Skip to main content

भिडे गुरुजींना झालंय काय ?

लेखक सोमनाथ खांदवे यांनी सोमवार, 09/07/2018 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
भिडे गुरुजींनी शिवप्रतिष्ठान संस्थेच्या अंतर्गत खेडेगावात शेकडो सभा घेऊन शिवप्रेमी निर्माण करण्याचे सतत कार्य केले . त्यांच्या एका सभेला मी सुद्धा उपस्थीत होतो , वक्तृत्व कौशल्य नसले तरी त्यांनी संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकोटांचे महत्व वाढवण्यासाठी घालवले असल्या मूळे हजर असलेल्या प्रत्येक जण भिडे गुरुजींना मनोमन नतमस्तक होत असतो . अशा आदरणीय सुशक्षित माणसाला अचानक काय झालंय हे समजेनासे झाले आहे , काही दिवसांपूर्वी त्यांनी " आमच्या बागेतील आंबे खाल्ल्याने मुलं होतात " असे वादग्रस्त वक्तव्य केले . त्याचा धुराळा बसण्या अगोदरच " संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता " असे दुसरे वादग्रस्त वक्तव्य भिडे गुरुजींनी केले आहे . त्यामूळे विधानसभेत मुख्यमंत्री साहेबांना कारवाई करण्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले . कोरेगाव भीमा च्या प्रकरणांत पोलीस दप्तरी भिडे गुरुजींनी चे नाव असतांना अशी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतः च्या समोरील अडचणी का वाढवत आहेत ?

वाचने 38925
प्रतिक्रिया 118

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद गोडबोले

छया !! छया !!! हवेत गोळीबाराला कोणी पुरावा देत का ? हजारो वर्षांपूर्वी लिहलेल्या मनुस्मृती प्रमाणे त्यात वर्णिलेल्या चार जाती आजच्या जीवनात कालबाह्य झालेल्या आहेत सगळे ब्राह्मण यज्ञ करून भिक्षुकी मागून जीवन जगतात का ? सगळे क्षत्रिय फक्त सैन्यात जातात का ? वैश्य मात्र त्यांना नेमून दिलेले च काम करत आहेत सगळे क्षुद्र वरील तिघांची सेवा करतात का ? मग कशाला भिडे गुरुजींनी आणि त्यांच्या समर्थकांनी मनुस्मृती ची भलामण करून गदारोळ उडवून दिला आहे ? आणि मनुस्मृती समर्थकांचे म्हणणे जर खर असेल तर शरिया , तीन तलाक , बुर्कां ह्ये विषय वादग्रस्त आणि कालबाह्य कसे होऊ शकतात ?

In reply to by सोमनाथ खांदवे

सोमनाथ , तुमचा प्रतिसाद निरुपयोगी आहे ! जर आनगापै " मनुस्मृतीचा आजच्या भारतीय घटनेला आधार आहे " हे पुराव्याने शाबित करत नसतील तर " मनुस्मृतीचा काडीमात्र आधार नाहीये संविधानाला" हे तुम्ही सिध्द करा ! नुसता शब्दच्छल करुन काय उपेग ? आम्हाला सुर्य उगवल्याशी मतलब आहे मग तो तुमच्या कोंबड्याच्या आरवण्याने उगवो कि गा.पैं. च्या !

In reply to by प्रसाद गोडबोले

अहो मार्कस , मला सुध्दा तेच म्हणायचे आहे !! फक्त गा पा पैलवान असल्या मुळे मी त्यांना डायरेक्ट विरोध न करता तुमच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली .काय राव !! मी आता गियर चेंज केला आहे , मुखवट्या मागचे चेहरे आताशी कुठे दिसायला लागले आहेत . आणि बाबासाहेबांनी मनुस्मृती मधील तरतुदी वापरल्या असत्या तर त्यांनी मनुस्मृति जाळला असता का ? 3 % असलेल्या उच्चवर्णीयां मध्येच आंतरजातीय विवाहा चे प्रमाण का जास्त आहे ? आणि मग कुठे गेला तो वर्णसंकर चा नियम ? वृद्धाश्रमात उच्च वर्णीयांचेच म्हातारे आईवडील असण्याचे प्रमाण जास्त का आहे ? " माता पिता आचार्य यांचा अनादर करू नये " मग या वाक्याला अर्थ काय ? मनुस्मृती प्रमाणे उच्च लोकच वागत नसतील तर त्यांनी मनुस्मृती ची भलामण का करावी ? कोरगाव भीमा प्रकरण व्यवस्थित पणे का वाढत गेलं ? साम दाम दंड भेद वापरा आणि राज्य करा बस .

In reply to by सोमनाथ खांदवे

3 % असलेल्या उच्चवर्णीयां मध्येच आंतरजातीय विवाहा चे प्रमाण का जास्त आहे ?
वृद्धाश्रमात उच्च वर्णीयांचेच म्हातारे आईवडील असण्याचे प्रमाण जास्त का आहे ? "
याला काही संदर्भ आहे का नसल्यास प्रतिसाद संपादित करावा हि विनंती.

स्वधर्म,
उदाहरणार्थ गा पैना अजूनही मनुस्मृतीत आक्षेपार्ह काय आहे, असा प्रश्न पडला आहे.
मनुस्मृतीचा अन्वयार्थ ( = इंटरप्रीटेशन ) वेगळ्या प्रकारे लावला पाहिजे. मी लावलेला जरासा वेगळा अर्थ इथे सापडेल : १. https://www.misalpav.com/comment/966587#comment-966587 २. मनुस्मृती आणि विवाह : https://www.misalpav.com/comment/966928#comment-966928 वरील दोन्ही प्रतिसाद परिपूर्ण नाहीत. पण मनुस्मृतीस वेगळ्या प्रकाशात पाहता येऊ शकतं, हा मुद्दा स्पष्ट व्हावा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गापै , 'मी मानत असलेल्या इश्वरांस्मोर सर्व मानव सारखे आहेत, म्हणून मी जन्माधारीत विषमता नाकारतो' खूपच क्मी शब्दांच वाक्य आहे, आपल्याच इश्वराचे मोठेपण मनाने स्विकारण्यासाठी काही सेकंद आणि कॉपी पेस्ट करण्यासाठी किबोर्ड वर चार पेक्षा अधिक टिचक्यपण माराव्या लागत नाहीत, तेव्हा ...........

In reply to by गामा पैलवान

जो अर्थ सुस्पष्ट दिसतो, त्याचा मुद्दामहून ‘जरासा वेगळा’ अर्थ कशाला लावायचा? तो कसा पवित्र ग्रंथ आहे दाखवायला? तुंम्ही कसा अर्थ लावता याला बिल्कुल महत्व नसून बहुसंख्य लोक तो कसा लावतात, आपल्याच बांधवांप्रति अत्यंत हीन वर्तनाचे समर्थन करायला तो कसा वापरतात आणि त्यामुळे शतकानुशतके समाजाची कशी अपरिमित हानी होते, याला महत्व आहे. तुंम्ही ‘लावलेला’ उदात्त अर्थसुध्दा स्त्रियांप्रति किती विषमता निर्माण करणारा आहे, हे तुम्ही दिलेल्या लिंक्सवर जाउन स्वत: पहावे अशी समस्त मिपाकरांना विनंती. हे असे वेगळे अर्थ लावण्यापेक्षा सरळ माहितगार यांनी लिहीलेल्या 'मी मानत असलेल्या इश्वरांस्मोर सर्व मानव सारखे आहेत, म्हणून मी जन्माधारीत विषमता नाकारतो' या वाक्याला तुमची सहमती आहे का असहमती, ते सांगा.

