाव प्रकरणाचा. इथे भिडे गुरुजी उपस्थित होते याचा कोणताही पुरावा नाही. मुळात राज्यात असलेल्या स्थिर सरकारला आणि मुख्य म्हणजे फडणविसांना त्रास देण्यासाठी अनेक मुद्दे काढले जात आहेत, त्यापैकी हा प्रकार असावा.
तेव्हा जंगली महाराज मंदिरातील त्यांच्या पुर्ण भाषणाचा व्हिडीओ एकेपर्यंत तरी मी मत बनवणार नाही.

पिलीयन रायडर's picture

9 Jul 2018 - 8:51 pm | पिलीयन रायडर

कुणाच्या तरी वॉल वर मी आंब्याचा व्हिडीओ पाहिलाय. आणि ते खरंच तसं बोललेत. कुठे पाहिलंय आठवत नाहीये पण मी शोधायचा प्रयत्न करते. त्यात "आंबा खाऊन मूल होतं, मुलगा हवा असेल तर मुलगा होतो" असं स्पष्ट विधान आहे. व्हिडीओ एडिटेड वाटला नाही. कारण केमेरा त्यांच्यावरच आहे. आवाजही त्यांचाच आहे.

शब्दबम्बाळ's picture

9 Jul 2018 - 10:06 pm | शब्दबम्बाळ

नशीब शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारला आणि त्याचे लेखी पुरावे मागे ठेवले नाही तर त्याला मारण्यापूर्वी शेवटचे जे पत्र त्यांनी लिहिले होते ज्यात ते म्हणाले होते की मी तुम्हाला घाबरलो आहे आणि तुम्ही मला पितृतुल्य आहात त्यावरून तेवढेच पत्र उचलून लोकांनी इतिहास लिहिला असता की अफजल खानाला शिवाजी महाराज वडिलांप्रमाणे मानत होते. भिडे गुरुजी जर असे म्हणाले की मला एक जण म्हणाला आणि पुढे काही वाक्य बोलले तर ते गुरुजींचे वाक्य कसे काय ठरेल ?

पिलीयन रायडर's picture

10 Jul 2018 - 5:36 pm | पिलीयन रायडर

दासबोध काका, एकसाईट होऊ नका. मी ह्या वर दिलेल्या व्हिडीओ बद्दलच बोलतेय आणि मी तेवढंच बोललेय. कुठे तरी अशी चर्चा होती की गुरुजी असं बोललेच नाही. तर तसे विधान मी व्हिडीओ मध्ये पाहिले आहे इतकेच माझे म्हणणे. मला त्यांच्याविषयी राग लोभ काहीही नाही. जे सत्य असेल तितकेच समोर यावे. मला त्यांची बोलायची स्टाईलही माहिती नाही. पुढे मागे काहीही विधान केलं तरी त्यांनी ज्या श्रद्धेने हे विधान केले आहे ते बघून आश्चर्य वाटलं. मग भले त्यांनी पुढे उपमा अलंकार वापरून काही वेगळा विषय मांडला असेल. पण त्यांना ते आंब्याचं पटलं आहे हे दिसतंय. आणि मला ते विनोदी वाटतं.

सोमनाथ खांदवे's picture

9 Jul 2018 - 9:17 pm | सोमनाथ खांदवे

खिलजी साहेब , जाणत्या लोकांनी धूर येऊ न देण्याची काळजी घ्यायची असते . थोडासा सुद्धा निष्काळजीपणा झाला तर मीडिया तयार आहेच आगडोंब उसळवायला .
ज्या वेळेस एखादी व्यक्ती असामान्य कार्य करून
सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण करते त्यानंतर ते स्थान टिकवणे त्या व्यक्तीच्याच हातात असते . आपले विचार , आचरण ठीक असेल तर पोलीसांनी दबावाखाली कितीही केस टाकल्या तरी सामान्य माणूस पाठीमागे खंदा समर्थका सारखा उभा राहू शकतो . अशा वक्तव्या मूळे समर्थक झपाट्याने कमी होऊन अण्णा हजारे चीं पुनरावृत्ती होण्याची शक्यता वाटत आहे.

संभाजी भिडें विरोधात संभाजी ब्रिगेडकडून पोलिसांकडे तक्रार
https://www.loksatta.com/maharashtra-news/sambhaji-brigade-has-filed-com...
Shared via Loksatta Android App

माहितगार's picture

9 Jul 2018 - 11:11 pm | माहितगार

दोन एक वर्षापुर्वी पर्यंत मी त्यांचे नाव सुद्धा ऐकले नसेल - माझ्या अज्ञाना बद्दल क्षमस्व. अशात युट्यूब वरुन जी काही थोडीफार भाषणे (की प्रवचने?) अभ्यासण्याचा प्रयत्न केला त्यावरुन माझी धारणा पुढील प्रमाणे झाली.

आजचा तरुण तसा पुरेसा सुशिक्षीत असावा, संभाजी भिडेचा अनुयायी वर्गासही त्यांच्या मर्यादा सहज लक्षात येण्याची शक्यता वाटते. त्यामुळे संभाजी भिडे काही बोलले म्हणून तरुण वाहून गेले अशी शक्यता त्यांच्या युट्यूबवर उपलब्ध भाषणे पाहून तरी कमी वाटते. (माझ व्यक्तीगत मत)

त्यांच्या प्रवचनातील बरेचसे संदर्भ जुने झाले असून अद्ययावत होण्याचे बाकी असावेत , त्यांच्या कार्य, कार्यशैली आणि वय पहाता त्यांच्या भूमिकांना अद्ययावत तर्कसुसंगत होण्याची संधी ही कमी असेल.

त्यांच्या भाषणात दिशेचा आव असला तरी आजच्या काळासाठी प्रत्यक्ष व्यवहारात अमलात आणता येतील अशा नेमक्या दिशांचा अभाव वाटतो. तरुणांच्या एका वैचारीक-गटास संघटन आणि दिशा सांगू शकणार्‍या कळकळ असलेळ्या, प्रेरणादायी प्रचारक प्रवचनकाराची मानसिक पोकळी भासत असावी - जी संभाजी भिडेंमुळे भरुन निघत असावी. त्यांचे मर्यादीत परिघातील पुर्वाश्रमी परंपरावदी वाचन आणि मनन राहीले असावे, -जे आधूनिक काळास जुळेलच असे नाही -तत्वज्ञानाच्या लेव्हलवर स्वतःचे नवे विचार फारसे नसावेत -पण संघटन कार्यात झोकून दिलेल्यांचे जे होते तसे लेखन आणि इतर विचारांचे वाचन संवाद कमी होत असल्याने प्रगल्भतेस मर्यदा पडत असाव्यात.

महाराष्ट्रातील एकुण किर्तनकार आणि प्रचारकांची संख्या पाचेक हजार तरी असेल यातील हजार अधिक सक्रीय धरले तरी त्यातील मूठबर उच्च विद्या विभूषित सोडले तर उर्वरीतांची एकुण श्रद्धा-अंधश्रद्धा परंपरवाद हा संभाजी भिडेंपेक्षा वेगळा असण्याची शक्यता कमी असावी. त्यांनी स्वतःस धारकरी म्हणवून घेणे आणि पश्चिम महाराष्त्रात थोडाफार तरुण अनुयायी वर्ग मिळणे , (प्रत्यक्ष उपद्रव क्षमते बद्दल किंवा खरी धार असण्याबद्दल केवळ साशंकताच असलेली) जराशी टोकाची कललेली भाषा ज्याचा माध्यमांना गाजावाजासाठी उपयोग करुन घेता येऊ शकतो असे स्वरुप दिसते आहे.

भाषणांमध्ये कललेली टोके पुन्हा पुन्हा उठून दिसत असली तरी आता पर्यंत अभ्यासलेल्या चार-सहा व्हिडीआँवरुन तरी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यापलिकडे जाऊन कायद्यांचे उल्लंघन होत असण्याची मोठी शक्यता नसावी. त्यांच्यावर गरजे पेक्षा अधिक फोकस करण्याने केवळ राजकीय धृवीकरण करु इच्छिणार्‍यांच्या आपमतलबा पलिकडे काय हशिल होऊ शकेल या बाबत साशंकता वाटते.

मार्कस ऑरेलियस's picture

10 Jul 2018 - 12:52 am | मार्कस ऑरेलियस

भिडे गुरुजी सध्या तरी एकदम ट्रेंडिंग टॉपिक आहेत =))))
भिडे गुरुजी न्युज असा एखादा युट्युब चॅनेल काढला तर वर्शाभरात मिलियन सबस्क्राईबर्स घेईल ह्यात शंका नाही =))))

बाकी भिडेगुरुजींचे विडिओ पाहिले आहेत ! एकदमच बाळबोध श्रध्दाळु हिंदुंचे प्रतिनिधित्व करताहेत असे वाटते ! ते बत्तीस मण सोन्याचे सिंहासन वगैरे ऐकुन तर हसुच येते ! इम्प्रॅक्टिकॅलिटीचा कळस झाला ! आज्च्या घडीला खुद्द थोरले महाराजसाहेब असते तर ते ही हसले असते ह्यावर.
काय दुनिया कोठे चालली आपण कोठे चाललोय ? गोल्ड सँडर्ड हटवुन जमाना झाला , आता तर फियाट करंसी चा ही जमाना संपत आलाय ! बिटकॉईन्स चे सिंहासन करा म्हणावं !
इकडे दुनिया आय.वी.एफ , स्पर्म डोनेशन , एग्ग प्रिझर्वेशन , सरोगसी मार्केट बिझनेस च्या पुढे गेली अन आमच्याकडे अजुनही आंबे खाऊन पोरं होत आहेत =))))

पण असो. भिडे गुरुजींना दोष देता येणार नाही , वयाचा दोष आहे , ते अजुनही १९७० -८० च्या दशकात जगत आहेत असे वाटते . पण त्यांना मिळाणारा तरुणांचा पाठिंबा आश्चर्यकारक आहे. खरंच हिंदु आजही इतके बाळबोध , भोळे भाबडे आहेत का ?
छ्या , फारच निराशाजनक आहे हे असे असेल तर ! कोणीतरी मनावर घेवुन ही असली बाळबोधी #जपहोश्याम टाईप भोंगळ हिंदुत्वाची जळमटं काढुन परत एकदा खणाखणीत प्रॅक्टिकल सनातनी हिंदु धर्माला वर काढलं पाहिजे ! पोरं होत नसतील तर एकवेळ नियोग करा पण आंबे नको . =))))

पण असो. भिडे गुरुजी " भारत तेरे टुकडे होंगे इन्शाला इनशाला " असे म्हणात नाहीत तोपर्यंत तरी हे असले बाळबोध क्लेम्स चालवुन घ्यावे लागणार आहे असे दिसते.

अवांतर : आमच्या घरातल्या झाडाच्या कैर्‍या पोरं चोरुन नेतात , ते थांबवण्यासाठी झाडावर आता मी ही " हे आंबे खाल्ले कि पोरं होतात " अशी टुम सोडावी की काय असा विचार करत आहे !

माहितगार's picture

10 Jul 2018 - 8:22 am | माहितगार

अवांतर : आमच्या घरातल्या झाडाच्या कैर्‍या पोरं चोरुन नेतात , ते थांबवण्यासाठी झाडावर आता मी ही " हे आंबे खाल्ले कि पोरं होतात " अशी टुम सोडावी की काय असा विचार करत आहे !

तुम्ही आंबे तोडून मार्केट रेट पेक्षा जास्त भावानी विकणार असाल आणि त्यासाठी स्वतः अधिकृत टूम म्हणजे सं.भि. गुरुजी टाईप जाहीरात करणार असाल तर कायदा हातात घेऊन सं . ब्रि. तुमच्या मागे लागू शकते :) (ह.घ्या. हे वे सा न ल)

...पण त्यांना मिळाणारा तरुणांचा पाठिंबा आश्चर्यकारक आहे. खरंच हिंदु आजही इतके बाळबोध , भोळे भाबडे आहेत का ?

भाबडेपणाची शक्यता कमी वाटते पण त्यातले काही सश्रद्धेने भोळे झालेले आणि अगदी बाळबोधही असू शकतात . पण तो महत्वाचा प्रश्न नाहीए, शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतलेल्या अँग्री यंग तरुणाईला धाडसाची भाषा हवी असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे पाठीशी काही तरुण मंडळी मिळणे आश्चर्याचे वाटत नाही,

त्या शिवाय वरवर मतपेटीसाठी लांगूलचालन केले तरी काँग्रेसी-राष्ट्रवादीगट आतून सॉलीड परंपरावादी असू शकतात, त्यात लोकसंख्या वाढल्यामुळे राजकीय महत्वाकांक्षा असल्यामुळे कुटूंबात काँग्रेसची पार्श्वभूमी असली तरी स्वतःचे वेगळे राजकीय घोडे दामटण्यासाठी
भाजपा सोडून द्या काँग्रेसी-राष्ट्रवादीगटातूनही पडद्या आडून मदत पोहोचवली जाणार नाही असे नसावे - पडद्या मागच्या दुहेरी खेळीत काँग्रेसी तसे वाकबगार असतात - संभाजी भिडे राजकारण करण्यात इच्छूक असोत अथवा नसोत- असा अंदाज वाटतो.

मार्कस ऑरेलियस's picture

10 Jul 2018 - 8:38 am | मार्कस ऑरेलियस

+१

पडद्या मागच्या दुहेरी खेळीत

मीही थोडेसे स्पष्टीकरण देणारच होतो. भिडे गुरुजींच्या भाषाणाचे जमतील तितके विडीयो शोधुन पाहिले , युट्युबवरही जितके मिळाले ते नीट पाहीले,
बहुतांश सारेच व्हिडीओ अर्धवट आहेत . एकही संपुर्ण व्हिडीओ मला तरी अजुन सापडलेला नाही. भिडे गुरुजींच्या अनुयायांपैकी " चौगुले" नावाच्या एका व्यक्तींने देखील गुरुजींचे व्हिडीयो अर्धवट दाखवुन आणि सिलेक्टीव्ह अर्थ काढुन अपप्रचार केला जात आहे असे विधान केले आहे !

तस्मात मी माझ्या वरील प्रतिसादाबाबत जरा माघारच घेत आहे . जोवर संपुर्ण व्हिडीओ पहायला मिळत नाही तोवर काहीही कॉमेन्ट करणे योग्य नाही !

कादाचित हा देखील "जळगाव जोशी कांडा"सारखा फुसका बार निघु शकतो !

पण बाकी ते ३२ मणाचे सिंहासन हा प्रचार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे आणि तो बाळबोध पणाअच आहे ह्या मतावर मात्र ठाम आहे !
एवढी जर प्रसिध्दी आहे तर ३२ मण सिंहासन करण्यापेक्षा ३२ मिलियन हिंदुंना रोजगाराच्या संधी उपलब्ध्द करुन द्या , हिंदुत्वाचं प्रदर्शन एका रायगडावर का ? ३२ जिल्ह्यात रायगड तयार करुन दाखवा - आमचे सनातनी हिंदुत्व सांगते !

सोमनाथ खांदवे's picture

10 Jul 2018 - 10:39 am | सोमनाथ खांदवे

आता पर्यंत एका ही वक्तव्यावरून गुरुजींनी घुमजाव केलेले नाही असे असताना ' चौघुले ' , मार्कस किंवा माझ्या सहित इतर मिपाकरांनीं ते व्हिडिओ अर्धवट आहेत असं प्रमाणापत्र देऊन काय उपयोग ?
आपण किती ही गुरुजी चें लटके समर्थन करत बसलो तरी , विरोधी पक्षांना चघळायला विषय भाजप आणि भाजपचे समर्थक देतात हे सत्य आहे . सध्या गुरूजी ची वक्तव्य तर गेले तीन चार वर्षे देशपातळीवरील साक्षी महाराज, उमाभारती, शत्रुघ्न आणि यशवंत सिन्हा यांचे बोलने सुध्दा वादग्रस्त होते . आता 2019 मध्ये पुन्हा मोदीलाटे मूळे भाजप बहुमताने निवडुन येण्याची शक्यता कमी असताना इतरांनी विनाकारण शंख वाजवत बसू नये .
ताजी बातमी - बहुचर्चित डी एस के प्रकरणात मराठे च्या जामिनावर मुंबईतील प्रज्ञा सावंत आणि श्रीधर ग्रामोपाध्ये यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली .

जेम्स वांड's picture

10 Jul 2018 - 4:08 pm | जेम्स वांड

आवडला प्रतिसाद सोमनाथ भाऊ!

मार्कस ऑरेलियस's picture

10 Jul 2018 - 5:32 pm | मार्कस ऑरेलियस

गुरुजी चें लटके समर्थन

आर यु किडिंग मी ????

मी कुठेच गुरुजींचे समर्थन केलेले नाहीये आणि कसलेही प्रमाणापत्र दिलेले नाहीये , उलट ते बाळबोध , इम्प्रॅक्टिकल बोलतात्त , त्यांचे हिंदुत्व ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊ आहे अशी खिल्लीच उडवली आहे त्यांच्या विचारसरणीची.
मात्र जेव्हा त्यांच्या व्हिडीओतले मुद्दे अर्धवट उचलुन वापरल्याचे दिसले तेव्हा " संपुर्ण व्हिडीयो पाहिल्या शिवाय काहीही मत बनवणे चुक आहे" असा मी सावध पवित्रा घेतला आहे ! कारण स्वयंघोषित पुरोगाम्यांसारखे तोंडावर पडाणे चांगले नव्हे !

संपुर्ण व्हिडीयो पाहुन बोलुयात .

सोमनाथ खांदवे's picture

10 Jul 2018 - 6:13 pm | सोमनाथ खांदवे

कै नै वो तयार चिमटा काढयची हुक्की आली व्हती !!!!

फारएन्ड's picture

10 Jul 2018 - 2:46 am | फारएन्ड

भिडे गुरूजींच्या क्लिप्स यावर्षी कोरेगाव भीमा नंतर काही पाहिल्या. ते ७०-८० वर्षांचे आहेत आणि अजून थोड्या जुन्या काळात आहेत असे दिसते. ते म्हणजे काही रॅशनल, लिबरल विचारांचे प्रतिनिधी नव्हेत.

पण ते जे म्हंटले ते हास्यास्पद असणे, त्याच्याशी कोणीही सहमत नसले तरी अगदी त्या मनू बद्दलच्या वक्तव्यांवर "कारवाई" ची मागणी कोणत्या कायद्याखाली करणार? असे काय आहे त्यात?

बाकी त्यांनी कोरेगाव भीमा मधे तरूणांना फूस वगैरे लावली का यावर अजून कोणताही पुरावा बाहेर आलेला दिसत नाही. जेथे कोणत्याही गोष्टीच्या असंख्य क्लिप्स युट्यूब वर एका दिवसांत येतात तेथेही अजून कसलीही क्लिप नाही. गावकर्‍यांच्या मुलाखतींमधेही कसलाही उल्लेख नाही. त्यांनी काही केले असेल तर करा कारवाई पण इथे गेले ६ महिने मीडिया ट्रायल ऑलरेडी झालेली आहे.

या माणसाची चिथावणी घेऊन लोक दंगा करतात म्हणणे हेसुध्दा हास्यास्पद वाटतं.

मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांनी मनूचे आणि मनुस्मृतीचे समर्थन करण्याची ही पहिली वेळ नाही. अस्पृश्यता, स्त्री-दुय्यमत्व आणि जात्यंधतेसारख्या भयानक प्रथांचा ज्यांना तिरस्कार वाटतो त्यांना मनुस्मृतीची भलामण करण्याच्या प्रकारांचा निषेध करायलाच पाहिजे. ज्यांना अशा गुलामगिरी आणि मानव्यविरोधी अनिष्ट गोष्टींचा धर्म-संस्कृतीच्या नावाखाली अभिमानच वाटतो त्यांना भिडे यांची वक्तव्ये बाळबोध वाटून सोडून द्यावीत असे वाटणे स्वाभाविक आहे. भिडे यांच्यावर कायद्याने काय कारवाई होईल ती होईल. परंतु समाजात तथाकथित सनातन धर्म किंवा संस्कृतीरक्षणाच्या आणि इतिहासाच्या जाज्वल्य अभिमानाच्या पुनर्स्थापनेच्या नावाखाली एकमेकांचा द्वेष करण्याची प्रवृत्ती वाढवण्याचा जो खटाटोप चाललेला असतो त्याला कसा आळा घालायचा हे एक समाज म्हणून आपल्याला फार मोठे सामाजिक आव्हान आहे. हे वेळीच थांबले नाही तर हिंदूंचे भवितव्य धोक्यात आहे.

माहितगार's picture

10 Jul 2018 - 11:13 am | माहितगार

@ एस

आधी डिसक्लेमर
मी आपला प्रतिसाद व्यक्तिगतरित्या घेत नाही पण आमचे प्रतिसाद व्यक्तिगत रित्या घेतले जाऊ नयेत म्हणून आधी डिसक्लेमरचे प्रयोजन
मी शब्दपूजा पुस्तक पूजा व्यक्ती पूजा करत नाही. मनुस्मृती मधील जन्माधारीत विषमतेच्या मुद्द्यावर मिसळपावर क्ठोर आणि भरीव टिका बर्‍याच जणांनी केली आहे अशी टिका करण्यात मीही सहभागी होतो आहे आणि राहीन. प्रत्येक ग्रंथ/साहित्य/चित्रपट साक्षेपी टिका आणि समिक्षेसहीत प्रकाशित व्हावी पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिकतम असावे या मताचा आहे.

मनोहर उर्फ संभाजी भिडेंच्या डोळे झाकून समर्थनातही रस नाही. आतापर्यंत पाहिलेल्या व्हिडीओत , जन्माधारीत विषमतेवर आणि अनीष्ठ प्रथांवर सुस्पष्ट टिका करताना भिडे दिसले नाहीत, हे मान्य करतानाच त्यांच्या संघटनेतले कार्यकर्त्यांचे म्हणणे खरे असेल तर त्यांच्या संघटनेत जातपात अस्पृष्यता पाळली जात नसावी.

भिडेंनी मनूस्मृतीचे नाव काढणे पॉलीटीकली राईट नसेल (मनूस्मृतीत इतर काही चांगले आढळले तरी ते मनूचे नाव न घेता सांगणे आजच्या काळात अधिक शहाणपणाचे असावे अर्थात निर्णय ज्याचे त्याचे , पण त्यांनी दिलेला मनूस्मृतीचा कालचा संदर्भ जातीयवादाच्या समर्थनार्थच आहे ह्याची आपण खात्री केली आहे का ? )

मी थोडक्यात.कॉमने ३४.०९ मिनीटांची व्हिडीओ लावली आहे त्यात मनू अमुक मराठी संतांच्या एक पाऊल पुढे आहे असे म्हटले आहे - पण त्यात जातीयवादाचे समर्थन किमान या व्हिडीयोत आढळले नाही. संतांच्या मार्गदर्शनाने चांगली व्यक्ती बनता येते पण त्यापलिकडे जाऊन राष्ट्रकर्तव्येही महत्वाची असतात असा काहीसा संदेश त्यांना द्यावयाचा असावा असे प्रवचन ऐकताना वाटून गेले.
त्यांची मांडणी प्रगाढ हिंदू विद्वानाप्रमाणे नाही तर अध्यात्मिक आणि धार्मीक पातळीवर बाळबोध स्वरुपाची असावी असे काहीसे मिपाकर मार्कस यांना म्हणावयाचे असावे. त्याचा कोणत्याही बाजूने तिसरा काही अर्थ काढणे प्रस्तुत वाटत नाही. राष्ट्रकर्तव्येही महत्वाची असतात या संदेशात बाळबोध किंवा अयोग्य गोष्टीचे समर्थन असलेच पाहिजे असा अर्थ करणे. मूळ संदर्भ नीट न तपासता ट्रायल बाय मिडीया आणि ट्रायल बाय सोशल मिडीया करणे कित्पत श्रेयस्कर आहे या बद्दल साशंकता वाटते.

मनोहर उर्फ संभाजी भिडेंचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारले तरीही हिंदू धर्म धोक्यात येण्याची शक्यता म्हणून नाही कारण हिंदू धर्म एका मनोहर भिडेंवर अवलंबूनही नाही.

परंतु समाजात तथाकथित सनातन धर्म किंवा संस्कृतीरक्षणाच्या आणि इतिहासाच्या जाज्वल्य अभिमानाच्या पुनर्स्थापनेच्या नावाखाली एकमेकांचा द्वेष करण्याची प्रवृत्ती वाढवण्याचा जो खटाटोप चाललेला असतो त्याला कसा आळा घालायचा हे एक समाज म्हणून आपल्याला फार मोठे सामाजिक आव्हान आहे.

हा वेगळ्या सविस्तर चर्चेचा विषय आहे. भिडे गुरुजींपुरते त्यांचे आकलन कमी पडते असण्याची शक्य्ता सर्वसाधारणपणे स्विकारली जात असण्याची शक्यता आहे. पण त्यांच्या शक्य प्रभावा पेक्षा मिडिया आणि सोशल मिडिया ट्रायल वाढवून दाखवत नाहीएना अशी एक शंका वाटते.

...हे वेळीच थांबले नाही तर हिंदूंचे भवितव्य धोक्यात आहे.

ह्या वाक्याचा काँटेक्स्ट कळणे जरा कठीण गेले - आपला काँटेक्स्ट भिडेंपुरता मर्यादीत नसावा. आपल्याला नेमके काय म्हणायचे ते वेगळ्या धाग्यातून मांडलेले श्रेयस्कर असावे असे वाटते म्हणजे स्वतंत्र चर्चा होऊ शकेल. भिडेंच्या इतर वक्तव्ये आणि कृतींचे माहित नाही पण ह्यावेळी तरी टिकाकारांचा त्यांच्यावरचा नेम हुकत असण्याची प्राथमिक शक्यता वाटते चुभूदेघे. ज्यांना राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत त्यांची बाब वेगळी.

गामा पैलवान's picture

10 Jul 2018 - 12:22 pm | गामा पैलवान

माहितगार,

तुमची संदेशाशी सहमत आहे.

पूज्य भिड्यांनी मनु ज्ञानेश्वरांपेक्षा चांगला होता असं कुठेही म्हंटलं नाहीये. त्यांचं म्हणणं इतकंच की ज्ञानेश्वरांनी निजी (=प्रायव्हेट) साधना सांगितली, तर मनुने यापुढील पायरी म्हणजे राष्ट्रधर्माची साधना सांगितली. इथे श्रेष्ठकनिष्ठत्वाचा प्रश्न आलाच कुठे?

न्यूटनने जे गतीचे नियम सांगितले त्याच्या पुढे जाऊन आईनस्टाईनने अतिप्रचंड गतीचे नियम सांगितले. बदनामीकारांच्या मते आईनस्टाईन न्यूटनपेक्षा श्रेष्ठ हवा. याला म्हणतात फालतूपणा. प्रस्तुत प्रसंगी मात्र मी यांस हलकटपणा म्हणेन. कारण की माध्यमं पूज्य भिड्यांच्या मागं खलप्रवृत्तीनं लागलेली असल्याचं स्पष्टपणे दिसतंय.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

10 Jul 2018 - 11:15 am | माहितगार

भिडेंचे थोडक्यात डॉटकॉमने युट्ञ्बवर दिलेले पूर्ण चर्चीत भाषण

मार्कस ऑरेलियस's picture

10 Jul 2018 - 6:20 pm | मार्कस ऑरेलियस

संपुर्ण व्हिडीयो शेयर केल्याबद्दल धन्यवाद ! व्हिडीयो पाहिला . हेही प्रकरण जळगाव जोशीकांड व्हर्जन २ असल्याचे दिसुन येत आहे . गुरुजींनी कोठे ही मनु ज्ञानेश्वर महाराज तुकोबांच्या पेक्षा श्रेष्ठ होता असे म्हणालेले मला तरी दिसले नाही !

गुरुजींचा कोट पुढील प्रमाणे :

" धर्माचार साध्य कसा होईल हे ज्ञानोबा तुकोबांनी संत परंपरेने ऋषीमुनींनी शिकवले आहे . आत्मोध्दार , आत्मौन्नती ह्याच्यातुन साध्य होतात . पण मनु त्यांच्यापुढे एक पाऊल आहे आणाखी ! हा धर्म व्यक्तिगत पातळीवरचा धर्म . आपण देश म्हणुन जगतो , भारत म्हणुन जगतो , हिंदुस्तान म्हणुन जगतो .........जीवनाचा उद्देश कळला पाहिजेल. तसं ह्या भारत मातेच्या कुटुंबातील तुम्ही आम्ही सगळीजणं भावंड आपलं राष्ट्र आपला धर्म आपला देश आपले पुर्वज आपलं कर्तव्य आजचा वर्तमान काळ
उद्याचा भविष्यकाळ ह्याची जाणीव असलेला असला पाहिजेल . तर हे अध्यात्म वेदांत धर्म हे शिकवण्याची भुमी असलेला हा देश टिक्ले !....."

एकुणच ज्ञानोबा तुकोबांनी वैयक्तिक अध्यात्मिक उध्दराचा मार्ग दाखवला आणि मनु ने एक राष्ट्र म्हणुन उध्दाराचा मार्ग दाखवला म्हणुन तो एक पाऊल पुढे आहे अशा अर्थाचे हे विधान आहे !

ह्यात काहीही चुकीचे दिसत नाहीये ! ह्यात कोठेही मनुस्मृतीतील वर्णाश्रमाचे , स्त्रीयांविषयींच्या विषमतेचे उदात्तीकरण दिसत नाहीये. उलट पुढच्याच वाक्यात भारतमातेच्या कुटुंबातील आपण भावंडं आहोत अशा अर्थाचे स्पष्ट वाक्य आहे . मीडीयाने मात्र ते जाणीवपुर्वक टाळल्याचे दिसत आहे !
आणि उगाचच भिडे गुरुजींनी " भारत तेरे टुकडे होंगे इन्शाल्लाह इन्शाल्लाह " ह्या धर्तीवर काही विधान केल्याचा आव आणुन केलेला आकांड तांडव केल्याचे दिसते!

एकुंणच भिडे गुरुजींवर काही कारवाई होईल असे काहेही दिसत नाहीये ह्या भाषणात. मनु , मनुस्मृती क्वोट करणे कायद्याने गुन्हा नाही आणि पाप ही नाही . मनुस्मृय्रीतील वर्णाश्रमाचे समर्थन करणारे श्लोक क्वोट करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य न ठरता कदाचित गुन्हा ठरु शकेल पण इथे तरी गुरुजींनी तसे केल्याचे दिसत नाही !
थोडक्यात काय तर हाही जळगाव जोशीकांडासारखाच फुसका बार दिसत आहे ! आता पाहुयात सरकार भिडे गुरुजींवर काय कारवाई करते ते !

अवांतरः व्यक्तीगत उध्दारापेक्षा राष्ट्र उधार जास्त महत्वाचे आहे अशा अर्थाचे अजुन एक वाक्य आठवले ! जेव्हा चंद्रगुप्त मौर्याने जैन श्रमण व्हायचा निर्णय घेतला तेव्हा आर्य चाणक्य त्याला म्हणाले : चन्द्रगुप्त तुम नीजी मुक्ती के पिछे दौद रहे हो | इस संस्कृती के अभिषाप ने तुम्हे भी ग्रसलिया | समाज की मुक्ती के और से तुम ने आखे मोड लियी |

https://www.youtube.com/watch?v=s6OEcw5uQ6w

=))))

प्रकाश घाटपांडे's picture

10 Jul 2018 - 11:50 am | प्रकाश घाटपांडे

उन्हे उनके हाल पे छोड दो।

दासबोध.कॊम's picture

10 Jul 2018 - 12:02 pm | दासबोध.कॊम

भिडे गुरुजींबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया वाचण्याची आता सवय झाली आहे. यातील बहुतांश लोक त्यांना प्रत्यक्ष कधीही भेटलेले नसतात किंवा फार फार तर त्यांनी गुरुजींचे एखाददुसरे व्याख्यान प्रत्यक्ष किंवा youtube वर ऐकलेले असते. गुरुजी कसे जगतात हे पाहण्याचे भाग्य त्यांना फारसे लाभलेले नसते. ते भाग्य सुदैवाने लाभल्यामुळे लिहिण्याचे दुस्साहस करत आहे. लिखाणाचा नाममात्र हेतू इतकाच आहे की ज्यांना गुरुजींबद्दल काहीच माहिती नाही त्यांचे मन भ्रमित होऊ नये. मी गुरुजींचा प्रवक्ता वगैरे कोणीही नाही किंवा त्यांना तसा कोणी प्रवक्ता लागत सुद्धा नाही याची कृपया आधीच नोंद घ्यावी .एकेक मुद्दा घेऊन प्रतिवाद करू.
१ ) गुरुजींचे आंबा विधान. गुरुजी सुमारे अर्धशतक संघाचे प्रचारक राहिलेले आहेत. संघ म्हणजे काय याबाबतीत प्रत्येकाचे आकलन वेगवेगळे आहे त्याबद्दल आता बोलणे नको. परंतु या संघ विचारांशी फारसे न जुळल्यामुळेच गुरुजी संघातून बाहेर पडले असावेत असे मानावयास पुरेसा वाव आहे. संघाचे प्रचारक असताना गुरुजींना धाराशिव जिल्ह्यामध्ये मायभाते नामक एक शेतकरी भेटला होता ज्याने त्याच्या शेतात असे आंब्याचे झाड असल्याचा दावा केला होता. गुरुजींचे नाशिक मधले व्याख्यान हे त्या आंब्याची जाहिरात करण्यासाठी नसून त्यांनी केवळ उदाहरण म्हणून तो प्रसंग सांगितला व पुढे ते असे म्हणाले की जर एखादा आंबा खाऊन पुरुषाचे नपुंसकत्व जात असेल तर शिवछत्रपती आणि संभाजीमहाराज यांच्या विचारांचे ग्रहण करणाऱ्या हिंदूंचे पिढ्यानुपिढ्या आलेले राष्ट्रीयत्वाचे नपुंसकत्व का जाणार नाही. इथे केवळ उदाहरण म्हणून त्या आंब्याचा गुरुजींनी उल्लेख केला जो तितकाच उचलून माध्यमांनी जणूकाही गुरुजी स्वतःच्या शेतातील आंब्यांची जाहिरात करत आहेत असे भासविले व यावर विश्वास ठेवणारी माणसे ही किती अल्प बुद्धीची असतील हे देखील त्यानिमित्ताने सिद्ध होऊन गेले .

२ ) मनू बद्दल गुरुजी काय बोलले
मुळात मनू कोण होता, मनू बद्दल ज्ञानेश्वरांचे वारकरी संतांचे विचार काय आहेत हे जाणून न घेता बडबड करणाऱ्या लोकांच्या मुळे हा सर्व उपद्व्याप होतो आहे.
*मनू म्हणजे नक्की काय ?हा कोण होता ? मनुस्मृति म्हणजे काय ?*
आपल्या धर्मशास्त्रांमध्ये श्रुती वांङ्गय आणि स्मृती वाङ्मय असे वाङ्मयाचे मुख्य प्रकार आहेत. जे ज्ञान कधीच बदलत नाही ते श्रुतीं मध्ये मोडते. हे ज्ञान शाश्वत आहे. आणि जे ज्ञान हे एका विशिष्ट काळापुरते लागू केले जायचे त्याला स्मृती असे म्हणतात. स्मृती या नावातच त्याचे सार सामावलेले आहे. अगदी अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाले तर भारताचे संविधान हे स्मृती या प्रकारात मोडणारे लिखाण आहे. कारण ते आताच्या काळाला लागू असून त्यामध्ये अनेक बदल वेळोवेळी करण्यात आलेले आहेत ते शाश्वत नाही. भारतीय धर्मशास्त्राने काळाची अप्रतिम व्याख्या केलेली असून पृथ्वीवर पुन्हा पुन्हा प्रलय होऊन नवीन मानवी संस्कृतीचा जन्म होत असतो व अशा अनेक संस्कृती आजवर निर्माण होऊन लोप पावलेल्या आहेत. हा सर्व कालखंड मोजण्याचे अत्यंत अचूक मोजमाप आपल्या कडे आहे.
त्यातील सध्याचे जे मन्वंतर सुरू आहे त्या मन्वंतराचा अधिपती विवस्वान नावाचा एक राजा होऊन गेला. हा तो राजा असतो ज्याला परमेश्वर प्रत्यक्ष येऊन संस्कृती, धर्म ,राज्य ,मानवी व्यवस्था कशा चालवायच्या याचे ज्ञान थेट देतो.
कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला ब्राह्मण लोक देश काल वर्तमानस्थिती चा उल्लेख करतात तो नीट ऐकत चला. त्यामध्ये कलियुगे भरत वर्षे भरतखण्डे
गोदावर्या: अमुक तीरे हे सांगताना वैवस्वत मन्वंतरे असा उल्लेख करून आपल्याला जाणीव करून देत असतात की हे विवस्वान नावाच्या मनूचे मन्वंतर सुरू आहे. थोडक्यात आज आपल्याला जे जे म्हणून धर्माचे ज्ञान प्राप्त झालेले आहे ते थेट परमेश्वराने मनू द्वारे आपल्यापर्यंत पोहोचविलेला आहे. आता हे आम्ही म्हणतो का तर तसे नाही हे स्वतः भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या सुरूवातीलाच आपल्याला सांगतात.
*इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् । विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥ १ ॥*

अर्थात भगवंत सांगतात की अर्जुना हे सर्व ज्ञान जे मी तुला आज देतो आहे ते या युगाच्या प्रारंभालाच मी विवस्वान नावाच्या मनूला दिलेले असून त्याने पुढे ते ज्ञान इक्ष्वाकु वंशामध्ये प्रक्षेपित केले .इश्वाकु वंशा पासूनच रामाचा रघुवंश उत्पन्न झालेला आहे ,हे लक्षात घेण्यासारखे आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेवर केलेली टीका आहे. नवीन पिढीसाठी पुन्हा एकदा सांगतो टीका करणे या अर्थाने मराठी मध्ये आपण जो शब्द वापरतो त्याचा या टीकेची काही संबंध नाही. एखाद्या ग्रंथाचे विस्तृत विवेचन करणे त्यावर स्वतःचे भाष्य करणे याला टीका करणे असे म्हणतात. असो तर ह्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगतात ?

*मग देव म्हणे अगा पंडुसुता l हाची योगु आम्ही विवस्वता | कथिला परी ते वार्ताI बहुवा दिसांची ॥*
*मग तेणे विवस्वते रवी I हे योगस्थिती आघवीI निरोपिली बरवी मनू प्रति॥*
*मनूने आपण अनुष्ठिली I मग इक्ष्वाकुवा उपदेशिली I ऐसी परंपरा विस्तारिलीI आद्य हे गा॥*
थोडक्यात माऊली आपल्याला स्पष्टपणे सांगतात की परमेश्वराने त्याचे सर्व ज्ञान सर्वप्रथम विवस्वान याला दिले. त्याने तेच ज्ञान त्याच्या पिढीमध्ये पुढे प्रसारित केले. व हे सर्व ज्ञान ज्या मनूला प्राप्त झाले त्याने स्वतः तो योगमार्ग अंगीकारला ,त्याचे अनुष्ठान केले व तो योग सिद्ध झाल्यावर तोच योग त्याने इक्ष्वाकु ला देऊ केला. आणि हेच ज्ञान रघु वंशांमध्ये पुढे प्रसारित झाले. हे ज्ञान देण्याची पद्धत पूर्वी ग्रंथरूपात ग्रथित केली जात असे. तो ग्रंथ म्हणजेच मनुस्मृती होय.

ही ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्यापर्यंत विस्तारलेली हिंदू धर्माची परंपरा जी आहे तिचे मूळ मनू पासून सुरु होते असे स्वतः माऊली सांगतात. यातील *आद्य* हा माऊलींनी वापरलेला शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे.
कारण हा तोच शब्द आहे ज्याने ज्ञानेश्वरी ची सुरुवात माऊली करतात. *ओम नमोजी आद्या l वेद प्रतिपाद्याl जयजय स्वसंवेद्याl आत्मरूपाll*
इतक्या महत्त्वाच्या शब्दाचा गैरवापर स्वतः ज्ञानेश्वर माऊली तरी करणार नाहीत. जो शब्द थेट आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यासाठी माऊली वापरतात, त्याच शब्दांमध्ये ते मनूचा देखील गौरव करतात यामध्येच सर्व सार आले. मग मनुस्मृतीला नंतरच्या काळामध्ये इतका विरोध का झाला असेल? त्याचे कारण इंग्रजांनी आपल्या स्वकीयांना हाताशी धरून केलेला मनुस्मृतीचा अपप्रचार होय. ह्या मनुस्मृतीमध्ये मुद्दाम होऊन काही अश्लाघ्य श्लोक घुसडण्यात आले व केवळ त्यांचाच प्रसार करून मनुस्मृती कशी खोटी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न वेळोवेळी झाला. आत्तासुद्धा भिडे गुरुजींच्या संपूर्ण भाषणातील केवळ एखादेच वाक्य उचलून त्याचा जसा गहजब माध्यमे करतात अगदी तीच पद्धत हे लोक त्या काळामध्ये वापरत होते. संदर्भाशिवाय जर आपण अशी आधली मधली वाक्ये उचलायला सुरुवात केली तर त्याने अर्थाचा अनर्थ होत असतो हे सांगायला कुठल्या तज्ञाची आवश्यकता नाही. इतिहासामध्ये एकदा अनैतिहासिक गोष्टी घुसडल्या की हळूहळू शेकडो वर्षांनी त्या इतिहासाचाच भाग होऊन जातात. आज ब्रिगेडी इतिहासकार शिवछत्रपतींची इतिहासाची जी मोडतोड करत आहेत ती पाहता तुमच्या सहज लक्षात येईल की अजून सात-आठशे वर्षांनी शिवाजी महाराज हे मुसलमान राजा होते असा सुद्धा इतिहास कायम होऊ शकेल. असो ज्या लोकांनी साक्षात ज्ञानेश्वर माऊलींना सोडले नाही तुकोबारायांना सोडले नाही शिवछत्रपतींना सोडले नाही त्या प्रवृत्ती भिडे गुरुजींना सोडतील अशी अपेक्षा करणेच गैरलागू आहे. सुदैवाने तुकोबारायांनी त्यांना तत्कालीन पुरोगामी लोकांकडून होत असलेल्या त्रासाचे रीतसर वर्णन करून ठेवलेले आहे ते मुळापासून वाचण्यासारखे आहे आणि तुकाराम महाराज त्या लोकांचे पुढे काय होईल ते सांगता ते ही वाचावे.