सवर्ण कन्येशी विवाह न करिता जो ब्राह्मण शूद्र स्त्रीस भोगाकरिता आपल्या शय्येवर आरोपित करतो (तिच्याशी विवाह करतो) तो अधोगतीस जातो व तिच्या ठायी पुत्राची उत्पत्ति केल्याने तो आपल्या ब्राह्मण्यापासूनच भ्रष्ट होतो. ॥१७॥ मनुस्मृती मध्ये किती व्यवस्थित सांगितले आहे शुद्र स्त्री बद्दल तरी पण त्याच्या अगदी उलट वर्णन ' माझा प्रवास ' या पुस्तकात झाशी या शहरातील नारायणशाश्री आणि 159 भटजी च्या कर्तृत्वा चे वर्णन केले गेले आहे http://aisiakshare.com/node/5250 असं समजूया तो भटजी आणि ते पुस्तक सगळे खोटं आहे . धागा मिपा पिनल कोड मध्ये बसेल का ? तरी पण स्वजबाबदारी वर उघडावा . त्या पुस्तकाची पी डी एफ सुद्धा आहे जमलं तर चितकवतो .

मार्कस ऑरेलियस,
ह्या वरील विधानला समर्थन करण्यास काही उदाहरणे पुराव्यासह देता येतील का ?
माझ्याकडून चुकीचं विधान केलं गेलं. त्याबद्दल क्षमा असावी. घटनेतल्या तत्रुडी मनुस्मृतीवरनं घेतलेल्या नाहीत. मला हिंदू कोड बिल म्हणायचं होतं. आंबेडकरांना संस्कृत येत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या हिंदू कोड बिल समितीने अनेक शास्त्रीपंडितांकरवी मनुस्मृती व इतर ग्रंथ समजावून घेतले. त्याच दरम्यान (१९४९ च्या आसपास) घटना लिहिण्याचं कामही चालू होतं. घटनासमितीपुढे भाषण करतांना आंबेडकरांनी मनु व याज्ञवल्क्य या दोघांच्या स्मृती उच्च दर्जाच्या असल्याचं म्हंटलंय. यासंबंधी इथे एक उल्लेख आहे : http://antisambhajibriged1.blogspot.com/2012/12/blog-post_1142.html मूळ मुद्दा मनुस्मृतीच्या उपयोगहीनतेचा होता. विरोधक समजतात तितकी ती टाकाऊ नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कायेन गापैजी, सध्याचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद आहेत, अबकड पर्सनल लॉ मध्ये काही बदल करण्यासाठी आणि समजूत काढण्यासाठी पवित्र ग्रंथा मधल्या काही चांगल्या तरतुदींचा प्रासंगिक आधार रविशंकर प्रसादांनी घेतला तर सबंध पवित्र ग्रंथास स्विकारलेच असा अर्थ होत नसावा. जसे गुलामगिरीचे समर्थन , स्त्री दास्य, जन्मधारीत विषमता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारणे , अनिष्ठ रुढी कोणत्याही ग्रंथाचा आधार घेत असतील तर ते संबंधीत ग्रंथामधील अनिष्ठ भाग नाकारावाच लागतो. बाकीचा चंद्र बघा बाकिचा चंद्र बघा कितीही म्हणाले तरी चंद्रावरचा डाग लपत नसतो . डागाचे समर्थन करण्यासाठी चंद्राच्या बाकीचे सौंदर्य उपयोगी येईलच असे नसावे. जन्माधारीत विषमतेच्या डागाचे समर्थन करत नसल्याचे स्विकारावे आणि आपल्या मोठ्या मनाची पावती द्यावी असे सुचवावेसे वाटते , बाकी आपली मर्जी.

In reply to by माहितगार

माहितगार, तुम्ही म्हणता की चंद्रावर डाग आहे. पण हिंदू समाजातल्या विषमतेला मनुस्मृतीस जबाबदार का धरण्यात आलंय? नक्की संबंध काय दोहोंत? हिंदू समाजात जी काही विषमता आलेली आहे ती परक्या राजवटींत. तिचं लोढणं मनुस्मृतीच्या गळ्यांत का म्हणून? आसामात अस्पृश्यता अगदी नाममात्र होती. तीसुद्धा इंग्रजी राजवटीत उत्पन्न झालेली होती. मग आसामी हिंदूंच्या समतेचं श्रेय मनुस्मृतीस मिळणार का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुमचे अंशतः बरोबरे गापै ! , बहुतेक सर्वच धर्मांचे परंपरावादी आपापल्या धर्मग्रंथात अनिष्ठ असे काही नाहीच / नव्हतेच हा मुद्दा मांडतात. व्यवस्थित सिद्ध करुन दिले तर या ग्रंथातील अयोग्य गोष्टीच्या समर्थनाचा परिणाम समाजावर झाला हे ऐतिहासिक पुराव्यांनी सिद्ध करुन दाखवा म्हणतात, असे काही पुरावे देणे अशक्य नसले तरी प्रत्यक्ष पुराव्यांची संख्या कमी असल्याने संशयाचा फायदा इथे तिथे मिळत राहातो. (इथे इतर मिपासदस्य पुरेसे दाखले देतील त्यासाठी सहसा माझी जरुर भासू नये , भासल्यास कळवावे) अलिकडे दुसर्‍या धाग्यावर आपण पाकीस्तानी कॅनेडियन डॉक्टर अली रिझवी यांच्या पुस्तकावर चर्चा करत होतो. जे लोक कुराण आणि अतिरेकी वृत्तीचा संबंध नाकारतात किंवा इज्राएल आणि काश्मिर संघर्षावर टाकतात त्यांच्या साठी त्यांनी १८ व्या शतकातला एक आफ्रिकी देश कुराणच्या नावाने जहाजे लुटणार्‍यांना कशी सुरक्षा देत होता याचे वर्णन केले आहे. अमुक ग्रंथ अथवा चित्रपट बघणारे सर्वच लोक त्यातील चुकीच्या संदेशांचे पालन करतात असे नाही पण दिशा चुकलेले व्यक्ती आणि समुह ग्रंथ प्रामाण्याचे आधार घेऊन अनिष्ठ कृती करण्यास प्रवृत्त होत असतात हे वास्तव परंपरावादी आणि सापेक्ष झालेले तथाकथित पुरोगामी दोघेही नाकारत असतात. ग्रंथातील मग ते कोणतेही असोत अनिष्ठतेला अनिष्ठ म्हणणे आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारणे हेच आपल्यातील अनिष्ठतेचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन धुवून काढण्याचा एकमेव मार्ग असावा असे वाटते. मी वर म्हटल्या प्रमाणे बहुतांश हिंदू ग्रंथ प्रामाण्य आणि अनिष्ठता नाकरुन पुढे गेले आहेत. उरलेल्यांनी ग्रंथातील अनिष्ठ भाग मनमोकळे पणाने नाकारुन पुढे जाण्यार्‍यांची कास धरणे त्यांच्या स्वतःचे प्रेम असलेल्या हिंदू धर्माच्या खर्‍या उन्नती साठी अत्यंत गरजेचे असावे. मुख्य म्हणजे अन्यथा इतर स्पर्धक धर्मीयांच्या ग्रंथ प्रामाण्याला नाकारण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार रहात नाही. आणि हि मोठी विचीत्र स्थिती आहे. आधूनिक काळात 'मी चांगला होत नाही तू चांगला हो ' हे विधान फारकाळ विकले जाणार नाही, 'आम्ही चांगले झालोय आता चांगले होण्याची तुमची वेळ आहे' हे विधान व्यवस्थित परिणामकारक ठरते. मनुस्मृतीतल्या उणीवा आणि त्यांचे अनिष्ठ परिणामाचे दाखले पुन्हा पुन्हा देता येऊ शकतील ती मोठी गोष्ट नाही , मुख्य म्हणजे एकदा का ' ईश्वरासमोर सर्व समान आहेत आणि म्हणून जन्माधारीत विषमता, अनिष्ठता आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारतो ' हे स्विकारले जाणे ग्रंथाच्या योग्यायोग्यतेवरील चिकित्सेच्या आधी आणि टिकेपेक्षाही अधिक महत्वाचे आहे. एकदा ' ईश्वरासमोर सर्व समान आहेत आणि म्हणून जन्माधारीत विषमता, अनिष्ठता आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारतो , आणि निर्णय ग्रंथ प्रामाण्या एवजी विवेकाने करतो म्हटले तर ग्रंथांवर टिका करण्याचे प्रयोजन सर्वसामान्यासाठी कमी होऊन जात असावे. एकदा लांछनाचे समर्थन करत नाही म्हटले की उरलेल्या चंद्राचे गुणगाण करण्यास तुम्ही मोकळे आहात. हवे तर ज्ञानदेवांचे पसायदान आणि टागोरांचे व्हेअर द मांईड इज विदाऊट फिअर पुन्हा एकदा वाचून घ्यावे. जमल्यास बघावे मी काय म्हणतो ते लक्षात घ्यायचे का ते