*पाखांडयांनी पाठी पुरविला दुमाला । तेथे मी विठ्ठला काय बोलो ॥ १ ॥*
*कांद्याचा खाणारा चोजवी कस्तुरी । आपण भिकारी अर्थ नेणे ॥ २ ॥*
*न कळे ते मज पुसती छळूनी । लागता चरणी न सोडती ॥ ३ ॥*
*तुझ्या पायाविण दुजे नेणे काही । तूची सर्वांठायी एक मज ॥ ४ ॥*
*तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा । किती बोलो भांडा वादकांशी ॥ ५ ॥*

कलियुगी कवित्व करिती पाखांड । कुशल हे भांड बहू झाले ॥ १ ॥
द्रव्य दारा चित्ती प्रजांची आवडी । मुखे बडबडी कोरडेचि ॥ २ ॥ 
दंभ करी सोंग मानावया जग । मुखे बोले त्याग मनी नाही ॥ ३ ॥
वेदाज्ञे करोनी न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनि ॥ ४ ॥
तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसे ॥ ५ ॥

नाहीं आह्मी विष्णुदास । करीत आस कोणांची ॥1॥ कां हे नष्ट करिती निंदा । नेणों सदा आमुची ॥ध्रु.॥ असों भलते ठायीं मनें । समाधानें आपुलिया ॥2॥ तुका ह्मणे करूं देवा । तुझी सेवा धंदा तो ॥3॥

तात्पर्य हेच की गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी हे कोणाला चांगले वाटावे म्हणून काही बोलत नाहीत. तर जे जे आपल्या पूर्वजांनी चांगले ,उत्तुंग, उदात्त विचार मांडून ठेवले आहेत तितकेच ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. आत्ता भिडे गुरुजींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे लोक हे तुकाराम महाराजांचे किंवा ज्ञानेश्वर माऊलींचे समर्थक नसून हे तेच लोक आहेत हे एकेकाळी ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण असल्यामुळे वारकरी संत असू शकत नाहीत असे म्हणून ज्ञानदेव तुकाराम म्हणायच्या ऐवजी नामदेव तुकाराम म्हणा असा वारकऱ्यांना सल्ला देत होते. आज स्वतःला बुद्धिवादी समजणारे आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले काही लोक समाजामध्ये दिसतात जे संविधानालाच आपला धर्मग्रंथ मानतात आणि देशालाच देव मानतात त्या लोकांना असेच आवर्जून सांगावेसे वाटते की आपण केवळ देशापुरता विचार न करता अखिल मानवजातीचा विचार केला पाहिजे. *हे विश्वची माझे घरl ऐसी मती जयाची स्थिरl किंबहुना सचराचर l आपणचि जाहलाll* असे कळवळून सांगणाऱ्या माऊलींचे नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला अजिबातच नाही. केवळ काही लोक मनुस्मृती जाळतात हे लक्षात ठेवणाऱ्या तुम्ही कधी मनु सुद्धा वाचलेला नाही ,ज्ञानेश्वर सुद्धा वाचलेले नाहीत आणि तुकाराम सुद्धा तुम्हाला कळलेले नाहीत. त्यामुळे भिडे गुरुजी काय आहेत हे जाणण्याचा तुम्हाला अधिकारच नाही .कारण तुम्हाला कळलेले भिडे गुरुजी हे अलीकडच्या दोन-तीन वर्षांच्या माध्यमातील गदारोळामुळे कळलेले आहेत, तर आम्हाला कळलेले गुरुजी हे वर्षानुवर्षांच्या सहवासातून आणि त्यांच्या प्रत्यक्ष *बोले तैसा चाले* या आम्हाला आलेल्या अनुभवातून जाणिवेत उतरलेले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही गुरुजींना उपदेशाचे डोस पाजत बसण्यापेक्षा गुरुजींच्या पायाशी बसून किंवा त्यांच्या सोबत सह्याद्रीच्या गडकोटांची भटकंती करून थोडेफार ज्ञान पदरामध्ये पाडून घेता आले तर तुम्ही गुरुजींचे समकालीन असल्याचा काही लाभ करून घेतला असे म्हणता येईल, नाहीतर तुकाराम महाराजांच्या समकालीन धर्ममार्तंडां मध्ये आणि तुमच्या मध्ये फारसा काही फरक राहणार नाही. गुरुजी नेहमी म्हणतात ते या प्रकारांमुळे पटते.
विश्वाचा आकार केवढा?ज्याच्या-त्याच्या मेंदू एवढा !
आता वरील प्रतिक्रिया वाचून त्यावर प्रतिक्रियांचा महापूर कोणाला लुटा वयाचा असेल तर तो अवश्य लुटावा परंतु त्यातील एकही प्रतिक्रिया वाचली जाईल याची शाश्वती बाळगू नका कारण आपला वेळ वाया घालवू नये ही गुरुजींची शिकवण आम्ही तंतोतंत पाळत असतो.
राहता राहिला विषय सुवर्ण सिंहासनाचा तर त्याबाबत सर्वांनी एकच गोष्ट लक्षात घ्यावी. रयतेचे कल्याण करावे हे शिवाजी महाराजांना सुद्धा कळत होते तरीसुद्धा त्यांनी 32 मण सोने खर्च करून सिंहासन उभे केलेच . कारण सिंहासन हे प्रतीक असते. भारताच्या राष्ट्रपतींना राहण्यासाठी एवढा मोठा 40 दरवाजे असलेला महाल कशाला हवा आहे ? कारण राष्ट्रपती हे प्रथम नागरिकाचे प्रतीक असते. त्याचप्रमाणे राजा हा संपूर्ण प्रजेचा पालक मानला जातो त्यामुळे सिंहासन व त्याची सर्व बिरुदे ही प्रतीकात्मक असतात. आपल्या देशावर परकीयांनी आक्रमणे केली हे जर मिसळपावच्या वाचकांना मान्य असेल तर त्यांनी ठरवून पृथ्वीराज चव्हाणचे सिंहासन तुकडे तुकडे करुन फेकून दिले हे मान्य करायला हरकत नाही. व तीच सल तीच बोध मनात बाळगत शिवछत्रपतींनी पुरेशी ताकद प्राप्त झाल्यावर हिंदूंचे तख्त पुन्हा एकदा विश्वामध्ये उभे करून दाखविले ते या सिंहासनाच्या रूपाने. शिवछत्रपतींच्या माघारी झुल्फिकारखानाने त्या सिंहासनाचे पुन्हा तुकडे-तुकडे करून टाकून दिले. हे तुकडे सिंहासन नावाच्या एका फर्निचर चे तुकडे नसतात तर ते तुमच्या प्रतीकाचे पर्यायाने तुमच्या अस्मितेचे स्वाभिमानाचे तुकडे असतात. अर्थात ज्यांना स्वाभिमान वगैरे गोष्टी समजतात त्यांना त्यातले वर्म कळू शकेल. केवळ सिंहासन उभे राहिल्यावर गुरुजींचे काम संपणार नसून उलट ती कार्याची सुरुवात आहे. दररोज प्रत्येक तालुक्यातील दोन हजार मुले जेव्हा सिंहासनाला जागता पहारा देण्याच्या निमित्ताने रायगडावर अनवाणी चढत येतील आणि तिथल्या मातीचा स्पर्श त्यांच्या शरीराला होईल सकाळी भरघोस व्यायाम करून नंतर शिवचरित्राचे पारायण करून एक संपूर्ण दिवस निर्व्यसनी राहून उदात्त विचारांच्या संपर्कात ती मुले जेव्हा राहतील तेव्हा निश्चितच त्यांच्या आयुष्याला काहीतरी नवी दिशा मिळेल आणि कुठल्याही कार्यात हात घातल्यावर यश मिळवण्याची एक विजिगीषू वृत्ती त्यांना तेथे प्राप्त होईल जी कुठल्याही एका फडतुस नोकरीपेक्षा कैकपटीने श्रेष्ठ आहे. गुरुजींचे धारकरी आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये यशस्वी आहेत. फक्त त्याची कुठे जाहिरात ना धारकरी करतात ना गुरुजी करतात. आज गुरुजींना जो काही विरोध होतो आहे त्याचे महत्त्वाचे कारण सिंहासनाचा हा प्रकल्प हाच आहे. आजपासून पन्नास वर्षांनी दिसणारा महाराष्ट्र हा पूर्णपणे वेगळा असेल आणि त्याचे मूळ स्थान हे 32 मण सोन्याचे सिंहासन असणार आहे यात आम्हाला कोणतीही शंका वाटत नाही. गुरुजींना विरोध करण्यापेक्षा गुरुजींच्या या उदात्त कार्यामध्ये जर आपण सर्व सहभागी झालो तर ते कार्य अधिक गतीने पूर्णत्वाला नेता येईल. कारण तुम्ही विरोध केलात तर तुमच्या शिवाय हे कार्य तडीला जाणार आहेत यात शंकाच नाही.
मनुस्मृति ज्यांना वाचायची असेल ती खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

www.dasbodh.com

माहितगार's picture

10 Jul 2018 - 1:00 pm | माहितगार

* ३२ मण सोन्याचे सिंहासन

एखाद्या देखण्या सिंहासनाचे प्रतिक उभारण्यास काहीच हरकत नाही, थोडे फार सोनेही वापरण्यास हरकत नाही पण

अगदी ब्रिटीश काळात भारताच्या एक्सपोर्ट पेक्षा इंपोर्ट वाढून बॅलन्स ऑफ ट्रेड निगेटीव्ह झाला तेव्हा पासून भारतीयांनी आयात सोन्याचे प्रेम सोडणे अभिप्रेत होते कारण भारतात मोठ्या प्रमाणावर सोने खाणि नाहीत हे रहस्य नाही. वस्तु उत्पादनास आवश्यक गोष्टीची आयात सोडून परकीय खाणीतून निघणार्‍या सोन्यावर पैसा आणि जीव लावणे खर्‍या देशहिताच्या व्याख्येत कितपत बसू शकते या बद्दल अर्थशास्त्रीय बाजूने साशंकीत आहे. मी हि साशंकता या बाबीतच व्यक्त केली आहे असे नाही भारतीयांच्या सोने प्रेमा च्या देशहित लक्षात घेता आर्थीक सयुक्तते बद्दल साशंकता व्यक्त करणारा धागा चर्चा पुर्वीही काढली आहे.

पण भारतीयां च्या सोने प्रेमापुढे प्रत्येक अर्थशास्त्र जाणता केवळ __/\__ एवढेच करु शकला असावा.

*** ***

संविधानालाच आपला धर्मग्रंथ मानतात आणि देशालाच देव मानतात त्या लोकांना असेच आवर्जून सांगावेसे वाटते की आपण केवळ देशापुरता विचार न करता अखिल मानवजातीचा विचार केला पाहिजे. *हे विश्वची माझे घरl ऐसी मती जयाची स्थिरl किंबहुना सचराचर l आपणचि जाहलाll* असे कळवळून सांगणाऱ्या माऊलींचे नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला अजिबातच नाही.

मुद्दा चांगलाय यावर इतर दिग्गज मिपाकर असताना मी स्वतःचे भाष्य करण्यापेक्षा त्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा करतो. तुम्ही त्यांचे शंका निरसन करावे.
*** ***

मनू आणि मनूस्मृती

त्यांचे बाकीचे कोणतेही योगदान चर्चा करण्या पुर्वी मनुप्रणित जन्माधारीत विषमता नाकारत असल्याबद्दल सुस्पष्ठ नि:संदिग्ध विधान हवे तरच त्यांचे इतर योगदान लक्षात घेतले जाण्याची काही तरी शक्यता उरु शकते अन्यथा केवळ मुठभर लोक मांस चढवण्या इतपत मनुच्या बाजूने बोलतील, पण बहुसंख्य ह्या कानाने ऐकुन दुसर्‍या कानाने सोडतील किंवा विरोध करत असतील.

* आता जरा तुमच्या बाजूने (पण आधी डिस्क्लेमर उत्तरदायित्वास नकार देऊन)

** तुकाराम गाथेतून
तुकाराम गाथेत मला दोन अभंगात 'मनु' हा शब्द दिसला, ते अभंग प्रक्षिप्त आहेत किंवा नाही , तो शब्द कोणत्या अर्थाने येतो याची मला कल्पना नाही. मला आंतरजालावर जे मिळाले ते मी खाली कॉपी पेस्टवत आहे.

* १३१९
अनुभवें अनुभव अवघा चि साधिला । तरि स्थिरावला मनु ठायीं ॥१॥
पिटूनियां मुसे आला अलंकार । दग्ध तें असार होऊनियां ॥धु॥
एक चि उरलें कायावचामना । आनंद भुवनमाजी त्रयों ॥२॥
तुका म्हणे आम्ही जिकिला संसार । होऊनि किंकर विठोबाचे ॥3॥

* ४२९

मनु राजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी।

पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणें कृपा केली आम्हांवरी गा ॥१॥

म्हणउनि आलों या देशा । होतों नाहीं तरी भुललों दिशा ।

दाता तो मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा॥ध्रु.॥

सवें घेउनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण ।

कडे चुकवुनि कांटवण । ऐका आणिली तीं कोण कोण गा ॥२॥

पुढें भक्तिनें धरिलें हातीं । मागें ज्ञान वैराग्य धर्म येती ।

स्थिर केलीं जीं आचपळें होतीं । सद्धि आणुनि लाविलीं पंथीं गा ॥३॥

केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसी माय ।

धर्में त्याच्या देखियेले पाय । दिलें अखय भय वारुनि दान गा ॥४॥

होतों पीडत हिंडतां गांव । पोट भरेना राहावया ठाव ।

तो येणें अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बंधव गा ॥५॥

** याचा फेसबुकवर एक सार्थ दुवा दिसतोय , तोच अर्थ बरोबर आहे का याची कल्पना नाही.

शब्दबम्बाळ's picture

11 Jul 2018 - 12:18 pm | शब्दबम्बाळ

खर तर अशा प्रतिसादांवर काही लिहायची इच्छा होत नाही आता कारण आपलंच वेळ वाया जातो आणि समोरचा शब्दांना गोलगोल फिरवत बसतो.
असेही, पानभर प्रतिसाद लिहून आपला वेळ किती अमूल्य आहे हेही आपण लिहिले आहेच. त्यामुळे तुम्हाला समोरच्याला सांगायला भरपूर वेळ दिसतो पण ऐकायला मात्र दिसत नाही असे वाटते.

आता वरील प्रतिक्रिया वाचून त्यावर प्रतिक्रियांचा महापूर कोणाला लुटा वयाचा असेल तर तो अवश्य लुटावा परंतु त्यातील एकही प्रतिक्रिया वाचली जाईल याची शाश्वती बाळगू नका कारण आपला वेळ वाया घालवू नये ही गुरुजींची शिकवण आम्ही तंतोतंत पाळत असतो.

"
महापूर वगैरे नाही आला कि हो, असो...

आधी काही प्रश्न: याची उत्तरे कोणीही द्यावीत, म्हणजे जे काही गोंधळ निर्माण करणारे मुद्दे आहेत ते तरी दूर होण्यास मदत होईल.
१. भिडेचें शिक्षण काय आहे? (फेबु वरती समर्थकांनी अगदी पीएचडी, फिजिक्स मध्ये गोल्ड मेडल, १०० च्या वरती शोधनिबंध असे बरेच काही लिहिलेले मी स्वतः देखील पहिले आहे. एके ठिकाणी तर ते नासा ला मदत करत होते वगैरे लिहिलेले होते! ते वाचून या सगळ्यांचीच सत्यता पडताळून घ्यावी वाटली)
२. भिडे फर्ग्युसन मध्ये शिकवायला कधीपासून होते? आणि मग त्यांनी ते सोडून संघ प्रचार वगैरे नक्की कधी सुरु केला?

आता त्यांनी शिक्षणाचे दाखले द्यायची गरज काय हा प्रश्न विचारला जाईल, पण जेव्हा सार्वजनिक जीवनात तुमच्याबद्दल काही गोष्टी "चांगल्या" म्हणून पसरवल्या जात असतील तर त्याचा पुरावा तुमच्याकडे असण्याची आवश्यकता असते असे मला तरी वाटते. हे पुरावे कधी कोणी पाहिल्याचे मला माहिती नाही, कोणाला माहिती असेल तर तर त्यांनी सांगावे.

बर, आता प्रतिसादातील काही मुद्दे:
१ ) गुरुजींचे आंबा विधान: वरती व्हिडीओ दिला आहे, त्यात भिडे स्पष्ट बोलताना दिसत आहेत आंब्याविषयी! "मुलगा पाहिजे तर मुलगाच होतो" हेही ऐकू येतंय तरी काही समर्थक लोकांनी सगळ्या सोशल मीडियावर ते हे वाक्य बोललेच नाहीत हा प्रचार लावला होता. तुम्हीदेखील सोयीस्कर बगल दिलीच आहे.
त्याला विरोध झाला कि मग ते जे बोलले ते "रूपक" होते असा प्रचार सुरु झाला. या गोष्टी खूपच ऑर्गनाइज्ड पद्धतीने सुरु होत्या त्यावरून नक्की कोण हे पसरवत होत अशी शंका आली.
पण आता प्रकरण त्यांच्या अंगाशी येईल असे दिसतंय.
संभाजी भिडे चौकशीत दोषी: http://zeenews.india.com/marathi/maharashtra/nasik-mahapalika-investigation-on-sambhaji-bhide/437803
"शिवप्रतिष्ठान' या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे नाशिक महापालिकेच्या रडारवर आलेत. 'आंबा खाऊन संतती' होण्याच्या वक्तव्यावर नाशिक पालिकेच्या चौकशीत दोषी आढळलेत. 'प्रसूतीपूर्व लिंग निदान तंत्र अधिनियम समिती' पीसीपीएनडीटीच्या प्राथमिक बैठकीत सदस्यांच्या चित्रफीत चौकशी अहवालात संभाजी भिडे दोषी आढळलेत. उल्लेखनीय म्हणजे, चौकशी दरम्यान महापालिकेनं संभाजी भिडे यांना दोन वेळेस नोटीस देऊनही भिडे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खुलासा करणं टाळलं होतं."

२ ) मनू बद्दल गुरुजी काय बोलले: इथं मी ते काय बोलले यापेक्षा तुम्ही काय बोललात ते पाहत होतो.

मग मनुस्मृतीला नंतरच्या काळामध्ये इतका विरोध का झाला असेल? त्याचे कारण इंग्रजांनी आपल्या स्वकीयांना हाताशी धरून केलेला मनुस्मृतीचा अपप्रचार होय. ह्या मनुस्मृतीमध्ये मुद्दाम होऊन काही अश्लाघ्य श्लोक घुसडण्यात आले व केवळ त्यांचाच प्रसार करून मनुस्मृती कशी खोटी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न वेळोवेळी झाला.

याचा काही पुरावा कि उचलली जीभ? मनुस्मृतीवर भरपूर चर्चा झाली आहे मिपावर आणि काही इतके घाणेरडे आणि फालतू नियम आहेत त्यात कि बनवणाऱ्याच्या मानसिकतेची लाज वाटावी! मग यावरसुद्धा मनुस्मृती चांगलीच होती कालसुसंगत होती पण नंतर तिला वाईट बनवले गेले हे असले गोलमोल प्रचार करायचे!
आमचा हिंदू धर्म किती भारी त्यात सगळंच किती चॅन चॅन होत. कोणावर अत्याचार झाले नाहीत, विधवाना जाळलं गेलं नाही त्यांचं शोषण केलं गेलं नाही, अस्पृश्याना जनावरांपेक्षा खराब वागणूक दिली गेली नाही, त्यांना शिक्षण पैसे यांची कधी कमी नव्हती असे देखील प्रचार होतील. हे पण इंग्रजांनी पसरवले असतील समज!

फाळणीमध्ये सगळं काही गमावलेल्या परिवारासमोर जाऊन फाळणी झाली ते बर झालं, डोक्याची कटकट गेली अशी विधान केल्यावर काय प्रतिक्रिया येईल? तशाच प्रतिक्रिया जुना हिंदू धर्म किती चांगला हे बोलल्यावर काही लोकांकडून आल्या तर त्यात गैर ते काय? अनेक समाजसुधारकांनी समाज ढवळून काढल्यावर कुठे आता जरातरी बरी परिस्थिती आहे . पण काही लोकांना ते जून जे होत तेच परत हवे आहे असे वाटू लागलय, त्याला वेळीच थोपवायलाच हवे!
टीका हि जरुरीचं असते आणि लोकशाहीत तो हक्क आहे त्यामुळे आपल्याला खपत नसेल तर इतरांची बुद्धी काढण्यापेक्षा स्वतःचा संयम वाढवा!

३. ३२ मण सिंहासन: हे तर अडाणीपणाचे लक्षण वाटते. सध्या सोन्याचा भाव ३२००० पकडला तर या कार्यासाठी अंदाजे 3276800000 इतके पैसे लागतील!
याशिवाय २००० लोक पहारा देणार म्हणे!
यापेक्षा १ कोटी फंडिंग करून २००-३०० मराठी कंपन्या बनवा आणि हजारो मराठी तरुणांना कायमस्वरूपी राजगोर देऊन मराठी "उद्योग साम्राज्य" निर्माण करायचा ध्यास घेतला तर काहीतरी कल्याण होईल लोकांचं. तुम्हाला नोकरी हि "फडतूस" वाटते त्यामुळे असो!
पण आम्हाला इतिहासच पाहिजे फक्त ध्रुवीकरण करायला!

४. एखादा मुस्लिम नेता व्यासपीठावरून हिंदूंना हरामखोर, देशद्रोही अशी विशेषणे वापरत असेल तर त्याचा उल्लेख आपण कसा कराल हे ऐकायला आवडेल. मग हिंदू असलेला एक माणूस जर मुस्लिमांबाबत असे बोलत असे तर काय करायचे? हा माणूस जाहीरपणे अशा गोष्टी करून समाजाला कलुषित करत आहे आणि ध्रुवीकरण करत आहे.
कशाला पाहिजेत तलवारी कुठल्याही जनसमुदायाकडे? आहेत ना पोलीस आणि सैन्य भारतात? कि दहशत निर्माण करायची आहे?

एखादा माणूस चप्पल न घालता गडकिल्ले फिरतो, संघटन करतो तर त्यासाठी त्याचे कौतुक होईल पण हि असली जातीय तेढ निर्माण करण्याची मानसिकता असेल तर टीका देखील व्हायलाच हवी!

धन्यवाद शब्दसाहेब! परंतु श्रध्दाळू डोक्यांमध्ये त्याने किती प्रकाश पडेल, ते ‘त्याला’च माहिती.

या वादावरची संत साहित्य अभ्यासक मा. सदानंद मोरे यांची या संदर्भातली ताजी मुलाखत : मनू व मनूस्मृतीमधील फरक

मनू व मनूस्मृतीमधील फरक

(एबीपी माझा वरील सदर व्हिडियोवर राईट क्लिक केले असता "copy embed code" हा मेनू दिसला नाही, त्यामुळे हा व्हिडियो मी या प्रतिसादात एम्बेड करू शकलो नाही, कुणी मदत करु शकेल का ?)

माहितगार's picture

10 Jul 2018 - 1:56 pm | माहितगार

हम्म

@ दासबोध.कॉम

ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगतात ?

*मग देव म्हणे अगा पंडुसुता l हाची योगु आम्ही विवस्वता | कथिला परी ते वार्ताI बहुवा दिसांची ॥*
*मग तेणे विवस्वते रवी I हे योगस्थिती आघवीI निरोपिली बरवी मनू प्रति॥*
*मनूने आपण अनुष्ठिली I मग इक्ष्वाकुवा उपदेशिली I ऐसी परंपरा विस्तारिलीI आद्य हे गा॥*
थोडक्यात माऊली आपल्याला स्पष्टपणे सांगतात की परमेश्वराने त्याचे सर्व ज्ञान सर्वप्रथम विवस्वान याला दिले. त्याने तेच ज्ञान त्याच्या पिढीमध्ये पुढे प्रसारित केले. व हे सर्व ज्ञान ज्या मनूला प्राप्त झाले त्याने स्वतः तो योगमार्ग अंगीकारला ,त्याचे अनुष्ठान केले व तो योग सिद्ध झाल्यावर तोच योग त्याने इक्ष्वाकु ला देऊ केला. आणि हेच ज्ञान रघु वंशांमध्ये पुढे प्रसारित झाले. हे ज्ञान देण्याची पद्धत पूर्वी ग्रंथरूपात ग्रथित केली जात असे. तो ग्रंथ म्हणजेच मनुस्मृती होय.

तुमच्या उपरोक्त विधानातील / समजुतीतील "हे ज्ञान देण्याची पद्धत पूर्वी ग्रंथरूपात ग्रथित केली जात असे. तो ग्रंथ म्हणजेच मनुस्मृती होय." हा भाग प्रा. सदानंद मोरे नाकारत असावेत. ते भगवदगीता आणि मनुचा संबंध स्विकारतात, मनु आणि मनुस्मृतीचा संबंध म्हणजे वारकरी संप्रदायासाथी मनुस्मृती स्विकारत नाहीत तसेच त्यांना ज्ञानदेव तुकारामांपेक्षा ईतर कुणिही मोठे नाही असे काहीसे वरील मुलाखतीतून सुचवताहेत असे वाटते आहे.

विश्वाचा आकार केवढा?ज्याच्या-त्याच्या मेंदू एवढा !

जेम्स वांड's picture

10 Jul 2018 - 4:16 pm | जेम्स वांड

<blockquote>मला एक माणूस म्हणाला होता/माझा एक मित्र अमुक अमुक आहे तो म्हणतो/आमच्या ओळखीचे एक असे म्हणालेत वगैरे वाक्यं डिस्क्लेमर सारखी विधानाच्या आधीच जोडून मी वाटेल ते बोललो तर त्या विधानाच्या परिणामांचे उत्तरदायित्व घेणे मला लागू होईल का?</blockquote>

गुरुजींना, तो कोण मराठवाड्यातील शेतकरी भेटला होता, किंवा गुरुजी जे काही "मला एक माणूस बोलला होता" म्हणतात त्यांना त्या त्या विधानांचे उत्तरदायित्व लागू असेल का नसेल ? असले तरी गुरुजींनी सरळ त्या त्या विधाने करणाऱ्यांना जगासमोर आणावे अन सगळ्यांचीच तोंडे गप करून टाकावीत की. मला गुरुजींच्या गडसंवर्धन कार्याबद्दल अतिशय जास्त आदर आहे, ह्या वयातही डोंगरदऱ्या तुडवून इतिहास जपायची वृत्ती पण भारीच, फक्त तितकं एकदा गुरुजींनी त्यांच्यावर आलेलं किटाळ "हा सूर्य अन हा जयद्रथ" प्रमाणे एक घाव दोन तुकडे करून टाकावेत ही मनापासून इच्छा आहे, ज्यामुळे पुढे गुरुजींना आपले शिवकार्य चालवताना असल्या बिनकामी फंदात पडायची गरजच उरणार नाही.

माहितगार's picture

10 Jul 2018 - 4:40 pm | माहितगार

मला अबकड व्यक्ती हळक्षज्ञ म्हणाली, पण अबकड व्यक्तिची खासगीपण जपायचे असल्यामुळे अबकड बद्दल अधिक माहिती देणे शक्य नाही, असे होऊ शकते आणि अशी माहिती देण्याचा कायदेशीर दबाव टाकता येत नसतो. समजा अबकडने स्वतःहून येऊन स्वतःस सादर केले तर वेगळे.

...शिवछत्रपती आणि संभाजीमहाराज यांच्या विचारांचे ग्रहण करणाऱ्या हिंदूंचे पिढ्यानुपिढ्या आलेले राष्ट्रीयत्वाचे नपुंसकत्व का जाणार नाही...

असे विचार संभि नी मांडले असे मिपासदस्य दासबोध . कॉम म्हणतात. या विधानाच्या योग्यते बद्दल वेगळी चर्चा होऊ शकेल पण हे वाक्य सिद्ध करण्यासाठी उदाहरणातील अनेकवर्षापुर्वी भेटलेला खरा /काल्पनिक आंबेवाला समोर आणून उभा करण्याची गरज वाटत नाही असे माझे व्यक्तिगत मत.

हे जळगाव-जोशी आता वीस लाख-ट्रक सारखं होऊ लागलंय.

जोशी ब्राह्मण नाहीतच, पुरोगाम्यांचा कस्सा पचका झाला करणार्यांनी जोशी नक्की कोणत्या जातीचे आहेत तेपण सांगून टाक.

त्याचसोबत जमलंतर खैरलांजीमधले आरोपी कोणत्या जातीचे आहेत तेपण सांगा. म्हणजे त्याच्या पावत्या कोणाच्या नावाने, का फाडल्या जातात तेपण कळेल....

अच्छा.. म्हणजे तुम्ही मनुवादी मनुवादी म्हणून ओरडायला हरकत नाही. लं आम्ही ट्रक फिरवला की चालत नाही काय?

जेम्स वांड's picture

11 Jul 2018 - 2:03 pm | जेम्स वांड

धिस थ्रेड गॉट नो चिल

गामा पैलवान's picture

11 Jul 2018 - 5:55 pm | गामा पैलवान

शब्दबम्बाळ,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. मला काय वाटतं ते लिहितो.

१.

१. भिडेचें शिक्षण काय आहे? (फेबु वरती समर्थकांनी अगदी पीएचडी, फिजिक्स मध्ये गोल्ड मेडल, १०० च्या वरती शोधनिबंध असे बरेच काही लिहिलेले मी स्वतः देखील पहिले आहे. एके ठिकाणी तर ते नासा ला मदत करत होते वगैरे लिहिलेले होते! ते वाचून या सगळ्यांचीच सत्यता पडताळून घ्यावी वाटली)

याचा पूज्य भिड्यांच्या कार्याशी कसलाही संबंध नाही. नसलेली कामे पूज्य भिड्यांच्या गळ्यात मारणे ही हितशत्रूंनी उठवलेली अफवा दिसते आहे.

२.

पण जेव्हा सार्वजनिक जीवनात तुमच्याबद्दल काही गोष्टी "चांगल्या" म्हणून पसरवल्या जात असतील तर त्याचा पुरावा तुमच्याकडे असण्याची आवश्यकता असते असे मला तरी वाटते.

नसलेल्या पदव्या पूज्य भिड्यांच्या गळ्यात मारणे ही हितशत्रूंनी उठवलेली अफवा दिसते आहे.

३.

त्यात भिडे स्पष्ट बोलताना दिसत आहेत आंब्याविषयी! "मुलगा पाहिजे तर मुलगाच होतो" हेही ऐकू येतंय

ही पूज्य भिड्यांनी ऐकलेली वदंता आहे. पूज्य भिड्यांचा दावा नव्हे.

४.

त्याला विरोध झाला कि मग ते जे बोलले ते "रूपक" होते असा प्रचार सुरु झाला.

कारण की ते रूपक आहेच मुळी. ज्याप्रमाणे विवक्षित आंबा खाल्ल्याने निपुत्रिकास पुत्रप्राप्ती होते त्याप्रमाणे पूज्य भिड्यांची शिकवण आचरणात आणली की उदासीन माणूस उत्साही बनतो (किंवा तत्सम काही).

५.

'आंबा खाऊन संतती' होण्याच्या वक्तव्यावर नाशिक पालिकेच्या चौकशीत दोषी आढळलेत.

ही कसली चौकशी म्हणायची? चौकशी पोलीस करतात असं ऐकून आहे.

६.

'प्रसूतीपूर्व लिंग निदान तंत्र अधिनियम समिती' पीसीपीएनडीटीच्या प्राथमिक बैठकीत सदस्यांच्या चित्रफीत चौकशी अहवालात संभाजी भिडे दोषी आढळलेत.

आंबा खाऊन मुलगा होण्याचा गर्भलिंग निदानाशी काडीमात्र संबंध नाही. आणि स्त्रीभ्रूणहत्येशी तर नाहीच नाही. पूज्य भिड्यांना त्रास देण्यासाठी उगीच बादरायण संबंध जोडला आहे.

७.

काही इतके घाणेरडे आणि फालतू नियम आहेत त्यात कि बनवणाऱ्याच्या मानसिकतेची लाज वाटावी!

एखादा नियम मिळेल काय? मूळ संहितेत हवा.

८.

तशाच प्रतिक्रिया जुना हिंदू धर्म किती चांगला हे बोलल्यावर काही लोकांकडून आल्या तर त्यात गैर ते काय?

शिंदे व होळकर याच पद्धतीतनं पुढे आले ना? नारायण गुरूंनी याच धर्मातून केरळातली अस्पृश्यता नष्ट केली ना? सावरकरांनी याच हिंदू धर्मात राहून रत्नागिरी सुधरवली ना? पूज्य भिडे हा माणूस याच मार्गाने जातोय ना? मग त्याच्यावर इतकी आगपाखड का?

त्यातूनही हिंदू धर्माचा इतकाच द्वेष करायचा असेल तर जा पाकिस्तानात राहायला. तुमच्या कल्पनेतला स्वर्ग आहे ना तिथे. तुम्हाला तेच चांगलंय.

९.

पण काही लोकांना ते जून जे होत तेच परत हवे आहे असे वाटू लागलय, त्याला वेळीच थोपवायलाच हवे!

ते काही लोकं म्हणजे तुम्ही स्वत:च आहात. तुम्हांस सतत रडायची सवय लागली आहे. (संपादित) तो मोदी बघा डिक्की पुढे आणायला बघतोय. आणि तुम्ही आजूनही मनुस्मृती कवटाळून बसलाय.

१०.

यापेक्षा १ कोटी फंडिंग करून २००-३०० मराठी कंपन्या बनवा आणि हजारो मराठी तरुणांना कायमस्वरूपी राजगोर देऊन मराठी "उद्योग साम्राज्य" निर्माण करायचा ध्यास घेतला तर काहीतरी कल्याण होईल लोकांचं

अरे वा ! हे भिड्यांनी करायचं. मग तुम्ही काय करणार? मनुस्मृती अशी आणि तशी आहे, भिड्यांनी ह्यंव करायला पाहिजे आणि त्यंव करायला पाहिजे, म्हणून हुकूम सोडंत बसणार? मुलखाचे आळशी आहात तुम्ही.

८०+ वर्षांचा अकिंचन म्हातारा अविश्रांत कार्य करतोय त्याचं कौतुक सोडा, नुसता द्वेष करायचा. तो ही हिंदुद्वेष्ट्यांच्या बातम्या ऐकून. पारतंत्र्याकडे छानपैकी वाटचाल होते आहे.

११.

मग हिंदू असलेला एक माणूस जर मुस्लिमांबाबत असे बोलत असे तर काय करायचे?

याविषयी माहित नाही. आपला पास.

आ.न.,
-गा.पै.

शब्दबम्बाळ's picture

11 Jul 2018 - 8:47 pm | शब्दबम्बाळ

संपादक कारवाई करतील का?
गापै, आपण आपल्या पातळीवर आलात हे बरे झाले!

एक तर भिडेंना संपूर्ण प्रतिसादात मी काहीही अपशब्द वापरले नाहीयेत त्यामुळे तुमचा मेंदू इतका ठण ठण का करतोय ते बघून घ्या!
तुमच्याच पद्धतीचा छानपैकी प्रतिसाद दिला असता पण असल्या माणसावर वेळ कशाला वाया घालवा!
विचारांची पातळी वाढवा जरा जमलं तर!

(संपादित)

शब्दबम्बाळ's picture

12 Jul 2018 - 11:56 am | शब्दबम्बाळ

माझ्या इथल्या संपादित प्रतिसादामध्ये गापै यांचेच वाक्य मी "कोट" करून टाकले होते ते संपादकांकडून उडवण्यात आले आहे.
ते वाक्य म्हणजे मला दिलेली धमकी आहे का हे ही विचारले होते. मी असंसदीय काहीही बोललेलो नव्हतो. या (संपादनामुळे)कोणाला गैरसमज नसावेत यासाठी हा प्रतिसादप्रपंच!
संपादकांनीही खरंतर संपादन करताना, त्याच धाग्यावर प्रतिसाद्कर्त्याला तेथेच समज दिली गेली तर वाचणाऱ्याचा "माहितगारांचा" उडाला तसा गोंधळ उडणार नाही.

साहना's picture

12 Jul 2018 - 12:26 am | साहना

जबरी प्रतिसाद !

सोमनाथ खांदवे's picture

11 Jul 2018 - 8:39 pm | सोमनाथ खांदवे

गा.मा. जी हा मात्र तुम्ही मोठा बॉम्ब टाकलाय , अगोदरच मुलींची संख्या कमी असतांना " आंबा खाऊन मुलगा होण्याचा गर्भलिंग निदानाशी काडीमात्र संबंध नाही. आणि स्त्रीभ्रूणहत्येशी तर नाहीच नाही " अस बोलून तुम्ही मुलगाच हवा या जनतेच्या विचारांना पाठिंबा देताय .
अहो जस व्हिडिओ मध्ये ऐकू आल्या प्रमाणे परमपूज्य भिडे गुरूजींच्या आणि तुमच्या प्रतिसादा प्रमाणे आंबा खाऊन मूलगेच होत असतील तर का करायचे गर्भलिंग निदान ? फक्त त्या ' अबकड ' व्यक्तीच्या बागेतील आंबे खायचे .
खरं म्हणजे गुरूजींनी " सध्या मुलगा होण्यासाठी काही माणसं त्यांच्या बागेतील आंबा खाण्याचा सल्ला देतात , त्या मुळे मुलींची संख्या अजून कमी होऊन भारतातील जनसंख्ये चा समतोल बिघडून जाईल म्हणून सरकार ने त्या 'अबकड ' व्यक्तीवर कारवाई करावी " अस जर म्हणाले असते तर त्यांची उंची जनमानसांत अजून वाढली असती .

आंबा विषयक गैरसमजुती आणि लिंगपरीक्षण ह्यांचा इथे काडीचाही संबंध नाही. उलट आईवडिलांना जर मुलगाच हवा असेल तर आंबा खाण्यात बेकायदेशीर नाही. बंदी फक्त सोनोग्राफी वर आहे. इतर सर्व मार्ग वापरण्याचा पूर्ण अधिकार लोकांना आहे. मुलगा पाहिजे किंवा मुलगी हा जोडप्यांचा खाजगी प्रश्न असून गामा काय किंवा मी काय कुणालाही ह्यांत नाक खुपसण्याचा अधिकार नाही. कायदा फक्त सोनोग्राफीला लागू होतो. प्रार्थना, भावना, इच्छा, आंबा इत्यादींना नाही.

उद्या मुलगा पाहिजे म्हणून एखाद्या जोडप्याने देवळांत जाऊन प्रार्थना करायला भटजीला सांगितले तर भटजी ला जेल मध्ये टाकायचे काय ?

मार्कस ऑरेलियस's picture

11 Jul 2018 - 8:59 pm | मार्कस ऑरेलियस

हां तर कसं आहे की ....

कितीही चर्चा झाली , काथ्याकुट झाल तरीही काहीही उपेग नाही. भिडे गुरुजी त्यांच्या मुद्द्यांवर ठाम आहेत , भिडेंचे विरोधक त्यांच्या विरोधावर ठाम आहेत ! एकदम स्पष्ट डायकोटॉमी आहे ही. इर्रीकन्साईलेबल !!
तस्मात
आता कोर्टाला काय निर्णय घ्यायचाय ते कोर्ट घेईल , तोवर आपण वाट पहाणेच इष्ट !

जर ह्या देशात " छिनके लेंगे आजदी" "भारत तेरे टुकडे होंगे इन्शाल्लाह इन्शाल्लाह " सारर्ख्या विधानांवर कारवाई होत असेल तर " आंबा खाऊन पोरं होतात" "धर्मकर्तव्य सांगण्यात मनू ज्ञानोबा तुकोबांच्या एक पाऊल पुढे आहे " ह्या विधानांवरही सुयोग्य कारवाई होईल च की नै !!

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

इत्यलम =))))

फक्त आंबा खाऊन अपत्य प्राप्ती होते का इतर नेहमीची धडपड सुद्धा करणे आवश्यक आहे ? मी हल्ली आंबे खात असल्याने त्यातील एखादा आंबा ह्या बागेतला असला तर उगाच पंचायत व्हायची.

तेंडुलकरला त्याच्या संस्कृत च्या ज्ञानाविषयी विचारायचे, संस्कृत पंडिताला क्रिकेट बद्दल विचारायचे, शिवाजी महाराजांच्या केमिस्ट्री ज्ञानावर प्रबंध लिहायचा, तुकोबांच्या भूगोलाच्या ज्ञानावर किस पाडायचा असलेच खटाटोप घेऊन आपली मीडिया बसते आहे. भिडे गुरुजी आणि त्यांचे प्रजनन विषयक सल्ले ह्याला जास्त महत्व द्यायचे कारण नाही.

गामा पैलवान's picture

12 Jul 2018 - 1:16 am | गामा पैलवान

सोमनाथ खांदवे,

अहो जस व्हिडिओ मध्ये ऐकू आल्या प्रमाणे परमपूज्य भिडे गुरूजींच्या आणि तुमच्या प्रतिसादा प्रमाणे आंबा खाऊन मूलगेच होत असतील तर का करायचे गर्भलिंग निदान ? फक्त त्या ' अबकड ' व्यक्तीच्या बागेतील आंबे खायचे .

तेच तर मी म्हणतोय. आंब्याचा गर्भलिंगनिदानाशी कसलाही संबंध नाही. हां पण जर लोकांच्या मनोवृत्तीशी जोडायचा असेल तर हरकत नाही. अर्थात, आंबा वगैरे लोकांची समजूत आहे. तो पूज्य भिड्यांचा दोष नव्हे. भिड्यांनी नेहमी शहरी मध्यमवर्गीय लोकांना रुचेल पटेल अशीच विधानं का म्हणून करायची!

पूज्य भिड्यांनी चंद्र बघा म्हणून खाली तलावाकडे बोट दाखवलं. खाली तळ्यात चंद्राचं प्रतिबिंब आहे. एकतर ते बघा किंवा वर विरुद्ध दिशेने आकाशात प्रत्यक्ष चंद्र बघा. यापैकी काहीही न करता जर चंद्रदर्शनार्थ कोणी खाली जमीन उकरीत बसेल, तर ते चंद्रदर्शन नव्हे. ती लबाडी आहे.

आ.न.,
-गा.पै.

शब्दबम्बाळ,

१.

गापै, आपण आपल्या पातळीवर आलात हे बरे झाले!

माझी आणि पातळी? काहीही हं शब्दबम्बाळ! मला कसलीही पातळी नाही हे मोठ्या नम्रपणे नमूद करू इच्छितो.

२.

एक तर भिडेंना संपूर्ण प्रतिसादात मी काहीही अपशब्द वापरले नाहीयेत त्यामुळे तुमचा मेंदू इतका ठण ठण का करतोय ते बघून घ्या!

भिड्यांवर बेछूट आरोप करतांना लाज नाही वाटली तुम्हांस? आंब्याविषयी बोललं ती लोकांची समजूत आहे. शिवाय काय, की भिड्यांनी २०० कंपन्या खोलल्या पाहिजेत म्हणे. तुम्ही का नाही खोलंत?

३.

तुमच्याच पद्धतीचा छानपैकी प्रतिसाद दिला असता पण असल्या माणसावर वेळ कशाला वाया घालवा!

द्या की मग. कोणी अडवलंय!

४.

विचारांची पातळी वाढवा जरा जमलं तर!

आजिबात वाढवणार नाही. पूज्य भिड्यांचं मनुसंबंधी वक्तव्य चर्चेस घ्यायचं सोडून मनुस्मृतीवर घसरायची काय गरज होती? मनुस्मृतीच्या नावाने खडे फोडणाऱ्यांचा प्रतिवाद केलाच पाहिजे.

आयुष्यभर ज्याला धंद्यातला ध माहित नव्हता त्या म्हाताऱ्याने वयाच्या ऐशीव्या वर्षी म्हणे २०० कंपन्या उघडायला मदत करायची. फार सुंदर प्रस्ताव आहे. नेमक्या याच कारणासाठी मला तुमच्या पातळीस यायची कणभरही इच्छा नाही. तुमची पातळी तुम्हांस लखलाभ होवो.

उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा.

आ.न.,
-गा.पै

शब्दबम्बाळ's picture

12 Jul 2018 - 10:56 am | शब्दबम्बाळ

प्रतिसाद फाट्यावर मारण्यात येत आहे.
आपल्या प्रिय मनुस्मृतीबद्दल जी काय घालायची असेल ती भर "स्त्री : रुढी परंपरा ..मनुस्मृती आणि आपली भूमिका !" आणि "मनुस्मृति भाग (३)" इथे घाला!

आणि डोळ्यांनी नीट वाचता येत असेल तर मनुस्मृतीचा विषय दासबोध नि काढला आणि त्यांचं वाक्य कोट करून मी प्रतिसाद दिला हे आपल्याला दिसेल कदाचित...