मिपावरील तमाम कायदेपंडित पुन्हा एकदा अभ्यास करण्याची गरज पडण्याची शक्यता आहे , खास करून दासबोध. कॉम. MT: ‘मुलगा’ शब्द भिडेंच्या अंगलट http://mtonline.in/76Q2Nb/dga via @mataonline: http://app.mtmobile.in

In reply to by सोमनाथ खांदवे

साबजी कायदा वाचलेला आहे, व्हिडीओ तेवढाच त्यांच्याच शेतातल्या आंब्या पुरता असेल तर ते बहुधा कायद्याच्या कचाट्यात अडकावेत. पण मिपासदस्य दासबोध.कॉम म्हणतात तसे , त्या सबंध असलेल्या व्हिडीओत त्यांनी दुसर्‍या कुणाच्या बद्दलचा उल्लेख रुपक म्हणून केला असेल कोर्टा समोर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत संभिंना त्यांची बाजू मांडता येऊ शकते, पण तो पर्यंत चौकश्या आणि कोर्ट केसेसचा त्रास होऊ शकतो.

माहितगार, १.
दिशा चुकलेले व्यक्ती आणि समुह ग्रंथ प्रामाण्याचे आधार घेऊन अनिष्ठ कृती करण्यास प्रवृत्त होत असतात
कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. अशा मोमीनांना दिशा चुकलेले म्हणता येतं. मात्र मनुस्मृतीच्या आधारे अत्याचार केलेले आढळून येतात का? निदान एखादी नोंद तरी? मनुस्मृतीचे असे काही ठाम आणि ठोस अनुयायी कोणीतरी कधीतरी ऐकलेत का? नसल्यास मनुस्मृतीच्या नावे शिमगा कशासाठी? कम्युनिस्टांनी मार्क्सचं नाव घेऊन जगभरात अनन्वित अत्याचार केलेत. मग दास कॅपिटलला कोणी मयतीचं पुस्तक म्हणतो का? मग ती विषमतेची धोंड मनुच्या गळ्यांत कशासाठी? २.
मनुस्मृतीतल्या उणीवा आणि त्यांचे अनिष्ठ परिणामाचे दाखले पुन्हा पुन्हा देता येऊ शकतील ती मोठी गोष्ट नाही
एखादा ग्रंथ काही प्रमाणात कालबाह्य झाला असेल तर त्यातला कालबाह्य नसलेला भाग व कालोचित इतर विचार घेऊन नवीन कालसुसंगत ग्रंथ निर्माण करता येतो ना? मग जुन्या अर्धवट कालबाह्य ग्रंथाच्या नावे बोंबाबोंब करणं बरोबर नाही. संदर्भ म्हणून देखील मनुस्मृती नको? इतका विटाळ? ३.
मी वर म्हटल्या प्रमाणे बहुतांश हिंदू ग्रंथ प्रामाण्य आणि अनिष्ठता नाकरुन पुढे गेले आहेत.
माझ्या मते हिंदू लोकं धर्मग्रंथ फारशा कट्टरपणे पाळत नाहीत. बदलत्या काळातही उपासना, साधना, भक्ती, योग, इत्यादि मूळ अध्यात्मिक अंगे टिकवून धरल्याने हिंदू समाज पुढे गेला आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. अशा मोमीनांना दिशा चुकलेले म्हणता येतं.
नक्की का? कुराणात लिहिलंय म्हणून काफिरांना ठार मारणारे असे मोमीनच कुराणानुसार योग्य दिशेने जातात असे नव्हे का?

In reply to by वामन देशमुख

मोमीनच कुराणानुसार योग्य दिशेने जातात असे नव्हे का? प्रतिवाद करण्याच्या नादात तुम्ही कशाचं समर्थन करताय? उद्या कोणीही म्हणू शकेल मी XXX पुस्तक मानतो आणि त्यात YYY व्यक्तींना मारा लिहिलंय म्हणून ते योग्य आहे? प्रत्येक जण स्वतःच्या मते नेहमीच बरोबर असतो.

In reply to by ट्रेड मार्क

प्रतीवाद नाही आणि समर्थन तर मुळीच नाही. माझ्या माहीतीनुसार आणि समजुतीनुसार- १. भारतीय कायदा (किंवा घटना) मोमिनांना इस्लामचे पालन करण्यास परवानगी देते. २. इस्लामचा पाया कुराण आहे. मग, जर कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. हे खरे असेल तर अशा मोमीनांना दिशा चुकलेले कसं म्हणता येईल? ते तर कुराणानुसार आणि म्हणून subsequently घटनेनुसारही योग्य दिशेनेच जात असतील ना?

मुळात अगदी वरिजनल संपूर्ण मनुस्मृती किती जणांनी वाचली आहे? त्यात नक्की काय काय लिहिले आहे याची खात्रीलायक माहिती किती लोकांकडे आहे? त्यापेक्षाही पुढे जाऊन गेल्या ५० वर्षात मनुस्मृती प्रमाण मानून समस्त भारतात किती गोष्टी केल्या गेल्या? मनुस्मृतीचे कट्टरपणे पालन करणारे किती समुदाय किंवा लोक भारतात आहेत? माझ्या मते हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे हे पण एक कारस्थान शिजले आणि कोणाच्यातरी वाचनात कोणीतरी त्याच्या आकलनाप्रमाणे लिहिलेला मनुस्मृतीचा भाग आला असावा आणि मग त्याचा पद्धतशीरपणे वापर करण्यात आला. मनुस्मृती किंवा त्याचे कुठलेच भाषांतर वगैरे मी तरी वाचलेलं नाहीये. पण काही शे/ हजार वर्षांपूर्वी, कदाचित त्या काळाशी सुसंगत असेल अश्या पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथावरून आत्ता का वाद होतात हेच मला समजत नाही. बरं हिंदूंमध्ये काही मनुस्मृती हा एकच ग्रंथ नाहीये. अगदी काही दशकांपूर्वी पर्यंत खूप शिकलेल्यांना वेदशास्त्रात पारंगत म्हणायचे, यात कुठेही कोणी मनुस्मृतीत पारंगत असल्याचे मी तरी ऐकले नाही. त्याकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती जी लोक पाळत होते, राजेशाही होती जी सगळ्यांना मान्य होती. उद्या कोणी शहाणा उठून पूर्वी हिंदुस्थानात राजेशाही होती हा किती मूर्खपणा होता आणि ते कसं अन्यायकारक होतं आणि त्यामुळे हिंदुस्थान हा जनतेसाठी चांगला नव्हता असं सांगू लागला तर ते मानाल का? काही राजे जनतेसाठी खूप चांगले होते तर काही वाईट होते, म्हणून संपूर्ण व्यवस्थाच पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट होऊ शकत नाही. राजा कसाही असो आणि त्याचा मुलगा कसाही असो, वारसाहक्काने त्या राजपुत्राकडेच राजगादी चालत यायची. राजाला पुत्र नसेल तर काहीतरी "सोय" करण्यात यायची पण प्रधानजींचा किंवा सेनापतीचा मुलगा, केवळ आधीचा राजा म्हातारा झाला म्हणून, राजा झाला अशी किती उदाहरणं आहेत? सांगण्याचा मतितार्थ असा की त्या काळी जी काही व्यवस्था होती त्यावर आता भांडण्यात काय अर्थ आहे?