माहितगार's picture

12 Jul 2018 - 9:24 am | माहितगार

* आधी दोघेही परंपरावादी आणि कथित पुरोगामी

"जन्माधारीत विषमता नाकारण्याची अपेक्षा करतो" आणि "जन्माधारीत विषमता नाकारतो" या दोन विधानांमध्ये संपण्याची चर्चा व्यक्तिगत होऊन कुठल्याकुठे येऊन पोहोचली आहे ?

* परंपरावादी

सावरकरांनी विज्ञानवाद स्विकारुन शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारण्यास शतकपुर्ती समारोह अजून किती वर्षांवर आहे हे मोजण्याची वेळ असताना, "जन्माधारीत विषमता नाकारतो" हे तीन शब्द बोलण्या लिहीण्यासाठी जीभ अथवा बोटे अडखळण्याचे खरे म्हणजे कारण नसावे. शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारण्याची गरज सावरकरांना सुमारे शंभर वर्षांपुर्वी उमजली, या मागे काही विचार असेल की नाही तो विचार समजून घेण्याचा परंपरावादी काही प्रयत्न करतात की नाही. शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारल्याने आणि आधुनिकीकरणाने हिंदू धर्म आणि संस्कृतीवर कोणतेही आभाळ कोसळण्याची शक्यता नाही. दुसर्‍या बाजूला तुमच्या मनाला सदोदीत छ्ळणारे स्पर्धक धर्म संस्कृती ग्रंथ प्रामाण्यावर आधारीत आहेत आणि ग्रंथप्रामाण्य नाकारल्या शिवाय त्याबाजूची कोंडी सुटण्याची शक्यता नाही. ग्रंथ प्रामाण्य आणि जन्माधारीत विषमता सुस्पष्टपणे नाकारत रहाण्यात नुकसानी पेक्षा फायदा सावरकरांना अधिक दिसला असावा तो इतर परंपरावाद्यांना का दिसत नसेल ?

* आता कथित पुरोगामी

वरच्या शब्दबंबाळ यांच्य प्रतिसादात काही रिकाम्या जागा भरतो .

याचा काही पुरावा कि उचलली जीभ? अबकड ग्रंथांवर भरपूर चर्चा झाली आहे ....आणि काही इतके घाणेरडे आणि फालतू नियम आहेत त्यात कि बनवणाऱ्याच्या मानसिकतेची लाज वाटावी! मग यावरसुद्धा ............ चांगलीच होती कालसुसंगत होती पण नंतर तिला वाईट बनवले गेले हे असले गोलमोल प्रचार करायचे!

जन्माधारीत विषमता नाकारण्यासाठी एक ग्रंथ प्रामाण्य नाकारण्याचे शब्दबंबाळ यांचे स्वागत पण अशा सुस्पष्ट पद्धतीने इतर धर्मीय ग्रंथांचे ग्रंथप्रामाण्य नाकारण्यास ते तयार आहेत का ? की त्या बाबत काही अडचण आहे ?

प्रतिसादाची प्रतिक्षा असेल.

शब्दबम्बाळ's picture

12 Jul 2018 - 10:48 am | शब्दबम्बाळ

ते "कथित पुरोगामी" वगैरे विशेषण लावायची काही आवश्यकता होती का? का हल्ली विशेषणे लावल्याशिवाय चर्चा होत नाहीत?
त्या गपै आयडीने आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी वैयक्तिक प्रतिसाद देऊनसुद्धा त्याचा साधा निषेध होत नाही इथे! असो...

तर तुम्हाला ज्या गाळलेल्या जागा हव्या होत्या त्या आधी एक धाग्यात भरलेल्या आहेत.
"मनुस्मृति भाग २" हा तो धागा! आणि खाली त्यातला मी श्रीगुरुजींनी दिलेला प्रतिसाद इथे देत आहे.

सहमत!
याचसाठी हिंदू धर्म हा अभिनंदनास पात्र ठरतो कारण नको असलेल्या गोष्टी टाकून देण्याची सुरु झालेली चळवळ हि अजूनही चालू आहे. बऱ्याच गोष्टी स्वीकारल्या जात आहेत काही ठिकाणी अजूनही संघर्ष आहे पण समाज सुधारणावादी झालेला आहे.

तुम्ही बहुदा कुराण बद्दल बोलत आहात, पण मग संदिग्ध का बोलायचं? त्यातही जे चुकीचं आहे ते लोकांनी सोडून दिलेच पाहिजे.
पण त्यासाठी लोकशिक्षण आणि चळवळीची गरज लागेल ते कोणी करायचं हा मोठा प्रश्न झालेला आहे!

माहितगार's picture

12 Jul 2018 - 11:17 am | माहितगार

...विशेषण लावायची काही आवश्यकता होती का?

आपण पूर्ण निरपेक्षता पाळत असल्यामुळे कथित हे विशेषण तुर्तास आपल्या पुरते मागे घेऊ इच्छितो . ( तसा कथितच्या मागे 'तथा' हा उपसर्ग टाळलेला होता :) -बघा माहितगार जरा जरा काळजी घेतात :) ) आपल्या प्रमाणे इतर पुरोगामी पूर्ण निरपेक्ष होणार नाहीत तो पर्यंत त्यांच्यासाठी मात्र ' कथित' , 'तथाकथित' चा उपयोग प्रसंग परत्वे चालू राहील. या निमीत्ताने माझ्या इतर बर्‍याच पुरोगामी घाग्यात आपला सहभाग असावा असे सांगावेसे वाटते.

...त्याचा साधा निषेध होत नाही इथे!

माझ्या वरच्या प्रतिसादात चर्चा व्यक्तिगत होत चालली असल्याकडे निर्देश केला आहे, अर्थात मी दोहोंनाही एकाच पारड्यात तोलले ( संपादकांनी सुद्धा दोघांचेही प्रतिसाद संपादीत केल्याचे दिसेल)

आपल्याही 'मनुस्मृती विषयक' प्रतिसादात "जन्माधारीत विषमता नाकारण्याची अपेक्षा करतो" या पाच शब्दा पलिकडे जाऊन आवश्यकते पेक्षा अधिक सरसकटीकरण नाहीना याची आपणच पुनश्च खात्री करावी. ज्याचे माप त्याच्या पदरी नक्की घालावे प्राचीन ग्रंथात कालपरत्वे प्रक्षिप्तता येत गेल्या असण्याच्या शक्यता आपण डोळे झाकून नाकारत नाही ना ? स्गळच वाईट किंवा सगळेच चांगले हा ब्लॅक अँड व्हाईट वाला अट्टाहास एक वेळ परंपरवाद्यांनी करणे ठिक पुरोगाम्यांनी टाळणे श्रेयस्कर असे माझे मत आहे. असो.

शब्दबम्बाळ's picture

12 Jul 2018 - 11:58 am | शब्दबम्बाळ

आपला गैरसमज झाला आहे.
( संपादकांनी सुद्धा दोघांचेही प्रतिसाद संपादीत केल्याचे दिसेल)

मी इथे उत्तर दिल आहे.

माहितगार's picture

12 Jul 2018 - 2:48 pm | माहितगार

सकारात्मक नोंद घेतली. अनेक आभार .

प्रकाश घाटपांडे's picture

12 Jul 2018 - 9:24 am | प्रकाश घाटपांडे

एकदा भिड्यांनाच बोलवा ब्वॉ मिपावर. सन्माननीय सदस्यत्व देउन टाका

माहितगार's picture

12 Jul 2018 - 9:39 am | माहितगार

:)

सोमनाथ खांदवे's picture

12 Jul 2018 - 10:36 am | सोमनाथ खांदवे

मला हे नाही समजले भिडे गुरुजींनी सगळे आयुष्य ज्या राजा साठी घालवले त्या राजा बद्दलचेच असले घाणेरडे उदाहरण ( आणि शिवाजी महाराजां च्या वडिलांचेच का ? ) दासबोध नामक आय डी वाल्याने का दिले ? आश्चर्य नाही वाटले . दासबोध आय डी सारख्या लोकांना सवयच कोल्ह्या सारखं बकरी चे कातडे पांघरूण बसायचे आणि समाजाला काळिमा फासायचं . औरंगाबाद च्या छिदंम सारखी अचानक मळमळ बाहेर काढायची नंतर पुन्हा सोशल मीडियावर नावे बदलून समाजाच्या वर्चस्वासाठी हिरहिरीने वाद घालत बसायचे अशाने समाजाबद्दल वितुष्टता अजून वाढणारच आहे .
आश्चर्य अजून एका गोष्टीचे वाटते की पिलीयन रायडर सोडून कोणीही दासबोध च्या या मुद्द्यावर प्रतिवाद केला नाही , दासबोध ची ती प्रतिक्रिया माझ्या सहित सर्वांच्या ' नजरेतून निसटली ' असेल असे आता आपण मानू या .

दासबोध.कॊम's picture
नशीब शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारला
10 Jul 2018 - 1:16 pm | दासबोध.कॊम
नशीब शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारला आणि त्याचे लेखी पुरावे मागे ठेवले नाही तर त्याला मारण्यापूर्वी शेवटचे जे पत्र त्यांनी लिहिले होते ज्यात ते म्हणाले होते की मी तुम्हाला घाबरलो आहे आणि तुम्ही मला पितृतुल्य आहात त्यावरून तेवढेच पत्र उचलून लोकांनी इतिहास लिहिला असता की अफजल खानाला शिवाजी महाराज वडिलांप्रमाणे मानत होते. भिडे गुरुजी जर असे म्हणाले की मला एक जण म्हणाला आणि पुढे काही वाक्य बोलले तर ते गुरुजींचे वाक्य कसे काय ठरेल ?

प्रसाद_१९८२'s picture

12 Jul 2018 - 11:02 am | प्रसाद_१९८२

दासबोध.कॉम यांच्या वरिल प्रतिसादात तुम्हाला मळमळ वगैरे कुठुन दिसली ?
---
संपूर्ण भाषणातून एकादे वाक्य उचलून, त्यातून सध्याची प्रसारमाध्यमे अर्थाचा अनर्थ कशी करतात, ह्याचे फक्त उदाहरण त्यांनी दिले आहे असे मला तरी वाटते. शिवाय ज्या पत्राचा उल्लेख दासबोध.कॉम यांनी केला आहे ते अस्सल पत्र आजही उपलब्ध आहे.

....ते अस्सल पत्र आजही उपलब्ध आहे.

बहुतेक टाळण्याजोगे गैरसमज होताहेत पण मूळ साहित्याचे परिपूर्ण संदर्भ न देता लेखन गैरसमजांना वाढवणारे असते , आणि परिपूर्ण संदर्भ उपलब्ध करण्याबाबतीत सर्वच मराठी निष्काळजी का असतात ते उमजत नाही.

सोमनाथ खांदवे's picture

12 Jul 2018 - 12:25 pm | सोमनाथ खांदवे

प्रसाद साहेब ,
यात तुम्हांला दासबोध. कॉम ची मळमळ दिसली नाही यात सर्व काही आले . हाच तो फरक !!!!!! व्यवस्थित वाचून सुद्धा हवे ' तेच ' पुढे घ्यायचे . ते पत्र आहे की नाही हा वादच नाहीये , दासबोध .कॉम ला उदाहरण देताना नेमकं शिवाजी राजे नीं लिहलेल्या त्याच पत्राचा आधार घ्यावासा का वाटला ? शिवाजी महाराजां बद्दल कोणीही काही वाक्य जोडून तोडून लिहावी ? आपण कुठे महाराज कुठे याच साधं भान नसावं ? म्हणून मी संयमाने मळमळ हा शब्द वापरला .
बाकी काय बोलचाच भात आणि बोलचीच कढी !! . अशा ' विशिष्ट प्रतिक्रिया ' चीं जाणूनबुजून पाठराखण होत असेल तर हिंदू एकजुटी ची पोपटपंची सोशीलमीडिया वर सुद्धा चालणार नाही .

जेम्स वांड's picture

12 Jul 2018 - 12:40 pm | जेम्स वांड

आसेतु हिमाचल हिंदू एक व्हावा म्हणायचं अन मग असले प्रकार.....

यात मळ्मळ काय अहे हे मलाही कळले नाही.
यात त्रागा आहे, सिलेक्टिव्ह पत्रकारिता करणार्‍यांबद्दल.. आणि यात कुठेही शिवाजीराजांचा अपमान केलेला नाही. त्यामुळे तुम्हाला त्रास व्हायचं कारण कळलं नाही.

अवांतर - बेअरिंग सुटत चाललंय.., डु आयडी असेल तर उघडा पडेल हां !

सोमनाथ खांदवे's picture

12 Jul 2018 - 7:12 pm | सोमनाथ खांदवे

जाऊ द्या हो !!!!
एका नंतर दुसरा मग तिसरा , पिचकारी मारून गेलेल्या दासबोध .कॉम साठी सगळे टप्प्या टप्प्या ने रिंगणात येत आहेत . बरोबर मुस्कटदाबी करतात हो !! चालू द्या असच , माझं च चुकलं मी मुखवट्या मागे वेगळे चेहरे असलेल्या लोकां मध्ये वावरत होतो .
अवांतर :
मी कायम एकच भूमिका ठेवली आणि मनाला पटेल तेच बोलतो , चुकलं तर कबूल करून पाऊल मागे घेतो . त्या मुळे डू आयडी उघडा पडणं हा प्रकार मला माहित नाही ( सं .मं विचारुन खात्री करा )

आनन्दा's picture

12 Jul 2018 - 11:49 pm | आनन्दा

हा हा हा.
तुम्हाला प्रतिसाद कळला नाहीये किंवा तुम्ही फारच संतप्त झालेले आहात.

असो. सगळे शांत झले की पुन्हा एकदा विचार करा. मग अनेक निसटत्या बाजू समजतील.. किंवा कदाचित समजणार देखील नाहीत. कारण तुम्हाला कदाचित दुसरी बाजू माहीतच नसावी. असो.
तक्रार नाही.

जेम्स वांड's picture

12 Jul 2018 - 12:23 pm | जेम्स वांड

श्रीपाद छिंदम हा मनुष्य अहमदनगरचा होय औरंगाबादचा नाही. बाकी सहमत

सोमनाथ खांदवे's picture

12 Jul 2018 - 1:04 pm | सोमनाथ खांदवे

नाही तर काय !!कसली आली एकजूट ? विनाकारण पुराणातील वांगी बाहेर काढणाऱ्या ला पाठिंबा द्यायचा मग त्या साठी महापुरुषा चा अपमान झाला तरी चालेल . मी तर म्हणेन तोंडावर कंट्रोल नसलेल्या लोकांनी ' दासबोध .कॉम ' सारखा आयडी घेतल्या मूळे दासबोध ची सुद्धा प्रतिमा मालिन होत आहे . निसर्गात भरपूर गोष्टी आहेत घ्या ना त्यातले एखादे नाव किंवा ठेवा स्वतः चे ओरिजनल नाव .

माहितगार's picture

12 Jul 2018 - 2:37 pm | माहितगार

त्यांच्या दुसर्‍या एका धाग्यावरच्या प्रतिसादानुसार त्यांचा दासबोध.कॉम शी काही संबंध नाही. आणि मी त्यांना दिशाभूल टाळण्यास हलकेच सुचवले होते.

बाकी त्यांच्या लेखनाबद्दल त्यांनी स्वतः स्पष्टीकरण करणे अधिक उत्तम असावे. त्यांचा उद्देश्य अर्ध्या माहितीवर आधारीत चुकीचे अर्थ काढू नयेत असे सुचवण्याचा मर्यादीत असावा असे वाटले, पण भिडेंचे आंबांसंबधीत पूर्ण ओरीजीनल व्हिडीओ आणि त्यांनी उल्लेखिलेले पत्र आणि किंवा संदर्भ वाचनात आलेले नसल्याने ; तसेच त्या शिवाय त्यांयाशी इतरत्र व्यक्त केलेल्या मतांतरास त्यांची उत्तरेही आलेली नसताना, मत व्यक्त करण्याची घाई करणे श्रेयस्कर वाटले नव्हते.

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

July 11, 2018

भिडे गुरुजींनी तरुणांना काय शिकवले असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या त्या सर्वांना हे एक सडेतोड उदाहरण आहे !

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

थायलंड येथे एका गुहेत अडकलेल्या बारा मुलांना व त्यांच्या फुटबॉल कोच यांना त्या दुर्गम गुहेतून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असताना जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे रेस्क्यु टिमला अडथळे येउ लागले.

थायलंड सरकारने भारत सरकारकडे मदत मागितल्यानंतर किर्लोस्कर ब्रदर्सचे फ्लडपंप पाठविण्यास सांगितले. किर्लोस्कर ब्रदर्समध्ये अभियंते ( डिसाईन प्रमुख ) म्हणून कार्यरत असणारे प्रसाद कुलकर्णी यांच्यासोबत एक टिम थायलंड येथे पोहचली. तब्बल अडिच किलोमीटर गुहेतील पाणी उपसून खेळाडूंना बाहेर काढण्यात आले.

सर्व स्तरातून भारताच्या या गौरवास्पद कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या रेस्क्यु टिम मध्ये अभियंता ( डिसाइन प्रमुख ) म्हणून जबाबदार व्यक्ती असणारे प्रसाद कुलकर्णी सर हे एक आहेत !

कोण आहेत हे प्रसाद कुलकर्णी ? हे मुळचे सांगलीच्या मिरज तालुक्यात राहणारे आणि आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींचे निस्सीम धारकरी आहेत. पूर्वीपासून प्रसाद कुलकर्णी सर हे मिरजमध्ये भिडे गुरुजींनी देव देश धर्म शिवछत्रपती - संभाजी महाराजांच्या मार्गावर चालणारे धारकरी म्हणून तिथे कार्यरत होते. भिडे गुरुजींनी दाखवलेल्या राष्ट्रनिर्माणाच्या मार्गावर चालणारे असे शेकडों तरुण भविष्यात अनेक क्षेत्रात उज्ज्वल कार्य करत असताना आढळून येतात. भिडे गुरुजींनी जे हजारों तरुण उभे केलेले आहेत त्यांच्यापैकीच एक म्हणजे प्रसाद कुलकर्णी सर !

आता काही मुर्ख जातीयवादी लोक प्रसाद कुलकर्णी सरांचे आडनाव कुलकर्णी आहे आणि त्यांची जात काय म्हणूनही बोंबाबोंब करतील काही सांगता येत नाही. प्रत्येक ठिकाणी जातीय चष्मा घालणाऱ्यांना केलेल्या कामगिरी पेक्षा जात कुठली हे जास्त महत्वाचे वाटते म्हणून या चांगल्या कार्याबद्दल एक चकार शब्दही काढणार नाहीत !

भिडे गुरुजींनी तरुणांना काय शिकवले असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सर्वांना हे एक सडेतोड उत्तर आहे !

(कायप्पावर मला आलेले ढकलपत्र)

सोमनाथ खांदवे's picture

13 Jul 2018 - 1:17 pm | सोमनाथ खांदवे

' पाणी उपसून बाहेर काढल्या मूळे त्या मुलांचा जीव वाचला ' अस आंतरराष्ट्रीय मिडिया ने कौतुक केलेली फक्त एक लिंक द्या.
नाही तस सगळ्या भारताला कौतुक आहे त्या किर्लोस्कर कं चे पण फक्त ' कुलकर्णी ' नाव घेऊन किर्लोस्कर च महत्व कमी होतंय .

मंदार भालेराव's picture

12 Jul 2018 - 11:58 am | मंदार भालेराव

लै दिवसांनी पॉपकॉर्न वाला धागा आलाय, चिज कॅरॅमल चा मोठा टब घेऊन येतोय.

स्वधर्म's picture

12 Jul 2018 - 1:59 pm | स्वधर्म

भिडे गुरुजींना झालंय काय? काहीही नाही. ते तसेच आहेत आणि तसेच राहतील. झालंय फक्त एवढंच, की त्यांच्या सारखे विचार असणार्यांप्रति सहानुभूती असलेले सरकार सध्या आहे, त्यामुळे असे विचार समाजात मांडणे, त्यांना अनुयायी मिळणे वगैरे काहीसे वाढले आहे. ते तसेच राहतील म्हणण्याचे कारण म्हणजे इथे आलेल्या प्रतिक्रीया! उदाहरणार्थ गा पैना अजूनही मनुस्मृतीत आक्षेपार्ह काय आहे, असा प्रश्न पडला आहे. माहीतगार यांनी त्यांना मनुस्मृतीच्या धाग्यावर प्रश्न विचारला होता: तुंम्ही स्वत:ची समजूत कशी घालता म्हणून. भरपूर चर्चा झाली होती, पण पुन्हा तेच समर्थन! चालायचंच.

गामा पैलवान's picture

12 Jul 2018 - 10:19 pm | गामा पैलवान

शब्दबम्बाळ,

आणि डोळ्यांनी नीट वाचता येत असेल तर मनुस्मृतीचा विषय दासबोध नि काढला आणि त्यांचं वाक्य कोट करून मी प्रतिसाद दिला हे आपल्याला दिसेल कदाचित...

मनुस्मृतीचा विषय काढला की तुम्हाला फक्त आक्षेपार्ह गोष्टीच दिसतात. जमल्यास स्वीकारार्ह गोष्टीही बघंत चला. संवाद वाढवण्यास फायदा होतो. उदा . : आंबेडकरांनी मानुस्मृतीच्या आधारे घटनेत तरतुदी टाकल्या आहेत.

आ.न.,
-गा.पै.

मार्कस ऑरेलियस's picture

12 Jul 2018 - 10:27 pm | मार्कस ऑरेलियस

आंबेडकरांनी मानुस्मृतीच्या आधारे घटनेत तरतुदी टाकल्या आहेत.

गा.पै,

एक अतिषय नम्र विनंती. ह्या वरील विधानला समर्थन करण्यास काही उदाहरणे पुराव्यासह देता येतील का ? सदर दाव अन्यत्र काहीठिकाणी पाहिला अहे पण त्याला सबळ पुरावा कधीच दिसल नाहीये.