In reply to by ट्रेड मार्क

>> कदाचित त्या काळाशी सुसंगत असेल अश्या पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथावरून आत्ता का वाद होतात हेच मला समजत नाही.  >> सांगण्याचा मतितार्थ असा की त्या काळी जी काही व्यवस्था होती त्यावर आता भांडण्यात काय अर्थ आहे? ट्रेडमार्क साहेब, तुमचे वरील दोन्ही मुद्दे पटले… पण - कदाचित त्या काळाशी सुसंगत असेल अश्या पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथाला आता गौरवण्याचे कारण काय?  - सांगण्याचा मतितार्थ असा की त्या काळी जी काही व्यवस्था होती ती किती चांगली होती हे सांगून वाद निर्माण करण्यात काय अर्थ आहे? … असं भिडे गुरूजींना विचारलं पाहिजे, नाही का?

In reply to by स्वधर्म

मनुस्मृती कालबाह्य आहे हे भिडे गुरुजींना माहीत नाही काय? ते सोडा पुर्वीच कस चांगल होत आणि आता कसे वाईट चाललय असा वादही असतोच की

In reply to by स्वधर्म

कदाचित त्या काळाशी सुसंगत असेल अश्या पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथाला आता गौरवण्याचे कारण काय? त्या ग्रंथाला कोण गौरवत आहे? कोणी तरी उच्चवर्णीय, खास करून ब्राम्हण, मनुस्मृतीच्या आधारे वागत आहेत का? भिडे गुरुजींनी गौरव केला म्हणजे काय म्हणलं ते इथे वाचा. ते म्हणले 'मनुनं जगाला पहिली घटना दिली. मनुस्मृती म्हणजे मानववंशास्त्र आहे. मनुच्या सावलीला उभं राहण्याचीही आपली लायकी नाही'. त्या काळी जी काही व्यवस्था होती ती किती चांगली होती किंवा आताच्या काळात मनुस्मृतीप्रमाणे वागावं असं काही म्हणले नाहीयेत. या उलट संभाजी ब्रिग्रेड आणि समविचारी मात्र अजून मनुस्मृती पकडून बसलेत. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेला हा ग्रंथ आहे, ज्याला इंग्रजांनी प्रमाण मानून १७९४ साली हिंदू कायदा बनवायला वापर केला. ते कायदे सुद्धा आता काळाप्रमाणे बदलले आहेत. चातुर्वर्ण्य व्यवस्था आत्ता अस्तित्वात आहे का?

In reply to by ट्रेड मार्क

मग आताची कालसुसंगत घटना असताना मनुस्मृतीचं नाव काढायची गरजच काय ते मला काही कळले नाही. आता चातुर्वर्ण्य व्यवस्था नाही तरी क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र ह्या शब्दांना आता कहीही अर्थ नाही असं नाही ना. अजूनही खालच्या जातीतल्या माणसाने लग्नात वरात काढली म्हणून खून होतात ह्या देशात.

In reply to by नगरीनिरंजन

म्हणजे भिडेगुरुजींना भाषणस्वातंत्र्य नाही असंच ना? ब्रिगेडी लोक कित्येक वर्ष मनूच्या नावाने बोंबलत आहेत ते चालतं, हो ना? भिडे गुरुजींनी फक्त मनू आणि मनुस्मृतीबद्दलचं त्यांचं मत सांगितलं. त्याप्रमाणे वागा किंवा आत्ता आचरणात आणा वगैरे काही सांगितलं का? आता चातुर्वर्ण्य व्यवस्था नाही तरी क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र ह्या शब्दांना आता कहीही अर्थ नाही असं नाही ना. चातुर्वर्ण्य व्यवस्था नाहीचे. सध्या जातीआधारित व्यवस्था आहे. दोन्हींमधील फरक तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो. तथाकथित उच्चवर्णीय सोडून बाकीच्यांना शिक्षणापासून ते सरकारी नोकरीपर्यंत सगळीकडे आरक्षण मिळतं. ऍट्रॉसिटी चे कलम लावून कोणाही तथाकथित उच्चवर्णीयाला विनाचौकशी तुरुंगात डांबता येतं. तुम्ही दिलेल्या वरात काढल्यामुळे हत्या होण्याच्या घटनांपेक्षा मी सांगितलेलया दोन मुद्द्यांवर आधारित कितीतरी जास्त घटना आहेत.

डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली : संभाजी भिडे भिडे यांनी कोरेगाव-भिमा दंगलीवरही भाष्य केलं आणि मिलिंद एकबोटेंचं समर्थन करत संभाजी ब्रिगेडनेच ही दंगल पेटवली होती, अशी टीकाही केली. --- ‘न्यूज 18 लोकमत’च्या एका कार्यक्रमात बोलताना भिडे म्हणाले, ”डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे. राजस्थान विधानसभेच्या भवनाबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यासाठी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर गेले होते. मनूचा जो पुतळा उभा करण्यात आला होता, त्या पुतळ्याखाली “मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता” असं बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलं असा दावा भिडेंनी केला. तसंच संविधान देशासाठी अर्पण करताना, मी हे लिहिलं मनुस्मृतीचा अभ्यास करून लिहिलं असंही बाबासाहेब म्हणाले होते असा दावाही भिडेंनी केला आहे. याशिवाय याचा पुरावाही मिळेल तो मीडियाने शोधून काढावा” असं भिडे म्हणाले. मनुने विश्वाच्या कल्याणासाठी ग्रंथ लिहिला. जपान सारखे राष्ट्र मनूला मानतं अनेक विदेशातील विद्यापीठात मनुस्मृतीचा अभ्यास करतात असा दावाही त्यांनी केला. --- https://www.loksatta.com/maharashtra-news/sambhaji-bhide-says-babasheb-…

स्वधर्म,
- कदाचित त्या काळाशी सुसंगत असेल अश्या पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथाला आता गौरवण्याचे कारण काय?
माझ्या मते मनुस्मृतीस गौरवण्याचं कारण असं की स्मृती लिहिणे ही एक प्रक्रिया आहे. मनुने ती पहिल्यांदा पद्धतशीरपणे राबवली. जरी ती स्मृती आज अंशात: कालबाह्य असली, तरी नवनिर्मितीची प्रक्रिया आजिबात कालबाह्य नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

प्रा. सदानंद मोरे यांचे या विषयावरचे भाष्य वेगळे असावे, संबंधीत एक कुणाचा प्रतिसाद वर असावा आणि आपण त्याची अद्याप कदाचित दखल घेतली नसावी.
...मनुने ती पहिल्यांदा पद्धतशीरपणे राबवली. ...
आपल्या या वाक्याचे विश्लेषण आपणच करावे आणि ठरवावे की आपणास नेमके काय म्हणायचे आहे ?

या युट्यूब दुव्यावर न्यूज१८लोकमत चॅनलवर उदय निरगुडकरांनी घेतलेली संभाजी भिडे यांची जवळपास ४४ मिनीटांची मुलाखत दिसते आहे. संभाजी भिडेंचे काही पूर्वग्रह कायम दिसतात तर काही विधानांची वस्तुनिष्ठता साशंकीत असल्याची चर्चा आहे. मनुस्मृती ग्रंथातील त्याज्य सोडून चांगले पहा असा काहीसा होरा त्यांच्या मुलाखतीतून असला -जातीयवादाचे समर्थन करताना ते दिसत नाहीत - तरी काही विधानांच्या वस्तुनिष्ठता साशंकीत झाल्याने चर्चेत राहतील असे दिसते, पण ते सरते शेवटी ग्रंथ प्रामाण्याचे नाहीतर राष्ट्रीयत्वाच्या भावनेसाठी व्यक्ती प्रामाण्याचे समर्थन करताना दिसताहेत. मुख्य म्हणजे त्यांचे आंबा विषयक विधानाचे स्पष्टीकरण वर दासबोध.कॉम यांच्या प्रतिसादातील स्पष्टीकरणापेक्षा वेगळे दिसते. त्यांनी आंबा विषयक केलेले विधान अधिक व्यापक रुपकाचा भाग असले तरीही संभाजी भिडे गुरुजींना गर्भलिंग निदान विरोधी कायद्यातील नेमक्या तरतुदींची कल्पना नसावी आणि ते या कायद्याच्या कचाट्यात तांत्रिक दृष्ट्या सापडू शकतात असे प्रथम दर्शनी वाटते. पण उर्वरीत मुलाखत राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याने एवढी प्रखर आहे , एकीकडे गर्भलिंग निदान विरोधी कायद्यान्वयेची कारवाई टळण्याची शक्यता कमी वाटते पण त्यांच्यावरील अशा कारवाईने त्यांच्या बद्दल सहानुभूती वाढणारच नाही असे ही सांगणे कठीण असावे असे वाटते.

भिडे गुरूजींच्या आंबा विषयी विधानावर एक ही महिला संघटना तावातावाने वाद घालायला कशा नाही आल्या ? तुकाराम मुंढे हे पुण्यात pmpl चे ceo असताना पुण्यातील सर्व पक्षांच्या पुढाऱ्यांना चार हात लांब ठेऊन विनादबाव काम करण्याची त्यांची हातोटी पुणेकरांनी पहिली आहे आणि आता ते नाशिक महानगरपालिका चे आयुक्त आहेत . अशा कर्तव्यदक्ष व्यक्ती ला राज्य सरकारला ने रिपोर्ट पाठवायला सांगितले आहे .

वामन देशमुख,
कुराणात लिहिलंय म्हणून काफिरांना ठार मारणारे असे मोमीनच कुराणानुसार योग्य दिशेने जातात असे नव्हे का?
थोडं शब्दांकन चुकलं माझं. दुरुस्त केलेलं विधान असं की :
कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. अशा मोमीनांना दिशा चुकलेले म्हणून पुरोगामी लोकं संशयाचा फायदा देतात.
आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

वामन देशमुख आणि गा.पै. गा. पै.ंनी उपचर्चा खाली घेतल्यामुळे वामन देशमुख यांचा ह्या प्रतिसादावरची चर्चाही इथेच करतो.
आधी गा.पै. कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. अशा मोमीनांना दिशा चुकलेले म्हणून पुरोगामी लोकं संशयाचा फायदा देतात. गा.पैंचा प्रतिसाद संदर्भ
ईथे कथित पुरोगामी मांडणी जराशी वेगळी असते. त्यांचा पहिला बचाव, 'हिंसा आणि परधर्मीयांशी केलेल्या हिंसेचे उल्लेख ईतर धर्मीय ग्रंथात सुद्धा असतात', या मांडणीत अंशतः वस्तुनिष्ठता असल्याचे ईतर धर्मीय अती-उजवे नाही म्हटले तरी लक्षात घेत नाहीत; आणि दुसर्‍या बाजुला ह्या स्वतःच्या पुरोगामी मांडणीच्या निसटत्या बाजू पुरोगाम्यांनाही लक्षात येत नाहीत की, ईतर धर्मीय ग्रंथातही अशा हिंसा विषयक समस्या असल्या तरी, इतर धर्म आणि धर्मीय रिफॉर्मेशन आणि एनलाईटनमेंट पुर्नमांडणी आणि प्रबोधनाच्या प्रक्रीयेतून बर्‍यापैकी पुढे गेले आहेत, ईस्लामच्या बाबतीत रिफॉर्मेशन आणि एनलाईटनमेंट पुर्नमांडणी आणि प्रबोधनाच्या प्रक्रीये बाबत बर्‍यापैकी मागे असावी. आताशा भीत भीत का होईना बोटावर मोजण्या एवढे का होईना मुस्लीमातील पुरोगामी स्विकारु लागले आहेत असे दिसते, रिफॉर्मेशन आणि एनलाईटनमेंट पुर्नमांडणी आणि प्रबोधनाच्या अपेक्षीत प्रक्रीये बद्दल मुस्लीमातील या पुरोगामी विचारांची नीटशी दखल घेतली जाणे अद्याप बाकी आहे. तो स्वतंत्र लेखाचा विषय -माझ्या येत्या स्वतंत्र लेखात असणार- आहे. रिफॉर्मेशन आणि एनलाईटनमेंट पुर्नमांडणी आणि प्रबोधनाच्या बाजूचे नसलेले पुरोगामी अजून एक वाट शोधत असतात ती म्हणजे ईतर धर्मीयांचे रिफॉर्मेशन आणि एनलाईटनमेंट पुर्नमांडणी आणि प्रबोधनाची प्रक्रीया झाली म्हणता तर ईतर धर्मीयातील अती उजवे कट्टर लोक हिंसा करताना दिसतात त्याचे काय ? म्हणजे धर्मग्रंथात लिखीत ग्रंथप्रामाण्याचा अंशतः पडणारा प्रभाव त्यांना या पळवाटेने सरसकट नाकारायचा असतो-म्हणजे पुर्नमांडणी आणि प्रबोधन नाकारयचे असते. ईथे पुरोगामी असुरक्षीतता आणि अ-विश्वासाच्या भावनेतून होणार्‍या प्रतिक्रीयावादी इतर हिंसा आणि ग्रंथप्रामाण्यातून येणार्‍या हिंसा यांची गल्लत करत असावेत. वस्तुतः ते जर खरे विशुद्ध पुरोगामी असतील तर एक ते ग्रंथप्रामाण्याचे नव्हे तर विवेकाचे समर्थक असायवास हवेत, दुसरे विवेकावर विश्वास असेल तर कोणत्याही अबकड ग्रंथाच्या चिकित्से बाबत कथित पुरोगाम्यांना आक्षेप असण्याचे कारण नसावे . तसेच ग्रंथ प्रामाण्याच्या पाठीशी असलेल्या अंधश्रद्धा, त्यातुन निर्मित होणारे उत्पात मुल्य, हिंसा इत्यादी नाकारण्याचे कारण नसावे. पण इथे विरुद्ध गंमत अशी होते की, साध्या शांततामयी शब्दातला उपरोध त्यांचा त्यांनाच व्यवस्थित कळत असतो -पण या उपरोधास विरोधक नाही ते स्वतःच जबाबदार आहेत हे त्यांच्या लक्षात का येत नसावे कोण जाणे. विवीध प्रेषित ते परमेश्वर यांची नावे चुकाशील माणसांनी वापरणे चालते पण व्यंगचित्र दूर असूद्यात आदरपुर्वक काढलेल्या चित्राला , मुर्तीला अथवा अभिनयालाही चालत नाहीत -उत्पात मुल्य ते हिंसा ते शिक्षा यांची भिती असते - तिथे यांना सहनशीलता शांततामयी शब्द त्यांचे त्यांना खटकत असतील तर नवल नसावे. जेव्हा स्वतः मुस्लीम, मुस्लीम स्त्रीया आणि मुस्लीमेतरांच्या १) (व्यक्ती) स्वातंत्र्य, २) मानवाधिकार, ३) सहिष्णूता, ४) कायद्या समोर समानता, ५) विवीधता (pluralism) यांची विवीध स्तरावर विवीध देशातून पायमल्ली होते आणि या पायमल्लीची कोणतीही चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य नसते आणि स्वातंत्र्य दडपण्यासाठी अबकड ग्रंथांचे दाखले दिले जातात तेव्हा प्रबोधनेच्छु रास्त टिकांबद्दलच्या फोबीआचे प्रदर्शन तथाकथित पुरोगाम्यांकडून होताना दिसते (संदर्भ डॉ.अली रिझवी आणि हमेद अब्देल-समद), त्यातील अनेक अगदी टोकाच्या परंपरावाद्यांप्रमाणेच मुद्देसुद चर्चाकरण्या एवजी पिंका आणि टिकाकारास व्यक्तीगत लक्ष्य करतानाही दिसून येतात. अगदी या मुद्द्यावरही इतर धर्म/धर्मीयातही हे दोष नाहीत का ? चे तुणतुणे एकाच्या उणीवा झाकण्यासाठी दुसर्‍याच्या उणीवाम्ची उदाहरणे सादर केली जातात आणि अशा पद्धतीने पुरोगामी संशयाचा फायदा देतात असे वाटते. मग वामन देशमुख प्रतीवाद नाही आणि समर्थन तर मुळीच नाही. माझ्या माहीतीनुसार आणि समजुतीनुसार- १. भारतीय कायदा (किंवा घटना) मोमिनांना इस्लामचे पालन करण्यास परवानगी देते. २. इस्लामचा पाया कुराण आहे. मग, जर कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. हे खरे असेल तर अशा मोमीनांना दिशा चुकलेले कसं म्हणता येईल? ते तर कुराणानुसार आणि म्हणून subsequently घटनेनुसारही योग्य दिशेनेच जात असतील ना? वामन देशमुखांचा प्रतिसाद संदर्भ आधी वामन देशमुखांची बाजू ईथे वामन देशमुखांच्या उप्रोधा मागची भावना समजता येते, व्यक्तिगतत कायदा अमुक एका ग्रंथातील प्रामाण्यानुसारच चालला पाहीजे त्यात कालसुसंगत सुधारणांना वाव नाही आणि हे ग्रंथ प्रामाण्य राज्यघटनेपेक्षा अधिक महत्वाचे असेल; राज्यघटना आणि लोकशाही आमच्या ग्रंथप्रामाण्यानुसार चालली नाहीतर आमच्या उत्पात मुल्याची तुम्हाला भिती वाटली पाहिजे जेणे करुन कालसुसंगत बदल योग्य असले तरी आम्ही होऊ न देण्याच्या अट्टाहासात यशस्वी होऊच होऊ. इथे तथाकथीत पुरोगाम्यांना त्यांचे कर्मठ आपलेसे वाटतात आणि सुधारणांचा