पुराव्याशिवाय बोलायला लागलो तर रॅशनल हिंदुत्ववादी आणि स्वमतांध तथाकथित पुरोगामी लोकांत काय फरक राहील ?

-
आ.न.
मा.ऑ

सोमनाथ खांदवे's picture

13 Jul 2018 - 8:40 am | सोमनाथ खांदवे

छया !! छया !!!
हवेत गोळीबाराला कोणी पुरावा देत का ?
हजारो वर्षांपूर्वी लिहलेल्या मनुस्मृती प्रमाणे त्यात वर्णिलेल्या चार जाती आजच्या जीवनात कालबाह्य झालेल्या आहेत
सगळे ब्राह्मण यज्ञ करून भिक्षुकी मागून जीवन जगतात का ?
सगळे क्षत्रिय फक्त सैन्यात जातात का ?
वैश्य मात्र त्यांना नेमून दिलेले च काम करत आहेत
सगळे क्षुद्र वरील तिघांची सेवा करतात का ?
मग कशाला भिडे गुरुजींनी आणि त्यांच्या समर्थकांनी मनुस्मृती ची भलामण करून गदारोळ उडवून दिला आहे ?
आणि मनुस्मृती समर्थकांचे म्हणणे जर खर असेल तर शरिया , तीन तलाक , बुर्कां ह्ये विषय वादग्रस्त आणि कालबाह्य कसे होऊ शकतात ?

मार्कस ऑरेलियस's picture

13 Jul 2018 - 9:26 am | मार्कस ऑरेलियस

सोमनाथ ,

तुमचा प्रतिसाद निरुपयोगी आहे ! जर आनगापै " मनुस्मृतीचा आजच्या भारतीय घटनेला आधार आहे " हे पुराव्याने शाबित करत नसतील तर " मनुस्मृतीचा काडीमात्र आधार नाहीये संविधानाला" हे तुम्ही सिध्द करा !

नुसता शब्दच्छल करुन काय उपेग ?

आम्हाला सुर्य उगवल्याशी मतलब आहे मग तो तुमच्या कोंबड्याच्या आरवण्याने उगवो कि गा.पैं. च्या !

सोमनाथ खांदवे's picture

13 Jul 2018 - 10:23 am | सोमनाथ खांदवे

अहो मार्कस ,
मला सुध्दा तेच म्हणायचे आहे !!
फक्त गा पा पैलवान असल्या मुळे मी त्यांना डायरेक्ट विरोध न करता तुमच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली .काय राव !! मी आता गियर चेंज केला आहे , मुखवट्या मागचे चेहरे आताशी कुठे दिसायला लागले आहेत .
आणि बाबासाहेबांनी मनुस्मृती मधील तरतुदी वापरल्या असत्या तर त्यांनी मनुस्मृति जाळला असता का ?

3 % असलेल्या उच्चवर्णीयां मध्येच आंतरजातीय विवाहा चे प्रमाण का जास्त आहे ? आणि मग कुठे गेला तो वर्णसंकर चा नियम ?

वृद्धाश्रमात उच्च वर्णीयांचेच म्हातारे आईवडील असण्याचे प्रमाण जास्त का आहे ? " माता पिता आचार्य यांचा अनादर करू नये " मग या वाक्याला अर्थ काय ?

मनुस्मृती प्रमाणे उच्च लोकच वागत नसतील तर त्यांनी मनुस्मृती ची भलामण का करावी ?
कोरगाव भीमा प्रकरण व्यवस्थित पणे का वाढत गेलं ? साम दाम दंड भेद वापरा आणि राज्य करा बस .

मंदार भालेराव's picture

16 Jul 2018 - 11:30 am | मंदार भालेराव

3 % असलेल्या उच्चवर्णीयां मध्येच आंतरजातीय विवाहा चे प्रमाण का जास्त आहे ?

वृद्धाश्रमात उच्च वर्णीयांचेच म्हातारे आईवडील असण्याचे प्रमाण जास्त का आहे ? "

याला काही संदर्भ आहे का नसल्यास प्रतिसाद संपादित करावा हि विनंती.

सोमनाथ खांदवे's picture

16 Jul 2018 - 3:57 pm | सोमनाथ खांदवे

मिपावर च वाचलं होतं प्रतिसादा मध्ये , शोधतोय .

टवाळ कार्टा's picture

25 Jul 2018 - 1:57 pm | टवाळ कार्टा

व्वा :)

गामा पैलवान's picture

12 Jul 2018 - 10:25 pm | गामा पैलवान

स्वधर्म,

उदाहरणार्थ गा पैना अजूनही मनुस्मृतीत आक्षेपार्ह काय आहे, असा प्रश्न पडला आहे.

मनुस्मृतीचा अन्वयार्थ ( = इंटरप्रीटेशन ) वेगळ्या प्रकारे लावला पाहिजे. मी लावलेला जरासा वेगळा अर्थ इथे सापडेल :

१. https://www.misalpav.com/comment/966587#comment-966587
२. मनुस्मृती आणि विवाह : https://www.misalpav.com/comment/966928#comment-966928

वरील दोन्ही प्रतिसाद परिपूर्ण नाहीत. पण मनुस्मृतीस वेगळ्या प्रकाशात पाहता येऊ शकतं, हा मुद्दा स्पष्ट व्हावा.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

13 Jul 2018 - 9:51 am | माहितगार

गापै , 'मी मानत असलेल्या इश्वरांस्मोर सर्व मानव सारखे आहेत, म्हणून मी जन्माधारीत विषमता नाकारतो' खूपच क्मी शब्दांच वाक्य आहे, आपल्याच इश्वराचे मोठेपण मनाने स्विकारण्यासाठी काही सेकंद आणि कॉपी पेस्ट करण्यासाठी किबोर्ड वर चार पेक्षा अधिक टिचक्यपण माराव्या लागत नाहीत, तेव्हा ...........

जो अर्थ सुस्पष्ट दिसतो, त्याचा मुद्दामहून ‘जरासा वेगळा’ अर्थ कशाला लावायचा? तो कसा पवित्र ग्रंथ आहे दाखवायला? तुंम्ही कसा अर्थ लावता याला बिल्कुल महत्व नसून बहुसंख्य लोक तो कसा लावतात, आपल्याच बांधवांप्रति अत्यंत हीन वर्तनाचे समर्थन करायला तो कसा वापरतात आणि त्यामुळे शतकानुशतके समाजाची कशी अपरिमित हानी होते, याला महत्व आहे. तुंम्ही ‘लावलेला’ उदात्त अर्थसुध्दा स्त्रियांप्रति किती विषमता निर्माण करणारा आहे, हे तुम्ही दिलेल्या लिंक्सवर जाउन स्वत: पहावे अशी समस्त मिपाकरांना विनंती.
हे असे वेगळे अर्थ लावण्यापेक्षा सरळ माहितगार यांनी लिहीलेल्या 'मी मानत असलेल्या इश्वरांस्मोर सर्व मानव सारखे आहेत, म्हणून मी जन्माधारीत विषमता नाकारतो' या वाक्याला तुमची सहमती आहे का असहमती, ते सांगा.

सोमनाथ खांदवे's picture

12 Jul 2018 - 11:05 pm | सोमनाथ खांदवे

सवर्ण कन्येशी विवाह न करिता जो ब्राह्मण शूद्र स्त्रीस भोगाकरिता आपल्या शय्येवर आरोपित करतो (तिच्याशी विवाह करतो) तो अधोगतीस जातो व तिच्या ठायी पुत्राची उत्पत्ति केल्याने तो आपल्या ब्राह्मण्यापासूनच भ्रष्ट होतो. ॥१७॥

मनुस्मृती मध्ये किती व्यवस्थित सांगितले आहे शुद्र स्त्री बद्दल तरी पण त्याच्या अगदी उलट वर्णन ' माझा प्रवास ' या पुस्तकात झाशी या शहरातील नारायणशाश्री आणि 159 भटजी च्या कर्तृत्वा चे वर्णन केले गेले आहे
http://aisiakshare.com/node/5250
असं समजूया तो भटजी आणि ते पुस्तक सगळे खोटं आहे .
धागा मिपा पिनल कोड मध्ये बसेल का ? तरी पण स्वजबाबदारी वर उघडावा .
त्या पुस्तकाची पी डी एफ सुद्धा आहे जमलं तर चितकवतो .

मार्कस ऑरेलियस,

ह्या वरील विधानला समर्थन करण्यास काही उदाहरणे पुराव्यासह देता येतील का ?

माझ्याकडून चुकीचं विधान केलं गेलं. त्याबद्दल क्षमा असावी. घटनेतल्या तत्रुडी मनुस्मृतीवरनं घेतलेल्या नाहीत.

मला हिंदू कोड बिल म्हणायचं होतं. आंबेडकरांना संस्कृत येत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या हिंदू कोड बिल समितीने अनेक शास्त्रीपंडितांकरवी मनुस्मृती व इतर ग्रंथ समजावून घेतले. त्याच दरम्यान (१९४९ च्या आसपास) घटना लिहिण्याचं कामही चालू होतं. घटनासमितीपुढे भाषण करतांना आंबेडकरांनी मनु व याज्ञवल्क्य या दोघांच्या स्मृती उच्च दर्जाच्या असल्याचं म्हंटलंय.

यासंबंधी इथे एक उल्लेख आहे : http://antisambhajibriged1.blogspot.com/2012/12/blog-post_1142.html

मूळ मुद्दा मनुस्मृतीच्या उपयोगहीनतेचा होता. विरोधक समजतात तितकी ती टाकाऊ नाही.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

13 Jul 2018 - 6:22 pm | माहितगार

कायेन गापैजी, सध्याचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद आहेत, अबकड पर्सनल लॉ मध्ये काही बदल करण्यासाठी आणि समजूत काढण्यासाठी पवित्र ग्रंथा मधल्या काही चांगल्या तरतुदींचा प्रासंगिक आधार रविशंकर प्रसादांनी घेतला तर सबंध पवित्र ग्रंथास स्विकारलेच असा अर्थ होत नसावा. जसे गुलामगिरीचे समर्थन , स्त्री दास्य, जन्मधारीत विषमता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारणे , अनिष्ठ रुढी कोणत्याही ग्रंथाचा आधार घेत असतील तर ते संबंधीत ग्रंथामधील अनिष्ठ भाग नाकारावाच लागतो.

बाकीचा चंद्र बघा बाकिचा चंद्र बघा कितीही म्हणाले तरी चंद्रावरचा डाग लपत नसतो . डागाचे समर्थन करण्यासाठी चंद्राच्या बाकीचे सौंदर्य उपयोगी येईलच असे नसावे. जन्माधारीत विषमतेच्या डागाचे समर्थन करत नसल्याचे स्विकारावे आणि आपल्या मोठ्या मनाची पावती द्यावी असे सुचवावेसे वाटते , बाकी आपली मर्जी.

गामा पैलवान's picture

14 Jul 2018 - 2:00 am | गामा पैलवान

माहितगार,

तुम्ही म्हणता की चंद्रावर डाग आहे. पण हिंदू समाजातल्या विषमतेला मनुस्मृतीस जबाबदार का धरण्यात आलंय? नक्की संबंध काय दोहोंत? हिंदू समाजात जी काही विषमता आलेली आहे ती परक्या राजवटींत. तिचं लोढणं मनुस्मृतीच्या गळ्यांत का म्हणून?

आसामात अस्पृश्यता अगदी नाममात्र होती. तीसुद्धा इंग्रजी राजवटीत उत्पन्न झालेली होती. मग आसामी हिंदूंच्या समतेचं श्रेय मनुस्मृतीस मिळणार का?

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

14 Jul 2018 - 9:34 am | माहितगार

तुमचे अंशतः बरोबरे गापै ! , बहुतेक सर्वच धर्मांचे परंपरावादी आपापल्या धर्मग्रंथात अनिष्ठ असे काही नाहीच / नव्हतेच हा मुद्दा मांडतात. व्यवस्थित सिद्ध करुन दिले तर या ग्रंथातील अयोग्य गोष्टीच्या समर्थनाचा परिणाम समाजावर झाला हे ऐतिहासिक पुराव्यांनी सिद्ध करुन दाखवा म्हणतात, असे काही पुरावे देणे अशक्य नसले तरी प्रत्यक्ष पुराव्यांची संख्या कमी असल्याने संशयाचा फायदा इथे तिथे मिळत राहातो. (इथे इतर मिपासदस्य पुरेसे दाखले देतील त्यासाठी सहसा माझी जरुर भासू नये , भासल्यास कळवावे)

अलिकडे दुसर्‍या धाग्यावर आपण पाकीस्तानी कॅनेडियन डॉक्टर अली रिझवी यांच्या पुस्तकावर चर्चा करत होतो. जे लोक कुराण आणि अतिरेकी वृत्तीचा संबंध नाकारतात किंवा इज्राएल आणि काश्मिर संघर्षावर टाकतात त्यांच्या साठी त्यांनी १८ व्या शतकातला एक आफ्रिकी देश कुराणच्या नावाने जहाजे लुटणार्‍यांना कशी सुरक्षा देत होता याचे वर्णन केले आहे. अमुक ग्रंथ अथवा चित्रपट बघणारे सर्वच लोक त्यातील चुकीच्या संदेशांचे पालन करतात असे नाही पण दिशा चुकलेले व्यक्ती आणि समुह ग्रंथ प्रामाण्याचे आधार घेऊन अनिष्ठ कृती करण्यास प्रवृत्त होत असतात हे वास्तव परंपरावादी आणि सापेक्ष झालेले तथाकथित पुरोगामी दोघेही नाकारत असतात.

ग्रंथातील मग ते कोणतेही असोत अनिष्ठतेला अनिष्ठ म्हणणे आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारणे हेच आपल्यातील अनिष्ठतेचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन धुवून काढण्याचा एकमेव मार्ग असावा असे वाटते.

मी वर म्हटल्या प्रमाणे बहुतांश हिंदू ग्रंथ प्रामाण्य आणि अनिष्ठता नाकरुन पुढे गेले आहेत. उरलेल्यांनी ग्रंथातील अनिष्ठ भाग मनमोकळे पणाने नाकारुन पुढे जाण्यार्‍यांची कास धरणे त्यांच्या स्वतःचे प्रेम असलेल्या हिंदू धर्माच्या खर्‍या उन्नती साठी अत्यंत गरजेचे असावे. मुख्य म्हणजे अन्यथा इतर स्पर्धक धर्मीयांच्या ग्रंथ प्रामाण्याला नाकारण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार रहात नाही. आणि हि मोठी विचीत्र स्थिती आहे. आधूनिक काळात 'मी चांगला होत नाही तू चांगला हो ' हे विधान फारकाळ विकले जाणार नाही, 'आम्ही चांगले झालोय आता चांगले होण्याची तुमची वेळ आहे' हे विधान व्यवस्थित परिणामकारक ठरते.

मनुस्मृतीतल्या उणीवा आणि त्यांचे अनिष्ठ परिणामाचे दाखले पुन्हा पुन्हा देता येऊ शकतील ती मोठी गोष्ट नाही , मुख्य म्हणजे एकदा का ' ईश्वरासमोर सर्व समान आहेत आणि म्हणून जन्माधारीत विषमता, अनिष्ठता आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारतो ' हे स्विकारले जाणे ग्रंथाच्या योग्यायोग्यतेवरील चिकित्सेच्या आधी आणि टिकेपेक्षाही अधिक महत्वाचे आहे. एकदा ' ईश्वरासमोर सर्व समान आहेत आणि म्हणून जन्माधारीत विषमता, अनिष्ठता आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारतो , आणि निर्णय ग्रंथ प्रामाण्या एवजी विवेकाने करतो म्हटले तर ग्रंथांवर टिका करण्याचे प्रयोजन सर्वसामान्यासाठी कमी होऊन जात असावे.

एकदा लांछनाचे समर्थन करत नाही म्हटले की उरलेल्या चंद्राचे गुणगाण करण्यास तुम्ही मोकळे आहात. हवे तर ज्ञानदेवांचे पसायदान आणि टागोरांचे व्हेअर द मांईड इज विदाऊट फिअर पुन्हा एकदा वाचून घ्यावे.

जमल्यास बघावे मी काय म्हणतो ते लक्षात घ्यायचे का ते

सोमनाथ खांदवे's picture

14 Jul 2018 - 4:17 am | सोमनाथ खांदवे

मिपावरील तमाम कायदेपंडित पुन्हा एकदा अभ्यास करण्याची गरज पडण्याची शक्यता आहे , खास करून दासबोध. कॉम.

MT: ‘मुलगा’ शब्द भिडेंच्या अंगलट
http://mtonline.in/76Q2Nb/dga via @mataonline: http://app.mtmobile.in

माहितगार's picture

14 Jul 2018 - 8:46 am | माहितगार

साबजी कायदा वाचलेला आहे, व्हिडीओ तेवढाच त्यांच्याच शेतातल्या आंब्या पुरता असेल तर ते बहुधा कायद्याच्या कचाट्यात अडकावेत. पण मिपासदस्य दासबोध.कॉम म्हणतात तसे , त्या सबंध असलेल्या व्हिडीओत त्यांनी दुसर्‍या कुणाच्या बद्दलचा उल्लेख रुपक म्हणून केला असेल कोर्टा समोर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत संभिंना त्यांची बाजू मांडता येऊ शकते, पण तो पर्यंत चौकश्या आणि कोर्ट केसेसचा त्रास होऊ शकतो.

माहितगार,

१.

दिशा चुकलेले व्यक्ती आणि समुह ग्रंथ प्रामाण्याचे आधार घेऊन अनिष्ठ कृती करण्यास प्रवृत्त होत असतात

कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. अशा मोमीनांना दिशा चुकलेले म्हणता येतं. मात्र मनुस्मृतीच्या आधारे अत्याचार केलेले आढळून येतात का? निदान एखादी नोंद तरी? मनुस्मृतीचे असे काही ठाम आणि ठोस अनुयायी कोणीतरी कधीतरी ऐकलेत का? नसल्यास मनुस्मृतीच्या नावे शिमगा कशासाठी?

कम्युनिस्टांनी मार्क्सचं नाव घेऊन जगभरात अनन्वित अत्याचार केलेत. मग दास कॅपिटलला कोणी मयतीचं पुस्तक म्हणतो का? मग ती विषमतेची धोंड मनुच्या गळ्यांत कशासाठी?

२.

मनुस्मृतीतल्या उणीवा आणि त्यांचे अनिष्ठ परिणामाचे दाखले पुन्हा पुन्हा देता येऊ शकतील ती मोठी गोष्ट
नाही

एखादा ग्रंथ काही प्रमाणात कालबाह्य झाला असेल तर त्यातला कालबाह्य नसलेला भाग व कालोचित इतर विचार घेऊन नवीन कालसुसंगत ग्रंथ निर्माण करता येतो ना? मग जुन्या अर्धवट कालबाह्य ग्रंथाच्या नावे बोंबाबोंब करणं बरोबर नाही. संदर्भ म्हणून देखील मनुस्मृती नको? इतका विटाळ?

३.

मी वर म्हटल्या प्रमाणे बहुतांश हिंदू ग्रंथ प्रामाण्य आणि अनिष्ठता नाकरुन पुढे गेले आहेत.

माझ्या मते हिंदू लोकं धर्मग्रंथ फारशा कट्टरपणे पाळत नाहीत. बदलत्या काळातही उपासना, साधना, भक्ती, योग, इत्यादि मूळ अध्यात्मिक अंगे टिकवून धरल्याने हिंदू समाज पुढे गेला आहे.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

14 Jul 2018 - 9:02 pm | माहितगार

__/\__

चौथा कोनाडा's picture

18 Jul 2018 - 5:46 pm | चौथा कोनाडा

गापै,
अतिशय निर्दोष प्रतिवाद !
तुम्हाला __/\__

वामन देशमुख's picture

18 Jul 2018 - 9:40 pm | वामन देशमुख

कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. अशा मोमीनांना दिशा चुकलेले म्हणता येतं.

नक्की का?

कुराणात लिहिलंय म्हणून काफिरांना ठार मारणारे असे मोमीनच कुराणानुसार योग्य दिशेने जातात असे नव्हे का?

ट्रेड मार्क's picture

18 Jul 2018 - 10:10 pm | ट्रेड मार्क

मोमीनच कुराणानुसार योग्य दिशेने जातात असे नव्हे का?

प्रतिवाद करण्याच्या नादात तुम्ही कशाचं समर्थन करताय? उद्या कोणीही म्हणू शकेल मी XXX पुस्तक मानतो आणि त्यात YYY व्यक्तींना मारा लिहिलंय म्हणून ते योग्य आहे? प्रत्येक जण स्वतःच्या मते नेहमीच बरोबर असतो.

वामन देशमुख's picture

18 Jul 2018 - 10:47 pm | वामन देशमुख

प्रतीवाद नाही आणि समर्थन तर मुळीच नाही.

माझ्या माहीतीनुसार आणि समजुतीनुसार-

१. भारतीय कायदा (किंवा घटना) मोमिनांना इस्लामचे पालन करण्यास परवानगी देते.
२. इस्लामचा पाया कुराण आहे.

मग, जर कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. हे खरे असेल तर अशा मोमीनांना दिशा चुकलेले कसं म्हणता येईल?

ते तर कुराणानुसार आणि म्हणून subsequently घटनेनुसारही योग्य दिशेनेच जात असतील ना?

ट्रेड मार्क's picture

14 Jul 2018 - 8:47 pm | ट्रेड मार्क

मुळात अगदी वरिजनल संपूर्ण मनुस्मृती किती जणांनी वाचली आहे? त्यात नक्की काय काय लिहिले आहे याची खात्रीलायक माहिती किती लोकांकडे आहे?

त्यापेक्षाही पुढे जाऊन गेल्या ५० वर्षात मनुस्मृती प्रमाण मानून समस्त भारतात किती गोष्टी केल्या गेल्या? मनुस्मृतीचे कट्टरपणे पालन करणारे किती समुदाय किंवा लोक भारतात आहेत?