आग्रह धरणारे फोबीआ ग्रस्त वाटतात, काही फोबीआ ग्रस्त असतीलही पण सुधारणांच्या सर्वच मागण्या सरसकट कशा चुकीच्या असुशकतत आणि कोणतेच बदल कसे पुढे येत नाहीत असे प्रश्न कुणाला पडत असतील तर भावना समजता येते. अर्थात या समर्थनाचा उद्देश्य फोबीआ निर्माण करणे नाही योय बाजूचे समर्थन एवढाच मर्यादीत आहे. बाकी वामन देशमुखांकडून सुटणार्‍या बाजू आधी झाकीर नाईक कृत बचाव कसा असू शकेल आणि नंतर भारतीय कायद्यातील वस्तुस्थिती. कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात, हे विधान सरसकट बरोबर नसावे. कुराण आणि हदीथ यांची वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रीटेशन होत असावित त्यातील झाकीर नाईक प्रणित आणि पुरोगाम्यांनाही (आणि तसे कुणालाही) चालावेसे इंटरप्रिटेशन म्हणजे, इस्लाम आणि कुराण मधील संदेश शांततामयी आहे, तुमचा धर्म तुमच्यापाशी आमचा धर्म आमच्या पाशी, कुणावरही आपला धर्म लादू नका असेच कुराण सांगते. - इथे पुरोगामी गापै म्हणतात तसे संशयाचा फायदा देतात. मग 'कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात'- याचे गौड बंगाल काय आहे ? तर फक्त काफीर युद्धात जिवंत मिळाले तर धर्मपरिवर्तनाच्या अटीवर तुम्ही काफीरांना दंड जिझीया लावून जिवदान देऊ शकता किंवा धर्म परिवर्तन स्विकारले नाहीतर तुम्ही त्यांना ठार मारु शकता. मग आहे की नाही धर्म शांततामयी, विरोधक उगीचच चुकीचा गवगवा करतात ! आता कोण स्वतःला खलीफा /सुल्तान किंवा अमुकतमुक जाहीर करुन कुणा विरुद्ध केव्हा युद्ध पुकारेल आणि आपले स्वतंत्र इंटरप्रिटेशन लावत आस्मानी सुल्तानी बरसवेल हे सांगणे कर्म कठीण असावे . कुणा परधर्मीयांविरुद्ध केवळ वेगळ्या धर्माचे आहेत म्हणून जिझीया का लावावा ? परधर्मीयतेमुळे युद्ध का पुकारावे ? युद्धात जिवंत सापडले तर धर्म बदलण्याचे कंपल्शन का टाकावे ? जर सर्वश्री परमेश्वर एकटा एकमेव असेल तर त्याची ईतर कोणी इतर कोणत्या पद्धतीने भक्ती केली किंवा नाही केली तर सर्व शक्तीमानास का फरक पडावा ? त्या सर्वशक्तीमान दयाळूस मानवाची हिंसक परिक्षा का पहावी वाटावी ? क्रौर्यपूर्ण शिक्षा का द्याव्या वाटाव्यात या प्रश्नांची उत्तरे पुरोगामी त्यांच्या कर्मठांकडे मागतील का आणि त्यांच्यातले झाकीर नाईकांसारखे कर्मठ परंपरावादी इतरांसाठी नको स्वतःसाठी याची उत्तरे कधी शोधतील हा मोठा प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे प्रेषित महोदयांना (त्यांना शांती लाभो) सुरवातीच्या काळात आलेले संदेश शांतता मयी समजले जातात तर दुसर्‍या टप्प्यात आलेले संदेश हिंसा आणि क्रौर्याकडे झुकलेले समजले जात असावेत. वर म्हटल्या प्रमाणे कोणत्या भागाचे काय अर्थ लावायचे याच्या नुसार इंटर प्रिटेशन बदलतात. अहिंसक पुरोगामी आपल्या सोईचे इंटरप्रिटेशन घेऊन बसतात, आणि हिंसक इंटरप्रिटेशन वापरणारे दिसले की दुसरीकडेही असेच आहेना अशी मखलाशी करतात. त्यांच्यातील सर्वच लोक अथवा सर्वच समुह हिंसा आणि क्रौर्यात सहभागी होत नाहीत असा एक दावा केला जातो त्यात तथ्य नक्कीच आहे पण जो पर्यंत काही लोक ग्रंथप्रामाण्याचा आधार सांगत हिंसा आणि क्रौर्याचा मार्ग वापरत आहेत तोपर्यंत - अशा प्रामाण्य मानल्या जाणार्‍या तत्वज्ञानाची मनमोकळी चिकित्सा होऊन तत्वज्ञानाच्या पुर्नबांधणीस गती यावयास हवी आणि प्रबोधन तशा हिंसक मार्गाची निवड करु शकणार्‍यांपर्यंत पोहोचावयास हवे असे वाटते कायद्याचे जागतिक संदर्भ तसे पहाता अगदी जागतिक स्तरावर इस्लामिक देशातही बरेच कायदे व्यवहारता पाहून बदलले गेले आहेत, क्रिमीनल लॉ मधील दंडाच्या पद्धतील क्रौर्य कमी होऊन तुरुरंगवासाच्या सिव्हीलाईज्ड पद्धतीचा वापर वाढत आहे. व्यवहारात फायदा आणि आवश्यक असेल तेथे हि मंडळी सोईने बरेच काही न बोलता वाकवतात. कर्जाचे देणे घेणेस परवानगी नसावी पण बहुधा दुसृया खलिफानेही कर्ज घेण्याचा अथवा देण्याचा व्यवहार केल्याचे वाचल्याचे आठवते चुभूदेघे पण ओटोमनांनी कर्ज घेऊन वसुलीसाठी तुर्कस्थान युरोपीयनांना चक्क आंदण दिला होता. आताही तेलाधारीत देश सोडले तर बहुतेक इस्लामीक देश सर्रास कर्जे घेतात. एकीकडे कम्युनीस्ट नास्तीक म्हणून रशियनांशी लढाई केली जाते दुसरीकडे नास्तीक असलेल्या चिनचे तळवे चाटले जातात. हे सर्व शेवटी सोईने होत असते. दुसरीकडे ज्या काही कट्टरवाद्यांना हे ग्रंथ प्रामाण्यात बसत नाही हे कळते त्यांच्या साठी परमेश्वर आणि त्याच्या ग्रंथातील आदेशानुसार चालणार्‍या खलिफा शिवाय इतर कोणतेही स्थानिक सरकार अथवा युनो सार्वभौम असू शकत नाही . ग्रंथात फक्त सोन्या आणि चांदीच्या नाण्यांचाच उल्लेख आहे म्हणून कागदी चलनही चालत नाही अशा प्रकारच्या अनेक कट्टरतावादी इंटरप्रिटेशन्स आणि त्यांच्या मागे धावणे समांतरपणे अव्याहत चालते. जिथ पर्यंत भारतीय कायद्यांचा संदर्भ आहे यातील कायद्यातील कट्टरता बाजूस ठेऊन मोकळा श्वास घेण्याचे अकबराच्या पद्धतीने काही प्रयत्न झाले नाही असे नाही. किंवा मराठा साम्राज्य आणि त्या नंतर रणजित सिघांनी पंजाबात कंट्रोल मिळवल तसे किमान चर्चित वाक्या प्रमाणे वागण्यास बर्‍यापैकी लगाम बसू लागला असावा. ब्रिटीशांच्या कालावधी नंतर क्रिमीनल लॉच्या बाबतीत रिफॉर्मेशन पूर्णतः यशस्वी पणे लावले गेले - हे ब्रिटीशांचे रिफॉर्मेशनही पलटवू इच्छित काही पाकिस्तानी कट्टरतावादी गट पाकिस्तानात आहेत त्यांच्या कारवाया सातत्याने दिसतच असतात. भारतीय राज्य घटना किमान थेअरॉटीकली सार्वभौम आहे. व्यक्तिगत कायद्याच्या संदर्भाने भारतीय राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समानतेच्या व्यावहारीक विवेकी अंमलबजावणी समोर ग्रंथप्रामाण्य कृत उत्पात आणि वोटबँक कृत अव्हाने आहेत नाही असे नाही तरीही हिंसा आणि क्रौर्य या बाबतीत वामन देशमुख म्हणतात तसा खुला परवाना भारतीय कायदा आणि राज्यघटनेत दिसत नाही असे वाटते. असो. हा प्रतिसाद स्वतंत्र लेखाच्या स्वरुपात असावयास होता का असे वाटून गेले कारण यात वस्तुनिष्ठतेच्या आणि संदर्भांच्या गरजेपोटी बदल करणे भर घालणे अवघड जाईल. असे वाटते. काही संदर्भ आणि वस्तुनिष्ठ बदल सुचवावे वाटल्यास स्वागत असेल. चुभूदेघे. पिंका आणि व्यक्तिगतात विरहीत सकारात्मक रचनात्मक चर्चा सहभागा साठी अनेक आभार.

संभाजी भिडे यांच्या आंबा प्रकरणाविषयी https://www.facebook.com/barve.prasanna/posts/10213609662970770 येथे लेख वाचनात आला. तोच लेख https://prasannavadane.blogspot.com/2018/06/blog-post.html येथेही आहे. त्यावरून सर्व वृत्तवाहिन्यांनी मुद्दाम चुकीचे वार्तांकन केल्याचे दिसते.

In reply to by आकाश५०८९

प्रसन्न वदनेंचा ब्लॉग वाचून युट्यूब जरा आणखी खोदले तर २१ जूनची जनप्रवास लाइववरची हि मुलाखत युट्यूबवर दिसली पण याच गोष्टी संभाजी भिडे उदय निरगुडकरांना दिलेल्या या मुलाखतीत का सांगत नाहीत याचा प्रश्न पडतो -प्रत्येक व्यक्तिला मिडीया मिसरिपोर्टींगला कसे तोंड द्यायचे हे माहित असेलच असे नसावे . भिडेंच्या इतर चुका काय असतील ते असोत, प्रसन्न वदने म्हणतात तसे जनप्रवास लाइववरची मुलाखत पाहिल्यानंतर, आंबा प्रकरणाचा पूर्ण वक्तव्याचा मूळ व्हिडियो न दाखवता सोईचे मर्यादीत अंश फक्त दाखवले गेले असल्याची साशंकता आधी पेक्षा अधिक वाटत आहे. भिडेंच्या चुकीच्या अंधश्रद्धेचे खंडण जरुर करावे पण भिडेंना अंधश्रद्धा आहेत म्हणून त्यांचे वक्तव्य अर्धवट दाखवले जात असेल तर पत्रकारीतेच्या नैतिकतेच्या नेमक्या कोणत्या नियमात बसते कि अधःपतन आहे असे म्हणावे. संबंधीत पत्रकारांनी खरेच अर्धवट रिपोर्टींग केले असेल तरी बहुधा बदनामीच्या कायद्या अंतर्गत कव्हर होणार नाही पण पत्रकारीतेच्या मुल्यांचे पालन झाल्या बाबत शंका असेल तर प्रेस काऊंसिल ऑफ ईंडियाकडे कुणालाही इमेल ने पण तक्रार करता येत असावी. अशा सभेत उपस्थित व्यक्तींकडून खात्री करुन घेऊन अशी तक्रार करण्यास हरकत नसावी असे वाटते.

सोशल मिडियावरच्या व्हिडियोजवरुन जनतेची अदालत बसायला लागलीयआजकाल. गंमत म्हणजे “व्हिडिओ एव्हिडन्स“वरुन निरुपद्रवी विद्यार्थ्यांना थेट देशद्रोही ठरवून मोकळे झालेले लोक आता बावचळले आहेत. दुधारी हत्यार आता उलटले तर पूर्ण पुरावा,न्यायालायात प्रलंबित असणे वगैरे गोष्टी आठवायला लागल्या आहेत. चांगलीच गोष्ट आहे. दरम्यान कन्हैय्याकुमारला विद्यापीठाच्या “उच्चस्तरीय” समितीने केलेला दहा हजाराचा दंड न्यायालयाने रद्द केला आहे. तसेच न्यायालय ह्या बाबतीतही योग्य तो निर्णय देईलच. प्रश्न फक्त असा उरतो की अशा गोष्टी पसरवणाऱयांचं काय करावं? सरकार अशा आयटीकंटकांचा बंदोबस्त करणार की उलट आणखी सेना निर्माण करणार?

In reply to by नगरीनिरंजन

निरुपद्रवी विद्यार्थी कोणाला म्हणताय? कन्हैया आणि त्याच्या गॅंगला? आपल्याकडे विद्यार्थीदशा साधारणतः वयाच्या २४-२५ पर्यंत संपते. पुढे जे PHd वगैरे करतात ते एकीकडे कामधंदा करत आपला अभ्यास चालू ठेवतात. आता ३१ वर्षांचा असूनही कन्हैयाच्या अचिव्हमेंट्स सांगा. दुर्दैवाने तो कम्युनिस्ट विचारांच्या प्रभावाखाली आला आणि त्यात नंतर जनेवि सारख्या विद्यापीठात दाखल झाला. कन्हैयाने काय केलं ते तुम्हाला माहित असेलच. तरी त्याला पाठिंबा देत असाल तर.... काय बोलणार!

In reply to by ट्रेड मार्क

कोर्टाच्या आधी तुम्हाला कळलेलं दिसतंय त्याने काय केलं ते. की ठरवूनच टाकलंय तुम्ही? कोर्टाने तर त्याचा दंडही रद्द केला आहे. ह्या देशाच्या न्यायसंस्थेबद्दल आपल्याला काहीच आदर नसेल तर तुम्हाला देशभक्तीचा ठेका घ्यायचा काहीही अधिकार नाही. मुळात देशाच्या नावाखाली सरकारच्या अशा दडपशाहीला पाठिंबा देऊन देशाचे नुकसानच केले जात आहे. अर्थात तुम्हाला ते समजणार नाही किंवा समजून घ्यायचं नाहीय ते उघड आहे.