माझ्या मते हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे हे पण एक कारस्थान शिजले आणि कोणाच्यातरी वाचनात कोणीतरी त्याच्या आकलनाप्रमाणे लिहिलेला मनुस्मृतीचा भाग आला असावा आणि मग त्याचा पद्धतशीरपणे वापर करण्यात आला. मनुस्मृती किंवा त्याचे कुठलेच भाषांतर वगैरे मी तरी वाचलेलं नाहीये. पण काही शे/ हजार वर्षांपूर्वी, कदाचित त्या काळाशी सुसंगत असेल अश्या पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथावरून आत्ता का वाद होतात हेच मला समजत नाही. बरं हिंदूंमध्ये काही मनुस्मृती हा एकच ग्रंथ नाहीये. अगदी काही दशकांपूर्वी पर्यंत खूप शिकलेल्यांना वेदशास्त्रात पारंगत म्हणायचे, यात कुठेही कोणी मनुस्मृतीत पारंगत असल्याचे मी तरी ऐकले नाही.

त्याकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती जी लोक पाळत होते, राजेशाही होती जी सगळ्यांना मान्य होती. उद्या कोणी शहाणा उठून पूर्वी हिंदुस्थानात राजेशाही होती हा किती मूर्खपणा होता आणि ते कसं अन्यायकारक होतं आणि त्यामुळे हिंदुस्थान हा जनतेसाठी चांगला नव्हता असं सांगू लागला तर ते मानाल का? काही राजे जनतेसाठी खूप चांगले होते तर काही वाईट होते, म्हणून संपूर्ण व्यवस्थाच पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट होऊ शकत नाही. राजा कसाही असो आणि त्याचा मुलगा कसाही असो, वारसाहक्काने त्या राजपुत्राकडेच राजगादी चालत यायची. राजाला पुत्र नसेल तर काहीतरी "सोय" करण्यात यायची पण प्रधानजींचा किंवा सेनापतीचा मुलगा, केवळ आधीचा राजा म्हातारा झाला म्हणून, राजा झाला अशी किती उदाहरणं आहेत?

सांगण्याचा मतितार्थ असा की त्या काळी जी काही व्यवस्था होती त्यावर आता भांडण्यात काय अर्थ आहे?

स्वधर्म's picture

17 Jul 2018 - 11:31 am | स्वधर्म

>> कदाचित त्या काळाशी सुसंगत असेल अश्या पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथावरून आत्ता का वाद होतात हेच मला समजत नाही. 
>> सांगण्याचा मतितार्थ असा की त्या काळी जी काही व्यवस्था होती त्यावर आता भांडण्यात काय अर्थ आहे?
ट्रेडमार्क साहेब, तुमचे वरील दोन्ही मुद्दे पटले… पण
- कदाचित त्या काळाशी सुसंगत असेल अश्या पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथाला आता गौरवण्याचे कारण काय? 
- सांगण्याचा मतितार्थ असा की त्या काळी जी काही व्यवस्था होती ती किती चांगली होती हे सांगून वाद निर्माण करण्यात काय अर्थ आहे?
… असं भिडे गुरूजींना विचारलं पाहिजे, नाही का?

प्रकाश घाटपांडे's picture

18 Jul 2018 - 8:14 am | प्रकाश घाटपांडे

मनुस्मृती कालबाह्य आहे हे भिडे गुरुजींना माहीत नाही काय? ते सोडा पुर्वीच कस चांगल होत आणि आता कसे वाईट चाललय असा वादही असतोच की

ट्रेड मार्क's picture

18 Jul 2018 - 6:40 pm | ट्रेड मार्क

कदाचित त्या काळाशी सुसंगत असेल अश्या पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथाला आता गौरवण्याचे कारण काय?

त्या ग्रंथाला कोण गौरवत आहे? कोणी तरी उच्चवर्णीय, खास करून ब्राम्हण, मनुस्मृतीच्या आधारे वागत आहेत का?

भिडे गुरुजींनी गौरव केला म्हणजे काय म्हणलं ते इथे वाचा. ते म्हणले 'मनुनं जगाला पहिली घटना दिली. मनुस्मृती म्हणजे मानववंशास्त्र आहे. मनुच्या सावलीला उभं राहण्याचीही आपली लायकी नाही'. त्या काळी जी काही व्यवस्था होती ती किती चांगली होती किंवा आताच्या काळात मनुस्मृतीप्रमाणे वागावं असं काही म्हणले नाहीयेत. या उलट संभाजी ब्रिग्रेड आणि समविचारी मात्र अजून मनुस्मृती पकडून बसलेत. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेला हा ग्रंथ आहे, ज्याला इंग्रजांनी प्रमाण मानून १७९४ साली हिंदू कायदा बनवायला वापर केला. ते कायदे सुद्धा आता काळाप्रमाणे बदलले आहेत. चातुर्वर्ण्य व्यवस्था आत्ता अस्तित्वात आहे का?

नगरीनिरंजन's picture

22 Jul 2018 - 11:45 pm | नगरीनिरंजन

मग आताची कालसुसंगत घटना असताना मनुस्मृतीचं नाव काढायची गरजच काय ते मला काही कळले नाही.
आता चातुर्वर्ण्य व्यवस्था नाही तरी क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र ह्या शब्दांना आता कहीही अर्थ नाही असं नाही ना.
अजूनही खालच्या जातीतल्या माणसाने लग्नात वरात काढली म्हणून खून होतात ह्या देशात.

ट्रेड मार्क's picture

23 Jul 2018 - 9:24 pm | ट्रेड मार्क

म्हणजे भिडेगुरुजींना भाषणस्वातंत्र्य नाही असंच ना? ब्रिगेडी लोक कित्येक वर्ष मनूच्या नावाने बोंबलत आहेत ते चालतं, हो ना?

भिडे गुरुजींनी फक्त मनू आणि मनुस्मृतीबद्दलचं त्यांचं मत सांगितलं. त्याप्रमाणे वागा किंवा आत्ता आचरणात आणा वगैरे काही सांगितलं का?

आता चातुर्वर्ण्य व्यवस्था नाही तरी क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र ह्या शब्दांना आता कहीही अर्थ नाही असं नाही ना.

चातुर्वर्ण्य व्यवस्था नाहीचे. सध्या जातीआधारित व्यवस्था आहे. दोन्हींमधील फरक तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो. तथाकथित उच्चवर्णीय सोडून बाकीच्यांना शिक्षणापासून ते सरकारी नोकरीपर्यंत सगळीकडे आरक्षण मिळतं. ऍट्रॉसिटी चे कलम लावून कोणाही तथाकथित उच्चवर्णीयाला विनाचौकशी तुरुंगात डांबता येतं. तुम्ही दिलेल्या वरात काढल्यामुळे हत्या होण्याच्या घटनांपेक्षा मी सांगितलेलया दोन मुद्द्यांवर आधारित कितीतरी जास्त घटना आहेत.

कपिलमुनी's picture

17 Jul 2018 - 1:24 pm | कपिलमुनी
प्रसाद_१९८२'s picture

17 Jul 2018 - 1:31 pm | प्रसाद_१९८२

डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली : संभाजी भिडे
भिडे यांनी कोरेगाव-भिमा दंगलीवरही भाष्य केलं आणि मिलिंद एकबोटेंचं समर्थन करत संभाजी ब्रिगेडनेच ही दंगल पेटवली होती, अशी टीकाही केली.
---
‘न्यूज 18 लोकमत’च्या एका कार्यक्रमात बोलताना भिडे म्हणाले, ”डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे. राजस्थान विधानसभेच्या भवनाबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यासाठी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर गेले होते. मनूचा जो पुतळा उभा करण्यात आला होता, त्या पुतळ्याखाली “मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता” असं बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलं असा दावा भिडेंनी केला. तसंच संविधान देशासाठी अर्पण करताना, मी हे लिहिलं मनुस्मृतीचा अभ्यास करून लिहिलं असंही बाबासाहेब म्हणाले होते असा दावाही भिडेंनी केला आहे. याशिवाय याचा पुरावाही मिळेल तो मीडियाने शोधून काढावा” असं भिडे म्हणाले. मनुने विश्वाच्या कल्याणासाठी ग्रंथ लिहिला. जपान सारखे राष्ट्र मनूला मानतं अनेक विदेशातील विद्यापीठात मनुस्मृतीचा अभ्यास करतात असा दावाही त्यांनी केला.
---
https://www.loksatta.com/maharashtra-news/sambhaji-bhide-says-babasheb-a...

गामा पैलवान's picture

18 Jul 2018 - 2:59 am | गामा पैलवान

स्वधर्म,

- कदाचित त्या काळाशी सुसंगत असेल अश्या पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथाला आता गौरवण्याचे कारण काय?

माझ्या मते मनुस्मृतीस गौरवण्याचं कारण असं की स्मृती लिहिणे ही एक प्रक्रिया आहे. मनुने ती पहिल्यांदा पद्धतशीरपणे राबवली. जरी ती स्मृती आज अंशात: कालबाह्य असली, तरी नवनिर्मितीची प्रक्रिया आजिबात कालबाह्य नाही.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

18 Jul 2018 - 11:10 am | माहितगार

प्रा. सदानंद मोरे यांचे या विषयावरचे भाष्य वेगळे असावे, संबंधीत एक कुणाचा प्रतिसाद वर असावा आणि आपण त्याची अद्याप कदाचित दखल घेतली नसावी.

...मनुने ती पहिल्यांदा पद्धतशीरपणे राबवली. ...

आपल्या या वाक्याचे विश्लेषण आपणच करावे आणि ठरवावे की आपणास नेमके काय म्हणायचे आहे ?

माहितगार's picture

18 Jul 2018 - 1:10 pm | माहितगार

या युट्यूब दुव्यावर न्यूज१८लोकमत चॅनलवर उदय निरगुडकरांनी घेतलेली संभाजी भिडे यांची जवळपास ४४ मिनीटांची मुलाखत दिसते आहे. संभाजी भिडेंचे काही पूर्वग्रह कायम दिसतात तर काही विधानांची वस्तुनिष्ठता साशंकीत असल्याची चर्चा आहे. मनुस्मृती ग्रंथातील त्याज्य सोडून चांगले पहा असा काहीसा होरा त्यांच्या मुलाखतीतून असला -जातीयवादाचे समर्थन करताना ते दिसत नाहीत - तरी काही विधानांच्या वस्तुनिष्ठता साशंकीत झाल्याने चर्चेत राहतील असे दिसते, पण ते सरते शेवटी ग्रंथ प्रामाण्याचे नाहीतर राष्ट्रीयत्वाच्या भावनेसाठी व्यक्ती प्रामाण्याचे समर्थन करताना दिसताहेत.

मुख्य म्हणजे त्यांचे आंबा विषयक विधानाचे स्पष्टीकरण वर दासबोध.कॉम यांच्या प्रतिसादातील स्पष्टीकरणापेक्षा वेगळे दिसते. त्यांनी आंबा विषयक केलेले विधान अधिक व्यापक रुपकाचा भाग असले तरीही संभाजी भिडे गुरुजींना गर्भलिंग निदान विरोधी कायद्यातील नेमक्या तरतुदींची कल्पना नसावी आणि ते या कायद्याच्या कचाट्यात तांत्रिक दृष्ट्या सापडू शकतात असे प्रथम दर्शनी वाटते. पण उर्वरीत मुलाखत राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याने एवढी प्रखर आहे , एकीकडे गर्भलिंग निदान विरोधी कायद्यान्वयेची कारवाई टळण्याची शक्यता कमी वाटते पण त्यांच्यावरील अशा कारवाईने त्यांच्या बद्दल सहानुभूती वाढणारच नाही असे ही सांगणे कठीण असावे असे वाटते.

सोमनाथ खांदवे's picture

18 Jul 2018 - 6:02 pm | सोमनाथ खांदवे

भिडे गुरूजींच्या आंबा विषयी विधानावर एक ही महिला संघटना तावातावाने वाद घालायला कशा नाही आल्या ?

तुकाराम मुंढे हे पुण्यात pmpl चे ceo असताना पुण्यातील सर्व पक्षांच्या पुढाऱ्यांना चार हात लांब ठेऊन विनादबाव काम करण्याची त्यांची हातोटी पुणेकरांनी पहिली आहे आणि आता ते नाशिक महानगरपालिका चे आयुक्त आहेत . अशा कर्तव्यदक्ष व्यक्ती ला राज्य सरकारला ने रिपोर्ट पाठवायला सांगितले आहे .

गामा पैलवान's picture

19 Jul 2018 - 3:04 am | गामा पैलवान

वामन देशमुख,

कुराणात लिहिलंय म्हणून काफिरांना ठार मारणारे असे मोमीनच कुराणानुसार योग्य दिशेने जातात असे नव्हे का?

थोडं शब्दांकन चुकलं माझं. दुरुस्त केलेलं विधान असं की :

कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. अशा मोमीनांना दिशा चुकलेले म्हणून पुरोगामी लोकं संशयाचा फायदा देतात.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

19 Jul 2018 - 4:45 pm | माहितगार

वामन देशमुख आणि गा.पै.

गा. पै.ंनी उपचर्चा खाली घेतल्यामुळे वामन देशमुख यांचा ह्या प्रतिसादावरची चर्चाही इथेच करतो.

आधी गा.पै.

कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. अशा मोमीनांना दिशा चुकलेले म्हणून पुरोगामी लोकं संशयाचा फायदा देतात.

गा.पैंचा प्रतिसाद संदर्भ

ईथे कथित पुरोगामी मांडणी जराशी वेगळी असते. त्यांचा पहिला बचाव, 'हिंसा आणि परधर्मीयांशी केलेल्या हिंसेचे उल्लेख ईतर धर्मीय ग्रंथात सुद्धा असतात', या मांडणीत अंशतः वस्तुनिष्ठता असल्याचे ईतर धर्मीय अती-उजवे नाही म्हटले तरी लक्षात घेत नाहीत; आणि दुसर्‍या बाजुला ह्या स्वतःच्या पुरोगामी मांडणीच्या निसटत्या बाजू पुरोगाम्यांनाही लक्षात येत नाहीत की, ईतर धर्मीय ग्रंथातही अशा हिंसा विषयक समस्या असल्या तरी, इतर धर्म आणि धर्मीय रिफॉर्मेशन आणि एनलाईटनमेंट पुर्नमांडणी आणि प्रबोधनाच्या प्रक्रीयेतून बर्‍यापैकी पुढे गेले आहेत, ईस्लामच्या बाबतीत रिफॉर्मेशन आणि एनलाईटनमेंट पुर्नमांडणी आणि प्रबोधनाच्या प्रक्रीये बाबत बर्‍यापैकी मागे असावी. आताशा भीत भीत का होईना बोटावर मोजण्या एवढे का होईना मुस्लीमातील पुरोगामी स्विकारु लागले आहेत असे दिसते, रिफॉर्मेशन आणि एनलाईटनमेंट पुर्नमांडणी आणि प्रबोधनाच्या अपेक्षीत प्रक्रीये बद्दल मुस्लीमातील या पुरोगामी विचारांची नीटशी दखल घेतली जाणे अद्याप बाकी आहे. तो स्वतंत्र लेखाचा विषय -माझ्या येत्या स्वतंत्र लेखात असणार- आहे.

रिफॉर्मेशन आणि एनलाईटनमेंट पुर्नमांडणी आणि प्रबोधनाच्या बाजूचे नसलेले पुरोगामी अजून एक वाट शोधत असतात ती म्हणजे ईतर धर्मीयांचे रिफॉर्मेशन आणि एनलाईटनमेंट पुर्नमांडणी आणि प्रबोधनाची प्रक्रीया झाली म्हणता तर ईतर धर्मीयातील अती उजवे कट्टर लोक हिंसा करताना दिसतात त्याचे काय ? म्हणजे धर्मग्रंथात लिखीत ग्रंथप्रामाण्याचा अंशतः पडणारा प्रभाव त्यांना या पळवाटेने सरसकट नाकारायचा असतो-म्हणजे पुर्नमांडणी आणि प्रबोधन नाकारयचे असते. ईथे पुरोगामी असुरक्षीतता आणि अ-विश्वासाच्या भावनेतून होणार्‍या प्रतिक्रीयावादी इतर हिंसा आणि ग्रंथप्रामाण्यातून येणार्‍या हिंसा यांची गल्लत करत असावेत. वस्तुतः ते जर खरे विशुद्ध पुरोगामी असतील तर एक ते ग्रंथप्रामाण्याचे नव्हे तर विवेकाचे समर्थक असायवास हवेत, दुसरे विवेकावर विश्वास असेल तर कोणत्याही अबकड ग्रंथाच्या चिकित्से बाबत कथित पुरोगाम्यांना आक्षेप असण्याचे कारण नसावे . तसेच ग्रंथ प्रामाण्याच्या पाठीशी असलेल्या अंधश्रद्धा, त्यातुन निर्मित होणारे उत्पात मुल्य, हिंसा इत्यादी नाकारण्याचे कारण नसावे.

पण इथे विरुद्ध गंमत अशी होते की, साध्या शांततामयी शब्दातला उपरोध त्यांचा त्यांनाच व्यवस्थित कळत असतो -पण या उपरोधास विरोधक नाही ते स्वतःच जबाबदार आहेत हे त्यांच्या लक्षात का येत नसावे कोण जाणे. विवीध प्रेषित ते परमेश्वर यांची नावे चुकाशील माणसांनी वापरणे चालते पण व्यंगचित्र दूर असूद्यात आदरपुर्वक काढलेल्या चित्राला , मुर्तीला अथवा अभिनयालाही चालत नाहीत -उत्पात मुल्य ते हिंसा ते शिक्षा यांची भिती असते - तिथे यांना सहनशीलता शांततामयी शब्द त्यांचे त्यांना खटकत असतील तर नवल नसावे. जेव्हा स्वतः मुस्लीम, मुस्लीम स्त्रीया आणि मुस्लीमेतरांच्या १) (व्यक्ती) स्वातंत्र्य,
२) मानवाधिकार, ३) सहिष्णूता, ४) कायद्या समोर समानता, ५) विवीधता (pluralism) यांची विवीध स्तरावर विवीध देशातून पायमल्ली होते आणि या पायमल्लीची कोणतीही चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य नसते आणि स्वातंत्र्य दडपण्यासाठी अबकड ग्रंथांचे दाखले दिले जातात तेव्हा प्रबोधनेच्छु रास्त टिकांबद्दलच्या फोबीआचे प्रदर्शन तथाकथित पुरोगाम्यांकडून होताना दिसते (संदर्भ डॉ.अली रिझवी आणि हमेद अब्देल-समद), त्यातील अनेक अगदी टोकाच्या परंपरावाद्यांप्रमाणेच मुद्देसुद चर्चाकरण्या एवजी पिंका आणि टिकाकारास व्यक्तीगत लक्ष्य करतानाही दिसून येतात. अगदी या मुद्द्यावरही इतर धर्म/धर्मीयातही हे दोष नाहीत का ? चे तुणतुणे एकाच्या उणीवा झाकण्यासाठी दुसर्‍याच्या उणीवाम्ची उदाहरणे सादर केली जातात आणि अशा पद्धतीने पुरोगामी संशयाचा फायदा देतात असे वाटते.

मग वामन देशमुख
प्रतीवाद नाही आणि समर्थन तर मुळीच नाही.

माझ्या माहीतीनुसार आणि समजुतीनुसार-

१. भारतीय कायदा (किंवा घटना) मोमिनांना इस्लामचे पालन करण्यास परवानगी देते.
२. इस्लामचा पाया कुराण आहे.

मग, जर कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. हे खरे असेल तर अशा मोमीनांना दिशा चुकलेले कसं म्हणता येईल?

ते तर कुराणानुसार आणि म्हणून subsequently घटनेनुसारही योग्य दिशेनेच जात असतील ना?

वामन देशमुखांचा प्रतिसाद संदर्भ

आधी वामन देशमुखांची बाजू

ईथे वामन देशमुखांच्या उप्रोधा मागची भावना समजता येते, व्यक्तिगतत कायदा अमुक एका ग्रंथातील प्रामाण्यानुसारच चालला पाहीजे त्यात कालसुसंगत सुधारणांना वाव नाही आणि हे ग्रंथ प्रामाण्य राज्यघटनेपेक्षा अधिक महत्वाचे असेल; राज्यघटना आणि लोकशाही आमच्या ग्रंथप्रामाण्यानुसार चालली नाहीतर आमच्या उत्पात मुल्याची तुम्हाला भिती वाटली पाहिजे जेणे करुन कालसुसंगत बदल योग्य असले तरी आम्ही होऊ न देण्याच्या अट्टाहासात यशस्वी होऊच होऊ. इथे तथाकथीत पुरोगाम्यांना त्यांचे कर्मठ आपलेसे वाटतात आणि सुधारणांचा आग्रह धरणारे फोबीआ ग्रस्त वाटतात, काही फोबीआ ग्रस्त असतीलही पण सुधारणांच्या सर्वच मागण्या सरसकट कशा चुकीच्या असुशकतत आणि कोणतेच बदल कसे पुढे येत नाहीत असे प्रश्न कुणाला पडत असतील तर भावना समजता येते. अर्थात या समर्थनाचा उद्देश्य फोबीआ निर्माण करणे नाही योय बाजूचे समर्थन एवढाच मर्यादीत आहे.

बाकी वामन देशमुखांकडून सुटणार्‍या बाजू

आधी झाकीर नाईक कृत बचाव कसा असू शकेल आणि नंतर भारतीय कायद्यातील वस्तुस्थिती.

कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात, हे विधान सरसकट बरोबर नसावे. कुराण आणि हदीथ यांची वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रीटेशन होत असावित
त्यातील झाकीर नाईक प्रणित आणि पुरोगाम्यांनाही (आणि तसे कुणालाही) चालावेसे इंटरप्रिटेशन म्हणजे, इस्लाम आणि कुराण मधील संदेश शांततामयी आहे, तुमचा धर्म तुमच्यापाशी आमचा धर्म आमच्या पाशी, कुणावरही आपला धर्म लादू नका असेच कुराण सांगते. - इथे पुरोगामी गापै म्हणतात तसे संशयाचा फायदा देतात. मग 'कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात'- याचे गौड बंगाल काय आहे ? तर फक्त काफीर युद्धात जिवंत मिळाले तर धर्मपरिवर्तनाच्या अटीवर तुम्ही काफीरांना दंड जिझीया लावून जिवदान देऊ शकता किंवा धर्म परिवर्तन स्विकारले नाहीतर तुम्ही त्यांना ठार मारु शकता. मग आहे की नाही धर्म शांततामयी, विरोधक उगीचच चुकीचा गवगवा करतात ! आता कोण स्वतःला खलीफा /सुल्तान किंवा अमुकतमुक जाहीर करुन कुणा विरुद्ध केव्हा युद्ध पुकारेल आणि आपले स्वतंत्र इंटरप्रिटेशन लावत आस्मानी सुल्तानी बरसवेल हे सांगणे कर्म कठीण असावे . कुणा परधर्मीयांविरुद्ध केवळ वेगळ्या धर्माचे आहेत म्हणून जिझीया का लावावा ? परधर्मीयतेमुळे युद्ध का पुकारावे ? युद्धात जिवंत सापडले तर धर्म बदलण्याचे कंपल्शन का टाकावे ? जर सर्वश्री परमेश्वर एकटा एकमेव असेल तर त्याची ईतर कोणी इतर कोणत्या पद्धतीने भक्ती केली किंवा नाही केली तर सर्व शक्तीमानास का फरक पडावा ? त्या सर्वशक्तीमान दयाळूस मानवाची हिंसक परिक्षा का पहावी वाटावी ? क्रौर्यपूर्ण शिक्षा का द्याव्या वाटाव्यात या प्रश्नांची उत्तरे पुरोगामी त्यांच्या कर्मठांकडे मागतील का आणि त्यांच्यातले झाकीर नाईकांसारखे कर्मठ परंपरावादी इतरांसाठी नको स्वतःसाठी याची उत्तरे कधी शोधतील हा मोठा प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे प्रेषित महोदयांना (त्यांना शांती लाभो) सुरवातीच्या काळात आलेले संदेश शांतता मयी समजले जातात तर दुसर्‍या टप्प्यात आलेले संदेश हिंसा आणि क्रौर्याकडे झुकलेले समजले जात असावेत. वर म्हटल्या प्रमाणे कोणत्या भागाचे काय अर्थ लावायचे याच्या नुसार इंटर प्रिटेशन बदलतात. अहिंसक पुरोगामी आपल्या सोईचे इंटरप्रिटेशन घेऊन बसतात, आणि हिंसक इंटरप्रिटेशन वापरणारे दिसले की दुसरीकडेही असेच आहेना अशी मखलाशी करतात.

त्यांच्यातील सर्वच लोक अथवा सर्वच समुह हिंसा आणि क्रौर्यात सहभागी होत नाहीत असा एक दावा केला जातो त्यात तथ्य नक्कीच आहे पण जो पर्यंत काही लोक ग्रंथप्रामाण्याचा आधार सांगत हिंसा आणि क्रौर्याचा मार्ग वापरत आहेत तोपर्यंत - अशा प्रामाण्य मानल्या जाणार्‍या तत्वज्ञानाची मनमोकळी चिकित्सा होऊन तत्वज्ञानाच्या पुर्नबांधणीस गती यावयास हवी आणि प्रबोधन तशा हिंसक मार्गाची निवड करु शकणार्‍यांपर्यंत पोहोचावयास हवे असे वाटते

कायद्याचे जागतिक संदर्भ

तसे पहाता अगदी जागतिक स्तरावर इस्लामिक देशातही बरेच कायदे व्यवहारता पाहून बदलले गेले आहेत, क्रिमीनल लॉ मधील दंडाच्या पद्धतील क्रौर्य कमी होऊन तुरुरंगवासाच्या सिव्हीलाईज्ड पद्धतीचा वापर वाढत आहे. व्यवहारात फायदा आणि आवश्यक असेल तेथे हि मंडळी सोईने बरेच काही न बोलता वाकवतात. कर्जाचे देणे घेणेस परवानगी नसावी पण बहुधा दुसृया खलिफानेही कर्ज घेण्याचा अथवा देण्याचा व्यवहार केल्याचे वाचल्याचे आठवते चुभूदेघे पण ओटोमनांनी कर्ज घेऊन वसुलीसाठी तुर्कस्थान युरोपीयनांना चक्क आंदण दिला होता. आताही तेलाधारीत देश सोडले तर बहुतेक इस्लामीक देश सर्रास कर्जे घेतात. एकीकडे कम्युनीस्ट नास्तीक म्हणून रशियनांशी लढाई केली जाते दुसरीकडे नास्तीक असलेल्या चिनचे तळवे चाटले जातात. हे सर्व शेवटी सोईने होत असते.

दुसरीकडे ज्या काही कट्टरवाद्यांना हे ग्रंथ प्रामाण्यात बसत नाही हे कळते त्यांच्या साठी परमेश्वर आणि त्याच्या ग्रंथातील आदेशानुसार चालणार्‍या खलिफा शिवाय इतर कोणतेही स्थानिक सरकार अथवा युनो सार्वभौम असू शकत नाही . ग्रंथात फक्त सोन्या आणि चांदीच्या नाण्यांचाच उल्लेख आहे म्हणून कागदी चलनही चालत नाही अशा प्रकारच्या अनेक कट्टरतावादी इंटरप्रिटेशन्स आणि त्यांच्या मागे धावणे समांतरपणे अव्याहत चालते.

जिथ पर्यंत भारतीय कायद्यांचा संदर्भ आहे

यातील कायद्यातील कट्टरता बाजूस ठेऊन मोकळा श्वास घेण्याचे अकबराच्या पद्धतीने काही प्रयत्न झाले नाही असे नाही. किंवा मराठा साम्राज्य आणि त्या नंतर रणजित सिघांनी पंजाबात कंट्रोल मिळवल तसे किमान चर्चित वाक्या प्रमाणे वागण्यास बर्‍यापैकी लगाम बसू लागला असावा. ब्रिटीशांच्या कालावधी नंतर क्रिमीनल लॉच्या बाबतीत रिफॉर्मेशन पूर्णतः यशस्वी पणे लावले गेले - हे ब्रिटीशांचे रिफॉर्मेशनही पलटवू इच्छित काही पाकिस्तानी कट्टरतावादी गट पाकिस्तानात आहेत त्यांच्या कारवाया सातत्याने दिसतच असतात.

भारतीय राज्य घटना किमान थेअरॉटीकली सार्वभौम आहे. व्यक्तिगत कायद्याच्या संदर्भाने भारतीय राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समानतेच्या व्यावहारीक विवेकी अंमलबजावणी समोर ग्रंथप्रामाण्य कृत उत्पात आणि वोटबँक कृत अव्हाने आहेत नाही असे नाही तरीही हिंसा आणि क्रौर्य या बाबतीत वामन देशमुख म्हणतात तसा खुला परवाना भारतीय कायदा आणि राज्यघटनेत दिसत नाही असे वाटते. असो.

हा प्रतिसाद स्वतंत्र लेखाच्या स्वरुपात असावयास होता का असे वाटून गेले कारण यात वस्तुनिष्ठतेच्या आणि संदर्भांच्या गरजेपोटी बदल करणे भर घालणे अवघड जाईल. असे वाटते.

काही संदर्भ आणि वस्तुनिष्ठ बदल सुचवावे वाटल्यास स्वागत असेल. चुभूदेघे. पिंका आणि व्यक्तिगतात विरहीत सकारात्मक रचनात्मक चर्चा सहभागा साठी अनेक आभार.

आकाश५०८९'s picture

20 Jul 2018 - 12:01 am | आकाश५०८९

संभाजी भिडे यांच्या आंबा प्रकरणाविषयी https://www.facebook.com/barve.prasanna/posts/10213609662970770 येथे लेख वाचनात आला.
तोच लेख https://prasannavadane.blogspot.com/2018/06/blog-post.html येथेही आहे. त्यावरून सर्व वृत्तवाहिन्यांनी मुद्दाम चुकीचे वार्तांकन केल्याचे दिसते.

माहितगार's picture

20 Jul 2018 - 9:41 am | माहितगार

प्रसन्न वदनेंचा ब्लॉग वाचून युट्यूब जरा आणखी खोदले तर २१ जूनची जनप्रवास लाइववरची हि मुलाखत युट्यूबवर दिसली पण याच गोष्टी संभाजी भिडे उदय निरगुडकरांना दिलेल्या या मुलाखतीत का सांगत नाहीत याचा प्रश्न पडतो -प्रत्येक व्यक्तिला मिडीया मिसरिपोर्टींगला कसे तोंड द्यायचे हे माहित असेलच असे नसावे .

भिडेंच्या इतर चुका काय असतील ते असोत, प्रसन्न वदने म्हणतात तसे जनप्रवास लाइववरची मुलाखत पाहिल्यानंतर, आंबा प्रकरणाचा पूर्ण वक्तव्याचा मूळ व्हिडियो न दाखवता सोईचे मर्यादीत अंश फक्त दाखवले गेले असल्याची साशंकता आधी पेक्षा अधिक वाटत आहे. भिडेंच्या चुकीच्या अंधश्रद्धेचे खंडण जरुर करावे पण भिडेंना अंधश्रद्धा आहेत म्हणून त्यांचे वक्तव्य अर्धवट दाखवले जात असेल तर पत्रकारीतेच्या नैतिकतेच्या नेमक्या कोणत्या नियमात बसते कि अधःपतन आहे असे म्हणावे.

संबंधीत पत्रकारांनी खरेच अर्धवट रिपोर्टींग केले असेल तरी बहुधा बदनामीच्या कायद्या अंतर्गत कव्हर होणार नाही पण पत्रकारीतेच्या मुल्यांचे पालन झाल्या बाबत शंका असेल तर प्रेस काऊंसिल ऑफ ईंडियाकडे कुणालाही इमेल ने पण तक्रार करता येत असावी. अशा सभेत उपस्थित व्यक्तींकडून खात्री करुन घेऊन अशी तक्रार करण्यास हरकत नसावी असे वाटते.

नगरीनिरंजन's picture

22 Jul 2018 - 11:34 pm | नगरीनिरंजन

सोशल मिडियावरच्या व्हिडियोजवरुन जनतेची अदालत बसायला लागलीयआजकाल.
गंमत म्हणजे “व्हिडिओ एव्हिडन्स“वरुन निरुपद्रवी विद्यार्थ्यांना थेट देशद्रोही ठरवून मोकळे झालेले लोक आता बावचळले आहेत.
दुधारी हत्यार आता उलटले तर पूर्ण पुरावा,न्यायालायात प्रलंबित असणे वगैरे गोष्टी आठवायला लागल्या आहेत.
चांगलीच गोष्ट आहे.
दरम्यान कन्हैय्याकुमारला विद्यापीठाच्या “उच्चस्तरीय” समितीने केलेला दहा हजाराचा दंड न्यायालयाने रद्द केला आहे.
तसेच न्यायालय ह्या बाबतीतही योग्य तो निर्णय देईलच.
प्रश्न फक्त असा उरतो की अशा गोष्टी पसरवणाऱयांचं काय करावं?
सरकार अशा आयटीकंटकांचा बंदोबस्त करणार की उलट आणखी सेना निर्माण करणार?

ट्रेड मार्क's picture

23 Jul 2018 - 10:23 pm | ट्रेड मार्क

निरुपद्रवी विद्यार्थी कोणाला म्हणताय? कन्हैया आणि त्याच्या गॅंगला? आपल्याकडे विद्यार्थीदशा साधारणतः वयाच्या २४-२५ पर्यंत संपते. पुढे जे PHd वगैरे करतात ते एकीकडे कामधंदा करत आपला अभ्यास चालू ठेवतात. आता ३१ वर्षांचा असूनही कन्हैयाच्या अचिव्हमेंट्स सांगा. दुर्दैवाने तो कम्युनिस्ट विचारांच्या प्रभावाखाली आला आणि त्यात नंतर जनेवि सारख्या विद्यापीठात दाखल झाला.

कन्हैयाने काय केलं ते तुम्हाला माहित असेलच. तरी त्याला पाठिंबा देत असाल तर.... काय बोलणार!

नगरीनिरंजन's picture

29 Jul 2018 - 1:07 am | नगरीनिरंजन

कोर्टाच्या आधी तुम्हाला कळलेलं दिसतंय त्याने काय केलं ते. की ठरवूनच टाकलंय तुम्ही? कोर्टाने तर त्याचा दंडही रद्द केला आहे. ह्या देशाच्या न्यायसंस्थेबद्दल आपल्याला काहीच आदर नसेल तर तुम्हाला देशभक्तीचा ठेका घ्यायचा काहीही अधिकार नाही.
मुळात देशाच्या नावाखाली सरकारच्या अशा दडपशाहीला पाठिंबा देऊन देशाचे नुकसानच केले जात आहे. अर्थात तुम्हाला ते समजणार नाही किंवा समजून घ्यायचं नाहीय ते उघड आहे.

सोमनाथ खांदवे's picture

23 Jul 2018 - 4:00 pm | सोमनाथ खांदवे

कन्हैयाकुमार बद्दल अजून वादविवाद चालू आहेत ? आपल्या भारतातील लोक पण कोणाला आणि का डोक्यावर बसवून ठेवतात हेच कळत नाही .
कन्हैया ने आता पर्यंत राष्ट्रीय पार्टी कशी स्थापन केली याचेच आश्चर्य वाटते . विद्यार्थीदशेतला कन्हैयाकुमार ला थेट भारताच्या पंतप्रधानांना मीडिया समोर एकेरीत उल्लेख करण्याचे बळ पुरवत कोण ? आता बहिर्जी नाईक जरी असते त्यांना सुध्दा पडद्यामागचे सापडले नसते ( पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करणारा देशद्रोहाच्या घोषणा देईल असा जावईशोध कुणी लावू नये हं ! ) खरंच मोठा राजकीय नेता बनण्याचे गुण वैशिष्ट्य आहे त्याच्यात .

शब्दबम्बाळ's picture

24 Jul 2018 - 9:52 am | शब्दबम्बाळ

हीहीही!
कन्हैया गॅंग च जाऊदे तुम्ही चष्मेवाल्या गॅंगचे दिसताय...

आपल्याकडे विद्यार्थीदशा साधारणतः वयाच्या २४-२५ पर्यंत संपते.

कुठून निष्कर्ष काढलात? असाही "देशद्रोह्यांसाठी" संदर्भ कुठल्या गोष्टींना लागतो पण तरीही बघूया...
जर १२ वी १८ व्या वर्षी झालीच, तर डिग्री ३/४ वर्ष पुढे म्हणजे २२ वर्षांपर्यंत... त्यानंतर लगेच पीएचडी करता येत नाही मास्टर्स डिग्री करावी लागणार म्हणजे २ वर्ष किमान! त्यानंतर करता येईल पीएचडी! आता पीएचडीसाठी ३ ते ५ वर्ष कितीही लागू शकतात... म्हणजेच किमान २९-३० पर्यंत तरी पीएचडी साठी कालावधी लागणारच! हो का?
मास्टर्स करून आता डोंबल नोकरी मिळतेय, पण ते जाऊद्या... पीएचडी करताना स्टायपेंड मिळू शकतो त्यामुळे अनेक जण पूर्णवेळ करतात त्यात काय गैर आहे?

आणि गम्मत म्हणजे बीजेपीच्या तथाकथित देशभक्त गॅंग ने "कन्हैया ११ वेळा पीएचडीला नापास झाला" हा संदेश व्हायरल केलाय! पीएचडीला परीक्षा नसते मग ११ वेळा नापास कसा होणार, हे याना कोण सांगणार!
Speaking to Alt News, Kumar said, “This information is totally fake. There is no exam for PhD. I am a final year student. My thesis is in the final stage and will be submitted by July 21, 2018. The subject of my thesis is ‘social transformation in South Africa’. I enrolled in JNU for the integrated MPhil-PhD program in 2011 which is of 7 years’ duration. I commenced my PhD in 2013. I suspect that someone just created a message with this rumour which then started to circulate. I haven’t even been in JNU for 11 years. This is my 7th and final year.” Kumar also tweeted the same.
Link1

कन्हैयाने काय केलं ते तुम्हाला माहित असेलच. तरी त्याला पाठिंबा देत असाल तर.... काय बोलणार!

काय केलं त्याने? जरा सांगाल का? नाही म्हणजे कोर्ट सुद्धा असे काही म्हणत नाहीये जर तुम्हाला काही आतली बातमी असेल तर कळू दे सगळ्यांना!
नाहीतर कोर्टात पाठवून द्या पुरावे म्हणजे शिक्षा पक्की होईल त्याला!
मध्यंतरी कुणाल कामरा ने याची मुलाखत घेतलेली तेव्हापासून त्याला पण देशद्रोही केलं! आता नुकताच त्याचा कार्यक्रम एका युनिव्हर्सिटी मधून रद्द केलाय. का तर म्हणे तो देशद्रोही बोलतो?! कोण ठरवू लागलाय हे? सगळी फालतुगिरी चाललीये नुसती...
एखाद्या विद्यार्थ्याला इतकी मेहनत घेऊन मीडिया ट्रायल करून राष्ट्रीय पातळीवर कोर्टाच्या आधीच "देशद्रोही" ठरवण्याची हि पहिलीच वेळ असेल.

जर चष्मा काढून जरा बघावासा वाटलं तर एक छोटा व्हिडीओ दिला आहे तो बघा.. तो पूर्ण व्हिडीओ नाहीये, असे अर्धवट व्हिडीओ देणे मलाही योग्य वाटत नाही पण लोकांकडे १-२ तास वेळ नसतो त्यामुळे १८ मिनिटांचा व्हिडीओ बघा... तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील कदाचित.
सुरुवातच त्याच वय आणि शिक्षण यावरून आहे म्हणून देत आहे.
(त्याच शीर्षक नका घेऊ मनावर! ;) )

ट्रम्प's picture

25 Jul 2018 - 7:46 pm | ट्रम्प

धन्यबाद शब्दबंबाड जी !!!!
अठडा मिनट का आपने अच्छा बीडीओ पोस्ट किया . हम कुछ बात कहना चाहते है कन्हया जी के बाडे में .
१) एव्हलांचं प्रूफ टेंट के लिये सिर्फ भाजप को जिम्मेदाड पकड रहे है ? काँग्रेस ने क्यो नही लिये ?
2) बिहाड में जो दलितो की हत्याये हुई उसके लिये भाजप क्यो ? नितीश कुमार जिम्मेदाड नही है ?
3) दलितो की बुक बॅन के बारे में बोलते वक्त मनुस्मृती बॅन के बारे में क्यो नही बोले ?
4) आरक्षण के बारे में बोलते वक्त गटड साफ करने वाले और मंदीड के पुजाडी की बात करते करते प्रायव्हेट कम्पनी में आरक्षण क्यो नही ऐसा उन्होंने सवाल किया . कीधड की लिंक कीधड जोड रहे हैं वो ?
प्रायव्हेट कम्पनीयो में भला गटड साफ कडने वाले और मंदिड के पुजाडी का क्या काम , वाहां टॅलेंटेंड लोगो को ही चूनते है फिर वॊ किसीं भी जाती से हो . सिड्फ गव्हर्नमेंट में आरक्षण के नाम पर कुछ भी चलता हैं .
5) हमारे भारत में दलितो की जीवन अवस्था के लिये सिर्फ चार साल पुराणी भाजप की सरकार जिम्मेदाड है ? दलितो की जीवन अवस्था के लिये काँग्रेस की कोई जिम्मेदाडी नही ? अगर है तो आज तक हमने श्रीमान कन्हया कुमार जी को काँग्रेस के खिलाफ बोलते वक्त हमने नही देखा . अगर आपने देखा है तो डालीये बीडीओ .
6) कन्हया कुमार जी बिहाड से आये है और बिहाड की जो दुरावस्था लालूप्रसाद ने की है , कन्हया जी ने उनके बारे में भी कभी गुस्सा आज तक नही दिखाया ? ऐसा क्यो ? सभी प्रॉब्लेम के लिये सिड्फ भाजपा की गलती है क्या ?

सबसे अहम बात
पी एच डी के बारे में बोलते वक्त टॅक्सपेयर की बात की बहुत अच्छा लगा , लेकीन हम ये कहना चाहते है की वो देश की जनता के टॅक्स पे मुफत में खा पी के पी एच डी ही करे 30 साल नही तो 40 साल लगने दो लेकीन सिर्फ शिक्षा पे ध्यान देना चाहीये ना की राजनीती पे . ये तो पाकिस्तान और अमडीका की तरह हो गया . क्या जडूडत है टॅक्सपेयर के पैसो पे जीवन जीते हुये टी व्ही इंटडव्यूव देना , जंतड मंतड पे मोर्चा , जे एन यू में अफजल की शहादत मनाना ?

सोमनाथ खांदवे's picture

25 Jul 2018 - 9:05 pm | सोमनाथ खांदवे

फुल शालजोडे आणि एकदम पर्फेक्ट जागेवर हाणल्यात , कन्हया व्हिडिओ मध्ये बऱ्याच ठिकाणी ' र ' चा 'ड ' करतोय
वाचतांना हगून हगून पुरेवाट झाली खी ! खी !!

प्रसाद_१९८२'s picture

26 Jul 2018 - 3:05 pm | प्रसाद_१९८२

वाचतांना

हगून हगून

पुरेवाट झाली खी ! खी !!

नीट धुवा बर !
सध्या पावसाळा सुरु आहे, उगाच इंफ्केशन व्हायचे. :))

ट्रम्प's picture

26 Jul 2018 - 3:50 pm | ट्रम्प

ह ह पु वा चा लॉंग फॉर्म आहे तो !!!!!

माहितगार's picture

26 Jul 2018 - 2:54 pm | माहितगार

आंब्याचा वाद एकदाचा नाशिक नहानगर पालिकेने स्थानिक न्यायालयात दाखल केला असे बातम्यांवरुन दिसते.