कन्हैयाकुमार बद्दल अजून वादविवाद चालू आहेत ? आपल्या भारतातील लोक पण कोणाला आणि का डोक्यावर बसवून ठेवतात हेच कळत नाही . कन्हैया ने आता पर्यंत राष्ट्रीय पार्टी कशी स्थापन केली याचेच आश्चर्य वाटते . विद्यार्थीदशेतला कन्हैयाकुमार ला थेट भारताच्या पंतप्रधानांना मीडिया समोर एकेरीत उल्लेख करण्याचे बळ पुरवत कोण ? आता बहिर्जी नाईक जरी असते त्यांना सुध्दा पडद्यामागचे सापडले नसते ( पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करणारा देशद्रोहाच्या घोषणा देईल असा जावईशोध कुणी लावू नये हं ! ) खरंच मोठा राजकीय नेता बनण्याचे गुण वैशिष्ट्य आहे त्याच्यात .

हीहीही! कन्हैया गॅंग च जाऊदे तुम्ही चष्मेवाल्या गॅंगचे दिसताय...
आपल्याकडे विद्यार्थीदशा साधारणतः वयाच्या २४-२५ पर्यंत संपते.
कुठून निष्कर्ष काढलात? असाही "देशद्रोह्यांसाठी" संदर्भ कुठल्या गोष्टींना लागतो पण तरीही बघूया... जर १२ वी १८ व्या वर्षी झालीच, तर डिग्री ३/४ वर्ष पुढे म्हणजे २२ वर्षांपर्यंत... त्यानंतर लगेच पीएचडी करता येत नाही मास्टर्स डिग्री करावी लागणार म्हणजे २ वर्ष किमान! त्यानंतर करता येईल पीएचडी! आता पीएचडीसाठी ३ ते ५ वर्ष कितीही लागू शकतात... म्हणजेच किमान २९-३० पर्यंत तरी पीएचडी साठी कालावधी लागणारच! हो का? मास्टर्स करून आता डोंबल नोकरी मिळतेय, पण ते जाऊद्या... पीएचडी करताना स्टायपेंड मिळू शकतो त्यामुळे अनेक जण पूर्णवेळ करतात त्यात काय गैर आहे? आणि गम्मत म्हणजे बीजेपीच्या तथाकथित देशभक्त गॅंग ने "कन्हैया ११ वेळा पीएचडीला नापास झाला" हा संदेश व्हायरल केलाय! पीएचडीला परीक्षा नसते मग ११ वेळा नापास कसा होणार, हे याना कोण सांगणार! Speaking to Alt News, Kumar said, “This information is totally fake. There is no exam for PhD. I am a final year student. My thesis is in the final stage and will be submitted by July 21, 2018. The subject of my thesis is ‘social transformation in South Africa’. I enrolled in JNU for the integrated MPhil-PhD program in 2011 which is of 7 years’ duration. I commenced my PhD in 2013. I suspect that someone just created a message with this rumour which then started to circulate. I haven’t even been in JNU for 11 years. This is my 7th and final year.” Kumar also tweeted the same. Link1
कन्हैयाने काय केलं ते तुम्हाला माहित असेलच. तरी त्याला पाठिंबा देत असाल तर.... काय बोलणार!
काय केलं त्याने? जरा सांगाल का? नाही म्हणजे कोर्ट सुद्धा असे काही म्हणत नाहीये जर तुम्हाला काही आतली बातमी असेल तर कळू दे सगळ्यांना! नाहीतर कोर्टात पाठवून द्या पुरावे म्हणजे शिक्षा पक्की होईल त्याला! मध्यंतरी कुणाल कामरा ने याची मुलाखत घेतलेली तेव्हापासून त्याला पण देशद्रोही केलं! आता नुकताच त्याचा कार्यक्रम एका युनिव्हर्सिटी मधून रद्द केलाय. का तर म्हणे तो देशद्रोही बोलतो?! कोण ठरवू लागलाय हे? सगळी फालतुगिरी चाललीये नुसती... एखाद्या विद्यार्थ्याला इतकी मेहनत घेऊन मीडिया ट्रायल करून राष्ट्रीय पातळीवर कोर्टाच्या आधीच "देशद्रोही" ठरवण्याची हि पहिलीच वेळ असेल. जर चष्मा काढून जरा बघावासा वाटलं तर एक छोटा व्हिडीओ दिला आहे तो बघा.. तो पूर्ण व्हिडीओ नाहीये, असे अर्धवट व्हिडीओ देणे मलाही योग्य वाटत नाही पण लोकांकडे १-२ तास वेळ नसतो त्यामुळे १८ मिनिटांचा व्हिडीओ बघा... तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील कदाचित. सुरुवातच त्याच वय आणि शिक्षण यावरून आहे म्हणून देत आहे. (त्याच शीर्षक नका घेऊ मनावर! ;) )

धन्यबाद शब्दबंबाड जी !!!! अठडा मिनट का आपने अच्छा बीडीओ पोस्ट किया . हम कुछ बात कहना चाहते है कन्हया जी के बाडे में . १) एव्हलांचं प्रूफ टेंट के लिये सिर्फ भाजप को जिम्मेदाड पकड रहे है ? काँग्रेस ने क्यो नही लिये ? 2) बिहाड में जो दलितो की हत्याये हुई उसके लिये भाजप क्यो ? नितीश कुमार जिम्मेदाड नही है ? 3) दलितो की बुक बॅन के बारे में बोलते वक्त मनुस्मृती बॅन के बारे में क्यो नही बोले ? 4) आरक्षण के बारे में बोलते वक्त गटड साफ करने वाले और मंदीड के पुजाडी की बात करते करते प्रायव्हेट कम्पनी में आरक्षण क्यो नही ऐसा उन्होंने सवाल किया . कीधड की लिंक कीधड जोड रहे हैं वो ? प्रायव्हेट कम्पनीयो में भला गटड साफ कडने वाले और मंदिड के पुजाडी का क्या काम , वाहां टॅलेंटेंड लोगो को ही चूनते है फिर वॊ किसीं भी जाती से हो . सिड्फ गव्हर्नमेंट में आरक्षण के नाम पर कुछ भी चलता हैं . 5) हमारे भारत में दलितो की जीवन अवस्था के लिये सिर्फ चार साल पुराणी भाजप की सरकार जिम्मेदाड है ? दलितो की जीवन अवस्था के लिये काँग्रेस की कोई जिम्मेदाडी नही ? अगर है तो आज तक हमने श्रीमान कन्हया कुमार जी को काँग्रेस के खिलाफ बोलते वक्त हमने नही देखा . अगर आपने देखा है तो डालीये बीडीओ . 6) कन्हया कुमार जी बिहाड से आये है और बिहाड की जो दुरावस्था लालूप्रसाद ने की है , कन्हया जी ने उनके बारे में भी कभी गुस्सा आज तक नही दिखाया ? ऐसा क्यो ? सभी प्रॉब्लेम के लिये सिड्फ भाजपा की गलती है क्या ? सबसे अहम बात पी एच डी के बारे में बोलते वक्त टॅक्सपेयर की बात की बहुत अच्छा लगा , लेकीन हम ये कहना चाहते है की वो देश की जनता के टॅक्स पे मुफत में खा पी के पी एच डी ही करे 30 साल नही तो 40 साल लगने दो लेकीन सिर्फ शिक्षा पे ध्यान देना चाहीये ना की राजनीती पे . ये तो पाकिस्तान और अमडीका की तरह हो गया . क्या जडूडत है टॅक्सपेयर के पैसो पे जीवन जीते हुये टी व्ही इंटडव्यूव देना , जंतड मंतड पे मोर्चा , जे एन यू में अफजल की शहादत मनाना ?

फुल शालजोडे आणि एकदम पर्फेक्ट जागेवर हाणल्यात , कन्हया व्हिडिओ मध्ये बऱ्याच ठिकाणी ' र ' चा 'ड ' करतोय वाचतांना हगून हगून पुरेवाट झाली खी ! खी !!

In reply to by सोमनाथ खांदवे

वाचतांना

हगून हगून

पुरेवाट झाली खी ! खी !! नीट धुवा बर ! सध्या पावसाळा सुरु आहे, उगाच इंफ्केशन व्हायचे. :))